Home Blog Page 464

अतिक्रमीत शेतरस्ता मोकळा करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू – शेतकर्‍यांचा इशारा

0

 

नांदुरा:-(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

मौजे मुरंबा येथुन महाळुंगी कडे जाण्याचा गाढ रस्ता हा संबंधित शेतकरी यांनी दगड रचुन अतिक्रमित केला आहे. त्यामुळे सदर रस्ता हा बैल गाडी, बैल जोडी जाईल एवढा सुद्धा राहिलेला नाही, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्यामध्ये मधोमध झाडं सुद्धा वाढलेले आहेत. त्यापैकी एक झाडा लिंबाचे तर दुसरे बाभळीचे आहे, हेसुद्धा रस्त्यातून काढणे आवश्यक आहे. अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे.
पेरणी पाण्याचे दिवस लक्षात घेता आज रोजी मशागत करण्यासाठी व पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टर, बैल जोडी शेतामध्ये जाणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्ता मोकळा करणे अत्यावश्यक आहे. सदर विषय हा गंभीर रित्या घेऊन अधिकाऱ्यांमार्फत सदर रस्त्याचा पंचनामा करण्यात यावा व ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांना रीतसर नोटिसा पाठवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, आणि आम्हा शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता मोकळा करण्यात यावा.
सदर रस्ता हा लवकरात लवकर मोकळा करून देण्यात यावा अन्यथा सर्व शेतकरी लोकशाही मार्गाचा अवलंब करून दि.९ /६ /२०२१ पासुन आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
शेतकऱ्यांनी संबंधित आशयाचे निवेदन मा. आमदार साहेब, मा. जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा, विभागीय अधिकारी साहेब मलकापूर, मा. गटविकास अधिकारी साहेब नांदुरा, पोलीस ठाणेदार पिंपळगाव राजा यांना दिले आहे.
तरी शेत रस्ता लवकरात लवकर मोकळा करून आम्हाला न्याय मिळावा अशी रास्त अपेक्षा शेतकर्‍यांना आहे.

मालमत्ता कर माफ करा विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांची मागणी .

0

 

