Home Blog Page 487

यावल शहरात व परिसरात जिल्हा प्रशासनाच्या कोरोना पार्श्वभुमीवर लागु झालेले नवीन संचारबंदी निर्बंधांने कडकडीत बंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर वेगाने वाढत्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काल दिनांक २० एप्रिल रात्री ८ वाजे पासुन संचारबंदी च्या संदर्भात नवीन कडक निर्बंध लावले असुन या नवीन नियमावलीनुसार संपुर्ण व्यवसाय सकाळी ७ वाजेपासुन११ वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याने या नव्या संचारबंदीच्या आदेशाला नागरीकांसह सर्व व्यापारी व व्यवसायीकांनी पहील्याच कडकडीत बंद पाडले आहे . संपुर्ण राज्यात मागील काही दिवसापासुन महाराष्ट्र थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणुसंसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र मृत्युचे तांडव सुरू झाले असुन , राज्य शासनाच्या आदेशाने जिल्हाधिकारी अभीजीत राऊत जळगाव जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्याकरीता नविन संचारबंदीची| नियमावली जाहीर केली असुन , काल रात्री ८ वाजेपासून या संचारबंदीची अमलबजावणीस सुरुवात झाली असुन , आज सकाळच्या ७ वाजेपासुन तर सकाळच्या११ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्गावरील बाजारपेठेत दुकाने सुरू असल्याने नागरीकांची जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदी साठी एकच गर्दी केल्याचे दिसुन आली ,दरम्यान यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी कालच पोलीस वाहनाव्दारे भ्रमणध्वनीद्वारे शहरातील नागरीकांना सुचना देण्यात आले होत्या , या सुचनांची शहरवासीयांनी आपली व्यवसाय कडकडीत बंद प्रशासनाला साथ दिली आहे . यावल बस आगारातुन प्रवासी नसल्याने अखेर काही मोजक्या सुरू असलेल्या सर्व बसफेऱ्या ही रद्द करण्यात आल्याची माहीती एसटी आगाराच्या सुत्रांकडुन मिळाली आहे. यावलहुन बदलुन गेलेले तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे हे यावल येथे पुन्हा रूजु झाल्याची ही काही टवाळखोर मंडळीने खोटी अफवा शहरात पसरविल्याने शहरात विविध ठिकाणी धनवडेसाहेब पुन्हा यावल येथे आले का ? अशी चर्चा देखील काही मंडळी करीत असतांना दिसत होती .

राहुल बोडखे यांनी घेतली रविकांत तुपकरांची भेट

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनीधी सेनगाव

वस्त्रोद्योग महामंडळाचे .अध्यक्ष आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची पं.स.सदस्य राहुल बोडखे यांनी बुलढाणास्थित स्वाभिमानी हेल्पलाईन सेंंटरला भेट घेतली.त्यामध्ये खरिप हंगामात शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले असताना पिक विमा कंपन्यांनी विमा भरुनहि जाचक अटी लावत पळवाटा काढून शेतकऱ्यांना कुठलिही नुकसान भरपाई दिली नाही.शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा प्रश्न, शेतातील विजेचा प्रश्न,अवकाळी गारपीट, केंद्र सरकारने लादलेले कायदे, दिल्लीतील शेतकरी आंदोलन,कोरोना परिस्थिती अशा अनेक विषयांवर विस्तृत चर्चा झाली.राहुल बोडखे यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात चालू असलेल्या कोविड हेल्पलाईन विषयी माहिती रविकांत तुपकरांना दिली.कोरोनाच्या काळात रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून युवक काँग्रेस करत असलेल्या कामाचं तुपकरांनी कौतुक केलं.कोरोना महामारीच्या काळात रूग्णांना सहकार्य करणे म्हणजेच खरं समाजकार्य असे प्रतिपादन रविकांत तुपकरांनी केले.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGO ४५११चे एक दिवशीय काम बंद आंदोलन नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एक दिवशीय काम बंद केले यशस्वी

0

 

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ४५११ च्या
दिनांक १९ /४ / २०२१ ला संपूर्ण महाराष्ट्रात आप आपल्या
ग्रामपंचायत स्तरांवर एक दिवशीय आंदोलन करण्यात आले
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी नांदगाव खंडेश्र्वर शाखेचे वतीने सुध्दा तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचारीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना च्या प्रमुख मागण्या .महानगरपालिका व,जिल्हा परिषद कर्मचाऱ्यां प्रमाणे चतुर्थ श्रेणी लागु करण्याबाबत निरुत वेतन लागू करण्याबाबत भविष्य निर्वाह निधी मिळण्याबाबत व उपदान निधी मिळण्याबाबत , कोरोना काळात आम्ही सर्व ग्रामपंचायत कर्मचारी सेवा देत असल्याने आम्हाला कमीत कमी २५०००००रुपयांचा विमा मिळण्याबाबत इत्यादी मागण्या शासण दरबारी मागण्या करण्यात आल्या तालुक्यातील ग्रामपंचायत वाघोडा, शिवरा,प्रिम्प्रि गावांडा, ढवलसरी ,लोणी ,सार्शी ,कोठोडा, कोदोरी मारुफ, पळसमंडळ यादी
गावामधील ग्रामपंचायत कर्मचारी
अंकुश गांडोळे, अमोल मेटकर ,सागर गोडांने, सविता चोरे मँडम , मयुर मनहोर खोपटकर,प्रविण राऊत, अतुल चोपडे,दत्ता भाऊ केने ,संजय राऊत , तुळशिदास गोळंबे, गणेश बोरकर, सुमित लोंढे शरद घाट़ोळे
राजेश मेश्राम, पांडुरंग दुर्गे , मंगेश घरपाळ, ज्ञानेश्वर धनधरे इत्यादी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे पदधिकारी एक दिवशीय आंदोलनात सहभागी झाले होते
हंसराज उके
अमरावती

सुनगाव येथे कोवीड लसीकरण व तपासणीसाठी करण्यात आली जनजागृती…

0

 

गजानन सोनटक्के
प्रतिनिधी जळगाव जा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जिल्ह्यात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असताना, तो आपल्या पर्यंत येऊ नये याकरिता जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे covid-19 च्या वाढत्या प्रादुर्भावा ला रोखण्याकरिता दिनांक 19 एप्रिल रोजी सुनगाव येथे लसीकरण आणि तपासणी करण्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी सहकार्य करून प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती सुनगाव येथील मातोश्री नथिबाई विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक राजाभाऊ कोकाटे यांनी गावामध्ये जनजागृती करताना नागरिकांना केली. गावामधील गल्ली गल्ली मध्ये जाऊन नागरिकांना हात जोडून विनंती करण्यात आली तसेच सुनगाव येथील मिलिंद नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाऊन तेथील नागरिकांना लसीकरण आणि तपासणी करून घेण्याकरिता प्रोत्साहित करण्यात आले यावेळी पंचायत समितीचे उपसभापती महादेवराव धुर्डे, गुणवंराव कपले, कृषीमित्र मोहनसिंह राजपूत,पत्रकार राजकुमार भड, गजानन खिरोडकार, गजानन सोनटक्के, गणेश भड,अनिल भगत यांनीसुद्धा गावांमध्ये फिरून कोवीड लसीकरण व तपासणी जास्तीत जास्त नागरिकांनी करून घ्यावी याकरिता सुनगाव येथील नागरिकांना विनंती केली.

श्याम देशपांडे माझे दैवत.. चंद्रशेखर शुक्ल…..

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

……. साखरखेर्डा येथे एस ई एस हायस्कूल तथा ज्युनियर कॉलेज मध्ये श्याम काका देशपांडे यांची जयंती २० एप्रिल रोजी पार पडली .ते जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापासून साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव होते. त्यांनी साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटी कशी वाढेल याकडे लक्ष देऊन खरोखर पणे एस .इ. एस हायस्कूल ज्युनिअर कॉलेज हे भलेमोठे विस्तारमय केले. आज परिसरामध्ये भरपूर विद्यार्थी संख्या वर्ग 5 ते 12 पर्यंत असलेली साखरखेडा एज्युकेशन सोसायटी श्यामकाका देशपांडे यांनी नावारूपास आणली .कोणत्याही प्रकारची अडचण साखरखेडा एज्युकेशन सोसायटी मध्ये येऊ नये यासाठी सदैव तत्पर राहिले. श्यामकाका देशपांडे यांनी शेवटच्या क्षणी चंद्रशेखर शुकलं यांना सचिव पद देण्याचे ठरवले. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने नवनियुक्त सचिव चंद्रशेखर शुकलं शाळेचे मुख्याध्यापक एस .टी दसरे, पर्यवेक्षक एम. बी .भगत, प्रा. रवींद्र माठे, माजी उपसरपंच दर्शनकुमार गवई, विलास ठाकूर (हरित सेना संयोजक) ,मगन रबडे हजर होते !ज्यावेळी कोरोणा चे सर्व नियम पाळण्यात आले ।1

धान्य साठवण्याची जागा पत्र्याच्या कोठी ने घेतल्यामुळे ! कोरटी च्या फोका पासून बनवलेली कंणगी इतिहास जमा !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

जसजसेनवीन संकल्पना मानवाच्या डोक्यात येत आहे तस तसे जुनी संकल्पना ह्या इतिहास जमा होत आहे याचाच प्रत्यय आपल्याला अनेक वस्तू वरून दिसून येत आहे !
पूर्वी धान्य साठवण्यासाठी ज्वारी असेल गहू असतील .हे धान्य उंदरा पासून किड्या पासून बचाव करण्यासाठी काही कणगी बनवणाऱ्या कारागिराकडून कोराटी च्या फोका पासून कंणगी बनवून त्यामध्ये धान्य साठवून ठेवत असत ‘ कैकाडी . वैदू या शिवाय .ज्यांना कनग्या बनवल्या जातात ते लोक कणग्या बनवत असत ! परंतु मातंग कारागिराने बनवलेल्या कणग्या ह्या एक वेगळी छाप पाडून ग्राहकांना आकर्षित करत असतात त्यामुळे जास्तीत जास्त लोक मातंग कारागिराकडून कणग्या बनवून घेत असत ‘

सिंदखेडराजा तालुक्यातील साखर खेर्डा येथील बहुतांशी कारागार कणग्यां बनवत . शिंदी येथील विलास तोडे यांचे वडील आत्माराम तोडे सुद्धा आकर्षित कणग्या बनवत असत !

सकाळीच रानावनात जाऊन ते कोराटी यांचे सरळ फोक तोडून आणून !

ज्यांनी कणग्या बनवण्याची ऑर्डर दिली त्यांच्या ते कणग्या बनवत असत :
दहा क्विंटल धान्य दोन क्विंटल चे धान्य पाच क्विंटल चे धान्य अशा प्रकारचे धान्य ज्यांच्याकडे असेल ते त्या प्रकारच्या कणग्या धान्य साठवण्यासाठी बनवून घेत असत ‘

त्यामुळे आकर्षक अशा निरगुडी (कोराटी ) च्या फोकापासून कनग्या बनवत असत .एकमेकांमध्ये फोक विनवून .कणग्या बनल्यानंतर त्या सुकण्यासाठी उन्हात ठेवत असत ‘

तसेच धान्य काढण्यासाठी चौकोनी .छोटीशी जागा ठेवत असत ।व त्या चौकोनी छिद्रांमध्ये घरातील कापडाचा बोळा त्यामध्ये घालत असंत जेव्हा धान्य काढायचे असेल त्यावेळेस तो कापडाचा बोळा काढले जाई व धान्य काढल्यानंतर परत तो गोळा त्या छित्रा मध्ये घातल्या जायचा !
कंगी बनल्यानंतर त्याला गोठ्या मधून माय माऊली शेन आणून कंणगीला लिपून (सारवून ) घेत असत !
कणगी ही पाच फुटापासून तर दहा फुटापर्यंत बनवत असत !

धान्य सडू नये म्हणून जुन्याकाळी कडुलिंबाचा पाला त्यामध्ये टाकल्या जायाचा ।आता धान्याला कीड लागू नये म्हणून विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन त्यामध्ये सोडले जातात !

व धान्य साठवण्यासाठी कणग्या ऐवजी आता लोखंडी पत्रा पासून मोठ्या कोठी बनवले जातात ‘

ज्या कोठी ची किंमत हजार रुपयापासून तर दहा हजार रुपये पर्यंत आहे ‘

सांगायचं तात्पर्य एवढेच की जुन्या काळातील कणग्यां आता इतिहास जमा झाले असून नवीन संकल्पनेमुळे त्याची जागा आता पत्राच्या कोठी ने घेतली आहे !

शिंदी येथे कोरोना चा पहिला बळी ! गावात भितीचे वातावरण ! शिंदी गाव पाच दिवस कडकडीत बंद ।ग्रामीण भागात कोरोना चा कहर सुरूच !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यामध्ये विशेषता : ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा कहर सुरूच असून कोरोना चा उद्रेक बघावयास मिळत आहे .
चारशे च्या जवळपास कोरोणाचे रुग्ण आहे ग्रामीण भागातील आहे !

त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे ।
सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथे कोरोनामुळे पहिला बळी गेला आहे :

सखुबाई सुदाम खरात ‘यांचा कोरोनामुळे चिखली येथील हेगडेवार यांच्या दवाखान्यांमध्ये उपचारादरम्यान दिनांक 19 एप्रिल ला सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला ‘
तसेच त्यांच्या घरातील इतर सदस्य सुद्धा उपचार घेत आहे ‘

त्यामुळे शिंदी गावकऱ्यांनी पाच दिवस सर्व प्रतिष्ठाने बंद करून शिंदी गाव कडकडीत बंद ठेवली आहे ‘
तर वार्ड क्रमांक तीन मधील काही गल्या स्वतःहून लोकांनी शील केले आहे !
कोरोणा चा पहिला बळी गेल्यामुळे गावामध्ये कमालीची घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून ‘
लोकांनी शेतात राहणे पसंत केले आहे ‘
तर गावामध्ये सॅनिटायझर ची फवारणी करावी अशी मागणी होत आहे !

लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तोंडाला माक्स हाताला सॅनिटायझर आणि सोशल डिस्टिंग चे पालन करावे असे आव्हान ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे ‘

नांदुरा यथे विनाकारन फिरनारेवर पोलिसांनी केली कडक कारवाई

0

 

सुनील पवार. नांदुरा ता.प्र.

नांदुरा शहरात आज दुपारी दोन वाजता पासुन कडक संचारबंदी लागु करण्यात आली आहे या कालावधीत मध्ये विनाकारण फिरनारेवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे आज दुपारी दोन वाजता पासून शहरासह तालुक्यात
संचारबंदी लागू करण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने दवाखाने.व मेडिकल वगळता सर्व च दुकाने आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश माननीय जिल्हाअधिकारी यांनी दिले आहे याच काळात विनाकारण फिरनारेवर ठानेदार सुरेश नाईक नवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे यामध्ये मधूबन चौक.शिवाजी चौक. यामध्ये विनाकारण फीरनारेवर कारवाई करण्यात येत आहे तरी कोनिहि घराबाहेर पडु नये असे आवाहन ठानेदार सूरेश नाईक नवरे साहेब यांनी जनतेला केले आहे

आमदार राजेश एकडे यांनी केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.नितीनजी गडकरी यांचे मानले आभार

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

मागील पंचवीस वर्षात जे शक्य झाले नाही ते अवघ्या दीड वर्षात मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री.राजेश एकडे यांनी करून दाखविले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ (जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६) चे मलकापूर विधानसभा मतदार संघात चिखली रनथम-मलकापुर-नांदुरा वळण मार्ग ते खामगाव कडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग अश्या मतदार संघातील ४४ की.मि.चे काम प्रगतिपथावर आहे परंतु यामध्ये नांदुरा शहरां मधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचे कामाचा समावेश करण्यात आलेला नव्हता.मागील पंचवीस वर्षापासून या रस्त्याचे काम झाले नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था आहे ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्याचप्रमाणे सदर राष्ट्रीय महामार्गावर पासून अवघ्या ३०० मीटरवर रेल्वे क्रॉसिंग गेट असल्याने वाहतुकीची देखील मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती.
मलकापूर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार संघर्ष योध्दा मा.श्री.राजेश एकडे नांदुरा शहरा मधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण व्हावे या करिता केंद्रीय मंत्री,रस्ते व परिवहन मंत्रालय,भारत सरकार मा.ना.श्री. नितीनजी गडकरी यांची नागपूर येथे प्रत्यक्ष भेट घेऊन नांदुरा शहरा मधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण व सुधारणा करण्याचे काम मंजूर करावे असे निवेदन देणून मागणी केली होती.मा.ना.श्री.
नितीनजी गडकरी यांनी सदर बाबत सकारात्मकता दर्शवित नांदुरा शहर मधून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन आमदार श्री.राजेश एकडे यांना दिले होते.सदर बाबत केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीन गडकरी यांनी आमदार श्री.राजेश एकडे याना पत्राद्वारे कळविले आहे.नांदुरा शहरा मधून जाणारा रस्ता काँक्रिटीकरण व ईतर रस्ता डांबरीकरनाचा होणार असून सदर च्या कामाची निविदा लवकरच प्रसिध्द होणार असून प्रत्यक्ष कामाला देखील लवकरच सुरवात होणार आहे.त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाने नांदुरा शहर मुख्य भागातून जाणारा राष्ट्रीय महामार्गा वरील शहरातील काँक्रिटीकरण व ईतर काम डांबरीकरण करण्यासाठी रु.११.७७ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मागील पंचवीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम मंजूर केल्याबद्दल आमदार श्री.राजेश एकडे यांनी केंद्रीय मंत्री मा.श्री.नितीनजी गडकरी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.नांदुरा शहरातील वाहतुकीची कोंडी सुटण्याच्या अनुषंगाने महत्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल नांदुरा शहरातील शहरवासीयांन कडून आमदार श्री.राजेश एकडे यांचे आभार व्यक्त करून अभिनंदन करण्यात येत आहे.असे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांचे खाजगी सचिव राजू केणे यांनी प्रसिध्दी पत्रकाअन्वये कळविले आहे.

यावल महसुल व पोलीस प्रशासनाच्या कार्यवाहीत मागील एक वर्षात बेकाद्याशीर अवैधगौण खनिज वाहतुक करणाऱ्या ३५वाहनांकडुन ५२ लाखाची वसुली

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यात मागील काही दिवसापासुन एकीकडे वाळु माफीया हे बेलगाम झाले असुन, मागील वर्षीच्या दंडात्मक कार्यवाही चा तपशीलवार आढावा घेतला असता तत्कालीन अधिकारी यांनी केलेली कार्यवाही लक्ष वेधणारी ठरली आहे . यावलच्या महसुल प्रशासनाने केलेल्या वाळुमाफीया वरील दंडात्मक कार्यवाहीचा आढावा घेतला तर तो अत्यंत समाधानकारक वाटतो , तरी या वर्षात देखील महसुल प्रशासनाकडुन अजुन यापेक्षा चांगली उत्तम कामगीरीची अपेक्षा शासन प्रेमी करीत आहे . यावल तालुक्यात मागील कोरोना संसर्गाच्या महामारीच्या धुमाकुळ घालणाऱ्या वेळी नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने लावण्यात आलेली संचारबंदी याच काळात फैजपुर विभागाचे तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ अजीत थोरबोले, तत्कालीन तहसीलदार जितेन्द्र कुवर , निवासी नायब तहसीलदार आर .के पवार , तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात वाळु माफीया विरूद्ध सडेतोड कार्यवाही चा बडगा उद्धगारीत सुमारे वाहनावर बेकायद्याशीर विनापरवाना वाळूची वाहतुक काणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करीत महसुलचा वचक बसविण्यात मोठे यश मिळवले होते .दरम्यान तत्कालीन अधिकारी डॉ . अजीत थोरबोले, तहसीलदार जितेन्द्र कुवर , पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या माध्यमातुन प्रशासनास अवैध गौण खनिज ची विनापरवाना वाहतुक करणाऱ्या पाच ट्रक दोन डंपर व२८ ट्रॅक्टर अशा एकुण ३५ वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करीत ५२ लाख३० हजार२३१ रुपये दंडाची रक्कम पैक्की३७ लाख५९ हजार७८५ रुपये दंडाच्या रूपात वसुल केले असुन , यापैक्की८ वाहन न्यायलयात जमा असुन , यातील २५वाहन सोडण्यात आली आहे . संबधीत तत्कालीन अधिकारी यांनी केलेली धडक मोहीम व्दारे कार्यवाही ही लक्ष वेधणारी व वाळु माफीयावर प्रशासनाचे वचक बसविणारी आहे .