Home Blog Page 453

महाराष्ट्र प्ररेश असंघटीत कॉग्रेस कामगार कायदेविषयक सल्लागार समितीच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. नितिन चौधरी निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार काँग्रेस नियुक्ती कार्यक्रम आज दिनाक ११/६/२०२१ रोजी यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचे हस्ते व योगेंद्रसिंग पाटील, बंटी भैय्या खान्देश काँग्रेस समन्वयक यांचे उपस्थित सोबत सौ मनीषाताई पाचपांडे प्रमुख उपस्थित खिरोदा येथे आमदार शिरीष चौधरी यांच्या निवासस्थानी कार्यक्रम पार पडला यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व असंघटीत कामगार काँग्रेसचे राज्य अध्यक्ष मोहम्मद बदरू जमा यांचे सूचनेवरून महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कॉंग्रेस कामगारांची बैठक जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश भैय्या बारसे व कार्याध्यक्ष फय्याज हुसैन , प्रसन्न गुणवंतराव देशमुख जिल्हा समन्वयक व जिल्हा प्रसिध्दी प्रमुख यांचे उपस्थितीत ॲड नितीन चौधरी यांची कायदेविषयक सल्लागार समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर ॲड. देवेंद्र आर बाविस्कर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर ॲड लोंढे यांची सचिवपदी तसेच कायदेशीर सल्लागार समिती वर, मदिना तडवी यांची अध्यक्ष यावल तालुका ,सौ प्रेरणा ताई भंगाळे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी व योगिताताई शुक्ला यांची जिल्हा उपाध्यक्षपदी उल्हास मुरलीधर नेमाडे, जगदीश धांडे यावल तालुका सचिव प्रशांत किरगे फैजपूर शहर मीडिया प्रमुख ,प्रदीप आदिवाल यांची जिल्हा समन्वयक रिक्षा चालक मालक प्रदीप मेढे यांची रावेर तालुका अध्यक्ष माथाडी कामगार, म्हणून अमीनाताई तडवी यांची जळगाव महानगर अध्यक्ष , असली रोष यांची भुसावळ तालुका समन्वयक ,हाफिज खान भुसावळ तालुका उपाध्यक्ष, मोहम्मद जावेद भाई भुसावळ, नईम हाजी यांची अध्यक्ष यावल शहर व्यापारी असोसिएशन व जुगल घारू यांची व्यापारी असोसिएशन च्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली
सोबत जळगाव चे प्रल्हाद सोनवणे , यावल चे समाजसेवक राजेन्द्र करांडे व रावेर चे दिलीप पंडित,लक्ष्मण भैय्या रल, राधेश्याम गुजराती, ( पहीलवान),हेमंत हसकर, गौरव जावरे, रोहित रल उपस्थित होते

चिमुकल्या मानव ने वाढदिवसनिमित्य केले किराणा वाटप

0

 

पातुरडा बु प्रतिनिधी

वाढदिवस म्हटले की केक,लहान मुलांची पार्टी,व इतर गोष्टी वर होणारा खर्च हे आपण प्रत्येक वाढदिवस मध्ये पाहतो मात्र पातुर्डा येथील माजी सरपंच निलेश चांडक यांचा मुलगा मानव निलेश चांडक या 5 वर्षीय मुलाने आपला वाढदिवसावर कोणताही अनाठायी खर्च न करता जे गरीब कुटुंब आहेत ज्यांना काम केल्यावरच 2 वेळच जेवण मिळते आशा काही कुटुंब ला आपल्या 5 व्या वाढदिवसानिमित्य किराणा सामान वाटप केले व कोणत्याही आपल्या मित्राला न बोलवता आपल्या परिवार मधील व्यक्ती सोबत गरीब कुटुंब ला वाटप केले मागील वर्षी ही मानव च्या वाढदिवस निमित्य सॅनिटायझर,मास्क व इतर कोरोना काळात लागणाऱ्या वरस्तू चा वाटप केला होता या विधायक कार्याची नागरीका कडून स्तुती होत आहे या वेळी मानव ची आजी,वडील,बहीन,भाऊ उपस्थित होते

यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापनादिवस ध्वजपुजन करून उत्साहात साजरा करण्यात आला

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस उत्साहाच्या वातावरणात पक्षातील विविध पदावर कार्यरत असलेल्या कार्यकर्ते व पदधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला .१० जुन१९९९ साली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी पक्ष हा देशहीत , समाजहित व सर्व जाती धर्मांना बरोबर घेवुन चालणारा राष्ट्रवादी पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष असल्याची भावना यावेळी दिसुन आली , यावल तालुका येथील खरेदी विक्री सहकारी संघाच्या व्यापारी संकलनाच्या आवारात आज दिनांक १० जुन रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २२वा स्थापन दिवस साजरा करण्यात आला , यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , राष्ट्रवादीचे नगर परिषदेतील नेतृत्व करणारे नगरसेवक अतुल पाटील , नगरसेवक अभीमन्यु विश्वनाथ चौधरी (हेन्द्री ) , नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष राकेश कोलते ,डॉ . हेमन्त येवले, एस .पी . बोदडे, राष्ट्रवादी आदीवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष एम .बी . तडवी सर , कृषी उत्पन्न चे माजी संचालक दिनकर पाटील , युवक राष्ट्रवादीचे ॲड. देवकांत पाटील , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अब्दुल करीम मन्यार , डॉ .जी .पी . पाटील , राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील , गिरधर काशिनाथ पाटील , गनी खान अफजल खान , वसंत पाटील , ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे , बापु जासुद, हितेश गजरे , मनोहर महाजन , दहीगावचे सरपंच अजय अडकमोल, कामराज घारू, अय्युब खान सर , द्वारकाबाई श्रीनिवास पाटील , सौ . शामल भावसार , सौ . उज्वला किरण , ॲड . निवृत्ती पाटील ,शांताराम पाटील , ललित पाटील , गणेश महाजन , एजाज देशमुख , श्रीराम सपकाळे , नरेन्द्र शिंदे , भरत पाटील यांच्यासह आदींनी उपस्थित राहुन राष्ट्रवादीच्या स्थापनदिनी पक्षध्वजाचे पुजन केले .दरम्यान या वेळी कोरोनाच्या संकटकाळात पक्षासाठी कार्य करणारे दुदैवीरित्या मरण पावलेल्या पक्षाच्या विविध पदधिकारी व कार्यकर्त्यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली . याप्रसंगी पक्षाच्या स्थापन दिनानिमित्त उपस्थित राहीलेल्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे आभार प्रा . मुकेश येवले यांनी मानले .

किनगाव खुर्द येथे दलीत वस्तीत मंजुर निधीतुन इतस्त्र ठिकाणी काम, पीआरपीकडून चौकशीची मागणी

0

 

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

तालुक्यातील किनगाव खुर्द ग्रामपंचायती कडून दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत मंजुर झालेल्या निधीतुन दलीत वस्ती सोडून दुसरी कडेचं कामे केली जात आहे अशी तक्रार पंचायत समिती कडे पीआरपी कडून करण्यात आली असुन कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे
येथील पंचायत समिती मध्ये गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्या कडे पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे यावल तालुकाध्यक्ष राहुल बापू साळुके व जिल्हा उपाध्यक्ष रतन रमेश वानखेडे यांनी दिलेल्या निवेदना नुसार किनगाव खुर्द ता. यावल ग्रामपंचायती कडे सुमारे २० लाखांचा निधी हा दलीत वस्ती सुधार योजने अंतर्गत प्राप्त झाला आहे तेव्हा या निधीतुन दलीत वस्तीत विविध विकास कामे होणे आवश्यक होते मात्र, सदरची कामे ही फक्त कागदावरच असून प्रत्येक्षात जुन्या कामावर डागडूगी सुरु आहे. तसेच सदर काम दलीत वस्तीत न करता इतर ठिकाणी सुरू आहे. तेव्हा या कामांची त्वरित चौकशी होऊन काम थांबविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे तेव्हा आठवड्याभरात चौकशी न केल्यास पंचायत समितीवर मोर्चा आणून जन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.-पुर्ण—फोटो आहे

