Home Blog Page 457

शेत रस्त्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करणार – आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

बेलुरा शिवारातील शेत रस्त्याचे भूमिपूजन मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.शेत रस्त्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करणार असे प्रतिपादन यावेळी आमदार श्री.राजेश एकडे यांनी केले. सदर शेतरस्त्या साठी आपल्या शेती मधील जागा उपलब्ध करून देणाऱ्या कमलाबाई विश्वासराव शिंगोटे यांचा सत्कार देखील आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर भूमिपूजन समारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.वसंतराव भोजने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनराव पाटील, नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानराव धांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री.अनिल धनोकार, श्री.संजय सिंह राजपूत,उपसरपंच सीमाताई मेहेंगे, ग्रामपंचायत सदस्य सत्यभामाताई घनोकार, शुद्धमतीताई घनोकार, प्रतिभाताई घनोकार, संगीताई तांगडे,मधुकर हिवाळे,माजी सरपंच विनोद मेहेंगे,पंढरीभाऊ पाटील,जवळा बाजार येथील सरपंचपती अशोकभाऊ डीवरे प्रामुख्याने उपस्थित होते.

सुनगाव येथे आढळला मांडूळ जातीचा साप

0

 

गजानन सोनटक्के

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील सुनगाव ते जामोद रोड वर शेतामध्ये आढळला मांडूळ जातीचा साप साडेपाच ते सहाच्या दरम्यान हा साप येथील शेतकऱ्याला दिसला त्यामुळे हा साप शेतात असताना रोड वरून जाणाऱ्या नागरिकांनी साप बघण्यासाठी एकच गर्दी केली हा साप अंदाजे तीन ते साडेतीन फुटापर्यंत लांबीचा होता त्यानंतर गावातील नागरिकांनी विभागाशी संपर्क करून फॉरेस्ट विभागाचे घुईकर व खेडकर हे कर्मचारी घटनास्थळावर हजर झाले आणि त्यांनी तो साप ताब्यात घेऊन जळगाव जामोद वनविभाग यांच्याकडे सुपूर्द केला

बोरखेडा खुर्द ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कट्टीबद्ध असुन निव्वळ विरोधासाठी विरोध करून गावाचा विकास थांबवयाचा हे चुकीचे : सरपंच जमशेर तडवी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील बोरखेडा खुर्द या गावातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन संर्वागीण विकास कामांना साथ देण्यासाठी सर्व सन्मानिय सदस्यानी विकासाच्या दुरदृष्टीकोणातुन विचार करून एकत्र येणे काळाची गरज असुन त्याशिवाय आपल्या गावाचा विकास होवु शकत नाही असे मनोगत बोरखेडा खुर्द तालुका यावल या गावाचे लोकनियुक्त सरपंच जमशेर तडवी यांनी व्यक्त केले आहे . बोरखेडा खुर्द ग्रामपंचायतीत आपण मागील अडीच वर्षापासुन लोकनियुक्त सरपंच म्हणुन कार्यरत आहोत आणी या कालावधीत आपण आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या सहकार्याने गावाला जोडणाऱ्या व शेतकरी बांधवांच्या दळणवळणाच्या मार्गावरील इंगाळ नदीवर महत्वाचे पुल बांधणी केल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत तसेच गावाला जोडणाऱ्या विविध रस्त्यांची बांधणी , आपल्या गावास नियमित पुरेसा व मुबलक पाणीपुरवठा व्हावा याकरीता आपण विहीरीचे खोलीकरण केले व आज रोजी माझ्या गावकऱ्यांना व्यवस्थीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे . याशिवाय आपण माजी आमदार स्व . हरीभाऊ जावळे यांच्या सहकार्याने विविध विकासाची शक्य झाली अशी विकास कामे आपण करीत असुन , आदीवासी बांधवांना त्यांचे हक्काचा निवारा मिळावा म्हणुन शर्यतीचे प्रयत्न करून आपण सुमारे ८oघरकुलांना मंजुरी मिळवली आहे असे काही चांगले विकासाचे विधायक कामे आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातुन केली असुन, ग्रामस्थांच्या व गावाच्या विकासाला साथ देण्यासाठी आपण कट्टीबद्ध बांधील असुन आपण केलेल्या अल्पशा: प्रत्यनाने मिळालेल्या यशाबद्दल आपणास आत्ममीक समाधान असुन गावाच्या विकासासाठीचे आपले कार्य हे सुरू राहणार असल्याचे तडवी यांनी म्हटले असुन दुसरीकडे मात्र हे करीत असतांना मागील काही दिवसापासुन ग्रामपंचायती मधील माझे सहकारी ग्रामपंचायत सदस्य हे निव्वळ विरोधासाठी विरोध करून प्रतिमाह होणाऱ्या सर्वसाधारण सभांना उपस्थित राहतात मात्र प्रोसिडींगवर नियमाप्रमाणे आपल्या स्वाक्षरी करीत नसतात यामुळे सदस्यांचे कोरम ( सदस्य संख्या )पुर्ण असतांना ही विकासाच्या कामांचे ठराव घेवुन त्यांना नियमाप्रमाणे मंजुरी देता येत नसुन ग्रामपंचायतीकडे पुरेसा निधी असतांना आपणास कुठल्याही विकास कामांना करता येत नसल्याची खंत लोकनियुक्त सरपंच जमशेर तडवी यांनी व्यक्त केली असुन, आपल्या सहकारी सदस्यांनी लावलेले गैरकारभाराचे सर्व आरोप फेटाळुन लावले आहे .

