Home Blog Page 479

पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा,अन्यथा ठिय्या आंदोलन- लोकनेते विजयराज शिंदे यांचा जिल्हा प्रशासनाला इशारा

0

 

अजहर शाह मोताळा

खरीप हंगाम 2020-21 मधील जिल्ह्यातील हजारो शेतकरी पिकविम्या पासून वंचित

“विमा कंपनीची मनमानी खपवुन घेतली जाणार नाही”

*बुलडाणा:- बुलडाणा जिल्ह्यातील 2020-21 मधील खरीप हंगामातील हजारो शेतकरी हे पिक विम्याच्या लाभापासून वंचित असल्याने अश्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पिक विम्याची रक्कम तात्काळ खात्यात जमा करावी या मागणी साठी आज लोकनेते विजययराज शिंदे यांनी तसेच किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव दिपकजी वारे यांच्या वतीने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.

“यावेळी जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चे दरम्यान “विमा कंपनीची मनमानी सुरु असून पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नसून कृषि विभाग व या विमा कंपनीचे आर्थिक हित संबंध असल्याचा सुद्धा घनाघाती आरोप यावेळी भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी केला आहे.पिक विम्या बाबत शेतकऱ्यांच्या येणाऱ्या विविध तक्रारिंवर कृषि विभाग कोणतीही कारवाई न करता केराची टोपली दाखवत असून यामुळे शेतकरी मेटाकुटिस आला आहे.जिल्हाधिकारी यांनी 50 पैसे पेक्षा आणेवारी कमी असल्याचे जाहिर करून सुद्धा जर विमा कंपन्या या घोषणेला जुमानत नसतील तर अश्या विमा कंपनीची मनमानी खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा लोकनेते विजयराज शिंदे यांनी दिला आहे.”

दिलेल्या निवेदनात नुमद आहे की, बुलडाणा जिल्ह्यातील 2020-21 या मागील वर्षात खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तिमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे.महसूल यंत्रनेने पंचनामे करून त्या आधारे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्याची आणेवारी घोषित केली होती. त्यात सर्व तालुक्याची आणेवारी ही 50 पैसे पेक्षा खाली आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढलेला आहे अश्या कोणत्याही शेतकऱ्यास पिक विम्याची रक्कम अद्याप पर्यंत पिक विमा कंपनीने खात्यात जमा केलेली नाही.

30/12/ 2020 रोजी मा.जिल्हाधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे खरीप हंगाम 2020-21 ची तालुका निहाय अंतिम आणेवारी घोषित केली होती. सदर घोषित केलेल्या आणेवारीत बुलडाणा तालुक्यातील 98 गावे तर मोताळा तालुक्यातील 120 गावांची अंतिम आनेवारी ही 50 पैसे पेक्षा कमी आलेली आहे.
संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता जवळपास 1419 गावांची आनेवारी 50 पैसे पेक्षा खाली आलेली आहे.ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढलेला आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यास सुरवात केली आहे.विमा कंपनीच्या म्हणन्या नुसार शेतकऱ्यांनी शेतकरयांनी नुकसान झालेल्या पिकांचा क्लेम नुकसान झाल्या नंतर 72 तासाच्या आत ऑनलाइन दाखल करावा अशी अट घातली होती .बऱ्याच शेतकरयांनी यानुसार क्लेम दाखल केला आणि काही शेतकरयांना 72 तासाच्या आत क्लेम दाखल करता आला नाही शेतकरयांच्या जवळ महागड़े मोबाइल, नेट सुविधा,अज्ञान या सर्व कारनामुळे काही शेतकऱ्यांना नुकसानीचा क्लेम दाखल करता आला नाही. त्यामुळे विमा कंपनी नुकसान भरपाई देण्यास नकार देत आहे.प्रशासकिय महसूल यंत्रनेनी स्वतः स्थळ निरीक्षण करून पंचनामे करून या नुकसानीचा सर्वे केलेला आहे.त्या अहवाला च्या आधारेच जिल्हाधिकारी यांनी आनेवारी जाहिर केलेली आहे.त्या आधारे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे ही बाब सुस्पष्ठ असताना विमा कंपन्या आर्थिक नुकसान भरपाई टाळा टाळ करत आहे.
तरी जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या आनेवारी व गावातील तलाठी वा महसूल यंत्रनेनी केलेल्या पंचनाम्या च्या आधारे संपूर्ण जिल्ह्या भरातिल पिक विमा काढलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम तत्त्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी व विमा कंपनीला द्याव्यात.
व येणाऱ्या 8 दिवसात जर जिल्हयातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पिक विम्याची रक्कम न मिळाल्यास अश्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी किसान मोर्च्या च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल व यास सर्वस्वी विमा कंपनी व जिल्ह्या प्रशासन जबाबदार राहिल, असा आंदोलनात्मक इशारा लोकनेते विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदना द्वारे दिला आहे.
यावेळी किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव दिपकजी वारे,तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे यांची उपस्थिति होती.

