Home Blog Page 475

सेलू येथिल श्रीराम प्रतिष्ठान तर्फे कोविड सेंटर मध्ये दहा बेड उपलब्ध

0

 

अजहर पठाण सेलू/परभणी

सेलू येथिल श्रीराम प्रतिष्ठान तर्फे शिक्षण महर्षी तथा वाशिम जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षनिरीक्षक श्री.डॉ. संजय रोडगे यांच्या वाढदिवसा निमित्त अपूर्वा महाविद्यालयात लोकांच्या सेवेसाठी परिपूर्ण कोविड सेंटर सुरू करण्यात आले. यात नवीन शंभर बेड उपलब्ध करून देण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे सेलू तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्वागत करण्यात आले असून तालुका अध्यक्ष सौ. निर्मलाताई बालासाहेब लीपणे यांनी डॉ. संजय रोडगे यांचे आभार मानले. व कोरोनग्रस्त लोकांना बेड उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त केले.

लोकप्रिय आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते पादन रस्त्याचे उद्घाटन,

0

 

सुनिल पवार नांदुरा

नांदुरा :- तालुक्यातील लोकप्रिय आमदार मलकापूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष माननीय श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते पालकमंत्री पादन शेत रस्ते योजना अंतर्गत उद्घाटन दहिगाव स्मशानभूमी ते ज्ञानाई आश्रम शिवार पर्यंत करण्यात आले आहे, खुमगाव या गावाचे सरपंच रोहित वसंतराव सोनवणे यांच्या अथक प्रयत्नाने व सातत्याने पाठपुरावा करून सर्वांना यश लाभले, त्यावेळी पदमराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, वसंतराव भोजने जिल्हा परिषद सदस्य, विलास पाटील संचालक मोहन पाटील संचालक संतोष पाटील जिल्हा परिषद सदस्य ,भगवान धांडे पंचायत समिती सदस्य, युवराज देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष, ईश्वर पांडव शिवसेना जिल्हा युवा उपाध्यक्ष, गजानन करांगळे सदस्य, गणेश वावगे सरपंचपती दहिगाव,किशोर पाटील सरपंच माटोळा,संतोष महाराज टिकार, ज्ञानाई आश्रम, ज्ञानेश्वर पठाडे ज्ञानाई आश्रम कार्यकर्ता ,संजय मार्कंड नायब तहसीलदार नांदुरा, अनिल गिरी वरिष्ठ लिपिक, तलाठी तेलरांधे खुमगाव बुर्ती, तलाठी चोपडे दहिगाव, ग्रामसेवक कोलते दहिगाव,किशोर इंगळे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष,निवृत्ती इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता, निलेश पाऊलझगडे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस यावेळी, केदार ,खुमगाव ,बुर्ती,दहिगाव, माटोळा ,या गावातील शेतकरी उपस्थित होते,

कोविड रुग्णाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करा आकाश बोरीकर जय जवान जय किसान संघटनेचे वर्धा जिल्हाउपाध्यक्ष यांची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट:-सद्या कोरोना या रोगाने रौद्र रूप धारण केले आहे.दररोज कोरोना रुग्ण संख्येत झपाट्यानी वाढ होत असून मृतांच्या संख्येने देखील उच्चांक गाठला आहे.अश्या परिस्थिती मध्ये रुग्णालयात खाट उपलब्ध नसून ऑक्सिजन तसेच औषधांचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे.वर्धा जिल्ह्यात मोठ्या संख्येने कामगार तसेच मोलमजुरी करणारे लोक आहेत.गोरगरीब सामान्य नागरिक शासकीय रुग्णालयात खाटा नसल्याने खाजगी रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यास नेत असतात मात्र काहींची आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची असल्याने ते खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही त्यामुळे पैश्या अभावी देखील निष्पाप लोकांचा या रोगामुळे बळी जात आहे या परिस्थितीत जिल्ह्यातील संपूर्ण खाजगी कोविड रुग्णालय यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करावे.या योजने मध्ये रुपये दिड लाख पर्यंत आर्थिक सहाय्य राज्य सरकार तर्फे देण्यात येते यामध्ये कोविड या रोगाचा समावेश आहे या योजनेअंतर्गत आर्थिक मदत जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला करून द्यावी जणे करून पैश्या अभावी कोणताही रुग्ण दगावणार नाही व औषधांचा व इतर बाबींचा काळाबाजार करणाऱ्यांकडून गोरगरीब जनतेची आर्थिक लूट देखील होणार नाही त्यामुळे तत्काळ या योजनेत जिल्ह्यातील सर्व खाजगी कोविड रुग्णालयाला सामाविष्ट करा अशी मागणी जय जवान जय किसान संघटनेचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष आकाश बोरीकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