स्व. गोपीनाथ मुंडे पुण्यतिथी निमित्त हिंगणघाट वंजारी समाज सेवा संघातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि.३.6.21
बहुजनांच्यासाठी हक्कासाठी लढनारे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त वंजारी समाज सेवा संघ हिंगणघाट शाखेच्यावतीने शहरातील संत तुकडोजी वार्ड येथील स्व.गोपीनाथजी मुंडे बाल उद्यान तसेच बिडकर वार्ङ येथेही वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वंजारी समाज सेवा संघाचेवतीने ५१ झाडे लावून माजी उपमुख्यमंत्री मुंडे यांचे स्मृतिस अभिवादन करण्यात आले.
वंजारी समाजसेवा संघाचे महिला आघाडीचेवतीनेसुद्धा स्व.मुंडे यांचे पुण्यतिथिदिनी शहरातील नेहरू वार्ड येथील जलारामबाप्पा मंदिर परिसरात गरीब,निराधारांना अन्नदान केले.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक निघाला बाइकचोर,घरफोडीसह अनेक गुन्ह्यात आरोपी.

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट/दि.३.5.21
तेरा वर्षीय अल्पवयीन बालिकेला लग्नाचे आमिष दाखवून आरोपिने वारंवार बलात्कार केल्याची घटना शहरातील इंदिरा गांधी वार्ड येथे घडली.
उपरोक्त प्रकरणी आरोपी विशाल उर्फ वांढुर वसंत उरवते,वय १९, रा.संत कबीर वार्ड याचेवरती अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीवरुन बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दर्ज करीत अटक केली.
पोलिस तपासादरम्यान आरोपीने अनेक गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेल्या दोन पल्सर दुचाकी त्याचेकडून हस्तगत केल्या असून हिंगणघाट पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपीला ताब्यात घेतले.
सदर आरोपी हा घरफोडीचा अट्टल गुन्हेगार असून त्याचेवर घरफोडी तसेच मोटरसायकल चोरीचे गुन्हे दर्ज आहेत.
आरोपीने यवतमाळ,
वरोरा,नागपुर,बुटिबोरी इत्यादि ठिकाणी घरफोडी तर हिंगणघाट पांढरकवड़ा येथून दोन पल्सर दुचाकी वाहनचोरी केली आहे.
जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्या प्रकरणी पीडितेने आपल्या आईसह हिंगणघाट पोलिसांत काल दि.२ रोजी तक्रार नोंद केली.
पिडितेचे कुटुंब घरी नसल्याचे पाहुन आरोपीने तिचेवर अनेकदा बळजबरी केली परंतु हे सर्व असह्य झाल्याने पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला,अखेर पीडितेने घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिसांत दाखल केल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपिचा शोध घेऊन भादवी कलम ३७६(३),२९४,३२३,५०६ अन्वये कारवाई करीत त्याला गजाआड़ केले.
सदर प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी पीयुष जगताप,ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पपीन रामटेके,डीबी पथकाचे पोहवा शेखर डोंगरे,नापोशी निलेश तेलरान्धे,सचिन घेवन्दे,विशाल बंगाले,पोशी सचिन भारशंकर तसेच डीबी पथकाचे विवेक बंसोड़ यांनी कारवाई केली.