साकळी गावात आरोग्य सभापती व तहसीलदार यांच्या उपस्थितीत माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमाअंतर्गत सर्वेक्षण

0

 

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल तालुक्यातील साकळी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या कार्यक्रमा अंतर्गत सर्वेक्षण सुरू असताना जळगाव जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र उर्फछोटु पाटील, तहसीलदार महेश पवार तसेच यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईमुद्दीन कुतुबुद्दीन शेख यांनी भेट दिली याप्रसंगी सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांनी नागरिकांनी covid-19 या कार्यक्रमाअंतर्गत शासकीय नियमांचे पालन करून स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी व समय सुचकता बाळगुण आपली वेळ येईल त्यावेळेस कोवीड लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मार्गदर्शन केले. सर्वेक्षण केंद्र प्रमुख किशोर चौधरी यांनी पंचक्रोशीतील साकळी परिसरात साकळी, शिरसाड, मनवेल, दगडी, थोरगव्हाण व पिळोदा येथील आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण संदर्भात माहिती दिली. साकळी परिसरातील आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातुन होत असलेल्या कोरोना संदर्भातील जनजागृती व रुग्णांची घेतली जात असलेली काळजी या विषयाची माहिती जाणुन घेतली तहसीलदार महेश पवार समाधान व्यक्त केले व कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासनास जनजागृती व शासनाच्या नियमांची काटेकोर अमलबजावणी आणी सर्वेक्षण अधिकाधिक प्रभावी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी परिसरातील सर्वेक्षण कर्मचारी शिक्षक, आशा वर्कर प्रामुख्याने उपस्थित होते.

वाघझीरा येथील आदीवासी तरूणी कु . मोहीणी भुगवाडया झाली एमबीबीएसच्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

0

 

यावल प्रतिनिधी विकी वानखेडे

यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम क्षेत्र म्हणुन ओळखले जाणारे वाघझीरा ता.यावल येथील आदीवासी कुटुंबातील मोहिणी मालसिंग भुगवाड्या(पावरा) या शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नागपूर येथुन सन २०१६-२०२१ च्या वर्गा मधून प्रथम श्रेणीत एम.बी.बी.एस.ची परीक्षा उतीर्ण झाली आहे . कु.मोहिणी यांचे वडील मालसिंग जंगलू भुगवाड्या हे जिल्हापरीषदेच्या नायगाव येथील शाळेत शिक्षक म्हणुन कार्यरत असुन, आई सौ.नवादी मालसिंग भुगवाड्या या किनगाव आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मालोद येथील आरोग्य उपकेंन्द्रात परीचारीका म्हणून सेवा बजावत आहेत कु.मोहिणी भुगवाडया यांच्या या यशाबद्दल त्यांचे शाळेतील मुख्याध्यापिका चोपडे , शिक्षक कराळे सर ,नावकार मॅडम व समाजबांधव सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान कु .मोहीणीचे १०पर्यंतचे प्राथमीक शिक्षण शेगाव जिल्हा बुलढाणा येथील श्री स्वामी विवेकांनद इंग्लीश ज्ञानपीठ स्कुल मध्ये झाले आहे व नंतर १२चे शिक्षण श्रीमती मेहेरबानु कॉलेज ऑफ सायन्स अँन्ड कॉर्मस, अकोला येथे झाले आहे .