उसरा परिसरात हरिणांचा हैदोस कपाशीचे कोवळे पिक फस्त शेतकरी त्रस्त वनविभागाने बंदोबस्त करण्याची गरज

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा:-_

सूनगाव परिसरातील उसरा शेतशिवारात वन्यप्राण्यांनी हौदोस सुरू केल्यामुळे हरीण व रोही नुकतीच लागवड केलेल्या कपाशी पीक फस्त करीत आहे त्यामुळे उसरा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहरींना पाणी कमी असल्याने सदर शेतकऱ्यांनी 12 ते 15 दिवसापुर्वीच ठिबकच्या साहय्याने कपाशीची लागवड केली आहे परंतू कपाशीचे जमिनिवर आलेले कोवळे पिकांसह ईतरही भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी कमालीचे संकटात सापडून गेले आहेत.अद्यापही पाऊसाचा पत्ताच नाही पेरलेल्या कपाशींच्या पिकांना ठिबक च्या सहाय्याने कसे -बसे रात्री -बेरात्री विहरीत थोडेपार असलेले पाणी देवुन पिके शेतकरी वाचवित आहेत , कोवळी कपाशीची रोपे जमिनीवर येताच माकडांसह हरिण व रानडुकरे रातभरातून कोवळ्या कपाशीचे शेंडेच खूरतडून फस्त करीत असल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त होवून गेले असून शेतकऱ्यांसमोर आता हे वन्यप्राण्यांचे संकट उभे ठाकले आहे सातपुडा पर्वतातून हरीणांसह रोही रानडुकरांच्या कळपांनी आपला मोर्चा शेतातील पिकांकडे वळविला असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान कमी करण्याकरीता शेतकरी बूजगावने व ईतर पारंपारिक उपाय करीत परंतू गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेत जंगलात वन्यप्राण्यांची संख्या जास्त प्रमानात वाढत असल्याने शेतातील पिकांचे नुकसानीचे प्रमाणही वाढले आहे. शेतात २५ ते ३० हरणांचे कळप कपाशीचे पिकात घुसून कपाशीचे उभे पिक फस्त करीत आहे या मुळे शेतकऱ्यांना नव्याने पुन्हा कपाशी पिकाची लागवड करावी लागत आहे आतातरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शिवारातील हरीण रोही रानडुकरांचे कळपांचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी उसरा परिसरातील। शेतकरी करीत आहेत.

फुले वार्ड येथील गांजा विक्रेत्यावर पोलिसांची धाड़

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट/दि.९
शहरात अवैध दारुसह आता अंमली पदार्थाचीही मोठ्या प्रमाणात विक्री होत असून या अंमली पदार्थाचा छुपा व्यापार करणाऱ्या विक्रेत्यांवर हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धाड़ घालून तब्बल ४.७३० किलोग्रॅम गांजा हस्तगत करीत आरोपीला अटक केली.
सदर अंमली पदार्थ(गांजा) ७० हजार ९५० रूपये किंमतीचा असून या प्रकरणी स्थानिक महात्मा फुले वार्ड येथील विजय उर्फ बावा माणिक कोथरे(४०) या आरोपीस काल दि.८ रोजी अटक केली असून मुख्य फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
सदर कारवाई एन.डी.पी.एस.कायद्यान्वये करण्यात आली.
सदर प्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन आरोपीचे निवासस्थानी एका प्लास्टीक पोत्यामध्ये ४.७३० किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला.
सदरचा गांजा हा फुले वार्ड येथील फरार आरोपी राकेश सिद्धार्थ जनबंधु याचा असल्याचे अटकेतील आरोपी बावा याने सांगितले.
सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत अपराध क्रमांक
५०५/२०२२ कलम २० (ब) २९ एन.डी.पी.एस.कायदयान्वये दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद
करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि प्रशांत पाटणकर हे करीत आहे.
सदरची कामगीरी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत पाटणकर, डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर, विरेन्द्र कांबळे, संदिप बदकी यांनी केली आहे.

आमदार राजेशजी एकड़े व मान्यवरांच्यां उपस्थिती मधे रुग्णवाहिका रुग्ण सेवेत दाखल

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी राज्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये याची दखल घेत जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती त्या अनुषंगाने नांदुरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा व प्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड यांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध झाली असून नांदुरा शहरात दाखल देखील झाली आहे.सदर रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते आज संपन्न झाला सदर रुग्णवाहिका रुग्णांसाठी देवदूत म्हणून काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.वसंतराव भोजने नांदुरा पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनिताताई डीवरे,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे,युवा सेनेचे श्री.ईश्वर पांडव,नायब तहसीलदार श्री.संजय मार्कंड, डॉ.अभिलाष खंडारे, डॉ.खोद्रे, डॉ.जैस्वाल, डॉ.घाटे,,डॉ.पायल पाटील,विजय पायघन, दादागावचे सरपंच श्री.गणेशराव काटे प्रामुख्याने उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक दिनाचा नगरपरिषद जळगाव जामोद ला पडला विसर ,,,,,,,,,नगरसेवक श्रीकृष्ण केदार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

दिनांक 6 जून 2021 रोजी संपूर्ण राज्यभरच नव्हे तर देशभर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिन संपन्न झाला.
हा सोहळा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संपन्न होत असतांना सुद्धा नगर परिषद जळगाव जामोद शासन व प्रशासनाला शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा पडला विसर पडला.
छत्रपतींच्या नावावर मते मागून देशात सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपशासित नगरपरिषद प्रशासनास शिवराज्याभिषेक दिनाच्या विसर पडणे म्हणजे एक प्रकारे शिवभक्तांच्या भावनांसोबत केलेली थट्टाच होय. अशा या निगरगट्ट व छत्रपतींचे नावाचा केवळ वापर करणाऱ्या व छत्रपतींचा सन्मान करण्याची मानसिकता नसलेल्या विचारसरणीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.
नगर परिषद च्या संबंधित अधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा का आयोजित केला नाही अशी विचारणा केली असता त्यांनी अत्यंत पोरकट व उडवाउडवीची उत्तर देत थातूर मातुर समाधान करण्याचा प्रयत्न केला.अशा या अकार्यक्षम प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वेळीच कार्यवाही होणे आवश्यक आहे.अन्यथा अशा या घोडचूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या नगराध्यक्षा व संबंधित पदाधिकारी यांना जनता माफ करणार नाही.

किनगाव बु Iयेथे आजारास कंटाळुन एका वयोवृद्ध शेतकऱ्याची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या पोलीस अक्समात नोंद

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव बु I येथील एका वयोवृद्ध व्यक्तिने आजारास कंटाकुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत पोलीसात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील किनगाव बु येथील राहणारे एकनाथ बाबुराव पाटील
वय८१वर्ष दिनांक ७ जुन रोजी सकाळी ११च्या सुमारास आपल्या शेतात जावुन येतो असे सांगुन केले मात्र सायंकाळी उशिरा पर्यंत घरी आले नसल्याने घरच्या मंडळींनी व नातेवाईकांनी शेतात जावुन त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळुन आले नाही , दरम्यान आज दिनांक ८ मे रोजी त्यांच्या कुटुंबाच्या मंडळीने पुनश्च शोध घेतला असता कासारखेडा शिवारातील रविन्द्र रामकृष्ण पाटील ( टेलर ) यांच्या शेतातील विहीरीवर एकनाथ पाटील यांची काठी दिसुन आली त्यावेळी एकनाथ पाटील यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसुन आला यावेळी गावातील यांच्या मदतीने अखेर प्रेत विहिरीतुन बाहेर काढण्यात आले , या घटनेची खबर मयताचा मुलगा हेमराज एकनाथ पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलीस स्टेशनला अकसमात मृत्युची नोंद करण्यात आली असून , मयत एकनाथ पाटील यांचे मृतदेह शवविच्छेदना साठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे .एकनाथ बाबुराव पाटील ही वयोवृद्ध व्यक्ति होती व त्यांना बऱ्याच दिवसांपासुन पोटदुखीचा आजार जळला होता , त्यामुळे त्यांना पोटदुखीच्या आजारातुन होणारा त्रास असहाय्य झाल्याने अखेर त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . घटनेचा तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .

चुंचाळे बोराळे गावास अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आ. सौ .लताताई सोनवणे यांनी मदतीचे दिले आदेश

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

काल रात्री तालुक्यातील चुंचाळे बोराळे गाव परिसरात विज कोसळली व ढगफुटी सदृष्य झाल्याने झालेल्या मुसळधार पाऊस पडल्याने गावातुन जाणाऱ्या नदीला १५ वर्षानंतर नदीला मोठा पुर आल्याने दोघ गावांचा संपर्क तुटला होता तर एका ठीकाणी विज कोसळुन दोन बैलांचा मृत्यु तर दोन मोटरसायकल पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली असुन .या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील पश्चिम क्षेत्रातिल असलेली चुंचाळे व बोराळे या गाव परिसरात आज सायंकाळच्या सुमारास ढगफुटीसदृष्य झाल्याने दोघ गावांना जोडणाऱ्या नदीला २००६नंतर अशा प्रकारचे मोठे पुर आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे . तर हा सर्व प्रकार ढगफुटीसारखा असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले या सर्व वातावरणात विज कोसळल्याने बोराळे गावातील शेतकरी सुरेश प्रल्हाद धनगर यांच्या घरासमोर बांधलेल्या बैलांच्या अंगावर विज कोसळयाने सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन बैलांचा मृत्यु झाला असुन , यांची संजयसिंग राजपुत आणी रमेश पिताबंर धनगर यांच्या १ लाख३०हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली देखील पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याचे वृत्त आहे . दरम्यान चुंचाळे बोराळे गावांच्या उत्तरेकडील असलेल्या सातपुडा पर्वताच्या जवळ असलेल्या निंबादेवी तलावाच्या परिसरात ढगफुटी झाल्याचे वृत्त आहे .अचानक परिसरात मुसळधार पाऊस मागील पाच तासापासुन सुरू असल्याने अचानक गावातील नदीला मोठा पुर आल्याने दोघ गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे . या पार्श्वभुमीवर महसुलच्या प्रशासकीय यंत्रणेकडुन सकाळ पासुनच नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामास सुरूवात करण्यात आली होती या पंचनाम्याच्या कार्यवाही साकळीचे मंडळ अधिकारी पी .बी .कडनोर , ग ग्रामसेवक राजू तडवी, ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर. यांच्यासह चुंचाळे गावाचे तलाठी प्रविण नेहते , विशाल राजपुत कोतवाल यांनी यात भाग घेतला दरम्यान या वेळी पावसामुळे नुकसान झालेल्या ९ घरांचे पंचनामे करण्यात आले तर पुराच्या पाण्यात वाहुन गेलेल्या दोघमोटरसायकल वाहन सापडले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी तात्काळ चोपडा मतदारसंघाच्या आमदार सौ .लता ताई चंद्रकांत सोनवणे , तहसीलदार महेश पवार , विस्ताराधिकारी हबीब तडवी, , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील , शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवी सोनवणे , युवा सेनेचे प्रमुख गोटु सोनवणे , योगेश पाटील , दिनेश पाटील , पराग महाजन , दिपक कोळी , पिटुं धनगर, चुंचाळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच नाजिमा तडवी , स्वराज फाउंडेशनचे भरत चौधरी , ग्राम पंचायत सदस्य अनिल कोळी , रहेमान तडवी , सुकलाल कोळी व सुधीर सर चौधरी यांच्यासह आदी ग्रामस्थ बांधव याप्रसंगी उपस्थित होते . यावेळी आमदार सौ .लताताई सोनवणे यांनी घरांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना तात्काळ अन्नधान्य देण्याच्या सुचना यावेळी महसुल प्रशासनास दिल्यात .