Home Blog Page 459

शिवराज्याभिषेक दिनाचा नगरपरिषद जळगाव जामोद ला पडला विसर ,,,,,,,,,नगरसेवक श्रीकृष्ण केदार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

दिनांक 6 जून 2021 रोजी संपूर्ण राज्यभरच नव्हे तर देशभर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिन संपन्न झाला.
हा सोहळा राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये संपन्न होत असतांना सुद्धा नगर परिषद जळगाव जामोद शासन व प्रशासनाला शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा पडला विसर पडला.
छत्रपतींच्या नावावर मते मागून देशात सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपशासित नगरपरिषद प्रशासनास शिवराज्याभिषेक दिनाच्या विसर पडणे म्हणजे एक प्रकारे शिवभक्तांच्या भावनांसोबत केलेली थट्टाच होय. अशा या निगरगट्ट व छत्रपतींचे नावाचा केवळ वापर करणाऱ्या व छत्रपतींचा सन्मान करण्याची मानसिकता नसलेल्या विचारसरणीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.
नगर परिषद च्या संबंधित अधिकाऱ्यांना शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा का आयोजित केला नाही अशी विचारणा केली असता त्यांनी अत्यंत पोरकट व उडवाउडवीची उत्तर देत थातूर मातुर समाधान करण्याचा प्रयत्न केला.अशा या अकार्यक्षम प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वेळीच कार्यवाही होणे आवश्यक आहे.अन्यथा अशा या घोडचूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या नगराध्यक्षा व संबंधित पदाधिकारी यांना जनता माफ करणार नाही.

किनगाव बु Iयेथे आजारास कंटाळुन एका वयोवृद्ध शेतकऱ्याची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या पोलीस अक्समात नोंद

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव बु I येथील एका वयोवृद्ध व्यक्तिने आजारास कंटाकुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत पोलीसात अक्समात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील किनगाव बु येथील राहणारे एकनाथ बाबुराव पाटील
वय८१वर्ष दिनांक ७ जुन रोजी सकाळी ११च्या सुमारास आपल्या शेतात जावुन येतो असे सांगुन केले मात्र सायंकाळी उशिरा पर्यंत घरी आले नसल्याने घरच्या मंडळींनी व नातेवाईकांनी शेतात जावुन त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळुन आले नाही , दरम्यान आज दिनांक ८ मे रोजी त्यांच्या कुटुंबाच्या मंडळीने पुनश्च शोध घेतला असता कासारखेडा शिवारातील रविन्द्र रामकृष्ण पाटील ( टेलर ) यांच्या शेतातील विहीरीवर एकनाथ पाटील यांची काठी दिसुन आली त्यावेळी एकनाथ पाटील यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसुन आला यावेळी गावातील यांच्या मदतीने अखेर प्रेत विहिरीतुन बाहेर काढण्यात आले , या घटनेची खबर मयताचा मुलगा हेमराज एकनाथ पाटील यांच्या खबरीवरून यावल पोलीस स्टेशनला अकसमात मृत्युची नोंद करण्यात आली असून , मयत एकनाथ पाटील यांचे मृतदेह शवविच्छेदना साठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे .एकनाथ बाबुराव पाटील ही वयोवृद्ध व्यक्ति होती व त्यांना बऱ्याच दिवसांपासुन पोटदुखीचा आजार जळला होता , त्यामुळे त्यांना पोटदुखीच्या आजारातुन होणारा त्रास असहाय्य झाल्याने अखेर त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे . घटनेचा तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .

चुंचाळे बोराळे गावास अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून आ. सौ .लताताई सोनवणे यांनी मदतीचे दिले आदेश

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

काल रात्री तालुक्यातील चुंचाळे बोराळे गाव परिसरात विज कोसळली व ढगफुटी सदृष्य झाल्याने झालेल्या मुसळधार पाऊस पडल्याने गावातुन जाणाऱ्या नदीला १५ वर्षानंतर नदीला मोठा पुर आल्याने दोघ गावांचा संपर्क तुटला होता तर एका ठीकाणी विज कोसळुन दोन बैलांचा मृत्यु तर दोन मोटरसायकल पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली असुन .या संदर्भात मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील पश्चिम क्षेत्रातिल असलेली चुंचाळे व बोराळे या गाव परिसरात आज सायंकाळच्या सुमारास ढगफुटीसदृष्य झाल्याने दोघ गावांना जोडणाऱ्या नदीला २००६नंतर अशा प्रकारचे मोठे पुर आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे . तर हा सर्व प्रकार ढगफुटीसारखा असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले या सर्व वातावरणात विज कोसळल्याने बोराळे गावातील शेतकरी सुरेश प्रल्हाद धनगर यांच्या घरासमोर बांधलेल्या बैलांच्या अंगावर विज कोसळयाने सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन बैलांचा मृत्यु झाला असुन , यांची संजयसिंग राजपुत आणी रमेश पिताबंर धनगर यांच्या १ लाख३०हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली देखील पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याचे वृत्त आहे . दरम्यान चुंचाळे बोराळे गावांच्या उत्तरेकडील असलेल्या सातपुडा पर्वताच्या जवळ असलेल्या निंबादेवी तलावाच्या परिसरात ढगफुटी झाल्याचे वृत्त आहे .अचानक परिसरात मुसळधार पाऊस मागील पाच तासापासुन सुरू असल्याने अचानक गावातील नदीला मोठा पुर आल्याने दोघ गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे . या पार्श्वभुमीवर महसुलच्या प्रशासकीय यंत्रणेकडुन सकाळ पासुनच नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामास सुरूवात करण्यात आली होती या पंचनाम्याच्या कार्यवाही साकळीचे मंडळ अधिकारी पी .बी .कडनोर , ग ग्रामसेवक राजू तडवी, ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर. यांच्यासह चुंचाळे गावाचे तलाठी प्रविण नेहते , विशाल राजपुत कोतवाल यांनी यात भाग घेतला दरम्यान या वेळी पावसामुळे नुकसान झालेल्या ९ घरांचे पंचनामे करण्यात आले तर पुराच्या पाण्यात वाहुन गेलेल्या दोघमोटरसायकल वाहन सापडले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी तात्काळ चोपडा मतदारसंघाच्या आमदार सौ .लता ताई चंद्रकांत सोनवणे , तहसीलदार महेश पवार , विस्ताराधिकारी हबीब तडवी, , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील , शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवी सोनवणे , युवा सेनेचे प्रमुख गोटु सोनवणे , योगेश पाटील , दिनेश पाटील , पराग महाजन , दिपक कोळी , पिटुं धनगर, चुंचाळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच नाजिमा तडवी , स्वराज फाउंडेशनचे भरत चौधरी , ग्राम पंचायत सदस्य अनिल कोळी , रहेमान तडवी , सुकलाल कोळी व सुधीर सर चौधरी यांच्यासह आदी ग्रामस्थ बांधव याप्रसंगी उपस्थित होते . यावेळी आमदार सौ .लताताई सोनवणे यांनी घरांचे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना तात्काळ अन्नधान्य देण्याच्या सुचना यावेळी महसुल प्रशासनास दिल्यात .

यावल नगर परिषदच्या माध्यमातुन तिन कोटी निधीतुन उभारण्यात येत असलेल्या नवीन १०० एमएलडी जलसाठवण क्षमतेच्या तलावाचे काम अंतीम टप्यात : अतुल पाटील

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील नगर परिषद व्दारे शहराला स्वच्छ योग्य व मुबलक पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीकोणातुन १४ व्या वित्तीय आयोगाच्या सुमारे २ कोटी८७ लाख रुपये निधी खर्चातुन नवीन जल साठवण तलावाचे काम अंतीम टप्यात आले असुन ,या नव्या साठवण तलावामुळे शहरातील ६० हजार लोकवस्तीतील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याची माहीती माजी नगराध्यक्ष तथा नगर परिषदचे गटनेते अतुल पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली . यावल शहरापासुन सुमारे दोन किलो मिटरच्या लांबीवर असलेल्या जुन्या पाणी साठवण तलावाच्या बाजुस २०० मिटर लांबी आणी५० मिटर रुंद्धी व११ मिटर उंचीचे १ooएमएलडी जलसाठवण क्षमतेच्या तलावाचे काम जवळपास अंतीम टप्यात आले असुन , यामुळे ३०० एमएलडी क्षमतेच्या जुन्या साठवण तलाव आणी १०० एमएलडी क्षमतेचे नवीन उभारण्यात येत असलेल्या साठवण तलावाचे काम साधारण मागील तिन महीन्यापुर्वी सुरू करण्यात आले होते आता हे काम ९० टक्के पुर्ण झाले असुन , शहराला सद्य परिस्थितीला जुन्या साठवण तलावातुन शहराला ४५ दिवस पाणी पुरवठा करता येईल ईतकाच जलसाठा उपलब्ध रहात आहे यामुळे वारंवार भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नापासुन आता यावलच्या नागरीकांची सुटका होणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलतांना अतुल पाटील यांनी दिली . जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरातील नगर परिषदेतील होणाऱ्या पाण्याच्या संकटात असतांना यावल शहरातील नगर परिषद हे नागरीकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणारी एकमेव नगर परिषद असल्याची माहीती त्यांनी यावेळी पाटील यांनी दिली . यावेळी अतुल पाटील यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रा . मुकेश येवले , माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश मुरलीधर कोलते , नगरसेवक समिर शेख ,यांच्यासह सामाजीक कार्यकर्ते गणेश महाजन , डॉ . युवराज चौधरी , दिलीप वाणी , राजु फालक , गिरीष महाजन , एजाज देशमुख यांच्यासह आदी मान्यवर मंडळी उपस्थितीत होती .

शिवकल्याण मराठा बिग्रेड व मराठा समाज तर्फे नानाजी पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांना निवेदनाद्वारे मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि. 8.6.21
मराठा समाजाला आरक्षण व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपण आपल्या पक्षातर्फे शर्थीचे प्रयत्न करावे तसेच हिंगणघाट शहरामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा व उद्यान आहे तसेच या नावाने खूप मोठे उद्यान हिंगणघाट शहरात आहे परंतु त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात छेडखानी गांजा दारू पिणे तसेच मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असतात याबाबत नगरपरिषद प्रशासनास वारंवार विनंती करून सुद्धा कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही त्यामुळे आपणास विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज उद्यान याचे सौंदर्यीकरण व सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची गस्त मिळण्या बाबत आपणास याद्वारे विनंती करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज या उद्या या उद्यानाचे सौंदर्यीकरण मागील पाच वर्षापासून झालेले नाही त्यामुळे या उद्यानासाठी भरीव निधी देण्यात यावा तसेच या उद्यानामध्ये डाव्या बाजूला खुल्या जागेवर समाज भवन व सामाजिक कार्यक्रम व इतर समारोहा साठी निधी मंजूर करावा संबंधित निवेदन देताना अक्षय निकम (मराठा बीग्रेड अध्यक्ष ), अमित गावंडे, अक्षय भांडवलकर, प्रवीणभाऊ काळे, अक्षय गायकवाड, अभिजीत शिंगारे, आदित्य पालांडे व समाज बांधव उपस्थित होते

हात मदतीचा” सामाजिक बांधिलकी जपणारा व नवप्रेरणा देणारा आदर्श उपक्रम-नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांचे प्रतिपादन

0

 

अजहर पठाण सेलू/

“केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहीजे” या उक्तीप्रमाणे समाजाशी घट्ट नाळ जोडणारा व समाजाला नव प्रेरणा देणारा उपक्रम म्हणजे हात मदतीचा असे गौरवोद्गार नायब तहसीलदार आदरणीय प्रशांत थारकर यांनी संयोजक सुनील गायकवाड आयोजित हात मदतीचा या कार्यक्रमात केले.
कोविडमुळे ग्रस्त अशा २१ महिला भगिनींना प्रातिनिधिक स्वरूपात जीवनावश्यक अन्नधान्य किटचे या वेळी वाटप करण्यात आले.तसेच १०१ महिलांना वाटप करण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील छत्रपती शिवाजी नगरात आयोजित या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते शेख मेहमूद,तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार प्रशांत थारकर, विशेष उपस्थिती निर्मलाताई लिपणे,तलाठी मुकूंद आष्टीकर,ह.भ.प प्रसाद महाराज काष्टे,रमेश दौड,प्रशांत ठाकूर, लक्ष्मण दोड , मोहन समुद्रे,वसंत शेरे,विनोद शेरे,शेख साजिद बाबासाहेब लिपणे , कुमार महाजन, यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना थारकर साहेब म्हणाले की कोविडच्या या भिषण परिस्थिती मध्ये एक हात मदतीचा देवून खर्या अर्थाने आपण समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे.

प्रास्ताविकात सुनील गायकवाड यांनी या उपक्रमाचा उद्देश सांगितला.ते म्हणाले की आपणा सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे.या भिषण परिस्थिती मध्ये देखील नियती कोपली पण माणुसकी जिवंत आहे हे ब्रीद मनाशी घट्ट करून या वर्षीचा हा उपक्रम केला आहे.यासाठी सर्वांनी मनापासून सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
ह.भ.प प्रसाद महाराज काष्टे यांनी सुनील गायकवाड यांचे कौतुक आपल्या शैलीत केले.

अध्यक्षीय समारोप करतांना शेख मेहमूद यांनी या सामाजिक उपक्रमाचा एक भाग होता आले या बद्दल समाधान व्यक्त करत असेच उपक्रम राबविले जावेत असा आग्रह व्यक्त केला.
यशस्वितेसाठी मदन मानमोडे गजानन बागल शुकाचार्य शिंदे अभिजीत गायकवाड दत्तराव किरळकर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन योगेश ढवारे यांनी केले.

यावल तालुक्यातील बोराळे चुंचाळे येथे ढगफुटी सदृश्य पाऊस विज पडून बैल जोडी जागीच ठार.

0

 

यावल तालुका ,(प्रतिनिधी)विकी वानखेडे

चुचाळे बोराळे : सोमवारी सायंकाळी यावल तालुक्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडात मध्ये पाऊस झाला यात चुंचाळे -बोराडे व सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गायरान भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. दोनतास तुफान वेगात सऱ्या बरसल्या तर बोराडे गावात वीज पडून सुरेश प्रल्हाद धनगर यांची बैल जोडी ठार झाली. एक लाख २० हजार रूपये किंमतीची सदरील बैल जोडी होती तर या घटनेत प्रत्यक्षदर्शी विनोद(महाराज) वानखेडे हे थोडक्यात बचावले तसेच चुंचाळे या गावात पुराचे पाणी प्रचंड वेगाने येत असतांना संजयसिंग राजपूत व रमेश पितांबर धनगर चुंचाळे या दोघांच्या दुचाकी पुरात वाहून गेल्या तसेच गायरान व चुंचाळे प्लॉट भागातील २०० हून अधिक घरात पाणी शिरले आहे.गायरान, चुंचाळे व बोराळे या गावांचा एकमेकाशी संपर्क हा रात्री उशिरापर्यंत तुटलेला होता पाऊस थांबल्यामुळे नागरिकांमध्ये थोडा दिलासा आहे.—

चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील यांच्या विरूध्द अविश्वास पस्ताव पारीत.

0

 

यावल ,(प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा पाटील यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सोमवारी पारीत झाला. ग्रामपंचायत कार्यालयात तहसिलदार यांनी घेतलेल्या विशेष सभेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सहित नऊ सदस्यांनी अविश्वासाच्या बाजुने मतदान करीत ९ विरूध्द एक असा प्रस्ताव पारित झाला.
चुंचाळे ता. यावल येथील लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील या तीन वर्षापूर्वी डिसेंबर २०१७ मध्ये सरपंच पदावर विराजमान झाल्या होत्या. तर गेल्या काही महिन्यापासून सरपंच पाटील या उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करत नाहीये म्हणून ३१ मे रोजी येथील तहसील कार्यालयात त्यांच्या विरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता तेव्हा या प्रस्तावावर सोमवारी तहसिलदार महेश पवार साहेब यांनी चुंचाळे ग्रामपंचायतीत सायंकाळी ४ वाजेला विशेष सभा घेण्यात आली या सभेत सरपंच यांच्या विरूध्द उपसरपंच नाजिमा अन्वदर तडवी सह सुकलाल यशवंत पाटील, अनिल पंडीत कोळी, अरमान मनवर तडवी, दगडू किताब तडवी, शारदा सुधाकर चौधरी, नवशाद सायबु तडवी, जयनूर संजय तडवी, व सिंधुबाई संजय पाटील यांनी मतदान केले व ९ विरूध्द एक असा अविश्वास प्रस्ताप पारीत झाला आहे.-पुर्ण—फोटो आहे

मोदी सरकार च्या डिझेल, पेट्रोल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जळगाव जा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचे मुंडन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी ह्यांच्या सूचने नुसार जळगांव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक ७/०६/२०२१, सोमवार रोजी, सकाळी 11 वाजता संपूर्ण राज्यात एकाच वेळी होत असलेल्या डिझेल,पेट्रोल व गॅस दरवाढ निषेध आंदोलनात जळगांव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटीने सहभाग नोंदवला. जळगांव जामोद शहर व तालुका काँग्रेस कमिटी आयोजित डिझेल, पेट्रोल व गॅस दरवाढ विरोधात पदाधिकारी व कार्यकर्ते ह्यांनी एकत्र येत स्थानिक मुंदडा पेट्रोल पंप येथे नगर सेवक श्रीकृष्ण केदार व शेतकरी समाधान नानकदे यांनी प्रथम केंद्र सरकारच्या विरोधात मुंडन करून व पेट्रोल व डिझेल ग्राहकांना गुलाबाची फुले व पेढा भरवत त्यांना अच्छे दिन ची आठवण देत जनता सहन करत असलेल्या अन्यायाची जाणीव करून देत केंद्रातील भाजपा सरकार चा जाहीर निषेध व्यक्त केला. यापुढे पक्ष आदेशानुसार तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून त्रासलेल्या जनतेला न्याय देण्याचे काम काँग्रेस चे पदाधिकारी करतील असा निर्धार करण्यात आला.
यावेळी पक्षनेत्या डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर,तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर,शहर अध्यक्ष अर्जुन घोलप,बु जि काँग्रेस सरचिटणीस अमर पाचपोर,तालुका उपाध्यक्ष प्रमोद पाटील, शुभमभाऊ पाटील,नगर सेवक श्रीकृष्ण केदार, ऍड संदीप मानकर,nsui तालुका अध्यक्ष गोपाल कोथळकर,गौरव इंगळे,जामोद ग्रामपंचायत सदस्य वसंत धुर्डे,किसना दामधर,प्रविण भोपळे,युवक तालुका अध्यक्ष निशिकांत देशमुख,युवक शहर अध्यक्ष राजीक भाई, दादाराव धंदर, दिपक बंबटकार,महेंद्र बोडखे ,धनंजय बंबटकर,अनिल इंगळे,योगेश घोपे,ज्ञानेश वानखडे, संकेत रहाटे
यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी पार पडले.

मुख्यधिकारी यांना निवेदन व्यवसाय प्रतिष्ठान का कडून नागरिक व ग्राहकांनसाठी प्राथमिक सुविधा नाही चौकशी करून कारवाईची मागणी !

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि. 7.6.21
व्यवसायिक प्रतिष्ठानाला पार्किंग,शौचालय,मुतारी तसेच सुरक्षा रक्षकाची व्यवस्था नसतांना नगरपालिका या व्यावसायिक प्रतिष्ठानांना व्यवसाय करण्याची परवानगी देतेच कशी? असा प्रश्न शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन वाघे यांनी केला असून या संपूर्ण व्यावसायिक प्रतिष्ठानांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली.
संबंधित प्रकरणी माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती घेतली असता , माहितीमध्ये हिंगणघाट नागरी जागरण समिती अध्यक्ष सदाशिवराव राऊत तसेच एका नगरसेविकेने नगरपालिका अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना वाहनांसाठी पार्किंग नसल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याबद्दलचे तक्रार दिली होती यावरून मुख्याधिकारी यांनी हिंगणघाट शहरातील बँका ,मंगल कार्यालये,शॉपिंग कॉम्प्लेक्स, दवाखाने मुख्य रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था नसल्याने शहरात वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याबद्दल व्यवसाय धारकास नोटीसीसुद्धा निर्गमित केल्या.
परंतु समस्या जैसे थे दिसुन येत आहे.
कोणत्याही व्यवसायिक प्रतिष्ठानास व्यवसाय सुरु करतांना पालिकेकडून ‘ना- हरकत’ प्रमाणपत्र घ्यावे लागते,परंतु पालिकेतील संबंधित अधिकारी कोणतीही मोकाचौकशी न करता ना-हरकत प्रमाणपत्र देते.
हिंगणघाट नगरपालिकेत अधिकारी यांना व्यवसाय धारकाने दिलेली कागदपत्रे नियमानुसार नसली तरी ना हरकत प्रमाणपत्र मिळतेच कसे?
हिंगणघाट शहरात व्यवसाय धारकाकडून पार्किंग बद्दलची कागदपत्रे दिली जातात त्यामध्ये जागेवर प्रत्यक्षात पार्किंग अस्तित्वातच नसते,
काही ठिकाणी कागदावरच पार्किंग दाखविल्या जाते परंतु प्रत्यक्षात जागेवर पार्किंगच्या जागेचा पत्ताच नसतो तसेच महत्वाचे म्हणजे यासंबंधी कुणी तक्रार केली तरी कारवाई होत नाही . तक्रार आल्यावर काही वेळेस मुख्याधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या अर्जानुसार व्यवसाय धारकास कारवाईचे पत्र दिले. मोक्यावर नागरिक व ग्राहकांकरिता मुतारी ,शौचालय , पार्किंग , सिक्युरिटी गार्ड नसल्याचे नमूद करीत नोटिस दिली, यात संबंधित प्रतिष्ठानावर कारवाई करण्याची तंबी दिल्या गेली.
संबंधित पुरावे असतानासुद्धा कारवाई होत नाही.कारण अशावेळी जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हेच मदतीला धावून जातात,वेळप्रसंगी अशाप्रकारे कारवाई करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना खोट्यानाट्या आरोपावरून बदली किंवा वरिष्ठच्या चौकाशिला बळी जावे लागते.
वास्तविक पहाता शहरातील नागरिकांना विना अडथळा रस्ते,बँका किंवा अन्य व्यवसायिक प्रतिष्ठानामधे होत असलेली असुविधा याविषयी लोकप्रतिनिधिनेच आवाज उठवायचा आहे.परंतु होणाऱ्या असुविधांकड़े लक्ष देणारा जनतेचा कुणी वालीच नसल्याचे दिसुन येत आहे.
कुंपनच शेत खात असल्याने हा प्रकार असाच पुढे चालणार का? असा प्रश्न सामान्य नागरिकांस पडला आहे.