Home Blog Page 451

विरावली निवासी व बिएसएफ चे अनुसचिवीय उपनिरिक्षक महेन्द्र पाटील यांना पोलीस सेवा अंतरिक सेवा पदक व सन्मानपत्र द्वारे सन्मानित

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

नॉर्थ ईस्ट (मेघालय आणि त्रिपुरा) येथे जवळपास 4 वर्ष शांतता व सामान्य वातावरण राखण्याच्या दृष्टीने महानिदेशक, सीमा सुरक्षा बल (BSF) नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार पूर्वोत्तर च्या अती दुर्गम भाग असलेल्या मेघालय आणि त्रिपुरा येथे केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार सेवेच्या परिचालन उत्कृष्टतेवर आधारित उत्कृष्ठ सेवे करिता विरावली गावचे राहिवासी सध्या बीएसएफ मधे सहा. उपनिरीक्षक(अनुसचिवीय) पदावर तैनात श्री महेन्द्र पुंडलिक पाटील गांव विरावली तालुका यावल जिल्हा जळगाव यांचा श्री. राम अवतार, संयुक्त निदेशक /महानिरीक्षक, सीमा सुरक्षा बल टेकनपूर, राहणार ग्वालियर (मध्यप्रदेश )यांचे हस्ते संपूर्ण देशावर ओढवलेल्या कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारी संकट काळात कोविड 19 चे शिस्तीने काटेकोरपणे पालना केल्याबद्दल एक छोटे खानी कार्यक्रमात वरिष्ठाच्या हस्ते *पोलिस अंतरीक सेवा पदक व प्रमाणपत्र* प्रदान करण्यात आले या सम्मानाने विरावली गावातिल नागरिक व यावल तालुक्या करिता ही अभीमानाची गौरवास्पद आणी आंनदाची बाब आहे. या सम्मान सोहळाच्या कार्यक्रम प्रसंगी श्री.के.एल. शाह, (उपमहानिरीक्षक ) श्री. विक्रम कुंवर, (कमांडेंट ) श्री अरुण कुमार गंगवार, ( द्वितीय श्रेणी कमांडिंग अधिकारी )व अन्य महत्वाचे अधिकारीगण प्रामुख्याने उपस्थित होते.

डोंगर कठोरा येथे नादुरूस्त महीला शौचालय कोसळण्याच्या मार्गावर ग्राम पंचायत लक्ष द्यावे ग्रामस्थांची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

केन्द्र शासन व राज्य शासनाच्या केन्द्रस्थानी असलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाचे तिन तेरा वाजवणारी ग्रामपंचायत म्हणजे तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्राम पंचायत म्हणावी लागेल , डोंगरकठोरा येथील बेघर वस्तीतील सार्वजनिक महीला शौचालय कोसळण्याच्या मार्गावर असून कोणतीही अप्रीय घटना होवु नये याची काळजी घेवुन या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देवुन शौचालयाची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे . या संदर्भातील माहीती अशी की डोंगर कठोरा तालुका यावल येथील ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात परसाडे मार्गावरील बेघर वस्तीत असलेल्या महीलासाठीची सार्वजनिक शौचालय कुठल्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर असुन नादुरुस्त शौचालयामुळे महीलांची मोठी गैरसोय होत असल्याचे दिसुन येत असुन , याविषयी गावातील नागरीकांनी व महीलांनी वारंवार तोंडी तक्रार ग्राम पंचायत कडे करून देखील या महिलांच्या व त्या परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे कारभारी बेजबाबदारपणे वागणुक देवुन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आहेत . दरम्यान काही दिवसात होवु घातलेल्या पावसाळ्या ही महीलांसाठी असलेल्या सार्वजनिक शौचालय कोसळल्यास काही अप्रीय घटना घडल्यास यास पुर्णपणे जबाबदारी ही डोंगर कठोरा ग्रामपंचायतीची असणार अशा ग्रामस्थांच्या तक्रारी व ग्रहाणे आहे . दरम्यान डोंगर कठोरा ग्रामपंचायतच्या माध्यमातुन मागील दोन वर्षा पासुन शासनाच्या विविध विकास कामांसाठीच्या मिळालेल्या लाखो रुपयांच्या निधीच्या माध्यमातुन सर्व अत्यंत निकृष्ठ प्रतीची कामे करण्यात आली असून , या कामांविषयी ग्रामस्थांच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी असतांना ही संबधीत अधिकारी यांच्याकडुन या कामांची गुणवत्ता चौकशी न करता निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारांची बिले काढली जात असल्याची डोंगर कठोरा ग्रामस्थांची ओरड आहे .

बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी व संलग्न संघटना तर्फे वाढत्या महागाईच्या विरोधात धक्का मारो आंदोलन

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट :– 15.6.21
बहुजन मुक्ति पार्टी महिला आघाडी व संलग्न संघटना अंतर्गत वर्धा जिल्ह्यात आज १५ जून २०२१ रोज मंगळवारला केंद्र आणि राज्य सरकारने लादलेल्या महागाईमुळे महाराष्ट्रातील ३६ जिल्हा कार्यालयावर आणि 358 तहसील कार्यालयावर एकाच वेळेस बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीतर्फे ११ ते 2 या कालावधीत मोठ्या संख्येने कलम १९(१) नुसार आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक १५ जून २०२१ ला हिंगणघाट शहरात बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी, युवा आघाडी तसेच संलग्न संघटना तर्फे संविधानीक मार्गाने आंदोलन करण्यात आले आहे. आमच्या विद्यमान सरकारच्या विरोधातील मागण्या महामहीम राष्ट्रपती यांना खालीलप्रमाणे आहेत.
१. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाची गॅस यांचे भाव कमी करा.
2. खाद्य तेलाचे भाव कमी करा.
3. सरकी व सरकीढेप यांचे वाढलेले भाव कमी करा.
4. इलेक्ट्रिक चे वाढलेले बिल कमी करा.
5. covid-19 चा वाढता कहर लक्षात घेता शिधा वाटप केंद्रातून गहू, तांदळासोबत खाद्यतेल, चनादाळ, तुरडाळ तसेच हळदी पावडर, मिरची पावडर व मसूर डाळ इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा कारण कोरोणावर लॉकडाऊन हा काही पर्याय नाही त्यामुळे लॉक डाऊन लावण्यात येऊ नये.
6. ह्या आमच्या वरील मागण्या मान्य न केल्यास खुर्ची खाली करा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनावर राहील अशा प्रकारचा इशारा शासनास देण्यात आला. या आंदोलनामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माननीय मडावी, भारत मुक्ती मोर्चाचे सुरज ताकसांडे, इंडियन लायर असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. संदीप कांबळे, बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कचे तालुका अध्यक्ष चंद्रहास्य कांबळे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे ता.अध्यक्ष गजाननजी माऊसकर, राष्ट्रीय शिकलीगर शीख मोर्चाचे तालुका अध्यक्ष साधूसिंग भादा, बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत जवादे, बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीचे श्रीमती येनोरकर मॅडम, बी. एम. पी. चे जिल्हा अध्यक्ष गेमदेव मस्के, उपाध्यक्ष संजय ढोकपांडे व बी. एम. पी. चे तालूका युवा अध्यक्ष संजय डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले‌.

लोणी(टाकळी)येथे अपंग माहिती ,मार्गदर्शन व मदत केंद्राचे उद्घाटन.