हिंगणघाट शहरात तात्पुरते कोव्हिडं संक्रमण (ट्रान्झिट)सेंटर सुरु करण्याची पालकमंत्री यांना विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट शहरात शहर व ग्रामीण परिसरातील कोव्हिडं रुग्ण मोठया प्रमाणात उपचार घेण्यासाठी येतात परंतु त्यांना उपजिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे असे रुग्ण विविध दवाखान्यात फिरतात व बेडअभावी त्यांची प्रकृती गंभीर होऊन प्रसंगी अश्या रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो. त्याकरिता डॉ. बी. आर. आंबेडकर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी संयुक्त सभा घेऊन असे ठरविले की अश्या रुग्णांना तात्पुरती व्यवस्था म्हूणून डॉ.बी. आर. आंबेडकर विद्यालयात निर्माण होणाऱ्या ट्रान्झिट सेन्टर मध्ये भरती करता येते. याकरिता रुग्णांनी आपले नाव अगोदर उपजिल्हा रुग्णालयात नोंदणी करावे .रुग्णालयात बेड उपलब्ध असेल तर फारच छान जर नसेल तर रुग्णालय प्रशासनाने असे रुग्ण ट्रान्झिट सेंटर मध्ये पाठवावे. तिथे त्यांना प्रथमोपचार सुरू करावा. आणि उपजिल्हा रुग्णालयात बेड उपलब्ध झाल्यानंतर तिथे त्यांना परत भरती करावे. यामुळे फायदा असा होईल की कोव्हिडं पॉझीटीव्ह रुग्णांना बेडकरिता शहरातील दवाखान्यात फिरावे लागणार नाही व वेळेत त्यांना प्रथमोपचार मिळून त्याच्या प्रकृती मध्ये सुधारणा होऊन त्यांचे मनोधेर्य वाढेल. आणि कोरोना आजारापासून त्यांना मुक्ती मिळेल. आजच्या परिस्थितीत कोव्हिडं रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. हिंगणघाट शहरातील शासकीय व प्रायव्हेट कोव्हिडं सेंटरमध्ये आज रुग्णांकरिता बेड उपलब्ध नाही. त्यामुळे पेशंट दिवसभर वेगवेगळ्या रुग्णालयात फिरून – फिरून शेवटी हतबल होतो त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. ही अवस्था फार गंभीर आहे. दरम्यानच्या परिस्थितीमध्ये कोव्हिडं रुग्णांची तात्काळ व्यवस्था होणे याकरिता जोपर्यंत नवीन व्यवस्था कार्यान्वित होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपातील व्यवस्था करणे आवश्यक आहे. शहरातील व ग्रामीण भागातील रुग्ण फार मोठ्या आशेने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात येतात. परंतु अपूर्ण सोयीसुविधांमुळे रुग्णांना येथे भरती न करण्यात आल्याने त्यांची निराशा होते खाजगी दवाखान्याचा खर्च त्यांच्या ऐपतीच्या बाहेरचा असतो अशा अवस्थेत रुग्णांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण होतात. हतबल होतात परिणामी रुग्णांना मृत्यूला कवटाळण्या शिवाय मार्ग राहत नाही.