लोकनेते स्व्. भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुण्य़तिथी दिनी भाजपा विद्यार्थी आघाडी बुलढाणा जिल्ह्याची जम्बो कार्यकारणी गठीत संग्रामपूर तालुक्यातील दोघांची नियुक्ती

0

 

लोक नेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांची दि.31 मे 2021 रोजी पुण्य़तिथी. सर्वात प्रथम “शत प्रतिशत भाजपा” चा नारा देत बहुजनांना सोबत घेऊन संघटन सशक्त़ करणा-या भाऊसाहेबांच्या पुण्यतिथी दिनी भाजपा विद्यार्थी आघाडी बुलढाणा जिल्हयाची कार्यकारणी गठीत करण्यात आली.
भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाशदादा फुंडकर, आमदार संजूभाऊ कुटे,आमदार श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा विद्यार्थी आघाडी बुलढाणा जिल्ह्याची कार्यकारणी गठीत करण्यात आली. लोकनेते स्व़.भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुण्य़तिथी दिनी त्यांचा “शत प्रतिशत भाजपा” हा नारा तरुणांमध्ये रुजविण्यासाठी देशभक्तीच्या विचाराने प्रेरित विद्यार्थ्यांना भाजपाशी जोडण्यासाठी भाजपा विद्यार्थी आघाडीची जिल्हा कार्यकारणी आज विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड यांनी घोषीत केली.
यामध्ये सरचिटणीस:- आशिष सुरेका(खामगाव), ऋषिकेश नालिंदे (चिखली), आदित्य उदयकार (मोताळा), ऋषिकेश देशमुख (सिंदखेड राजा), वैभव आढाव (जळगाव जामोद), जितेंद्र मोरे (मलकापूर),विकास काकड(देऊळगाव राजा)
उपाध्यक्ष:- पवन ठाकूर (खामगाव), विजय दिवाने (चिखली). नितीन काळे (मेहकर), आकाश काळे (भट), मोहन रावणकर (संग्रामपूर), सागर जयस्वाल (मलकापूर), चेतन पाटील (चिखली), आकाश लटके (मलकापूर) रितेश अग्रवाल (जळगाव जामोद)
सचिव:- सुपेश साखरे (खामगाव) संकेत पाटील (चिखली) अभिषेक देशमुख (बुलढाणा) वैभव तुपकर (सिंदखेड राजा) विनोद भुसारी (मेहकर) गोपाल तायडे (जमाठी)
सहसचिव:- राहुल जाधव (खामगाव) नकुल राज लोंढे (चिखली) विनायक लोगो रे (मेहकर) तेजस भंडारी (बुलढाणा) मोहन सोनवणे (संग्रामपूर),सतीश गीते(देऊळगाव राजा)
सोशल मीडिया प्रमुख:-प्रीतम चव्हाण,वेदांत पाठक
यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच
कायमनिमंत्रित सदस्य:-
मा आमदार चैनसुखजी संचेती, आमदार संजूभाऊ कुटे,आमदार आकाशदादा फुंडकर, आमदार श्वेताताई महाले,माननीय योगेंद्रभाऊ गोडे,माननीय विजयराजसाहेब शिंदे, माननीय प्रदीप इलक, माननीय शिवराजभाऊ जाधव, माननीय सचिनबापू देशमुख,मा राकेशभाऊ राठोड राणा
अशी माहिती भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड यांनी एका प्रसिद्ध पत्रकारद्वारे दिली.

