Home Blog Page 450

यावल तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या रब्बी हंगामाच्या ज्वारी व मका आधारभुत खरेदीअंतर्गत उद्धीष्ट वाढवावे : भाजपा किसान मोर्चाची मागणी….

0

 

यावल तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

 

तालुक्यातील शेतकरी बांधवांना ‘शासनाच्या किमान रब्बी हंगाम२०२१च्या ज्वारी व मक्याचे आधारभुत खरेदी किमत योजने अंतर्गत धान्य खरेदीचे उध्दीष्ठ वाढवुन मिळावे अशा मागणीचे लिखित निवेदनाद्वारे यावलचे तहसीलदार महेश पवार यांना भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष कृषीभुषण नारायण शशीकांत चौधरी यांच्या शिष्टमंडळाने केली आहे . या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा जळगाव जिल्हा अध्यक्ष कृषी भुषण नारायण चौधरी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , शासनाच्या किमान आधारभुत खरेदी किमत योजने अंतर्गत यावल तालुक्यातील रब्बी हंगाम ज्वारी साठी १४ शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे . त्यास त्यांची हेक्टरी २१ , ९५ क्विंटल प्रमाणे ४६९ क्विंटल खरेदी होणे अपेक्षीत आहे व मक्याची तालुक्यातुन १५४ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे . त्यास त्यांची हेक्टरी ४० क्विंटल प्रमाणे ८९२४ क्विंटल खरेदी होणे अपेक्षित आहे . पण शासनाकडुन यावल तालुक्यासाठी ज्वारी खरेदीचे १००क्विंटलचे व मका १२०० क्विंटल खरेदीचे उद्धीष्ट देण्यात आलेले आहे . म्हणजेच ३६९ क्विंटल ज्वारी व७७४ क्विंटल मका खरेदी पासुन यावल तालुक्यातील शेतकरी बांधव खरेदी पासुन वंचित राहतील , त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांचे फार मोठे आर्थीक नुकसान होणार आहे . तालुक्यातील शेतकरी बांधवांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने त्वरित ज्वारी व मका खरेदीसाठीचे वाढीव खरेदी उद्धीष्टचे आदेश काढावे जेणे करून पाऊस सुरू होण्यापुर्वी शेतकऱ्यांच्या धान्याचे मोजमाप वेळेत व विहीत मुदतीत पुर्ण होईल अशा योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षाकृत मागणी चे निवेदन तहसीलदार महेश पवार यांना भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष कृषी भुषण तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक नारायण शशीकांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष सागर राजेन्द्र महाजन , भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ .कांचन ताराचंद फालक , भाजपाचे यावल शहर अध्यक्ष डॉ . निलेश गडे आणी परेश नाईक यांच्या शिष्टमंडळाने केली असुन या प्रसंगी नायब तहसीलदार आर डी पाटील उपस्थित होते.

हैदराबाद नागपूर रोड वरील सोनेगाव ,कुटकी,दारोडा येथे सर्विस रोड देण्याबाबत आकाश पोहाणे तालुकाध्यक्ष भाजप यांनी केली निवेदनातून मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा
दारोडा :- 19.6.21
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात मौजा सोनेगाव (कुटकी )व मौजा दारोडा तहसील हिंगणघाट येथील बोकद्या खालून सर्विस रोड.
देण्यात आलेला नाही त्यामुळे अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले व कायमचे अपंगत्व आले आहे करिता बोगदा खालून 300 मीटरच्या सर्विस रोड देण्यात यावे म्हणजेच साधारण सात ते आठ गावातील लोकांना जाण्यास सोयीचे होईल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात मौजा दारोडा तहसील हिंगणघाट येथील बोगदा असून नागपूर कडून हैदराबाद कडे जाताना डाव्या बाजूच्या सर्विस रोड न केल्यामुळे टेंबा चौरस्ता येथे नेहमीच अपघात होत असून केलेल्या बोगद्याच्या कसल्याच प्रकारचा फायदा झालेला नाही करिता बोगद्याजवळ सर्विस रोड बनवून देण्यात यावे अशी मागणी मा.नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांना निवेदनातून तालुका अध्यक्ष आकाश पोहाने (भाजप)व विठू बेनिवार तालुकाध्यक्ष (भाजयुमो) यांनी केली आहे

भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल बांधून देण्याबाबत नगरसेवक प्रकाश राऊत यांनी केली निवेदनातून मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा
18.6.21
हिंगणघाट इथून तिसरी रेल्वे लाईन सुरु झाल्यामुळे शास्त्री वार्डातील नागरिकांना शहरांमध्ये जाण्याकरीता फार अडचण निर्माण होणार आहे तसेच लहान मुलांना शाळेत जाणे येण्यास, वरिष्ठ नागरिकांना रेल्वे लाइन क्रॉस करणे ,बिमार पेशंटला दवाखान्यात नेण्याकरता ,तसेच डिलिव्हरी पेशंट यांना सर्वांना जाण्यास अडचणीचा सामना करावा लागतो , रेल्वे लाइन क्रॉस करताना अत्यंत धोकासुद्धा होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता वरील बाबी लक्षात घेता किसान जीन पासून एक भुयारी मार्ग किंवा उडान पूल बांधकाम करून देण्याबाबत यावा जेणेकरून शास्त्री वार्ड येथील नागरिकांना होणाऱ्या समस्या सुटतील मा. श्री नितिन गडकरी केंद्रीय पर्यावरण मंत्री भारत सरकार दिल्ली यांनानिवेदनातून केले मागणी .

भारतीय जनता युवा मोर्चा कडून मा.नितीन गडकरी यांना सर्विस रोडमध्ये वाढ करण्याबाबत निवेदन

0

 

सचिन वाघे वर्धा
17.6.21
हिंगणघाट ते जाम वरील सर्विस रोड उब्दा या गावापर्यंत वाढ करण्यातयावी
या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे.
सात किलोमीटरचे रस्ते दरम्यान आठ ते दहा खेडेगाव आहे
आजंती, एमआयडीसी ते उब्दा पर्यंत जवळपास पन्नास उद्योगधंदे कारखाने आहे तसेच जामची सूतगिरणी सुद्धा आहे .
सर्व मजूर वर्ग भोवतालच्या भागातील असून ऑटो, दुचाकीवर ,काही पायदळ सुद्धा नेहमी येणे-जाणे करते
बहुतांश शेत जमिनी ह्या ज्या पलिकडच्या भागात असून शेती विषयक सर्व कामाकरिता नेहमी जाणे-येणे असते
संपूर्ण भागातील लोकांना हिंगणघाट मध्ये प्रत्येक महत्त्वाच्या कामाकरता शिक्षण आरोग्य, प्रशासन व इतर कामांकरिता दिवस-रात्र जाणे येणे करावे लागते .मध्यंतरी झालेले अपघात स्थानिक लोकांचे असून विदारक होते की ते सांगणे खूप अवघड आहे . आमदार समीर कुणावर मार्फत युवा मोर्चा व समस्त कामगार ,शेतकरी, विद्यार्थी वाहतूकदार, उद्योजकांकडून श्री अंकुश ठाकूर नगरसेवक, प्रदेश सचिव भाजयुमो यांनी निवेदन दिले

ना.नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय महामार्गावरील उड़ानपुलाचे लोकार्पण आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळेच पुलाची निर्मिती..ना.नितीनजी गड़करी

0

 

