Home Blog Page 473

१८+ वयोगटातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन पातळीवर लसीकरण करा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

राज्यात १८+ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करणे राज्यसरकारने बंधनकारक केले आहे. पण यावल तालुक्यात व जिल्ह्य़ात लसीकरण हे अतिशय संत गतीने केले जात असुन नागरीकांनमध्ये लसी संबधी गोधंळ निर्मान झाला आहे.
लसीकरण करण्यासाठी Co-win या बेब साईट वर नोदंनी करून अपॉइण्टमेण्ट घेणे बंधनकारक केले आहे पंरतु लसी अभावी १८+ नागरिकांना नोंदणी नंतर अपॉइण्टमेण्ट भेटत नसल्याचे दिसून येत आहे म्हणून लसीची संख्या वाढवून लसीकरण हे महाविद्यालयीन पातळीवर राबवीले जावे जेणे करुन आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होवुन लसीकरण हे जलद गतीने करणे सोपे जाईल.
कोरोना विषाणुसंसर्गाच्या सातत्याने वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर १८+ नागरिकांमध्ये विद्यार्थ्यी संख्या जास्त आहे म्हणून विद्यार्थ्यांना सरळ महाविद्यालयामध्ये लस दिली तर लसीकरणाला गतीमीळेल त्यासाठी १८+ विद्यार्थ्यांचे लसीकरण महाविद्यालयीन पातळीवर केले जावे अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थ्यी कॉंग्रेसचे यावल तालुकाअध्यक्ष राकेश सोनार यांनी नायब तहसीलदार आर डी पाटील यांच्या कडे दिले आहे या प्रसंगी सोबत कार्यअध्यक्ष महेंद्र तायडे, जय अडकमोल उपस्थित होते.

न प जळगांव जामोद चे प्रशासन संवेदनशुन्य : नगरसेवक श्रीकृष्ण केदार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगांव जामोद:-आज दिनांक 12 मे 2021 रोजी जळगांव जामोद शहरातील विविध समस्या विषयी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश उमरकर,पंचायत समितीचे माजी सभापती प्रविण भोपळे, नगरसेवक ऍड संदीप मानकर यांच्या उपस्थितीत तसेच न प गटनेता अर्जुन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांनी विविध प्रकारच्या समस्या विषयी निवेदन दिले. त्यामध्ये पुढीलप्रमाणे समस्या न प प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
जळगांव जामोद शहरात व परिसरात सॅनिटायजर फवारणी करण्याबाबत अनेक वेळा तक्रारी देऊन सुद्धा अद्यापपर्यंत सार्वत्रिक फवारणी करण्यात आली नाही.
शहरातील व्यापारी,गोरगरीब व सर्वसामान्य नागरिक यांच्या समस्या सोडवण्याच्या बाबतीत न प जळगांव जामोद चे प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे.
अग्निशमन ,साफसफाई तसेच ईतर अत्यावश्यक व जोखमीच्या विभागात सेवा देणारे कायमस्वरूपी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पुरेसे विमा संरक्षण व कोरोना प्रतिबंधक साहित्य देण्याविषयी मागील वर्षी तक्रार दिली असूनही त्याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेण्याची संवेदनशीलता न प शासन व प्रशासनाने दाखवली नाही.
न प मलकापूर ने मागील दिवसात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मच्याऱ्यांचा सत्कार केला व त्यांना मानसिक बळ दिले,असे कार्य करण्याची सद्बुद्धी न प प्रशासन जळगांव जामोद ला केव्हा येईल?
न प प्रशासनाच्या असंवेदनशील व गलथान कारभारामुळे काही न प कर्मचारी तसेच पुष्कळ नागरिक गतप्राण झाले. त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला परन्तु त्याच्याविषयी सहानुभूती या निगरकट्ट प्रशासनाने दाखवली नाही.
न प मार्फत केवळ शहरात दर्जाहीन व थातुरमातुर बांधकामे सुरु ठेवण्याचे काम होतांना दिसत आहेत .त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही.त्या ठिकाणी विकास कामाविषयीचे फलक लावलेले आढळत नाहीत.
तसेच न प च्या व जळगांव जामोद शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने नगरसेवकांनी म्हणजेच लोकप्रतिनिधी यांनी न प च्या अधिकारी व कर्मचारी यांना विचारणा केली असता अत्यंत पोरकट व उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळकाढूपणा न प प्रशासनाकडून करण्यात केला जातो. मा नगराध्यक्षा यांचे प्रशासनावर अजिबात नियंत्रण नसुन,लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांना न प प्रशासन अजिबात जुमानत नाही हा एकप्रकारे शहरातील जनतेचा अपमान आहे.केवळ काही विशिष्ट व्यक्ती व अधिकारी यांच्या मर्जीनुसार न प चा अंदाधुंद व गचाळ कारभार सुरू आहे.
आता तरी न प प्रशासन व सत्ताधारी यांचे डोळे उघडतील का?शहरात आरोग्याच्या सुविधे अभावी आणखी किती बळी घेतले जातील?असे प्रश्न शहरवासीयांना पडत आहेत.
अश्याप्रकारे निवेदन देऊन भा रा काँग्रेस व महाविकास आघाडीच्या वतीने न प प्रशासनाच्या अंदाधुंद, गलथान व भ्रष्टाचारी कारभाराचा निषेध उपस्थितांमार्फत नोंदविण्यात आला.

