Home Blog Page 467

शेतकऱ्यांना पिक विमा व नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई द्या – माजी मंत्री.आ.डॉ.संजय कुटे.

0

 

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

राज्यातील बहुतांशी जिल्हामध्ये पिक आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असल्यांने अशा परिस्थितीत यापूर्वी शासनाने दिल्याप्रमाणे सरसकट प्रत्येक शेतकर्‍याला पिक विमा मिळाला पाहिजे. या अनुषंगाने सर्व पिकविमा कंपन्यांना आपण आदेश करावे. त्याचप्रमाणे वरील निकष उपयोगात आणून हेक्टरी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान सरसकट देण्यात यावे. गेल्या आठवड्यात आलेल्या चक्रीवादळामुळे भालेल्या तुकसानाचे पंचनामे त्वरित करावे व झालेल्या पंचनाम्याप्रमाणे तात्काळ भरपाई मिळवून देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे यांनी 24 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.राज्यातील शेतकर्‍याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा खरीप हंगाम सुरु होत आहे. सध्या कोरोना महामारीमुळे व नुकत्याच झालेल्या अनेक नैसर्गिक संकटानि हैराण करून ठेवले आहे. खरीपच्या नियोजनात बि-बियाणे, खाते, औषधी, सिंचन व्यवस्था व अत्य प्रकारच्या नियोजनासाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोरोना महानारीमुळे राज्यभरातील बहुतांश दुय्यम कार्यालये बंद असल्यामुळे बँकांकडून कर्ज पुरवठा होणे बंद झाले आहे.यावरील निर्बंध शिथिल केल्यामुळे शेती तारण व्यवस्था सुरळीत होऊन कर्ज पुरवठा होऊ शकेल. त्याचप्रमाणे बँका फक्त 3 तासच काम करत असल्यामुळे सध्या त्यांची प्राथमिकता फक्त दैनिक व्यवहारापुरधीच असून कर्ज प्रकरणे करणे बंद आहेत. त्यांना पूर्णकालींन काम करण्यास मुभा मिळाल्यास पिक कर्ज प्रकरणे त्वरित होतील व शेतकर्‍याचि समस्या सुटेल. याप्रमाणे कार्यवाही त्वरित झाल्यासं अन्य खरीप हेगामाच्या तोंडावर अडचणीत आलेल्या आपल्या राज्यातील शेतकर्‍यांना भरीव मदत मिळून देता येईल तरी उपरोक्त मुद्दयांवर गंभीरतेने विचार करून शेतकर्‍यांना न्याय मिळवूत द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात अली आहे.

ग्रा.पं. वडनेर येथे कोरोणा साथ नियंत्रण आढावा बैठक व साहित्य वाटप 

0

 

सचिन वाघे वर्धा

वडनेर :–ग्रा.पं. वडनेर येथे मा.सौ कविता विनोद वानखेडे यांचे अध्यक्षेत कोरोना संसर्ग नियंत्रण करीता आढावा सभा घेण्यात आली.
सभेला ग्रा.रू. वडनेर चे अधीक्षक डॉ.पाटील, तलाठी इंगळे, गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रा.वि.अ. रामटेके, उपसरपंच सुभाष शिंदे उपस्थित होते.
गावात कोरोणा ची लागण झालेले 112 रुग्ण होते परंतु नियंत्रण समितीने गृहभेटी देऊन रुग्णांची काळजी घेऊन योग्य मार्गदर्शन केल्यामुळे गावात फक्त 8 रुग्ण असल्याचे आशा सेविकांनी सांगितले.
सभेच्या निमित्ताने ग्रा.पं.वडनेर च्या वतीने आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना आरोग्य किट चे उपस्थितांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
तसेच गावात कोरोणा प्रतिबंधत लस घेण्याबाबत जनजागृती करून सर्वांनी लस घेण्यात यावी असेही मार्गदर्शन करण्यात आले.
गावात मोठ्या प्रमाणात कोरोणा रुग्ण असताना आरोग्य विभागाने योग्य नियोजन केल्यामुळे रुग्ण बरे झालेले असून काही दिवसात गाव कोरोणा मुक्त होणार असे सरपंच वानखेडे यांनी सांगितले व गाव कोरोणा मुक्त करण्याचा संकल्प उपस्थित सर्वांनी व्यक्त केला.
डॉ. पाटील यांनी सभेला कोरोणा संसर्ग व लसीकरण बाबत मार्गदर्शन केले.

