Home Blog Page 455

तीन दुचाकीस्वारांच्या विचित्र अपघातात एक गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद : समोरा समोर तीन मोटरसायकलची धडक होऊन त्यामध्ये एक गंभीर व दोन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजता च्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील गोराळा धरणाजवळ घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की बुऱ्हाणपुर वरून गोकुलदास गवई मोटरसायकल क्रमांक(1) MH28 5549 व दुसरी मोटरसायकल क्रमांक (2 )येत होते तेव्हा सूनगावावरून मोटरसायकल क्रमांक( 3 ) mh30 294 ही येत असताना धरणाजवळ मोटरसायकल क्रमांक तीनच्या धारकांनी मोटरसायकल क्रमांक दोन ला धडक देऊन मोटरसायकल क्रमांक एक ला सुद्धा धडक दिली या मधील मोटरसायकल क्रमांक दोन जागेवरून फरार झाला तर मोटरसायकल क्रमांक तीन वाहनधारक हा गंभीर स्वरूपात जखमी झाला मोटरसायकल क्रमांक एक मधील दोन्ही व्यक्ती हे किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती पोलीस पाटील तडवी यांना मिळताच त्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला या बद्दल माहिती दिली माहिती मिळताच जळगाव पोलिस स्टेशनचे पीएसआय प्रल्हाद मदन घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सर्व जखमी व्यक्तींना पोलीस गाडीमध्ये ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नेले तेथे गंभीर व्यक्तीची ओळख पटली सदर व्यक्ती कालमाठी येथील देवसिंग डाबर आहे सदर व्यक्‍तीची प्रकृती खराब असल्या कारणाने त्याला खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे.

फॅारेस्ट चौफूली यावल येथे तैनात यावल पोलीस स्टेशन चे पोलीस/होमगार्ड कर्मचारी याना आज छत्रपति शिवाजी महाराज यांचे राज्यअभिषेक दिनानिमित्त फळ मिठाई वाटप करण्यात आले

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

आज छत्रपति शिवाजी महाराज यांचे राज्यअभिषेक दिना चे औचित्त साधत आजचे शुभ दिवसी कोविड-19 चे नियंत्रण आणि जनतेच्या संरक्षणा करिता फॅारेस्ट चौफूली येथे तैनात यावल पोलीस स्टेशन चे पोलीस/होमगार्ड कर्मचारी याना बीएसएफ ग्वालियर येथे तैनात विरावली गावचे सैनिक महेंद्र पुंडलिक पाटील यांचा मुलगा योहित पाटील व सोबत नयन संतोष पाटिल यांचे हस्ते फळ आणि मिठाई याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी विरावली गावातिल राहिवासी श्री सुनिल कडू पाटील, मोहित संतोष पाटील, देवेन्द्र (सोनू) पाटील, बाळा पाटील व रोहीत गोकुल राजपुत आणि बीएसएफ जवान महेंद्र पाटील आदी उपस्थित होते

मालोद येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

हिन्दवी स्वराज्याचे जनक छत्रपति शिवाजी महाराज यांच्या राज्यअभिषेक दिनाचे औचित्त साधत व कोविड-१९चे पुरेपुर पालन करत तालुक्यातील ग्रामपंचायतीसह इतर ठिकाणी भगवा फडकवून शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान, कोविड-१९चे नियंत्रण आणि कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाढत्या संकटात नागरीकांनी लॉकडाऊन नियमांची काटेकोर अमलंबजावणी व्हावी, याकरीता
मालोद येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवराज्याभिषेक दिन साजरा करुण प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.हसिना सिराज तडवी ,व विस्ताराधिकारी हबीब तडवी, ग्रामसेवक राजु तडवी, वाघिरा शाळेचे मुख्याध्यापक शिराज तडवी सर ग्रामपंचायत शिपाई कुरबान तडवी,ग्रामरोजगार सेवक मेहेरबान तडवी यांचेसह ग्रामस्थ मुकेश पाटील सचिन पाटील तेजस चौधरी सागर पाटील ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक उपस्थित होते

मालोद येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

मालोद येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवराज्याभिषेक दिन साजरा करुण प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.हसिना सिराज तडवी ,व विस्ताराधिकारी हबीब तडवी, ग्रामसेवक राजु तडवी, वाघिरा शाळेचे मुख्याध्यापक शिराज तडवी सर ग्रामपंचायत शिपाई कुरबान तडवी,ग्रामरोजगार सेवक मेहेरबान तडवी यांचेसह ग्रामस्थ मुकेश पाटील सचिन पाटील तेजस चौधरी सागर पाटील ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक उपस्थित होते

