Home Blog Page 47

प्रेमाच्या विरहातून आत्महत्या; बुलढाण्यातील धक्कादायक घटना (instagram video Live)

0

बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना

instagram video Live:बुलढाणा जिल्ह्यातील बीड परिसरात एका तरुणाने आपल्या प्रेमिकेच्या अचानक निघून जाण्याने व्यथित होऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून उघड झाली आहे.

या व्हिडीओत तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट घेण्यापूर्वी त्याच्या भावनांचा प्रकटपणे प्रदर्शन केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

UPI युजर्स सावधान निष्क्रिय मोबाईल नंबरवरील सर्विस बंद होणार(Upi)

समाधान अटोळे नावाच्या २५ वर्षीय तरुणाने ही घटना घडवून आणल्याचे समोर आले आहे. तो गेल्या काही काळापासून आपल्या प्रेमिकेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. सुरुवातीला त्यांच्यात सगळं सुरळीत होतं, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू झाले होते.

अचानक प्रेमिकेने काहीच न सांगता निघून जाण्याने समाधानला खूप नैराश्य आलं होतं. त्याच्या विरहात व्याकूळ झाल्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आपल्या आयुष्याचा शेवट केला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

instagram video Live:व्हिडीओत समाधान डोक्यात बाटलीने स्वत:ला मारहाण करताना दिसत आहे. सुरुवातीला त्याने बाटलीने स्वत:ला मारून घेतल्यानंतर त्याने ऑन कॅमेरा विष प्राशन केलं. यानंतर काही वेळातच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने स्थानिक लोकांमध्ये शोक आणि आक्रोशाचे वातावरण आहे.

प्रशांत डीक्कर यांच्यावर खंडणी मागण्याचा आरोप; शेगाव पोलिसांत गुन्हा दाखल(prashantdikkar)

0

 

prashantdikkar:शेगाव शहरातील एका घटनेत शेतकरी नेते प्रशांत काशिराम डीक्कर यांच्यावर खंडणी मागण्याचा आरोप झाला आहे.

ही घटना 21 मार्च 2025 रोजी शेगावच्या रेल्वे उड्डाण पुलाजवळ घडली. फिर्यादी सौ. पुष्पा संदिप मोरखडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

त्यांच्या तक्रारीनुसार, प्रशांत डीक्कर यांनी जिगाव प्रकल्पातील पुनर्वसनासाठी शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्यातून प्रति एकरी चाळीस लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

त्याबदल्यात त्यांनी पाच लाख रुपये घेतले आणि प्रति एकरी पाच लाख रुपये द्यावे लागतील, नाही तर शासनाकडे आंदोलन करून त्यांना कोणताही लाभ मिळू देणार नाही अशी धमकी दिली.

पोलीस स्टेशन शेगाव शहरात या प्रकरणाची कायमी अप नं. 150/2025 कलम 308 (2), 308(3), 308 (5) भारतीय न्यास संहिता अनुसार नोंदणी करण्यात आली आहे.

prashantdikkar: फिर्यादी सौ. पुष्पा संदिप मोरखडे या हिंगणा कवठळ, ता. संग्रामपुर येथील रहिवाशी आहेत. आरोपी प्रशांत काशिराम डीक्कर हे ग्राम बोडखा, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा येथील रहिवाशी आहेत. या प्रकरणाचा तपास तपास अधिकारी सपोनी गजानन सोनटक्के यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

जिगाव प्रकल्प भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात प्रशांत डिक्कर यांनी आवाज उठवताच बांधकाम ठेकेदार एकवटले..प्रशांत डिक्कर व त्यांच्या सहकाऱ्यांना खोट्या केसेसमधे अडकवण्याच्या धमक्या.ठेकेदारांकडून प्रशांत डिक्कर यांना धक्काबुक्की..(prashantdikkar) 

0

इस्माईल शेख शेगाव /बुलडाणा

prashantdikkar:शेगाव/ जिगाव प्रकल्पातील जमिनीला एकरी ४० लाख रुपये मोबदला द्यावा. व शेतकऱ्यांच्या जिवावर उठलेल्या ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करा. या मागणीसाठी प्रशांत डिक्कर यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी अधिक्षक अभियंता कार्यालय शेगाव येथे निवेदन देण्यासाठी गेले असता कार्यालयातच संबंधित अधिकाऱ्यांसोबत शातंतेत चर्चा सुरू असतांना.

