Home Blog Page 478

हिवरा आश्रम येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर ‘गावामध्ये ‘ग्रामपंचायत च्या वतीने ‘हायड्रोक्लोरोफिन व डेटॉल ची फवारणी ‘

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सध्या कोरोनाची संख्या ग्रामीण भागांमध्ये झपाट्याने वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं गाव सुरक्षित रहावे यासाठी स्थानिक ग्रामपंचायत च्या वतीने गावामध्ये सॅनिटायझर जी फवारणी केली जात आहे ‘
मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे दिनांक २४ एप्रिल रोजी ‘स्थानिक ग्रामपंचायत च्या वतीने ‘गावामध्ये हायड्रोक्लोरोफिन व डेटॉल लिक्विड ची फवारणी करण्यात आली

यावेळी सरपंच नितीन इंगळे ‘उपसरपंच रमेश गिर ‘ग्रामसेवक सदानंद मस्के .माजी सरपंच मनोहर गिरे ‘संजय बनसोडे ‘संतोष दळवी .मेहबूब पठाण ‘पोलीस पाटील विवेक लहाने ‘ रवी घोंगडे .आरोग्य सेवक विवेक बाजड ‘तलाठी राहुल मोहिते ‘संजय गिरी ‘आधी हजर होते तर ‘फवारणी करण्यासाठी ‘किशोर मोरे विजय कंकाळ .सुदाम पाखरे ‘संजय केंदळे ‘अफजल पठाण यांचे विशेष सहकार्य लाभले ‘

त्यामुळे लोकांनी कोरोणा च्या पार्श्वभूमीवर घरातच राहावे व काळजी घ्यावी असे आवाहनही यावेळी सरपंच नितीन इंगळे यांनी केले ‘

बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र प्रल्हाद सोरमारे करतोय औरंगाबाद येथे जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची जेवण्याची ‘ राहण्याची व्यवस्था ‘ कठीण परिस्थिती प्रल्हाद चोरमारे चं दायित्व ! .

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सध्या कोरोना मुळे सामान्य माणसाचे जगणे हे अतिशय बिकट झाले आहे ‘

कोरोना चं थैमान थांबण्याचं नाव घेत नाही त्यामुळे धावपळीच्या या दुनियेमध्ये माणूस थांबला आहे ‘ सह्या महाराष्ट्र मध्ये कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता कडक लॉकडाऊन चालू आहे ।दवाखाना मेडिकल वगळता सर्व हॉटेल दुकाने बंद आहेत ‘
त्यामुळे रुग्णाबरोबर असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकाची ‘मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल बंद असल्यामुळे जेवण न मिळाल्यामुळे गैरसोय होत आहे ‘

परंतु अशा परिस्थितीमध्ये सामाजिक दायित्व म्हणून अनेक जण पुढे आले आहेत ‘रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक जण डबा पुरवत आहेत ।
असेच सामाजिक दायित्व म्हणून औरंगाबाद येथे मंगल कार्यालयाचा व्यवसाय करणारे तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख ‘

प्रल्हाद सोरमारे यांनी कडक लॉकडाऊन मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तसेच औरंगाबाद मधील
रुग्ण सोबत असणाऱ्या नातेवाईकांची जेवणाची व त्यांच्या राहण्याची संपूर्ण व्यवस्था प्रल्हाद सोरमारे यांनी त्यांच्या मंगल कार्यालयामध्ये केली आहे ।

प्रल्हाद सोरमारे हे मूळचे सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील रहिवासी असून .त्यांचा औरंगाबाद येथे मंगल कार्यालय व केटरिंगचा व्यवसाय आहे ‘सध्या लग्नसराई बंद असल्यामुळे त्यांनी मंगल कार्यालयाचा उपयोग रुग्णांच्या नातेवाइकांना निवारा देण्यासाठी केला आहे ।
व तसेच सकाळी नऊ वाजेपर्यंत दिलेल्या या 7775857442 नंबर वर फोन केल्यानंतर .दवाखान्यांमध्ये जाऊन रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना डबा पुरवले जातो ‘
तसेच सायंकाळी सात वाजेपर्यंत फोन केल्यानंतर मी डब्बा पुरवला जातो ‘

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक रुग्ण आहे उपचारासाठी औरंगाबाद येथे जात असतात ‘व तेथे गेल्यानंतर कोरोणांची वाढती संख्या पाहता तेथे कडकलॉक डाऊन असल्यामुळे तसेच हॉटेल्स बंद असल्यामुळे जेवणाची खूप मोठी समस्या नातेवाईकांची झाली होती ‘

त्यामुळे कधीकधी रुग्णासोबत असणाऱ्या नातेवाईकांना उपाशी राहावे लागत असे ‘
अशा परिस्थितीमध्ये केंटरिंग चे उरलेले अन्नधान्य याचा उपयोग प्रल्हाद सोरमारे हे रुग्णांना डबा पुरवण्यासाठी करतात !
प्रल्हाद सोरमारे यांनी दाखवलेल्या दायित्वामुळे त्यांच्यावर बुलढाणा जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे !

व आणखी दानशूर व्यक्तींनी अशा परिस्थितीमध्ये पुढे यावे असे आवाहनही यावेळी प्रल्हाद सोररमारे त्यांनी केली आहे ‘

शिंदी येथे वाढता कोरोनाचा संसर्ग बघता ग्रामपंचायत च्या वतीने गावात सॅनिटायझर ची फवारणी !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यादृष्टीने गावामध्ये दिनांक 25 एप्रिल रोजी ग्रामपंचायतच्या वतीने सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली ‘

शिंदी हे गाव साडेतीन हजार लोकवस्तीचे असून
गावामध्ये गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोना चा संसर्ग वाढत आहे ।

तसेच गावांमध्ये कोरोनामुळे एका महिलेचा सुद्धा मृत्यू झालेला आहे ‘

अशा परिस्थितीमध्ये गावामध्ये पाच वेळा सॅनिटायझर ची फवारणी करण्यात येणार असून ।

शिंदी ग्रामपंचायत चे सचिव अर्जुन गवई हे वेळोवेळी गावात येऊन गावच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यावर काय उपाययोजना करता येतील याची काळजी ते घेत असतात .

त्यामुळेच 25 एप्रिल ला सॅनिटायझर ची फवारणी करण्यात आली .
यावेळी सरपंच विनोद खरात ‘
ग्रामपंचायत लिपिक विशाल खंडागळे ‘
ग्रामपंचायत कर्मचारी पप्पू गुनेवाड ‘

यांनी हजर राहून सहकार्य केले ।

वेगळी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे यांनी सुद्धा गावाला धावती भेट दिली ‘
यावेळी पोलीस पाटील मदन हाडे ‘
व इतर पोलिस कर्मचारी हजर होते ‘

साखरखेर्डा येथील नवीन पाणीपुरवठा पाईपलाईनची सरपंच दाऊतशेठ कुरेशी यांच्याकडून पाहणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या .तसेच 35 हजार लोकसंख्या चे गाव असलेले साखरखेर्डा येथेन व नवनिर्वाचित साखरखेर्डा गाव चे सरपंच दाऊद सेठ कुरेशी .यांनी सतत पाठपुरावा करून ‘
नामदार तथा पालकमंत्री डॉ . राजेंद्रजी शिंगणे .यांच्या माध्यमातून साखरखेर्डा गावातील नागरिकांसाठी नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे ‘

पाइपलाइन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून ‘लवकरच साखरखेर्डा गावाला स्वच्छ पाणी पुरवठा होणार आहे ‘
साखरखेर्डा येथील तांबोळी पुऱ्यामध्ये नवीन पाणी पुरवठा पाईप लाईन टाकण्याचे काम आले असता
साखरखेर्डा येथील सरपंच दाऊत सेठ कुरेशी यांनी प्रत्यक्ष कामावर जाऊन कामाची पाहणी केली ‘
व लवकरात लवकर काम पूर्ण करा अशा सूचना दिल्या ‘

यावेळी आयुब सेट कुरेशी ‘माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य बाबुशेठ कुरेशी ‘अख्तर भाई ‘ हारुण भाई ‘यासीन अख्तर ‘तनवीर भाई ‘आदी हजर होते ‘

उपचारादरम्यान कोरोनामुळे साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रतापराव भुतेकर यांचे निधन !

0

 

सिंदखेड राजा ( विशेष प्रतिनिधी )

सध्या कोरोनाच्या प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे आणि जवळची माणसे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्युमुखी पडत आहे सर्व काही हतबल आहे .

साखरखेडा पोलीस स्टेशन मध्ये वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले .
प्रतापराव भुतेकर ‘ ब . नं . १००१ ‘
यांचा कोरोना चा संसर्ग झाल्यामुळे औरंगाबाद येथील दवाखान्यांमध्ये उपचारादरम्यान दिनांक २४एप्रिल रोजी मृत्यू झाला .

मृत्युसमयी ते ५४ वर्षाचे होते .

मुलाचे लग्न असल्यामुळे ते काही दिवसांसाठी सुट्टीवर गेले होते ‘

त्यानंतर सुट्टी संपल्यानंतर परत साखरखेर्डा पोलीस स्टेशनला हजर झाले ‘परंतु त्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे ते परत उपचारासाठी चिखली येथील खाजगी रुग्णालय मध्ये विलगीकरण उपचारासाठी दाखल झाले ।

परंतु चिखली येथील दवाखान्यांमध्ये प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे ‘
लगेच त्यांना औरंगाबाद येथील दवाखान्यामध्ये 28 मार्च रोजी भरती करण्यात आले .

परंतु उपचार घेत असताना दिनांक २४ एप्रिल रोजी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला ‘
ते दवाखान्यामध्ये असताना साखरखेडा पोलीस स्टेशन ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे यांनी सर्व सहकार्य केले ‘

कोरोना चा संसर्ग वाढत असल्यामुळे काळजी घेणे हाच एकमेव पर्याय आहे ।लोकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणारे पोलिस बांधवांना सहकार्य करून त्यांना जपण्याची खरी गरज निर्माण झाली आहे !

व्यापारी संघटना जळगाव जामोद तर्फे रक्तदान शिबिर संपन्न

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

व्यापारी संघटना नेहमीच नवनवीन उपक्रमासाठी आणि आंदोलनासाठी ओळखले जाते सध्या कोरोना च्या भयंकर काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. रक्त हे कुठल्याही फॅक्टरीत तयार होत नाही हे जाणून सामाजिक दायित्वाचे भान ठेवत संघटनेमार्फत रक्तदान शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये व्यापारी बांधव व इतर नागरीकांच्या माध्यमातून लक्षणिय बॕग्स रक्त गोळा करण्यात संघटना यशस्वी झाली. सदर शिबिर रक्ताच्या जमा झालेल्या रक्ताच्या बॕग्स व नियोजनासाठी एक आदर्श बनले . विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही आणखी एक विशेष बाब. सदर शिबिरासाठी डॉक्टर हेडगेवार रक्तपेढी अकोला यांचे सहकार्य लाभले.

*लक्षवेधक नियोजन*

कोरोनाचा काळ पाहता अतिशय प्रशंसनीय नियोजन संघटनेमार्फत करण्यात आले होते. मास्क , सॕनी टायझर, प्रत्येक रक्त दात्यांमध्ये आठ फुटाचे अंतर ,आरोग्याची काळजी घेता प्रत्येक रक्तदात्या करिता प्लेन सीटचा वापर, शारीरिक अंतर , प्रत्येक कार्यकर्त्याला हॅन्ड ग्लोज , नियम व सूचना फलक अशा अनेक गोष्टी लक्षवेधक होत्या .

*महिलांचा प्रतिसाद*

सदर रक्तदान शिबिरात महिलांचा सहभाग दिसून आला. महिलांना रक्तदानासाठी स्वतंत्र व्यवस्था हे आणखी एक नवीन वैशिष्ट्ये दिसून आले .

*सेल्फी पॉइंट*

*आम्ही रक्तदान केले ……तुम्ही?* हा सेल्फी पाॕईंट येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आकर्षणाचा बिंदू ठरला. प्रत्येक रक्तदात्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी सेल्फी पाॕईंट ची निर्मिती हा नवा प्रयोग पहावयास मिळाला.

सदर शिबिराचे आयोजनात
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे , अनिल भगत, जितेश पलन, निलेश सेदाणी , अजय पलन, महेंद्र पलन, गौतम भंसाली , एफ आर खान ,हुसेन डायमंड , प्रकाश सोळंकी , पवन चांडक आणि व्यापारी बांधवांनी परिश्रम घेतले.

सरकारी अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांच्या भेटी

सदर शिबीराला जळगाव जामोद च्या उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर मॕडम , तहसिलदार शिवाजी मगर, नगराध्यक्ष सौ. सीमाताई डोबे,डाॕ. संदिप वाकेकर , काँग्रेस चे शहरअध्यक्ष अर्जुन घोलप, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख , तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ , शहराध्यक्ष अभिमन्यु भगत, परिक्षित ठाकरे , उमेश येऊल , तसेच कैलास डोबे , राजू हिस्सल , डाॕ. प्रकाश बगाडे, अजिंक्य टापरे यांनी भेटी दिल्या. नगरपरिषद जळगाव जामोद ने सांस्कृतिक भवन उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यापारी संघटनेमार्फत पालीका प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.

सेवाग्राम हॉस्पिटल covid-19 सेंटर मधील फरार आरोपी याच्यावर हिंगणघाट डीबी पथकाने केली कारवाई

0

 

सचिन वाघे वर्धा
25.4.21
हिंगणघाट :- मोहम्मद शबार मोहम्मद शब्बीर वय19 वर्ष राहणार जहीराबाद ,तेलंगणा याच्यावर हिंगणघाट इथे चोरीच्या आरोपाखाली कलम 379 -34 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आरोपी हा वर्धा कारागृह येथे बंदिस्त होता त्यास न्यायालयीन कोठडी दरम्यान covid-19 ची लागण झाल्याने पुढील उपचाराकरिता कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे भरती करण्यात आले होते.
दि. 22. 4 .21 च्या उपचार दरम्यान तो covid-19 वार्ड येथून फरार झाला होता त्याच्याविरोधात सेवाग्राम पोलीस स्टेशन येथे कलम 224, 269 भा.द.वी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार होताच त्याचा शोध घेणे कामी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पो.हवा शेखर डोंगरे यांचे प्रगटीकरण पथकास नेमून
मा पो.अधीक्षक यांचे आदेशान्वये, पो.हवा.शेखर डोंगरे यांची गुन्हे प्रगटीकरण पथक आरोपीचा पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांच्या सोबत सतत संपर्कात राहून शोध घेत होते पांढरकवडा जिल्हा यवतमाळ आदीलाबाद, निर्मल, निजामबाद, जहीराबाद, राज्य तेलंगणा येथे शोध घेतला असता माहितीच्या आधारे आरोपीला बीदर राज्य कर्नाटक येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे आणून परत आरोपीस सेवाग्राम पोलीसकडे कारवाई करण्याकरिता हस्तांतरण करण्यात आले सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध इतर राज्यात सुद्धा बरेचसे गुन्हे दाखल आहे .
सदरची कामगिरी मा.श्री प्रशांत होळकर ( पोलीस अधीक्षक वर्धा ) मा.श्री यशवंत साळुंखे (अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा ) मा.श्री दिनेश कदम कदम (उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट) श्री संपत चव्हाण (पोलीस निरीक्षक हिंगणघाट) यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे पो.हवा शेखर डोंगरे नापोशी निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे विशाल बंगाले ,पोशि सचिन भारशंकर यांनी केली

जळगांव जामोद तालुक्यातील निंभोरा बु.जि.प.शाळेच्या कु.आरती सुरडकर ची आकाशवाणीवर झेप

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव(जामोद):दि.२५ कोरोना सदृश्य परिस्थिती मध्ये सध्या प्राथमिक शाळा बंद असून विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासाची निरंतर ओढ लागावी, यासाठी आकाशवाणी नागपूर आणि विद्या प्राधिकरण नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “शाळेबाहेर ची शाळा”हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. तालुक्यातील निंभोरा बु. येथील जि.प. प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. आरती सुरळकर हिची ह्या उपक्रमासाठी आकाशवाणी केंद्राने मुलाखत घेऊन प्रसारित केल्याने ह्या शाळेने व कु.आरतीने आकाशवाणी वर झेप घेतली आहे.आरतीने कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली.
नागपूर आकाशवाणी च्या अ केंद्रावरून शाळे बाहेरची शाळा हा कार्यक्रम आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असे तीन दिवस सकाळी साडेदहा वाजता प्रसारित करण्यात येत असतो. कु.आरती व सुरडकार हिने “बँका मुळे तुम्हाला काय फायदा” ह्या विषयावर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. तिचे वडील विठ्ठल सुरडकार यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला. कु. आरती ही इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी असून तिचा अभ्यास ती गटामध्ये पूर्ण करते. शाळेबाहेर ची शाळा ह्या उपक्रमात १३२ व्या भागांमध्ये कु. आरती चा सहभाग असलेला कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. कु. आरती सुरडकर हिच्या प्रतिसादाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एन.जी.फाळके, गटसमन्वयक एम.आर.इंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी आर.पी.तायडे, केंद्रप्रमुख योगेश वाघ, ह्या उपक्रमाचे तालुका समन्वयक किशोर शास्त्रकार, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना सपकाळ ,सहयोगी शिक्षक संदीप इंगळें, मनोज वाकडे ,गोविंद बोरुडे यांच्यासह ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी कु. आरतीचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. सध्या कोरोनाचा भयंकर असा संक्रमण काळ आहे. विद्यार्थ्यांनी विनाकारण कुठेही न फिरता घरात राहूनच अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे, तसेच”शाळा बाहेरची शाळा” अश्या अभिनव उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवून आपल्या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

संचारबंदी काळामध्ये ग्रामसेवकाने मारली एका महिन्यापासून दांडी. ग्रामसेवका अभावी जामोद ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार

0

 

गजानन सोटक्के
जळगाव जा प्रतिनिधी:-

कोरोनाच्या काळात तरी ग्रामसेवकांने मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे परंतु जामोद येथील ग्रामसेवक हे मुख्यालयी तर राहतच नाहीत. त्यामुळे जामोद वासियांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने खूपच त्रास होत आहे लाँकडाऊन चे नियम पाळण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकाची भूमिका महत्वाची असते गावात ग्रामसेवक राहत तर नाहीच परंतु गेल्या महिन्याभरापासून ग्रामसेवकांनी दांडीच मारली असल्याने गावात लाँकडाऊन चे नियम पाळल्या जात नाहीत जामोद ग्रामपंचायतचा कारभार सध्या ग्रामसेवका अभावी सध्या रामभरोसे सुरू असल्याने गावात कोरोनाचे काळात विविध समस्या निर्माण झालेल्या असल्याने जामोद वासियांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे जामोद हे गांव जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव असून येथील लोकसंख्या 20000 चे वर असून येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या 17 + 1=18 असून ग्रामविकास अधिकारी पदाच्या पोस्टची जामोद ग्रामपंचायत असूनही बरेच वर्षांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवकच नाही गेल्या तीन महिन्यांपासून महिला सदस्यांसोबत उद्धट वागणूक देणारे वादग्रस्त ठरलेले कैलास चव्‍हाण यांची जामोद येथून बदली करण्यात आली त्यांचे जागी गेल्या तीन महीण्यांन पासून कस्तुरे नामक ग्रामसेवक देण्यात आले ते काही दिवस महिन्यातून तीन ते चार दिवसच येत होते आणि आता तर गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांचे जामोदात दर्शनच झाले नाही गावात कोरोना चा वाढता शिरकाव सुरूच असतानाही सध्या जामोद ग्रामपंचायतचा कारभार ग्रामसेवकांना अभावी रामभरोसे सुरू असल्याने कोरोनाचे काळात जामोद गावात विविध समस्या निर्माण झाल्या असल्याने जामोद वासियांना ऐैन उन्हाळ्याच्या दिवसात गावातील सांडपाण्याच्या नाल्या कित्तेक दिवसांपासून साफ न केल्याने सदर नाल्यांमधील सांडपाणी हे रस्त्यांवरून वाहत आहे त्यातच येथील पेठ भागातील पथदिवे हे गेल्या सहा महिण्यांपासून बंदच असल्याने रात्रीच्या वेळेस सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते रात्रीच्या वेळेस अंधारातून व चिखलातून दगडांच्या ठोकरा खाव्या लागत आहेत ग्रामपंचायत ने मागे सुरू केलेली कचरागाडी सुद्धा परत गेल्या पंधरा दिवसांपासून चालकास गेल्या चार महिन्यांपासून पगारच न दिल्यामुळे ग्रामपंचायत समोर शोभेची वस्तू होऊन निकामी उभी आहे गावात सर्वत्र केरकचरा सह घाणीचे व चिखलाचे साम्राज्य पसरलेले असल्याने गावात मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने जामोद वासियांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे ग्रामसेवका अभावी जामोदात विविध समस्या निर्माण झाल्याने खूपच त्रास सहन करावा लागत आहे तसेच ग्रामपंचायतीची विविध कामे रखडली आहेत ग्रामसेवकाच्या दाखल्यासाठी चकरा मारूनही दाखले मिळत नाहीत आता तरी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन जामोद ग्रामपंचायतला स्वतंत्र व मुख्यालयी हजर राहणारा ग्रामविकास अधिकारी देण्यात यावा अशी मागणी जामोद येथील जनतेकडून होत आहे

जवळा बाजार येथे आग लागून गोठ्यातील तीन गुरांचा आगीत होरपळून मृत्यू

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

जवळा बाजार ता. नांदुरा येथील श्री.संजय किसनराव शिंगोटे यांच्या गोठ्यात आज सकाळी १०.०० वा. सुमारास अचानक आग लागून त्यांच्या गोठ्यातील तीन गुरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला व गोठ्यामध्ये ठेवलेली पीव्हीसी पाईप शेतीचे अवजारे जळून खाक होऊन श्री.संजय शिंगोटे यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तहसीलदार नांदुरा व तालुका पशुवैकीय अधिकारी यांना सदर नुकसानी बाबतचा पंचनामा ईतर आवश्यक बाबीची पुर्तता तात्काळ करावी व आपदग्रस्त शेतकरी श्री.संजय शिंगोटे यांना त्वरित आर्थिक मदत मिळणे बाबत सूचना केल्या.या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील, श्री.अनिलभाऊ शिंगोटे, सरपंचपती श्री.अशोकभाऊ डीवरे,जवळा बाजार येथील तलाठी उपस्थित होते.