Home Blog Page 498

निलंबन करण्यापेक्षा मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.- माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली मागणी,

0

 

 

अनिलसिंग चव्हाण बुलढाणा

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी वन विभागाचे वरीषौठ अधिकारी यांचे निलंबन न करता त्यांचेवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बुलडाणा जिल्ह्यातील माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांना निवेदन पाठवून केली आहे.
निवेदनात असे नमुद केले आहे की,
अमरावती विभागातील वरीष्ठ वन अधिकारी शिवकुमार व श्रीनिवास रेड्डी यांचेवर मणूष्य वधाचे गुन्हे दाखल करावे.
दिपाली चव्हाण यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्यावर फक्त एफ आय आर दाखल करणे व निलंबन करने यापेक्षा यांचेवर मणूष्य वधाचे गुन्हे दाखल करावे अशी महाराष्ट्राच्या सर्व जनतेची मागणी आहे.

बुलढाणा हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा ! बुलढाणा जिल्हयात दोन दिवस उष्णतेची लाट !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्हयात दिनांक ३० व ३१ मार्चला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची अधिक शक्यता आहे. त्यासाठी नागरिकांनी उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी. शेतकरी बंधूंंनी उष्माघातापासून बचाव म्हणून शेतातील कामे शक्यतो सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेत करावी. जनावरांना सावलीमध्ये किंवा गोठ्यामध्ये बांधून ठेवावे, त्यांना पिण्यासाठी स्वच्छ, थंड पाण्याची व्यवस्था करावी !व लोकांनी सुद्धा विनाकारण घराच्या बाहेर पडू नये ‘शिवाय लहान मुलांना घेऊन मोटरसायकलने सुद्धा प्रवास करू नये डोक्याला रुमाल किंवा टोपी घालावी .
असे आव्हानही बुलढाणा जिल्हा कृषी हवामान केंद्राचे कृषी हवामान निरीक्षक अनिल जाधव यांनी केले आहे !

अगोदरच अवकाळी पाऊस व कोरोना चे संकटआणि त्यामध्ये आणखी उष्णतेचे लाट ‘त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी ‘या शिवाय पर्याय नाही ‘

सुनगाव येथील ग्रामपंचायत सदस्य यांचा उपोषणाचा इशारा ठरला हवेतील गोळीबार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

सुनगाव ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी चौधरी यांना ग्रामपंचायत सूनगाव येथे पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत ते गावातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे गावात राजकारण करून वातावरण दुषित होण्याची शक्यता आहे तसेच त्यांच्याविरुद्ध बऱ्याच प्रमाणात पोलीस तक्रारी झालेल्या आहेत झालेल्या आहेत चौधरीसाहेब गावामध्ये मनमानी कारभार करीत आहेत गावातील लोकांना सांगतात की माझे हात वर पर्यंत आहेत तुमच्या गावातील कोणीच माझे काहीच करू शकत नाही असे म्हणून मजुरी करीत असलेले ग्रामसेवक यांची ताबडतोब बदली करण्यात यावी व गावाला न्याय द्यावा सुनगाव ग्रामपंचायत सदस्यांनी दिनांक 30 मार्च मंगळवार पासून पंचायत समिती जळगाव जामोद येथे आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी तक्रार माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जामोद यांना 24 मार्च रोजी दिलेली आहे परंतु आज 30 मार्च मंगळवार असल्यानंतरही सूनगाव ग्रामपंचायतचे सदस्य उपोषणाला बसले नाही तर या आठ सदस्यांपैकी तीन सदस्यांनी आम्हाला तक्रार करतेवेळी तक्रारीचा विषय समजावून सांगितला नाही व ग्रामसेवक यांनी भरपूर कामे केली असून अशा माणसाची तक्रार करणे योग्य नाही सदर तक्रारिशी आमचा काहीही संबंध नाही अशा प्रकारचे निवेदन गटविकास अधिकारी यांना दिले आहे यामुळेचतर उपोषणाचा इशारा फोल ठरला नाहीना किंवा त्यांनी केवळ कागदोपत्रीच उपोषणाचा अर्ज माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केलेला आहे त्यामुळे त्यांचे उपोषण म्हणजे पोकळ आंदोलनाचा इशारा आहे की या प्रकरणात आणखी वेगळी खिचडी शिजली आहे की काय अशी चर्चा सुनगाव येथील नागरिकांमध्ये व राजकीय वर्तुळात होत आहे

 

साखरखेर्डा येथे डॉ . राजेंद्रजी शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त ’61 जणांनी केले रक्तदान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिनखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे दिनांक 30 मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयांमध्ये ’61 जणांनी रक्तदान करून अनोख्या पद्धतीने पालकमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला !अगोदरच महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट आहे ।आणि या संकटामध्ये महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये रक्ताचा साठा हा कमी आहे ‘मुख्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री यांनी वारंवार जनतेला आव्हान केले होते की रक्तदान करा ‘आणि म्हणून पालक मंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त साखरखेर्डा येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले !यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जी जाधव ‘माजी उपसभापती पंचायत समितीचे सुनील भाऊ जगताप ‘ माजी पंचायत समिती सभापती राजू दादा ठोके ‘साखरखेडा नगरीचे सरपंच दाऊद सेट कुरेशी ‘साखरखेर्डा ग्रामपंचायत सदस्य तथा माजी रोजगार हमी बुलढाणा जिल्हा सदस्य ।सय्यद रफिक ‘उपसरपंच पती प्रवीण पाझडे ‘ग्रामपंचायत सदस्य दिलीप भाऊ बेंडमाळी ‘ माजी सरपंच कमळाकर गवई ‘ सदस्य संग्राम सरगये ‘ समाजभूषण अर्जुन गवई ‘तेजराव बापू देशमुख ‘ डॉ .प्रवीण ठोसरे .माजी कृषी सभापती दिनकर बापू देशमुख ‘राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रामदास सिंग राजपूत ‘सामाजिक कार्यकर्ते दिलीप इंगळे ‘ग्रामपंचायत सदस्य संजय जयस्वाल ‘अमित जाधव ‘ललित शेठ अग्रवाल ‘ ग्राप सदस्य ‘ पटेल ‘आदी उपस्थित होते ‘

हिरोळे पेट्रोल पंप जवळील जागा नगरपरिषदेने डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी द्यावी या मागणीसाठी ‘सम्राट चे अध्यक्ष आशिष खराब यांचे नगर परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू ! ..आशिष खरात यांना बुलढाणा जिल्ह्यातून समस्त भीम अनुयायीचा यांचा पाठिंबा … :शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार अशीच खरात यांचा निर्धार ! …

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक तसेच पुतूळा तसेच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ‘या मागणीसाठी सम्राट संघटनेचे अध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मागणीचे प्रणेते आशिष खरात यांनी शिरोळे पेट्रोल पंपा जवळील जागा नगर परिषदेने द्यावी या मागणीसाठी दिनांक 30 मार्च पासून सकाळी ११वाजेपासून बुलढाणा नगर परिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे ‘बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सुरू होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे ‘परंतु दोन्ही जर महामानवाचे स्मारक बुलढाणा शहरांमध्ये झाले तर सौंदर्य करणामध्ये भर पडेल ।हिरोळे पेट्रोल पंपाजवळ जागा ही भव्यदिव्य असून स्मारकासाठी योग्य जागा आहे ‘तरी ही जागा मिळावी म्हणून खरात यांनी अगोदर नगर परिषदेला निवेदन दिले होते ‘त्यानंतर हा विषय बुलढाण्या पुरता मर्यादित न राहता समस्त भीम अनुयायीच्या अस्मितेचा जिल्हाभरातला प्रश्न बनला ! बघता बघता बुलढाणा जिल्ह्यातून विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना विद्यार्थी असतील यांनी आपल्या भागातील तहसीलदार . नगर परिषद ‘ बुलढाणा ‘ जिल्हाधिकारी यांना आपापल्यापरीने निवेदन देऊ लागली ‘
तरीही नगर परिषद बुलढाणा यांनी निवेदनावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही किंवा ॲक्शन ही घेतली नाही ‘त्यामुळे नगर परिषद जागेबाबत कधी निर्णय घेते असा प्रश्न जनतेला पडला आहे !त्यामुळे शहरातील भूखंड बाबत अनेक हेराफेरी झालेली असताना ‘नेमके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विख्यात कायदेपंडित महा मानवासाठी ‘नगरपरिषद जागा देण्यासाठी टाळाटाळ का करत आहे हा प्रश्न समजण्यासारखा आहे !त्यामुळे समस्त भीम अनुयायी आपल्या निधी जमा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी पुढे सरसावले असताना ‘आता आशिष खरात हे अस्तित्वाची लढाई लढत आहे !आणि ते सैनिक सुद्धा होते ‘त्यामुळे कुठे कसे लढायचे हे त्यांना चांगले ठाऊक आहे ‘त्यांच्या लढ्याला यश येवो हीच अपेक्षा !

धुलिवंदनाच्या दिवशी युवकाने घेतली फाशी

0

 

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.३०

स्थानिक शास्त्री वार्ड येथील अनिरूद्ध रामदास ताकसांडे (२०) या युवकाने काल सायंकाळी गळफांस लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरात घडली.
सदर घटना दि.२९ रोजी घडली असून मृतक हा अविवाहित होता.स्थानिक कापडदुकानात काम करीत असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मृतकाचे वडील रामदास सुखदेव ताकसांडे यांनी हिंगणघाट पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करीत मृतदेह स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.

बाप आणि भाऊ च निघाले खुनी !24 तासात पोलिसांनी केला विवाहितेच्या खुनाचा उलगडा ! – ऑनर किलींग चा प्रकार !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील एका 26 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह निंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेमध्ये 26 मार्च रोजी सकाळी वसंत नगर भागात आढळून आला होता ।याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाचे चक्रे वेगाने फिरविली !व अवघ्या चोवीस तासांमध्ये खुनाचा उलगडा केला ।ऑनर किलिंग च्या माध्यमातून बापाने सख्ख्या भावाने खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले ।पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे !दुसर बीड ते लोणार मार्गावरील .वसंतनगर शिवारामध्ये एका लिंबाच्या झाडाला .एका 26 वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह लटकलेल्या स्थितीमध्ये आढळून आला होता ।याबाबत वसंत नगर चे पोलीस पाटीलअरुण राठोड यांनी बिबी पोलिसांना माहिती दिली ‘माहिती मिळताच ठाणेदार लहू तावरे ‘पीएसआय व्यवहारे ‘कलम देशमुख अर्जुन सांगळे ‘ जगदेव टेकाळे ‘ मोहम्मद परसूवाले सुभाष गीते महिला पोलीस मंगला बिथरे ‘ रोहिदास पांढरेयांनी तातडीने घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला .व हे प्रीत किनगाव जट्टू नजिकच्या च्या आईचा तांडा येथील निता वामन आडे यांचा असल्याचे निष्पन्न झाले ।त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा कयास बांधला होता .त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता जिल्हा पोलीस अधीक्षक व ‘उपविभागीय पोलिस अधिकारी ‘विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला ‘यामध्ये मृतक निता हिचे सासरकडील मंडळी ची मतभेत असल्यामुळे .किनगाव जट्टू येथे माहेरीच राहत होती .पोलिसांनी बारकाईने तपास केला असता मृतक महीलेचे अनैतिक संबंध असल्याचे निदर्शनास आले ‘व या वरून ऑनर किलिंग चा प्रकार असल्याचे निदर्शनास आले मृतका चा बाप ‘वामन खिरा आडे ‘ वय ४५ वर्ष व भाऊ ‘राहुल यांची पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली ‘नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच ‘बाप-लेकांनी गुन्हा कबूल केला ‘व नीता हिला मारून टाकून प्रेत वसंत नगर येथील लिंबाच्या झाडाला लटकून दिली असल्याची कबुली दिली ‘व 27 मार्च रोजी पोलिसांनी दोघा बाप-लेकांनी अटक केली दरम्यान आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे ‘यामुळे 24 तासात खुनाचा उलगडा केल्यामुळे बीबी पोलिसांचे कौतुक होत आहे ‘

अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांनी केली महसुल अधिकार्याना व धक्काबुक्की तर तलाठीयांना अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची धमकी…

0

 

नांदुरा( प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

दिनांक 29 मार्च 2021 रोजी सकाळी अकराच्या दरम्यान कोदरखेड तालुका नांदुरा येथील पूर्णा नदी पात्रात अवैध रेती या गौण खनिजाची वाहतूक उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली, असता मोक्याच्या ठिकाणी तहसीलदार राहुल तायडे नांदुरा मंडळ अधिकारी अनिल जोशी तलाठी अभिजीत आमले गेले असता त्या ठिकाणी कोदरखेड नदीपात्रात महेश पाटील ट्रॅक्टर ड्रायव्हर राहणार दादुलगाव तालुका जळगाव जामोद हे ट्रॅक्टर व मजुरा सह रेती या गौण खनिजांची उत्खनन करून वाहतूक करीत असल्याचे दिसले असता त्यांना सदर ट्रॅक्टर पकडले व रेती वाहतुकीची अवैध परवानगी मागणी केली असता, सदर ड्रायव्हरकडे कोणत्याही प्रकारची वाहतूक परवाना नव्हता त्यांनी लगेच त्यांचे मालकाला फोन करून नदीपात्रात बोलावून घेतले, नदीपात्रात दोन चाकी वाहने आले असता, सदर वाहनाचा क्रमांक Mh 28 BL 3644 आहे,व दोन चाकी वाहन क्रमांक MH 28 BH 4708 या वाहनावर ट्रॅक्टर मालक व सोबत व्यक्ती असे नदीपात्रात आले,त्यांनी अधीकाऱ्याना विचारणा केली तुम्ही कोण आहे तर त्यांना परिचय दिला असता राहुल तायडे तहसीलदार नांदुरा व मंडळ अधिकारी अनिल जोशी आहे, आपले वाहन अवैध आहे,आपण सदर वाहन तहसील कार्यालय नांदुरा येथे घेऊन चला सदर वाहन मालक पैसोडे राहणार दादुलगाव तालुका जळगाव जामोद व इतर यांनी वाहनांच्या दूर व्हा… ताकद असेल तर ट्रॅक्टर अडवून दाखवा,असे म्हटले व अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली, व ट्रॅक्‍टर घेऊन पळून गेले सदर वाहनांमध्ये अंदाजे 01 ब्रास रेती ची किंमत 3100/- रुपये आहे हे सर्व 7 ते 8 लोक असल्यामुळे त्यांना अधिकारी रोखण्यास असमर्थ ठरले, सदर महेश पाटील व पैसोडे रा,दादुलगांव तालुका जळगाव जामोद यांनी आमचे शासकीय कामात अर्थडा निर्माण केला, तसेच अवैध रेती वाहतूक उत्खनन करीत होते,तलाठी अभिजीत आमले यांना त्यांनी धमकी दिली, की परत नदीपात्रात आले,तर जिवंत अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकू असे म्हटले त्या प्रमाणे त्यांनी वरील आठ ते दहा लोकांनी शासकीय कामात अडथळा अर्थडा निर्माण केला आणि जिवंत मारण्याची धमकी व अवैध रीत्या रिती या गौण खनिजांची उत्खनन करून वाहतूक केले, असल्यामुळे सदर व्यक्तीवर मोक्का अंतर्गत कारवाई संबंधीता विरुद्ध गुन्हे दाखल कायमी अप नंबर 153/2021 कलम 353/332/143/ 147/ 149/ 504 भादवि कलम 7 क्रिमिनल लॉ अमेडमेट अक्ट 1932 सह कलम 48 (7) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966,या नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार असे नांदुरा तहसीलदार यांनी एका प्रेस नोट द्वारे सांगीतले आहे.

किनगाव खुर्द गावातुन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली घरासमोर उभी असलेली मोटरसायकल पोलीसात तक्रार

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव गावातुन घरासमोर लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार यावल पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे . दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार सत्तार बिस्मिल्ला पिंजारी वय४२ वर्ष राहणार किनगाव खुर्द हे दिनांक २६ मार्च रोजी आपल्या मित्रासोबत फैजपुर येथे गेले होते ते रात्री ८ वाजता किनगाव येथे आपल्या गावी परतल्यावर रात्री त्यांनी आपल्या घरासमोर लावलेली बजाज पल्सर हे दुचाकी वाहन कुणीतरी घेवुन गेल्याची बाब दिनांक २७ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते घराबाहेर आल्यावर आदी सर्वत्र शोध घेतल्यावर समजले , अखेर पिंजारी यांनी बजाज पल्सर या कंपनीची सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच १९ सिके ४७६५हे दुचाकी वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार दिली असुन , यावल पोलीस स्टेशनमध्ये सत्तार बिस्मिल्ला पिंजारी यांनी दिलेल्या माहीतीवरून अज्ञात चोरट्यांविरूद्ध भादवी कलम३७९प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे

दहिगाव येथे विहीरीत उडी घेवुन एका महीलेची आजारास कंटाळुन आत्महत्या पोलीस अक्समात मृत्युची नोंद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील दहिगाव येथे एका महीलेची आजारास कंटाळुन विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन, याबाबत पोलीस स्टेशनला अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , आज दिनांक २९ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्यापुर्वी दहिगाव येथील राहणाऱ्या कोकीळाबाई प्रकाश पाटील वय६oवर्ष यांनी आजाराला कंटाळुन नायगाव रोडवरील दहीगाव शिवारातील राजु दगडु पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडुन आत्महत्या केली आहे . याबाबतची खबर मयत महीलेचे मेहुणे छन्नु पाटील राहणारे नेरी ता . जामनेर यांनी यावल पोलीसात दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन तपास पोलीस कर्मचारी असलम खान हे करीत आहे .