Home Blog Page 479

चुंचाळे येथील तरुण धावला गरजूंच्या मदतीसाठी

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

चुचाळे.बोराळे  गावातील पेशंट यांना आता फक्त्त इंधन वर हॉस्पिटल साठी गाड्या मिळणार, कोरोना महामारी मुळे ऍम्ब्युलन्स ची कमतरता भासत आहे, गरजू पेशंट साठी वेळेवर गाडी उपलब्ध व्हावी यासाठी गावातील,
मिरखा नूरखा तडवी यांनी आरोग्य सेवेसाठी हे पाऊल उचलले आहे, सध्या मुंबई महा नगर पालिकेत मिरखा तडवी हे वाहन चालक या पदावर कार्यरत आहेत, तडवी समाजाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी ऍम्ब्युलन्स च्या संचालक मंडळ तसेच प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करतात, गावातील आणी समाजातील चांगल्या कामात त्यांचा नेहमीच सहभाग असतो,
यांचा आदर्श घेऊन प्रत्येक तरूणाने मदतीस बाहेर आले पाहिजे,आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनाच मदतीची गरज आहे मात्र ज्यांच्याने शक्य होईल त्यांनी केली पाहिजे.
या कार्याने गावात मिरखा तडवी यांची लोकांविषयी मदत बघून चर्चेला उधाण आले आहे आणि समाजातील व गावातील सर्वत्र यांचे कौतुक होत आहे.

लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी उपविभागीय कार्यालयात तात्काळ घेतली बैठक .

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 24.4.21
लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून वर्धा येथील DHO मा. डॉ. डवले साहेब यांना आमदार समीर कुणावार यांनी सतत पाठपुरावा करून त्यांना हिंगणघाट येथील बैठक घेण्यास विनंती केली. त्यानुसार आज दिनांक 24-04-2021 ला ठीक 12.00 वाजता एस डी ओ कार्यालय हिंगणघाट येथे बैठक संपन्न झाली त्या बैठकीला जिल्हा परिषद चे CO मा. श्री. बडे साहेब, DHO डॉ. डवले साहेब, तहसीलदार श्रीरामजी मुंदडा साहेब, नायब तहसीलदार डॉ. शकुंतलाताई पराजे, BDO संगमित्रा कोल्हे, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. चाचारकर साहेब, हिंगणघाट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किर्तीताई कुचेवार, ठाणेदार संपतजी चव्हाण साहेब सर्वांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये हिंगणघाट येथील लसीकरण तातडीने होण्याबाबत चर्चा केली आणि यावेळी हिंगणघाट शहराची लोकसंख्या 01लाख 20 हजार पाहता या ठिकाणी दोनच लसीकरण केंद्र सुरू असून याठिकाणी पुन्हा दोन लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली त्यावर चर्चा होऊन आरोग्य विभागाचे मनुष्यबळ लक्षात घेता त्याच प्रमाणे जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या लसीकरणाचा साठा लक्षात घेता त्यांनी एक केंद्र जी बी एम एम हायस्कूल मध्ये सुरू करण्यास मंजुरी दिली असून यासाठी लागणारा स्टॉप त्यांनी घेण्याचे आरोग्य विभागाला सुचविले असून सोमवार पासून हिंगणघाट जी बी एम एम हायस्कूल मध्ये सुद्धा लसीकरणाला सुरुवात होणार आहे लसीकरणाचे डोज हिंगणघाट मध्ये कुठेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही DHO डॉ. डवले साहेब यांनी या बैठकीत सांगितले.
हिंगणघाट शहरात तसेच ग्रामीण भागात जे कोरोण टाईन पेसेंट्स आहे त्या कोरोन टाईन पेशंटला किमान सात दिवसाचे औषधे देण्यात यावी अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली.
कोरोन टाइन असलेल्या प्रत्येक पेशंटला त्यांच्या घरापर्यंत औषधी पोहोचण्याचे काम आरोग्य विभागाने तातडीने करावे जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील लक्षणे वाढणार नाही या प्रकारची मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली व ती मान्य करून औषधी देणे सुरू झाले.
कोरोना बाधितांच्या नातेवाईकांची व घरच्या लोकांची प्रोटोकॉल प्रमाणे चाचण्या RTPCR व ANTIGEN टेस्ट व्हावी जेणेकरून पॉझिटिव्ह असलेल्या लोकांची टेस्टिंग होईल त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल.
हिंगणघाट येथील नगरपालिका तर्फे शहरासाठी औषधी चा साठा देण्याचे नगर परिषद ने मान्य केले असून शहरांमध्ये जे कोरोन टाईन पेशंट आहे त्यांच्या घरापर्यंत औषधी चा साठा पोहोचवण्याचे काम नगरपरिषद करणार आहे असे मुख्याधिकारी मा. जगताप साहेब यांनी मान्य केले असून औषधी देण्यास सुरुवात झाली आणि औषधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मा. जगताप साहेब यांनी दिली.
तसेच सिंधी रेल्वे येथील PSC ला RTPCR व ANTIGEN टेस्ट सुरू करण्यात यावी अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली त्या मागणीनुसार DHO डॉ. डवले साहेब यांनी सिंधी रेल्वे येथे ANTIGEN टेस्ट उद्यापासून सिंधी रेल्वे PSC येथे सुरु करणार असल्याचे कळविले असून RTPCR टेस्ट सुरू करण्या करिता लवकरच विचार करू असे त्यांनी सांगितले.
कोरोनाला थांबविण्यासाठी लसीकरण हेच एक प्रभावी माध्यम असून जितके जास्त लसीकरण करता येईल तेवढे लसीकरण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि जनतेनी लसीकरण घेतले पाहिजे व शासनाकडून त्यांना लसीकरण देण्यात आले पाहिजे त्यामुळे कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यामध्ये आपल्याला निश्चितच यश मिळणार आहे.
कोरणा चा वाढता प्रकोप पाहता जनतेने अत्यंत सावध राहणे गरजेचे असून कोरोना चा प्रकोप वाढत असून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असून अनेकांना ऑक्सीजन बेड मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे जनतेला कळकळीचे आवाहन आहे की त्यांनी घराबाहेर पडू नये कोव्हिड च्या त्रिसुत्री चे पालन करावे व स्वतःचा जीव वाचवावा असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी यावेळी केले.