शेतातील चोरीस गेलेला 150 किलो लसुन आरोपीसह पोलिसांचे ताब्यात..

0

 

सचिन वाघे वर्धा

12.5.21
हिंगणघाट
तक्रारकर्ता देवानंद मोहारे यांचे शेतातील बंडयाचे कुलुप तोडुन लसणाचे दिडशे किलो वजनाचे 5 कट्टे अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याबाबतची तक्रार प्राप्त झाल्याने फिर्यादीचे तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी अपराध क्र. 0442/2021 कलम 461, 380 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हा दाखल होताच हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथकाने लगतचे परिसरात माहीती घेत अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेतला असता, सदर गुन्हयातील चोरून नेलेले लसणाचे बाजार भावाप्रमाणे अंदाजे 15 हजार रुपये किमतीचे कट्टे हे भिमनगर वार्ड येथील अमोल यादवराव वडे (33)याने चोरी केल्याचा सशंय असल्याने त्यास ताब्यात घेतले.
कसुन चौकशी केली असता आरोपी नामे अमोल यादवराव वडे (33) याने सांगितले कि, सदरचे लसणाचे कट्टे त्यानेच चोरले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीचे घरी जावुन त्याचे ताब्यातुन सदरचे लसणाचे 5 पोते एकुण 150 किलो माल जप्त करण्यात आला.
सदरची कामगीरी प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार संपत चव्हाण,पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या नविन उपकेंद्राचे इमारती वैद्यकीय अधिकारी विना बेवारस

0

 

हंसराज उके अमरावती

अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाने लाखो रुपये खर्च करून ग्रामीण भागातील खेडेगावात नविन उपकेंद्राच्या इमारती उभ्या झालेल्या असुन गेले त्या उपकेंद्रामधे वैद्यकीय अधिकारी,स्टाॅप नर्स, व इतर कर्मचारी नसुन कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकां मधे
चर्चा होत आहे.आज कोरोणाच्या
काळात या उपकेंद्राच्या इमारती उपयोग काय ? असा प्रश्न जनसामान्य नागरिका पुढे उभा आहे.कोरोणा महामारिच्या जिव घेण्यात बिमारीत होत नसेल तर
या भव्यदिव्य बांधण्यात आलेल्या
उपकेंद्राच्या इमारतीचा उपयोगच
काय?अशी चर्चा जनसामान्य नागरिका मधे होत असल्याचे दिसुन येत आहे आज जर या उप केंद्रात जर आरोग्य योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या आरोग्याला पोषक योजनेचा लाभ घेता आला असता
तसे न होता ग्रामीण भागातील खेडेगावातील सर्वसामान्य नागरिक हा शहरातील खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेण्यासाठी जावं लागलं आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरातील पैसा या दवाखान्यात जातं आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अर्थीक प्रश्र्न उभा राहिला आहे व गेले दिड वर्षांपासून कोरोणा सारख्या महाभयंकर बिमारी मुळें रोजगार गेले शासन एकीकडे अनेक योजना राबविण्यात पण या मुठ योजना सर्वसामान्यांसाठी पर्यंत पोहोचत आहे की नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अर्थीक मदतीची आज तरी गरज आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला या आर्थिक योगदान होईल तरी शासनाने ग्रामीण भागात लक्ष देण्याची गरज आहे.

हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड्सची व्यवस्था न झाल्यास प्रहार पद्धतीने तीव्र आंदोलन करण्याचा रुग्णमित्र गजू कुबडे यांचा इशारा

0

 

सचिन वाघे वर्धा

12.5.21
. हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात 200 ऑक्सिजनयुक्त बेड्सची व्यवस्था वाढत्या कोविड रुग्ण संख्येमुळे करण्यात यावी जर या भागातील जनतेची ही न्यायोचित मागणी मान्य न झाल्यास प्रहारच्या स्टाईलने कोणत्याही क्षणी उग्र आंदोलन करण्यात येईल व त्याची जबाबदारी ही जिल्हा प्रशासनाची असेल असा खणखणीत इशारा प्रहारचे पूर्व विदर्भ प्रमुख रुग्णमित्र गजू कुबडे यांनी दि 12 मेला जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.
या बाबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांना दिलेल्या निवेदनातून दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी दि.19 एप्रिल व 22 एप्रिलला २०० बेड्सच्या निर्मितीसाठी निवेदन सादर केले होते.निवेदनातून दिलेल्या इशाऱ्यानुसार श्री कुबडे यांनी दि 26 एप्रिलला कोविड संदर्भातील शासकीय नियमांचे पूर्ण पालन करून स्वतःच्या घराच्या छतावर बसून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणाची सांगता करण्या पूर्वी सायंकाळी 6 वाजता येथील उपविभागीय अधिकारी श्री खंडाईत यांनी व्हिडीओ कॉल करून श्री कुबडे यांच्याशी चर्चा केली व या मागणी साठी थोडा अवधी देण्याची विनंती केली होती.त्यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून येथील ठाणेदार श्री संपतजी चव्हाण यांनी प्रत्यक्ष गजू कुबडे यांचे घरी येऊन उपोषण सोडविले होते.
वरिष्ठ अधिकारी यांच्या विनंतीनुसार त्यावेळी आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते.परंतु सदरची मागणी ही येथील सर्वहारा,गोरगरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे.त्यामुळे त्यांनी सातत्याने 200 बेड्सची मागणी लावून धरलेली आहे. याबाबतीत सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन ही मागणी मंजूर करावी अशी श्री कुबडे यांनी कळकळीची विनंती आहे.
जर ही न्यायोचित मागणी येत्या आठ दिवसात मान्य न झाल्यास प्रहारच्या स्टाईलने कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळेला जिल्ह्यातील /तालुक्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींच्या घरा समोर तीव्र आंदोलन छेडील व त्याची संपूर्ण जबाबदारी ही आपल्या प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असा इशारा निवेदनातून देण्यात आलेला आहे.सदर निवेदन देतेवेळी कुबडे यांचे सोबत प्रशांत आवारी,मोहन पेरकुंडे उपस्थित होते.

राज्यातील पत्रकारांना तातडीने लस देण्यात येण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

0

 

 

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण करणे गरजेचे

अजहर शाह बुलढाणा

बुलढाणा:-राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 10 मे पासून ते 20 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील सर्व नागरिकांच्या संपूर्ण लसीकरणावरही राज्य सरकार आणि आणि केंद्र सरकारकडून भर दिला जात आहे. आपण ज्या पद्धतीने सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक यांना प्राधान्यांने लस दिली आहे. त्याच पद्धतीने राज्यातील प्रत्येक घडामोडी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मेहनत घेणाऱ्या पत्रकारांना देखील लस देण्यात यावी अशी मागणी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे….

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या शोधात संपुर्ण राज्यभर फिरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची कोविड-१९ त्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमांद्वारे शासनास अवगत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनीधी यांना फ्रंटलाईन वर्कर्स चा दर्जा देवून त्यांचे लसीकरण करणे आवश्यक आहे त्यामुळे राज्यातील सर्व पत्रकारांचे लसीकरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा….

महाराष्ट्राने कोरोनाच्या लढाईत अनेक महत्वाचे निर्णय घेत कोरोनाला अटकाव करण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहे. सततच्या वाढणाऱ्या कोरोना रूग्णांच्या संख्सेत घट व्हावी यासाठी आपण लसीकरणावर जोर दिला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आपण प्राधान्याने लस दिली तशीच आता पत्रकारांना देखील तातडीने लस देणे गरजेचे आहे. देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेत पत्रकारांना लस दिली आहे त्यामुळे आपण देखील आपल्या राज्यातील पत्रकार व वृत्तवाहिन्याचे प्रतिनीधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देण्यात यावी अशी विनंती देखील केली आहे.

बाळापुर तालुक्यातील लोहारा येथे पोलिसांचे पथसंचलन

0

 

:-बाळापूर तालुक्यातील लोहारा येथे रमजान ईद निमित्त उरळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे रोजी पथसंचलन करण्यात आले

बालापुर तालुक्यातील लोहारा येथे रमजान ईद निमित्त मंगळवारी उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून पथसंचलन करण्यात आले ग्रामपंचायत पासून सुरू करण्यात आलेल्या पथसंचलन गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आले यावेळी उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार वडतकार यांनी देशावरील कोरोनाचे संकट पाहता रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक मोरे, बिट जमादार राजाभाऊ बचे,पो.हे.काॅ जे एस सिंगारे, पो. काॅ ज्ञानेश्वर फाळके, शैलेश घुंगे,मेहेंगे आदी उरळ पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते

सुर्या न्यूज महाराष्ट्र ब्युरो चिफ हिंम्मतराव तायडे लोहारा

गडचिरोली जिल्यातील मुलचेरा तालुक्यातील ग्रामपंचायत अडपल्ली,कालीनगर येथील सन २०१६-२०२१ या वित्तीय वर्षातील ठक्कर बाप्पा योजनेच्या कामात भ्रष्टाचार- जिल्हाध्यक्ष प्रा अशोक लांजेवार यांची चौकशी करण्याची CEO कडे मागणी.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

गडचिरोली:-महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम,नक्षल ग्रस्त, आदिवासी जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.हा जिल्हा अतिमागास असल्याने केंद्र व महाराष्ट्र शासनाने सन २०१६ ते २०२५ पर्यंत जिल्हा परीषदेच्या प्राप्त लेखाशिर्षाकानुसार ठक्कर बापा,बिआरजीएफ, मनरेगा, १३, १४, १५ व वित्त आयोग, नक्षल योजना जिल्हा वार्षिक योजना, २५१५३०५४ इत्यादी योजनेमध्ये करोडो रुपयेचा निधी प्राप्त झाला.मात्र मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली, कालीनगर या ग्राम पंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी यांनी सदर निधीच्या वापरात करोडो रुपयेचा भ्रष्टाचार करून शासनाच्या नियमांना धाब्यावर बसविले व सदर निधीचा विल्लेवाट लावलेला आहे.या संपूर्ण कामात प्रचंड गैरव्यवहार तथा भ्रष्टाचार झालेला आहे.
चौकशी करताना सर्व योजनांच्या मोजमाप पुस्तिका मधील काम केलेल्या कामाचे स्तळ दर्शविलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष मोका चौकशी करून तसेच झालेल्या खर्चाची देयके आणि कामावर असलेल्या मजुराचे हजेरी पट तपासण्यात यावे अशी मागणी लेखी तक्रार जिल्हाध्यक्ष प्रा अशोक लांजेवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे. कामात गैरव्यवहार,भ्रष्टाचार झालेला असून एकाच कामाचे स्तळ अनेक योजनेमध्ये दाखवून शासकीय निधीचा परस्पर अपहर केलेला आहे. यामध्ये ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी,शाखा अभियंता जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.

उपजिल्हा रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने 8 महिन्याच्या गरोदर महिलेचा बाळासह मृत्यू

0

 

सचिन वाघे वर्धा
11.5.21 हिंगणघाट:- वासी येथे राहणारी सौ रुपाली लहू पर्बत वय 20 वर्षे या 8 महिन्याच्या गरोदर विवाहित महिलेला पोटात दुःखत असल्या कारणाने अत्यवस्थ अवस्थेत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आणले असता उपस्थित डॉक्टरांनी रुग्णालयांत सद्या कोविड रूग्ण असल्याने गायनिक वॉर्ड बंद असल्याचे सांगून खाजगी रुग्णालयांत जाण्यास सांगितले. या दरम्यान खाजगी रुग्णालयांत गेल्यानंतर त्यांना सेवाग्राम येथे जाण्याचा खाजगी डॉक्टरांनी सल्ला दिला. म्हणून पुन्हा रूपाली हिला उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले तेव्हा तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांने अर्धा तास थांबायला सांगितले दरम्यान ती बेशुद्ध पडली.ताबडतोब वैदयकीय उपचार न मिळाल्याने सादर महिलेचा मृत्यू झाला. सदर विवाहित महिलेचे मागच्या वर्षी लग्न झाले होते. वासी या ठिकाणी आठव्या महिन्यांपर्यतचा तिचा उपचार प्राथमिक आरोग्य केंद्र वासी येथे सुरू होता 9 महिना सुरू होणार आहे सोनोग्राफी करून घ्या या सूचनेनुसार हिंगणघाट येथे माहेरी पोहचवण्यात आले. घरी तिची प्रकृती अस्वस्थ झाल्याने तिला दवाखान्यात आणले होते . वरील गरोदर महिलेचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणावरून झाला हे मात्र समजू शकले नाही. मात्र सोमवारला शवविच्छेदन केल्यावर महिलेचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. योग्य उपचार मिळाला असता तर तिचे व बाळाचे प्राण वाचविता आले असते.
8 महिन्याच्या गरोदर महिलेचा याप्रकारे मृत्यू झाल्याने वाशी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांनी वाशी येथे जाऊन सदर महिलेच्या सासरी भेट दिली असता तिच्या सासरच्यांनी सांगितले की ती हिंगणघाट ला तिच्या आईकडे सोनोग्राफी करिता गेली होती. वास्तविकता जाणून घेण्यासाठी अनिल जवादे आपल्या सहकाऱ्यांसोबत पुरपीडित कॉलनी शुक्रवार बाजार येथे पोहोचले परंतु मृतक मुलीची आई एकटीच घरी असल्याने व तब्येत बरोबर नसल्यामुळे ती नांदगाव येथील तिच्या बहिणीकडे होती. त्या ठिकाणी मृतक गरोदर महिलेच्या आईने सर्व आपबीती जवादे यांना सांगितली. मृत महिलेच्या आई जवळ पैसे नसल्याने मृत महिलेची मावशी ज्या मालकाकडे मोलकरीण म्हणून काम करत होती त्या मालकाला 5 हजार रुपये उसने मागून तिच्या बहीणलेकीचा इलाज करण्याचा प्रयत्न केला परंतु ती आपल्या बहिणी लेकीचा व तिच्या पोटात असणाऱ्या बाळाचा जीव वाचवू शकली नाही .हिंगणघाट शहरात गरिबांना योग्य इलाज मिळू शकत नाही कोरोना च्या नावाखाली अशा गरीब गरोदर महिलांचे प्राण वाचवू शकत नसेल तर जिल्हा रुग्णालय प्रशासन शेवटी फक्त धनदांडग्या लोकांकरिता आहे की गरिबांचाही विचार प्रशासन करणार आहे की नाही असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यासंदर्भात उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील डॉक्टर यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की कोरोना मुळे दवाखाण्यातील इतर ओपीडी बंद करण्यात आलेल्या आहे त्यामुळे इतर आजराचे पेशंट घेणे बंद आहे. असा निर्णय कोणाच्या परवानगीने घेतला हे मात्र कळू शकले नाही. हा निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घेतला की कोरोना महामारीमुळे सर्व अधिकार उपविभागीय अधिकारी यांना असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. असा निर्णय घेताना इतर आजारी लोकांचा विचार का केल्या गेला नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या सर्व अव्यवस्थेचा हा दुसरा बळी आहे. याअगोदर सावंगी झाडे येथे तीन दिवस मरून राहलेल्या मायलेकी. आणि ही दुसरी घटना!

पाणी टंचाई हिंगणघाट नगर पालिका कोमात डाॅ उमेश वावरे यांनी केले पाण्याचे वाटप

0

 

सचिन वाघे वर्धा

कोविड19 मुळे सपूर्ण वर्धा जिल्हा लाॅकडाॅऊन करण्यात आला शासनाने नियम पाळून लोक आपला घरी राहून शासनाला सहकार्य करतय आहे हिंगणघाट शहरा अमृत योजना स्वरूपात शहरात खुप मोठं मोठा टाक्या बांदनात आला . हे सर्व असताना सुद्धा दर उन्हाळ्यात पाणी टंचाई चा सामना जनतेला करावा लागतो नगर परिषद ला बाब माहीत असून सुद्धा यावर काही उपाय योजना नगर पालिका शासन करत नाही हि बाब गंभीर असून यानच्या जत्रास फक्त जनतेला होते. हि बाब लक्षात येता आज वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानी जावून संत तुकडोजी वार्ड सरकारी दवाखान्याच्या मागे पाण्याचे वाटप केले .हे काम नगर पालिकेचे असून लवकरात लवकर पाण्याचे टाॅकर चालू करावे अन्यथा सर्व लोकांना घेवून नगर पालिका वर मडके फोड आदोलन करण्यात येईल.
त्या प्रसंगी. मनीष कांबळे .दिलिपभाऊ कहूरके. बन्सोड सर .देवेंद्र भालशंकर. व वार्डतील नागरिक उपस्थित होते..