यावल ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण कल्याण समिती ही नांवालाच रुग्णांच्या प्रश्नांकडे कुणाचेही लक्ष नाही समितीच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण कल्याण समिती मागील १oवर्षापासुन फक्त नांवालाच असल्याचे दिसुन येत असल्याने रुग्णालयात लावलेल्या फलकावरच ही समिती असुन , यातील अनेक सदस्य असलेले अधिकारी हे यावल येथे प्रशासकीय सेवेत कार्यरत नसल्याने ही सामिती अस्तित्वात आहे किंवा काय असा प्रश्न निर्माण झाले असुन ,या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी यांनी जातीने कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या आरोग्याशी निगडीत संबधित प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे . दरम्यान यावल येथील ग्रामीण रुग्णालयातील नागरीकांच्या दैनंदीन समस्यांचे निराकरण व्हावे तसेच रुग्णालयाच्या संबंधीत विविध प्रश्न सोडविण्यात करीता शासन मान्यता प्राप्त राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत ,ग्रामीण रुग्णालय रूग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली असुन , या रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष वाय पी सपकाळे , ( गट विकास अधिकारी यावल ) , उपाध्यक्ष विजयकुमार जयकार ( वैद्यकीय अधिकारी सा . रु . जळगाव ) यांची नांवे दिसत असुन तर सदस्य म्हणुन ९ वर्षापुर्वीच यावलहुन बदलुन गेलेले तहसीलदार कुंदन हिरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता आर आर चिरमाडे यांच्यासह काही अधिकारी समिती सदस्य तर सेवानिवृत्त झाले आहे तर काहींच्या बदल्या झालेल्या आहेत . या रुग्ण कल्याण समिती मधील अध्यक्षा पासुन तर सर्व कार्यकारणीतील सदस्य हे यावल येथे शासकीय सेवेत कार्यरत नसल्याने या समितीच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन , दरम्यान समितीच अस्तित्वात नाही तर नागरीकांच्या आरोग्यांशी निगडीत समस्या , शासनाकडुन रूग्णालयाच्या देखभाल व दुरुस्ती करीता येणाऱ्या निधीचे काय असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले असुन , रावेरचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी आणी चोपड्याच्या आमदार सौ .लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी तात्काळ या समितीची पुर्नबांधणी करुन रुग्णांना आपल्या आरोग्या विषयी प्रश्न मांडण्या करीता रुग्णालयाशी संबधीत एक कक्ष उभारणी करावी जेणे करून योग्य उपचाराच्या दिशेपासुन भटकलेल्या रुग्णालयास उपचाराची दिशा मिळेल अशी मागणी असंख्य नागरीक करीत आहे .

भव्य रक्तदान शिबिर आमदार समीर कुणावार यांच्या शुभहस्ते अनुसया पॅलेस रोड हिंगणघाट येथे संपन्न झाला !

