Home Blog Page 460

यावल चोपडा मार्गावर रात्री साईकृपा ढाब्याजवळ डंपर आणी अॅपेरिक्शाचे भिषण अपघात रिवशाचालक गंभीर डंपर चालक मात्र फरार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

 

येथील यावल चोपडा मार्गावर एका वाळुने भरलेल्या डंपर आणी ऑटोरिक्शाच्या झालेल्या अपघातात जखमी एक अनओळखी रिक्शाचालकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत असुन , पोलीसांचा ताफा रात्री १२ , ३० वाजता घटनास्थळी होते . या भिषण अपघातानंतर रोडाच्या बाजुस असलेल्या एका शेतात हा डंपर मोठया वेगाने घुसला असुन ,जेसीबी द्वारे त्या डंपरला काढण्यात आले आहे . या संदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार यावल शहरापासुन अवघ्या दोन किलोमिटर लांब चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपाच्या पुढे साईकृपा ढाब्या ढाब्याच्या काही अंतरावर दिनांक ६ जुन रोजी रात्री ११, २० वाजेच्या सुमारास चोपड्याकडुन भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी डंपर क्रमांक एमएच १९ , ३४२६या वाहनाने यावल हुन किनगावकडे जाणाऱ्या अॅपेरिक्शा क्रमांक एमएच १९ एके ६४९३या वाहनास दिलेल्या धडकेनंतर झालेल्या भीषण अपघातात अज्ञात अॅपे रिक्शाचालक हा गंभीररित्या जख्मी झाल्याचे दिसुन आले तर या अपघातात दुसऱ्याही व्यक्ती असल्याची माहीती मिळाल्याने पोलीसांनी त्या ठीकाणी शोध घेतले असता दुसरी व्यक्ति त्या अपघातस्थळी मिळुन आली नाही . यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस पाठविले व जेसीबी यंत्रणेच्या सहाय्याने अपघातास कारणीभुत डंपरला बाहेर काढले असुन याबाबत घटनेतील अपघातास कारणीभुत डंपर वाहनचालक हा फरार झाल्याची माहीती पोलीसांनी दिली असुन , अपघात स्थळावरून काही तरुणांच्या मदतीने जख्मी रिक्शा चालकास उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर प्रथम औषध उपचार केल्यावर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले अहे . दरम्यान प्राथमिक चौकशीच्या आधारावर अपघातातील रिक्शाचालक हा रावेर तालुक्यातील असल्याचे कळते .

किनगाव बु येथे विहीरीतील पाण्यात मिळाले अन ओळखी तरुणाचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

 

तालुक्यातील किनगाव बु गाव शिवारातील एका विहीरीत ३५ वर्ष वयाच्या तरूणाचा मिळाला मृतदेह परिसरात एकच खळबळ पोलीसांनी केला पंचनामा व केले ओळख पटाविण्याचे आवाहन . या संदर्भात पोलीस सुत्रांकड्डन मिळालेल्या माहितीनुसार किनगाव बु येथील पोलीस पाटील रेखा नायदे यांनी पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार यांना कळविले कि किनगाव शिवारातील लीलाधर खंबायत यांच्या खोलपाण्याच्या विहीरीत ३oते ३५ वर्ष वयोगटाच्या एका अनओळखी तरुणाचे अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळुन आले असुन मयताच्या मृतदेहातुन दुर्गंधी येत असल्याचे माहीती ग्रामस्थांकडुन मिळाल्याने सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे आपल्या सहकारी पोलीस हेड कॉन्सटेबल सुनिल तायडे आणी पोलीस हेड कॉन्सटेबल विजय परदेशी यांच्यासह घटनास्थळी जावुन मोठया प्रयत्नांनी कुजलेले व अत्यंत दुर्गंधी येत असलेले प्रेत विहीरीतुन नागरीकांच्या मदतीने बाहेर काढल्यानंतर त्या अनओळखी व्यक्तिच्या मृतदेहाचे पंचनामा व जागेवरच यावल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ . शुभम तिडके व बापु महाजन यांच्याकडुन शवविच्छेदन करण्यात आलीत, दरम्यान याबाबतची पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहीतीनुसार सदरच्या या तरूणाचा मृत्यु साधारण १५ते २० दिवसापुर्वी या विहीरीत पडल्याने झाला असुन , सदर मयत इसम हा हिन्दु जातीचा असुन त्याचे व३०ते ३५च्या आत असावे अशा वर्णनाचे व्याक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन यावल पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे .

वाढती महागाई हे केंद्र सरकारचे अपयश- आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोल १०० रुपये लिटर चा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे त्याचप्रमाणे स्वयंपाकाचा गॅस ९०० रु. झाला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त झाली असून त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहे. वाढत्या महागाईच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या आदेशान्वये मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक गणी पेट्रोल पंप येथे पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस च्या किमतीत झालेल्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.केंद्र शासनाविरुद्ध घोषणा देत काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यां नी परिसर दणाणून सोडला.वाढती महागाई हे केंद्र सरकारचे अपयश आहे अशी प्रतिकिया यावेळी आमदार श्री.राजेश एकडे यांनी दिली. महागाई आटोक्यात आणली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची भावना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.केंद्र सरकार विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समिती चे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील,बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे, नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे,नांदुरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.गौरव पाटील, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया च्या राज्य सचिव सौ.सुनीताताई देशमुख, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे, मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.बंटी पाटील,उपाध्यक्ष श्री.राजू हाडे पाटील, नांदुरा शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.श्रद्धाताई गावंडे,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री.आकाश वतपाळ, श्री.शंकर बोदडे श्री. शुभम लांडे, श्री. राजेंद्र चाभारे,श्री. सोपान वक्ते,श्री.सोपान गावंडे,श्री.महेंद्र देशमुख, श्री.संतोष घोराडे, श्री.गोपाळ भोकरे, श्री.भास्कर वाकोडे, श्री.अनिल देशमुख, श्री.शशिकांत गव्हाड,श्री.शालीग्राम तांगडे व काँग्रेस, कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीन दुचाकीस्वारांच्या विचित्र अपघातात एक गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद : समोरा समोर तीन मोटरसायकलची धडक होऊन त्यामध्ये एक गंभीर व दोन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजता च्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील गोराळा धरणाजवळ घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की बुऱ्हाणपुर वरून गोकुलदास गवई मोटरसायकल क्रमांक(1) MH28 5549 व दुसरी मोटरसायकल क्रमांक (2 )येत होते तेव्हा सूनगावावरून मोटरसायकल क्रमांक( 3 ) mh30 294 ही येत असताना धरणाजवळ मोटरसायकल क्रमांक तीनच्या धारकांनी मोटरसायकल क्रमांक दोन ला धडक देऊन मोटरसायकल क्रमांक एक ला सुद्धा धडक दिली या मधील मोटरसायकल क्रमांक दोन जागेवरून फरार झाला तर मोटरसायकल क्रमांक तीन वाहनधारक हा गंभीर स्वरूपात जखमी झाला मोटरसायकल क्रमांक एक मधील दोन्ही व्यक्ती हे किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती पोलीस पाटील तडवी यांना मिळताच त्यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला या बद्दल माहिती दिली माहिती मिळताच जळगाव पोलिस स्टेशनचे पीएसआय प्रल्हाद मदन घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सर्व जखमी व्यक्तींना पोलीस गाडीमध्ये ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे नेले तेथे गंभीर व्यक्तीची ओळख पटली सदर व्यक्ती कालमाठी येथील देवसिंग डाबर आहे सदर व्यक्‍तीची प्रकृती खराब असल्या कारणाने त्याला खामगाव येथे रेफर करण्यात आले आहे.

फॅारेस्ट चौफूली यावल येथे तैनात यावल पोलीस स्टेशन चे पोलीस/होमगार्ड कर्मचारी याना आज छत्रपति शिवाजी महाराज यांचे राज्यअभिषेक दिनानिमित्त फळ मिठाई वाटप करण्यात आले

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

आज छत्रपति शिवाजी महाराज यांचे राज्यअभिषेक दिना चे औचित्त साधत आजचे शुभ दिवसी कोविड-19 चे नियंत्रण आणि जनतेच्या संरक्षणा करिता फॅारेस्ट चौफूली येथे तैनात यावल पोलीस स्टेशन चे पोलीस/होमगार्ड कर्मचारी याना बीएसएफ ग्वालियर येथे तैनात विरावली गावचे सैनिक महेंद्र पुंडलिक पाटील यांचा मुलगा योहित पाटील व सोबत नयन संतोष पाटिल यांचे हस्ते फळ आणि मिठाई याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी विरावली गावातिल राहिवासी श्री सुनिल कडू पाटील, मोहित संतोष पाटील, देवेन्द्र (सोनू) पाटील, बाळा पाटील व रोहीत गोकुल राजपुत आणि बीएसएफ जवान महेंद्र पाटील आदी उपस्थित होते

मालोद येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

हिन्दवी स्वराज्याचे जनक छत्रपति शिवाजी महाराज यांच्या राज्यअभिषेक दिनाचे औचित्त साधत व कोविड-१९चे पुरेपुर पालन करत तालुक्यातील ग्रामपंचायतीसह इतर ठिकाणी भगवा फडकवून शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान, कोविड-१९चे नियंत्रण आणि कोरोनाच्या पार्श्वभुमीवर वाढत्या संकटात नागरीकांनी लॉकडाऊन नियमांची काटेकोर अमलंबजावणी व्हावी, याकरीता
मालोद येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवराज्याभिषेक दिन साजरा करुण प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.हसिना सिराज तडवी ,व विस्ताराधिकारी हबीब तडवी, ग्रामसेवक राजु तडवी, वाघिरा शाळेचे मुख्याध्यापक शिराज तडवी सर ग्रामपंचायत शिपाई कुरबान तडवी,ग्रामरोजगार सेवक मेहेरबान तडवी यांचेसह ग्रामस्थ मुकेश पाटील सचिन पाटील तेजस चौधरी सागर पाटील ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक उपस्थित होते

मालोद येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

0

 

यावल (प्रतिनिधी )विकी वानखेडे

मालोद येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवराज्याभिषेक दिन साजरा करुण प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.हसिना सिराज तडवी ,व विस्ताराधिकारी हबीब तडवी, ग्रामसेवक राजु तडवी, वाघिरा शाळेचे मुख्याध्यापक शिराज तडवी सर ग्रामपंचायत शिपाई कुरबान तडवी,ग्रामरोजगार सेवक मेहेरबान तडवी यांचेसह ग्रामस्थ मुकेश पाटील सचिन पाटील तेजस चौधरी सागर पाटील ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक उपस्थित होते

महेलखेडी शिवसेनेच्या वतीने राज्याचे पाणी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आली

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राज्याचे पाणी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्ताने आज महेलखेडी येथे शिवसेनेच्या वतीने सामाजीक बांधीलकीच्या माध्यमातुन एक चांगले उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाद्वारे गावातली ग्रामपंचायत जवळ वृक्ष लागवड कार्यक्रम पार पडला . महेलखेडी शिवसेना शाखेच्या वतीने , आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त

महेलखेडी येथे रुक्ष लागवड करण्यात आली याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख व कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती मुन्नाभाऊ पाटील व स्वराज फाउंडेशन अध्यक्ष भरत चौधरी
शिवसेना शाखा प्रमुख व यावल तालुका विभाग प्रमुख आशिष झुरकाळे ग्रामपंचायत सदस्य नामदेव झुरकाळे ग्रामपंचायत माजी सदस्य प्रमोद महाजन शालेय समितीचे अध्यक्ष अब्दुल देशमुख व शिवसेना जिल्हा बूथ प्रमुख राजू पाटील
सामाजिक कार्यकर्ते रितेश महाजन सामाजिक परीक्षित महाजन गंगाराम माळी अशोक माळी नंदू महाजन शिवशैनिक लोकेश येवले हर्षल येवले सर्व शिवशैनिक उपस्थित होते

