Home Blog Page 480

सिंदखेड राजा तालुक्यात एकूण 557 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण !!ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट :

0

 

…अजूनही ग्रामीण भागातील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता ! !

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सध्या कोरोना रुग्णांची संख्या तसेच कोरोना चा कहर ग्रामीण भागामध्ये जास्त पसरलेला दिसतो !

त्याचे कारणही ग्रामीण भागातील बहुतांश लोक हे अजूनही निष्काळजीपणाने वावरतात तसेच जे कोरोना चे रुग्ण आहेत ते खुलेआम पणाने गावांमध्ये तोंडाला मास्क न लावता फिरत असतात !तसेच जे रुग्ण कोरोना वर मात करून घरी आलेले आहेत ते सुद्धा तोंडाला माक्स न लावता फिरत असतात !

त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कोरोना वाढलेला आहे !
सिंदखेड राजा तालुक्यामध्ये 29 एप्रिल पर्यंत ‘557 कोरोना चे ऍक्टिव्ह रुग्ण असून ‘त्यातील आडगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत =एकूण 128 कोरोना चे रुग्ण आहेत ।

..किनगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 65 कोरोना चे रुग्ण आहेत !

…मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत .68 रुग्ण आहेत !

तर सर्वाधिक तालुक्यातून रुग्ण साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आहेत एकट्या साखरखेर्डा येथे एकूण 56 कोरोणाचे रुग्ण आहेत -तर साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत एकूण 144 कोरूना चे रुग्ण आहेत !

असे एकूण तालुक्यांमध्ये 557 ऍक्टिव्ह कोरोना चे रुग्ण आहेत !

तर अनेक रुग्ण हे बाहेर नाव येऊ नये म्हणून कोरोनाची चाचणी करतात ते वेगळेच असतील !

त्यामुळे दवाखान्या मध्ये बेड उपलब्ध नाहीत ऑक्सिजन मिळत नाहीत इंजेक्शन मिळत नाहीत अशा परिस्थिती मध्ये ग्रामीण भागातील लोकांनी तोंडाला मास लावा व घरातच राहावे !किंवा शेतामध्ये काम करत असताना जाताना मास्कचा वापर करावा !

काळजी घ्यावी असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र कुमार साळवे यांनी केले आहे !

कंटेनरने उपजिल्हा रुग्णालय चौकात पायदळ जाणाऱ्या युवकास चिरडले

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 29.4.21

स्थानिक उपजिल्हा रुग्णालय येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उडान पुल चढतांना नागपुर कडून हैदराबाद कडे जाणाऱ्या कंटेनरने पायदळ जाणाऱ्या भोजराज रामचंद्र घाटुडे राहणार संत तुकडोजी वार्ड वय ३५ हा सरकारी उपजिल्हा रुग्णालयाकडे जातांना भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने क्रमांक N.N.01AB1069 ने चिरडले. हा अपघात सकाळी 10.15 चे दरम्यान घडला असून कंटेनर हिंगणघाट पोलिसांनी दारोडा टोल नाक्यावरुन पकडला त्यावेळी चालक व वाहक कंटेनर सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. तेव्हा हा कंटेनर दारोडा टोल नाक्यावरुन हिंगणघाट पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेचा पुढील तपास पी.एस.आय.गंगाधर पेन्दोर, महेंद्र आकरे, दिपक मस्के, करीत आहे.

ग्रामीण भागात वाढता कोरोना चा प्रादुर्भाव बघता ! ..गावातच नागरिकांना मिळावी कोरोनाची लस .लसीसाठी गावातील सरपंच आग्रही !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये बहुतांश गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अतिशय वेगाने वाढत आहे आणि ग्रामीण भागातील लोक अजूनही निष्काळजीपणाने वावरत आहे कोरोनावर मात करून घरी परतले ते लोक अजूनही तोंडाला माक्स लावत नाही ही वस्तुस्थिती आहे तसेच अनेक लोक हे अजूनही गोळक्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी गप्पा मारताना आपल्याला दिसत आहे .

