Home Blog Page 460

कोरोनाच्या भयंकर संकट काळात श्री पीयूष मिहानी आणि श्री राजुभाया शर्मा यांचा ओम साईं फाउंडेशनलां मदतिचा हात

0

 

ओमसाईं फाऊंडेशन म्हणजे नांदुरा शहरातील सामाजिक कार्यात अग्रभागी असलेली संस्था! पोलिसस्टेशन असो की रेल्वे स्टेशन, दवाखाना असो की स्मशानभूमी जिथ कुठ काही मदत पाहिजेत असल्यास नांदुरा शहरातील व पंचक्रोशीतील प्रत्येकाच्या तोंडी सर्वात पहिले नाव येते ते ओमसाईं फाउंडेशन.थोर पुरुषांच्यां फक्तच जयंत्या साजऱ्या करून चालणार नाही तर त्यांनी दिलेल्या शिकवनी नुसार आपण कार्य केले पाहिजेत यां विचाराने ओमसाई चा प्रत्येक सदस्य काम करत असतो.विविध सामाजिक कार्य करत असतांना खर्च हा लागूच असतो.पण एक म्हणतात न की आपण जऱ देवाकड़े जाण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले तर तो देव चार पाऊल पुढे येतो.हाच अनुभव ओमसाई च्यां सर्व सदस्यांना येत आहे.जसजशी ओमसाईच्या कार्याची माहिती समाजात पसरत आहे तसतशे अनेक मदतीचे हात ओमसाई च्या कार्यात उत्साह वाढ़वन्याचे काम करीत आहेत.

अनेक सामाजीक कार्यात सहभागी असणारे श्री पीयूष मिहानी हे देखील ओमसाईचे सामाजिक कार्य बघून प्रभावित झाले व ओमसाईच्या कार्यात आपला देखील सहभाग असावा व आपन देखील समाजऋण फेडण्याचा प्रयत्न करावा या विचारावे एक मदतिचा हात म्हणून त्यांनी ओमसाई चे संस्थापक अध्यक्ष श्री विलास नींबोळकर यांच्यां जवळ 20 हजार रु ची आर्थिक मदत जमा केली. या वेळी डॉ ज्ञानेश्वर लोढ़े साहेब उपस्थित होते.

गेल्या दोन महिन्या पासून सर्वांना ऑक्सीजन च्यां संकटाने भयभीत करून सोडले आहे.अशा संकटात नांदुरा शहरातील उद्योजक श्री राजुभाया शर्मा यांनी ओमसाईं लां जंबो ऑक्सीजन सिलेंडर भेट दिले आहे.त्यामुळे ओमसाई च्यां माध्यमातून अनेकांना ऑक्सीजनची मदत मिळत आहे.

आता राष्ट्रीय अन्नसुरक्षा व शेतकरी योजने अंतर्गत मिळणार केशरी कार्ड धारकांनाही सवलतीच्या दरात धान्य

0

 

यावल ( प्रातिनिधी) विकी
वानखेडे

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेअंतर्गत तालुक्यातील पुर्वी समाविष्ठ न झालेल्या एपीएल (केशरी ) शिधापत्रक धारकांना माहे जुन २१ / ६ / २०२१ पासून सवलतीच्या दरात धान्य मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावलचे तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे.
मागील दिड वर्षापासुन सुरू असलेल्या कोराना संसर्गाच्या पार्श्श्वभुमीवर पिवळया रेशन कार्ड धारकांना धान्य मिळायचे आता माहे२१ जुन पासून २३५७५ कार्डधारकातील १ लाख२३९७५ नागरीकांना या योजनेद्वारे लाभ मिळणार असुन , आता केशरी शिधापत्रिका कार्डधारकांना देखील प्रती माह प्रती व्यक्ती एक किलो गहु तर एक किलो तांदुळ असे दोन किलो धान्य तांदुळ १२ रुपये प्रती किलो तर गहु ८ रुपये प्रती किलो दराने मिळणार आहे. अशा सुचना तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये धान्य वितरणाच्या सुचना तालुका पुरवठा निरिक्षक कु.अंकीता वाघमुळे आणी पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन राजेश भंगाळे यांनी तालुक्यातील सर्व रेशन दुकांनांना दिले असून , मागील एक वर्षा पासुन शिधा पत्रीका असतांना ही कोरोनाच्या संकटकाळात धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या याची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतला असुन , नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार महेश पवार यांनी केले आहे

कोरोना काळातही ठाणेदाराच्या आशीर्वादाने जुगार अड्डा व क्लब सुरु.

0

 

अनिलसिंग चव्हाण( मुख्य संपादक)

वरीष्ठ आधिका-यांचे दुर्लक्ष चे ठाणेदाराला अभय कोणाचे?.
—————————————————–
कारंजाः- वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे )तालुक्यात ठाणेदाराच्या आशीर्वादाने राजकीय माजी पदाधिका-यांचा जुगार अड्डा व क्लब तोही कोरोना काळात सुरु आहे.याकडे वरीष्ठ आधिका-यांचे होत असुन ह्या ठाणेदाराला अभयदान कुणाचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ६ते७ महिन्यापासुन वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यात मदणी,बिहाडी,खैरी सेलगाव ह्या चार गावाच्या मध्यभागी असणाऱ्या विशाल मोरेश्वर भांगे यांच्या गिट्टी खदानवर मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा व क्लब खुले आम सुरु आहे.सदर अड्डा व जुगार चालविणारे मोरेश्वर भांगे हे भाजपाचे माजी सभापती होते तर शिरीष भांगे हे भाजपाचे उप जिल्हा प्रमुख व माजी सरपंच आहेत.ह्या जुगार अड्ड्याचे पार्टनर कारंजा ,वरुड काटोल,नागपूरचा आहेत.आवैध व्यवसाय चालविणारे हे भाजपाचे पदाधिकारी असल्याने कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दारासिंग राजपूत हे स्वतःचे चांगभले करण्यासाठी खुलेआम जुगार अड्डा व क्लब चालू देत असल्याचा समजते.त्यामुळे ह्या गब्बर ठाणेदारास कोणाचे अभयदान मिळत मिळत आहे.हा कारजा तालुक्यात चर्चेचा वीषय बनला आहे.अश्या ठाणेदारावर त्वरित कार्यवाही होणः आवश्यक आहे.आशी जोरात चर्चा सीरु आहे.

नवीन अपंग अधिनियम कायदाची सक्तीने अंमलबजावणी करावी पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर याचा सोबत अपंग जनता दल चे विभागीय उपाध्यक्ष शेख बब्बू याची चर्चा

0

 

अमरावती.. अपंगांचा जलत गतीने विकास व्हावा म्हणून केंद्र सरकार ने अपंग हक्क अधिनियम 2016 नवीन कायदा बनविला आहे व हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये सक्तीने लागू करावा म्हणून अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य चे नेते शेख अनिस पत्रकार प्रयत्न करत आहे असून अमरावती जिल्ह्यात सक्तीने अंमलबजावणी करण्यात यावी या बद्दल आहे अमरावती जिल्हाचा पालकमंत्री यशोमती ठाकूर सोबत अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अमरावती विभागीय उपाध्यक्ष शेख बब्बू यांनी सविस्तर चर्चा केली असून मा पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर याची अपंग हक्क अधिनियम 2016 चा कायदा ची जिल्ह्यात सक्तीने अंमलबजावणी करण्यात येणार असे आश्वासन दिले आहे यावेळी समाज सेवक अन्नूला खान. शमा भाई. राईस भाई समीर भाई. मयूर मेश्राम. शाहीन परवीन. गोपाल वनवे. कासीम भाई. अन्वर शहा. रुस्तम शेख. मुतालिख चौस. नासीर बेग ये उपस्थित होते

महाराष्ट्रात तीन कृषी कायद्याच्या विरोधात काळे झेंडे लावून प्रहारनी पाळला निषेध दिन

0

 

सचिन वाघे वर्धा
26.5.21

वर्धा :– केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी विरोधी कायदे रद्द व्हावे यासाठी मागच्या सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. 26 मे रोजी मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण होत आहे शेतकरी विरोधी कायदे करणाऱ्या मोदी सरकारच्या निषेध म्हणून आज मोदी सरकारच्या निषेध म्हणून 26 मे रोजी महाराष्ट्राचे जलसंपदा, शिक्षण,कामगार व महिला व बालकल्याण राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे सरसेनापती नामदार बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत , पूर्व विदर्भ प्रमुख गजू कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील सर्व शेतकरी,शेतमजुर,व प्रहार सेवकांनी आपआपल्या घरावर व शेतीवर काळा झेंडा लावून निषेध नोंदवला वर्धा जिल्ह्यातही सर्व तालुक्यात प्रहारचे सर्व पदाधिकारी जिल्हाप्रमुख,उपजिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख, शहर प्रमुख,शाखा प्रमुख यांनि गावागावात काळे झेंडे लावून निषेध नोंदवला

जळगाव वनविभाग अंतर्गत अस्वलची अवयव तस्करीसाठी शिकार?

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

मादी अस्वल मृत अवस्थेत नखे व दाताविना आढळले
ज. जा./ दि 26 /ता प्र
तालुक्यातील सूनगाव शिवार (जामोद बिट) च्या वर जंगलात मृत अस्वल कुजलेल्या स्थितीत आढळून त्याचे नखे व दात चोरट्याने लांबवल्याची घटना उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजून वणप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे.
====== चौकट =======
13 काळवीट हरणांची शिकार ची घटना ताजी असताना ,ही कुजलेले अस्वल मृत व अवयव गायबस्थितीत आढळल्याने तालुक्यातील वनविभाग च्या अस्तित्व व कार्यशैलीवरच प्रश्न उपस्थित झाला आहे.सागवान तस्करी,कडुनिंब कटाई,गौण खनिज चोरी,डिंक तस्करी,अंजन पाला तस्करी, राखीव वनात अवैध चराई, एकना दोन असे सर्वच वनगुन्हे खुलेआम सूरु असताना बघ्याची भूमिका घेणारा वनविभाग आता ह्या एकापाठोपाठ एक होत असलेल्या वन्य प्राण्यांच्या मृत्यू ढिम्म बसून पाहत आहे.
================
सविस्तर वृत्त असे की
दि 24 मे 2021 रोजी वनविभागाच्या पूर्व भिंगारा बिट मध्ये कँपर्टमेंट नंबर 631 च्या एका खोऱ्यातील ओढ्यात
अंदाजे 8 ते 10 दिवस आधी मृत पावलेले एक मादी अस्वल अंदाजे 7 वर्ष वय असलेले मृत व कुजलेल्या अवस्थेत दिसून आले.
दहन प्रसंगी प्रत्यक्ष दर्शींच्या सांगण्यानुसार ह्या अस्वलची समोरच्या पायाची काही बोटे व नखे ही गायब होती ,त्याचप्रमाणे काही दात सुद्धा तोडून नेल्याचे दिसत होते,
नियमानुसार पंचनामा व इतर सर्व सोपस्कार पूर्ण करून पंचांच्या उपस्थित दिनांक 24 ला संध्या अंदाजे 5 वाजता सदर अस्वलाला दहन देण्यात आले.
यावेळी याच शिवारात सलाईबन प्रकल्प येथे रहिवासी असणारे जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक मंजितसिंग सिख ,वनपरिक्षेत्र अधिकारी बी.डी. कटारिया,पशुधन विकास अधिकारी,व वन कर्मचारी सह साक्षीदार व प्रत्यक्ष दर्शी म्हणून काही आदिवासी स्थानिक नागरिक उपस्थित होते.
====चौकट==========
नेमके कशामुळे मेले अस्वल??
ह्या घटनेचा अभ्यास केला असता अस्वल खालील एका कारणाने मृत झाले असेल असे दिसते.
१)तापत्या उन्हात तहानेने व्याकुळ अस्वल पाण्याच्या शोधार्थ फिरून पाण्याअभावी मेले असेल.
२)सराईत शिकार्यांनी तिला मारून अवयव काढून नेले असतील
३)अस्वल नैसर्गिक रित्या मृत पावूण
अंधश्रद्धेपोटी कुणी दात व नखे काढून नेली असतील.
===================
ह्याविषयीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून रीतसर नियमानुसार अस्वलास दहन पंचासमक्ष देण्यात आले
वरिष्ठ अधिकारी च्या मार्गदर्शनात तपास सुरू असून आरोपीचे व मृत्यूच्या कारणाचे शोध घेणे सुरू आहे.
-बी डी कटारिया (वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग जळगाव जामोद)
==================
सदर अस्वल चा मृत्यू हा नैसर्गिक दिसत असून तिची काही नखे व दात मात्र गायब दिसून आले.नुकत्याच शिकार झालेल्या काळवीट हरीण व हे अस्वल मृत्यू प्रकरण याने वन्यजीव व पर्यावरणास हानी पाहचली असून यापुढे तालुक्यात वन्यजीव विषयी जनमानसात आणखी जागरूकता निर्माण करावी लागेल- मंजितसिंग शिख( मानद वन्यजीवरक्षक बुलडाणा जिल्हा)
===========+=======
वनविभागाची भूमिका संशयास्पद
या घटने विषयी तालुक्यातील प्रसार माध्यमाचे प्रतिनिधींना ह्या मृत अस्वलाच्या छायाचित्र,व दहन देतांनाचे छायाचीत्र प्रसिद्धी साठी मगितल्यावरही सदर कार्यालयाने दि 26 च्या 3 वाजेपर्यंत कोणताही ठोस प्रेसनोट किंवा छायाचित्र प्रसिद्धीस दिले नाही, तालुक्यातील बहुतांश पत्रकार ह्या बातमीच्या माहिती व फोटोसाठी 2 दिवस कार्यालयात चकरा मारत होते तसेंच तालुका,उपजिल्हा व जिल्हा अधिकारीना फोन करत होते, परंतु हे सर्व एकाच माळेचे मणी असून माहिती दडवून काहीशे संशयस्पद व संभ्रमात्मक वातावरण यांनी बनवले.
3 वाजता एक प्रेसनोट व्हाट्सउप च्या माध्यमाने दिली तर त्यावर सही खोडलेली व शिक्काच नाही अशी दिली त्यामुळे हिरव्या कपड्याने झाकलेल्या ह्या गुप्त कार्यालयाचे कामकाज ही गूढ पद्धतीने चालते.
सम्पूर्ण तालुक्यात ह्या हरीण व अस्वलाच्या शिकार प्रकरण नि नागरिक व वणप्रेमी हादरले असून
ह्या सातपुड्याच्या कुवरदेव ते उंबरदेव हा सम्पन्न जंगल प्रादेशिक स्वरूपाचा असून या विभागात एवढ्या संख्येने वन्यजीवांची उपस्थिती कशी काय?या वनजीवांच्या संख्येस बघितल्यावर आजपर्यंत तालुक्यात मोठी प्राणी गणना का झाली नाही?अंबाबरवा अभयारण्य व मेळघाट व्याघ्रप्रकल्प चा शेजारील ह्या विभागाचा वन्यजीव म्हणून का समावेश करू नये? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

हिंगणघाट शहरात चौका – चौकात काळे झेंडे व फीती लावून केला केंद्र सरकारचा निषेध

0

 