महेलखेडी शिवसेनेच्या वतीने राज्याचे पाणी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आली

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राज्याचे पाणी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्ताने आज महेलखेडी येथे शिवसेनेच्या वतीने सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन एक चांगले उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाद्वारे गावातली ग्रामपंचायत जवळ वृक्ष लागवड कार्यक्रम पार पडला . महेलखेडी शिवसेना शाखेच्या वतीने , आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

महेलखेडी येथे रुक्ष लागवड करण्यात आली याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख व कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती मुन्नाभाऊ पाटील व स्वराज फाउंडेशन अध्यक्ष भरत चौधरी
शिवसेना शाखा प्रमुख व यावल तालुका विभाग प्रमुख आशिष झुरकाळे ग्रामपंचायत सदस्य नामदेव झुरकाळे ग्रामपंचायत माजी सदस्य प्रमोद महाजन शालेय समितीचे अध्यक्ष अब्दुल देशमुख व शिवसेना जिल्हा बूथ प्रमुख राजू पाटील
सामाजिक कार्यकर्ते रितेश महाजन सामाजिक परीक्षित महाजन गंगाराम माळी अशोक माळी नंदू महाजन शिवशैनिक लोकेश येवले हर्षल येवले सर्व शिवशैनिक उपस्थित होते

मराठा पाटील युवक समिती तर्फे वृक्षारोपण करून स्वराज्य दिन साजरा

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिन आणि जागतिक पर्यवरण दिनाचे औचित्य साधून नांदुरा येथे मराठा पाटील युवक समिती तर्फे ६जून रोजी सकाळी महाराजांना हारार्प न करून अभिवादन करण्यात आले.
सध्याची घडी लक्षात घेता कोरोनामुळे ऑक्सिजन चे महत्व खूप अधोरेखित झाले, झाडे म्हणजेच जीवन त्याशिवाय पर्याय नाही हे स्पष्ट झाले, जीवन जर वाचवायचे असेल तर प्रत्येकाने झाड लावलेच पाहिजे आणि जगवले पाहिजे.
स्वराज्य दिन आणि पर्यावरण दिनानिमित्त मराठा मंगल कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मराठा पाटील युवक समिती चे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ शरद पाटील, माजी अर्थ व बांधकाम सभापती बलदेव राव जी चोपडे, नांदुरा नगर परिषद चे पाणी पुरवठा सभापती अजयभाऊ घनोकर, श्री चांडक भाऊ , वामनराव भगत सर , शिवशंकर शिंबरे सर , श्री पेठकर भाऊ, युवक समितीचे जिल्हा सदस्य शंकर पाटील, संजय मनस्कर, नांदुरा तालुका अध्यक्ष लक्ष्मण वक्टे , नांदुरा शहर अध्यक्ष चि.अतुलभाऊ गव्हाड पाटील, समिती सदस्य दीपक ढोले, गावंडे पाटील, तुकाराम पाटील, अमोल पाटील, भरत चोपडे, गणेश गायगोळ, राहुल चोपडे, भागवत पाटील, दीपक पाटील, निलेश पाटील, गावंडे भाऊ तसेच बरेच शिवभक्ती हजर होते .
वृक्षारोपण लागणाऱ्या रोपटे साठी श्री संतोष भाऊ डीवरे आणि वामनराव भगत सर यांचे सहकार्य लाभले.

संभाजी ब्रिगेड नांदुरा द्वारा आयोजित रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद ५३ लोकांनी केले रक्तदान

0

 

जिजाऊची लेक मनिषाने केले रक्तदान

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे):-
संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांनी ६ जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नांदुरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले असून या रक्तदान शिबिरात तब्बल ५३ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता कु.मनीषा रमेश पाटील या जिजाऊच्या लेकीन रक्तदान केले. तसेच भाजपा शहर उपाध्यक्ष प्रमोद हिवाळे यांनी या शिबिरात रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. या शिबिरात बऱ्याच समाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात सामाजिक कार्यकर्ते अशोकराव घानोकर यांनी ५०० रुपयांची मदत केली.

 

सदर रक्तदानासाठी खामगाव येथील शासकीय रक्तपेढीची चमू उपस्थित होती. तसेच संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवश्री योगेश पाटील,जिल्हा सचिव डॉ.शरद पाटील,शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,पुंडलिक काळे, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव घानोकार,राष्ट्रीय विष्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे,पत्रकार संतोष तायडे, प्रफुल्ल बिचारे, पुरुषोत्तम भातुरकर, उपस्थित होते. या शिबिराला नांदुरा नगरीचे नगराध्यक्षपती श्री अनीलभाई जवरे यांनी भेट दिली.

 

शून्य टक्के व्याजाने मिळणाऱ्या पीक कर्जाची मर्यादा 3 लाख रुपये

0

गजानन सोनटक्के जळगाव जा

नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणारी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज परतावा योजना राज्यात राबविली जाते. याची मर्यादा आता 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येत असून बॅंकांनी या वाढीव मर्यादेप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे. तसेच बॅंकांनी या अन्नदात्याच्या पाठीशी आधारस्तंभ बनून उभे राहावे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बॅंकर्स समितीची 151वी बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत राज्याच्या 2021-22 साठीच्या 4 लाख 60 हजार 881 कोटी रुपयांच्या राज्याच्या पतआराखड्यास मंजुरी देण्यात आली.

या आराखड्यात कृषी क्षेत्रासाठीचे उद्दिष्ट 1 लाख 18 हजार 720 कोटी रुपये असून यामध्ये पिक कर्जासाठीचे उद्दिष्ट 60 हजार 860 कोटी रुपयांचे आहे. लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांसाठी बॅंकांच्या वार्षिक पतआराखड्यात 2 लाख 49 हजार 139 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय तर्फे 5 जून जागतीक पर्यावरण दिनाचे आवचित्त साधत मोहराळे गावात स्मशान भूमी परिसराची साफ सफाई करत केले वृक्षारोपण .

0

 

तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे आवचित्त साधत डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय च्या वतीने मोहराळे गावातील स्मशान भूमी परिसर ची साफ सफाई करून वृक्षारोपण करण्यात आली यात गावातील तरुणांनी स्वयं स्फुर्ती ने श्रमदान करत स्मशान भूमीत काटेरी झुडपे कचरा यांची साफ सफाई करत त्या परिसरात वड , पिंपड , कडुनिंब , बाभूळ , फुल झाडे, बांबू ,निलगिरी या प्रजातीचे वृक्ष लागवड करत आपले योगदान दिले . या प्रसंगी श्रमदान करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय
आज 5 जून जागतिक पर्यावरण दिना निमित्त
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय मोहराळे तर्फे वृक्षारोपण लागवड करण्यात आले
कोरोना सारख्या गंभीर प्रदुर्भाव मुळे खूप लोकांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेत. म्हणून पर्यावरण दिना निमित्त तुम्ही पण वृक्षारोपण करा आणि निसर्गाला सहकार्य करा. असा संदेश वाचनालय तर्फे देण्यात आला,
या आधी सुद्धा वाचनालय तर्फे वृक्षारोपण करण्यात आले होते. या प्रसंगी राहुल ऊर्फ देवा अडकमोल, सुनील सोनवणे, संदीप झाल्टे, किरण सोनवणे, अभिषेक अडकमोल, दिपक अडकमोल, अजय अडकमोल, शुभम अडकमोल, सुमित सोनवणे, उपस्थित होते
आदी ग्रामस्थांनी श्रमदान व वृक्षारोपण रोपण करून 5 जून पर्यावरण दिन केला साजरा .

यावल येथे जागतीक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागाच्या आवारात नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपणाचे कार्यक्रम संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या वतीने आज ५ जुन या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालय आवारात उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव एच एस पद्मनाभा यावल नगर परिषदच्या नगराध्यक्ष सौ. नौशाद मुबारक तडवी यावल वन्यजीव विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक सौ.अश्विनी खोपडे यांच्यासह विशाल कुटे (सहाय्यक वनसंरक्षक यावल तथा व.प.अ.यावल पश्चिम विभाग ), विक्रम पदमोर ( प.अ.यावल पुर्व )आनंदा पाटील (व.प.अ.गस्ती पथक यावल ), तथा आदीवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ता मुबारक तडवी यावल, ललित चौधरी (अध्यक्ष सं.व.स.वड्री खु।) दिनेश पावरा (समन्वयक वनांचल सेवाभावी संस्था जळगाव,) वनक्षेत्र यावल पुर्व, यावल पश्चिम आणि गस्ती पथक यावल क्षेत्रीय वनपाल, वनरक्षक, वनमजुर आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थितीत वृक्ष लागवड कार्यक्रम झाला.कार्यक्रमाचे प्रस्ताविका व सुत्रसंचालन विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले. तसेच कार्यक्रमात पद्मनाभा एच एस उपवनसंरक्षक,सौ.नौशाद तडवी नगराध्यक्ष , विशाल कुटे सहा.वनसंरक्षक,मुबारक तडवी (सामाजिक कार्यकर्ता ), आनंदा पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पर्यावरण विषयी उपस्थितांना आपले अमुल्य मार्गदर्शन केले.