तसेच अनेक ठिकाणी कोरोनामुळे लोक उपचाराअभावी मृत्युमुखी पडत आहे .

या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरण स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुरू आहे ।
परंतु पाहिजे तसा तालुक्याला लसीचा पुरवठा होत नाही त्यामुळे लसीकरण हे सुरळीत पणाने सध्या दिसत नाही .

अनेक लोक लस घेण्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जातात परंतु तिथे गेल्यावर त्यांना सांगितले जाते लस उपलब्ध नाही त्यामुळे खेड्यापाड्यातील लोक मोठ्या आशेने लस घेण्यासाठी जात असतात परंतु संपूर्ण काम सोडून त्यांना लस घेण्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते ‘

म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये फक्त स्थानिक लोकांचीच लसीकरण करावे जेणेकरून लसीकरणासाठी गर्दी होणार नाही लोकांचाही वेळ वाया जाणार नाही !

खेडे गावातील लोकांच्या लसीकरणासाठी गावातच लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्यावी जेणेकरून लोकांचा त्रास वाचेल !

शिवाय गावातच लसीकरणासाठी बहुतांश गावातील सरपंच आग्रही आहे .

कारण खेड्यापाड्यात कोरोणाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे व लसीकरण हे संथ गतीने सुरू असल्यामुळे रुग्णांची संख्या आणखीन वाढत आहे ! .त्यामुळे गावातच लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी लोकांनी केली आहे !!

….!गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे शिवाय लस घेण्यासाठी सामान्य लोकांना साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावे लागते कुठलीही वाहनाची व्यवस्था नसल्यामुळे उन्हातानात लोक पायी जातात व त्यामुळे तिथे कधी लस उपलब्ध नसते त्यामुळे ते रिकाम्या हाताने परतावं लागतं त्यामुळे गावातच लसीकरणाची सोय उपलब्ध व्हावी !
….. .सौ अर्चना विनोद खरात ( सरपंच शिंदी )

…..गावात लसीकरणाची सोय उपलब्ध झाली तर लोकांचा वेळही वाचेल व खर्चही वाचेल अनेक वयस्कर लोक गाड्यांची सुविधा नसल्यामुळे पाणी जाऊ शकत नाही त्यामुळे गावात जर लसीकरण याची सोय झाली तर चांगलं होईल …

…सौ अलकाताई भानुदास लव्हाळे ।सरपंच रताळी )

…..साखरखेर्डा ते पिंपळगाव हे सात किलोमीटरचे अंतर आहे पिंपळगाव येथून साखरखेर्डा जाण्यासाठी सर्वसामान्य माणसाला कुठल्याही वाहनाची व्यवस्था नाही तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे लसीकरणासाठी लोक पायी जातात तर कधी लस उपलब्ध असते तर कधी लस उपलब्ध नसल्यामुळे ते माघारी येत असतात त्यामुळे त्यांचा वेळही वाया जातो व कामही वाया जाते .
त्यामुळे गावातच लसीकरण व्हायला पाहिजे यासाठी वेळ पडल्यास पालकमंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांना सुद्धा बोलू !

.. तोताराम ठोसरे ( सरपंच पिंपळगाव सोनारा )

दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे शिवसेना विद्यार्थी सेनेचे आदित्य काटे यांची मागणी !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

