Home Blog Page 456

छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन च्या वतीने 5 जून जगातील पर्यावरण दिनाचे व शिवराज्याभिषेक दिनांचआवचित्त साधत विरावली गावात स्मशान भूमी परिसराची साफ सफाई करत केले वृक्षारोपण

0

 

तालुका (प्रतिनिधी )विकी वानखेडे

5 जून जागतिक पर्यावरण दिन व 6 जून शिवराज्याभिषेक दिन या निमित्त आवचित्त साधत छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन च्या वतीने विरावली गावातील स्मशान भूमी परिसर ची साफ सफाई करून वृक्षारोपण करण्यात आली यात गावातील तरुणांनी स्वयं स्फुर्ती ने श्रमदान करत स्मशान भूमीत काटेरी झुडपे कचरा यांची साफ सफाई करत त्या परिसरात वड , पिंपड , कडुनिंब , बाभूळ , फुल झाडे, बांबू ,निलगिरी या प्रजातीचे वृक्ष लागवड करत आपले योगदान दिले . या प्रसंगी श्रमदान करताना छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक चे तालुका अध्यक्ष ,ग्रा प सदस्य ऍड देवकांत पाटील , विरावलीचे प्रगशील शेतकरी मनीष प्रभाकर पाटील मानवाधिकार प्रदेश उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील , माजी ग्रा प सद्स्य रणधीर पाटील , संस्थेचे संचालक देवेंद्र भीमसिंह पाटील , राकेश पाटील , राहुल राजपूत , चेतन पाटील ,दिनेश फुलपगारे प्रकाश पाटील , भूषण निळे ,नवाब तडवी ,गिरीश पाटील ,निलेश निळे पाटील,विरावली विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय पाटील विकास सोसायटी संचालक गुलाबराव रघुनाथ पाटील , संचालक शरद पाटील , पीक सवरक्षणं चे संचालक गोरख पाटील , दगडू तडवी , नरेंद्र निळे , नत्थू महाराज ,विनोद पाटील जितेंद्र धनगर , चेतन पाटील , साई बाबा पत संस्थेचे संचालक पितांबर निळे राष्ट्रवादी उप तालुका अध्यक्ष पवन पाटील , भूषण धनगर ,आर पी आय विध्यार्थी अध्यक्ष राजेश अडकमोल ,माजी उपसरपंच यशवंतराव पाटील , राष्ट्रवादी किसान उपतालुका अध्यक्ष गणेश राजपूत ,भगवान पाटील ,चिंधू निळे ,पवन धनगर , हर्षल निळे आदी ग्रामस्थांनी श्रमदान करत वृक्षारोपण रोपण करून 5 जून पर्यावरण दिन व 6 जून शिवराज्याभिषेक दिन केला साजरा .

