Home Blog Page 472

शेतकऱ्यांना हेक्टरी 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यासाठी भाजपची तहसीलदार सेलू यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

0

 

अजहर पठाण सेलू परभणी

भारतीय जनता किसान मोर्चा सेलूच्या वतीनेकरण्यात आली
*सेलू* तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक व शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अतिशय बेचैन झालेला आहे. शासनाने जाहीर केलेले निर्णय शासन क्रिकेट मधील खेळा प्रमाणे निकाल वेळोवेळी बदलत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी व जे शेतकरी नियमितक र्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम 50,000/- जाहीर करून त्यासंदर्भात देण्याचा निर्णय घेतला होता परंतु अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत आणि प्रोत्साहन रक्कम तर कोणत्याही शेतकऱ्याला जमा करण्यात आली नाही. शेतकऱ्यांचे पुनर्गठन करून त्यांना पेरणीच्या अगोदर पीककर्ज वाटप करण्यात यावे. अशा महत्त्वाकांक्षी बाबींचा तात्काळ आदेश देऊन कार्यवाही करण्यात यावी.
अशी मागणी दगडोबा जोगदंड पाटिल तालुकाध्यक्ष भारतीय जनता किसान मोर्चा सेलू, महादेव गायके जिल्हा कोषाध्यक्ष परभणी ग्रामीण भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य, शिवहारी शेवाळे तालुकाध्यक्ष भाजप युवा मोर्चा सेलू, जयसिंग शेळके पाटिल, आदींनी निवेदन देऊन तहसीलदार सेलू यांच्याकडे मागणी केली आहे.

छ्त्रपती शिव शाहू महाराज सामाजिक संघटना सोलापूर जिल्हा सांस्कृतिक तथा साहित्य विभाग प्रमुख म्हणून कवी तुषार गुळीग यांची निवड

0

 

नेहमीच सामजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात असणाऱ्या गौडवाडी गावातील मधील प्रसिद्ध लेखक तथा युवा कवी व पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजि या कॉलेज चे विद्यार्थी युवा कवी.तुषार गुळीग यांची संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश तळेकर व राज्य सचिव अविनाश गिरे यांनी सोलापूर जिल्हा सांस्कृतिक विभाग तथा साहित्य विभाग प्रमुख पदी निवड केली.

तुषार गुळीग हे उत्तम वास्तववादी कवी व लेखक आहेत सोबतच ते सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात,सध्या ते संगणक अभियांत्रिकी (माहिती तंत्रज्ञान) या विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत,त्यांच्या या निवडीबद्दल संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संग्राम सलगर,गणेश आवताडे,अजित चव्हाण,आकाश कोल्हे,सुहास गाडे,केशव नाचविणेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.तसेच सर्व गौडवाडी ग्रामस्तानी अभिनंदन केले आणि सांगोला तालुक्यातील सर्व स्तरावरून त्याच कौतुक होत आहे.

वडनेर येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरु करा सौ कविता वानखेडे सरपंचा यांची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

वडनेर दि.३ मे
तालुक्यातील वडनेर येथे ग्रामीण रुग्णालय असून सभोवतालच्या ४४ गावांचा येथे संबंध येतो. वडनेर गाव राष्ट्रीय महामार्ग ७ वर असून या गावात बँका, पोलिस स्टेशन तसेच विविध महाविद्यालये बाजारपेठ असून परिसरातील ४४ गावांच्या नागरिकांची देवाण-घेवाण होत असल्याने वडनेर हे मोठे केंद्र ठरले आहे. शासनाने सद्यस्थितीत वडनेर येथे लसीकरण केंद्र दिलेले नसल्याने फक्त हिंगणघाट येथेच लसीकरण केंद्र दिलेले आहे परंतु वडनेर परिसरातील गावाच्या आजूबाजूला असलेल्या खेड्यातील नागरिकांना हिंगणघाट येथे लस घेण्याकरिता अंदाजे ३० ते ४० किलोमीटर अंतर जावे लागते, सद्यस्थितीमध्ये बसेसची व्यवस्था नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर यांना हिंगणघाट येथे लस घेणे शक्य नाही.तसेच वडनेर येथे ग्रामीण रुग्णालय असल्याने व या गावाच्या आजूबाजूला असलेल्या गावाचा संबंध येत असल्याने ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे
कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करावे,अशी मागणी सरपंचा सौ.कविता वानखेड़े यांनी वर्धा जिल्हा पालकमंत्री ना.सुनील केदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

थोरगव्हाणगावात एका तरुण शेतकऱ्याने केली आपल्याच शेतबांधावर गळफास घेवुन आत्महत्या

0

 

यावल तालुका( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील थोरगव्हाण येथील राहणाऱ्या एका तरुण शेतकऱ्याने आपल्याच शेतात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली असुन, शेतकऱ्याच्या अशा प्रकारे झालेल्या मृत्युमुळे गावात व परिसरातील गावात एकच शोककळा पसरली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , भानुदास मंगल चौधरी वय३८ वर्ष शेतकरी यांनी दिनांक २ में रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मनवेल शिवारातील त्यांच्या शे,ताच्या भा बांधावरील झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्मह्त्या केल्याची घटना घडली असुन , या बाबत मयताचे चुलत भाऊ अतुल गोपाळ चौधरी यांनी पोलीसात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत असुन , मयत भानुदास चौधरी यांचे मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी शवविच्छेदन केले असुन , चौधरी यांनी आत्महत्या का केली हे मात्र समजु शकले नाही .

लॉकडाऊनच्या काळात महानगर पालिके च्या अपंग पुनर्वसन 5%निधी मधून आर्थिक अर्थ साहयता देण्याची घोषणा करण्यात यावी.

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अन्वर शाह (शहराध्यक्ष) अपंग जनता दल यांची मागणी.

अमरावती:-अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून संपूर्ण महाराष्टात अपंगाच्या न्याय व हक्का साठी सतत लढा देत असुन अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात शासन व प्रशासनाकडून कशी मदत अपंगांना मिळेल असे कार्य सुरू होते.
कोरोना विषाणु माहामारी मुळे अमरावती शहरातील अपंगांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.लॉकडाऊनच्या काळात अमरावती शहरामध्ये रोजगार ठप्प झाले असुन अपंगांना जीवन जगणे व पोट भरणे कठीण झाले आहे.
अमरावती महानगर पालिकेत जमा असलेला अपंग पुनर्वसन 5% निधी मधून अमरावती शहरातील अर्थ साहयता करावी जेणेकरून अपंगांना या कठीण परिस्थितीमध्ये जीवन जगणे व पोट भरणे सोपे होईल.
असे निवेदन अमरावती महानगर पालिका आयुक्त यांना अपंग जनता दल (सामाजिक संघटन) शहर अमरावती च्या वतीने देण्यात आले.
यावेळी अन्वर शाह (शहराध्यक्ष)मयूर मेश्राम, प्रदीप रघूते,शिवदास उईके, शेख रूस्तम,नासिर बेग,मो. राजिक, फारूक शाह,मो.इलियास,शेख मजीद, राजिक शाह उर्फ राजु हे प्रामुख्याने उपस्थित होते.

लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर नांदुरा येथील ‘ग्रुप युवा’ च्या वतीने रक्तदान शिबिर यशस्वीपणे संपन्न

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वांत मोठा दानधर्म म्हणजे रक्तदान होय. आजच्या धावपळीच्या काळामध्ये जीवनात कधी काय होईल याची श्वाश्वती देता येत नाही. विविध केसेसमध्ये रुग्णांना रक्त चढवावं लागतं. काही रुग्णांचा वेळीच रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूही होतो. तसेच पुढे कोरोना लसीकरणाची पार्श्वभूमी लक्षात घेता रक्ताचा तुटवडा जाणवु शकतो हा दूरदृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवुन नांदुरा येथील ग्रुप युवा च्या वतीने आज रविवार, दि. ०२/०५/२०२१ रोजी नांदुरा अर्बन बँक सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आज कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुद्धा रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. तसेच येत्या काही दिवसातच १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण कार्यक्रमाला सुरुवात होत असून लसीकरणानंतर नागरिकांना ६० दिवस रक्तदान करता येणार नाही. या परिस्थितीतून सावरण्यासाठी व सामाजिक जबाबदारी म्हणून एक पाऊल ग्रुप युवा या नांदुरा शहरातील तरुणांच्या ग्रुपने या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून उचलले. ग्रुप युवा च्या या आवाहनाला प्रतिसाद देत व रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या उक्तीनुसार या शिबिराला नांदुरा शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी अत्यंत उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला. आज त्यापैकी १०० व्यक्तींनी रक्तदान केले असून उर्वरित व्यक्तींचे रक्तसंकलन हे पुढील रक्तदार शिबिरात करण्याचा संकल्प ग्रुप युवाच्या वतीने यावेळी करण्यात आला. या शिबिरामध्ये रक्तसंकलन डॉ. हेडगेवार रक्तपेढी, अकोला यांच्याकडून करण्यात आले. काळाची गरज ओळखून रक्तदात्यांनी रक्तदान करून दाखविलेल्या या समाजऋणाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. आयोजक ग्रुप युवा च्या वतीने रक्तदात्यांना सन्मानपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. सदर रक्तदान शिबिर हे विशेष डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने व सर्व प्रतिबंधनात्मक उपाययोजनांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून यशस्वीरीत्या संपन्न झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्व. दिलीपजी वखरे स्मृती प्रित्यर्थ रक्तदान यज्ञ

0

 

सचिन वाघे वर्धा

समुद्रपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समुद्रपूर तालुक्याचे मा. संघचालक स्वर्गीय दिलीप मोरेश्वर उपाख्य नानाजी वखरे यांचे 29 एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेवा विभाग समुद्रपूर तालुका द्वारा आयोजित रक्तदान यज्ञ घेण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत जाम चे सरपंच श्री. सचिनजी गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान यज्ञामध्ये एकूण 51 रक्तदात्यांनी आपली समिधा अर्पण केली. यज्ञानंतर मा. नानाजीना उपस्थित सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी तालुका कार्यवाह श्री. रविजी गाठे, श्री. फकीरा खडसे, पी व्ही टेक्सटाइल जाम चे महाव्यवस्थापक व संघाचे जेष्ठ स्वयंसेवक मा. श्री. भुपेंद्रजी शहाणे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत जाम चे उपसरपंच श्री. अजय खेडेकर, संघाचे जिल्हा सदभावना प्रमुख श्री. कमलाकरजी भुरे, युवासेनेचे श्री. पंकज लाटकर या सर्व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सुरेश डरे, प्रशांत कोटमकर, किशोर गिरडकर, गौरव कुलकर्णी, नामदेव चंदनखेडे, अनिल दोडेवार, गजानन रोकडे, रजत भुरे, प्रशांत चंदनखेडे, अजय भुरे, कुणाल वरघणे, कुंदन वरघणे, सचिन कामडी, हिमांशू वरघणे, शुभम, अवघडे, आशिष येकोणकर, संकेत भोयर, नरेंद्रजी खेरडे, सुधाकर वरघणे, मिलिंदजी वैद्य व अन्य संघटनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला हॉटेल अशोका, जाम व जीवन ज्योती ब्लड बँक, नागपुर यांचे सहकार्य लाभले.

जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मिती व पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण बनवावे – पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

0

 

अजहर शाह मोताळा

• रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी
• किरकोळ व घाऊक विक्रेत्यांकडे आलेल्या रेमडेसिवीर औषधांची तपासणी करावी
• लसींसाठी पाठपुरावा करीत लसीकरणाचा वेग वाढवावा

बुलडाणा:-दि.2मे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा वेग जास्त आहे. त्यामुळे क्रियाशील रूग्णांचे प्रमाणही वाढले आहे. क्रियाशील रूग्णांपैकी ऑक्सिजनची गरज असणारे रूग्णही वाढले आहे. परिणामी जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी वाढती असून मागणी व पुरवठ्याचे प्रमाण सम राखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यंत्रणांनी ऑक्सिजन निर्मिती प्लँट तातडीने सुरू करून जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मिती व पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण बनवावे. अन्य जिल्ह्यातून ऑक्सिजन मागण्याची वेळ येवू देवू नये, अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिल्या.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात 1 मे रोजी कोविड संसर्ग नियंत्रण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प अध्यक्ष मनीषा पवार, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे आदी उपस्थित होते.
रेमडेसिवीर औषधांचे वितरण आता जिल्हाधिकारी कार्यालयातून रूग्णालयांना होत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांचा शोध घ्यावा. काळाबाजार करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करावी. रेमडेसिवीर औषधांच्या रिकाम्या कुप्यांची योग्य विल्हेवाट लावावी. इंजेक्शन दिलेल्या रूग्णांचे नाव, हॉस्पीटलचे नाव आदींचे रेकॉर्ड ठेवावे. जेणेकरून काळाबाजार होणार नाही. रेमडेसिवीर वितरण करताना रूग्णालयातील बेडची संख्या गृहीत धरावी. घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडे रेमडेसिवीर औषध येत असल्यास त्याची तपासणी करावी. औषधाचा अपव्यय होवू देवू नये. घाऊक विक्रेत्यांना रेमडेसिवीर देण्यासाठी कंपन्यांशी चर्चा करू.
हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लँट तातडीने सुरू करणेबाबत सूचना करीत पालकमंत्री म्हणाले ऑक्सिजन पुरवठा वेळेवर व सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करावी. पुरवठ्यामध्ये अडचणी असू नये. लिक्वीड ऑक्सिजन टँकमधून ड्युरा व जम्बो सिलेंडर भरण्यासाची सुविधा सुरू करावी. त्यामुळे बुलडाणा येथेच ऑक्सिजन भरला जाईल. तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्यात यावे. जळगांव जामोद येथील कोविड हॉस्पीटल तातडीने सुरू करावे. त्या भागातील रूग्णांना तेथेच उपचार मिळतील. ऑक्सिजन व फायर संबंधाने जिल्हयातील सर्व खाजगी व शासकीय रूग्णालयांचे ऑडीट सुरू असल्यास ते पुर्ण करावे. ऑडीटमधून काही कमतरता समोर आल्यास त्या तातडीने दूर कराव्यात. ऑक्सिजन खुप मौल्यवान त्याची बचत करावी. कुठेही ऑक्सिजन पाईप लाईनला गळती असता कमा नये. खाजगी रूग्णालयांकडून ऑक्सिजनबाबत व फायर ऑडीट झाल्याबाबत प्रमाणित करून घ्यावे. हिवरा आश्रम येथील ग्रामीण रूग्णालय लवकरात लवकर सुरू करावे.
ते पुढे म्हणाले, 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाबाबत काही विशेष योजना आखावी. जेणेकरून लसीकरण वेगाने पूर्ण होईल. लसीकरणाचा वेग वाढवावा, 18 वयाच्या पुढे जिल्ह्यातील 21 लक्ष लाभार्थ्यांना लसीकरण करावयाचे आहे. एकूण लोकसंख्येच्या 72.4 टक्के नागरिक लसीकरणाच्या टप्प्यात घ्यावयाचे आहे. त्यादृष्टीने यंत्रणांनी नियोजन करावे. जिल्हयातील सर्व नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्रात विद्युत दाहीनीचा प्रस्ताव सादर करावा. सर्व नगर पालिकांना विद्युत दाहीनी देण्यात येईल. कोविड हॉस्पीटल, कोविड केअर सेंटर येथे भोजन पुरविणाऱ्या कंत्राटदारांचे देयक अदा करावे. ऑक्सिजनचे देयकही अदा करून ॲडव्हान्स द्यायचे असल्यास तर देवून टाकावे. भोजनचा दर्जा चांगला ठेवावा. रूग्णांच्या याबाबत तक्रारी यायला नको. जिल्ह्यातील बेडची उपलब्धता, रिक्त बेड प्रकारानुसार दाखविणारी एखादी वेबलिंक किंवा डॅश बोर्ड तयार करावा. जेणेकरून नागरिकांना बेडची परिस्थिती लक्षात येईल. रूग्णालयाबाहेरही अशाप्रकारचा डॅश बोर्ड कार्यान्वीत करावा. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे, अति. जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसलिदार उपस्थित होते.
जिल्ह्यातील उपलब्ध बेड व सद्यस्थिती : शासकीय व खाजगी रूग्णालयातील एकूण बेड 5014. यामध्ये आयसीयु 526, वेंटीलेटर 113, ऑक्सिजन बेड 1554, सामान्य बेड 2934.

कोळवद येथे आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्रात कोवीड१९च्या लसीकरणास प्रारंभ

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

ग्रामीण पातळीवर कोरोनाचा संसर्गा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य यंत्रणाही अधिक सर्तक व सज्ज झाली असुन , या दृष्टीकोणातुन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासीम अंतर्गत येणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्र कोळवद येथे उपकेंद्र स्थरावर कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरणास आज प्रारंभ करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सविता अतुल भालेराव, सरपंच याकुब तडवी, उपसरपंच शशिकांत चौधरी, सामाजीक कार्यकर्ते अतुल भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी, ग्राम पंचायत सदस्य अनिल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, फत्तू तडवी आदि उपस्थित होते.
प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन , वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लसीकरण मोहीम तालुक्यातील विविध आरोग्य उपकेन्द्रांवर राबवण्यात आली असुन.
यावेळी ४५ वर्षावरील ३० नागरिकांना कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले.
कोळवद व सातोद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.साजिद तडवी , डॉ.राहुल गजरे ,आरोग्यसेविका मेहमूदा तडवी, आरोग्यसेवक भुषण पाटील, आशा सेविका छाया वाघुळदे ,उषा कोळी ,सरला गुंजाळ व सायरा तडवी यांनी यशस्वीरित्या नियोजन करून कोवीड लसीकरण कार्यक्रम राबविला जात आहे.

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संघाच्या राज्य प्रभारी अध्यक्षपदी जे के पाटील यांची निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राज्य मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघा महामंडळच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्षपदी जे के पाटील यांची निवड करण्यात आली आहे . या संदर्भात दिनांक १ मे २०२१रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संघाच्या राज्य कार्यकारणीची सभा ऑनलाईन पार पडली , या सभेत सर्व सभासदांनी महामंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा मख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष जे के पाटील यांची महामंडळाच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .जे के पाटील यांनी महामंडळासाठी केलेल्या आपल्या भरीव कामगीरी व योगदान पाहता त्यांची महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे . जे के पाटील यांची राज्य कार्यकारणीवर निवडीमुळे जळगाव जिल्ह्यच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला . या पदाला न्याय देणार असं व्याक्तीमत्व म्हणुन पाटील यांची संपुर्ण महाराष्ट्र राज्यात आहे . त्यांच्या निवडी बद्दल डॉ . सुरेश पाटील खानापुर यांच्यासह आदींनी त्यांचे स्वागत करून अभीनंदन केले आहे .