दहावी परीक्षा रद्द झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा …. कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे महाराष्ट्र सरकार ने दहावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे एकंदरीत महाराष्ट्रातील परिस्थिती बघता महाराष्ट्र सरकारने या निर्णयस सोबत सर्व विद्यार्थी व पालक सकारात्मक आहेत असे निदर्शनास येते महाराष्ट्रात असे प्रथमच घडत असावे. परंतू आजची परिस्थिती लक्षात घेता या कोठोर निर्णय बाबत सरकारचे आभार मानले पाहिजे. परंतु हा निर्णय घेत असताना अनेक बाबीचा राज्य सरकारने करायला पाहिजे त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभम निर्णय झालेला आहे निर्णय योग्य जरी असला तरी कोरोनाच्य प्रादुर्भाव मुळे मोठ्या आर्थिक संकट सामान्य सोमोर आहे . आजची परिस्थिती खूप बेताची आहे असल्याने विषेशबाब म्हणजे न सामान्य नागरिक. शेतकरी.कामगार. कष्टकरी मजूर हे आपल्या पाल्यांना शासकीय शाळेत पाठवतात परीक्षा रद्द झाली त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करावे. नक्कीच विद्यार्थ्यांना मदत होळीच्या त्यामुळेच या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करा
अशी मागणीही यावेळी विद्यार्थी सेनेचे आदित्य काटे यांनी केली आहे !

यावल महसुलच्या अवैद्य गौण खनिज वाहतुकीविरुद्ध कार्यवाहीत दोन डंपर दोन ट्रॅक्टर जप्त वाळु माफीयाचे धाबे दणाणले

0

 

यावल ( प्रतिविधी )विकी वानखेडे

तालुक्यात महसुल प्रशासनाच्या पथकांची विनापरवाना अवैद्य गौण खनिज वाहतुकी विरूद्ध धडक मोहीम दोन दिवसात दोन डंपर दोन ट्रॅक्टर वर झाली कार्यवाही वाळु माफीयाचे धाबे दणाणले . या संरर्भात महसुलच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार यावल तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन महसुलच्या पथकानेअवैद्य गौण खनिज विरूद्ध उघडलेल्या मोहीम अंतर्गत यावल तालुक्यातील किनगाव येथील मंडळ अधिकारी सचिन जगताप व त्यांचे भागातील तलाठी बामणोद मंडळ अधिकारी मिलींद देवरे व तलाठी , यावल मंडळ अधिकारी शेखर तडवी व तलाठी, साकळीचे मंडळ अधिकारी पि ए कडनोर व तलाठी यांनी वाळु माफीया विरुद्ध मागील दोन दिवसात राबविलेल्या कार्यवाहीच्या धडक मोहिमेत विनापरवाना अवैद्य मार्गाने वाळुची वाहतुक करणारे दोन डंपर व दोन ट्रॅक्टर तालुक्यातील विविध क्षेत्रातुन कार्यवाहीसाठी जप्त करण्यात येवुन पुढील दंडात्मक कार्यवाही करीता यावल पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले आहे . दरम्यान तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गौण खनिज ची विनापरवाना वाहतुक करणाऱ्या वाळु माफीयाचे चांगलेच धाबे दणाणले आहे .

कासारखेडा ग्रामपंचायत चौकातील महामानव गौत्तम बुद्ध व डॉ . बाबासाहेब आंबेडकर चे फोटो असलेल्या बोर्डावर मारला दगड गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील कासारखेडा येथील ग्राम पंचायत चौकातील महामानव गौत्तम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोखंडी बोर्डावरील असलेल्या फोटोवर गावातील एकाने दगड मारून जातीय भावना दुखाल्याप्रकरणी अखेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , कासारखेडा तालुका यावल येथे दिनांक २५एप्रिल रोजी रात्री १oवाजेच्या सुमारास गावातील ग्राम पंचायत चौकातील समाज मंदीर समोर लावलेले लोखंडी बोर्ड या वर महामानव गौत्तम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असुन गावातील हरिष श्रीराम न्हावी याने दगड मारून जातीय भावना दुखाल्या या संदर्भात ईश्वर आसाराम सोनवणे वय५oवर्ष राहणार कासारखेडा यांनी फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये भाग ५ भादवी कलम २९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजिज शेख हे करीत आहे . दरम्यान या घटनेचा गुन्हा दाखल होत नसल्याने परिसरातील काही कासारखेडा परिसरातील कार्यकर्त्यांनी ऑल इंडीया पॅंथर सेनेच्या जिल्हा अध्यक्ष शरद बावस्कर यांची भेट घेतली व सदर घटने बाबतची सविस्तर माहीती त्यांना दिली त्यानंतर शरद बावस्कर यांनी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेची माहीती दिली व आपण गुन्हा दाखल करावा असे सांगीतल्याने अखेर पोलीस निरिक्षकांनी समय सुचकता बाळगल्याने आज दिनांक २८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