अशी वेळ कुणावरही येऊ नये याकरिता अशा गोरगरीब रुग्णांकरिता एक संक्रमण (ट्रान्झिट ) कोव्हिडं उपचार केंद्र तात्पुरत्या स्वरूपात कार्यान्वित होणे गरजेचे आहे . ट्रान्झिट कोव्हिडं -19 सेंटर यामध्ये (1) आलेल्या प्रत्येक रुग्णाची नोंद एका मध्यवर्ती ठिकाणी (उपजिल्हा रुग्णालय) घेण्यात यावी. ज्या दवाखान्यात बेड उपलब्ध आहेत तिथे रुग्णांना भरती करण्यात यावे बेड उपलब्ध नाहीत तेव्हा हे रुग्ण ट्रान्झिट कोव्हिडं सेंटरला पाठविण्यात यावे .(२) इथे येणाऱ्या रुग्णांना प्राथमिक उपचार सुरू करण्यात येतील . (3) दरम्यान जिथे बेड उपलब्ध झाले तेथे या रुग्णांना पाठविण्यात येतील. (4) येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला प्राथमिक उपचार करणारे हे केंद्र कार्यान्वित करता येईल असे हे केंद्र असेल . या उपचार केंद्राकरिता डॉ बी आर आंबेडकर शिक्षण संस्थेचे संस्थापक मंडळ अशा कठीण परिस्थितीमध्ये कोव्हिडं रुग्णांना दिलासा देण्याकरिता तयार आहे. डॉ. बी आर आंबेडकर शिक्षण संस्थेद्वारे संचालित डॉ. बी आर आंबेडकर विद्यालय नंदोरी चौक हिंगणघाट येथील इमारत सध्या परिस्थिती शाळा बंद असल्याने तसेच शालेय परीक्षा रद्द झाल्याने रिकामी आहे. आपले स्तरावरून सकाळ-संध्याकाळ एक डॉक्टर व दोन परिचारिका व 2 वार्डबाय याची व्यवस्था जर होऊ शकली तर तीन दिवसात हे सेंटर सुरू होऊ शकते. विद्यालयाचे परिसरात इमारत क्रमांक 2 येथे तळ माळावरील सहा वर्गखोल्या पुढील सत्र सुरू होईपर्यंत उपलब्ध करून देण्यास ट्रस्टच्या समितीने होकार दिलेला आहे. प्रसाधनगृह, पाण्याची व्यवस्था सुद्धा ट्रस्टच्यावतीने करून घेण्याची ग्वाही दिलेली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण दवाखाना शोधण्यास शहरात फिरण्यास प्रतिबंध होईल . पॉझिटिव्ह असेल अशा रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपात थांबण्याकरिता एक ट्रान्झिट कोव्हिडं सेंटर तयार झाले तर ते शहरातील गोरगरीब व ग्रामीण भागातील जनतेच्या फायद्याचे होईल. अशा प्रकारचा एक प्रस्ताव अनिल जवादे यांनी माननीय उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी वर्धा यांना पाठविलेला आहे . तसेच यासंदर्भात आज दि 1 मे रोजी माननीय सुनीलजी केदार साहेब, पालकमंत्री वर्धा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आणि त्यांचेसोबत चर्चा केली. यावेळी विदर्भ विकास आघाडीचे महेश माकडे, दिनेश वाघ, जयंत धोटे, अजय मुळे इत्यादी उपस्थित होते.

फिनाले मिल येथील महिला कर्मच्यार्यावर वरिष्ठ अधिकारी नरेन्द्र कुमार शर्मा यांनी केला अत्याचार

0

अचलपूर पोलिस ठाण्यात गुन्हा ३५४अ,३५४ ड अनन्वे दाखल

हंसराज उके अमरावती

अमरावती जिल्ह्यातील दिवसाने दिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण अधिकच वाढली आहे धारणी येथील दिपाली चव्हाण यांच्या वर सुध्दा वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून अखेर दिपाली चव्हाण हिने स्वतावर पिस्तुलाने गोळी झाडून स्वरांची जिवनयात्रा संपवली.ते प्रकरणं जिवंत असतानाच अचलपूर पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या फिनाले मिल येथील एका महिला
कर्मचारी यांचेवर वरिष्ठ अधिकारी नरेन्द्र कुमार शर्मा यांच्या कडून वारंवार मानसिक, शारीरिक त्रास देण्याचे प्रकरणं आज दिनांक २९/ ४ / २०२१ ला अचलपूर पोलिस ठाण्यात उघडकीस आले
सविस्तर असे कि अचलपूर येथील फिनाले मिल येथे महीला कर्मचारी हि सन २०११ पासुन
वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहे गेले पाच,सहा, वर्षांपासून तेथील वरिष्ठ अधिकारी नरेन्द्र कुमार शर्मा हे सुध्दा फिनाले मिल अचलपूर येथे मॅनेजमेंट या विभागात कार्यरत असुन या नरेन्द्र कुमार शर्मा यांचा महीला कर्मचारी कडे पाहण्यासाठी नजरिया अल्लाची असल्याचे महिला कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत बोलायचे तर सोडाच पण ति महीला कर्मचारी प्रामाणिक पणे काम करत असताना तिला काम करु न देता त्या महिला कर्मचाऱ्यांना वाईट नजरेने पाहणे
या त्रासाला कंटाळून अखेर आज या महीला कर्मचार्यांनी शेवटी अचलपूर पोलिस ठाण्यात पतीसोबत जाणुन नरेन्द्र कुमार शर्मा यांचे कडून वारंवार होत असलेल्या मानसिक शारीरिक छळ करीत असुन मला कामावरून काढून दिल्याची तक्रर
दाखल करुन आरोपी विरुद्ध भांदवी कलम ३५४ अ ३५४ ड अनन्वे गुन्हा दाखल केला आहे.

तहसिल कार्यालय अचलपूर संजय गाधी योजना अधिकारी ला उषा पानसरे यांनी दिले निवेदन।

0

 

दिनांक 30 /4 /2021 रोजी मूख्य कार्यकारी संपादक व प्रेस सेवा संघाचा महीला जिल्हा अध्यक्षा उषा पानसरे यांनी अधिकारी अचलपूर तहसिल ईथे दिले निवेदन
असदपूर मधली एक भूमिहीन व विधवा महीला सूशिला बाई पूंडलिक धाडसे रा. असदपूर याना दोन वर्षा पासून संजय गाधी योजने चे पैसे येने बद झाले असता सूशिलाबाई यानी उषा पानसरे याचा कठे आला व त्याना मदत मागितली मला पैसे येत नाही काम मजूरी सूध्दा नाही एकटाच मूलगा दोनसे रूपये कमावतो व त्याचा पण परिवार पोचतो व मी ही आजारी राहते हमेशा उषा पानसरे कडे तिन दया धाव घेतली असता त्याचा कडून तिचे दूख बघीतले गेले नसता पानसरे मैडम चा दिनाक 8 /4 /2021 रोजी त्याचा आँक्सिडंट झाला होता त्याचा उपचार गावातील डाँ कडे चालू होता नंतर त्याना रावत आँर्थोपँडीक हाँस्पीटल परतवाडा येते दिनाक 17 /4 / रोजी नेले होते डाँ, नी चालण्यास मना केली होती व दोन महीने उपचार सागितला असतांना देखिल अशा व्यवस्थे मधे देखिल त्या सूशिलाबाई ची मदत करण्या करता अँफ डाँवून 70 कि. लो मी. असताना देखिल त्या अचलपूर तहसिल कार्यालय मधे जावून अधिकारी सी भेट घेवून निवेदन दिले
व सर्वी माहीती घेतली कि या महीलेचा संजय गांधी निराधार योजने चा लाभ मंजूर होवूनही तिला का? मिळत नाही ।कूठे तिचा पगार जमा होवून जात आहे । अधिकारी नी सपूर्न चेक करूण हे मान्य केले आहे कि सूशिला बाई पुंडलिक धाडसे याना दिनांक 6 /12 /2019 रोजी मान्यता दिली होती व त्याचा बैंक खाते नंबर कूठे तर चूकला असून ते पैसे आम्हाला परत येत आहे ? व आता तिला आम्ही चूकी दूरस्ती करून तिला या योजने चा लाभ लवकरच देवू येण्यार्‍या महीण्यातच असे त्यानी आँश्वाशन दिले आहे । या व्यवस्ते मध्ये सूध्दा उषा पानसरे आपले दूख बाजूला ठेवून महिलेला न्याय व हक्का मिळून देण्या साठी धावून जातो ? त्याना चालता सूध्दा येत नसूनही हया मँडम त्या महीले साठी 35 /35 कि. मी गेली आहे सलूट या उषा पानसरे मँडम ला व याचा कार्याला त्या लवकर च बर्‍या होवून जाईल व प्रत्येक श्त्री ची ढाल बनून खंबिर पणे उभा राहतील आमचा कडून शूभेच्छा सूशिलाबाई व ईतर महीला

येळगांव येथे 300 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारा

0

 

अजहर शाह मोताळा

तिन मजली सुसज्ज इमारत विना मोबदला उपलब्ध करून देण्यासाठी लोकनेते विजयराज शिंदे यांचा पुढाकार

जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी व सूचना

बुलडाणा:- बुलडाणा जिल्हयात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला असून रुग्णाची रोजची वाढती संख्या हजारावर गेलेली आहे.त्या प्रमानात जिल्हा आरोग्य यंत्रणा रुग्णाना सेवा देताना कमी पड़त आहे.बुलडान्यात सुरु असलेले स्त्री रुग्णालय इमारत व मूकबधिर विद्यालय येथील कोविड केअर सेंटर फुल झालेले असून आता येणाऱ्या रुग्णाना बेड उपलब्ध होत नाहीये त्यामुळे त्यांची, नातेवाइकांची प्रचंड हेळसांड होत आहे. यासाठी बुलडाणा जिल्हयाच्या ठिकाणी नव्याने अधिक खाटांचे कोविड केअर सेंटर उभरणे अत्यावश्यक झाले आहे, ही बाब लक्ष्यात घेऊन आज माजी आमदार विजययराज शिंदे यांनी चिखली रोड येळगाव स्थित आपल्या संस्थेची तिन मजली सुसज्ज इमारत 300 खाटांचे नविन कोविड केअर सेंटर उभरण्यासाठी “विनामूल्य” उपलब्ध करून देण्याची इच्छा जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून लेखी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

पत्रात नमुद आहे की, चिखली रोड ला टच असणारी संस्थेची येळगाव हद्दीतील गट नं 37 मध्ये तिन मजली इमारत सुस्थितित तयार आहे. सद्यस्थितीत सदर इमारत संस्थे अंतर्गत शैक्षणिक उपक्रम सुरु होते परंतु कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव व शासनाच्या आदेशाने हे सर्व उपक्रम सध्या बंद आहेत. सदर इमारत ही सर्व सुविधांनी सुसज्ज असून इमारतिला विजेची संपूर्ण व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, 50 हजार स्वेअर फुट संपुर्ण RCC बांधकाम केलेल्या 25 वर्ग खोल्या हॉल सुस्थितित आहे.सदर इमारतीत अंदाजे 300 खाटांचे कोविड केअर सेंटर सहज उभे राहु शकेल. इमारतीला निसर्ग रम्य वातावरण असून मोठे मैदान सुद्धा उपलब्ध आहे.सद्य स्थितीत कोरोना काळात वाढती रुग्णसंख्ये मुळे उपलब्ध असलेले कोविड केअर सेंटर हे फुल झाल्याने रुग्णाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.जागे अभावी रुग्णाना जिव गमवावा लागत आहे.खासगी हॉस्पिटलचीही तिच परिस्थिति असल्याने शिवाय गरीब रुग्णाना नाइलाजाने तिथे अव्वाच्या सव्वा बिले मोजावी लागत आहे.
बुलडाणा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने संपूर्ण जिल्ह्या भरातून म्हणजेच जळगाव जामोद,मेहकर पासून रुग्ण बुलडाणा येथे 100 किमी अंतरावरुन उपचारासाठी येत आहे. ऑक्सीजन बेड च्या कमतरतेमुळे रुग्णाचे दगावन्याचे प्रमाण ही वाढले आहे.

त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून संस्थेच्या वतीने येळगाव येथील ही तिन मजली सुसज्ज इमारत आम्ही 300 खाटांचे कोविड केअर सेंटर उभरण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यास आम्ही तयार आहोत जेणेकरून रुग्णाचे जागे अभावी,बेड अभावी हेळसांड होणार नाही तसेच मेहकर,लोनार,सिंदखेड़ राजा,देऊळगाव राजा,चिखली,बुलडाणा या घाटावरिल तालुक्यातुन येणारे रुग्ण यांना येथे उपचार देता येईल व बुलडाणा शहरातील कोविड केअर सेंटर वर ताणही पडणार नाही.

तरी याबाबत विचार करून 300 खाटांचे एक मोठे कोविड केअर सेंटर जिल्ह्याच्या ठिकाणी उभे करण्यासाठी इमारतीचे तात्काळ आपन स्वतः व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समवेत स्थळ निरीक्षण करून कोविड केअर सेंटर उभारन्यासाठी आपल्या पुढाकाराने युद्ध स्तरावर सकारात्मक प्रयत्न करावे,अशी सूचना व विनंती माजी आमदार विजयराज शिंदे यांनी व्यक्त करून दाखविली आहे.यावेळी किसान मोर्च्या चे प्रदेश सचिव दिपकजी वारे,तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे उपस्थित होते.

#जिल्हाधिकारी सकारात्मक :
सदर मागणी व सूचना विचाराधीन असून आपन याबाबत सकारात्मक असून लवकरच इमारतीची पाहणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

कोरोनाकाळात ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे कार्य अद्वितीय – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

0

 

कन्नड तालुक्यात घेतला आढावा
संभाजीनगर : जागतिक महामारी असलेल्या कोरोनाची सुरवात मेट्रो शहरात झाली. मात्र हळूहळू वर्षभरात त्याने ग्रामीण भागात शिरकाव केला. सध्या संभाजीनगर जिल्ह्यात शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त रुग्ण आढळत आहे. या परिस्थितीत ग्रामीण भागातील आरोग्य भागातील आरोग्य यंत्रणेचे कार्य अद्वितीय आहे. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचारी व डॉक्टर यांचे आभार मानत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कौतुक केले.
राज्य सरकारने शक्य होईल तितकी मदत केली आहे. मात्र ग्रामीण भागात अधिकारी व कर्मचारी कंटाळा करतात, असा भ्रम आता दूर झाला आहे. वर्षभरापासून कुटुंबापासून दूर राहत अनेक जण सेवा करत आहे. यावेळी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या निधीतुन उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटरचा आढावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतला.
ग्रामीण भागातील जनतेने न घाबरता धैर्याने या संकटाला तोंड द्यावे, आम्ही प्रशासकीय पातळीवर सर्व मदत मिळवून देऊ, मात्र काळजी घ्या, असे ते म्हणाले.
ग्रामीण रुग्णालय कन्नड येथे भेट देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंग राजपूत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे, नगरसेवक बंटी सुरे, शहरप्रमुख सुनील पवार, माजी उपसभापती तथा सरपंच अशोक दापके, माजी उपनगराध्यक्ष डॉ. सदाशिव पाटील, उपतालुकाप्रमुख शिवाजी थेटे, लंकेश गायकवाड, रामराजे देशमुख, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार, आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत गावंडे, डॉ. मनीषा मोतींगे, तहसील व पोलीस प्रशासन आदींची उपस्थिती होती.

सामाजिक बांधिलकी जपत हर्षल पाटील फदाट यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा परिसरात कौतुकाचा वर्षाव

0

 

मित्रांना पार्टी देणं, मोठमोठे समारंभ, जेवणावळी यावर मोठया प्रमाणावर होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन बोरगाव येथील युवा नेते,हर्षल फदाट व युवामित्र परिवाराने बोरगाव बु!! येथे कोरोना रोगाची जनजागृती करुन मास्क व सॅनिटायजर वाटप करीत आपला वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा केला. त्यामुळे परिसरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

हर्षल पाटील यांनी याअगोदर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक कामे राबून जनजागृती केली आहे. तसेच विद्यार्थी व शेतकरी यांचे प्रश्र्न लावुन धरुन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम ते करतात….

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक बांधिलकी जपत युवा नेते हर्षल पाटील यांच्या वतीने बोरगाव बु!! येथे परिसरामध्ये
मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात आले. यावेळी *विनोद पाटील फदाट, सोमनाथ चव्हाण(सर) वैभव फदाट, सुनील फदाट,शुभम कर्हाडे, स्वप्निल चव्हान, वैभव शेठ खंदाडे, रविंद्र फदाट गणेश फदाट,अंकुश चव्हाण, शुभम फदाट
व मोठ्या प्रमाणावर त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

संपूर्ण राज्यात कोरोनाचे सावट असुन नागरिकांनी सतर्क राहून . प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काळजी पूर्वक पालन केले पाहिजे कोरोना संसर्गापासून बचाव करायचा असेल तर प्रत्येक नागरिकांना मास्क व सेनिटायजर वापरणे गरजेचे आहे. असे युवा नेते हर्षल पाटील फदाट यांनी नागरिकांना आवाहन केले”

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती ऑनलाईन गठित करण्यात सरकार परवानगी-आमदार राजेश एकडे.

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

राज्यासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंनदिवस वाढत आहे.नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती गठित न झाल्यामुळे या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी सादर केले अर्ज प्रलंबीत आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जावर आपल्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही परिणामी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा तालुक्यातील शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती गठित करण्यासाठी ग्रामसभेच्या ठरावाची आवश्यकता असते परंतु सध्या महाराष्ट्र राज्य सह बुलढाणा जिल्ह्यात देखील कोरोना महामारीची अत्यंत दयनीय परिस्थिती असून रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे परिणामी राज्य शासनाने ग्रामसभा आयोजित करण्यावर निर्बंध घातले आहे.त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत विविध योजनांचा लाभ मिळणेबाबत शेतकऱ्यांनी सादर केलेले अर्ज यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने या योजनेपासून माझा पात्र शेतकरी बांधव वंचित आहे हीच बाब लक्षात घेता, मलकापूर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री.राजेश एकडे यांनी राज्याचे कृषिमंत्रीमा.ना.श्री.दादाजी भुसे,राज्यमंत्री डॉ.विश्वजीतजी कदम, कृषी विभागाचे प्रधान सचिव मा.एकनाथजी डवले,मा.प्रकल्प संचालक,नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना याना या योजने अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती गठीत करण्यास परवानगी मिळणेबाबत दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी ई-मेल द्वारे निवेदन सादर केले होते राज्याचे कृषिमंत्री मा.ना.
श्री.दादाजी भुसे यांनी सदर बाबत तात्काळ दखल घेऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती गठीत करण्यासा करण्यासाठी प्रत्यक्षात ग्रामसभा न घेता ऑनलाइन पध्दतीने ग्राम सभा घेण्यास परवानगी दिली असून त्याबाबत त्यांनी विभागाला सूचना केल्या व कृषी विभागाने आमदार श्री. राजेश एकडे यांनी ईमेल केल्यानंतर तात्काळ पत्र क्रमांक व्हीपीएम -२०२१/प्र.क्र.३१२/पंरा-३ दिनांक २८ एप्रिल २०२१ अन्वये अप्पर मुख्य सचिव ग्रामविकास व राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर बाबत ग्रामसभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत गाव पातळी वरील ग्राम कृषी संजीवनी समिती गठीत करण्यास परवानगी दिली आहे .त्यामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज दाखल केले आहेत त्यांना या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे तसेच सदर योजनेच्या वैयक्तिक लाभाच्या योजने अंतर्गत बीज उत्पादन कार्यक्रम सुद्धा सुरू करणे बाबत ग्रामसभेचा ठराव ऑनलाइन पद्धतीने प्राप्त होणार असल्याने त्याचा देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मलकापुर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार श्री.राजेश एकडे यांनी शासना कडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. व आमदार श्री राजेश एकडे यांचे शेतकरी बांधवांच्या वतीने अभिनंदन होत आहे.