सचिन वाघे वर्धा

31.5.21 हिंगणघाट – कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये या कारणाने संपूर्ण देशात मार्च 2020 पासून संचारबंदी आणि टाळेबंदी घोषित करण्यात आली त्यामुळे छोटे-मोठे व्यापारी, दुकानदार ,शेतकरी, शेतमजूर रिक्षावाले, टॅक्सी वाले, हात मजूर अशा सर्वांचेच उत्पन्न थांबल्यामुळे ते आर्थिक हलाखीचे जीवन जगत आहे त्यातल्या त्यात केंद्र सरकारने डिझेल पेट्रोल गॅसचे भाव वाढवून लोकांचे खिसे कापण्याचे उद्योग सुरू केला आहे . त्यामुळे नेमके जगायचे तरी कसे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे .लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतात पिकविलेल्या माल विकण्यासाठी पर्यायी व्यवस्था प्राप्त न झाल्यामुळे शेतकऱ्यांना पडत्या भावात माल विकावा लागला. शेतात लावलेला भाजीपाला बाजारात विकता न आल्यामुळे रस्त्यावर फेकून द्यावा लागला. वर्षभर काबाडकष्ट करून आणि तळहातावरच्या फोडासारखे जपून पिकविलेल्या शेतमालाला ग्राहकच न मिळाल्यामुळे ते जनावरांना खाऊ घालावे लागले. सण-समारंभ, उत्सव, लग्नकार्य यावर निर्बंध घातल्यामुळे फुल शेती करणाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अगोदरच शेतकरी वर्ग हा बँक, सावकार, नातेवाईक आणि ज्यांच्या ज्यांच्या कडून कर्ज मिळेल त्यांच्याकडून कर्ज मिळवून आपली शेती व्यवसाय उभा करीत असतो परंतु संचारबंदी आणि टाळेबंदी मुळे व्यवसायच उद्ध्वस्त झाल्यामुळे बँकेकडून, सावकाराकडून, नातेवाइकाकडून घेतलेले कर्ज कसे द्यावयाचे .येणाऱ्या हंगामाकरिता खते बियाणे कसे विकत घ्यायचे, मुला बाळाच्या अन्न वस्त्र आरोग्य, शिक्षणाच्या गरजा कशा भागवायच्या ही विवंचना आहे. वर्षभरापासून कंपन्या- कारखाने यांना टाळे असल्यामुळे अनेकांचे रोजगार जाऊन त्यांच्यावर बेकारीची वेळ आली आहे अनेक कर्मचारी अर्ध पगारी झाले आहे. अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानदारांना वर्षभर दुकानच उघडता आले नाही. अधेमध्ये टाळेबंदीत थोडी शिथिलता देऊन काही काळ मर्यादित वेळेत दुकान उघडण्याची परवानगी दिली होती. परंतु ग्राहकच नसल्यामुळे या वर्गाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे डिसेंबर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या महिन्याचा कालावधी हा लग्न समारंभाचा आणि इतर समारंभात असतो पण याच कालावधीत मागील वर्षी आणि या वर्षीही कडक टाळेबंदी असल्यामुळे मंगल कार्यालयाचे मालक त्यांच्यावर आधारित असणारे बँड वाले, घोडी वाले, मंडपवाले ,डेकोरेशन वाले, स वाले फुल वाले या सर्वच व्यावसायिक मंडळींना आर्थिक फटका बसला आहे संचार बंदी मुळे प्रथम निर्बंध घातले गेले ते प्रवासावर रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था डिकांचे अपरिमित नुकसान झाले टॅक्सी चालवून रिक्षा चालवून उपजीविका करणाऱ्या वर उपासमारीची वेळ आली एसटीला प्रवासी मिळत नसल्यामुळे एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांची कपात केली त्यामुळे त्यांच्यावर उपजीविकेचे मोठे संकट आलेले आहे हॉटेल्स निवासस्थानाच्या सोयी खानावळी पूर्णपणे बंद असल्यामुळे या व्यवसायिक व्यवसायिकांची ही नुकसान झाले आहे अनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक वगळता इतर बहुसंख्य शिक्षकांची परवड झालेली आहे शैक्षणिक संस्था सुरू नसल्यामुळे त्यांचे वेतन थांबले आहे. मुळातच बहुसंख्य विनाअनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांना कमी वेतन दिले जाते. शिक्षण संस्था चालक ही या परिस्थितीपुढे हतबल झालेले आहे . नगरपालिकेचे प्रमुख कर्तव्य जनतेला नागरी सुविधा पुरविण्याचे आहे .कोरोणातील लॉक डाऊन मुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांनाही त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केंद्र सरकारने केलेली नाही. असे असताना नगर परिषदेचे जनतेकडून मालमत्ता कर वसुली करणे सुरूच आहे. या निवेदना द्वारे नगर परिषद अध्यक्ष यांना अशी विनंती आहे की जनतेने आपणाला नगरपरिषदेच्या निवडणूकीत बहुसंख्य मते देऊन आपली निवड केली आहे . नगरपरिषदेत आपल्याच भारतीय जनता पक्षाची सत्ता आणि केंद्रातही आपल्या पक्षाची सत्ता असताना या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन आपणाला लॉक डाऊन च्या काळात जनतेला सोयीसुविधा उपलब्ध करून देता आले असते पण आपणाकडून या गोष्टी दुर्लक्षित झालेल्या आहे. जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची अजूनही वेळ गेलेली नाही. आपणास बहुमतांनी निवडून दिलेल्या जनतेचे आर्थिक संकटाच्या संघर्ष काळात त्यांना एक धीर म्हणून नगरपरिषदेच्या आमसभेत सन 2020 21 या वर्षातील मालमत्ता धारकांकडून आकारला जाणारा मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव संमत करावा. या सर्व परिस्थितीचा विचार करता नगर परिषद प्रशासनाने 20- 21 या वर्षातील शहरातील मालमत्ताधारकांना (शासकीय पगारदार वगळून) मालमत्ता कर पूर्णता माफ करावा .अशी मागणी विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांच्या तर्फे करण्यात येत आहे .यावेळी अनिल जवादे यांच्यासोबत महेश माकडे, गोरख भगत, राजेंद्र पाटील, जयंत धोटे ,दिनेश वाघ, राजू कुरेकार ,अजय मुळे इत्यादी विदर्भ विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती

0

 

आमदार जनसंपर्क कार्यालय नांदुरा येथे समाजबांधवां च्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चे मुख्य प्रशासक श्री. पदमभाऊ पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक, श्री.भानुदास तितरे,जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे, डॉ.माधवराव बोरसे, श्री.त्रंबक भवरे, श्री.रामदासभाऊ कारोळे, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री. पुरुषोत्तम झाल्टे, मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. बंटी पाटील,श्री.राजू पाटील हाडे, श्री.सोपान वक्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

जनसेवेचे व्रत निरपेक्ष पणे राबवणारी एकमेव संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी…..

0

 

ऋषी जुंधारे
औरंगाबाद जि.प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यात सेवा ही संघटन कार्यक्रम उत्साहात साजरा ” जनसेवेचे व्रत निरपेक्ष पणे राबवणारी एकमेव संघटना” म्हणजे भारतीय जनता पार्टी” तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांची माहिती . केंद्रात भारतीय जनता पार्टीच्या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने जनसेवेत ७ वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले. या निमित्त “सेवा ही संघटन” हा उपक्रम अंतर्गत तालुक्यात 50 ठिकाणी विविध कार्यक्रम राबवण्यात आले.

वैजापूर शहरामध्ये सरचिटणीस डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांनी कोविड सेंटरला फळे वाटप ,शहरात फवारणी, मास्क वाटप ,सँनेटायजर वाटप ,करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी, कल्यान पाटील दांगोडे , , दशरत बनकर , गणेश खैरे नगरसेवक , गोकूळ भुजबळ , बजरंग मगर नगरसेवक , अनिल भाऊ वानी,भाजपा यूमोर्चा शहर अध्यक्ष महेश भालेराव ,प्रवीन तांबे शहर उपाध्यक्ष गौरव दोडे , शहर सरचिटनिस युवा मोर्चा आकाश शिंदे , इत्यादी उपस्थित होते
लासुरगाव सर्कल मधील सर्व फ्रंटलाईन वर्कर चा साडीचोळी सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला .धोंदलगाव करंजगाव , दहेगाव पालखेड लासुरगाव शिवराई येथे फवारणी करण्यात आली.
याप्रसंगी कल्याण पाटील दांगोडे सरपंच अनिल वाणी, राजेंद्र चव्हाण , योगिता सतीश रावते ,मोहनराव उगले, कांताबाई एकनाथराव गायकवाड उपसरपंच बद्रीनारायण मगर, सौ वर्षा नंदकिशोर जाधव, श्री नंदकिशोर जाधव,
संतोष मिसाळ ,संतोष आवारे ,वसंत शेलार, गणेश डिके, किरण डिके, सचिन घोडके बाळू मगर, पांडुरंग ठोकळ, बिपिन साळे, काकासाहेब कुभाडें ,सुरेश पानसरे, सुभाष वाघ, डॉक्टर अनिल पवार ,विनोद सोळस, किसनराव आवारे ,भाऊसाहेब धुराट, दत्तात्रय आवारे, भगवान अवारे, शिवाजी डमाळे ,प्रकाश वाघ इत्यादी हजर होत
घायगाव सर्कल मध्ये मास्क वाटप व फवारणी करण्यात आली व मेजर हंगे यांनी कोरूना काळामध्ये विलगीकरण कसे करायचे याबाबत सर्व गावांना मार्गदर्शन केले . याप्रसंगी अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नबी पटेल बाबासाहेब वाळुज,
सुनिल गोरसे कानिफनाथ आहेर ,
गणेश गोरसे ,सतोष गुजाळ, शरद सावत, आमोल गायके , धनंजय सावत ,शिवनाथ सावत, विजय ञिभूवन उतम साळुके, बाबासाहेब तागड हजर होते करण्यात आले शिउर गावामध्ये कोरणा योद्धा सन्मान सुशील देशमुख व कार्यकर्त्यांनी केला.

यावल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय ईमारतीचे बांधकाम अंतीम टप्यात दोन महीन्यात नव्या ईमारतीत कार्यालय स्थळलांतराचे संके

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील पंचायत समिती यावलच्या नविन प्रशासकीय ईमारतीचे काम प्रगतीपथावर असुन हे काम आता अंतीम टप्यात आले असुन पावसाळया पुर्वीच पंचायत समितीचे स्थलांतर या नव्या ईमारतीत होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे . यावल पंचायत समितीचे अत्यंत जुने व जिर्ण झालेले कार्यालय हे या पावसाळ्यात कोसळण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत असुन , पन्नास वर्षा पेक्षा ही अधिक काळापासुन जुन्या असलेल्या पंचायत समितीच्या ईमारतीची पतझड गेल्या पाच ते सहा वर्षापासुन सुरू झाली होती , तेव्हा पासुन आमदार शिरीष चौधरी आणी माजी आमदार स्व . हरीभाऊ जावळे यांच्या अथक प्रयत्नातुन अखेर या पंचायत समितीसाठी नुतन प्रशासकीय ईमारती करीता दोन कोटी १४ रुपयांचे निधीस मान्यता मिळुन या ईमारतीच्या कामास प्रयत्यक्षात दिड वर्षा पासुन सुरूवात करण्यात आली होती , संबधीत ठेकेदाराने अत्यंत वेगाने केले असुन चांगल्या प्रति चे बांधकाम संबधीत ठेकेदार यांच्या कडुन स्थानिक प्रशासनाने करून घेतल्याचे ही दिसुन येत आहे , येणाऱ्या एक ते दिड महीन्यात ही भव्य नविन प्रशासकीय ईमारत पुर्णत्वास येणार असल्याची माहीती देवुन सदरची ईमारत ही प्रशासनाच्या ताब्यात दिली जाणार असल्याची माहीती भुसावळ येथील सदर बांधकामाचे ठेकेदार प्रमोद नेमाडे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांच्याशी अनपोचारीकरित्या बोलतांना दिली . असा ही योगायोग यावल पंचायत समितीची सुमारे पन्नास वर्षा पुर्वीची ईमारत ही त्या वेळेस मंत्री असलेले लोकसेवक स्व . बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या प्रयत्नातुन ईमारतीचे बांधकाम करण्यात आले होते आणी आता त्याच पंचायत समितीच्या नविन भव्य प्रशासकीय ईमारतीसाठी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या पाठपुराव्याने पन्नास वर्ष जुन्या ईमारतीच्या बांधकामास मान्यता मिळालेल्या नुतन ईमारतीचे बांधकाम त्यांच्या कार्यकाळात होत असल्याने हे महत्वाचे आहे असे राजकीय वर्तुळात कुतुहलाने बोलले जात आहे .

चुंचाळे येथे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य सभापती रविद्र पाटील यांच्या निधीतून दर्गा परिसरात पेव्हर ब्लॉक कामाचे शुभारंभ

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे येथे भाजपाचे साकळी दहिगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य व शिक्षण सभापती रविद्र सुर्यभान पाटील (छोटु भाऊ) यांच्या जन सुविधा विकास निधीतून चुंचाळे येथे पंचक्रोशितील सर्वधर्मीय शेकडो नागरीकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत गैबनशहा बाबा यांच्या दर्गा जवळ दोन लाख रुपयांची निधी मजुर करुन पेव्हर ब्लाँकचे भुमीपुजन व प्रत्यक्ष काम दिनांक २८ मे रोजी करण्यात आले कामाचे भुमीपुजन भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ सदस्य व ग्राम पंचायत सदस्य दगडु तडवी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रविद्र पाटील यांनी साकळी दहिगाव गटातील विकास कामे करण्यासाठी मी कटीबंद्ध आहे तसेच पेव्हर ब्लाँक चे कामे स्वता उभे राहून ठेकेदाराकडून चांगल्या प्रतीचे करुण घ्यावे अश्या सुचना भ्रमणध्वणी वरुन त्यांनी नागरीकांना व आपल्या कार्यकर्त्याना दिल्या आहेत.
या प्रंसगी चुंचाळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुंनदा पाटील, उपसरपंच नजिमा तडवी,सदस्य सुकलाल राजपुत,अनिल कोळी यांच्यासह ग्रा.प.सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते चुंचाळे येथे जिल्हा परिषद सदस्य रविद्र पाटील विविध विकास कामांसाठी निधी दिल्या बद्दल चुंचाळे प्रथम लोकनियुक्त सरपंच सुंनदा संजय पाटील यांनी त्यांचेआभार मानले.

पतिने केला पत्नी चा खुन.नारायनपुर येथील घटना

0

 

सुनिल पवार. नांदुरा. ता.प्र

नांदुरा तालुक्यातील निमगाव ला लागुन असलेल्या नारायनपुर येथे पतिने पत्नी चा खुन केला हि घटना२८मे.रोजि संध्याकाळी६चे सूमारास घडली वर्षा .वि.खैरे वय३१असे खुन झालेल्या महिलेचे नाव तिच्या राहते घरात पतीने जड वस्तू डोक्यावर मारून खून केला वि.खैरे वय३५असे आरोपिचे नाव आहे त्याना आठ वषँ वयाचा मुलगा. सहा वषँ वयाचा मुलगा. चार.वषँ चा मुलगा व.दहा महिनेचि मूलगि याघटने मुळे गावात धक्का बसला आहे घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करत मयत महिलेचे प्रेत उतरिय तपासणी करिता पाठवला तपास नांदुरा पोलीस करित खुनाचे कारन वूत् लिहेपरँत समोर आले नव्हते

हिंगणघाट तालुका संजय गांधी निराधार योजना समितीवर सौ कविता विनोद वानखेडे यांची निवड

0

 

सचिन वाघे वर्धा
29.5.21
वडनेर :– सरपंच व माजी पंचायत समिती सदस्या सौ कविता विनोद वानखेडे यांची वर्धा जिल्हा पालक मंत्री सुनील केदार यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना केलेल्या शिफारस पत्राद्वारे हिंगणघाट तालुक्याच्या संजय गांधी निराधार योजना समिती वर नियुक्ती करण्यात आली आहे..
समितीद्वारे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृध्द पेन्शन योजना, विधवांना अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांची निवड सदर समितीच्या शिफारसीनुसार केल्या जाते…
एक निष्ठावंत लढवय्या महिला कार्यकर्त्या म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. त्या बाबत मा.ना.सुनीलजी केदार पालकमंत्री, मा.रंजितदादा कांबळे आमदार, मा. राजु तीमांडे माजी आमदार, विनोद वानखेडे (अध्यक्ष हिंगणघाट तालुका रा.काँ.पार्टी) यांचे मनपूर्वक आभार मानले. तसेच निवडी बाबत अनेकांनी अभिनंदन केले आहे.
सौ.दिपाली भुते(ग्रा.पं.सदस्या),
सौ.रीना तागडे(ग्रा.पं.सदस्या),
सौ. वर्षा भोयर(ग्रा.पं.सदस्या),
सौ.नम्रता भगत(ग्रा.पं.सदस्या), सौ. मंदा आत्राम (ग्रा.पं.सदस्या),सौ वनिता कळसकर (ग्रा.पं.सदस्या)
सुभाष शिंदे उपसरपंच, आरिफ शेख सदस्य ग्रा.पं. यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावल नगर परिषदच्या विकास कामांसाठी अखेर आमदार शिरीष चौधरींनी केला एक कोटी रुपयांची वैशिष्टपुर्ण निधी मंजुर

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील नगर परिषदला मिळणार आमदार शिरीष चौधरी यांनी वैशिष्ठपुर्ण विविध विकास कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत एक कोटी विस लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आले असुन तसे पत्र नगर परिषदला प्राप्त झाले आहे . दरम्यान मागील आठवडयात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर आणी फैजपुर नगर परिषदच्या विकास कामांसाठी ४कोटी९२ लाखाचा निधी मंजुरीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण यावल शहरवासीयांच्या नजरा या आमदार शिरीष चौधरी यांच्या कडे लागल्या होत्या , आमदार शिरीष चौधरी यांच्या मतदारसंघात येणारे यावल शहर हे अत्यंत म्हत्वाचे शहर असुन या शहरातील देखील विकासकामे व्हावीत या दृष्टीकोणातुन आमदार चौधरी यांनी वैशिष्टपुर्ण कामांसाठी १ कोटी२० लाखांचा भरीव निधी मंजुर केला असुन, दिनांक ०३ मे२०२१ रोजी तसे पत्र महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव विवेक कुंभार यांनी यावल नगर परिषदेला पाठविला आहे . लवकरच शहरातील प्रलंबित विकास कामांना सुरूवात होणार आहे . या निधीमुळे यावल नगर परिषदच्या विकास कामांना गती व दिशा मिळेल , यानिधी मंजुर करण्या करीता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले तथा माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर या निधीस मान्यता मिळाली असुन , या निधीचा फायदा पावसाळ्यापुर्वी होणाऱ्या विकास कामावर व्हावीत अशी अपेक्षाकृत मागणी यावल शहरवासीयांकडुन व्यक्त करण्यात येत आहे .

यावल तालुक्यातील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थतेत सावळा गोंधळ नागरीकांसाठी सुचना फलक अनिवार्य करा : भाजपाची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यात व शहरातील स्वस्त धान्य दुकानातुन सर्वसामान्य नागरीकांना मिळणाऱ्या स्वस्त धान्य वितरणात अनियमितेचा मोठा सावळा गोंधळ होत असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी तहसीलदार महेश पवार यांच्याकडे लिखित तक्रारी व्दारे केली आहे . या संदर्भात दिलेल्या तक्रार निवेदनात उमेश फेगडे यांनी म्हटले आहे की तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानामध्ये वितरणात अनियमितता दिसुन येत असुन , सदर स्वस्त धान्य दुकानदार कोणते धान्य उपल्बध आहे व कोणत्या योजनेमधला व किती आहे याची सविस्तर माहीती दुकानावरील फलकावर लिखाण करीत नाही यामुळे आशिक्षीत व सर्वसामान्य नागरीकांची फसवणुक होत असते यामुळे नागरीकांना शासनाच्या नियमानुसार प्रतिमाह वितरण होणारे धान्य मिळत नसल्याने नागरीकांना पुर्ण लाभ मिळतांना दिसत नाही व प्रकारे मुळे स्वस्त धान्य दुकानदारांना गैरकारभार करण्यास वाव मिळतो या करिता महसुल प्रशासनाने यावल शहर व तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांवरील धान्याचा गैरकारभार थांबण्याचे असेल तर दुकानदाराने वितरणासाठी घेतलेल्या धान्यांचा सविस्तर माहीतीचे सुचना फलक हे अनिवार्य करावे आणी अशा प्रकारे सुचनांचे पालन न करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली असुन तहसीलदार महेश पवार साहेब यांना दिलेल्या निवेदनावर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , शहराध्यक्ष निलेश गडे , परेश दिलीप नाईक, योगेश विजय चौधरी , राहुल पंढरीनाथ बारी यांच्या स्वाक्षरी आहे .