0

 

अपंग नेते शेख अनिस पत्रकार याचा हस्ते

अमरावती, अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एक अराजकीय सामाजिक संघटना असुन या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अपंगाचे न्याय व हक्काचे कार्य सुरु असून शासकीय योजना व सवलतींची अपंगांना माहिती मीळावी म्हणून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडे.तालुका येथील लोणी(टाकळी)येथे अपंग माहिती, मार्गदर्शन व मदत केंद्र चे उदघाटन अपंग नेते शेख अनिस पत्रकार याचा हस्ते करून सुरु करून अपंगांना योजना व सवलतींचा लाभ मीळावा म्हणून हे केंद्र खुले करून अपंगांना मदत मिडेल अशी माहिती अपंग सेवक सुधाकरजी काळे यांनी यावेळी सांगितलं आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष मयुर मेश्राम, प्रदेश महासचिव राजीक शाह,अपंग मार्गदर्शक राहुल वानखडे, शेख रुस्तुम, अनवर शाह,सिध्दार्थ किर्दक,शरद गणवीर, संदिपभाऊ,मुतलीक चाऊस आदी अपंग बांधव उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ता लहान मुलांना आहार वाटप

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रावेर लोकसभा जनहित चेतन अढळकर यांच्या हस्ते व प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच सर्व पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील बोरावल गेट परिसरातील आदिवासी वस्तीतील लहान चिमूकल्या मुलांसोबत सकस आहार अंडी केळी बिस्किट काजू बदाम असा पोस्टीक आहार वाटप करून आज दिनांक १४ जुन ठाकरे रोजी वाढदिवस मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला, याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल तालुका उपाध्यक्ष शाम पवार विद्यार्थी सेना शहराध्यक्ष गौरव कोळी विपुल येवले, प्रतीक येवले, विभागाध्यक्ष आबिद कच्छी , राज शिर्के, आकाश चोपडे ,वैभव दांडेकर, खुशाल चौधरी, ओम लोणारी ,गोलू भोई यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व आदींनी कार्यकर्त्यात्यांसह उपस्थित राहुन कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी पारिश्रम घेतले . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रथम या आदीवासी वस्तीवरील गोरगरीब कुटुंबांतील चिमुकल्या लहान मुलांना सकस आहार वाटप करण्यात आल्याने मुलांच्या कुटुंबांनी मनसे चेरावेर लोकसभा जनहित जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर व त्यांच्या सैनिकांचे मनपुर्वक आभार मानले.

साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्र अंतर्गत वाढीव प्रसुती गृह बांधकामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली नागरीकांची दिशाभुल : मिलींद जंजाळे यांचे आरोप

0

 

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील साकळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी ता. यावल अंतर्गत प्रसूती गृह वाढीव बांधकामाच्या मंजुरी बाबत
साकळी ता यावल जि जळगांव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र शासन निर्णयानुसार सुसज्ज प्रसूती गृह वाढीव ईमारत बांधकामा बाबत विद्यमान जि प सदस्य तथा आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील व काही साकळी गावातील स्थानिक पदाधिकारी सदरील प्रसूती गृह आम्ही जि. प. निधीतून केलेले आहे असे सांगून चक्क जनतेची दिशाभुल करीत आहे का याबाबत शंका निर्माण झाली असता मी संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगांव यांच्याकडे दिनांक:-31/05/2021 रोजी मिलींद जंजाळे यांनी लेखी स्वरूपात अर्ज दाखल केला असता सदर अर्जात सदरील प्रसूती गृहाची ईमारत बांधकाम कश्या प्रकारे मंजूर आहे आणि त्यासाठी कोणी पाठपुरावा केला आहे का व ती कोणी मंजूर केली अशी माहिती मागितली होती. मिलींद जंजाळे यांच्या अर्जावर संबंधित आरोग्य विभागा कडून दिनांक :-10/06/2021 रोजी लेखी स्वरूपात माहिती प्राप्त झाल्याने त्या पत्रानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी तालुका यावल जिल्हा जळगांव अंतर्गत प्रसूती गृह वाढीव बांधकामच्या मंजुरी बाबत शासन निर्णय देण्यात आलेला असुन सदरचे बांधकाम हे राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NRHM) अंतर्गत 13 व्या वित्त आयोग मधुन मंजूर आहे. असे सांगण्यात आले आहे. तरी सुद्धा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य सभापती व गावातील काही स्थानिक पदाधिकारी खोटे नाटे बोलुन जनतेची दिशाभूल का करीत आहे. व त्यांना जनतेची दिशाभूल करण्याचा अधिकार कोणी दिला असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. त्याच प्रमाणे संबंधित पदाधिकारी यांनी सदरील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मंजूर झालेल्या बांधकामावर नेमणूक असलेल्या शिंदे नमक अभियंता यांच्यावर भूमिपूजन समयी दबाव आणून भूमिपूजन ठिकाणी आलेल्या जनते समोर आम्ही जि. प. निधीतून मंजूर केलेले आहे असे सांगण्यास भाग पाडले तरी प्रसूती गृह वाढीव बांधकामाच्या मंजुरी विषयी पुरावा असुन संबंधित विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील व साकळी गावातील काही स्थानिक पदाधिकारी यांनी स्वतःच्या फायद्या साठी प्रसूती गृह आम्ही मंजुर करून आणले असे सांगून श्रेय घेऊ नये आणि जनतेची दिशाभुल करू नये असे मिलिंद जंजाळे सामाजिक कार्यकर्ता
रा. साकळी. ता. यावल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.साकळी प्राथमिक आरोग्य केन्द्र अंतर्गत वाढीव प्रसुती गृह बांधकामाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली नागरीकांची दिशाभुल : मिलींद जंजाळे यांचे आरोप

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी ता. यावल अंतर्गत प्रसूती गृह वाढीव बांधकामाच्या मंजुरी बाबत
साकळी ता यावल जि जळगांव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र शासन निर्णयानुसार सुसज्ज प्रसूती गृह वाढीव ईमारत बांधकामा बाबत विद्यमान जि प सदस्य तथा आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील व काही साकळी गावातील स्थानिक पदाधिकारी सदरील प्रसूती गृह आम्ही जि. प. निधीतून केलेले आहे असे सांगून चक्क जनतेची दिशाभुल करीत आहे का याबाबत शंका निर्माण झाली असता मी संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद जळगांव यांच्याकडे दिनांक:-31/05/2021 रोजी मिलींद जंजाळे यांनी लेखी स्वरूपात अर्ज दाखल केला असता सदर अर्जात सदरील प्रसूती गृहाची ईमारत बांधकाम कश्या प्रकारे मंजूर आहे आणि त्यासाठी कोणी पाठपुरावा केला आहे का व ती कोणी मंजूर केली अशी माहिती मागितली होती. मिलींद जंजाळे यांच्या अर्जावर संबंधित आरोग्य विभागा कडून दिनांक :-10/06/2021 रोजी लेखी स्वरूपात माहिती प्राप्त झाल्याने त्या पत्रानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र साकळी तालुका यावल जिल्हा जळगांव अंतर्गत प्रसूती गृह वाढीव बांधकामच्या मंजुरी बाबत शासन निर्णय देण्यात आलेला असुन सदरचे बांधकाम हे राष्ट्रीय आरोग्य अभियान ( NRHM) अंतर्गत 13 व्या वित्त आयोग मधुन मंजूर आहे. असे सांगण्यात आले आहे. तरी सुद्धा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य सभापती व गावातील काही स्थानिक पदाधिकारी खोटे नाटे बोलुन जनतेची दिशाभूल का करीत आहे. व त्यांना जनतेची दिशाभूल करण्याचा अधिकार कोणी दिला असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. त्याच प्रमाणे संबंधित पदाधिकारी यांनी सदरील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मंजूर झालेल्या बांधकामावर नेमणूक असलेल्या शिंदे नमक अभियंता यांच्यावर भूमिपूजन समयी दबाव आणून भूमिपूजन ठिकाणी आलेल्या जनते समोर आम्ही जि. प. निधीतून मंजूर केलेले आहे असे सांगण्यास भाग पाडले तरी प्रसूती गृह वाढीव बांधकामाच्या मंजुरी विषयी पुरावा असुन संबंधित विद्यमान जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील व साकळी गावातील काही स्थानिक पदाधिकारी यांनी स्वतःच्या फायद्या साठी प्रसूती गृह आम्ही मंजुर करून आणले असे सांगून श्रेय घेऊ नये आणि जनतेची दिशाभुल करू नये असे मिलिंद जंजाळे सामाजिक कार्यकर्ता
रा. साकळी. ता. यावल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.साकळी येथील वाढीव प्रसुतीगृहाकरीता जिल्हा प्रशासनाकडे मी वारंवार पाठपुरावा केलेला आहे. यात कुठलीही शंका नाही.
जिल्हा परिषदेमध्ये विविध विकास कामांसाठी एकच विभागातून निधी उपलब्ध होत नाही तर वेगवेगळ्या विभागातून निधी उपलब्ध होत असतात. सर्व संबंधित प्रस्ताव जिल्हा परिषदेने मधूनच जात असतात. त्यासाठी पाठपुरावा करणे फक्त महत्त्वाचे आहे. कुठल्याही कामांच्या वर्कऑडरवर नाव नसते. प्रसूतीगृहाच्या बांधकामासाठी जि.प.मार्फत निधी दिलेला आहे.गटात विविध विकास कामे करणे माझे कामच असून आरोग्याच्या कामास मी प्रथम प्राधान्य देतो.तसेच मीच काम आणलेले असल्याने मला श्रेय घेण्याची गरज नाही.गटाचा विकास डोळ्यात अंजन भरल्यासारखं झालेला आहे त्यामुळे कोणीही काही आरोप केले तरी साकळी- दहिगाव गटाचा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहील.
■रविंद्र सुर्यभान पाटील
सभापती,शिक्षण व आरोग्य,जि.प.जळगाव

सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत आज १४ जुन रोजी ४५ वर्षावरील नागरिकांसाठी  कोवीशील्ड  कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र कोळवद आणी दहीगाव या ठिकाणी आज लसीकरण सुरू करण्यात आले असुन परिसरातील नोंदणी झालेल्या नागरिकांनी या लसीकरण शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडुन करण्यात आले आहे . या संदर्भात सावखेडा सिम तालुका यावल येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राकडुन देण्यात आलेल्या माहीतीनुसार आज दिनांक १४ जुन रोजी सावखेडा |सिम या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या दहिगाव आणी प्राथमिक आरोग्य उपकेन्द कोळवद या गावातील नागरीकांसाठी लसीकरण सुरू राहणार अयुन याकरीता नागरीकांसाठी सुचना आहे त्या पुढील प्रमाणे १) ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात येत येईल.
(२) ज्या नागरिकांनी कोवीशील्ड लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांनी *८४ दिवसानंतरच* ( १२ ते १६ आठवडे दरम्यान ) *दुसरा डोस* घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर यावे.
लसीकरणाला येताना नागरीकांनी जेवण किवां नाश्ता करूनच यावे व येतांना सोबत आपले आधार कार्ड आणि झेरॉक्स आणावे असे आवाहन सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वेद्यकीय अधिकारी डॉ . गौरव भोईटे आणी डॉ . नसिमा तडवी यांनी केले आहे .

यावल येथ महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार उत्साहात साजरी

0

 

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

 

येथील विविध पक्षाच्या वतीने हिंदुसुर्य क्षत्रिय गौरव विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती यावल येथे उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली . यावल येथील बाहेरपुरा परिसरात महाराणा प्रतापसिंह चौकात आज रविवार दिनांक १३ जुन रोजी क्षत्रिय कुल विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची तिथीनुसार ४८१वी जयंती सर्वपक्षीय कार्यकर्त व पदाधिकारी तथा समाज बांधव यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली आहे . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक प्रा . मुकेश येवले यावल चे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना आदरांजली वाहुन अभीवादन केले . यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे ,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे हितेश गजरे , विरेन्द्रसिंह सिसोदीया, प्रदीप पाटील , आंबालालसिंह राजपुत, मंजुर खान आदी समाज बांधव व ईतर सामाजीक कार्यकर्ते या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते . याप्रसंगी जयंती निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार समाजाच्या वतीने विरेन्द्रसिंह सिसोदीया यांनी मानले.

आदित्यसाहेब नव्या युगाचे शिलेदार रविंद्र वसंतराव भोजने

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

आज 13 जून रोजी युवासेना प्रमुख महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री युवकांचे प्रेरणास्थान युवासेना प्रमुख, पर्यावरण,पर्यटन,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त युवासेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र वसंतराव भोजने यांच्या तर्फे नांदुरा तालुक्यातील दहिगाव येथे वृद्धाश्रम मधील वयोवृद्ध मंडळी ना कपडे व मिठाई वाटून आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला या आश्रमातील असलेल्या वयोवृद्ध मंडळीने बाळासाहेबांच्या नातवाला आमचे खूप खूप आशीर्वाद म्हणून शुभेच्छा दिल्या. व त्याच प्रमाणे नांदुरा ते दहिगाव रस्ता हा सकाळी आणि संध्याकाळी नांदुरा शहरातील शेकडो लहान मुलां पासून तर महिला मंडळी वयोवृद्ध नागरिक या रोड नि फिरायला (मॉर्निग/इविनिग वाक) येत असतात. आज कोरोनाच्या महामारी मध्ये ओक्सिजन ची कमतरता भासत असताना युवासेना – विद्यार्थी सेने च्या वतीने आदित्यसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्य या रोड नि वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र वसंतराव भोजने, विद्याथी सेना शहर प्रमुख अभिराजे हिवराळे, युवासेना उपशहर प्रमुख सोनू चोपडे, किसान सेना शहर प्रमुख सागर वावटळीकर, युवासेना.सो.मी.तालुका प्रमुख निलेश तायडे,युवासेना विभाग प्रमुख ऋषिकेश जुमळे,पुरुषोत्तम सोनवणे,मुकेश निदाने, धनंजय वातपाळ,रामदास बघे,धीरज दाबेराव,सुरज जुमळे,संकेत जुमळे,ज्ञानेश्वर तायडे,किशोर राखोंडे आदी युवासैनिक,ग्रामस्थ उपस्थित होते.

परडा गावात वादळीने नुकसान झालेल्या घराची आमदार समीर कुणावार यांनी पाहणी करीत दिला मदतीचा हात

0

 

सचिन वाघे वर्धा

13.5.21 समुद्रपूर :— परडा गावात दिनांक ०९/०६/२०२१ रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला घरासह शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले तेथील नुकसान ग्रस्तांची आमदार समीर कुणावार यांनी पाहणी केली. वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाख्याने घराची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आमदार समीर कुणावार भेट घेतली. नुकसान झालेल्या घराला संसार उभे करण्यास मदत केली. त्यांच्या घरामध्ये सौ. ऊषा पंढरी चंदनखेडे ही महिला अनेक महिन्यापासून आजारी असून दिव्यांग आहे सोबतच श्री. पंढरी दादाजी चंदनखेडे हे सुद्धा दिव्यांग आहे त्यांच्याजवळ उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची त्यांचे वादळी पावसाने पूर्ण घर उडून गेल्यामुळे आमदार समीर कुणावार यांनी घराची पाहणी केली आणि त्यांचे घर उभे करण्यासाठी आवश्यक मदत केली.
नुकसानग्रस्त घराची पाहणी करते आमदार समीर कुणावार, समुद्रपूर पं. स. सभापती सौ. सुरेखा कैलास टिपले, परडा गावातील सरपंच सौ. सुवर्णा तडस, ग्रामपंचायत सदस्या वनिता पाल, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुरेखा धोटे, समाजसेवक कैलासराव टिपले, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर चंदनखेडे, तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.