लीलाधर मडावी (सामाजिक कार्यकर्ता ) यांची जिल्हाधिकार्‍यांना निवेदनातून मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करा !

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट:- 24.4.21 शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.हिंगणघाट शहर हे उद्यौगिक शहर म्हणून ओळखले जाते त्याच बरोबर या शहराची बाजारपेठ सुध्दा मोठी आहे. हिंगणघाट शहरात मोठी सुतगीरणी व मिल असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात मिल मजदुर वर्ग राहतो. या मध्ये महिला, पुरूष व युवा प्रवर्गातील मजुरांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
हिंगणघाट शहरातील मोठ्या सुतगीरणी व मिल सुरू असल्यामुळे मजदुर वर्गाला कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याचा आधिक धोका आहे. त्यामुळे मिल मालकांकडून मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लिलाधर मडावी यांनी जिल्हाधीकारी प्रेरणा देशभ्रतार यांना निवेदनातून केली आहे.
वास्तविक पाहता आपल्या संपुर्ण हिंगणघाट तालुक्यासह जिल्हाची परीस्थीती अतिशय चिंताजनक आहे.दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रूग्णलयातील ताण सुध्दा वाढत आहे. प्राणवायु व व्हेंटिलेटर अभावी रूग्णांचे हाल होत असून अनेकांचा मृत्यु झाला आहे. व शहरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.जेणेकरून सामान्य घरून आलेल्या मिल मजदुराला कोरोना विषाणुचा संसर्ग होणार नाही आणी मानसिक दुष्ट्या खचलेल्या मजदुर वर्गावर आर्थिक बोझा वाढणार नाही व त्याच्या कुटुंबाची गय होणार नाही. या संपुर्ण परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेता ताबडतोब निर्णय घेवून शहरातील मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करण्यात यावे असे मत सामाजिक कार्यकर्ते लिलाधर मडावी यांनी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केले आहे.

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याला धोका आठवडी बाजारातील कंपोझ डेपोच्या पॅलास्टीक जानवाराने खाल्ले मुळे जनवारानां जीव गमवावे लागले…..

0

 

भगवंत ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर

=नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या आठवाडी
बाजारा लागुन असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या प्लेटवर नगरपंचायतीच्या स्वच्छता अभियान अंतर्गत संपूर्ण नगरा मधील घरोघरचा व शहरातील
केरकचरा जमा करुन आठवडी बाजाराला लागुन असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या प्लेटवर कंपोस्ट डेपो म्हणून या खाली
जागेवर प्लास्टिक पिशव्या वार्ड नंबर पाच लागुन आहे व त्या वार्ड
बरेच कुंटुब कायमस्वरूपी वास्तव्यात करीत आहे व तेथील
नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक , प्रदुषण हवेच्या दिशेने नागरिकांच्या घरात जात असुन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून,पण नगरपंचायत च्या प्रशासकीय अधिकारी मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसून येते आहे पण नगरपंचायत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कचर्याची नियोजित जागेची निवड अद्याप पर्यंत कुठलेच नियोजन केले नाही त्यामुळे या खाली जागेवर प्लास्टिक पिशव्या पासुन मोकाट जनावरे आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका उदभवत आहे
त्यामुळे या कार्याला रात्री बेरात्री आग सुध्दा लागलेली आहे.आम्हचे प्रतिनिधींनी प्रत्येक्षात पाहुनी केली असता रहिवाश्यांनी सांगितले की आम्हाला प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की आम्हाला घरात पत्त्या उघडुन येतात मोकाट जनावरे सुध्दा बरीचशी पण्ण्या खावुन केलीत रात्री बेरात्री आग सुध्दा लागलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या समस्ये कडे नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी किती दिवसात नागरिकांच्या आरोग्याचा खेळ थांबवण्यात यशस्वी करण्यासाठी सक्षम आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकां मधे चर्चेचा व विषय सुरू आहे.

एक चार वर्षाच्या चिमुकल्यांनी ठेवला रोजा

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शहरातील सुर्दशन चित्र मंदीर चौक डांगपुरा या परिसरात राहणारे युवा सामाजीक कार्यकर्ते अल्ताफ शेख समद यांच्या चार वर्षीय चिमकुल्या मुसखर शेख यांने पवित्र रमजान महीन्यातील रोजा ( उपवास ) ठेवले , मुसखर शेख याने दाखवलेल्या या धाडसाचे समाज बांधवांमध्ये सर्वत्र कौत्तुक होत असुन , त्यास आजी ,आई, वडील, काका पत्रकार काबीज शेख यांनी आशीर्वाद दिले आहे. कोरोना आमच्या देशाला मुक्ती दे अशी प्रार्थना चार वर्षीय
शेख यांनी काल आपला पवित्र रमजान चा पहिला उपवास ठेवल होता उपास सोडण यावेळी त्यांनी ही प्रार्थना केलीचार वर्षीय मुसर्खर शेखने ठेवले पवित्र रमजानचे रोजा त्याच्या धाडसाचे सर्वत्र होत आहे कौत्तुक

वर्धा सावंगी मेघे येथे शंभर बेडचे कोविड हॉस्पिटल खासगी तत्वावर कोविड रुग्णाच्या सेवेत

0

 

सचिन वाघे वर्धा

23.4.21
महात्मा गांधी आर्युवेद महाविद्यालय सालोड हिरापूर, वर्धा. रूग्णालयात शंभर बेड्सचे खासगी करोना रूग्णालय करण्यात आले आहे.
वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पूर्णत: अतीगंभीर नसूनही ज्यांना भरती होण्याची गरज भासत असेल, अशा बाधित रूग्णांना या ठिकाणी भरती करण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. ज्या रूग्णाकडे गृह विलगीकरणाची व्यवस्था नाही, अशांची उपचार येथील करोना दक्षता विभागात केले जाणार आहे. रूग्णालयातील वास्तव्य कालावधीत *तज्ञांचे मार्गदर्शन, रूग्णांना चहा, नाष्टा, सकस आहार, औषधोपचार, वैद्यकीय समुपदेशन, आर्युवेद तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ध्यानधारणा, योगा, आर्युवेदिक काढा, अशा उपयुक्त सुविधा मिळणार आहे.(with 24×7 Oxygen Backup) व आवश्यक भासल्यास सावंगी मेघे रूग्णालयात दाखल करण्यात येईल.

