Home Blog Page 488

आमदार समीर कुणावार यांनी घेतला कोरोना महामारी चा आढावा आय. एम. ए. ने दिला सहकार्याचा हात

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता  आमदार समीरभाऊ कुणावार  यांनी तातडीने यांच्या अध्यक्षतेखाली आज हिंगणघाट तालुक्याचा कोरोणा आढावा बैठक आमदार कार्यालय हिंगणघाट येथे घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये कोरोना ग्रस्तांचा औषधोपचार त्याच प्रमाणे कंटेनमेंट झोन याबद्दल माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय योजना करणे, टेस्ट करून घेणे जे पेशंट कोरोना ग्रस्त आहे गृह विलगीकरनात आहे, त्यांची प्रकृती वाढत असल्यास त्यांची माहिती घेऊन त्यावर ताबडतोब औषध उपचार करण्याची दखल घेणे या सर्व गोष्टीचा आढावा सदर बैठकीमध्ये घेण्यात आला.
दिवसें दिवस कोरोणाचे संक्रमण वाढतच चालले असून हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेशंट दिसून आलेले आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन *आमदार समीरभाऊ कुणावार* यांनी केले. सदर कोरोना पहिल्यापेक्षाही मोठ्या झपाट्याने वाढत चालला असून उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे कोविंड सेंटर चालविणे गरजेचे आहे . हिंगणघाट शहरातील आय. एम. ए. चे सर्व डॉक्टर यांची मिटिंग घेऊन सर्व डॉक्टरांनी सहकार्य देण्यास प्राधान्य दिले. आय. एम. ए. च्या सर्व डॉक्टरांनी तीन शिफ्ट मध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे शहरात वाढत्या कोरोना वर निर्बंध निश्चितच लाभेल असा विश्वास *आमदार समीरभाऊ कुणावार* यांनी व्यक्त केला.

सदर बैठकीला *आय. एम. ए. च्या अध्यक्षा डॉ. सौ. मानधनीया मॅडम, वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन मा. श्री. सचिनजी तडस साहेब, हिंगणघाट उप-जिल्हा रुग्णालयाच्या अधिकारी डॉ. मिसाळ मॅडम, हिंगणघाट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सौ. किर्तीताई कुचेवार, इत्यादी हिंगणघाट शहरातील डॉक्टरांची चमू सोबतच हिंगणघाट शहराचे मुख्याधिकारी मा. श्री. जगताप साहेब* सदर बैठकीला उपस्थित होते.

लसीकरनाचा संदेश देणारी आगळी वेगळी गुढी उभारून वाकेकर हॉस्पिटल ने जोपासली परंपरा..

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:

भगवान श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत परतले होते, या आनंदात आयोध्यामध्ये दारात विजयाची गुढीउभारून त्यांचे स्वागत केले होते. हिंदु समाजात आपापल्या घराच्या दारात गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढी हे विजयाचे, समृध्दीचे आणि सकारात्मकतेचे शुभ प्रतिक समजले जाते.त्याच प्रमाणे यावर्षी स्थानिक जळगांव जामोद शहरातील सुप्रसिद्ध वाकेकर हॉस्पिटल तर्फे लसीकरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी गुढी उभारून जनजागृती केली. यावेळी कोरोना विषाणू चा नायनाट करण्यासाठी सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. आपल्या भारतात आज घडीला कोविशिल्ड व कोवॅक्सिन या लसी उपलब्ध आहेत. तरी सर्व जनतेने मनात कोणत्याही शंका कुशंका न ठेवता, कोणताही संभ्रम न ठेवता लसीकरण करून घ्यावे व शासनाच्या या उपक्रमाला आपली नैतिक जबाबदारी म्हणून हातभार लावावा असे आव्हान केलं. यावेळी वाकेकर हॉस्पिटल चे संचालक डॉ. संदीप वाकेकर व डॉ.सौ.स्वाती वाकेकर यांनी रीतसर पूजा करून सुख समृद्धी व सदृढ आरोग्यची गुढी उभारली व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.मागील वर्षी सुद्धा कोरोना योद्ध्यांचे आभार व्यक्त करणारी गुढी उभारून आगळा वेगळा संदेश दिला आहे.

रस्ता बांधकामाबाबत वार्ड नंबर 1 मधील नागरिकांचे ग्रामपंचायत कार्यालयास निवेदन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत मधील वार्ड नंबर एक मधील ग्रामपंचायत कार्यालय मागच्या बाजूस शंकर रामा कातोरे यांच्या घरापासून ते बऱ्हानपुर रोड पर्यंत रस्त्याची दुर्दशा फार खराब झालेली आहे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असते त्यामधून लोकांना जाण्या येण्यास त्रास होत असतो व वार्ड नंबर एक मधील जुनी आवजी सिद्ध बँक परिसरातील रस्ते हे मोठ्या प्रमाणात जशाच्या तसेच अवस्थेत आहेत तरी या परिसरात ग्रामपंचायततिने पेवर ब्लॉक व सिमेंट रस्त्याचे कामे करावेत व राहिलेला अर्धवट रस्ता हा बऱ्हानपूर रोडपर्यंत पूर्ण करावा असे निवेदन वार्ड नंबर एक मधील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयास दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी दिले आहे तरी अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा नाहीतर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असे निवेदनात म्हटले आहे या अर्जावर सुरेश मारोती मिसाळ वैभव ढगे अनिल गणेश राव ढगे सुनील जगदेव गवई व परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत

बापरे ! एकाच गावात 77 पॉझिटिव्ह 750 लोकसंख्या असलेल्या पोटा या छोट्याशा गावात तब्बल 77 रुग्ण पॉझिटिव्ह

0

 

नांदुरा:- (प्रफुल्ल बिचारे पाटिल)

तालुक्यातील पोटा या गावात आज दि. १२ एप्रिल रोजी रँपीड टेस्ट मधे तब्बल 77 पेशंट पाँझीटीव आल्याने नांदुरा तालुक्याचे कर्तव्य तत्पर अधिकारी राहुल तायडे तहसीलदार ,नांदुरा प. स. चे गट विकास अधिकारी समाधान वाघ , तालुका आरोग्य अधिकारी खंडारे साहेब , जि प सदस्य वसंतराव भोजने , तलाठी देशमुख मँडम , सचिव काळवाघे ,आरोग्य सेवक, आशा वर्कर्स यांनी पोटा गावात जावून प्रमुख गावकर्यांची बैठक घेतली व 750 लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावात 77 पेशंट निघाले म्हणून घाबरून न जाता कोणी ही गावकऱ्यांनी बाहेर जावू नये व कोनालाही गावात येवू देवू नये अशा सुचना केल्या व सकाळ पासुन न च गोळ्या ,औषधे व तपासणी करण्यात येईल
यावेळी विशाल पा सरपंच माजी सरपंच ऊमाकांत पाटील, जलतज्ज्ञ रामकृष्ण पाटील प्रामुख्याने हजर होते.
या गावात आज 145 तापसणी केली असता 77 posotive आढळून आले. पूर्ण गांव containment झोन करण्यात आले व उद्यपासून पूर्ण गांव तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हिवरा बु . येथे १० गांज्याची झाडे व वाळलेल्या गांज्यासह ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त ! साखरखेर्डा पोलीसांची कारवाई 

0

 

सिंदखेड राजा (विशेष प्रतिनिधी )

पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरा बु . येथील एका शेतातून पोलीसांनी १० गांज्याची झाडे आणि वाळलेला गांज्या असा ऐकून ४२ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
१२ एप्रिल रोजी ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना गोपनीय माहिती मिळाली त्या माहिती वरुन ठाणेदार जितेंद्र आडोळे , पीएसआय दिपक राणे , पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश मुंढे , पोलीस नायक काशपाग , धुड , रमा गवई यासह दोन शासकीय पंच , फोटो ग्राफर , वजन करण्यासाठी एक व्यावसायीक हेघटणास्थळी गेले . तेव्हा   हिवरा बु . शिवारातील राजू शेळके यांच्या रसवंती मागे शिवाजी त्रंबक शेळके यांचे शेत असून त्यांच्या शेतात कपाशी आणि मका ही पिके घेतली जातात . या  शेतातच शिवाजी शेळके हा गांज्याची शेती करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती .त्याच शेतात शेळके यांची फऱ्हाटीच्या कुडाची झोपडी असून त्या झोपडीत शिवाजी हा बसलेला आढळून आला . त्याची कसून चौकशी केली असता आणि झोपडीची झडती घेतली असता  झोपडीत एका पोतडीत २ किलो ३९२ ग्राम गांजा मिळून आला . अधिकची चौकशी करून मका शेताची पाहणी केली असता शेतातील धुऱ्यावर ७ ते ८ फुट उंचीची दोन व इतर लहान मोठी १० झाडे आढळून आली . पंचासमक्ष पंचनामा आणि झाडाचे वजन केले असता २४ किलो ५२ ग्राम वजन भरून आले . असा एकूण २६ किलो ५०० ग्राम गांजा जप्त करण्यात आला . गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी शेळके हा गांज्याची झाडे लावत असून त्या झाडाचा पाला वाळवून विक्री करीत असल्याचे सुत्रांकडून समजते . या गांज्या व्यवसायामागे आणखी कोन यांचा तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि दिपक राणे करीत आहेत . आरोपी शिवाजी त्रंबक शेळके वय ५५ वर्ष रा . हिवरा बु . यास अटक केली आहे . त्यामुळे आणखीन आता कोणाकोणाच्या शेतात गांजा आहे याचा तपास होणे गरजेचे आहे ।

नांदुरा तालुक्यात संपूर्ण राशन दुकानात मिळत आहे निष्कृष्ट दर्जाचे धान्ने:- बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिले नांदुरा तहसील दारांना निवेदन

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

शहर व ता . च्या हद्दीत शिधा वाटप पत्रिकेवर मिळणारे गहू तांदूळ गहू ज्वारी व मका हे धांन्य अंत्यत निकृष्ठ दर्जाचे व कोणत्याही प्रकारची दर्जा नसलेले धान्य असुन त्या पासुन अनेक प्रकारचे शारीरीक व्यंग व दुर्धर आजार नागरिकांना होत आहे सदर शासकीय धांन्ये गोदामात बऱ्याच दिवसापासून पड्न असलेलल्या व सडक्या स्वरूपाचा धांन्यसाठा नागरीकांना देण्यात येत असुन त्याबाबत संबंधित गोदाम निरीक्षक व पुरवठा निरीक्षक यास वारंवार सांगूनही तोच सटका साठा शिधावाटप दुकानदारांना वाटप करण्यात येतो व चांगल्या प्रतीचा असलेल्या उत्कृष्ट धान्य खुल्या बाजारात दलालांमार्फत सर्रास विकल्या जाते सदर प्रकरणात बहुजन समाज पार्टी च्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना याबाबत या अगोदर अवलोकन केले आहे. याकरीता बहूजन समाज पार्टीच्या वतीने नांदुरा तसीलदारांना निवेदन देण्यात आले.

उंद्रि परिसरतिल 18 गावातील बंद असलेले पथदिवे सुरू भाई प्रदीप अंभोरे आंदोलन यश !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

येथून जवळ असलेल्या उंद्रीसर्कल मधील 18 गावातील वीज बिले न भरल्याने पथदिवे महावितरण ने बंद केले होते. त्यावर प्रदेश कांग्रेस अनु जाती विभाग नेते, व उंद्रि ग्रा प सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी महावितरण कंपनी यांच्याकडे पथदिवे सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता त्यावर दिनांक बारा एप्रिल रोजी महावितरण कंपनीने दखल घेऊन अखेर उंद्री व सरकारमधील 18 गावातील बंद पाडलेले पथदिवे सुरू केले आहे.
या महिन्यांमध्ये विविध महापुरुषांच्या जयंत्या रामनवमी गुढ़ी पड़वा, रमजान अशा धार्मिक सणावर पहिलेच कोरोणामुळे विरजण पडले आहे यातच महावितरण कंपनीने वीज बिले उंद्रि व सरकलमधील अठरा गावातील ग्रामपंचायतीचे पथदिवे बंद केले होते. सदर पथदिवे सुरू करण्यासाठी भाई प्रदीप अंभोरे यांनी मा.उद्घव ठाकरे मुख्यमंत्री,मा.ऊर्जा मंत्री नितीन राऊत आदिक डे व महावितरण कंपनी बुलढाणा यांच्याकडे आंदोलन निवेदन देऊन केलेली मागनी ची दखल घेऊन पथदिवे सुरू केल्याने उंद्रिसह 18 गावामध्ये पथदिवे सुरू झाले आहे. हे पथदिवे सुरू करण्यासाठी उप अभियंता चिखली भुसारी व कनिष्ठ अभियंता जाधव याना वरिष्ठ अभियांत्यान्नी केलेल्या आदेशानुसार त्यान्नी उंद्री वैरागड़ सह 18 गावतिल पथ दिवे सुरू केले यावेली शिवाजी पाटिल ग्राप सदस्य राम नसवाले, आकाश राऊत स्वा.शे.स.पत्रकार वसंत सिरसा ठ आदि तरुण उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे शांतता बैठक मध्ये निर्णय

0

सचिन वाघे वर्धा

दिनांक 11एफ्रिल रोजी डाॅ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्याने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे शांतता कमेटीची बैठक आयोजीत करण्यात आली होती, या बैठकित शासनाच्या मार्गदर्शक व नियमाचे पालन करुन जयंती साजरी करावी,असे ठाणेदार संपत चव्हाण यांनी आवाहन केले, या बैठकीला माजी नगराध्यक्ष सुरेश मुंडेवार,, अशोक रामटेके, रसपाल शेंदरे, उमेश वावरे, अनील मून, गोरख भगत,, संजय वानखेडे, इत्यादि आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्तै उपस्थित होते,

यावल अभयरण्यातील करंजपाणी क्षेत्रात वन प्राण्यांच्या शिकारीसाठी फिरणाऱ्या परप्रांतीय कडुन वनरक्षकांवर गोळीबार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

 

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या करंजपाणी या अतिदुर्गम भागात वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्दीष्ठाने आलेल्या परप्रांतीय१०ते १५ जणांच्या टोळक्याकडुन अभयरण्यातील गस्तीवर असलेल्या वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली असुन , याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , यावल तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या करंजपाणी या परिमंडल कक्ष०३ क्रमांक१०४मध्ये दिनांक ११एप्रिल रोजी दुपारी ३ , ४० वाजेच्या सुमारास या क्षेत्राकरीता मागील चार वर्षापासुन वनरक्षक म्हणुन कार्यरत असलेले विजय गोरख शिरसाठ वय २७ वर्ष हे आपले सहकारी लेदा सिताराम पावरा , काळु बाळु पवार वनरक्षक लंगडाआंबा, अश्रफ मुराद तडवी , वनरक्षक करंजपाणी असे सर्व मिळुन एकत्र आम्ही लंगडा आंबा क्षेत्रात गस्त करीत असतांना त्या ठिकाणी १०ते १५ अज्ञात जणांचे टोळके दिसुन आले व त्या टोळक्यातील लोकांनी आमच्याकडे पाहुन घटनास्थळापासुन पळ काढला आम्ही सर्व त्यांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता , त्या टोळक्यांकडे असलेल्या गावठी कट्टयाने आमच्यावर झाडा आळ लपुन तुम्ही लोक आम्हाला शिकार करू देत नाही असे जोरा जाराने ओरडुन आमच्या दिशेने दोन फेऱ्या गोळीबार करून आम्हास जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला व त्या ठीकाणाहुन जंगलच्या मार्गाने परप्रांतात पळुन जाण्यात यशस्वी झाले . त्या वेळेस आमच्याकडे कुठलेही शस्त्र नसल्याने आम्ही सर्व झाडांच्या आडोसा घेवुन आपले जिव वाचविले आमच्याकडील मोबाईलला रेंज नसल्याने कुणाशीही संपर्क करता आले नाहीत नंतर काही अंतरावर असलेल्या शेणपाणी सरंक्षणकुटी जावुन फॉरेस्ट रेंजर अक्षय म्हात्रे यांच्याशी तात्काळ दुरध्वनीव्दारे कळविले असता त्यांनी आम्हास तात्काळ लंगडाआंबा मुख्यालयात बोलविले नंतर वरिष्ठांच्या आदेशाने अतिदुर्गम असा खडतर मार्गाने यावल येथे येवुन पोलीसात विजय गोरख शिरसाठ वनक्षक करंजपाणी यांनी त्या अज्ञात १oते १५ परप्रांतीय जणांचे टोळके हे बेकाद्याशीर शिकारच्या उद्धीष्ठाने फिरून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नात असलेल्याची फिर्याद दाखल केली असुन , या घटनेचा तपास पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सुधीर पाटील ,पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व पोलीस अमलदार सुशिलघुगे , भुषण चव्हाण ,असलम खान हे करीत असुन, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे पथक तपासकामी करंजपाणी या घटनास्थळी तात्काळ रवाना झाले आहे .

जळगांव जामोद वनविभागाची अवैध सलाईगोंध तस्करांवर धडक कारवाई. आरोपी फरार..

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगांव जा.प्रतिनिधी

आज दिनांक १२/०४/२०२१ चे सकाळी अंदाजे ५.०० वा. चे सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी श्री कटारिया यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन भिंगारा ते निमखेंडी रोडने गस्त करीत असतांना रस्याचे बाजुने दबा धरून बसले असता,वरील वेळेला भिंगाराकडून जळगांवकडे येणा-या रस्त्याने राखीव क.नं.३७१ निमखेडी बिट या ठिकाणी चॉकलेटी रंगाची टाटा इंडिगो कार क्रमांक MH-२०BC-३९७ ही दिसून आली. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने वनअधिकारी/वनकर्मचारी यांना पाहून गाडी सोडून जंगलातून पसार झाला. त्याला वनअधिका याने ओळखले असून तो इसम जामोद येथील तेजराव अशोक लोणे असून तो वरील गाडी व त्याचा मोबाईल हँडसेट घटनास्थळी सोडून फरार झालेला आहे. मोक्यावर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अवैध वनोपज सालई गोंद ८ कट्टे दिसून आले. त्याचा पंचासमक्ष पंचनामा करुन वजन केले असता,२६५ किलो भरले. सदर मालमत्ता जप्त करुन आरोपी विरुध्द वनगुन्हा क्रमांक ६६५/१६६०१ दिनांक १२/०४/२०२१ जारी करुन जप्त वाहन,सालई गोंद मोबाईल हँडसेट जळगांव जामोद येथील लाकूड आगारात आणून ठेवण्यात आलेला आहे. फरार आरोपीचा शोध घेणेसाठी वनविभागाचे अधिकारी/कर्मचारी जामोद परिसरात शोध घेत आहेत. आरोपीविरुध्द भारतीय वन अधिनियम, १९२७ चे कलम २६(१) ड,फ,ग,४१(१),४२(१) (२),५२,६१ ए.६९ व महाराष्ट्र वन नियमावली नियम २०१४ चे नियम ३१,८२ नुसार गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. सदरची कारवाई मा.श्री.अक्षय गजभिये,उपवनसंरक्षक प्रादेशिक बुलडाणा मा.श्री.आर.आर.गायकवाड,सहा.वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) बुलडाणा यांचे आदेशाप्रमाणे श्री.बि.डी.कटारिया,वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव जामोद प्रादेशिक व श्री.पी.जी.सानप वनपाल हे करीत आहेत.सदर कारवाईत श्री.ए.आर.खेडकर,श्री.आर.व्ही.फड,श्री.बि.एम.खेडकर हे वनरक्षक व फायर कॅम्पवरील व निमखेडी नाक्यावरील मजुर यांनी सहकार्य केले आहे.फरार आरोपीचा शोध घेण्याची कार्यवाही सुरु आहे.