 

चुंचाळ्यात अंगणवाडी खोलीचे भुमीपुजन जि.प.सदस्य रविद्र पाटील यांच्या डी.पी.डी.सी. 8 लक्ष 50हजार निधीतून मंजुर

0

 

 

.यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

. येथे भाजपाचे साकळी दहिगाव गटाचे आरोग्य व शिक्षण सभापती रविद्र पाटील (छोटु भाऊ) यांच्या डी.पी.डि.सी. विकास निधी वर्ष २१/२२ अंतर्गत विद्यार्थ्यांची वाढती संख्या बघता चुंचाळे जि.प.शाळेच्या आवारात अंगणवाडी खोलीचे भुमीपुजन आज दिनांक ३ मे रोजी माजी पिक संरक्षण सोसायटी चे चेअरमन व भाजपाचे कट्टर जेष्ठ समर्थक देवचंद कोळी यांच्या हस्ते करण्यात आले डी.पी.डी.सी निधी अतर्गत जवळपास ८ लाख ५० हजार मंजुर झाले आहे यावेळी रविद्र पाटील यांनी साकळी दहिगाव गटातील विकास कामे करण्यासाठी मी कटीबंद्ध आहे तसेच अंगणवाडी खोलीचे कामे स्वता उभे राहून ठेकेदाराकडून चांगल्या प्रतीचे करुण घ्यावे अश्या सुचना प्रत्यक्ष कार्यकर्त्याना व ग्रामपंचायतीला दिल्या
या प्रंसगी चुंचाळे ग्रामपंचायतीचे सदस्य दगडु तडवी, अनिल कोळी,बोराळे उपसरपंच उज्जैंनसिंग राजपुत,वि.का.सो.चे संचालक ईस्माईल तडवी,भटक्या जाती जमातीचे तालुकाध्यंक्ष समाधान धनगर,सरपंचपती संजय पाटील,जुम्मा तडवी,चंद्रकांत चौधरी,राजु सोनवणे,नितीन फन्नाटे,किसन महाजन,फत्तु तडवी, ग्रा.प.कर्मचारी मनिष पाटील,दलशेर तडवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते चुंचाळे येथे जि.प.सदस्य रविद्र पाटील यांनी विविध विकास कामानसाठी निधी दिल्या बद्दल चुंचाळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले

मुख्याध्यापक, सहायक शिक्षकही निलंबित!; मुलाकडून शौचालय साफ करून घेतल्याचे प्रकरण

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

संग्रामपूर तालुक्यातील मारोड (ता. संग्रामपूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शौचालय एका शाळकरी मुलाकडून साफ करून घेतल्या प्रकरणी यापूर्वी ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले होते. आता शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र भीमराव रोठे व सहायक शिक्षक मुकुंद सखाराम नरोटे यांना निलंबित केले आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री विसपुते यांनी केली. निलंबन काळात त्‍यांला लोणार तालुक्‍यातील पिंपळनेरची शाळा मुख्यालय देण्यात आली आहे.

घटनेची चौकशी सुरू असून, जिल्हास्‍तरीय समितीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. त्‍यानंतर आणखी काही जणांवर कारवाई होऊ शकते. मारोड येथे कोरोना विलगीकरण कक्ष तयार करताना एका शाळकरी मुलाकडून शौचालय साफ करून घेण्यात आले होते. याचा व्हिडिओ सर्वत्र व्‍हायरल झाल्‍याने खळबळ उडाली होती. दुसरीकडे ग्रामसेवक शिवदे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने जि.प. सीईओंना निवेदन दिले आहे

यावल ते सातोद मार्गावरील बुरूज चौक ते शासकीय गोदामा पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणास बहुप्रतिक्षेनंतर सुरूवात

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील यावल ते सातोद मार्गावरील बुरूज चौक ते शासकीय धान्य गोदामा पर्यंतच्या रस्त्याच्या दोन वर्षापासुनच्या मोठया प्रतिक्षेनंतर सुरूवात करण्यात आली असुन, या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ व्हावे यासाठी विविध पक्षांच्या वतीने मागणी करण्यात आली होती , अखेर प्रशासनाने याची दखल घेत कामाला अखेर सुरुवात झाल्याने शेतकरी ,पादचारी व वाहन धारकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे . या संदर्भातील वृत्त असे की , यावल ते सातोद या मार्गावरील बुरूज चौक ते शासकीय धान्य गोदामा पर्यंतच्या ५०० मिटर रस्त्याचे डांबरीकराणाचे बहुप्रतिक्षेत असलेल्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे . दरम्यान अत्यंत वेगाने होत असलेल्या या डांबरीकरणाच्या कामात संबधीत ठेकेदाराकडुन डांबराचा अत्यल्प प्रमाणावर वापर करण्यात येत आहे असुन , येणाऱ्या पावसाळयातच हा रस्ता जैसे थे अवस्थेत येण्याची चिन्ह दिसुन येत असुन , यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदरच्या डांबरीकरणाच्या कामावर नियंत्रण नसल्याचे बोलले जात असुन , संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरचे काम हे अटीशर्तीच्या अधिन राहुन करण्यात येत आहे की नाही याची खातरजमा करणे हे त्यांचे कर्तव्य असुन तात्काळ या डांबरीकरणाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे .

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव विजय कायस्थ हे प्रदीर्घ सेवेनंतर झाले आज कौटुंबीक कार्यक्रमात सेवानिवृत्तपर दिला निरोप

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील कृषी उत्पन्न समिती यावलचे सहसचिव विजय कायस्थ यांचा सेवापुर्ती निरोप समारंभ कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अगदी साद्या पद्धतीने सोहळा पार पडला . दरम्यान यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे जेष्ठ सहसचिव विजय कायस्थ हे आपल्या प्रदीर्घ सेवाकार्यातुन सेवानिवृत्त झाले . यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहातील दालनात आज दिनांक १ जुन २०२१रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झालेल्या या सेवापुर्ती निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी सभापती व संचालक नारायण शशीकांत चौधरी , संचालक उमेश पाटील , सत्तार तडवी , सुनिल बारी , अशोक चौधरी , सचिव स्वप्नील सोनवणे , योगेश चौधरी यांच्यासह आदी कर्मचारी या कार्यक्रमास प्रामुख्याने उपास्थित होते . यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षा पासुन कार्यरत असलेले सहसचिव विजय कश्यप यांनी सन१९या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणुन या पदा वरून त्यांनी आपल्या सेवाकार्यास सुरुवात केली होती व आज ते आपल्या सेवेच्या प्रदीर्घ सेवाकार्यातुन सेवानिवृत्त झालेत दरम्यान आज यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमात सहसचिव विजय कायस्थ यांना सेवापुर्ती कार्यक्रमात सपत्नीक निरोप देण्यात आले . या निरोप समारंभा प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी सहसचिव विजय कायस्थ यांनी केलेल्या आपल्या प्रदीर्घ सेवेत निष्काम सेवाभावी वृत्तीने केलेल्या उल्लेखनिय सेवाकार्याचा उल्लेख आपले मनोगतपर विचार मांडतांना व्यक्त केले .