जगाचा पोशिंदा केवळ उपाधीच शेतकरी मात्र अडचणीत

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

कोरोणाच्या सावटात रब्बी हंगाम निघून गेला आता सर्वत्र शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतिला लागले असून नांगरणे वखरणे शेतात शेणखत टाकने या कामाला वेग आला असून ही कामे आटोपली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागत कामाला प्रारंभ केला आहे दरवर्षी उन्हाळ्यात या ऋतूत म्हणजे मे महिन्याच्या शेवटी शेती मशागतीच्या कामाला प्रारंभ करीत असतो त्यामुळे यावर्षी सुद्धा कोरोणा चे सावट असूनही त्याच्या तडाख्यात आपल्या कामात तल्लीन होऊन शेतकरी खरीप लागवडीत पूर्व मशागतीच्या कामाला व्यस्त झाला आहे शेतकरी काळी कचरा जाळणे शेतात वखरणी करणे तसेच पावसाळ्याच्या या दिवसात सरपणासाठी वाढलेले लाकूड घरी आणून ठेवणे या व इतर कामात शेतकरी सध्या व्यस्त झालेला आहे उन्हाळ्यात उन्हाची पर्वा न करता बळीराजा शेतात राबत आहे सध्या लढून स्थितीत असताना सुद्धा आपल्या व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी राबल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही त्यासाठी जळगाव जा तालुक्यातील शेतकरी तयारीला लागलेले दिसत आहेत शेतातील ट्रॅक्टरद्वारे नांगरणी वखरणी शेतातील काडीकचरा साफ करणे काट्याची ठीक जाळणे तलावातील गाळ काढून शेतात इत्यादी मशागतीची कामे उरकून ठेवली आहेत कारण या महिन्याच्या सात तारखेपासून मृग नक्षत्र लागत आहे कोरोणाच्या सावटात कायम असतानाही शेतकरी आपले कामे हंगामापूर्वी सुरू करणे भाग असते हिवाळा असो की पावसाळा किंवा घामाच्या धारा अंगातून निघणारा उन्हाळा असो तिन्ही ऋतूत शेतात राबणाऱ्या शिवाय शेतकऱ्यांना वेळ मिळत नाही यामुळे बळीराजा जगाचा पोशिंदा अशी उपाधी मीळाली आहे मे महिना संपला आहे व जून महिना लागलेला आहे त्यासाठी शेती शिवारात शेतकरी राबताना दिसत आहे सततची नापिकी व दुष्काळजन्य परिस्थिती यामुळे आधीच शेतकरी हतबल झाले असताना कोरोना च्या सावटामुळे लॉकडाऊनचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे हक्काचा पिक विमा मिळण्यासाठी शासनाच्या उंबरठ्यावर चपला घ्यासाव्या लागत असून बि-बियाणे खरेदीची लगबग असताना बँक कर्ज व पुनर्घटन करण्यास तयार नाही त्यामुळे शेतीसाठी बियाणे व खते खरेदी करावे तरी कसे परिस्थिती कठीण झाली असून शासनाने मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे जळगाव जामोद तालुक्यात यावर्षी अती पावसाने सोयाबीन उडीद मूग मका या पिकांचे पूर्णतः नुकसान झालेले आहे व व तसा अहवाल शासन दरबारी ही आहे व आणेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी आहे परंतु तरीही शेतकऱ्याला विमा मिळत नाही व शासनाकडून कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही याची खंत मात्र जळगाव जामोद परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे तरी जळगाव जामोद परिसरातील लोकप्रतिनिधींनी या शेतकऱ्यांची मागणी ही रेटून दरीत शेतकऱ्याला हक्काचा पीकविमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी आशा जळगाव जामोद परिसरातील शेतकऱ्यांनी मनाशी बाळगली आहे

वंचित बहुजन आघाडी मधुकर सहकारी साखर कारखाना येथील सर्व कामगार यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी उतरणार मैदानात

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

न्हावी मधुकर सहकारी साखर कारखानातील कामगारांनी न्याय हक्क मिळावा, या दृष्टीने सर्व पक्षीय व संबंधित लोकप्रतिनिधींकडे अडचणींबाबत सांगितले असून कोणीही न्याय मिळवून देऊ शकले नाही. यामुळे आता सर्व कामगार न्याय हक्कासाठी मैदानात उतरतील, असे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे व यावल तालुका अध्यक्ष मनोज कापडे यांना मागणीव्दारे सांगितले आहे.
न्हावी मधुकर सहकारी साखर कारखाना येथील काम करणारे कामगार यांना त्याच्या हक्काचे पि.एफ व इतर मानधन मिळत नसुन त्यांनी लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, ह्या पक्षाला वेळोवेळी न्याय मागितलर. तरी देखिल या पक्षाचे जिल्हात आमदार, खासदार असुन या गोर गरिब कामगारांना त्यांच्या हक्काचे पि.एफ व मानधन मिळवून देऊ शकले नाही.
मधुकर सहकारी साखर कारखाना येथील कामगार यांना आपल्याला न्याय हक्क  आता फक्त वंचित बहुजन आघाडी मिळवून देणार हे लक्षात आले सर्व कामगार यांनी न्हावी येथे बैठक आयोजित  केली व बैठकित वंचित बहुजन आघाडीचे  जळगाव जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ सोनवणे, यावल तालुका अध्यक्ष मनोज कापडे, आय.टी जिल्हा प्रमुख सचिन बा-हे, जिल्हा सचिव दिपक मेघे, देवदत्त मकासरे (मेजर) व यावल तालुका सघटक रोहित भाऊ अडकमोल यांना आमंत्रीत केले व कामगार यांनी आपले अडचणी मांडले.
कामगार यांच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी सदैव आपल्या सोबत आहे आहे आपल्याला लवकर न्याय मिळवून देणार व आपले अडचणी वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या पर्यंत पोचणार व सर्व कामगार यांची भेट ॲड.बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्या करून कामगार यांच्या अडचणी वर मार्ग काढणार अशी ग्वाही वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे व यावल तालुका अध्यक्ष मनोज कापडे यांनी दिली. बैठकीमध्ये कुमार पाटिल, हमीद शाह, गिरीष कोळंबे, कुंदन जावळे, दामोदर कोळंबे, मोहन पाटील, संजय वायकोळे, सारंग मंदवाडे, सुधीर राणे, विजय चौधरी, सचिन बोंडे, सुनील कोलते, सह सर्व समाज बांधव व बहुजन कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकित सुत्रसंचालन, आभार प्रदर्शन हमिद शहा बिस्मिल्ला शहा यांनी केले.

यावल शहर शिवसेनेच्या वतीने ना . गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आदीवासी वस्तीवर अन्नदान व धान्य वाटप

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राज्याचे पाणी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्ताने आज यावल शहर शिवसेनेच्या वतीने सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन एक चांगले उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाद्वारे गरजु गोरगरीब आदीवासी कुटुंबांना अन्नदान व धान्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला . यावल शहर शिवसेना शाखेच्या वतीने शहरातील गोळीबार टेकटीवर मोलमजुरी करणारे अनेक आदीवासी कुटुंब वास्तव्यास राहात असुन , आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरगरीब नागरीकांना अन्नदानाचा व धान्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला , या कार्यक्रमास यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपप्रमुख शरद कोळी , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल बारी , मयुर खर्चे, शिवसेना आदीवासी विभागाचे तालुका प्रमुख हसन तडवी , पप्पू जोशी , संतोष खर्चे , किरण बारी ,सारंग बेहेडे , सागर देवांग ,योगेश राजपुत , योगेश चौधरी भरत चौधरी यांच्यासह सर्व यावल शहरातील शिव सेनेच्या कार्यकर्त्यांनी अन्नदान आणी धान्य वाटपाच्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महत्वाचे परिश्रम घेतले .

जुन्या वादातून प्रलय तेलंग (माजी नगरसेवक ) यांचे जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड

0

 

सचिन वाघे वर्धा
5.6.21
हिंगणघाट :- शहरातील माजी नगरसेवक प्रलय तेलंग तसेच स्थानिक रहिवासी अजय करवा यांचे जुन्या वादातुन तेलंग यांचे जनसंपर्क कार्यालयाची तोड़फोड़ करण्यात आली असल्याचा आरोप तेलंग यांनी आज दि.५ रोजी आयोजित पत्रपरिषदेतुन केला,त्यांनी करवा तसेच साथीदारांच्या अटकेची मागणी केली.
अधिक माहिती घेतली असता माजी नगरसेवक प्रलय तेलंग यांनी स्थानिक रहिवासी अजय करवा यांना मारहाण केल्याचे प्रकरणी काल समुद्रपुर पोलिसांत गुन्हा नोंद झाला.
सदर घटना काल सायंकाळी जाम येथे घडली असून अजय करवा तसेच प्रलय तेलंग यांचा जुना वाद असल्याने त्याचे पर्यवसान काल भांडणात झाले.
काल दि.४ रोजी अजय करवा हे संध्याकाळी जाम येथील एका हॉटेलमधे गेले होते,तेथून परत निघताच प्रलय तेलंग यानी त्यांना मारहाण केली.घटनेची करवा यांनी समुद्रपुर पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनी भादंवी कलम अन्वये ३२३,५०४,५०६ गुन्हा नोंद केला.
सदर घटनेनंतर काल रात्री ११ वाजताचे दरम्यान माजी नगरसेवक तेलंग यांचे हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जनसंपर्क कार्यालयावरही काही अज्ञात आरोपींनी हल्ला करुन कार्यालयाची तोड़फोड़ केल्याची तक्रार केली, याप्रकरणीसुद्धा हिंगणघाट पोलिसांत कलम ४२७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती ठाणेदार संपत चव्हाण यांनी दिली.पुढील तपास सुरु असल्याची माहिती श्रीयुत चव्हाण यांनी दिली.
सदर प्रकरणी आज दुपारी माजी नगरसेवक प्रलय तेलंग यांनी यांनी पत्रकारपरिषद घेऊन अजय करवा यांनीच १४-१५ सहकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्गावरील कार्यालयात तोड़फोड़ केल्याचा आरोप करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेची तसेच बैनरची विटंबना केल्याचाही आरोप केला.पोलिस अधिक्षकांनाही या निवेदनाच्या प्रती दिल्या असून करवा यांच्या अटकेची मागणी केली आहे.
पत्रपरिषदेला माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांचेसह तेलंग यांचे अनेक समर्थक उपस्थित होते

अपंगांना घरकुल योजनेमध्ये बिनशर्त समाविष्ट केले जावे.

0

 

अपंग जनता दल सामाजिक संघटनेची विभागीय आयुक्तांकडे मागणी

नांदगाव खं. …. अपंगांना घरकुल योजनेत समाविष्ट करण्याकरिता अपंग जनता दलाच्या वतीने विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले.त्यासाठी घरकुल ना योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, शबरी घरकुल योजना सुरू केली आहे. परंतु अपंग लाभार्थी या घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे दिसते. घरकुल योजनेचा लाभ अपंग लाभार्थ्यांना देण्याच्या कडक सूचना सरकारने दिल्या आहेत. परंतु ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या अपंगांना घरकुल योजनेचा लाभ अधिकाऱ्यांच्या निष्काळजी कारभारामुळे मिळत नाही, जिल्हास्तरावर सतत पत्रव्यवहार करूनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे शासकीय निर्णयांतर्गत अपंगांना घरकुल योजनेत समाविष्ट करून त्यांना घरकुलचा लाभ देण्याची मागणी केली जात आहे. त्याचबरोबर अपंग लाभार्थ्यांना घरकुल योजनेतून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

भाजपा सेवा सप्ताहानिमित्त जळगाव जामोद येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार…

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगांव जा.प्रतिनिधी:-

भारतीय जनता पक्षाचे केंद्रामध्ये मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक पर्व होऊन दुसऱ्या पर्वातील दोन वर्ष पुर्ण झाले आहे एकूण सात वर्षे पूर्ण झाली आहेत या काळात मा.पंतप्रधानांनी देशहिताचे अनेक निर्णय घेऊन देशासाठी एक आदर्श पंतप्रधान कसा असतो याचे एक उत्तम उदाहरण सर्व जनतेसमोर ठेवले आहे या देशसेेवेसाठी भारतीय जनता पक्षा च्या सर्व लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अभिमान आहे या कोरोना महामारीच्या काळात कुठल्याही प्रकारचा आनंद व्यक्त न करता कार्यकर्त्यांना सेवा सप्ताहाचे आयोजन करून जे या कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत अशा फ्रंट वर्कर्स तसेच सफाई कामगार, कोव्हिड सेंटर मध्ये सेवा देणाऱ्या आमच्या नर्स ताई यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानून त्यांचा उत्साह वाढवून त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत या सप्ताह मध्ये भारतीय जनता पक्षाचे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना ७ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल ,महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री स्व.भाऊसाहेब जी फुंडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त व अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त तसेच स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय यांच्या सूचनेनुसार सेवा सप्ताह करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सर्व भाजपा कार्यकर्त्यांना प्रत्येक गावातील फ्रंट लाईन वर्कर्स तसेच सफाई कामगार आशा वर्कर्स,डॉक्टर, नर्स,ग्रामीण रुग्णालयातील इतर कर्मचारी यांचा सत्कार करून गरजू पेशंटला मदत करावी ही विनंती. या कार्यक्रमाला जळगाव जामोद च्या नगराध्यक्षा सौ.सिमाताई डोबे,नगर परीषद सदस्य रत्नप्रभाताई खिरोडकर,जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बापू देशमुख,शहर अध्यक्ष श्री अभिमन्यू भगत,युवा मोर्चा शहर अध्यक्ष उमेश येऊल, महिला मोर्चा शहर अध्यक्ष सौ.शिल्पाताई भगत ,न.प. सदस्य आशिष सारसार ,कैलास डोबे, अरुण खिरोडकार, प्रकाश बगाडे ,पकंज देशमुख ,अमोल भगत,वैभव जाधव ,सचिन कल्यानकर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते

मातृछत्र हरवलेल्या ४ बालकांसाठी नांदुरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार ठरले देवदूत

0

 

नांदुरा:- (प्रफुल्ल बिचारे पाटील)

सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पोलीस प्रशासन व पोलीस अधिकारी यांचे विषयी बघण्याची भूमिका ही फक्त एक भीतीयुक्त आदर असला तरी नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री सुरेश नाईकनवरे यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालत असतानाच आपल्यातील माणूस पण जागी करून मातृछत्र हरवलेल्या चार बालकांची आपल्या बालसुधार पथकाच्या माध्यमातून चार बालकांचा सांभाळ करण्याची व्यवस्था त्यांनी ३० मे रोजी बुलढाणा बाल सुधारगृह अधिकारी यांच्याकडे माहिती देऊन केली.
यावेळी मौजे नारायणपूर तालुका नांदुरा येथील मातृछत्र हरवलेल्या ४ बालकांना पालन पोषण हा प्रश्न पडला असतात, खाकी वर्दीतील देवमाणूस जागा होऊन नांदुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री सुरेश नाईकनवरे यांनी बालसुधारगृह च्या माध्यमातून मातृछत्र हरवलेल्या ४ लहान लहान बालकांचा सांभाळ करण्याचा प्रश्न मिटवला. सदर केलेल्या कार्याबद्दल सर्वस्तरातून नांदुरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री नाईकनवरे यांचे अभिनंदन होत आहे, सदर कार्याची दखल उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच वरिष्ठ यांनी घ्यावी अशी रास्त मागणी सर्व स्तरातून होत आहे.

टीम परिवर्तन मुंबई व जाणीव बहुउद्देशीय फाऊंडेशन मलकापूर यांच्या माध्यमातून मोताळा तालुक्यातील २० गरजू कुटूबांना किराणा किटचे वाटप

0

 

अजहर शाह

मोताळा:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सध्या अनेक समाजघटकांना आपल्या मदतीची गरज आहे. टीम परिवर्तन मुंबई व जाणीव बहुउद्देशीय फाऊंडेशन मलकापूर यांच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या २० गरजू लोकांना किराणा किटचे वाटप दि. १ जुनं रोजी करण्यात आले. या किटमध्ये तूर डाळ, मुगाची डाळ, सोयाबीन वडी, शेंगदाणे, ५ किलो चक्की आटा, पार्ले बिस्किट बुडा, राजगीरा लाडू, टाटा साॅल्ट, डेटाॅल साबन, खाण्याचे तेल, व्हिल साबन, निहार तेल इ साहित्य देण्यात आले. यामध्ये पिंपळपाटी येथील श्री.वामन फकिरा गायकवाड, सौ.शांताबाई धनाजी गायकवाड, देवचंद्र रामचंद्र सोनोने, राधाबाई तुळशीराम गवळी, जैवंताबाई फकिरा गायकवाड, शारदाबाई दिपाजी गायकवाड, तसेच तळणी येथील तळणी गं.भा नलुबाई वसंत खर्चे, गुंफाबाई बिसन अंभोरे, गंगुबाई पंढरी वाढे, सरस्वती वसंत वाघ, रुख्माबाई निना वानखेडे, त्याप्रमाणे शेलापूर येथील शांताबाई रामभाऊ महाले, केसरबाई सिताराम सावळे अश्या गरजू कुटूंबाना किराणा वाटप करण्यात आले. या वाटपासाठी टिम परिवर्तनचे तुषार वारंग व जाणीव फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रांजलीताई धोरण, सचिव मनोज यादव, कोषाध्यक्षा दिपाली सोनोने, सदस्य गोपाल पाटील, रोशन तायडे, पत्रकार गणेश वाघ, सामाजिक कार्यकर्ते सारंगधर घाटे पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

शासकीय रुग्णालय मध्ये अपंगांना मिळनार कोरोना लस

0

 

अपंग जनता दल सामाजिक संघटना चा मागणीला यश

अमरावती .. अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून या संघटना चा वतीने शासनाला मागणी करण्यात आली होती की अपंगांना विशेष मोहीमे अंतर्गत लस देण्यात यावी यानुसार भारत सरकार चा सुचने नुसार अपंग वेक्ती व 60 वर्षी वरील जेष्ठ नागरिक याचा साठी दिनांक 5 / 06 / 2021 रोजी निअर ठू होम कोविड लस सर्व ग्रामीण रुग्णालय. उपजिल्हा रुग्णालय. तसेच जिल्हा रुग्णालय वर अपंगांना उपलब्ध होणार आहे असे अधिकुत पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा शल्य चिकिस्तक जिल्हा रुग्णालय याचा सहीने सर्व वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय यांना पाठवून आदेशीत करण्यात आले आहे तर जिल्हातील सर्व अपंगांनी याचा लाभ द्यावा अशी माहिती अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अमरावती अध्यक्ष मयूर मेश्राम यांनी दिली आहे