सचिन वाघे वर्धा

26.5.21
हिंगणघाट :-दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय किसान आंदोलनाला दिनांक 26 मे रोजी सहा महिने पूर्ण होत आहे स्वतंत्र भारतामध्ये इतके दीर्घकाळ चालणारे हे आंदोलन एकमेव आहे. संपूर्ण जगामध्ये भारताची कृषिप्रधान देश म्हणून ओळख असतांना शेतकऱ्यांना सहा महिने आपल्या मागणीसाठी आंदोलन करावे लागावे. ही बाब केंद्र सरकार साठी अत्यंत लाजिरवाणी आहे. भारतातील शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. केंद्र सरकार आंदोलनाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे लज्जास्पद आहे. केंद्र सरकारने हेकेखोरी करणे ही भारतातील लोकशाहीला मारक अशी आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रीय किसान आंदोलनाला समर्थन म्हणून व केंद्र सरकारचा निषेध म्हणून हिंगणघाट शहरात ठिकठिकाणी कोव्हिडं -19 च्या नियमाचे पालन करून काळे झेंडे व फिती लावून निषेध नोंदविला आहे. केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द करावे शेतकऱ्यांच्या शेतमालाला एम एस पी चा कायदा लागू करावा याकरिता हे निषेध आंदोलन हिंगणघाट मधील वेगवेगळ्या चौकात करण्यात आले. नंदोरी चौक येथे महेश माकडे, गौरव खिराळे, भूषण वाटोरे, मयूर नगराळे हे होते. विठोबा चौक येथे अजय मुळे, रोशन डेकाटे, नानाभाऊ शिरसागर, मंगेश ताजणे यांच्या वतीने तर कारंजा चौक येथे दिनेश वाघ, जयंत धोटे, गोलू भोंगाडे, रोहित राऊत , हर्ष मून , संकेत नगराळे, श्रीकांत वागदे हे होते मा.अनिल जवादे राष्ट्रीय किसान आंदोलन यांनी प्रथम नंदोरी चौक येथे भेट देऊन केंद्र सरकार विरुद्ध नारेबाजी केली. त्यानंतर विठोबा चौक या ठिकाणी त्यांनी भेट दिली तिथे केंद्र सरकारनी तीनही काळे कृषी कायदे रद्द करावे अश्या घोषणा दिल्या आणि शेवटी कारंजा चौक या ठिकाणी भेट देऊन या निषेध आंदोलनाचा समारोप नंदोरी चौक येथे केला. यावेळी अनिल जवादे यांच्यासोबत भारत पाटील, गोकुळ पाटील, हनुमान गुडदे , विलास भोमले आदि किसान कार्यकर्ते उपस्थित होते

भीम आर्मी च्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी बोराळे गावाचे तरूण सुपडू संदानशिव यांची निवड

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील बोराळे येथील युवा सामाजिक कार्यकर्त सुपडु संदानशिव यांची भीम आर्मी भारत एकता मिशन या आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य(सचिव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे
सुपडू संदानशिव यांचा ग्रामीण आणी आदीवासी क्षेत्रातील सर्वसामान्यात व्यक्तिपर्यंत वाढलेला दांडगा जनसंपर्क या दृष्टीकोणातुन जळगांव जिल्ह्यातील राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे,जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे,महा सचिव श्रीकांत वानखेडे व संघटक विक्रम प्रधान यांच्या साथीचे काम पाहून संघटनेचा ग्रामीण भागात विस्तार करण्यासाठी त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य (सचिव) म्हणून जबाबदारी सोपवली असल्याने त्यांची तळमळ बघून संघटनेला गती मिळणार आहे.
भीम आर्मी जळगांव जिल्हा युनिट मधील समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारा आक्रमक चेहरा असलेले सुपडू संदानशिव हे संस्थापक अध्यक्ष ॲड .चंद्रशेखर आझाद रावण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.
संघटनेच्या अनेक शाखा संदानशिव यांनी उघडलेल्या असून महाराष्ट्र राज्य मध्ये भीम आर्मी जोमाने वाढविण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन शिंग, प्रभारी दत्तू मेढे,महाराष्ट्र राज्य प्रमुख मा.प्रफुल जी शेंडे यांनी सुपडू संदानशिव यांना निवडीचे पत्र दिलेले आहे,त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य प्रचार प्रसिद्धी प्रमुख राजेश गवळी यांनी सुद्धा प्रसिद्धी द्वारे कळवले आहे. सुपडु संदानशिव यांच्या निवडीचे अनेकांनी स्वागत केले आहे .

यावलच्या बेपत्ता अल्पवयीन मुलीचा उत्तरप्रदेश सारख्या राज्यातुन शोधकार्यात उल्लेखनिय कामगीरी बजावणाऱ्या पोलीसांचे सत्कार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील धोबीवाडा परिसरात राहणाऱ्या व साधारण दिड वर्षापुर्वी शाळेतुन बेपत्ता झालेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा उत्तर प्रदेश सारख्या राज्यातुन शोध लावुन तिला सुखरुप आपल्या कुटुंबाच्या स्वाधीन करीत एक उत्कृष्ठअशी उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्दल पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणी त्यांचे सहकारी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांचे सत्कार आज लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले . दरम्यान यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांनी मागील दिड वर्षापुर्वी शहरातील शाळेतुन अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन ट्विंकल कोळी हिचा मिळालेल्या माहीतीच्या आधारावर गौरखपुर जिल्ह्यातील बडहलगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देरवा चौक या नेपाल राज्याच्या अगदी सिमारेषेवर जवळ असलेल्या गावातुन शोध लावुन तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले . अशा धाडसी कर्तृत्वान व कार्यतत्पर पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व त्यांच्या सोबत पथकात असणारे त्यांचे सहकारी विजय पाचपोळे यांचा यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते अतुल पाटील , माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक शेख असलम शेख नबी, सामाजीक कार्यकर्त गिरीष महाजन , गणेश भालेराव ( महाजन ) , हाजी फारूख शेख , एजाज देशमुख, राष्ट्रवादीचे कामराज घारू, सामाजीक कार्यकर्ते गणेश जोशी यांच्यासह आदी मान्यवरांनी या दोघ अधिकारी आणी बेपत्ता मुलीच्या शोधकार्यास मोलाचे मार्गदर्शन देवुन शोध कार्यास यशस्वी करणारे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांचे ही याप्रसंगी शाल पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आले .

स्व.राजीवजी सातव यांच्या रूपाने कुशल संघटक व दूरदृष्टी ठेवणारा नेता हरपला -आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे तसेच तालुका व शहर काँग्रेस कमिटी नांदुरा यांच्या वतीने स्व.राजीवजी सातव यांच्या अस्थीचे कलश दर्शन तसेच मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्व.अनिल खाकरे पाटील व सिदखेड राजा तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष स्व.जगन ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्व.राजीवजी सातव यांच्या रूपाने कुशल संघटक व दूरदृष्टी ठेवणारा नेता गेल्याने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे अशी भावना आमदार श्री.राजेश एकडे यांनी व्यक्त केली.स्व. राजीवजी सातव यांच्या अस्थीचे कलश दर्शन घेण्या साठी तसेच मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्व.अनिल खाकरे पाटील व सिदखेडराजा तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष स्व. जगन ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यावेळी आमदार श्री.राजेश एकडे, नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील,बुलडाणा जिल्हा काँगेस ओबीसी सेल चे अध्यक्ष श्री.गजानन खरात, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे, नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे, नांदुरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. गौरव पाटील, महाराष्ट्र सोशल मीडियाच्या सचिव सौ.सुनीताताई देशमुख,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे,
मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. बंटी पाटील, मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.राजू हाडे पाटील, नांदुरा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर डामरे,नांदुरा शहर महिला काँग्रेस च्या अध्यक्षा श्रध्दाताई गावंडे, श्री.श्रीकृष्ण खडसे,श्री.अशोक पाटील,श्री.प्रमोद गायकवाड,श्री.आकाश वतपाळ, अँड.मोहतेशाम रजा,श्री.अतुल पाटील,
श्री.निवृत्ती,श्री.
जयप्रसाद राजपूत,हिंगणकर,श्री,नारायण झाल्टे,श्री.शंकर बोबडे,श्री.कैलास नामगे,श्री.निवृत्ती वक्ते,श्री.सोपान गावंडे,श्री.गणेश पाटील,श्री.सुनील वेरुळकर,ईकबल खान,श्री.नामदेव मानकर,श्री.विजय डवंगे,श्री.विजय वासतकार,श्री.सुपडा धोटे,श्री.अशोक शेजोळे,श्री.भीमराव गवई प्रामुख्याने उपस्थित होते.