Home Blog Page 467

उमापूर येथील अल्पवयीन मुलीला पळविले पित्याची जळगांव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

ऊमापूर ता जळगांव जामोद येथील रहिवासी मोतीलाल राऊत यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली की मी उमापूर येथे कूटूंबासह राहतो. मला एकून दोन मूली असून मोठी मूलगी न वय 15 वर्ष 10 महीने असून दूसरी मूलगी नामे वय 12 वर्ष असे आहेत. दिनांक 12/05/2021 रोजी सकाळी 8/30 वाजता मी मेडीकलच्या औषधी घेने कामी जळगांव जामो येथे आलो होतो. 10/00 वा घरी परत गेलो असता मला माझी पत्नि नामे सौ सूधा हिरालाल राऊत हिने सांगितले की आपली मोठी मूलगी 1 तासापासून दिसली नाही असे सांगितल्याने मी मूलीचा शोध घेत घेतला मूलगी मिऴून आली नाही. आज सकाळी 10/00 वा निमखेडी फाट्यावर आलो असता निमखेडी फाट्यावरील हाँटेल चूल अंगन हाँटेलवर असलेला दिपक तेरसिंग राऊत याने मला सांगितले की दि. 12/05/2021 रोजी सकाळी 9/30 माझे ओळखीचा रितेश ऊपाश्या जामरा वय 22 वर्ष व जगन काशीराम चव्हान वय अंदाजे 23 वर्ष ह्यांचे सोबत मोटर सायकल वर तुमच्या मुलीला घेवून जातांना पाहीले आहे. दि. 12/04/2021 रोजी सकाळी 10/00 वा पासून माझी अल्पवयीन मूलगी निघून गेलेली असून तिला रितेश व जगन यांनी गाडीवर बसवून नेतांना दीपक राऊत नि पाहीलेले असल्याने माझी मूलगी दिव्या हीस वरील दोघांनी पऴून नेल्याची माझी खात्री झाली म्हनून माझी मूलगी दवय 15 वर्ष 10 महीने हीला रितेश ऊपाश्या जामरा वय 22 वर्ष रा. रायपूर सराई व जगन काशीराम चव्हान वय अंदाजे 23 वर्ष रा. मेथा जि. बर्हानपूर ह्यांनी पळून नेले बाबत पोलिस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. कारवाई व्हावी.

हिंगणघाट शहरात 14 दिवसात 3 आत्महत्या ! कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन केली आत्महत्या

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट
सततच्या संचारबंदीमुळे आर्थिक स्थिति खालावल्याने कर्जबाजारी झालेल्या ३८ वर्षीय विवाहित युवकाने आत्महत्या केल्याची घटना आज दि.१४ रोजी स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथे मध्यरात्री घडली.
स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी प्रविण अशोकराव नगराळे (३८) याने शुक्रवार रोजी मध्यरात्री १२ .५० वाजता आपल्या घरिच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.यादरम्यान मृतकाने ओरडल्याने घरातील मंडळी जागे झाली.मृतक गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, यादरम्यान मृतक प्रविण याचेवर ६ लाख कर्ज असल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिट्ठी पोलिसांना मिळाली असून सततच्या संचारबंदीमुळे कर्जबाजारी झाले असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. मृतक आकाश याचा आंबेडकर चौक येथे भंगारचा व्यवसाय होता.सततच्या लॉकडाउनमुळे एक महिन्यापासुण त्याचे दुकान बंद आहे व त्याने ज्याच्याकडून पैसे कर्जाने घेतले,ते पैशयासाठी तगादा लावला होता, सततचे फोन येत असल्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे त्याने चिठ्ठीमधे लिहले असल्याची माहिती आहे.
मृतकाला दोन मुले व आई,पत्नी असा परिवार आहे. याअगोदरच्या लाॅकडाऊनमधेसुद्धा त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
सततच्या संचारबन्दीमुळे अनेक व्यावसायिक,कामकारी कर्जबाजारी झाले असून त्यांना कुटुंबियांचा उदरनिर्वाह करने कठिण झाले आहे. शहरात आर्थिक अडचणीमुळे याआधीसुद्धा स्वामी विवेकानंद वॉर्ड येथील विवाहित युवकाने आत्महत्या केली होती.
सततच्या संचारबंदीमुळे आज मृतक आकाश याने केलेली दुसरी आत्महत्या आहे.
सदर प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे,पोहवा महेंद्र आकरे हे पुढील तपास करीत आहे.

अक्षय तृतीया व ईद च्या शुभमुहूर्तावर महासिद्ध पतसंस्थेच्या ॲम्बुलन्स चे उद्घाटन..

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

आज दि.14 मे रोजी अक्षय तृतीया व ईद च्या शुभ मुहूर्त पर्वावर महासिध्द अर्बनने आज जळगांव (जा) तालुक्यातील लोकांसाठी ॲम्बुलन्स ची सेवा उपलब्ध करून दिली.
यावेळी ॲम्बुलन्सचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. कृष्णरावजी इंगळे यांनी केले.
सदर कार्यक्रमाला महासिध्द अर्बनच्या अध्यक्षा तथा जळगांव जा मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर महासिध्द अर्बनचे माजी अध्यक्ष प्रा.भाऊसाहेब इंगळे, डॉ.शेषरावजी भोपळे, संचालक सर्वश्री मांगीलाल भंसाली हुसैन डायमंड, राजाभाऊ कोकाटे, समाधान नेमाडे, पांडुरंगभाऊ घोलप, शामभाऊ इंगळे, योगेशभाऊ वाकेकर, व्यवस्थापक
अनिलभाऊ इंगळे, दिवेश कोठडिया, अनंता वानखडे, राहुल राजनकार, आदीची उपस्थिती होती….

आमदार समीर कुणावार यांच्या निधीतून जीवनोपयोगी औषधींचा साठा उपलब्ध.

0

 

सचिन वाघे वर्धा

सिंदी (रेल्वे)

शहर आणि परिसरातील कोविड रुग्णांची वाढती संख्या बघून कोविड रुग्णांसाठी आवश्यक असलेला औषधी साठ्याची त्या ठिकाणी कमी होत असल्यामुळे तिथे औषधी ची आवश्यकता होती. त्या साठी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन निधी मंजूर करून त्याठिकाणी आमदार निधीतून औषधी साठा देण्यात आला. सोबतच दोन Oxygen Concentrator सुद्धा देण्यात आले.
कोविड रुग्णांना या ठिकाणी औषधी उपचारासाठी सुविधा निर्माण झाली असून डॉ. शिवरकर हे या ठिकाणी निशुल्क सेवा देत आहे यांचे आमदार समीर कुणावार यांनी अभिनंदन केले. त्यांना सांगितले की पेशंटची ट्रीटमेंट चांगली करा जास्तीत जास्त लोकांना वाचवा प्रत्येक जीव हा मोलाचा असून जीवावर योग्य उपचार होणे फार आवश्यक आहे.
न. प. अध्यक्षा व प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यांच्याकडे सदर औषधी साठा व साहित्य सुपूर्त केले. तेथील पेशंटला चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळावी म्हणून दोन लक्ष रुपयाची औषधी आणि दीड लक्ष रुपयाचे 02 Oxygen Concentrator त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र शिंदी रेल्वे यांना उपलब्ध करून दिले.
गावातील सर्व कोरोना ग्रस्त पेशंटनी या औषधी चा चांगला उपयोग घ्यावा असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी केले.
त्याच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुचिता कुंभारे, श्री. संजय डगवार व इतरांकडून आरोग्य केंद्राच्या कामकाजाची माहिती घेतली. आमदार निधीमधून देण्यात आलेल्या औषधी, उपकरणे व साहित्याचा योग्य वापर करून कोरोणावर मात करण्याचे अविरत प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी केले. उपस्थित नगरसेवकांना यावेळी आरोग्य विभागाला यथोचित सहकार्य करण्याची विनंती केली.
…..त्यानंतर आमदार समीर कुणावार यांनी डॉ. शिवरकर द्वारा संचालित कोव्हीड सेंटरला भेट दिली. तसेच गुंज कॉन्व्हेंटमधील कोविड केअर सेंटरला भेट दिली असून त्या ठिकाणची व्यवस्था पाहिली तसेच कोविड केअर सेंटर मध्ये असलेल्या पेशंटची दुरूनच चर्चा करून माहिती घेतली. त्यांना मिळणा-या व्यवस्थेबद्दल माहिती करून घेतली तसेच त्या ठिकाणी सेवा देणाऱ्या लोकांशी चर्चा केली पेशंटला कुठल्या गोष्टीची कमी असेल त्याबद्दल विचारणा केली येथील चांगल्या प्रकारची व्यवस्था पाहून तेथील चांगल्या कार्याबद्धल *आमदार समीर कुणावार यांनी तेथील कार्य करणाऱ्या लोकांचे मनस्वी अभिनंदन केले.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत *नगराध्यक्षा सौ.बबिता तुमाणे, ओम राठी, अकील शेख, देवतळे, अनिल साखळे, गिरीधर कारमोरे, अनिल चांदेकर, यशवंत बडवाईक, प्रभाकर तूमाने, रोशन तडस, बालु सोनटक्के, रमेश वडांद्रे, अजय निखार, महादेव बोरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते

प्राणवायु निर्मिती प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण करावे

0

 

अजहर शाह

जिल्हाधिकारी एस रामामूर्ती

बुलडाणा:-सक्रीय रूग्णांची लक्षात घेता प्राणवायूची गरज भविष्यातही अशाच पद्धतीने लागणार आहे. त्यामुळे स्थानिक सामान्य रूग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्प असणे गरजेचे आहे. तरी या प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण करून रूग्णांच्या सेवेत रूजू करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी आज खामगांव सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आढावा बैठकही घेतली. बैठकीत आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी रूग्णालयातील कोविड वार्ड, डायलेसीस विभाग, पाकगृह, कोविड प्रयोगशाळा व नव्याने प्रस्तावित प्राणवायू प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी वैदयकीय अधीक्षक यांचे दालनात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, प्रभारी तहसीलदार सुरेखा जगताप, न.प.मुख्याधिकारी श्री. आकोटकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे, गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, तालुका वैदयकीय अधिकारी दिनकर खिरोडकर, डॉ.सोनटक्के आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चाचण्या वाठविण्याचे निर्देश दिले. कोरोना चाचणी, विलगीकरण कक्ष व इतर सुविद्या रूणांना पुरविण्यासाठी आवश्यक सुविधा नागरिकांकडून लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले. रूग्णालयात प्राणवायू प्रकल्पाचे काम सध्या सुरु आहे. या कामाची पाहणी त्यांनी केली. येथील रुग्णालयात आर टी पी सी आर प्रयोगशाळा सुरु करण्यात येत आहे. त्याचा आढावा देखील त्यांनी घेतला. शोध, उपचार आणि लसीकरण या त्रिसूत्रीवर जास्तीत जास्त भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले. याशिवाय सामान्य रुग्णालयाला जर काही अडचणी,समस्या असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

थोरगव्हाण येथे तापी नदीच्या पात्रातुन अवैध वाळुचा उपसा करून होणारी वाहतुक रोखण्यासाठी नाकाबंदी गस्त पथक नियुक्त

0

 

 

यावल (प्रतिनीधी) विकी वानखेडे

 

मागील अनेक दिवसांपासुन तालुक्यातील थोरगव्हाण येथील तापी नदी पात्रातुन बेकायद्याशीर होणारा वाळुचा उपसा व अवैध मार्गाने होणारी चोरटी वाहतुकीला आळा बसविण्यासाठी यावल तहसिलदार महेश पवार यांनी एक विशेष गस्त पथकांची नियुक्ती केली असल्यामुळे अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात वृत्त असे की यावल तालुक्यातील थोरगव्हाण ,पथराडे, शिरागड येथुन मोठया प्रमाणावर तापी नदीच्या पात्रातुन खुलेआम अवैध मार्गाने वाळुचा उपसा करून वाहतुक बिनधास्त पणे सुरु होती महसुल विभागाकडुन अवैध रेती वाहतुक रोखण्यासाठी पथक तयार करुन ही अवैध वाळुची वाहतुक सुरुच होती उलट पक्षी कार्यवाही करणाऱ्या पथकांवर वाळु माफीयांचे हल्ले देखील झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान चार दिवसापुर्वीच अवैध वाळुची वाहतुकीचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी जाणाऱ्या महसुल विभागाचे मनवेल येथील तलाठी स्वप्निल तायडे यांचा अंगावर टँक्टर चालवुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला सुदैवाने ट्रॅक्टर त्यांच्या पायावरून गेल्याने त्यांच्या पायास गंभीर दुखापत करण्यात आली असल्यामुळे अखेर हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी तहसीलदार महेश पवार यांनी तात्काळ या घटनांची दक्षता घेत नाकाबंदी केली असुन याकरीता थोरगव्हाणगावातील मुख्य चौकात वाळुची चोरटी वाहतुक रोखण्यासाठी तलाठी मुकेश तायडे , कोतवाल धनराज महाजन, होमगार्ड कैलास लावणे या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील दोन कोविड योद्ध्यांना “राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान-२०२१” पुरस्कार प्रदान.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-कोविड कालावधीत शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे गडचिरोली जिल्ह्यातील दोन कोविड योद्ध्यांना राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान-२०२१ पुरस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार व पत्रलेखन संघाच्या वतीने दिनांक १२ मे रोजी झालेल्या आँनलाईन झुम मिटिंगच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष अँड कृष्णाजी जगदाळे आणि पद्मश्री पुरस्कार डॉ विजयकुमार शहा यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
त्यामध्ये गट साधन केंद्र पंचायत समिती चामोर्शीचे साधनव्यक्ती चांगदेव सोरते व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा छल्लेवाडा पंचायत समिती अहेरी येथील शिक्षक सुरजलाल लिंगाराम येलमुले यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे लाकडाउनच्या काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे तसेच कोविड परिस्थितीत स्थलांतरित झालेल्या पालकांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी घरोघरी जाऊन प्रयत्न केल्याने सदर कामाची महाराष्ट्र पत्रकार संघाने दखल घेत यांची निवड केली होती.तसेच या दोन्ही कोविड योद्ध्यांनी कोरोना कालावधीत समाज जागृती,आर्थिक मदत,साहित्य वितरण,योग्य समुपदेशन केल्याने कार्य उल्लेखनीय ठरले आहे.साधनव्यक्ती चांगदेव सोरते यांनी शाळा बाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले तर सुरजलाल येलमुले यांनी तेलगू,गोंडी, बंजारा, मराठी या भाषिक विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत.
या दोन्ही कोविड योद्ध्यांनी कोरोना महामारी असतांनाही मुलांचे घरी जावून त्यांचे अभ्यास गट तयार करून घरोघरची शाळा निर्माण केली.शासनाच्या सर्व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली.स्वाध्याय उपक्रम,गोष्टींचा शनिवार,कृतिपत्रीका, बालकदिन,महिला दिन यामध्ये मुलांचा सक्रिय सहभाग नोंदविला.वेध शिष्यवृत्ती, संपूर्ण व्हेबिनारमध्ये सहभाग,शिष्यवृत्ती परिक्षेची पूर्वतयारी,शाळेबाहेरची शाळा इत्यादी उपक्रम तालुका स्तरांवरील अधिकारी आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.गडचिरोली जिल्ह्यातील दोन कोविड योद्धे राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.त्यामुळे त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

१८+ वयोगटातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन पातळीवर लसीकरण करा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

राज्यात १८+ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करणे राज्यसरकारने बंधनकारक केले आहे. पण यावल तालुक्यात व जिल्ह्य़ात लसीकरण हे अतिशय संत गतीने केले जात असुन नागरीकांनमध्ये लसी संबधी गोधंळ निर्मान झाला आहे.
लसीकरण करण्यासाठी Co-win या बेब साईट वर नोदंनी करून अपॉइण्टमेण्ट घेणे बंधनकारक केले आहे पंरतु लसी अभावी १८+ नागरिकांना नोंदणी नंतर अपॉइण्टमेण्ट भेटत नसल्याचे दिसून येत आहे म्हणून लसीची संख्या वाढवून लसीकरण हे महाविद्यालयीन पातळीवर राबवीले जावे जेणे करुन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होवुन लसीकरण हे जलद गतीने करणे सोपे जाईल.
कोरोना विषाणुसंसर्गाच्या सातत्याने वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर १८+ नागरिकांमध्ये विद्यार्थ्यी संख्या जास्त आहे म्हणून विद्यार्थ्यांना सरळ महाविद्यालयामध्ये लस दिली तर लसीकरणाला गतीमीळेल त्यासाठी १८+ विद्यार्थ्यांचे लसीकरण महाविद्यालयीन पातळीवर केले जावे अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थ्यी कॉंग्रेसचे यावल तालुकाअध्यक्ष राकेश सोनार यांनी नायब तहसीलदार आर डी पाटील यांच्या कडे दिले आहे या प्रसंगी सोबत कार्यअध्यक्ष महेंद्र तायडे, जय अडकमोल उपस्थित होते.

न प जळगांव जामोद चे प्रशासन संवेदनशुन्य : नगरसेवक श्रीकृष्ण केदार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगांव जामोद:-आज दिनांक 12 मे 2021 रोजी जळगांव जामोद शहरातील विविध समस्या विषयी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश उमरकर,पंचायत समितीचे माजी सभापती प्रविण भोपळे, नगरसेवक ऍड संदीप मानकर यांच्या उपस्थितीत तसेच न प गटनेता अर्जुन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांनी विविध प्रकारच्या समस्या विषयी निवेदन दिले. त्यामध्ये पुढीलप्रमाणे समस्या न प प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
जळगांव जामोद शहरात व परिसरात सॅनिटायजर फवारणी करण्याबाबत अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा अद्यापपर्यंत सार्वत्रिक फवारणी करण्यात आली नाही.
शहरातील व्यापारी,गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक यांच्या समस्या सोडवण्याच्या बाबतीत न प जळगांव जामोद चे प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे.
अग्निशमन ,साफसफाई तसेच ईतर अत्यावश्यक व जोखमीच्या विभागात सेवा देणारे कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पुरेसे विमा संरक्षण व कोरोना प्रतिबंधक साहित्य देण्याविषयी मागील वर्षी तक्रार दिली असूनही त्याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेण्याची संवेदनशीलता न प शासन व प्रशासनाने दाखवली नाही.
न प मलकापूर ने मागील दिवसात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मच्याऱ्यांचा सत्कार केला व त्यांना मानसिक बळ दिले,असे कार्य करण्याची सद्बुद्धी न प प्रशासन जळगांव जामोद ला केव्हा येईल?
न प प्रशासनाच्या असंवेदनशील व गलथान कारभारामुळे काही न प कर्मचारी तसेच पुष्कळ नागरिक गतप्राण झाले. त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला परन्तु त्याच्याविषयी सहानुभूती या निगरकट्ट प्रशासनाने दाखवली नाही.
न प मार्फत केवळ शहरात दर्जाहीन व थातुरमातुर बांधकामे सुरु ठेवण्याचे काम होतांना दिसत आहेत .त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही.त्या ठिकाणी विकास कामाविषयीचे फलक लावलेले आढळत नाहीत.
तसेच न प च्या व जळगांव जामोद शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने नगरसेवकांनी म्हणजेच लोकप्रतिनिधी यांनी न प च्या अधिकारी व कर्मचारी यांना विचारणा केली असता अत्यंत पोरकट व उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळकाढूपणा न प प्रशासनाकडून करण्यात केला जातो. मा नगराध्यक्षा यांचे प्रशासनावर अजिबात नियंत्रण नसुन,लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांना न प प्रशासन अजिबात जुमानत नाही हा एकप्रकारे शहरातील जनतेचा अपमान आहे.केवळ काही विशिष्ट व्यक्ती व अधिकारी यांच्या मर्जीनुसार न प चा अंदाधुंद व गचाळ कारभार सुरू आहे.
आता तरी न प प्रशासन व सत्ताधारी यांचे डोळे उघडतील का?शहरात आरोग्याच्या सुविधे अभावी आणखी किती बळी घेतले जातील?असे प्रश्न शहरवासीयांना पडत आहेत.
अश्याप्रकारे निवेदन देऊन भा रा काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने न प प्रशासनाच्या अंदाधुंद, गलथान व भ्रष्टाचारी कारभाराचा निषेध उपस्थितांमार्फत नोंदविण्यात आला.

शेतातील चोरीस गेलेला 150 किलो लसुन आरोपीसह पोलिसांचे ताब्यात..

0

 

सचिन वाघे वर्धा

12.5.21
हिंगणघाट
तक्रारकर्ता देवानंद मोहारे यांचे शेतातील बंडयाचे कुलुप तोडुन लसणाचे दिडशे किलो वजनाचे 5 कट्टे अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी अपराध क्र. 0442/2021 कलम 461, 380 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हा दाखल होताच हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने लगतचे परिसरात माहीती घेत अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेतला असता, सदर गुन्हयातील चोरून नेलेले लसणाचे बाजार भावाप्रमाणे अंदाजे 15 हजार रुपये किमतीचे कट्टे हे भिमनगर वार्ड येथील अमोल यादवराव वडे (33)याने चोरी केल्याचा सशंय असल्याने त्यास ताब्यात घेतले.
कसुन चौकशी केली असता आरोपी नामे अमोल यादवराव वडे (33) याने सांगितले कि, सदरचे लसणाचे कट्टे त्यानेच चोरले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीचे घरी जावुन त्याचे ताब्यातुन सदरचे लसणाचे 5 पोते एकुण 150 किलो माल जप्त करण्यात आला.
सदरची कामगीरी प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार संपत चव्हाण,पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर यांनी केली आहे.