Home Blog Page 457

यावल येथ महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार उत्साहात साजरी

0

 

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

 

येथील विविध पक्षाच्या वतीने हिंदुसुर्य क्षत्रिय गौरव विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची जयंती यावल येथे उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली . यावल येथील बाहेरपुरा परिसरात महाराणा प्रतापसिंह चौकात आज रविवार दिनांक १३ जुन रोजी क्षत्रिय कुल विर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची तिथीनुसार ४८१वी जयंती सर्वपक्षीय कार्यकर्त व पदाधिकारी तथा समाज बांधव यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली आहे . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक प्रा . मुकेश येवले यावल चे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना आदरांजली वाहुन अभीवादन केले . यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे ,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे हितेश गजरे , विरेन्द्रसिंह सिसोदीया, प्रदीप पाटील , आंबालालसिंह राजपुत, मंजुर खान आदी समाज बांधव व ईतर सामाजीक कार्यकर्ते या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते . याप्रसंगी जयंती निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार समाजाच्या वतीने विरेन्द्रसिंह सिसोदीया यांनी मानले.

आदित्यसाहेब नव्या युगाचे शिलेदार रविंद्र वसंतराव भोजने

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

आज 13 जून रोजी युवासेना प्रमुख महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री युवकांचे प्रेरणास्थान युवासेना प्रमुख, पर्यावरण,पर्यटन,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त युवासेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र वसंतराव भोजने यांच्या तर्फे नांदुरा तालुक्यातील दहिगाव येथे वृद्धाश्रम मधील वयोवृद्ध मंडळी ना कपडे व मिठाई वाटून आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला या आश्रमातील असलेल्या वयोवृद्ध मंडळीने बाळासाहेबांच्या नातवाला आमचे खूप खूप आशीर्वाद म्हणून शुभेच्छा दिल्या. व त्याच प्रमाणे नांदुरा ते दहिगाव रस्ता हा सकाळी आणि संध्याकाळी नांदुरा शहरातील शेकडो लहान मुलां पासून तर महिला मंडळी वयोवृद्ध नागरिक या रोड नि फिरायला (मॉर्निग/इविनिग वाक) येत असतात. आज कोरोनाच्या महामारी मध्ये ओक्सिजन ची कमतरता भासत असताना युवासेना – विद्यार्थी सेने च्या वतीने आदित्यसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्य या रोड नि वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र वसंतराव भोजने, विद्याथी सेना शहर प्रमुख अभिराजे हिवराळे, युवासेना उपशहर प्रमुख सोनू चोपडे, किसान सेना शहर प्रमुख सागर वावटळीकर, युवासेना.सो.मी.तालुका प्रमुख निलेश तायडे,युवासेना विभाग प्रमुख ऋषिकेश जुमळे,पुरुषोत्तम सोनवणे,मुकेश निदाने, धनंजय वातपाळ,रामदास बघे,धीरज दाबेराव,सुरज जुमळे,संकेत जुमळे,ज्ञानेश्वर तायडे,किशोर राखोंडे आदी युवासैनिक,ग्रामस्थ उपस्थित होते.

परडा गावात वादळीने नुकसान झालेल्या घराची आमदार समीर कुणावार यांनी पाहणी करीत दिला मदतीचा हात

0

 

सचिन वाघे वर्धा

13.5.21 समुद्रपूर :— परडा गावात दिनांक ०९/०६/२०२१ रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला घरासह शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले तेथील नुकसान ग्रस्तांची आमदार समीर कुणावार यांनी पाहणी केली. वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाख्याने घराची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची आमदार समीर कुणावार भेट घेतली. नुकसान झालेल्या घराला संसार उभे करण्यास मदत केली. त्यांच्या घरामध्ये सौ. ऊषा पंढरी चंदनखेडे ही महिला अनेक महिन्यापासून आजारी असून दिव्यांग आहे सोबतच श्री. पंढरी दादाजी चंदनखेडे हे सुद्धा दिव्यांग आहे त्यांच्याजवळ उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची त्यांचे वादळी पावसाने पूर्ण घर उडून गेल्यामुळे आमदार समीर कुणावार यांनी घराची पाहणी केली आणि त्यांचे घर उभे करण्यासाठी आवश्यक मदत केली.
नुकसानग्रस्त घराची पाहणी करते आमदार समीर कुणावार, समुद्रपूर पं. स. सभापती सौ. सुरेखा कैलास टिपले, परडा गावातील सरपंच सौ. सुवर्णा तडस, ग्रामपंचायत सदस्या वनिता पाल, ग्रामपंचायत सदस्या सौ. सुरेखा धोटे, समाजसेवक कैलासराव टिपले, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकिशोर चंदनखेडे, तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या पाठपुरावा व प्रयत्नांना यश शेळगांव बँरेजच्या पुर्णत्वासाठी शासनाने केले १४० कोटींचा निधी मंजूर..

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

जळगावसह यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हरीत क्रांतीचे स्वप्न साकार करणारा महत्वकांशी प्रकल्प शेळगाव बॅरेजच्या पूर्णतेसाठी निधीची मागणी करण्यासाठी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांची भेट घेऊन त्यांचेशी सन२०२१व२०२२ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची विनंती केली होती. आमदार शिरीष चौधरी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे जलसंपदा ना.जयंत पाटील यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असुन. नुकतेच त्यांचे पत्र मिळाले. त्यात शेळगांव बँरेज मध्यम प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या वार्षिक आखणी मध्ये रू. १४०कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आल्याचे कळविले आहे. सदर निधी मुळे शेळगांव बँरेज मध्यम प्रकल्पाचे काम पूर्णत्वास होण्यास मदत होवून पुढील वर्षापासून पासून बँरेज मध्ये पाणी साठवता येवून हजारो हेक्टर जमीन ओलीता खाली येईल असे आमदार कार्यालयाने कळविले आहे. शेळगाव बॅरेजच्या कामाला पुर्णत्वास नेण्यासाठी निधी दिल्याबद्दल आ.चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष आभार मानले आहे.

यावल शेळगाव मार्ग जळगाव रस्ता तापी नदीला पाणी आल्याने पूल पुर्ण पाण्याखाली वाहतुकीसाठी रस्ता बंद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील शेळगाव मार्ग जळगाव जाणारा रस्ता तापी नदीला पाणी आल्याने तात्पुरता असलेला पुल व त्या वरील रस्ता बंद झाला असुन यावल ते बोरावल, टाकरखेडा मार्गावरून जळगावकडे जाणाऱ्या नागरीकांनी या मार्गाने आपली वाहने घेवुन येवु नये असे आवाहन परिसरातील नागरीकांनी केले आहे . दरम्यान यावलहुन बोरावल ,टाकरखेडा , शेळगाव . असोदा, भादली मार्ग जळगाव जाण्यासाठी कमी वेळेत जाण्याचा हा पर्यायी मार्ग असुन , या दोन दिवसात मध्य प्रदेश आणी महाराष्ट्रच्या काही भागात मोठया प्रमाणावर पाऊस पडल्याने शेळगाव बॅरेजच्या बाजुस तात्पुरत्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता तापी नदीला पाणी आल्याने हा रस्ता पुर्णपणे पाण्याखाली आली असल्याने या मार्गाने वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे . यावल व परिसरातील नागरीकांनी जळगाव जाण्यासाठी या मार्गाने येवु नये तसेच हे वृत्त आपल्या संपर्कातील ईतर
मित्रमंडळी यांनी कळविले आहे .

अपंगासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चे स्मार्ट कार्ड रद्द करा

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावतीत अपंग जनता दल(सामाजिक संघटना) ची मागणी

अमरावती: अपंगा साठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे ६ मार्च रोजी युनिक कार्ड वरून,स्मार्ट कार्डासारखे कार्ड अपंगांना देण्यात येणार आहे.त्यांची नोंदणी देखील चालू करण्यात आली आहे.परंतू दि.९ ऑक्टोबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार आधार कार्ड संलग्न अपंग युनिक स्मार्ट कार्ड देणे असा शासन निर्णय असूनदेखील तरी एस.टी महामंडळाकडून आदेश काढण्यात आले आहेत.त्यामुळे स्मार्ट कार्डचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली आहे. अपंगांना समाज कल्याण विभाग यांच्याकडून पिवळी व पांढरे वन फोर पास असतांना केंद्र शासनाने दिव्यांगांना युनिक कार्ड सवलतीस ग्राह्य धरावे असे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्त यांनी काढले आहेत व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी सुद्या युनिक कार्ड वर अपंगांना सवलत लागू करा असे लेखी आदेश असून अपंग व्यक्तींनी अजून किती कार्ड सवलतीसाठी सोबत ठेवावे म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व अपंगाकडून संताप व्यक्त केला जात आहे . महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी ६ मार्च रोजी काढण्यात आलेले आदेश रद्द करण्याची मागणी अपंग जनता दल (सामाजिक संघटना)चे अमरावती शहराध्यक्ष श्री.अनवर शाह यांनी ऑनलाइन निवेदन परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांना पाठवून मागणी केली आहे.

पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन चे दबंग ठाणेदार सचीन चव्हाण सन्मानीत !

0

 

पि. राजा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनचे दबंग ठाणेदार सचिन चव्हाण यांना नुकताच जिल्हा पोलिस प्रशासन यांच्या वतीने उत्कृष्ट कामगिरी म्हणून सन्मानित करण्यात आले. या मध्ये जिल्हातील मोजक्याच पोलिस अधिकारी यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. या मध्ये पिपळगांव च्या पोलिस स्टेशन चा नंबर आहे. खामगाव उपविभाग ग्रामीण भागांमध्ये दरोडेखोर  गुन्ह्यांमध्ये आरोपी हे पद्धतशीररीत्या लोकांना गंडवून नकली सोने खरे भासवुन  लोकांना लाखो रुपयांचा चुना लावून त्यांना मारहाण करत लुटत असायचे अशी हि टोळी  खामगाव ग्रामीण भागामध्ये सक्रिय झालेली होती आणि या टोळी ला जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने नष्ट करण्यात आले. सदर ग्रामीण भागामध्ये या लूटमार करणाऱ्या टोळी ला पायबंद घालने महत्त्वाचे असल्यामुळे  सहा मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक चावरिया साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव विभागात  विशेष कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आले, त्यामध्ये नियोजन बद्धरीत्या कोम्बिग ऑपरेशन करण्यात येऊन अत्यंत धाडसाने शस्त्रसज्ज असलेले एकूण २५ आरोपी  पकडण्यात आले होते. या कारवाईमुळे जिल्ह्यात पोलीस प्रशासन अत्यंत दक्ष काम करत असून कर्तव्यदक्ष असलेले जिल्ह्यामध्ये पोलिस प्रशासन  दिसुन आले होते. या कारवाईमध्ये पिंपळगाव राजा चे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण यांना गौरविण्यात आले. या सन्मानाने पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या गौरव मध्ये यशाचा तुरा हा प्राप्त झाल्या मुळे पोलिस स्टेशनचे कर्मचारी आनंदित असून परिसरात पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरी निवासी बाइकस्वाराचा अपघात दरम्यान मृत्यु

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि.१२
हिंगणघाट शहरातून बाजार व शेतीपयोगी साहित्य खरेदी करुन मोटरसायकल क्र.एमएच ३४-एएल-१४५८ ने गावी निघालेल्या मोटरसायकलस्वाराचा अपघात झाल्याने घटनास्थळीच मृत्यु झाल्याची घटना सकाळी तालुक्यातील मानोरा शिवारात घडली.
मृतकाची इसमाची आकाश सर्जेराव कुमरे(२६) रा.नागरी जि.चंद्रपुर अशी ओळख पटली असून अज्ञात मोटसायकल स्वाराने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डोक्याला गंभीर इजा झाल्याने सदर मोटरसायकल चालकाचा मृत्यु झाला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
आज शनिवारी सकाळी १०.१५ चे दरम्यान हिंगणघाट पोलिसांना मानोरा शिवारात सदर मोटरसायकलस्वार मृतावस्थेत पडून असल्याचे आढळले.
पोलिस उपनिरीक्षक आगाशे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतकाचे शव स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.
या प्रकरणी अज्ञात मोटरसायकलस्वार व्यक्तिविरोधात विविध कलमाअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आगाशे,पोहवा बंडू महाकाळकर, महेंद्र आकरे ,भारत बुटलेकर,पोशी रविंद्र कांबळे इत्यादि करीत आहे.

चुंचाळे बोराळे फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था लोकप्रतिनिधींच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये नाराजी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे बोराळे गावाला जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्याची मागील काही वर्षापासुन अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन , या वर्षीच्या येवु घातलेल्या पावसाळ्यात नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे . यावल पासुन साधारण९ किलोमिटर लांब असलेल्या चुंचाळे बोराळेफाटा ते गावापर्यंतच्या सुमारे चार किलोमिटरच्या मार्गावरील रसत्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असुन दुचाकी वाहनधारकांपासुन तर पादचाऱ्यांना ‘ या रस्त्यावरून चालतांना तारेवरची घसरत करावी लागत असल्याने चुंचाळे बोराळे व परिसरातील काही गावांनांशी बुरहाणपुर अंकलेश्वर या प्रमुख राज्य मार्ग असुन शेतकरी व सर्वसामान्यना दळणवळणाचे साधन म्हणुन जोडणारा ग्रामस्थांना परिसरातील आणी नागरीकांच्या दृष्टीने तसेच शेतकरी बांधवांसाठी महत्वपुर्ण रस्ता असुन , क्षेत्राच्या नागरीकांनी वारंवार लोकप्रतिनिधींना सांगीतल्यावरही या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी असुन , लोकप्रतिनिधीनी तात्काळ लोकहिताच्या दृष्टीकोणातुन निर्णय घेवुन या चार किलोमिटरचा संपुर्ण खड्डेमय झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिस्तातील नागरीकांकडुन करण्यात येत आहे .

कोवीड योद्ध्यांना शासकीय सेवेत सामावून घ्या या मागणीसाठी जळगाव जामोद कोवीड सेंटरवरील कर्मचाऱ्यांनी दिले आ.डॉ कुटे यांना निवेदन…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

कोविड 19 च्या भयंकर महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कोवीड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर नर्स तसेच इतर कर्मचारी यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी दिनांक 12 जून रोजी जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांना कोविड केअर सेंटर येथील कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले आहे. या भीषण महामारीमध्ये कोविड सेंटर मधील डॉक्टर नर्स व कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा नव्हती तरी त्यांनी कोविड रुग्णांना सेवा दिली. तसेच या डॉक्टर नर्स व कर्मचाऱ्यांना सेवा बजावत असताना जीवित हानी झाल्यास शासकीय नियमानुसार 50 लाख रुपये विमा कवच तसेच कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे असेही या कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे तसेच कोविड सेंटरमध्ये हे कर्मचारी मागील एक वर्षापासून सेवा देत असून ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नवीन कर्मचाऱ्यांची भरती न करता याच कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांना संधी देऊन कोविड केअर सेंटर जळगाव जामोद येथे त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे अशी मागणी जळगाव जामोद येथील कोविड सेंटर मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी निवेदणाव्दारे केली आहे.सदर निवेदन देतेवेळी डॉ. निता पुंडे, डॉ. पवन सुरपाटणे,डॉ. शुभम पाटील, विष्णु गव्हाळे, आखरे,कांचन आखरे,मैना वक्टे,निता पाटील, ज्योत्स्ना पवार, दिपाली इंगळे,सुनिता गवई,शुभम गायकवाड, धम्मपाल सपकाळ, श्रीकृष्ण सोनोने, अमोल गवई,गौरव चोपडे, पायल निंबाळकर, शुभांगी गवई,पुनम गवई इत्यादींची उपस्थिती होती.