सरपंचाची खोटी सही करून घरकुल लाभार्थ्यांचे नाव केले गहाड;माजी सरपंचाची गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

0

 

सावरगाव नेहु येथील प्रकार

सुनील पवार. नांदुरा

सरपंचाची खोटी सही करून एका लाभार्थ्यांचे पंतप्रधान आवास योजनेतून नाव गहाळ केल्याचा प्रकार तालुक्यातील सावरगाव नेहू येथे घडला आहे. याबाबत सुरेश तुळशीराम खराटे सावरगाव नेहु यांनी गटविकास अधिकारी नांदुरा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावरगाव नेहु येथील सुरेश तुळशीराम खराटे या अतिशय गरीब असलेल्या नागरिकांचे नाव सन 2017 18 मध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या प्रपत्र ब मध्ये पात्र यादी मध्ये समाविष्ट होते. मात्र तत्कालीन ग्रामसेवक डी.एस. गाडे यांनी मुद्दाम खोडसाळपणा करून ग्रामपंचायतचा दिनांक 19 नोव्हेंबर 2018 रोजी चा खोटा ठराव तयार करून सरपंच सौ वंदनाबाई प्रकाश पांडे यांची खोटी सही करून लाभार्थ्यांचे नाव पात्र यादीतून काढून अपात्र केले परंतु सदर तारखे मध्ये ग्रामपंचायत मध्ये कोणताच ठराव घेण्यात आला नसल्याचे सरपंच यांनी सांगितले त्यामुळे हा प्रकार उघड झाला आहे.
हा लाभार्थी गेल्या अनेक वर्षापासून याच गावात वास्तव्यात आहे त्यांचा जन्म सुद्धा याच गावात झालेला आहे परंतु ग्रामसेवक यांनी गावात राहत नसल्याच्या कारणावरून त्यांचे नाव व प्रपत्र-ब मधून काढून टाकले आहे. याबाबत सरपंच यांना विचारणा केली असता त्यांनी सुद्धा माझी खोटी सही करून हा प्रकार केला असल्याचे सांगितले आहे व तशी लेखी तक्रार गटविकास अधिकारी नांदुरा यांच्याकडे केली आहे व ग्रामसेवक डी.एस.गाडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे तर घरकुल लाभार्थी सुरेश तुळशीराम खराटे यांनी ग्रामसेवकावर 420 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुनगाव येथे थंडावले लसीकरण

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जा तालुक्यातील सुनगाव येथील लसीकरण दहा ते पंधरा दिवसापासून बंद आहे व नागरिकांनी पहिला डोस घेतलेल्या त्यांना स्वाभाविकपणे ठराविक मुदतीत दुसरा डोस देणे आवश्यक आहे मात्र लसीकरण केंद्र बंद असल्याने नागरिकांची फरफट होतअसल्याचे विदारक दृश्य दिसते कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लस हेच मुख्य शस्त्र असताना मंदगतीने चाललेली लसीकरण मोहीम चिंतेत भर टाकणारी आहे सूनगाव येथे मातोश्री नाथीयाबाई विद्यालय येथे लसीकरण केंद्र आयोजित केले आहे परंतु सूनगाव येथे आरोग्य विभागाकडे लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस मिळत नाही तरी या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे व सूनगाव येथील वाढती रुग्णसंख्या पाहता येथे लस उपलब्ध करावी अशी मागणी सूनगाव येथील नागरिकांकडून होत आहे

बुलडाणा कोविड हॉस्पिटल ची लोकनेते विजयराज शिंदे यांच्या कडून पाहणी

0

 