मराठा पाटील युवक समिती तर्फे वृक्षारोपण करून स्वराज्य दिन साजरा

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिन आणि जागतिक पर्यवरण दिनाचे औचित्य साधून नांदुरा येथे मराठा पाटील युवक समिती तर्फे ६जून रोजी सकाळी महाराजांना हारार्प न करून अभिवादन करण्यात आले.
सध्याची घडी लक्षात घेता कोरोनामुळे ऑक्सिजन चे महत्व खूप अधोरेखित झाले, झाडे म्हणजेच जीवन त्याशिवाय पर्याय नाही हे स्पष्ट झाले, जीवन जर वाचवायचे असेल तर प्रत्येकाने झाड लावलेच पाहिजे आणि जगवले पाहिजे.
स्वराज्य दिन आणि पर्यावरण दिनानिमित्त मराठा मंगल कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मराठा पाटील युवक समिती चे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ शरद पाटील, माजी अर्थ व बांधकाम सभापती बलदेव राव जी चोपडे, नांदुरा नगर परिषद चे पाणी पुरवठा सभापती अजयभाऊ घनोकर, श्री चांडक भाऊ , वामनराव भगत सर , शिवशंकर शिंबरे सर , श्री पेठकर भाऊ, युवक समितीचे जिल्हा सदस्य शंकर पाटील, संजय मनस्कर, नांदुरा तालुका अध्यक्ष लक्ष्मण वक्टे , नांदुरा शहर अध्यक्ष चि.अतुलभाऊ गव्हाड पाटील, समिती सदस्य दीपक ढोले, गावंडे पाटील, तुकाराम पाटील, अमोल पाटील, भरत चोपडे, गणेश गायगोळ, राहुल चोपडे, भागवत पाटील, दीपक पाटील, निलेश पाटील, गावंडे भाऊ तसेच बरेच शिवभक्ती हजर होते .
वृक्षारोपण लागणाऱ्या रोपटे साठी श्री संतोष भाऊ डीवरे आणि वामनराव भगत सर यांचे सहकार्य लाभले.

संभाजी ब्रिगेड नांदुरा द्वारा आयोजित रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद ५३ लोकांनी केले रक्तदान

0

 

जिजाऊची लेक मनिषाने केले रक्तदान

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे):-
संभाजी ब्रिगेड नांदुरा तालुकाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील यांनी ६ जून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त नांदुरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले असून या रक्तदान शिबिरात तब्बल ५३ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ता कु.मनीषा रमेश पाटील या जिजाऊच्या लेकीन रक्तदान केले. तसेच भाजपा शहर उपाध्यक्ष प्रमोद हिवाळे यांनी या शिबिरात रक्तदान करून वाढदिवस साजरा केला. या शिबिरात बऱ्याच समाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात सामाजिक कार्यकर्ते अशोकराव घानोकर यांनी ५०० रुपयांची मदत केली.

 

सदर रक्तदानासाठी खामगाव येथील शासकीय रक्तपेढीची चमू उपस्थित होती. तसेच संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवश्री योगेश पाटील,जिल्हा सचिव डॉ.शरद पाटील,शहर उपाध्यक्ष कुलदीप डंबेलकर,पुंडलिक काळे, सामाजिक कार्यकर्ते अशोकराव घानोकार,राष्ट्रीय विष्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे,पत्रकार संतोष तायडे, प्रफुल्ल बिचारे, पुरुषोत्तम भातुरकर, उपस्थित होते. या शिबिराला नांदुरा नगरीचे नगराध्यक्षपती श्री अनीलभाई जवरे यांनी भेट दिली.