Home Blog Page 476

वाळुची चोरटी करणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांवर तहसीलदार महेश पवार यांच्या कारवाई

0

 

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील महसुलच्या पथकाने केलेल्या अवैद्य गौण खनिजची बेकायद्याशीर वाहतुक करीत असतांना दोन वाळुची चोरटी करणाऱ्या ट्रॅक्टर वाहनांवर तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये कार्यवाही करण्यात येवुन वाहन जप्त करण्यात आली आहे . दरम्यान या संदर्भात महसुलच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार आज दिनांक ५ एप्रिल रोजी बुधवार भालशिव पिंप्री घाटशिवारातुन दुपारी २ ,३० वाजेच्या सुमारास अवैद्यरित्या विनापरवाना गौण खनिज वाळुची वाहतुक करतांना गणेश महाजन यांचे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ४३एल११ooआणी एजाज देशमुख यावल यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९पी१७१९हे वाहन यावल नगर परिषदच्या शेजारी महसुलच्या मंडळ अधिकारी शेखर तडवी भाग यावल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक ईश्वर कोळी तलाठी यावल , विरावली तलाठी मारोडे, यावल कोतवाल निलेश गायकवाड यांच्या पथकाने गुप्त माहीती मिळाल्याच्या आधारावर सापळा रचुन विनापरवाना वाळुची वाहतुक करतांना पकडण्यात आले असुन , सदरचे दोघ ही ट्रॅक्टर वाहन ही दंडात्मक कार्यवाही कण्यात आले आहे . तहसीलदार महेश पवार यांनी नियुक्त केलेल्या वाळु माफीया विरूद्धच्या भरारी पथकाव्दारे होत असलेल्या धडक कार्यवाही मुळे वाळु माफीयावर चांगलेच वचक निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे .

पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता दोन लहान मुलेचा बुडुन दुदैवी मृत्यु शहरात शोककळा

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील शहरातील सुर्दशन चित्र मंदीर परिसरातील राहणारी दोन लहान मुले पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले असता पाण्या बुडुन मरण पावल्याची दुदैवी घटना घडली असुन या घटनेचे वृत कळताच शहरात एकच शोककळा पसरली आहे . दरम्यान काल मध्यरात्रीपासुन त्या पाटात बुडालेल्या मुलांचा शोध घेतला जात असुन त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही . या संदंभात मिळालेली माहीती अशी की , यावल शहरातील या सुर्दशन चित्र मंदीर परिसरात सरस्वती विद्यामंदीर या शाळाजवळ राहणारा दिपक जगदीश शिंपी यांचा १२ वर्षीय गणेश बापु दुसाने वय१४ वर्ष हा मुलगा हा आपल्या मित्रांसह यावल भुसावल मार्गावरील असलेल्या हतनुर पाटबांधारे विभागाची पाटचारी असुन , या पाटचारीत पुर्ण क्षमतेचे पाणी शेत पिकांसाठी सोडण्यात आले असुन , काल दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील चार लहान मुलही पोहण्याच्या मोहात पडुन पाटचारीवर गेले होते त्यातील एक मुलगा हा पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता तो वाहुन जात असल्याचे पाहुन त्यास वाचविण्यासाठी गणेश बापु दुसाने याने एकास काठीच्या सहाय्याने वाचविलेपण तो पाण्यात पडुन मरण पावल्याची घटना घडली आहे . त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी मदतीसाठी आरडाओरड केली पण त्यांना मदत मिळु शकली नाही . त्यांना पाण्यात वाहुन जात असल्याचे पाहुन त्याला वाचविण्यासाठी या मुलांने मदत केली पण दुदैवाने पाण्यात प्रवाहाअधिक वेगाने असल्याने ती दोन मुले पडुन वाहुन गेल्याची दुदैवी घटना घडली असुन सद्या त्यांचा शोध पाटाच्या पाण्यात आठ पट्टीच्या पोहणाऱ्यांकडुन घेतला जात आहे .

नगरपरिषदचे कनिष्ठ बांधकाम अभियंता शेख यांना कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी निलंबीत 

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील नगरपरिषदेचे कनिष्ठअभियंता एस. ए. शेख यांनी बेकायदेशीर कामे करून कामात सतत हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून त्यांना मुयाधिकरी बबन तडवी यांनी निलंबीत केले आहे.
येथील नगरपरिषदेचे कनिष्ठअभियंता एस. ए. शेख यांनी परिषदेच्या ठरावानुसार कामे न केल्याने, तसेच संबंधित कामांची काही कागदपत्र आढळून येत नसल्याने, कामकाजात सतत हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केला.
बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांसंबंधीचे जे देयके ठेकेदारांना
प्रदान करण्यात आलेली आहे त्या संबंधित जे लेखापरीक्षणात आक्षेप
नोंदविण्यात आले त्याबाबतची पूर्तता न करणे कारणे दिलेल्या पत्रांचा खुलासा न करणे असे अनेक कारणावरून शेख सईद शेख अहमद यांना मुख्याधिािरी बबन तडवी यांनी
अखेर निलंबीत केले आहे.
कानतोडीच्या नाल्यातील अनधिकृत संरक्षण भिंतीचे बांधकाम, वसुंधरा
अभियानाचे अनियोजीत काम, तसेच जलसंवर्धनाच्या वि विध कामात त्यांनी हलगर्जीपणा करून दिलेल्या पत्राचे खुलासे न केल्याबद्यल महाराष्ट्र
नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १८६५चे कलम ७९ व महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम१९७९ मधील तरतुदीनुसार मुख्याधिकारी बबन तडवी यांनी निलंबनाचे आदेश बजावले आहेत. तसेच चौकशीअंती जे नव्याने दोषारोप समोर येतील त्याबाबातही आपणास नव्याने आदेश बजवण्यात येतील असे आदेशात नमूद आहे.

पं.बंगाल मध्ये झालेल्या लोकशाही विरोधी कृत्याचा विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा “जाहिर निषेध”

0

 

अजहर शाह मोताळा

#पं.बंगाल मधील भाजपा कार्यकर्त्यांचा हत्येचा बुलडान्यात जाहिर निषेध

बुलडाणा:- पश्चिम बंगाल मध्ये नुकतेच विधानसभेची निवडणूक संपन्न झाली.
या निवडणुकी दरम्यान तृणमूल कोंग्रेस च्या गुंडांणी अनेक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या झालेल्या हत्या,कार्यालयाची तोड़फोड़,जाळपोळ याचा लोकनेते विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात आज 5/5/2021 रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन बुलडान्यात लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करून मारेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलि आहे.

निवेदनात नमूद आहे की,
या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले व प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपाला मान्यता मिळाली.
भारतीय जनता पार्टिने लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास संपादन करून पं.बंगाल राज्यात आपले भरीव अस्तित्व तयार केले आहे.परंतु पश्चिम बंगाल मधिल या भारतीय जनता पार्टी च्या यशाने तृणमूल कोंग्रेस पक्षाची गुंडगिरी व हुकुमशाही विरोधात कौल दिल्याने आता तृणमूल कोंग्रेस कडून भाजपा कार्यालयाची तोडफोड व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मारहाण सुरु आहे. मारझोड़,जाळपोळ करून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची हत्या करण्यात आली आहे. झालेल्या ह्या हत्या म्हणजे फक्त मानवी हत्या असून तृणमूल कांग्रेस ने केलेली लोकशाहीची हत्या आहे.
त्यामुळे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टिचे पदाधिकारी व कार्यकर्ते या घटनेचा,तृणमूल कोंग्रेस चा तिव्र भावनेने “जाहिर निषेध” व्यक्त करतो.
तसेच तृणमूल कोंग्रेस च्या ह्या हल्ल्यात गेल्या काही वर्षापासून हिंसाचारात बळी पडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.तसेच या कठिन काळात पं.बंगाल मधील कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबिर उभे राहून हा संघर्ष त्यांच्या एकटयाचा नसून लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा आहे.
त्यामुळे घड़लेल्या या लोकशाही विरोधी कृत्याचा,गुंडगिरी प्रवृत्तिचा आम्ही पुन्हा एकदा “जाहिर निषेध” व्यक्त करून या समाज विघातक प्रवृतींवर कठोर कारवाई होण्यासाठी आपल्या स्तरावरुन योग्य कार्यवाही व्हावी.
अशी विनंती निवेदना अंति करण्यात आली आहे.
निवेदन सादर करते वेळी किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव दिपकजी वारे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर,जिल्हा सरचिटणीस अल्काताई पाठक,महिला तालुकाध्यक्ष मायाताई पद्ममने,तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे,नगरसेवक अरविंद होंडे,वैभव इंगले,मंदार बाहेकर,कुलदीप पवार,यतिन पाठक ई ची उपस्थिति होती.

नांदुरा येथे रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार : 3 जण ताब्यात

0

 

एलसीबीच्या पथकाने 10 इंजेक्शनही केले जब्त

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल) :
कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या मजबुरीचा ग़ैरफ़ायदा घेऊन काही जण रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहेत. बुलडाणा एलसीबीच्या पथकाने आज धडाकेबाज कार्रवाई करीत काळ्याबाजारात विकल्या जाणारे 10 रेमडेसीवीर इंजेक्शन जब्त केले असून आरोपीला जेरबंद केले आहे. अन्य दोघे जण ताब्यात घेण्यात आले आहेत. ही कार्यवाही आज संध्याकाळी 4 वाज़ेदरम्यान नांदुरा येथे करण्यात आली. नांदुरा येथील गैबी नगर येथे तीन जण रेमडेसीवीर विकत असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यावरून सापळा रचुन सदर कार्यवाही करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार एपीआय श्री. मोरे आणि पथकाने ही यशस्वी कार्रवाई केली आहे. विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात हा काळाबाजार उघडकीस आणल्याने पोलिसांचे कौतुक होत आहेत. पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी यापुर्वीच काळ्याबाजारात रेमडेसीवीर विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. यामध्ये आझादखा इनुसखा वय 31 रा. गैबी नगर नांदुरा, अलबग हुसेन उर्फ नुरआलम अबुबकर अन्सारी वय30 वर्ष रा.खुतरा जि. हजारीबाग (झारखंड), शे. इरफान शे. अजमत वय 20 वर्ष रा. गैबी नगर नांदुरा या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 10 इंजेक्शन व दोन मोबाईल असे एकूण 1 लाख 76 हजार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा सेलू भा. ज. यु. मोर्चाच्या वतीने निषेध

0

 

अजहर पठाण सेलू/परभणी

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा सेलू भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला.
या हल्ल्यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांना क्षती पोहचवून जी अशोभनीय परंपरा पश्चिम बंगालमध्ये अखिल भारतीय तृणमुल काँग्रेसने चालवीली आहे अश्या अराजक कृत्याचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
सबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशा मागणीचेनिवेदन नायब तहसीलदार सेलू श्री.प्रशांत थारकर यांना देण्यात आले.
निवेदनावर राजवाडी येथील सरपंच
तथा सेलू भा. ज. युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष श्री. शिवहरी शेवाळे, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. रवींद्र डासाळकर, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. दगडोबा जोगदंड पाटील, सेलू शहर अध्यक्ष श्री. कपिल फुल्लारी, जयसिंग शेळके पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संगीतराव भोंगळ यांनी दिली निमखेड गावाला भेट

0

 

संग्रामपूर तालुक्यातील निमखेड गावातील 40 लोक कोरोना पॉझिटिव आल्यामुळे संपूर्ण गाव दहशतीखाली आले होते.मा. जि प उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी गावाला भेट देऊन कोरोना पॉझिटिव रुग्णासोबत व गावकर्यां सोबत चर्चा केली असता गावकऱ्यांनी पॉझिटिव रुग्णांच्या पुन्हा तपासण्या कराव्या व संशयित रुग्णांच्या सुद्धा तपासण्या करून घ्याव्यात असे संगीतराव भोंगळ यांना गावकऱ्यांनी सांगितले एका मिनिटांचा अवधी न गमावता श्री भोंगळ यांनी गावकऱ्यांच्या समक्ष तालुका आरोग्य अधिकारी डॉ रोजतकर साहेब यांच्या सोबत फोन वरून चर्चा केली असता काही दिवस आधी पॉझिटिव रिपोर्ट आलेल्या रुग्णांच्या पुन्हा तपासण्या करून घ्याव्या जेणेकरून गावातून भीतीचे वातावरण कमी होईल. वैद्यकीय अधिकाऱ्यानि सुद्धा प्रतिसाद देत उद्याच गावात आरोग्य कॅम्प लावून पुन्हा तपासण्या करून असे सांगितले. संगीतराव भोंगळ यांनी गावकऱ्यांना धीर देऊन त्यांना हिम्मत दिल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सोबत उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष नारायण भाऊ ढगे,अजय सोनी जिल्हाउपाध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा हिंगणघाट शहरात निषेध

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट
दि. 5.5.21

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा हिंगणघाट विधानसभा भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला.
या हल्ल्यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांना क्षती पोहचवून जी अशोभनीय परंपरा पश्चिम बंगालमध्ये अखिल भारतीय तृणमुल काँग्रेसने चालवीली आहे अश्या अराजक कृत्याचा भारतीय जनता पार्टी हिंगणघाट विधानसभेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
सबंधितांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आमदार समिर कुणावार यांचे मार्गदर्शना नुसार निषेधात्मक निवेदन नायब तहसीलदार समशेर पठाण यांचे मार्फत उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाइत यांना देण्यात आले.
निवेदन देतांना भाजपाचे जिल्हा महामंत्री किशोर दिघे,नगर पालिकेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन मडावी,भाजपचे हिंगणघाट तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे समुद्रपुर तालुका अध्यक्ष संजय डेहणे,नगरसेवक चंद्रकांत मावळे उपस्थित होते.

पं.बंगाल मध्ये झालेल्या लोकशाही विरोधी कृत्याचा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात भाजपाने केले “निषेध”आंदोलन…

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.
पश्चिम बंगाल मध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणूका संपन्न झाल्या.या निवडणुक निकालाच्या दरम्यान तृणमूल कोंग्रेस च्या गुंडांणी अनेक भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या झालेल्या हत्या, भाजपा कार्यालयाची झालेली तोड़फोड़,जाळपोळ याचा जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात दिनांक ५ मे रोजी स्थानिक जळगांव जामोद तहसील जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत कोवीड नियमांचे पालन करीत.पश्चिम बंगाल येथील गुंड शाहीचा निषेध अशा घोषणा देत. लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त करून मारेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदणाव्दारे करण्यात आली आहे.निवेदनात नमूद आहे की,या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळाले व प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपाला मान्यता मिळाली.भारतीय जनता पार्टिने लोकशाही मार्गाने जनतेचा विश्वास संपादन करून पं.बंगाल राज्यात आपले भरीव अस्तित्व तयार केले आहे.परंतु पश्चिम बंगाल मधिल या भारतीय जनता पार्टी च्या यशाने तृणमूल कोंग्रेस पक्षाची गुंडगिरी व हुकुमशाही विरोधात कौल दिल्याने आता तृणमूल कोंग्रेस कडून भाजपा कार्यालयाची तोडफोड व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मारहाण सुरु आहे. मारझोड़,जाळपोळ करून भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची हत्या करण्यात आली आहे. झालेल्या ह्या हत्या म्हणजे फक्त मानवी हत्या असून तृणमूल कांग्रेस ने केलेली लोकशाहीची हत्या आहे. त्यामुळे सर्व भारतीय जनता पार्टिचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या घटनेचा,तृणमूल कोंग्रेस चा तिव्र भावनेने “जाहिर निषेध” व्यक्त केला आहे.तसेच तृणमूल कोंग्रेस च्या ह्या हल्ल्यात गेल्या काही वर्षापासून हिंसाचारात बळी पडलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.तसेच या कठिन काळात पं.बंगाल मधील कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबिर उभे राहून हा संघर्ष त्यांच्या एकटयाचा नसून लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा आहे.त्यामुळे घड़लेल्या या लोकशाही विरोधी कृत्याचा,गुंडगिरी प्रवृत्तिचा भाजपा जळगांव जा.तालुक्याच्या वतीने पुन्हा एकदा “जाहिर निषेध” व्यक्त करून या समाज विघातक प्रवृतींवर कठोर कारवाई होण्यासाठी आपल्या स्तरावरुन योग्य कार्यवाही व्हावी.अशी विनंती निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.यावेळी आमदार डॉ. संजय कुटे, जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर अग्रवाल, तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ,शहराध्यक्ष अभिमन्यू भगत,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष परिक्षित ठाकरे,सचिन देेशमुख,अक्षय देशमुख,उमेश येऊल,आशिष सारसर,गोटु खत्ती,कैलास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राम इंगळे, कैलास डोबे,डॉ. प्रकाश बगाडे,गजानन सरोदे, बाळू चव्हाण,, पांडुरंग मिसाळ,सुरेश इंगळे, अरूण खिरोडकार अंबादास निंबाळकर यांची उपस्थिति होती.

फैजपुरच्या लोकसहभागातील ऑक्सीजन सेन्टरला यावल तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने पन्नास हजाराची मदत

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

जळगाव जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील बाधीत रुग्णांची उपचारा आभावी होत असलेली हेळसांड थांबविण्यासाठी फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी फैजपुर येथे लोक सहभागातुन न्हावी फैजपुर येथील जे टी . महाजन अभियांत्रीक महाविद्यालयात शंभर ड्युरा ऑक्सीजन बॅड सेन्टर उभारणीचा संकल्प केला असुन यास रावेर आणी यावल च्या समाजसेवी दानसुरांनी मदत करावी असे आवाहन केले असुन यास मोठा प्रतिसाद मिळत आहे . आज दिनांक ४ मे रोजी यावल येथील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या यावल तालुका ग्रामसेवक शाखाच्या माध्यमातुन लोक सहभागातुन ऑक्सीजन सेन्टर उभारणी पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात आली , दरम्यान ग्रामसेवक युनियनच्या हस्ते देण्यात आलेली आर्थीक मदत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश शांताराम पाटील यांच्या हस्ते तहसीलदार महेश पवार ,यांच्या सुर्पूद करण्यात आले या प्रसंगी नायब तहसीलदार आर डी पाटील , सुयोग पाटील , ग्रामपंचायत विस्तार अधिकारी हबीब तडवी तालुका अध्यक्ष रुबाब तडवी , सचिव पुरूषोत्तम व्ही तळेले ,हितेन्द्र महाजन , राजु तडवी ,मजीत अरमान तडवी यांच्यासह आदी मंडळी याप्रसंगी उपस्थित होती .