ठेकेदारांनी पाठवलील्या माणसांनी अचानक कार्यालयात येऊन प्रशांत डिक्कर यांच्या सोबत थेट वाद घातला. घाणेरडे आरोप करीत शिवीगाळ केली. शेतकऱ्यांच्या जमिनीला एकरी ४० लाख रुपये मोबदला द्यावा व ठेकेदारांचा बंदोबस्त करा. त्यामुळे हा सर्व प्रकार ठेकेदारांच्या चांगलाच जिव्हारी आल्यामुळे ठेकेदारांच्या सांगण्यावरून हा प्रकार नियोजित घडवून आणला असल्याचे बोलल्या जात आहे.

FarmerNews /अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई: शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात

दरम्यान शेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार साहेब नितीन पाटील यांचे सह जाधव साहेब यांनी तत्काळ घटनास्थळी वाद विकोपाला न जाता वातावरण शांत केले.

शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर व भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना व सहकाऱ्यांना ठेकेदारांनी कितीही रोखण्याचे काम केले असले. तरीसुद्धा हा लढा थांबणार नाही.

FarmerNews /अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई: शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात

prashantdikkar:असे प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना सांगितले. जोपर्यंत प्रकल्पातील जमिनीला शेतकऱ्यांना एकरी ४० लाख रुपये मोबदला मिळत नाही. व भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. असा इशारा अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभागाला प्रशांत डिक्कर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

वास्तविक दिव्यांगावर अन्याय करणाऱ्या सेतू केंद्र चालकावर दिव्यांगा सुरक्षा कायद्यासह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा(बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरण) (FirNews) 

0

 

सय्यद वसीम खामगाव तालुका प्रतिनिधी

FirNews:खामगांव मा. जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा जिल्हा बुलढाणा २) मा. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक खामगाव जिल्हा बुलढाणा यांना बोगस अपंग प्रमाणपत्र तसेच त्यावर खोडतोड करणाऱ्या ऑनलाइन केंद्र चालकावर दिव्यांग सुरक्षा हमी कायदा तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन विराट मल्टीपर्पज फाउंडेशन या दिव्यांग सेवा संस्थेचे अध्यक्ष मनोज नगरनाईक यांच्या वतीने देण्यात आले.

बुलढाणा जिल्ह्यातील तेरा ही तालुक्यात बोगस अपंग प्रमाणपत्रांचा तसेच यु डी आय डी कार्डचा सुळसुळाट वाढलेला आहे या प्रमाणपत्र व यु डी आय डी कार्ड च्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ या माध्यमातून मिळत असतो.

FarmerNews /अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई: शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात

या प्रमाणपत्र व यु डी आय डी कार्ड बनविणारे रॅकेट सध्या आपल्या जिल्ह्यात कार्यरत आहे त्याचाच प्रत्यय दिनांक 19/03/2025 रोजी सामान्य रुग्णालय खामगाव येथे उघडकीस आल्यानंतर शहर पोलीस स्टेशन खामगाव येथे गुन्हा क्र. ११७/२०२५ कलम ४२०,४६५४६८,४७१,४७२ भारतीय दंड विधान नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

परंतु सदर प्रकरणांमध्ये संबंधित प्रकरणात यातील मुख्य सूत्रधार खामगाव सह बुलढाणा व इतर तालुक्यात ऑनलाइन सेंटर चालवणारे आहेत याविषयीच्या अनेक बातम्या विविध वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या आहे तरी या प्रकरणामध्ये सी आय डी चौकशी करून यातील मुख्य सूत्रधार व हे काम करणारे आपल्या जिल्ह्यातील विविध ऑनलाइन सेंटर चालक या मध्ये गुंतलेले आहेत खामगाव येथील प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार दिसून येत आहे,

KapusBajarbhav / कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत सुधारणा

अश्या दलाल यांचा पर्दाफाश करीत दिव्यांग सुरक्षा कायदा व देश द्रोहाचा या चौकशीतून गुन्हा दाखल करण्यात यावा प्रमाणपत्र कुठे तयार केले, त्याला कोणी मदत केली ,

प्रमाणपत्र बोगस देणाऱ्याने किती प्रमाणपत्र बनून कोणा कोणा ला दिली, किती आर्थिक व्यवहार झाला , लाभार्थी ने बनावट प्रमाणपत्र बनून घेऊन कोणते लाभ घेतले, बनावट शिक्के कुठून उपलब्ध केले याची चौकशी करण्यात यावी करिता अशा मागणीचे निवेदन सादर केले आहे यावर आपण पंधरा दिवसात कठोरात कठोर कार्यवाही करावी,

FirNews:व्हावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका स्वीकारावी लागेल तसेच सोबत असलेल्या ची संपूर्ण सखोल चौकशी या निवेदनाच्या प्रतिलिपी मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस , मा. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव बुलढाणा , मा. पालकमंत्री मकरंदजी पाटील बुलढाणा , मा. कामगार मंत्री आकाश दादा फुंडकर खामगाव , जिल्हाधिकारी बुलढाणा , दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे. यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत हे निवेदन देते वेळी मनोज नगरनाईक सह पत्रकार पंकज गमे संतोष करे आकाश शिंदे,संतोष आटोळे आदी उपस्थित होते

FarmerNews /अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई: शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात

0

अतिवृष्टीमुळे नुकसानभरपाई: शेतकऱ्यांना मिळणार मदतीचा हात

FarmerNews:बु लडाणा :-पावसाळ्यातील अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

Buldhana Takkal virus / केसगळतीचा गूढ: रेशनच्या गव्हाचा संबंध नाही, पाण्याचाही नाही

या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत मिळण्याची सुरुवात झाली आहे.

 

जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २२ हजार २१० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. त्यांना एकूण १३ कोटी २३ लाख रुपयांची भरपाई देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे मदतीचा निधी जमा केला जात आहे. यापैकी ११ हजार २९० शेतकऱ्यांच्या खात्यात ७ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक क्लिक करा 

उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच मदतीचा निधी पाठवण्यात येणार आहे.

FarmerNews:शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे, नाहीतर त्यांना आर्थिक मदत मिळण्यात अडचण येऊ शकते.

Shiv Bhojan Thali / खामगावमध्ये जेवणात अळ्या आढळल्याने खळबळ

0

 

 

सूर्या मराठी न्यूज ब्युरो 

Shiv Bhojan Thali:खामगाव शहरातील उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात शिवभोजन केंद्रामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकिस झाला आहे.

pikvima / खरीप हंगाम 2024 : शेतकऱ्यांना मिळणार 2197.15 कोटी रुपयांची मदत

या केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या शिवभोजन थाळीमध्ये अळ्या आढळल्याचा किळसवाणा व्हिडिओ समोर आला आहे.

हे शिवभोजन केंद्र गरजू व्यक्तींना माफक दरात चांगले भोजन मिळावे म्हणून सुरु करण्यात आले होते. मात्र, येथील जेवणातील दर्जा निकृष्ट असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

शिवभोजन थाळी म्हणजे फक्त दहा रुपयात पोटभरून जेवण मिळवण्याची संधी देणारी योजना. मात्र, या योजनेतील जेवणात मृत अळ्या असल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासनावर कारवाईची मागणी होत आहे.

Shiv Bhojan Thali / अन्न व औषध प्रशासनाकडून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. हा प्रकार उघड झाल्याने शिवभोजन केंद्राच्या मोहिमेवर शंका उपस्थित झाली आहे.

Foreshtnews /अंबाबरवा अभयारण्याला मिळाला सर्वोच्च मानाचा तुरा

0

 

वनरक्षक कपील मोरे यांना सुवर्ण पदक

Foreshtnews:गुरुवार, २१ मार्च रोजी जागतिक वन दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे वनरक्षक कपील मोरे यांना शासनाचा सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांना सातपुड्याच्या कुशीतील दुर्गम भागात असलेल्या अंबाबरवा अभयारण्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल देण्यात येत आहे.

अंबाबरवा अभयारण्याच्या या यशामुळे सोनाळा वनपरिक्षेत्राला मोठा बहुमान मिळाला आहे. कपील मोरे हे शेतकऱ्यांच्या कुटुंबातून शासकीय सेवेत दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना वन्यजीव विभागात वरिष्ठांकडून लौकिक मिळाला आहे.

KapusBajarbhav / कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत सुधारणा

अंबाबरवा अभयारण्याच्या या यशाचे श्रेय वनरक्षक कपील मोरे यांच्या प्रभावी कार्याला जातो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महसूल व वन विभागाने सन २२-२३ साठी त्यांना सुवर्ण पदकाच्या मानकरी घोषित केले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यापूर्वी सन १९२० मध्ये अंबाबरवा बीटच्या वनरक्षक कु. रुपाली राऊत यांना सुवर्ण पदक देऊन शासनाने गौरविले होते. आता दुसऱ्यांदा अंबाबरवा अभयारण्याला हा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे.

Foreshtnews:सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात याबाबतचे पत्र प्राप्त झाले असून, वनरक्षक मोरे यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुनिल वाकोडे, आर एफ ओ अंबाबरवा रेंज, सोनाळा यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी एलपीओ हॉलिडेजकडून आयोजन एक्सक्लुझिव्ह B2B एजंट्स मीटचं (B 2B )

0

 

B2B:पुणे – 18 मार्च 2025 : आंतरराष्ट्रीय पर्यटनक्षेत्रातील लोकप्रिय एलपीओ हॉलिडेज (LPO Holidays) कंपनीच्या वतीने पुण्यात ‘एक्सक्लुझिव्ह B2B ट्रॅव्हल एजंट्स मीट’चं शनिवारी (15 मार्च) आयोजन करण्यात आलं होतं.

स्थानिक ट्रॅव्हल एजंट्सना आंतरराष्ट्रीय पर्यटनविश्वाशी जोडून व्यवसायाला बळकटी देण्याच्या उद्देशाने या मीटचं पहिल्यांदा पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं, नंतर मध्य प्रदेशातील इंदूर, उत्तर प्रदेशातील लखनौ त्यानंतर संपूर्ण देशभरात अशा मीट्स आयोजित केल्या जाणार आहेत.

KapusBajarbhav / कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत सुधारणा

जागतिक पर्यटनाबद्दलची सखोल जाण असलेल्या अनुभवी कंपनीकडून एजंट्सना एक्सक्लुझिव्ह ट्रॅव्हल पॅकेजेस उपलब्ध करून देणं आणि तंत्रज्ञानातील संशोधन आणि सोयीसुविधांचा उत्तम मेळ व्यवसायात घालण्यात मदत करणं हा या मीटचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती एलपीओ हॉलिडेजचे संस्थापक आणि प्रमुख सुशील टिब्रेवाल यांनी दिली.

अमर्याद ग्रुप ट्रॅव्हल सोल्युशन्स, कम्पिटेटिव्ह प्रायझिंग याचबरोबर एक्सक्लुझिव्ह व्हाईट-लेबल संधींच्या माध्यमातून एजंट्सना त्यांच्या ब्रँडची लोकप्रियता  वाढवण्यासाठी एलपीओ हॉलिडेजशी केलेला करार उपयुक्त ठरणार आहे.

सुशील टिब्रेवाल म्हणाले, “ट्रॅव्हल इंडस्ट्रीतील अनेक वर्षांच्या अनुभवाच्या बळावर अगदी योग्य नियोजन करून ठरवलेल्या डिपार्चर आणि अरायव्हलच्या वेळा, कोणत्याही अडचणींविरहित ऑपरेशन्स देणारी कंपनी अशी ख्याती असलेली एलपीओ हॉलिडेज एजंट्सना हमी देते की, कुठलीही आंतरराष्ट्रीय पॅकेजेस शेवटच्या क्षणी रद्द होत नाहीत किंवा त्यात काहीतरी विचित्र बदलही केले जात नाहीत. एलपीओ हॉलिडेजची विश्वासार्ह सेवा आणि जादा फायदा यांच्या बळावर या मीटमध्ये सहभागी झालेले एजंट्स त्यांच्याकडची पॅकेज ऑफरिंग्ज वाढवू शकतील आणि अधिकाधिक कमाईही करू शकतील.”

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

एजंट्सना आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम पर्यटन अनुभव देण्यात मदत करण्यासाठी विश्वासार्ह व मजबूत B2B कोलॅबरेशन्सच्या माध्यमातून एलपीओ हॉलिडेज ट्रॅव्हल व्यवसायाची पारंपरिक पद्धतीच बदलू पाहत आहे. या कोलॅबरेशन्समुळे एजंट्स आणि ग्राहक दोघांनाही आंतरराष्ट्रीय प्रवास सेवा सहज उपलब्ध होतील आणि किफायतशीर होतील.

B2B:“फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, उर्वरित युरोपासह सगळ जग फिरण्याचं प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असतं आणि आम्ही ते स्वप्न वास्तवात आणतो. आमच्या एलपीओ हॉलिडेजची आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ट्रॅव्हल पॅकेजेस अनुभवल्यानंतर असंख्य भारतीय कुटुंबियांनी आणि ग्राहकांनी आनंदाची अनुभूती घेतली आहे,” असंही एलपीओ हॉलिडेजचे संस्थापक सुशील टिब्रेवाल यांनी सांगितलं.

युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव ( shivajimaharaj)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- शहरात तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली.अभिनंदन मुनोत यांचा नेतृत्वात संध्याकाळी ५ वाजता शोभायात्रा संत तुकडोजी चौक येथून भूषण कापकर (शहर प्रमुख युवासेना) यांच्या अध्यक्षतेत शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाला हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा भीषण सामना (Farmer Suicides)

कारंजा चौक, विठोबा चौक, आंबेडकर चौक, महावीर भवन चौक या प्रमुख मार्गाने शोभायात्रा निघाली!मोठ्या संख्येने युवक ,महिला यांनी भगवे फेटे बांधून सहभागी झाले होते.

युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव ( shivajimaharaj)

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Shivajimaharaj :तसेच मावळे तानाजी मालसुरे यांची तलवार, ५० पुरुष भजन हरिपाठ,शंकर आणि पार्वती नंदी वर बसून, सुंदर मनमोहक देखाव्यामुळे तसेच छावा चित्रपटातील दृश्य धुमाळ ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शोभयात्रेत आनंदमय वातावरनात शोभायात्रा समापण करण्यात आले . कार्यक्रमाचे आयोजन युवासेने कडुन करण्यात आले.

आठ महिन्यांपासून वाट पाहणारे नागरिक: नुकसानीची भरपाई केव्हा?( nanduranews)

0

 

nanduranews:ग्राम चांदुर बिस्वा येथील नागरिकांना पाऊस आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही,

ही समस्या आता आठ महिन्यांपासूनची आहे. या नागरिकांनी या संबंधात शासनाकडे विनंती पत्र सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी विनंती केली आहे.

वाळू चोरीचा धंदा जोरात; प्रशासनाची कारवाई कुठे? (revenue)

 

विनंती पत्रात नागरिकांनी चक्रीवादळामुळे झालेल्या घरांची आणि गुरांची नुकसानी भरुन काढण्यासाठी निधी मिळण्याची मागणी केली आहे.

त्यांनी या संबंधातील काही पुरावे आणि उदाहरणे देखील सादर केले आहेत. पत्रावर आठ महिन्यांपूर्वी शासनाकडे सादर करण्यात आले होते, परंतु अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

“आम्ही शासनाकडे अनेक वेळा विनंती केली आहे, परंतु अद्यापही नुकसानीची भरपाई मिळाली नाही.

ही परिस्थिती आमच्यासाठी खूप कठीण आहे,” असे एका नागरिकाने सांगितले. पत्रातील एका महत्त्वाच्या बिंदूवर प्रकाश टाकताना त्यांनी नमूद केले की, “आम्ही शासनाकडून योग्य न्याय मिळवण्याची आशा करतो.”

 

चक्रीवादळामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन खूपच अव्यवस्थित झाले आहे.

घरांची नुकसानी आणि गुरांची हानी यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. या नुकसानीची भरपाई मिळणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे त्यांना पुन्हा स्थिरता मिळेल.

शासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही, परंतु नागरिकांना आशा आहे की लवकरच त्यांची मागणी पूर्ण होईल.

nanduranews:त्यासाठी ते पुढील काही दिवसांत शासनाशी बैठक घेण्याचा विचार करत आहेत. या बैठकीत ते पुन्हा एकदा आपली मागणी मांडतील आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतील.