Home Blog Page 468

अखेर दिड वर्षापुर्वी अपहरण झालेली यावलची१३ वर्षीय ट्विंकल कोळी सुखरूप पोलीसांच्या ताब्यात पोलीसांनी मानले उत्तर प्रदेश पोलीसांचे आभार

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील धोबीवाडा परिसरात राहणारी व मागील दीड वर्षापुर्वी शाळेतुन अपहरण करण्यात आलेल्या १३वर्षीय मुलीला उत्तर प्रदेश सारख्या राज्यातुन शोधुन ताब्यात घेण्यात यावल पोलीसांना अखेर यश मिळाले आहे . या संदर्भात पोलीसात भिमसिंग कोळी वय६५ वर्ष यांनी पोलीसात आपल्या मुलीची मुलगी ट्विंकल कोळी हीचे १९नोव्हेंबर २०१९ रोजी ति शिकत असलेल्या शाळेतुन एका अज्ञात व्याक्तीव्दारे रिक्शात बसवुन तिचे अपहरण करण्यात आले होते . याच काळात तिची आई मनिषा कोळी ही देखील सुप्रिम कॉलनी जळगाव येथे राहात असतांना तिचा शोध घेतला असता ती देखील मिळुन आली नाही दरम्यान भिमसिंग गंगाराम कोळी यांनी सर्वत्र नात ट्विंकल कोळी आणी त्यांची मुलगी मनिषा कोळीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्या मिळुन आल्या नसल्याने निराश झालेल्या आजोबांनी त्या नातीचा व त्यांची मुलगी हिचा अखेर शोध थांबविला होता , मात्र दीड वर्षानंतर अचानक ट्विंकल कोळी हिचा दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजता आजोबांना फोन आला आणी तिने आपण कुठ आहे ही सर्व माहीती आजोबांना दिली त्यानंतर यावल पोलीसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून , त्या१३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या शोध कार्यासाठी पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे या दोन सदस्यांच्या पथकास गोरखपुर उतरप्रदेश येथे पाठविले होते , या दोघ ही पोलीसांनी दोन दिवसाच्या ७०० किलोमिटर लांबीचा प्रवास करून अखेर उत्तर प्रदेशच्या तहसील बडहलगंज जिल्हा गोरखपुर येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी बच्चा यादव, पोलीस कर्मचारी सुशीलकुमार यादव आणी गृहरक्षक दलाचे प्रदुमल कुमार या पोलीसांच्या मदतीने त्या अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा सुखरूप शोध लावण्यात यश मिळवले असुन , तिला त्यांनी त्याब्यात घेतले आहे . ट्विंकल कोळी ची आई मनिषा किरण कोळी हीचा मात्र एक महीन्यापुर्वी बडलहगंज येथे रुग्णालयात उपचार घेत असतांना कोरोनामुळे मृत्यु झाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे . त्या मुलीला सोबत घेवुन यावल येथे येण्यासाठी ते रवाना झाले आहे . दरम्यान पोलीस उपनिरिक्षक विनोद रवांडबहाले व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांनी उत्तर प्रदेश पोलीसांचे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले .

यावल शहरात सकाळच्या सत्रात दोन मोबाईल व इतर साहित्य विकणाऱ्या दुकानावर दंडात्मक कारवाई

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले असुन , या लॉकडाऊनच्या काळत गरज नसतांना अनावश्यक विनाकारण फिरणाऱ्यांसह नियमांचे उल्लंघन करीत आपली दुकाने बाहेरून बंद करून आतुन किंवा वेगवळ्या पद्धतीने व्यवसाय करीत असलेल्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असुन आज ही सकाळच्या सत्रात दोन दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे . या संदर्भात नगर परिषदच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार आज दिनांक २१ मे शनिवार रोजी शहरातील भुसावळ पॉईंट परिसरातील यावल खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनातील सदगुरू आणी यश एजन्सीज मोबाइल दुकानावर प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे कोविड१९च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन ,या कार्यवाहीत यावल नगर परिषदचे प्रशासकीय अधिकारी विजय बडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद स्वच्छता अधिकारी शिवानंद कानडे, पोलीस अमलदार सलीम शेख , ज्ञानेश्वर कोळी यांच्यासह गृहरक्षक दलाचे कर्मचारी , नगर परिषदचे रवी काटकर , स्वनील म्हस्के , संदीप पारधे , विश्वनाथ शाहरुख खाटीक गजरे , नितिन पारधे यांच्यासह आदीनी या कारवाईत सहभाग घेतला .

दहा लाख बत्तीस हजाराचा गुटखा पकडला

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

बुलडाणा येथुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लाखो रूपयांचा अवैध गुटखा जप्त करून क्रार्यवाही केली आहे. या कार्यवाहीने स्थानीक पोलीस अन्नभीन्न झाले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद ऊब चावरिया यांच्या पथकाने गूप्त माहितीच्या आधारे संग्रामपूर तालुक्यातील ग्राम लाडणापुर येथे धाड टाकून तब्बल १० लाख ३२ हजार ५७० रूपयांचा गूटखा जप्त केला आहे. हि कारवाई दि. २१ मे रोजी दूपारी ४ वा. पासून रात्री उशिरापर्यंत करण्यात आली. या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अवेद्य गूटख्यासह दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवैद्य गुटखा विक्रीची माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे लाडणापुर येथे धाड टाकून १० लाख ३२ हजार ५७० रूपयांचा गुटखा तसेच ५ लाख ५० हजार रूपयांचे चार चाकी वाहन असे एकूण १५ लाख ८२ हजार ५७० रुपयांची कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून शुक्रवारी दुपारी चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. याप्रकरणी सोनाळा पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणी आरोपी देविलाल जयस्वाल, नितिन जयस्वाल यांना अटक करण्यात आली. तर तिसरा आरोपी धिरज जयस्वाल घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिस स्टेशनला पोलींस हेड. कॉ सुधाकर काळे स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा याच्या फिर्यादी वरून वरील तीन्ही आरोपींवर कलम १८८, २६९, २७०, २७२, २७३ भादवी सहकलम अन्न सुरक्षाव मानके कायद्याअंतर्गत २६(2), ,(iv),५१ अन्वये दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात सहाय्यहक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे यांच्या सह पो काॅ सैय्यद हारून, नापोका संजय नागवे , सूनील खरात, दिपक पवार, वाहन चालक सुरेश भिसे आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून बुलढाणा येथील गुन्हे शाखेच्या पथकाने अवैद्य गुटख्यावर मोठी कारवाई केल्याने सोनाळा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी पूढील तपास सोनाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पवार करीत आहेत. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात अवैध गूटखा विक्री, तस्करी सूरू असल्याचे यावरून सिध्द झाले आहे.

भूसावळ कंडारी रास्ता रहदारी साठी खुला करावे या मांगनी साठी निवेदन

0

 

विकी वानखेडे
यावल तालुका (प्रतिनिधी)

 

भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी जनरल मॅनेजरची हुकूमशाही- फॅक्टरीच्या सुविधा बंद करणार !
भुसावळ,
अनेक दिवसांपासून भुसावळ जनरल मॅनेजर यांनी हुकूमशाही करीत भुसावळ कंडारी रस्ता बंद केला आहे. शिवसेना, ग्रामपंचायत कंडारी, संयुक्त कृती समिती ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ यांनी वेळोवेळी जनरल मॅनेजर यांना चर्चा करण्यासाठी वेळ मागितली. या सर्वांनाच भेटीची वेळ दिली नाही तसेच फोनवर चर्चा करण्यासाठीसुद्धा तयारी दर्शवली नाही.
ऑर्डनन्स फॅक्टरी, रेल्वे कर्मचारी, तसेच कंडारी परिसरातील महिला, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी अश्या ५००० नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीड किलोमीटरचा फेरा वाढल्याने सर्वसामान्यांना पेट्रोलवर जास्त खर्च लागतोय याची काळजी जनरल मॅनेजर यांना नाही म्हणून आज भुसावळ उपविभागीय कार्यालयात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ऍड. श्याम श्रीगोंदेकर, तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शिक्षकसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, युवासेनेचे तालुका समन्वयक सुरेंद्र सोनवणे यांनी निवेदन सादर केले.
भुसावळ फॅक्टरी तर्फे उत्सर्जित झालेले सांडपाणी, घाण कचरा हा कंडारीकडे जातो, फॅक्टरीत असलेले कर्मचारी, रहिवासी किराणा, मेडिकल, एटीएम दवाखाने तसेच धार्मिक अंत्यविधीसाठी कंडारी भागात येत असतात. या सर्व सुविधा बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
संरक्षणमंत्र्यांकडे तक्रार दाखल:
जनरल मॅनेजर परराज्यातील असल्याने त्यांना स्थानिक मराठी माणसाच्या त्रासाशी काहीही देणेघेणे नाही. एका प्रकारची हिटलर शाही फॅक्टरी परिसरात सुरू आहे म्हणून देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे, असे प्राचार्य विनोद गायकवाड यांनी कळविले आहे.

शेत व पांधण रस्त्याच्या कामांना प्राधान्य देणार -आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

वसाडी बु.ते माळेगाव शेत रस्त्याचे भूमिपूजन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते संपन्न झाले. शेत व पांधण रस्त्याच्या कामांना प्राधान्य देणार असे प्रतिपादन यावेळी आमदार श्री.राजेश एकडे यांनी केले.सदर भूमिपूजन समारंभास नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. वसंतरावजी भोजने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनभाऊ पाटील,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे, ह.भ.प.श्री.बळीराम महाराज ढोले, श्री.गणेश बोदडे श्री.पांडुरंग तायडे,श्री.जावेद खान,श्री. संजय टाले,श्री.विजय टाले,श्री.विनोद पाटील, श्री.प्रकाश वाघ,श्री. संतोष बोचरे,श्री.वासुदेव भोपळे प्रामुख्याने उपस्थित होते.

तरोडा बु!शेत शिवारात त्या १३ काळविटांच्या मृत्यू प्रकरणी आरोपीला पकडण्यात जळगाव वन विभागाला आले यश.

0

 

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी

जळगाव जामोद तालुक्यात दिनांक १४ मे रोजी तरोडा बु! शेत शिवारामध्ये १० मृत काळवीट आढळले होते. त्याविषयी दिनांक १४ मे रोजी नियमानुसार आरोपीवर कारवाई करून वन गुन्हा ६७८/१६९२७ जारी केला होता. तसेच वन गुन्ह्यासंदर्भात दिनांक १५ मे रोजी गावातील परिसरात फिरून चौकशी केली असता आणखी तीन काळवीट मृत अवस्थेत आढळून आले होते त्या विषयी दिनांक १५ मे रोजी वन गुन्हा क्रमांक ६७८/१६९२८ जारी करून वनविभाग त्या दिवसापासूनच आरोपीच्या शोधात होते त्या प्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी बी.डी कटारिया जळगाव जामोद व त्यांचे वनकर्मचारी या प्रकरणी तपास करीत होते सदर प्रकरणातील मुख्य आरोपी चा छडा लावण्यात वनविभाग यशस्वी झाले त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती मिळाली होती माहितीवरून वनपरिक्षेत्राधिकारी बि.डी कटारिया व त्यांचे वन कर्मचारी यांनी सदर आरोपीचा पाच दिवसांमध्येच शोध लावला सदर आरोपी मुख्य आरोपी हा हनवतखेड येथील राधुसिंग छत्तरसिंग डावर याच्या मुसक्या आवळण्यात वन विभागाला यश आले आहे त्याचा कबुलीजबाब घेऊन त्याला प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर केले असता त्याचा दिनांक २४ मे पर्यंत वन कस्टडी रिमांड देण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पुढील कालावधीत करण्यात येईल संपूर्ण प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक बुलढाणा अक्षय गजभिये आर आर गायकवाड सहाय्यक वनरक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी बी.डी कटारिया यांच्यासह वनकर्मचारी श्री.जी दंडे,पी.जी.सानप वनपाल,व्हेरोडे,पर्वते,खेडकर, बुधवत,ताडे,कु.फळके,फड,बारेल,जुमडे,चालक गणेश तराळे,महेंद्र तायडे यांनी परिश्रम घेतले.

श्री वासुदेव बाबा दरबारात साजरा करण्यात येणारा गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याचा सार्वजनिक कार्यक्रम रद्द

0

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल : तालुक्यातील चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात साजरा करण्यात येणारा गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याचा सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर पारंपारीक पध्दतीने मोजक्याच भाविकांच्या उपस्थिती धार्मिक विधी संपन्न होईल तेव्हा येथे दर्शना करीता कोणी येवु नये असे अवाहन श्री वासुदेव बाबा दरबार येथील भक्तांनी केले आहे.
दरवर्षी वैशाख शुध्द बारस रोजी चुंचाळे येथे गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन असते यंदा २३ मे रोजी रविवारी येथे हा सोहळा साजरा होणार आहे मात्र, कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर प्रशासना कडून देण्यात आलेल्या सुचने नुसार येथे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे व मंदिरात भक्त, भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे अशात रविवारी पारंपारीक पध्दतीने श्री समर्थ सदगुरू सुकनाथ बाबा तपोभूमी, श्री समर्थ रघुनाथ बाबा जन्मभूमी व श्री समर्थ सदगरू वासुदेव बाबा कर्मभूमी चुंचाळे ता. यावल येथे साजरा होणारा गुरु श्री समर्थ रघुनाथ बाबा व शिष्य श्री समर्थ वासुदेव बाबा यांचा गुरु-शिष्य पुण्यतिथी सोहळा साजरा होईल यात मंदिरातील पुजारी मूर्ती स्नान व पूजाअर्चा करतील व बाबांच्या सर्व महाराष्ट्र सह गुजरात व मध्य प्रदेशातील भक्तांनी घरूनचं दर्शन घ्यावे कुणीचं दर्शना करीता येवू नये असे अवाहन श्री वासुदेव बाबा दरबार येथील भक्तांनी केले आहे

लसीकरणाच्या वेग वाढवा डाॅ उमेश वावरे ची मागणी….

0

 

सचिन वाघे वर्धा
21.5.21
हिंगणघाट :-
आज देशा मधे कोविड 19 मुळे सर्वत्र हा हा कार माजला आहे .
महाराष्ट्रात परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत चाली आहे .
मेडिकल सुविधा च्या अभाव पाहिला असून वेलेंटीलेटर. बेड .कमतरता आहे.
आज युरोपियन देश सपूर्ण लसीकरण झाल्यामुळे हे देश कोरोणा मुक्त होण्याचा मार्गावर आहे.
परंतु महाराष्ट्र मधे लसीकरण वेग मंदावला मुळे आज ही आपण कोरोणा छायत जगत आहो .
म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व कामे बंद करून त्या पैशाचे लस खरेदी करून. प्रत्येक खेडे गावात व शहरी वार्ड मध्ये एक मोहीम राबहून कोविड 19 खातमा केला पाहीजे.
वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यानच्या मार्फत मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना यांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिपभाऊ कहूरके. राजेश खानकूरे. जिवनभाऊ उरकुडे. मायासिग टाक. चारू आटे. विनोद गोडघाङे उपस्थित होते…

मा. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना हिंगणघाट शहर काँग्रेसतर्फे श्रद्धांजली देण्यात आली

0

 

सचिन वाघे वर्धा हिंगणघाट :–

देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना प्रथमतः मताधिकार देणारे, ग्रामोन्नतीचे प्रोत्साहक, नवोदय विद्यालयाचे संकल्पक, आधुनिक भारताचे प्रणेते, भारतीय आईटी युगाचे जनक.
भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत राजिवजी गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी हिंगणघाट शहर काँग्रेस तर्फे श्रद्धांजली देण्यांत आली.
या प्रसंगी पंढरीनाथ कापसे माजी नगराध्यक्ष, अध्यक्ष शहर काँग्रेस हिंगणघाट , ज्वलंत मून अध्यक्ष किसान कॉंग्रेस हिंगणघाट ,सय्यद मेराज अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल कॉंग्रेस हिंगणघाट, गुणवंत कारवटकार उपाध्यक्ष हिंगणघाट कॉंग्रेस, नागेश जीवणकर माजी नगरसेवक हिंगणघाट.प्रामुख्याने उपस्थित होते.

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत शहरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका

0

कचरा , कंपोस्ट डेपोचे नियोजन शुन्य, महसूल विभाग
शहरवासीयांना न्याय देतील का?

हंसराज उके अमरावती
====================
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत नेहमीच कोणत्या ना कोणत्या नेहमीच चर्चेत असते आणि आता सन
२०१५ पासुन पहिल्या निवडणूक
राजकारण,कहि खुशी कही गम
चे राजकीय लोकसेकाने आप आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा मिळवून पहील्याच पंचवार्षिक मध्ये नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतला
दोन नगराध्यक्ष वेगवेगळ्या पक्षाने
दिले पण नगरपंचायत वाशियांचे
किती भाग्य कि गेले पाच वर्षांपासून आपल्या देशाचे पंतप्रधान सबका साथ सबका विकास पण विकास सोडाच गेले
पाच वर्षाच्या कालावधीत शहर वाशियांच्या मुलभूत अधिकारा पासुन कोसो दुर ठेवल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे गेले पाच वर्षांपासून आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे पण कचरा व्यवस्थापन आजच्या तारखे पर्यंत सुध्दा शुन्य प्रगती पथावर असल्याचे जन लोकांमध्ये चर्चेचा विषय चालू आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक कचरा, कंपोस्ट डेपोचा प्रश्र जैसे थे प्रलंबित नग
रपंचायत मध्ये धुळ खात पडलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा खेळ एका प्रकारे सुरू आहे व निवार्याबाबत बोलताना नागरिक
रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना , छबरी आवास योजनेंतर्गत घरकुल योजना बर्याच कुटुंबापर्यत पोहोचले नसल्याचे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कचरा कंपोस्ट डेपोचा प्रश्र्नाकडे मा. जिल्हाधिकारी नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत कडे लक्ष देतील का? नागरिकांना न्याय मिळवून देतील अशी चर्चा जनसामान्य नागरिका मधे होत आहे.