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट :– सध्या देशाला रक्तदानाची आवश्यकता असून सर्व दवाखान्यामध्ये पेशंट मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे लक्षात येताच हिंगणघाट येथील स्थानिक युवकांनी अंत्यत बिकट परिस्तिथी मध्ये संचारबंदीचे नियम पाळून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
सगळीकडे रक्ता चा तुटवडा भासत असल्या मुळे हिंगणघाट येथील युवकांनी पुढाकार घेऊन सेवा फाऊंडेशनच्या मदतीने हिंगणघाट येथील अनुसया पॅलेस येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले .
सदर शिबिरामध्ये किमान १०० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले , हिंगणघाट विधान सभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार व नगराध्यक्ष प्रेम बसंतांनी यांची प्रमुख उपस्थिती होती..
रक्तदान शिबिराच्या यशस्विते करिता महेश घुमडे , अक्षय चंदनखेडे , स्त्यालक्ष जवादे , युवराज खाटीक , उदयराज भोमले , आकाश वागदे , प्रणित झोरे , शुभम खाटीक, आनंद मानकर, आचाल वनकर , मीनल निखाडे ,खुशाल घोडे आणि रोहित तिजारे इत्यादी कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता पुढाकार घेतला.

कोरोना रुग्ण संख्या कमी असलेल्या जिल्ह्यात 1 जून नंतर नियमात बदल आरोग्य मंत्री राजेश टोपे .

0

 

सचिन वाघे वर्धा

महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला सुरुवातीला राज्य सरकारन 15 मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केला त्यानंतर त्यात वाढ 1 जून 2021पर्यंत लॉक डाऊन वाढवण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉक डाऊन असेल आता हा लॉक डाऊन संपायला अवघे आठ दिवस उरले आहेत त्यामुळे एक जून राज्यात लॉक डाऊन ची कशी स्थिती असेल लॉक डाऊन संपेल की वाढेल असे प्रश्न जनतेला पडू लागले आहेत याच पार्श्‍वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहेत
ज्या जिल्ह्यामधील कोरोना रुग्ण संख्या कमी आणि मृतांचा आकडा कमी असेल त्या – त्या जिल्ह्यांमध्ये एक जून नंतर लॉक डाऊन नियमा मध्ये शिथीलता देणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले

पेठ बीड कृती समितीच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम, सोशल इंजिनिअरिंगचे हे एक मूर्तिमंत उदाहरण – नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर

0

 

बीड दि.(प्रतिनिधी):-

पेठ बीड शहर विकास कृती समितीच्या वतीने मागील कोरोणा काळापासून विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांना अन्नाची पाकिटे त्याच बरोबर आता मोफत तात्पुरत्या ऑक्सीजन पोर्टेबल कँनच्या सहाय्याने जे रुग्ण बाहेरगावी जाण्यासाठी तसेच होम आयशोलेशनमध्ये आहे त्या रुग्णांना हा उपक्रमातून मदत होणार असून पेठ बीड शहर विकास कृती समितीच्या माध्यमातून समाजहिताचे उपक्रम राबविले जातात त्यांचे करावे तेवढे कौतुकच. सोशल इंजिनिअरिंगचे हे एक आदर्श मूर्तिमंत उदाहरण असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले.
रविवारी पेठ बीड भागातील बालाजी मंदिर रोडवरील पेठ बीड शहर विकास कृती समितीच्या वतीने मोफत पोर्टेबल आँक्सीजन कँन वितरण तसेच वाचनालयाच्या फलकाचे अनावरन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नगराध्यक्ष डाँ. भारतभूषण क्षीरसागर मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर पो.नि.पाटील साहेब (पेठ बीड पो.स्टे.), डाँ. नरेश कासट (बीड तालुका वैद्यकीय अधिकारी), माजी नगराध्यक्ष रणजितसिंह चौव्हाण, आसाराम गायकवाड, सादेकजमा, पेठ बीड शहर विकास कृती समितीचे मार्गदर्शक/ अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष अमृत सारडा, नगरसेवक प्रेम चांदणे, सतिश पवार आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर म्हणाले की कोरोणा महामारीमुळे देशात रोजगार, नोकरी, व्यवसायात अनेक समस्या निर्माण होत असून कोरोणा रुग्णांना खऱ्या अर्थाने मेडिसिन, आहार तसेच मायेच्या आधाराची गरज असते योग्य निदान आणी मायेचा आधार मिळाल्यास रुग्णांच्या मनातील भीती कमी होऊन त्यांना जगण्याची नवी उर्जा प्राप्त होण्यास मदत होते. बीडच्या विकासासाठी कृती समितीच्या माध्यमातून माजी मंत्री अण्णा व माझ्याकडे पेठ बीड भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, खंडेश्वरी भागातील तालुका स्टेडियम, शहराच्या मध्यवर्ती भागातील यशवंत उद्यान तसेच विविध विकास कामांसाठी पाठपुरावा करण्यात आला. या परिसरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत ही कौतुकास्पद बाब असून खरा भारत या भागात पहावयास मिळतो. कोरोणा महामारीत पोलीस, आरोग्य कर्मचारी, समाजातील दानशुर, समाजसेवक, न.प.च्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता नागरिकांना सेवा दिली त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कोरोणा हद्दपार करण्यासाठी शासनाच्या वतीने सांगितलेल्या नियमांचे पालन करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पो.नि.पाटील साहेब याप्रसंगी म्हणाले की, पेठ बीड शहर विकास समितीच्या वतीने सातत्यपूर्ण विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून मोफत पोर्टेबल आँक्सीजन कँन वाटप हा सर्वात महत्वाचा उपक्रम असून कोरोणा रूग्णांना यामुळे मोठी मदत होणार आहे. व्हँक्सिनेशन सेंटरवर ४५ वर्षापुढील नागरिकांना कोरोणा लस दिली जात असून ईतरांनी त्या परिसरात अनावश्यक गर्दी करू नये. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
डाँ.नरेश कासट यावेळी म्हणाले की, कोरोणा महामारीत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांना वेळेत सेवा देत आहेत रूग्णांच्या नातेवाईकांनी पण सहकार्य करणे गरजेचे आहे. रूग्णांच्या चेहऱ्यावर निरागस हसू खुलवण्यासाठी आम्ही सर्वच प्रयत्नशील असतो. पेठ बीड शहर विकास समितीच्या माध्यमातून मोफत पोर्टेबल आँक्सीजन कँन या स्तूत्य उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमातून अनेक गरजू रूग्णांना बाहेरगावी हलविण्यासाठी तसेच घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना पोर्टेबल आँक्सीजन कँनचा दिडशे ते दोनशे वेळा उपयोग होणार आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी याचा गरजेनुसार योग्य प्रमाणात वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना अमृत काका सारडा म्हणाले की आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून पेठ बीड शहर विकास कृती समिती मागील काळापासून काम करीत असून कोरोणा काळात आठशे ते हजार गरजुना घरपोच जेवन पुरविण्याचे काम केले, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोरोणाचे नियम पाळून मोफत घरपोच पाणी पुरवठा करण्यात येत आहे, यशवंत उद्यानाच्या विकासासाठी प्रयत्नशील असून कोरोणा रुग्णांना तात्पुरत्या मोफत पोर्टेबल आँक्सीजन कँनच्या माध्यमातून छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजन करीत आहोत रुग्णांच्या नातेवाईकांनी डाँक्टरांनी दिलेली योग्य कागदपत्रे दाखवून या मोफत पोर्टेबल आँक्सीजन कँनचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
या कार्यक्रमासाठी सतपाल लाहोट, लक्ष्मण शेनकुडे, सुरेश बनसोडे, विजय पिव्हळ, दत्ता परळकर अमोल वडतीले नागेश पवार, विलास बामणे, सम्राट सिंह चौव्हाण, जितेंद्र लोढा, सुरेश जगताप, भारत मस्के, कल्याण रायते, सोनू पांडे, मेहबूबखान, दादा हातागळे, किशोर परदेशी सखाराम चांदणे, रवि घेणे, सोमनाथ टऊळ, राम इगडे, अतीक शेख, शेख अब्बुभाई, भागचंद परदेसी, तीलक गुरखुदे, वनवे, अरुण नवले, गणेश कांबळे, रणजीत शिंनगारे, रतन बडोदे, विजय देशमुख, किशोर परदेशी, संजय घेणे, लाला बनसोडे, नितीन इगडे, नितीन साखरे, शेख खलील, नंदु येवले, ईश्वर धन्वे, फामजी पारीख आदिसह गरजु लाभार्थी उपस्थिती होती. यावेळी लोकसंगितातून कोरोणा महामारीवर आहेर वडगाव येथील कलावंतांनी जनजागृती केली तर यावेळी शासनाच्या वतीने सांगितलेल्या तोंडावर मास्क, सुरक्षित अंतर यासह कोरोणा नियमांचे पालन करण्यात आले.

राजकारणा तिल सुसंस्कृत व अष्टपैलू संसद रत्नास आपण मुकलो.. – काँग्रेस पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर.

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव जा:-दिनांक 23 मे 2021 रोजी स्व.
खा. राजीव सातव साहेब यांचे अस्थी कलश दर्शन व श्रद्धांजली कार्यक्रमाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जळगांव जामोद विधानसभा मतदार संघातर्फे महासिद्ध अर्बन पतसंस्थेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मान्यवरांनी अस्थी कलशाचे पूजन व दर्शन घेतले.
याप्रसंगी डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर यांनी आपल्या भाषणात स्व.खा.राजीव सातव यांच्या रूपाने एक सुसंस्कृत व अष्टपैलू संसद रत्नास आपण मुकलो. त्यांच्या प्रभावशाली कार्याचा आलेख हा सतत उंचावत राहला. शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे, युवकांचे प्रश्न पोट तिडकीने संसदेच्या सभागृहात मांडले. सोबतच त्या म्हणाल्या की प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची समाजातील प्रत्येकाची काळजी घ्यावी असा सल्ला दिला.
याप्रसंगी सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मा. कृष्णराव इंगळे, प्रा. हरिभाऊ इंगळे, डॉ.शेषराव भोपळे, जेष्ठ काँग्रेस नेत्या कु.अंजलीताई टापरे, बु.जि.महिला काँग्रेस अध्यक्षा सौ.ज्योतिताई ढोकणे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रकाश सेठ ढोकणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुकाराम भाऊ काळपांडे, ओ.बी.सी.कॉ.सेल चे जिल्ह्या ध्यक्ष गजानन खरात, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन वाघ, बु.जि. काँग्रेस सरचिटणीस अमर पाचपोर, ओ.बी.सी.चे प्रदेश उपाध्यक्ष राजीव घुटे, काँग्रेस शहर अध्यक्ष अर्जुन घोलप, नगरसेवक सर्वश्री श्रीकृष्ण केदार, रमेश ताडे, कलीम खान, सौ.चित्रा ताई इंगळे, ऍड. संदीप मानकर तसेच संजय भुजबळ, महिला शहराध्यक्ष सौ. मीनाताई सातव, मा.प.स.सभापती प्रवीण भोपळे, मा.प.स.सदस्य सुनील येनकर, सरपंच राजू शित्रे, जुबेर पटेल, अल्पसंख्याक शहराध्यक्ष शे.राजीक, पत्रकार बंधू नानासाहेब कांडलकर, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलाश बाप्पू देशमुख, गुलाबराव इंगळे, देविदास तायडे तसेच ओ.बी.सी.चे ओ.पी.तायडे, एड.काकड़े साहेब, अंसार बाबू, प्रमोद सपकाळ, योगेश महाले, विनोद धंदर, नंदकिशोर बाठे, कर्मचारी संघाचे सर्वश्री विजय म्हसाळ, संजय बावस्कर, राजीव सातव, ना. प.बगाडे, समाधान बगाडे, विश्वम्भर वावगे, संदीप भोपळे, दीपक उमाळे, गणेश सातव, समता परिषदे चे गजानन देवीकर, विक्की उमरकर, सौरभ अवचार, बंटी कळस्कार, अजय ताठे, गजानन साबळे, दिपक बंबटकार, शे.जूनेद, सचिन जाधव, महेंद्र बोडखे,गुड्डू जामोदे, धनंजय बंबट कार, गौरव इंगळे, रामा इंगळे, किशोर घटे, शे.हारून, मयूर सातव, योगेश जाधव, अजय काळे, सुरेश चौखंडे, योगेश घोपे, दिनेश काटकर ,कृष्णा धुर्डे, शंकर घोपे, प्रल्हाद राऊत, विशाल सातव, अनिल इंगळे, पहेलवान चाचा व असंख्य राजीव सातव यांच्यावर प्रेम करणारी मंडळी बंधु भगिनी उपस्थित होते.
यावेळी विचार व्यक्त करतांना सर्वांचे मन गहिवरुन आले होते. डोळे भरून आले होते. यावेळी कृष्णराव इंगळे, अंजलीताई टापरे, ज्योतिताई ढोकणे, प्रकाश सेठ ढोकने, संजय भुजबळ, गजानन खरात यांनी शब्द सुमन अर्पित केलेत. सर्वांनी राजीव सातव यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
संचालन सौ.कल्पना ताई इंगळे यांनी तर प्रस्ताविक अविनाश उमरकर यांनी केले.
सरते शेवटी कोरोना काळात मृत्यु पावलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली..

श्रीरामजी कुटे चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद अंतर्गत स्वखर्चातून ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर बँक ची निर्मिती..

0

 

गजानन सोनटक्के.

जळगांव जा.प्रतिनिधी:-

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव जामोद यांनी अंतर्गत स्वखर्चातून ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर बँकेची निर्मिती तयार करण्यात आली आहे. रुग्णांना ऑक्सीजन चा खर्च परवडणार नाही तसेच गरजू रुग्णांचा खर्च कमी व्हावा म्हणून ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर बँकेची निर्मिती तयार करण्यात आली आहे. तसेच यावेळी मेहकर मतदार संघाकरिता दहा ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर तसेच सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघा करिता दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यासह जळगाव जामोद आणि संग्रामपूर साठी तीस ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटअर आणि 30 बेड देण्यात आले आहेत. तसेच येत्या दहा दिवसांमध्ये मुंबईवरून आणखी ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटअर मिळणार असून गरजू रुग्णांना मोफत देण्यात येणार आहे. तसेच 18 वर्षे वयोगटातील च्या आतील ज्या मुलांचे कोरोणामुळे पालकत्व हरविले आहे अशा मुलांना श्रीराम कुटे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट दत्तक घेणार असून त्या मुलांचा शिक्षणापासून चा संपूर्ण खर्च श्रीरामजी कुटे चँरीटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात येणार आहे. असे जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. तसेच यावेळी डॉक्टर राजेश सराफ जिल्हा अध्यक्ष वैद्यकीय आघाडी,विजय भालतडक ता.अध्यक्ष शेगाव, ज्ञानेश्वर सारवरे शहर अध्यक्ष शेगाव, डॉ. संतोष भाकरे अध्यक्ष डॉक्टर सेल शेगाव, बाबाराव मुंडे तालुका अध्यक्ष लोणार, अँड शिव ठाकरे ता.अध्यक्ष मेहकर,लोकेश राठी ता.अध्यक्ष संग्रामपूर,विलास इंगळे शहर अध्यक्ष संग्रामपूर, रोशन कोब्रा मेहकर, डॉ. चांडक डॉ. सेल सुनगाव, प्रकाश वाघ तालुका अध्यक्ष जळगांव जामोद, अभिमन्यू भगत शहर अध्यक्ष जळगांव जा.,डॉ. मानके,डॉ. शिंदे, विनोद वाघ,गजानन भुले,पंकज देशमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यात गरिबांच्या जीवाला फास लावणारा लॉक-डाऊन:- पुनर्विचार करा

0

 

सचिन वाघे वर्धा
23.5.21
हिंगणघाट :-
विदर्भ विकासआघाडीचे अनिल जवादे यांची कळकळीची मागणी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील एक-सव्वा वर्षा पासून लॉक-डाऊन देशभरात कुठे ना कुठे लागू करण्यात येत आहे.सध्या वर्धा जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून लॉक-डाउन लागू असून यामुळे मोलमजुरी करणारे,छोटे दुकानदार यांच्या वर उपासमारीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे हे निर्बंध त्वरित शिथिल करुन या आदेशावर जिल्हाधिकारी यांनी पुनर्विचार करावा अशी मागणी विदर्भ विकास आघाडीचे संस्थापक श्री अनिलकुमार जवादे यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांना पाठविलेल्या एका निवेदनातून केलेली आहे.
श्री अनिल जवादे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सततच्या लॉक-डाऊन मुळे सर्वसामान्य जनतेचे जीवन मेटाकुटीला आले आहे.जनतेने आतापर्यंत शासनाच्या प्रत्येक आदेशाचे काटेकोरपणे पालन केलेले आहे.परंतु तरीही शासन सर्व सामान्य जनतेची दखल न घेता लॉक-डाऊन करून अनेकांची रोजीरोटी हिसकावून घेत आहे.रोजमजुरी करणारे,हातावर आणून पानावर खाणारा कसेबसे जीवन जगत आहेत.मित्र,सावकार,नातेवाईक यांच्या कडून उधार- उसनवार घेऊन कसेबसे दिवस काढीत आहेत.कोरोना संसर्गापासून स्वतःच्या कुटूंबियांचा बचाव करून मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.परंतु जिल्हाधिकारी यांनी परत एकदा कडकडीत लॉक-डाऊन चा आदेश काढून सर्वसामान्य जनतेला हतबल केले आहे.या नवीन आदेशाने जनतेच्या रोजगाराचे साधन परत एकदा हिरवल्या गेले आहे.
या नवीन आदेशात अत्यावश्यक वैद्धकीय कारणांसाठी बाहेर पडण्याची मुभा दिलेली आहे.मग रोजमजुरी करणाऱ्या रोजगाराचे काय ? किराणा माल व भाजीपाला यांना आठवड्यातील तीन दिवस घरपोच वितरण करण्याची मुभा दिलेली आहे.परंतु रोजमजुरीला जाणाऱ्या कुटूंबियांच्या घरा पर्यंत किराणा,व भाजीपाला त्याच्या ऐपतीप्रमाणे व गरजे प्रमाणे कसा पोहचेल ? हॉटेल,रेस्टारंट, शिवभोजन थाळी ची मुभा हॉटेल मालकांना दिली परंतु हॉटेल मालकांनी जर ही सुविधा दिली नाही तर ग्राहकाने कोणता पर्याय निवडावा ? कोणते हॉटेल ही सुविधा देणार हे कसे कळेल.कृषी साहित्याची दुरूस्ती या करीता शेतकऱ्याला शहरात आल्या शिवाय पर्याय नाही ही व्यवस्था घरपोच कशी होऊ शकते.सलून व्यवसायिकांना नियमांचे पालन करून व्यवसाय करण्याची परवानगी दिली होती त्याच प्रकारची परवानगी देण्यात यावी.पूर्वीच्या आदेशा प्रमाणे लग्न समारंभ करण्याची परवानगी दिली होती तशीच परवानगी आताही देण्यात यावी त्यामुळे या व्यवसायात असणाऱ्या मंडळींना रोजगाराची उपलब्धता होईल.अशा विविध मागण्या निवेदनातून करण्यात आली आहे.
शासनाचा सध्याचा आदेश हा जिल्ह्यातील ५० टक्के जनतेच्या सोयीचा असला तरी ५० टक्के लोकांच्या गैरसोयीचा आहे.५० टक्के मध्ये येणारे बांधकाम मजूर,चहाटपरीवाले,कार पेंटर,बँड पथक,धोबी,फोटोग्राफी, प्रिंटिंग प्रेस,भाजी विक्रेते, हमाल,फळवाले,सायकल रिक्षा चालविणारे,मोची,पंचर दुरुस्ती करणारे,शेती अवजारे दुरुस्ती करणारे,शेतमजूर, या वर्गाने या निर्बंधानामुळे जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झालेला आहे.अशी चिंता त्यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.
देशाच्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याची हमी दिलेली आहे.व जगवायची जबाबदारी शासनावर टाकलेली आहे.असे असतांना ५० टक्के लोकांच्या जगण्यावर निर्बंध घालण्यात येत आहेत.यामुळे संविधानाच्या मूळ तरतुदीलाच बाधा पोहचत आहे.५० टक्के लोकांच्या जगण्याचा संवैधानिक अधिकार नाकारणारे आदेश गेल्या वर्ष भरा पासून सातत्याने पारित होत आहे. हे अन्यायकारक आहेत.तरी या निवेदनातून शासनाला विंनती करतांना श्री जवादे म्हणतात की,५० टक्के जनतेला होत असलेली असुविधा त्यांचे जीवन जगणे कठीण करीत आहे.यावर मानवतेच्या दृष्टिकोणातुन विचार करावा व लोकाभिमुख निर्णय घेऊन गोरगरिबांना जगता यावे असे सुधारित आदेश निर्गमित करावे. अशी विनंती निवेदनातून अनिल कुमार जवादे यांनी जिल्हाधिकारी/ शासनाकडे केलेली आहे.

महापुरुषांचा लढा हा सामाजिक विचार परिवर्तनाचा होता – अॅड. प्रज्ञेश सोनावणे

0

 

ठाणे ( प्रतिनिधी आशा रणखांबे) :

राज्यावर, देशावर रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी सर्व बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून त्यांना मावळा ही पदवी बहाल करून स्वराज्य निर्माण केले. शेतकऱ्यांचा राजा बहुजनांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा लढा धार्मिक नव्हता तर तो राजकीय लढा होता. महात्मा फुले यांनी भारतामध्ये स्त्रियांसाठी शिक्षण निर्माण करून देशातील स्त्रियांना स्वावलंबी बनविले आणि स्त्रिया शिक्षित झाल्या. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात सर्वप्रथम आरक्षणाची तरतूद करून बहुजन समाजाला ५० टक्के आरक्षण देऊन सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे बहुजनवर्गाला पुढे येता आले. आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशात खऱ्या अर्थाने सामाजिक विचार परिवर्तनाची क्रांति घडवून आणली.

भारतीय संविधान निर्माण केले आणि त्यात प्रत्येक भारतीयांना न्याय मिळवून दिले. प्रत्येक धर्माच्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळवून दिला.

भारतीय विद्यार्थी संघटना ठाणे शहराच्या वतीने दिनांक २३ मे २०२१ रोजी रविवार सकाळी ११ : ०० वाजता, छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर ह्या महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महापुरुषांच्या विचारांचे भाष्यकार सामाजिक कार्यकर्ते, वक्ते अॅड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांनी आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या पिढीने महापुरुषांचा विचार स्वीकारणे आणि त्यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करणे आवश्यक आहे. देशात आज परिस्थिती विचित्र निर्माण झालेली आहे आणि या परिस्थिती विरुद्ध आपल्याला लढायचे असेल तर छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांशिवाय पर्याय नाही. सोशल मीडियाचा तरुणांनी चांगला वापर केला पाहिजे, विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे आणि विशेष करून हिंसेचे समर्थन करू नये. तथा प्रत्येक भारतीय नागरिकांकडे भारतीय संविधानाची प्रत घरात असलीच पाहिजे प्रत्येकाला आपले हक्क अधिकार आणि कर्तव्य माहिती असले पाहिजे. कार्यक्रमाला शुभम कांबळे यांनी प्रास्ताविक सादर केले तर वेदांत मोरे यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रा. प्रशांत साळवी, सायली कांबळे, श्रवण सादरे, यश साबळे, भूषण आंबिकर, श्रेयस काताळे, साईल आंबेकर, करण तेकाळे इत्यादींना सक्रिय सहभाग घेतला.