संपर्क: +9325013812

*

तहसीलदार, बि.डि.ओ . तालुका आरोग्य अधिकारी, यांनी केली साखरखेर्डा येथील कोविड सेंटर साठी सहकार विद्या मंदिर याची पाहणी ।

0

 

(कोवाड सेंटर साठी सहकार विद्या मंदिराला पसंती )

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

वाढता साखरखेर्डा परिसरामध्ये कोरोना चा संसर्ग बघता ‘साखरखेर्डा येथे कोरोना रुग्णांसाठी कोवाड सेंटर व्हावे .ही मागणी अनेक दिवसांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी
पालकमंत्री डॉ . राजेंद्रजी शिंगणे यांच्याकडे लावून धरली होती .
त्यादृष्टीने पालकमंत्र्यांनी होकार सुद्धा दिला होता !त्यादृष्टीने अगोदर स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी श्री पलसिद्ध संस्थान येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीची पाहणी केली होती .परंतु श्री पलसिद्ध संस्थान हे साखरखेरडा गावातच येत असल्यामुळे ‘तिथे कोविड सेंटरची उभारणी करणे कितपत योग्य हा प्रश्न पडल्यामुळे !

नवीन जागेचा शोध सुरू झाला ‘
त्यादृष्टीने ‘साखरखेर्डा येथील सूतगिरणीच्या जवळील ‘सहकार विद्या मंदिर ची ‘कोविड सेंटर उभारण्यासाठी ‘ दिनांक 23 एप्रिल ला पहाणी
करण्यात आली ‘
यावेळी सिंदखेडराजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ‘श्री गुणावंत ‘तहसीलदार श्री सुनील सावंत .तालुका आरोग्य अधिकारी डॉ .महेंद्रकुमार साळवे ‘साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप कुमार सुरुशे,साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे ‘दुय्यम ठाणेदार दीपक राणे .

माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ जाधव ‘साखरखेर्डा नगरीचे सरपंच दाऊद सेठ कुरेशी ‘तलाठी ‘मांडगे ‘तलाठी श्री शिंगणे ‘तलाठी पवार मॅडम ‘ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष अमित जाधव ‘
उपसरपंच प्रवीण पाझडे ‘माजी सरपंच कमलाकर गवई .माझी पंचायत समिती उपसभापती सुनीलभाऊ जगताप ग्रामपंचायत सदस्य दिलीप बेंडमाळी ‘ललित शेठ अग्रवाल ‘
ग्रामपंचायत सदस्य सय्यद रफिक ‘
माजी सभापती राजू ठोके ‘सहकार विद्या मंदिर चे प्राचार्य ‘आदी पाहणी करतांना उपस्थित होते ‘

यावेळी आता गटविकास अधिकारी ‘ तहसीलदार ‘ तालुका आरोग्य अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे !

व लवकरात लवकर साखरखेर्डा येथे कोविंड सेंटर सुरू व्हावे हीच सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे ‘
त्यादृष्टीने पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे प्रयत्नरत असून ‘त्यांच्या माध्यमातून साखरखेर्डा येथे लवकरच कोरड सेंटर सुरू होईल अशी अपेक्षा आहे !

वडीला नंतर तो ही झाला सैन्यदलात भरती ! ११ वर्षांनंतर शिंदी येथील तरुण सैन्यभरतीत दाखल !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मनामध्ये इच्छा ‘आकांक्षा ‘आणि जिद्द . असली तर मनुष्याला पाहिजे ते मिळू शकते,
अभ्यास जिद्द चिकाटी च्या भरोशावर सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील तरुण .प्रवीण लक्ष्मण चांदोरे हा सैन्य दलामध्ये (जी .डी )मध्ये भरती झाला आहे ‘
सिंदखेडराजा तालुक्यातील रिलेशन भरती ही ८ डिसेंबर रोजी बंगलोर येथे आयोजित केली होती ‘
त्यानंतर 12 डिसेंबरला मैदानी चाचणी झाली .
या मैदानी चाचणी मध्ये सुद्धा प्रवीण पास झाला .व त्यानंतर मेडिकल मध्ये सुद्धा पास झाला ‘
अशा तर्‍हेने प्रवीण हा संपूर्ण आवश्यक असलेल्या सैन्यदलातील परीक्षा पास होत गेला !
त्यानंतर कागदपत्रांची तपासणी झाली व नंतर परीक्षेतही तो पास झाला ‘

28 फेब्रुवारीला परीक्षा रद्द झाली होती .त्यानंतर परत एका महिन्याच्या कालावधीनंतर 28 मार्च 2021 ला परीक्षा संपन्न झाली .व 21 एप्रिल रोजी निकाल लागला व त्यामध्ये सुद्धा प्रवीण पास झाला ‘

अशा तर्‍हेने तब्बल ११ वर्षांनंतर शिंदीतील एखादा तरूण सैन्यभरती मध्ये दाखल होत आहे ‘

GD,जी डी मध्ये प्रवीण दाखल झाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे ‘

प्रवीण चांदोरी चे वडील लक्ष्मण चांदोरे हे देखील सैन्यदलामध्ये होते ‘हो त्यांनी सुद्धा वीस वर्ष देशाची सेवा केली ‘
व आज त्यांचा लहान मुलगा सुद्धा सैन्यदलामध्ये भरती झाला ।
प्रवीण चांदोरी चे कठीण परिश्रम हेच त्यांच्या यशाचे गमक होय !

तरुणांनी सुद्धा देश सेवेसाठी तत्पर राहावे हीच अपेक्षा !

शेतकऱ्यांना पिकवीमा तात्काळ मंजूर करा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना प्रसेनजीत पाटिल यांची पत्राद्वारे मागणी….

0

 

गजानन सोनटक्के जळगांव जा

जळगांव जा.प्रतिनिधी:

या वर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. महसूल पिककापणी अहवाल व आणेवारी सुद्धा ५० पैश्याच्या आत आहे.त्यामुळे पिकवीमा मंजूर होण्यास शेतकरी पात्र आहेत. परंतु, या वर्षी पिकवीमा कंपन्या शेतकऱ्यांना अद्यापही पिकवीमा मंजूर करायला तयार नाहीत. पिकनुकसान झाल्यानंतर ४८ तासाच्या आत क्लेम फॉर्म(सूचना पत्र) भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच विमा मंजूर करण्यात येणार असल्याचे कंपन्यांमार्फत कळवण्यात येत आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर खुप मोठा अन्याय आहे.कारण ४८ तासाच्या आत क्लेम फॉर्म भरण्याच्या कुठल्याच पूर्वसूचना, जनजागृती कंपन्या अथवा कृषि विभागामार्फत केल्या गेली नसल्यामुळे ९९% शेतकरी त्यांच्या हक्काच्या पिकवीम्यापासुन वंचित राहणार आहेत. या संदर्भात आम्ही एल्गार संघटनेच्या माध्यमातून स्थानिक प्रशासनामार्फत वेळोवेळी निवेदन दिले. तसेच ४ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव (जामोद) उपविभागीय कार्यक्षेत्रात10 हजार शेतकऱ्यांचा खुट मोर्चा काढून 13 हजार शेतकऱ्यांचे सामूहिक क्लेम फॉर्म जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत कृषि विभागाला दिले.२२ फेब्रुवारी पासून चालू झालेले शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाच्या विनंतीवरुन एका दिवसात शासनाला सहकार्य म्हणून मागे घेतले. त्यानंतर ९ मार्च रोजी मी स्वतः मा.कृषिमंत्री दादाजी भूसे यांची भेट घेऊन सर्व परिस्थितीवर विस्तृत चर्चा करून निवेदन दिले असता. मा.मंत्री महोदय यांनी सकारात्मक प्रतिसाद देत १ महिण्यात पिकवीमा मंजूर होण्याची हमी दिली होती.त्यावर तात्काळ कारवाई सुरू करून महसूल आयुक्तांना आदेश दिले. पाठपुरावा सुद्धा केला.परंतु, त्याला सुद्धा दीड महिना उलटून गेला. तरीही, पिकवीमा कंपन्या पिकवीमा मंजूर करायला तयार नाहीत. आधीच नापिकीमुळे हवालदिल झालेला शेतकरी या कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेला आहे.लॉकडाऊनच्या या परिस्थितीत शासनावर कुठलाही आर्थिक भार न पड़ता शेतकऱ्यांना पिकवीमा मंजूर झाल्यास त्यांना खुप मोठी आर्थिक मदत मिळू शकेल.तरी आपण शेतकऱ्यांची हि मागणी सकारात्मक घेत पिकवीमा कंपन्यांना लवकरात लवकर पिकवीमा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत हि नम्र विनंती.या संकट काळात सर्व गोरगरीब जनतेला आपण आर्थिक सहाय्य दिले. उद्या शेतकरी वर्गाकडून आर्थिक मदत मागितली जाऊ शकते.परंतु,सरकारी तिजोरीवर कुठलाही भार न पडता हजारो कोटी शेतकरी वर्गाने भरलेला त्यांच्या हक्काचा पीकविमा भेटल्यास त्यांना आर्थिक मदत अगदी योग्य वेळी,पेरणीच्या काळात उपयोगी पडून त्यांना सरकार प्रति सहानुभूती निर्माण होईल व बाजारात पैसा खेळता राहून व्यापारी वर्ग आर्थिक संकटातून मुक्त होईल.मुंग,उळीद,तीळ सोयाबीन,कापूस ह्या सारख्या पिकाचे नुकसान झाले.ते भरून निघणारे नाही.पण,आर्थिक मदतीची गरज न पडता फक्त शेतकरी वर्गाचा पीक विमा कंपन्या नी दिल्यास सरकार वर पडणारा आर्थिक भार कमी होईन शेतकरी सुखी होईल.शांत होईल.ह्यावर ताबळतोब सविनय विचार व्हावा. आपल्या एका आदेशाने राज्यातील कोटीच्या संख्येत असणारा शेतकरी आपणास धन्यवाद देईल.
संवेदनशील असलेला आपला स्वभाव महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गाने बघितला आता अनुभवू द्या. असे उद्गार
प्रसेनजीत किसनराव पाटील
सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती/पणन महासंघ संचालक यांनी काढले.

शेती मशागतीच्या कामाला वेग !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सध्या कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता तसेच शासनाने कोरोना ची संख्या वाढत असल्यामुळे राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे अशा परिस्थितीमध्ये लग्नसराई व इतर कामासाठी विनाकारण फिरण्यावर बंधन आल्यामुळे लोक जास्तीत जास्त वेळ आपल्या शेतीसाठी देत आहे !

सिंदखेडराजा तालुक्यातील बहुतांश शेतामध्ये शेती मशागतीच्या कामाला
वेग आला असून लोक शेतातील नांगरणे ‘वखरणे आदी कामे करण्यामध्ये व्यस्त आहे :

तालुक्यातील ‘शिंदी ‘ गोरेगाव . पिंपळगाव सोनारा ‘ मोहाडी ‘ गुंज ‘ वरुडी ‘रताळी ‘आधी गावा मध्ये शेताची नांगरणी करणे सुरू झाले आहे ‘

वरून कडक लॉक डावून असल्यामुळे लग्नसराई सुद्धा बंद आहे ‘

त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडता येत नाही ‘तसेच कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे त्यामुळे लोक घरात व शेतातच आपला वेळ घालवत आहे !
बहुतांश ठिकाणी शेत मशागतीची कामे सुरू आहे ।