जिल्हाधिकारि यांच्या आदेशाचा नांदुरा शहरात उडत आहे थट्टा

0

 

सुनिल पवार नांदुरा ता.प्र.

रोज शहरामध्ये सकाळी७ते११वाजेपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु करण्याचि परवानगी हि जिल्हाधिकारि साहेबनि दिलेली आहे परंतु नांदुरा शहरात जर बघितले तर जनू एक मोठी बाजारपेठ भरलेली असते कोरोनाचि दिवसान दिवस वाडत चाललेली रुग्णसंख्या हा सर्व याचा च परीनाम आहे.अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दूकाने व प्रतिषठाने बंद ठेवण्याचा आदेश आहे. पन या सर्व आदेशाचि खिल्ली उडवत शहरात जो कोरोना.वाढत आहे याला कुठ.ना कुठ. कोरोना नियंत्रण करनारि प्रशासकीय अधिकारी. यंत्रणाच जिमेदार आहे. अधिकारी हे.फक्त. अकरा वाजता रुट मारच काढतात पन सकाळी सात ते अकरा कापड दुकाने तसेच इतर सर्व दुकाने हि उघडि असुन यात कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे एका एका दुकानात पंधरा ते.विस ग्राहक उभि असतात अत्यावश्यक सेवा सोबत ईतर दुकाने चालू असतात त्या वर प्रशासन कार्यवाहि केव्हा करनार. स्थानिक प्रशासनाने जर बाजार पेठेत गरदी टाळण्यासाठी कार्यवाहि नाही केली तर जिल्हा अधिकारी साहेब यांच्या कडे.शहराचि सर्व परिस्थिती पुरावा निशि पाठवु आनि संबंधित अधिकारेवर कार्वाहि करण्यास लावु नये असे.म.न.से.ता.अध्यक्ष. भागवत भाऊ उगले यांनी व्यक्त केली आहे

ईगल कंपनीचे सोयाबीन कृषी केंद्र धारकांनी विकू नये, विकल्यास जबाबदारी स्वीकारावी लागेल – शिवसेनेचा इशारा

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

खरीप हंगाम 2020 मध्ये ईगल सीड्स , बायोटेक लिमिटेड या कंपनीचे सोयाबीन नांदुरा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी केंद्रांमधून खरेदी करून पेरले होते परंतु 2020 मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी या कंपनीचे बियाणे घेऊन पेरले परंतु ते उगवलेच नाही, अशा नांदुरा तालुक्यातील 132 शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी नांदुरा शिवसेनेच्यावतीने आवश्यक त्या पुराव्यानिशी केल्या होत्या. त्यापैकी फक्त 13 शेतकऱ्यांनाच मदत मिळाली. कृषी विभागाच्या वतीने ना स्थानिक कृषी केंद्र यांनी उर्वरित शेतकऱ्यांना कुठलीही मदत केली ना इंदूरच्या कंपनीने. एक वर्षापासून नांदुरा तालुक्यातला शेतकरी आशेने मदतीची वाट पाहत आहे. परंतु अजूनही नुकसान भरपाई झाली नाही. त्यामुळे आज नांदुरा तहसील या ईगल कंपनीचे सोयाबीन आपल्या तालुक्यात कृषी विषयक दुकानदारांनी ईगल सीड्स बायोटेक कंपनी चे सोयाबीन 2021 मध्ये विकू नये,आणि विकल्यास जर सोयाबीन निघाले नाही तर त्याची पूर्ण जबाबदारी स्थानिक दुकानदारांना घ्यावीच लागेल, अशा प्रकारचे निवेदन नांदुरा तहसील ला शिवसेनेने शिवसेना नांदुरा तालुका वतीने देण्यात आले यावेळी तालुकाप्रमुख संतोषभाऊ डिवरे, राजू काटे, सुनील जूनारे, रवी ईटखेडे, गजानन करांगळे, संजयसिंह जाधव, राम पांडव, गणेश ताठे, दत्ता जुमळे, नंदू खोदले, दीपक जुमडे, जगदीश चोपडे, विशाल फलके, संतोष लाहुडकर, संतोष दिघे, मनोज पाटील, एकनाथ वक्ते, ईश्वर पांडव, बाळकृष्ण गायगोळ, पद्माकर लांडे, महादेव काळे, भिका गायकवाड, विष्णू श्रिरसागर, विशाल हेलगे, विष्णू शिरसागर, मिलिंद हिवराळे, पुरुषोत्तम महाले आदी शिवसैनिक उपस्थित होते.

सेलू (मुरपाड ) कोविड प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावे-सरपंच संदीप ठाकरे

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 28.4.21 तालुक्यातील ९ कि.मी अंतरावरील असलेले सेलू (मु.) हे गाव ११०० लोकसंख्या वस्तीचे असून वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचे महत्त्व लक्षात घेता सर्व गावकरी मंडळीचे “कोविड-१९ रोगाचे तपासणी शिबीर” सोमवारला घेण्यात आले असता ह्यामध्ये तपासणी पथकाने सोबत कोविड तपासणी किट पुरेशी न नेल्याने केवळ ११०० लोकांच्या मधून २५१ गावकरी लोकांची तपासणी करण्यात आली व त्यापैकी ५१ व्यक्ती हे कोरोना प्रादुर्भावाचे बाधित रुग्ण आढळून आल्याने गावातील ७५० लोकांची बाकी असलेली तपासणी केली तर बाधित संख्या जवळपास ३०० चे वर जाणार असल्याची भिती ग्रामपंचायत सरपंच संदीप ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. तेव्हा ह्या गावातील अन्य गावकरी मंडळीची तपासणी लवकरात लवकर करुन हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करावे तसेच मुबलक प्रमाणात शासनाने औषधाचा पुरवठा यासह रोगप्रतिकारक फवारणी करण्यासाठी ग्रामपंचायत सेलू (मुरपाड) याला सहकार्य करुन वाढत्या कोविड रोगावर आळा बसविण्यात पंचायत समितीचे माध्यमातून शासकीय अधिकारी, डॉक्टर सेवा प्रदान करुन हे गाव कोविड प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करावे अशी मागणी सरपंच संदीप ठाकरे यांनी शासनाकडे केली आहे.

डोंगर कठोरा येथे शेतमजुराची विहीरीत उडी मारून पाण्यात बुडुन आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील डोंगर कठोरा येथे एका शेत मजुराने विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन घटनेची पोलीसात करण्यात आली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की डोंगर कठोरा तालुका यावल येथील राहणारे भरत जनार्दन जंगले वय ४५ वर्ष यांनी डोंगर कठोरा शिवारातील विनोद मधुकर राणे यांच्या याच शेतातील विहिरीत काल दिनांक २७ एप्रिल ते २८ एप्रिलच्या दरम्यान विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान काल सायंकाळपासुन भरत जंगले हे घरातुन बाहेर निघाले असता ते परत न आल्याने शोधाशोध घेतले असता त्यांचे मृत अवस्थेतील प्रेत दुपारी एक वाजेच्या सुमारास विहीरीत मिळुन आले . मयत जंगले यांच्या कुटुंबात पत्नी , एक मुलगी, एक मुलगा , आई असा परिवार आहे . याबाबत शेतमालक विनोद मधुकर राणे यांनी यावल पोलीसात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . भरत जंगले यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला, डॉ . प्रितम तायडे यांनी केले .