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.१७
वर्धा जिल्ह्यातील अनेक विकास कामे रस्ते जवळपास पूर्ण होत असून वर्धा जिल्ह्यात विकासाला गती मिळाली असल्याचे ना. नितीनजी गडकरी यांनी सांगितले, आमदार समीर कुणावार यांनी मागणी केल्याप्रमाणे येथे एम्स वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन नामदार नितीन गडकरी यांनी यावेळी दिले,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे केंद्र सरकारच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी ते बोलत होते.
स्थानिक शिवाजी मार्केट यार्ड येथे आज या उड्डाणपुलाचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस, राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावर,वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.पंकज भोयर,आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार दादारावजी केचे, विधान परिषद सदस्य डॉ.रामदास आंबटकर हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एड. सुधीर कोठारी,हिंगणघाट नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, वर्धा जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सरीता गाखरे, जिल्हा परिषद सभापती मृणाल माटे, माधव चंदनखेडे,पंचायत समिती सभापती सौ.शारदा आंबटकर,समुद्रपुर प.स.सभापती सुरेखा टिपले,वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार इत्यादि मान्यवर व्यासपीठावर हजर होते.
राष्ट्रीय महामार्गावरील शेडगाव येथील उड्डाणपुलाचा शिलान्यास करुन ना.गडकरी हे दुपारी १.३० च्या सुमारास हिंगणघाट येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पोचले, त्यांनी नांदगाव चौक येथील सुमारे १.४२ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले, या पुलाचे मूल्य ८५.२८ करोड आहे,दिल्ली येथील विद्या इंफ्रा या कंपनीने या पुलाचे बांधकाम केले आहे. स्थानिक आमदार कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळे या पुलाची ना. गडकरी यांनी केंद्र सरकारतर्फे निधी देऊन मंजुर केला होता. सदर पुलाच्या निर्मितीमुळे राष्ट्रीय महामार्ग पलीकडे राहणाऱ्या शहरी व ग्रामीण लोकांना मोठी सुविधा झाली आहे या रस्त्यावर ती अनेक अपघात झाले असून त्यासाठीच आमदार समीर कुणावर यांनी या पुलाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले होते. आज लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नामदार गडकरी यांनीच
शेणापासून चांगल्या प्रकारचा डिस्टेम्पर पेंट तयार होत असून त्याचा उपयोग करून रंगरंगोटी करण्यासाठी पुलाची निर्मिती करणाऱ्या कंत्राटदारास आवाहन
केले, आमदार समीर कुणावर यांनी वणा नदी खोलीकरण व सौंदर्यीकरण करण्याचा मुद्दा उपस्थित केला असता गडकरी यांनी त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, नागपूरच्या धर्तीवर नदीतुनही भविष्यकाळात वॉटर टॅक्सी सुरू करण्याच्या दृष्टीने त्यांनी योजना दिली.
राष्ट्रीय महामार्गावर झाडे लावून महामार्ग हिरवा करण्याचा सल्ला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले, कोरोना काळात नागरिकांचे मनोबल वाढले पाहिजे यासाठी मी व्यक्तिशः आलो असून मोठ्या प्रमाणात लसीकरण तसेच सामाजिक दूरता मास्क वापर इत्यादी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत निरोगी राहण्यासाठी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शेतकऱ्यांचा शेतमाल व उत्पादन निर्यात केले पाहिजे, हिंगणघाट शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा इतरांनी असा माल निर्यात करण्यासाठी प्रयत्न करावे त्यासाठी येथून रेल्वे वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन ना. नितीन गडकरी यांनी दिले शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी त्यांनी अनेक शासकीय योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी केले तर महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निदेशक यवतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाचेवेळी भाजपा सरचिटणीस किशोर दिघे, भूपेंद्र शहाणे,माजी जि.प.अध्यक्ष नितिन मडावी तसेच न.प.सदस्य भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना.गडकरी यांनी सदर कार्यक्रमानंतर शहरातील पत्रकार मंगेश वणीकर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली तसेच आमदार समिर कुणावार यांच्याही निवासस्थानी भेट दिली याप्रसंगी त्यांनी वणा नदी संवर्धन समितीचे निवेदन स्विकारले.
हिंगणघाट नगरपालिका अध्यक्ष प्रेम बसंतानी यांच्या निवासस्थानीसुद्धा त्यांनी भेट दिली.

प्रेमभंगातुन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि.१६ जून प्रेमभंगातुन आज एका युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असतांनाच जागरुक नागरीकांनी वेळीच मदत केल्याने त्या युवतीचे सुदैवाने प्राण वाचले.
सदर मुलीने हिंगणघाट पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शहरातील शास्त्री वार्ड येथे राहणार्‍या या २० वर्षीय युवतीचे मागील चार वर्षापासुन चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकावर प्रेम होते.आज दिनांक १६ रोजी सकाळी सदर युवतीने युवकाला फोन करुन लग्नाची गळ घातली.त्याने लग्न करण्यास नकार दिल्याने निराशेपोटी सकाळी १० च्या सुमारास घरी आली.तीचे घरीसुद्धा त्यावेळी कुणीही नव्हते.
नैराश्यापोटी तिने सरळ राष्ट्रिय महामार्गावरील वणा नदीचा पुल गाठला व कोणताही विचार न करता पुलावरुन नदीत उडी मारली.या दरम्यान तेथून जाणार्‍यांचे तिच्याकडे लक्ष गेले, तेथून जाणाऱ्या नागरिकांनी आरडाओरड करुन नदीत मासेमारी करणार्‍यांचे लक्ष वेधले.मासेमारी करणार्‍यांनी पाण्यात गटांगळ्या खात असलेल्या या युवतीला नदी पात्रातुन बाहेर काढले.वेळीच रुग्णवाहिका बोलावण्यात आली व तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी तिच्या पोटातुन पाणी काढुन पुढील उपचारासाठी वर्धा रुग्णालयात पाठविण्यात आले.सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिस पुढील तपास करीत आहेत.

जबरी चोरीचे दोन गुन्हे बारा तासाच्या आत उघड

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.१६ एकाच रात्री दरम्यान दाखल असलेले जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकिस आणून तीन
आरोपिंना गजाआड करीत एकूण ८८ हजार ५६३ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी हिंगणघाट पोलिसांनी केली.
काल दिनांक १५ रोजी रात्री १२.४५ दरम्यान राष्ट्रीय महामार्गा वर आजंती बस स्टॉप तसेच रायगड हॉटेल जवळ फिर्यादी
गुरूदेव कवडुजी उमरे वय 65 वर्षे रा. भिमनगर वार्ड, हिंगणघाट व त्यांचा मित्र मारोती उरवते रा. भिमनगर वार्ड, हिंगणघाट हे पायदळ आंजती बस स्टॅण्ड कडुन हिंगणघाटकडे येत होते, तसेच दुसरा फिर्यादी
अनुप विनयराव पवार वय ३२ वर्षे रा. शास्त्री वार्ड, हिंगणघाट हे रिमडोह कडुन हिंगणघाटकडे येतांना पांढन्या
रंगाच्या मोपेड गाडीवरील चार अनोळखी इसमांनी धारदार चाकुचा धाक दाखवुन तसेच चाकुने गंभीर जखमी
करून त्यांचे कडुन जबरीने रोख रक्कम तसेच मोबाईल हिसकावुन नेल्याच्या दोन्ही फिर्यादिनी हिंगणघाट पोलिसांत तक्रार केली. सदर तक्रारीवरुन पोलिसांनी
अपराध क्र. 0५२२/२०२१ कलम ३९७, ३४भादंवि तसेच अप क्र. ५२३/२०२१ कलम ३९७, ५०४, ५०६, ३४ भादंवि
चा गुन्हा नोंद केला.
सदर गुन्हा दाखल होताच पो.स्टे. हिंगणघाट येथील सहायक पोलीस निरिक्षक पाटणकर, उपनिरिक्षक अमोल लगड तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.हवा. शेखर डोंगरे यांनी त्यांच्या पथकासह
आजंती व रिमडोह शिवारात चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेतला असता सदर
गुन्हयातील संशयीत आरोपीची पांढऱ्या रंगाची मोपेड स्कूटर आजती शिवारात सापड़ली तसेच तीन संशयीत आरोपी शुभम अशोक कोल्हे वय २० वर्षे रा. आंजती, रोशन रामाजी बोभाटे, वय २२ वर्षे,रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट आणि चंद्रकांत उर्फ शेखर शंकर कुटारकर वय २२ वर्षे रा. गव्हा कोल्ही यांना अटक करण्यात आली.
सदर तिन्ही आरोपींची कसुन
चौकशी केली असता त्यांचे फिर्यादिंना धाक दाखवित जबरीने लूटलेली नगदी रक्कम, मोबाईल, गुन्हयात वापरलेले वाहन, त्यांचे जवळ असलेले
प्राणघातक हत्यार इ. असा एकूण ८८ हजार ५६३ रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले.

यावल पंचायत समितीमध्ये ग्रामीण महाआवास ई .गृहप्रवेश अभियान कार्यक्रमाचा मान्यवराच्या उपस्थित शुभारंभ

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

महाआवास अभियान अंतर्गत ग्रामीण पातळीवरील ई. ग्रुह प्रवेश कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थित यावल येथे पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला.
ग्रामीण गृहनिर्माण ला चालना देण्यासाठी ग्राम विकास विभाग मार्फत पुढील शंभर दिवसात राबवण्यात येणाऱ्या महा आवास अभियानाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या अभियानाद्वारे ग्रामीण भागात सुमारे ८ .८2 लाख घरकुलाची निर्मिती करण्याचा निर्धार करण्यात आला सर्वांनी एकत्रित सहभागातून अभियान यशस्वी करावे असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे
ग्रामीण भागात ‘महाआवास’ अभियानातून घरकुल आवास अभियान- ग्रामीण’  अभियान राबविण राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून नोव्हेंबर 2020 ते 28 नोंव्हेबर 2021 या कालावधीत शंभर दिवसीय ‘महा आवास अभियान- ग्रामीण’  अभियान संपुर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांनी येत्या शंभर दिवसात शंभर टक्के उद्दीष्ट पूर्ण करावे. ‘महा आवास’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण घरकुल निर्मितीला गती द्यावी आणि आपल्या क्षेत्रातील विभागाला प्रथम क्रमांकावर आणावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तालुक्यातील स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना केले.  याप्रसंगी यावल पंचायत समितीच्या सभापती सौ. पल्लवी पुरूजित चौधरी, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ .निलेश पाटील
राज्य परिषद संघाचे जिल्हा अध्यक्ष सरपंच पुरोजित चौधरी .ई . ग्रह प्रवेश कार्यक्रम अझरुददीन फारुकी ग्रमिण गृह अभियंता, किरण सपकाळ ( ग्रमिण अभियंता ) , घरकुल विभागाचे संगणक संचालक मिलींद कुरकुरे,
जावेद तडवी, अक्षय शिरसाडे रौनक तडवी आदी या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते .

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

0

 

नांदुरा( प्रफुल्ल बिचारे):-

तालुक्यातील माळेगाव (गोंड) येथे शेतात मशागत करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करू गंभीर जखमी केल्याची घटना १३ जून २०२१ च्या दुपारी ४ वाजे दरम्यान घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की पांडुरंग राजाराम बारब्दे वय ५३ वर्ष राहणार माळेगाव गोंड हे आपल्या शेतात १३ जून च्या दुपारी काकर काढीत असताना त्यांच्यावर पाठीमागून येऊन रानडुकराने अचानक हल्ला चढवला यात त्यांच्या डाव्या पायाला व डाव्या हाताला गंभीर जखमा केल्या. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर पांडुरंग बारब्दे हे जवळपास एक तास शेतातच पडलेले होते. गावकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी शेताकडे धाव घेऊन त्यांना तात्काळ नांदुरा येथे हलविले.
मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकोला येथे नेण्यात आले सदर शेतकरी बांधव हा अत्यल्पभूधारक असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे. तसेच वनविभागाने या हिंस्त्र प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करीत पिकांचे व शेतकन्यांचे या प्राण्यांपासून संरक्षण करावे अशी मागणी पुढे येत आहे.

उनाड वारा साहित्य परिवार आयोजित दिग्गजांच्या कविता व नवोदितांचे सादरीकरण काव्यवाचन स्पर्धा यशस्वीपणे पार पडली

0

 

 

 

उनाड वारा साहित्य परिवार आयोजित , कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन , सांगली येथे होणारे कवी संमेलन तात्पुरत्या काळासाठी स्थगित केलं . आणि अधूनमधून गुगलमीट अँपद्वारे आठवड्यातून , पंधरा दिवसातून , जसे जमेल तसे ऑनलाईन कवी संमेलन घेतले . आणि एक दिवस अविनाश शिंदे ( माऊली ) सरांच्या डोक्यात एक कल्पना आली की , आपण स्वतःच्या कविता सादर करतच असतो . पण आपण आपल्या दिग्गज कवी / कवयित्रीच्या कविताही सादर करायला हव्यात . हा संकल्प मनात ठेवून , त्यांनी एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे नियोजन करून , त्यांनी साहित्य क्षेत्रात एक इतिहास घडविला . आणि गुगलमीट अँपद्वारे दिग्गजांच्या कविता व नवोदितांचे सादरीकरण , अशा प्रकारे काव्यस्पर्धा यशस्वीरित्या पार पडली . या स्पर्धेचे आयोजन कवी अविनाश शिंदे यांनी केले . तर या स्पर्धेचे परीक्षक म्हणून कवी अरविंद भामरे यांनी काम पाहिले . ह्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमध्ये ,

कवी – संजय जाधव – बालकवी
कवी – हरिहर आनंदहरी – विंदा करंदीकर

कवी – प्रविण पुजारी – सुरेश भट
कवी – युवराज जगताप – ग्रेस

कवी – अनिल केंगार – वामनदादा कर्डक
कवी – जयराम मोरे – सुरेश भट

कवयित्री – प्रा . त्रिशिला साळवे – मंगेश पाडगावकर
कवयित्री – वंदना राऊत – बहिणाबाई चौधरी

कवयित्री – अस्मिता इनामदार – सुरेश भट
कवयित्री – मनीषा रायजादे पाटील – इंदिरा संत

कवयित्री – रोहिणी गंधेवार – शांताबाई शेळके
कवयित्री – दिपाली अष्टुरे – मंगेश पाडगावकर

ह्या सर्व कवी / कवयित्रीनी दिग्गजांच्या प्रत्येकी दहा कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली .
सहा गटातून तीन नंबर काढणे . खरंच खूप अवघड काम होतं . पण परीक्षक कवी , अरविंद भामरे सरांनी अगदी काटेकोरपणे निरीक्षण करून तीन नंबर काढले .

*प्रथम क्रमांक.*

१) श्री. संजय जाधव
२)हरिहर आनंदहरी
( बालकवी, विंदा करंदीकर

〰️〰️〰️〰️〰️〰️

*व्दितीय क्रमांक*

१)रोहिणी गंधेवार
२)दिपाली अष्टुरे
( शांताबाई शेळके, मंगेश पाडगावकर )

*तृतीय क्रमांक*

१)प्रा. त्रिशिला साळवे
२)वंदना राऊत
( मंगेश पाडगावकर, बहिणाबाई चौधरी)

सलग सहा दिवस चालणारी ही काव्यमय शृंखला , आनंदमय , प्रेममय आणि शांतपणे पार पडली . आणि सगळ्या कविता बहारदार असल्यामुळे आनंद गगनात मावत नव्हता . कामात सगळे व्यस्त असूनसुद्धा , वेळातवेळ काढून काव्यस्पर्धा छान केली . मला माझ्या उनाड वारा साहित्य परिवाराचा अभिमान आहे . असं सांगत कार्यक्रमाच्या मान्यवरांनी सहभागी कवी / कवयित्रीना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .