Home Blog Page 463

भूसावळ कंडारी रास्ता रहदारी साठी खुला करावे या मांगनी साठी निवेदन

0

 

विकी वानखेडे
यावल तालुका (प्रतिनिधी)

 

भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी जनरल मॅनेजरची हुकूमशाही- फॅक्टरीच्या सुविधा बंद करणार !
भुसावळ,
अनेक दिवसांपासून भुसावळ जनरल मॅनेजर यांनी हुकूमशाही करीत भुसावळ कंडारी रस्ता बंद केला आहे. शिवसेना, ग्रामपंचायत कंडारी, संयुक्त कृती समिती ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ यांनी वेळोवेळी जनरल मॅनेजर यांना चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. या सर्वांनाच भेटीची वेळ दिली नाही तसेच फोनवर चर्चा करण्यासाठीसुद्धा तयारी दर्शवली नाही.
ऑर्डनन्स फॅक्टरी, रेल्वे कर्मचारी, तसेच कंडारी परिसरातील महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी अश्या ५००० नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीड किलोमीटरचा फेरा वाढल्याने सर्वसामान्यांना पेट्रोलवर जास्त खर्च लागतोय याची काळजी जनरल मॅनेजर यांना नाही म्हणून आज भुसावळ उपविभागीय कार्यालयात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ऍड. श्याम श्रीगोंदेकर, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शिक्षकसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, युवासेनेचे तालुका समन्वयक सुरेंद्र सोनवणे यांनी निवेदन सादर केले.
भुसावळ फॅक्टरी तर्फे उत्सर्जित झालेले सांडपाणी, घाण कचरा हा कंडारीकडे जातो, फॅक्टरीत असलेले कर्मचारी, रहिवासी किराणा, मेडिकल, एटीएम दवाखाने तसेच धार्मिक अंत्यविधीसाठी कंडारी भागात येत असतात. या सर्व सुविधा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
संरक्षणमंत्र्यांकडे तक्रार दाखल:
जनरल मॅनेजर परराज्यातील असल्याने त्यांना स्थानिक मराठी माणसाच्या त्रासाशी काहीही देणेघेणे नाही. एका प्रकारची हिटलर शाही फॅक्टरी परिसरात सुरू आहे म्हणून देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे, असे प्राचार्य विनोद गायकवाड यांनी कळविले आहे.

शेत व पांधण रस्त्याच्या कामांना प्राधान्य देणार -आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

वसाडी बु.ते माळेगाव शेत रस्त्याचे भूमिपूजन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते संपन्न झाले. शेत व पांधण रस्त्याच्या कामांना प्राधान्य देणार असे प्रतिपादन यावेळी आमदार श्री.राजेश एकडे यांनी केले.सदर भूमिपूजन समारंभास नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. वसंतरावजी भोजने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनभाऊ पाटील,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे, ह.भ.प.श्री.बळीराम महाराज ढोले, श्री.गणेश बोदडे श्री.पांडुरंग तायडे,श्री.जावेद खान,श्री. संजय टाले,श्री.विजय टाले,श्री.विनोद पाटील, श्री.प्रकाश वाघ,श्री. संतोष बोचरे,श्री.वासुदेव भोपळे प्रामुख्याने उपस्थित होते.

तरोडा बु!शेत शिवारात त्या १३ काळविटांच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला पकडण्यात जळगाव वन विभागाला आले यश.

0

 

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

जळगाव जामोद तालुक्यात दिनांक १४ मे रोजी तरोडा बु! शेत शिवारामध्ये १० मृत काळवीट आढळले होते. त्याविषयी दिनांक १४ मे रोजी नियमानुसार आरोपीवर कारवाई करून वन गुन्हा ६७८/१६९२७ जारी केला होता. तसेच वन गुन्ह्यासंदर्भात दिनांक १५ मे रोजी गावातील परिसरात फिरून चौकशी केली असता आणखी तीन काळवीट मृत अवस्थेत आढळून आले होते त्या विषयी दिनांक १५ मे रोजी वन गुन्हा क्रमांक ६७८/१६९२८ जारी करून वनविभाग त्या दिवसापासूनच आरोपीच्या शोधात होते त्या प्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी बी.डी कटारिया जळगाव जामोद व त्यांचे वनकर्मचारी या प्रकरणी तपास करीत होते सदर प्रकरणातील मुख्य आरोपी चा छडा लावण्यात वनविभाग यशस्वी झाले त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली होती माहितीवरून वनपरिक्षेत्राधिकारी बि.डी कटारिया व त्यांचे वन कर्मचारी यांनी सदर आरोपीचा पाच दिवसांमध्येच शोध लावला सदर आरोपी मुख्य आरोपी हा हनवतखेड येथील राधुसिंग छत्तरसिंग डावर याच्या मुसक्या आवळण्यात वन विभागाला यश आले आहे त्याचा कबुलीजबाब घेऊन त्याला प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता त्याचा दिनांक २४ मे पर्यंत वन कस्टडी रिमांड देण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पुढील कालावधीत करण्यात येईल संपूर्ण प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक बुलढाणा अक्षय गजभिये आर आर गायकवाड सहाय्यक वनरक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी बी.डी कटारिया यांच्यासह वनकर्मचारी श्री.जी दंडे,पी.जी.सानप वनपाल,व्हेरोडे,पर्वते,खेडकर, बुधवत,ताडे,कु.फळके,फड,बारेल,जुमडे,चालक गणेश तराळे,महेंद्र तायडे यांनी परिश्रम घेतले.

श्री वासुदेव बाबा दरबारात साजरा करण्यात येणारा गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याचा सार्वजनिक कार्यक्रम रद्द

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल : तालुक्यातील चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात साजरा करण्यात येणारा गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याचा सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर पारंपारीक पध्दतीने मोजक्याच भाविकांच्या उपस्थिती धार्मिक विधी संपन्न होईल तेव्हा येथे दर्शना करीता कोणी येवु नये असे अवाहन श्री वासुदेव बाबा दरबार येथील भक्तांनी केले आहे.
दरवर्षी वैशाख शुध्द बारस रोजी चुंचाळे येथे गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन असते यंदा २३ मे रोजी रविवारी येथे हा सोहळा साजरा होणार आहे मात्र, कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर प्रशासना कडून देण्यात आलेल्या सुचने नुसार येथे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे व मंदिरात भक्त, भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे अशात रविवारी पारंपारीक पध्दतीने श्री समर्थ सदगुरू सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ सदगरू वासुदेव बाबा कर्मभूमी चुंचाळे ता. यावल येथे साजरा होणारा गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेव बाबा यांचा गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा साजरा होईल यात मंदिरातील पुजारी मूर्ती स्नान व पूजाअर्चा करतील व बाबांच्या सर्व महाराष्ट्र सह गुजरात व मध्य प्रदेशातील भक्तांनी घरूनचं दर्शन घ्यावे कुणीचं दर्शना करीता येवू नये असे अवाहन श्री वासुदेव बाबा दरबार येथील भक्तांनी केले आहे

लसीकरणाच्या वेग वाढवा डाॅ उमेश वावरे ची मागणी….

0

 

सचिन वाघे वर्धा
21.5.21
हिंगणघाट :-
आज देशा मधे कोविड 19 मुळे सर्वत्र हा हा कार माजला आहे .
महाराष्ट्रात परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत चाली आहे .
मेडिकल सुविधा च्या अभाव पाहिला असून वेलेंटीलेटर. बेड .कमतरता आहे.
आज युरोपियन देश सपूर्ण लसीकरण झाल्यामुळे हे देश कोरोणा मुक्त होण्याचा मार्गावर आहे.
परंतु महाराष्ट्र मधे लसीकरण वेग मंदावला मुळे आज ही आपण कोरोणा छायत जगत आहो .
म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व कामे बंद करून त्या पैशाचे लस खरेदी करून. प्रत्येक खेडे गावात व शहरी वार्ड मध्ये एक मोहीम राबहून कोविड 19 खातमा केला पाहीजे.
वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यानच्या मार्फत मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना यांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिपभाऊ कहूरके. राजेश खानकूरे. जिवनभाऊ उरकुडे. मायासिग टाक. चारू आटे. विनोद गोडघाङे उपस्थित होते…

मा. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना हिंगणघाट शहर काँग्रेसतर्फे श्रद्धांजली देण्यात आली

0

 

सचिन वाघे वर्धा हिंगणघाट :–

देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना प्रथमतः मताधिकार देणारे, ग्रामोन्नतीचे प्रोत्साहक, नवोदय विद्यालयाचे संकल्पक, आधुनिक भारताचे प्रणेते, भारतीय आईटी युगाचे जनक.
भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत राजिवजी गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी हिंगणघाट शहर काँग्रेस तर्फे श्रद्धांजली देण्यांत आली.
या प्रसंगी पंढरीनाथ कापसे माजी नगराध्यक्ष, अध्यक्ष शहर काँग्रेस हिंगणघाट , ज्वलंत मून अध्यक्ष किसान कॉंग्रेस हिंगणघाट ,सय्यद मेराज अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल कॉंग्रेस हिंगणघाट, गुणवंत कारवटकार उपाध्यक्ष हिंगणघाट कॉंग्रेस, नागेश जीवणकर माजी नगरसेवक हिंगणघाट.प्रामुख्याने उपस्थित होते.

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका

0

कचरा , कंपोस्ट डेपोचे नियोजन शुन्य, महसूल विभाग
शहरवासीयांना न्याय देतील का?

हंसराज उके अमरावती
====================
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत नेहमीच कोणत्या ना कोणत्या नेहमीच चर्चेत असते आणि आता सन
२०१५ पासुन पहिल्या निवडणूक
राजकारण,कहि खुशी कही गम
चे राजकीय लोकसेकाने आप आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा मिळवून पहील्याच पंचवार्षिक मध्ये नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतला
दोन नगराध्यक्ष वेगवेगळ्या पक्षाने
दिले पण नगरपंचायत वाशियांचे
किती भाग्य कि गेले पाच वर्षांपासून आपल्या देशाचे पंतप्रधान सबका साथ सबका विकास पण विकास सोडाच गेले
पाच वर्षाच्या कालावधीत शहर वाशियांच्या मुलभूत अधिकारा पासुन कोसो दुर ठेवल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे गेले पाच वर्षांपासून आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे पण कचरा व्यवस्थापन आजच्या तारखे पर्यंत सुध्दा शुन्य प्रगती पथावर असल्याचे जन लोकांमध्ये चर्चेचा विषय चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक कचरा, कंपोस्ट डेपोचा प्रश्र जैसे थे प्रलंबित नग
रपंचायत मध्ये धुळ खात पडलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा खेळ एका प्रकारे सुरू आहे व निवार्याबाबत बोलताना नागरिक
रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना , छबरी आवास योजनेंतर्गत घरकुल योजना बर्याच कुटुंबापर्यत पोहोचले नसल्याचे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कचरा कंपोस्ट डेपोचा प्रश्र्नाकडे मा. जिल्हाधिकारी नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत कडे लक्ष देतील का? नागरिकांना न्याय मिळवून देतील अशी चर्चा जनसामान्य नागरिका मधे होत आहे.

नांदुरा शासकीय कोविड रुग्णालयाला अत्यावश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

नांदुरा शहर व तालुक्यातील रुग्णांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी,नांदुरा डी.सी.एच.सी.ला अत्यावश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी सूचना आमदार श्री.राजेश एकडे यांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य प्रशासनाने केली आहे. आमदार श्री. राजशे एकडे यांच्या सूचनेनुसार दिनांक २० मे २०२१ रोजी अप्पर जिल्हाधिकारी श्री.धनंजय गोगटे व जिल्हा शल्यचिकित्सक श्री.प्रशांत पाटील आमदार श्री.राजेश एकडे यांच्यासह नांदुरा कोविड सेंटरची पाहणी करून आढावा घेतला.आमदार राजेश एकडे यांच्या पाठपुराव्याने नांदुरा कोविड सेंटर ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रमा केअर मध्ये सुरू असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिनस्त राहणार आहे.नांदुरा कोविड सेंटर चे रूपांतर डी.सी.एच. सी.मध्ये होणार आहे,डी.सी.एच.सी.च्या नॉम्स नुसार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध असणार आहे.५० बेड च्या डी.सी.एच.सी. मध्ये आता ३० ऑक्सिजन बेड करण्यात येतील व त्या साठी आवश्यक ऑक्सिजन सेंटर पाईप लाईन तात्काळ बसविण्यात येईल, मुबलक औषध साठा देखील उपलब्ध राहणार आहे.आमदार श्री.राजेश एकडे यांच्या अथक प्रयत्न व पाठपुराव्याने नांदुरा शासकीय डी.सी.एच.सी.सेंटर सुरू होत आहे.आमदार श्री राजेश एकडे यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य प्रशासनाने डी.सी.एच.सी.सेंटरला १० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून दिले असून स्थानिक विकास निधी(आमदार निधी) अंतर्गत आणखी १० ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध होणार आहेत.
यावेळी मलकापूर येथील उपविभागीय महसूल अधिकारी श्री.मनोज देशमुख, तहसीलदार श्री.राहुल तायडे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिलाष खंडारे,डॉ.चेतन बेंडे, डॉ.एल.जैस्वाल,नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री.गोपुसेठ बरालीय, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे, नांदुरा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर डामरे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रहार जनशक्ती पक्षाकडून वैजापूर येथे थाळी नाद आंदोलन..

0

 

वैजापूर दि २१(ऋषी जुंधारे)

केंद्र शासनाकडून शेतीसाठी उपयुक्त लागणाऱ्या खतांचे भाव गगनाला भिडले असून त्यातच केंद्र सरकरने देशात मुबलक कडधान्य असतानाही कडधान्य आयात केले आहे.आधीच देशातील शेतकरी कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे.त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत असतानाच अनेक शेतकरी मरणाच्या दारात उभे असतांना शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळून देण्याऐवजी शेतकऱ्यांचे रक्त शोषण्याचे काम मोदी सरकार करीत असल्याने राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या आदेशानुसार गुरुवारी सायंकाळी महाराष्ट्रभर प्रहार जनशक्ती पक्षाकडून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरुद्ध सामाजिक अंतर ठेवून थाळी नाद आंदोलन करण्यात आले.या दरम्यान वैजापूर तालुक्याचे प्रहारचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके व उपतालुका प्रमुख गणेश सावंत,विशाल शिंदे,सागर गुंड यांनी वैजापूर तहसीलदार यांना सकाळी निवेदन देऊन सायंकाळी तालुका भर कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील प्रमुख ठिकाणी केंद्र सरकार विरुद्ध शांततेत थाळी नाद आंदोलन केले.

सुनगांव येथिल आदीवासी व मेंढपाळ वस्ती जवळील डम्पिंग ग्राउंड चे विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाचे निवेदन

0

 

 

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायतचा अजब गजब कारभार निदर्शनास आला आहे एकीकडे शासनाचे नदी स्वच्छ अभियान चालू असताना याउलट गावाजवळीलच आंबे लोन नदीचे उगमस्थान असलेल्या जुना पानी या नाल्यापासुन 500 फुट अंतरावर नदीपात्रा लगत सुनगाव ग्रामपंचायतीने डम्पिंग ग्राउंड बनविले आहे सुनगाव ग्रामपंचायतने 20 19 मध्ये गावातील केरकचरा जमा करण्यासाठी कचरा गाडी खरेदी केली आहे व दीड ते दोन महिने पासून केरकचरा हा शासनाच्या नियमाप्रमाणे चक्क नदीपात्रा जवळ टाकलेला आहे व गावातील केरकचऱ्याचे सुका व ओला कचरा याचे वर्गीकरण न करता हा संपूर्ण कचरा एकत्रित केल्या जातो त्या कचरा मध्ये दवाखान्यातील स्क्रॅप मटेरियल जसे इंजेक्शन सुई व काचेची बॉटल व घरातील केरकचरा यामध्ये प्लास्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात असतात हा कचरा ग्रामपंचायतच्या कचरा गाडीमध्ये एकत्रित करून जुना पानी असलेल्या नदी पात्रा जवळ मोठ्या प्रमाणात टाकलेला आहे परिणामी या कचऱ्याची दुर्गंधी जवळ असलेल्या आदिवासी परिसरात पसरत आहे व कचरा नदीपात्राजवळ असल्याने आदिवासी व परीसरात गुरेढोरे व मेंढपाळ ची जनावरे या कचऱ्यात आपणास काही खायला मिळते का म्हणून कचरा धुंडाळीत असतात परिणामी कचऱ्यात असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या काचेचे बॉटल सुया गुरेढोरे यांच्या तोंडात जाऊन गुरेढोरे मृत्युमुखी पडण्यास कारणीभूत ठरत आहे व पशू पक्षी यांचे जीवनमान दुर्गंधीमुळे धोक्यात आले आहे कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्या हवेमुळे परिसरातील शेतीमध्ये पसरत आहे व या नदीपात्रातून भरपूर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता आहे त्यामुळे हा कचरा रस्त्यात पसरत आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे येणाऱ्या काळात पावसामुळे नदीला पूर येऊन परिसरातील कचरा हा नदीमध्ये पाणी साठविण्यासाठी केलेल्या खड्ड्यांमध्ये साचणार आहे परिणामी नदी दुषित होणार आहे खालच्या गावातील परिसरात पसरून तेथील नदि पात्र दुषित होणार आहे तरी अशा सुनगाव ग्रामपंचायतकडून पर्यावरणाच्या हानी होणाऱ्या गंभीर बाबीकडे पंचायत समिती प्रशासना कडून योग्य ती कारवाई करावी अशी जुना पानी येथिल आदिवासी व धनगर मेंढपाळ यांनी केली आहे सदर डंपिंग ग्राउंड तेथुन न हटवल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास सोनोने वआदीवासि / मेंढपाळ यांनी सांगितले