अजहर शाह

केंद्राकडून कोविड केअर ला 31 वेंटिलेटर व ओक्सिजन स्टोरेज प्लांट ची मदत

रतन टाटा यांच्या भरीव मदती साठी मानावे तेवढे आभार कमी..
लोकनेते विजयराज शिंदे

अधिकारी,कर्मचारी व भाजपा पदाधिकारी यांच्या समवेत सर्व रुग्ण वार्ड,विविध यंत्रणा यांची घेतली माहिती

बुलडाणा:- बुलडाणा जिल्ह्या कोरोनाने थैमान माजविले असून आरोग्य यंत्रनेवर त्याचा ताण पड़त आहे. रुग्ण त्यांचे नातेवाईक यांची रेमेडिसिव्हीर,ऑक्सीजन- वेंटिलेटर बेड यांच्यासाठी होणारी वाताहात यामुळे अनेक रुग्णाचे मनोधैर्य खेचुन त्यातच अनेक रुग्णानी आपले जीव गमावले आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा.आमदार विजयराज शिंदे यानी आज 6/5/2021 रोजी बुलडाणा जिल्हयातील मुख्य कोविड सेंटर बनलेल्या स्त्री रुग्णालय कोविड हॉस्पिटल व बाजुच्या क्षय आरोग्य धाम मधील कोविड हॉस्पिटल यांना भेट देऊन आरोग्य यंत्रनेची सविस्तर पाहणी करून माहिती घेतली त्याच प्रमाणे रुग्णाशी स्वतः संवाद साधला.
पाहणी करते वेळी, स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.सचिन वासेकर यांच्यासह भाजपा चे तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे,नगरसेवक अरविंद होंडे,मंदार बाहेकर,अनंता शिंदे ई पदाधिकारी त्यांच्या समवेत संपूर्ण कोविड हॉस्पिटल ची पाहणी केली.
सदर कोविड हॉस्पिटलची 220 एवढी रुग्ण क्षमता असून संख्या असून लवकरच 250 रुग्ण क्षमता होणार आहे त्याच प्रमाणे मुकबधिर विद्यालय कोविड केअर सेंटर येथे 100 बेड,तर क्षय आरोग्य धामच्या इमातीत 90 बेड,जिजामाता मुलींचे वस्तिगृह येथे 100 बेड असे एकून जवळपास 550 रुग्ण कोविड हॉस्पिटल ला उपचार घेऊ शकतील एवढी क्षमता बुलडाणा जिल्हा मुख्यालयी उपलब्ध आहेत, मात्र तरी सुद्धा ऑक्सिजन व वेंटिलेटर बेड कमी पड़त असल्याने रुग्णा ची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.त्यामुळे ओक्सिजन बेड वाढविन्याची मागणी यावेळी विजयराज शिंदे यांनी केली आहे. स्त्री रुग्णालयाची ही इमारत सुसज्ज असून सर्व सुविधांनी परिपूर्ण आहे,याबाबत समाधानी असल्याचे सांगत मुकबधिर विद्यालयाच्या कोविड केअर सेंटर बाबत विविध तक्रारी असून त्याचा लवकरात लवकर निपटारा करण्याची सूचना लोकनेते विजयराज शिंदे यांनी केली आहे.

या प्रसंगी लोकनेते विजयराज शिंदे यांना रुग्ण उपचार घेत असलेल्या सर्व वार्ड मध्ये भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली व रुग्ण व नातेवाईक यांच्याशी संवाद साधुन त्यांना धिर दिला व हॉस्पिटल च्या व्यवस्थे बद्दल समाधान व्यक्त केले.स्वयंपाक गृहाची सुद्धा पाहणी करून रुग्णाना मिळणारे जेवन,नास्ता,दूध इतर बाबत परिपूर्ण माहिती घेऊन आज बनलेल्या जेवनाची पाहणी केली.

रुग्णाना लागणाऱ्या ऑक्सिजन व्यवस्थे बाबतही लोकनेते विजयराजजी शिंदे यानी माहिती घेऊन साठयाचे नियोजन बाबत माहिती घेतली. यावेळी केंद्र शासनाच्या भरीव मदतीने जिल्ह्याला ऑक्सीजन स्टोरेजचा प्लांट उभरल्या गेल्या असून यामुळे रुग्णाना गरजे नुसार योग्य ऑक्सीजन उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्याच प्रमाणे उपचारासाठी अत्यंत महागड्या असणाऱ्या 31 वेंटिलेटर ची मदत सुद्धा यावेळी केंद्राणी केल्याची माहिती प्राप्त झालेया आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रने कड़े रेमेडिसीवीर चा मुबलक साठा :-
खासगी हॉस्पिटल मध्ये रेमेडीसिविर चा तुटवडा जाणवत असला तरी शासकीय कोविड हॉस्पिटल मध्ये रेमेडीसिविर मुबलक आहे. मागील वर्षीच दूरदृष्टि ठेवून 10,000 रेमेडिसिवीर उपलब्ध करून घेतल्याने सद्य स्थितीत रुग्णाना हा तूटवडा जाणवत नसल्याची माहिती डॉ.वासेकर यांनी दिली. त्यांच्या या दॄष्टिमुळे आज किमान शासकीय व्यवस्थेत गरीब रुग्णाना महागड़े रेमेडीसीवीर मोफत उपलब्ध होत आहे.डॉ.वासेकर ,त्यांचे आरव सहकारी व जिल्हा शल्य चिकित्सक,सर्व आरोग्य आरोग्य अधिकारी यांच्या नियोजनाचे लोकनेते विजयराज शिंदे यांनी विशेष कौतुक केले.कोरोना रुग्णांना सेवा मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या नगरसेवक अरविंद होंडे व मंदार बाहेकर यांचेही कार्य कौतुकास्पद असल्याची भावना बोलून दाखविली त्याच प्रमाणे श्री.रतनजी टाटा यांच्या माध्यमातून स्त्री रुग्णालयास मिळालेल्या भरीव मदतीमुळे आहे रुग्णाना अद्ययावत सेवा मिळत आहे त्यांच्या हया मदतीसाठी मानावे तेवढे आभार कमी असल्याचे प्रतिपादन लोकनेते विजयराज शिंदे यांनी केले आहे.

सूनगाव जिल्हा परिषद शिक्षक व अंगणवाडी सेविका यांनी केले डोअर टू डोअर तपासणी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे वाढत्या कोरोना चे रुग्ण संख्या पाहता सुनगाव ग्रामपंचायत प्रशासन हे अलर्ट झाले आहे त्यानुसार सुनगाव जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षक व अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी जाऊन नागरिकांची तापमान तपासणी थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिजन लेवल ऑक्सिमिटर यंत्राच्या तपासणी केली व नागरिकांना आरोग्य संबंधी व स्वच्छते संबंधी नियम व उपाययोजना सांगितले व वेळोवेळी हात सानेटायझर ने धुवावे व आरोग्याची दक्षता घ्यावी व सकस आहार घ्यावा असे सांगण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळा सुनगाव समिती अध्यक्ष सुनिताताई सोनटक्के मुख्याध्यापक ताडे सर सारोकार सर बुटे सर घट्टे मॅडम अंगणवाडी सेविका चंदाताई चिंचोळकर व आशा सेविका मिसाळ यांनी नागरिकांची वॉर्ड नंबर 6 मध्ये तपासणी केली

कोरपावली गावासह चार गावांना शवपेटयांचे जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविन्द्र( छोटू भाऊ) पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रविन्द्र उर्फ छोटु पाटील यांच्या प्रयत्नातुन नाविन्यपुर्ण योजनेअंतर्गत गटातील पाच गावांना शवपेटयांचे लोकापर्ण करण्यात आले आहे . कोरपावली तालुका यावल येथील ग्राम पंचायत कार्यालयात आज दिनांक ६ / ५ / २०२१ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदच्या डीपीडीसीच्या नाविन्यपुर्ण योजनेद्वारे चुंचाळे – बोराळे , दहिगाव , टाकरखेडा , थोरगव्हाण आणी कोरपावली या पाच गावांना प्रत्येकी सुमारे ७५ हजार रुपये किमतीची अशा पाच शवपेटया जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण सभापती रविन्द्र पाटील यांच्या हस्ते देण्यात आल्यात येथील कोरपावली ग्रामपंचायतच्या कार्यालयात आयोजीत या शवपेटी लोकार्पण कार्यक्रमास सरपंच विलास नारायण अडकमोल, उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल, ग्राम पंचायत सदस्य सत्तार तडवी , आरीफ तडवी , अफरोज पटेल , सिकंदर तडवी , सौ . कविता तुळशीराम कोंळबे , जुम्मा तडवी , नागो तायडे यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे , सामाजीक कार्यकर्त मुक्तार पिरण पटेल , जेष्ठ मार्गदर्शक पिरण पटेल, नारायण अडकमोल ग्रामसेवक प्रविण सपकाळे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा शवपेटी लोकार्पण कार्यक्रम पार पडले या प्रसंगी सभापती रविन्द्र पाटील यांनी केलेल्या सामाजीक व विधायक कार्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल सरपंच विलास अडकमोल यांनी विशेष आभार मानले.

खाजगी रुग्णालय सरकारने ताब्यात घेऊन कोरोना रुग्णास लागणारा सर्व खर्च शासना कडून करण्यात यावा हिंगणघाट बहुजन वंचित आघाडी ची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

6.5.21 हिंगणघाट :- सरकारने खाजगी रूग्णालयाला सहायता करून सर्व कोरोणा पेशन्टचा मुफ्त उपचार करण्यात यावा अशी वंचित बहूजन आघाडी ची मागणी…
महाराष्ट्र राज्या मधे कोविड चे पेशन्ट वाढीवर असून परीस्थिती हाता बाहेर गेली आहे. जम्बो कोविड सेंटर उभारा नाचे आश्वासन दिले.असून ते अजून पर्यंत ते काही सुरू झाले नाही.
अनेक लोकांना बेड. आक्सीजन. भेटत नसल्यामुळे पेशन्ट दगावत आहे.
महाराष्ट्र तील सर्व खाजगी रूग्णालय ताबात घेऊन शासनानच्या वतीने कोविड टेस्टिंग . लस .आक्सीजन. बेड. फ्री करण्यात यावी.
सर्व खाजगी रूग्णालय व डाॅक्टर यानची फी शासनाने दायवी . अंशी मागणी वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात मा उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यानच्या मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. व मा राजेशजी टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र . तसेच जिल्हा अधिकारी वर्धा यांना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिप कहूरके.राजेश खानकूरे चारू आटे. उपस्थित होते

साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस घेण्याकरता नागरिकांची प्रचंड गर्दी गर्दीतच कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता!!! लस उपलब्‍ध 200 नागरिक झाले 500 !!लस जास्तीची उपलब्ध करून द्यावी .वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

तालुक्यातील साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ती ८ दिवसानंतर कोरोना लसीकरण दिनांक ६ मे पासून परत सुरू झाले ‘
त्यामुळे आठ दिवसानंतर लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिकांनी सकाळी ७ वाजेपासून लस घेण्याकरता लसीकरण केंद्रा समोर प्रचंड गर्दी केली होती !

त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता साखरखेर्डा चे पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे पोलीस कॉन्स्टेबल श्री वैराळ श्री चौगुले यांना पाचारण करावे लागले !

यावेळी लस घेण्याकरता ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती !

शिवाय साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रावर ती 200 लसीचा साठा उपलब्ध असल्यामुळे ‘
लस घेणाऱ्यांची संख्या ही तीन पट होती ‘त्यामुळे लस कमी व माणसे जास्त असल्यामुळे लसीकरणाबाबत चा गोंधळ निर्माण झाला आहे !

तसेच गर्दी वाढल्यामुळे सोशल डिस्टंसिंग चा पूर्णपणे फज्जा उडाला आहे !
त्यामुळे गर्दीतच कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही ।

अगोदरच साखरखेर्डा हे कोणाचे हॉस्पॉट ठरलेले आहे !

त्यात मध्ये कोरोना ची लस घेण्याकरता उसळलेली प्रचंड गर्दी पाहता ‘कोरोना चा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही ।

तसेच साखरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 23 खेडी येत असल्यामुळे !
लसीचा डोस हा साखरखेर्डा येथे 400 ते 500 पर्यंत उपलब्ध व्हावा :
अशी मागणी साखरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री सुरुशे यांनी केली आहे !

त्यामुळे लसीकरण सुरळीत होण्याकरिता दररोज 500 ते 600 लसीचा साठा साखरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर ती देण्यात यावा अशी मागणी होत आहे !

नाहीतर लसीकरणाच्या रांगेतच कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही !