Home Blog Page 497

अवैधरित्या देशी व विदेशी दारूची चार चाकी वाहनाने वाहतूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात अवैधरित्या देशी व विदेशी दारूची चार चाकी वाहनाने वाहतूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद पोलिसांना दिनांक आठ एप्रिल रोजी रात्री गुप्त माहितीवरून खात्रीलायक माहिती मिळाली कुर्हा काकोडा गावाकडून पिंपळगाव काळे या गावाकडे एक पांढर्‍या रंगाची मारुती सुझुकी क्रमांक एम एच २८ सी १३९६ या गाडीमध्ये देशी व विदेशी दारू अवैधरित्या वाहतूक करणार आहेत अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून जळगाव जामोद पोलीस निरीक्षक श्री सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक परलाद मदन व पोलिस नायक गणेश पाटील यांनी पिंपळगाव काळे येथे एम एस सी बी पावर हाऊस जवळ रात्री दीड वाजेच्या दरम्यान नाकाबंदी केली असता तेथे वर नमूद वर्णनाची सदर गाडी थांबविली असता सदर गाडी थांबून आरोपी पळून जात असताना एका व्यक्तीला पकडले तसेच एक व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पळून गेला.तसेच
पकडलेला व्यक्ती नांदुरा येथील असून त्याचे नाव विक्की राजेश ओवाळकर असे आहे सदर गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये पांढर्‍या रंगाच्या पोतडीमध्ये देशी दारू टॅंगो पंच ९० एम एल च्या प्रत्येकी किंमत तीस रुपये च्या ४०० शिश्या एकुण किंमत १२००० हजार रूपये व इंम्पेरिअर ब्लू कंपनीच्या १८० एम एल च्या प्रत्येकी किंमत १४०रुपये च्या ४८ शिश्या एकुण किंमत ६७२० रूपये व मिळून आलेली गाडी जुनी वापरती पांढर्‍या रंगाची मारुती सुझुकी क्रमांक एम एच २८ सी.१३९६ किंमत ८०००० हजार रुपये व तीन पांढऱ्या रंगाच्या पोतड्या किंमत तीस रुपये असा एकुण ९८७५० रुपयाचा माल मिळून आला. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चावरिया साहेब अप्पर पोलीस अधीक्षक राजपूत साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी तडवी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांचे आदेशाने व सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन व पोलीस नाईक गणेश पाटील यांनी केली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मदन व गणेश पाटील हे करीत आहेत.

पिडीत महीलेला न्याय देण्यास प्रेस संपादक सेवा संघाचा महीला जिल्हा अध्यक्षा उषा पानसरे यांनी घेतला पूढाकार

0

 

असदपूर दिनाक 8 /4 /02021 रोजी प्रेस संपादक सेवा संघाचा वतीने उषा पानसरे महीला जि. अध्यक्ष यानी असदपूर ‘ ग्राम पंचायत ग्राम विकास अधिकारी दाळसिपे व असदपूर सरपच सौ ममता ताई येवूतकर याना निवेदन देण्यात आले
तसेच शहापूर ग्राम पंचायत ग्राम विकास अधिकारी पवार साहेब व सरपच चापके बाई याना पण निवेदन देण्यात आले ।
पिडीत महीले ला न्याय पिडीताचे नाव रेखा बाई पाठक वय 50 { धनगर समाज )मिळावा व तिचा वर अ त्याचार ‘अन्याय मारपीट ‘चोरी करून सर्व सामान झोपडी तोडून बेघर करून अश्रिल चाळे केले असल्यास महीला दिनांक 13 /3 /2021 दि शनिवार पासून शहापूर ग्राम पंचायत व पोलिस चौकी समोर रात्र दिवस बसली असून कोणी तरी मदत करेल या आशाने धरने आंदोलनला बसले आहे । तिने दिनाक 24/3 रोजी पोलिस स्टेशन आसेगाव ला रिपोर्ट देवूनही तिला पागल समजून आरोपी ला अटक केली नाही का?बर
आरोपीला बोलावून विचारतात कि तूम्ही त्या महीले स्वबोत अश्रिल हरकत केली का?
तर त्यानी नाही म्हटले तर सोडून देणे हेच चौकशी का?
चोरी करनारा यदी चोरी कबूल करल का? हा विचार बिट जमादार व थानेदार साहेबानी करायला पाहीजे ति महीला खूद 12 हजार 90 लोकसंखे मधून हयाच लोकांचे नाव का घेत आहे तसेच पोलीस पाटील रिपोर्ट देण्यास का जावू दिले नाही हे च का वारवर बोलतो कारण काय?
याचा विचार न करता आरोपीला सोडून देने हे मात्र नंक्कीच घडत आहे तेही वारंवरा
तिला न्याय देण्यात यावा व लवकरच मा.एस पी साहेब ग्रामिण अमरावती याना भेट देनार प्रेस संपादक सेवा चा उषा पानसरे अध्यक्षा
सचिन नितनवरे ग्राम पंचायत सदस्स शूभम कोल्हे’ प्रभाकर पारे’ आशिष मूंदार सतिस तायडे सजंय कपाटे अंकूश उपासे बेबीताई दूर्ण शेखर ताथोड रहेमत खान गजानन कोसरे लिना कोसरै काशिनाथ कोसरै हमिदूल्हा खान ठेकेदार उमेर खान साकिब खान उबेद खान सूनिल ठाकरे प्रल्हाद डवरे प्रतिक बारबूद्धे रन्ताबाई काळे शूभम भूस्कट ईनायत खान ओम प्रकाश काळे ईफ्रान पठान मनोज भावू चव्हाण
व लवकरच मा. एस पी साहेबाची भेट घेनार व निवेदन देनार प्रेस चा पत्रकार व समाजसेविका उषा पानसरे असदपूर

पुढील आठवडयात येणाऱ्या पवित्र रमजानच्या आगमनामुळे केळीला मिळाला १६०१ चा भाव शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

0

 

 

यावल ( प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

काळ बदलायला  वेळ लागत नाही या उक्तीप्रमाणे आजच्या स्थितीत केळीचा काळ बदलला आहे आणि म्हणून काही महिन्यांपूर्वी केळी कोणी घेईना अशी बिकट अवस्था केळी उत्पादक शेतकऱ्यांची झाली होती, अशी स्थिती झाली असतांना मात्र आता एका आठवडयावर येवुन ठेपलेल्या मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजानच्या उपवासामुळे केळीची मागणी परपरांतात वेगाने वाढल्याने आजचा काळ हा केळीचा आल्याने केळी घ्या केळी अशी वेळ आली आहे. त्यात ही उच्च प्रतीची दर्जेदार केळी तर जास्त भाव खावुन जात आहे. तेजीत कापणी भाव मिळाला नाही तर केळी नसल्यामुळे  भाव  मात्र कासव गतीने वाढत आहे.
मनवेल येथील शेतकरी धनसिंग सोमा पाटील यांचा उच्च प्रतिच्या
केळीला १६०१ रुपयाचा भाव मिळाला आहे. मागील काळात केळी ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रसंगी पटेल त्या भावात केळीची कापणी केली तर गेल्या काही दिवसापासुन केळीला चांगली मागणी वाढलेली आहे . दरम्यान आता बदलत्या वेळेनुसार केळी मिळत नसल्यामुळे व्यापारी भाव वाढुन देत असल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असुन , येत्या काही दिवसात केळीच्या भावात अजुन मोठी वाढ होण्याची शक्यता केळीचा व्यवसाय करणारी मंडळी व बाजार पेठेतील जाणकारांचे मत आहे .

परतवाडा पोलीसांच्या कार्याला सलाम

0

विमल रामभाऊ भोरे यांना रोख रक्कमेसह पर्श केली परत
====================
हंसराज उके अमरावती
====================
आज तारीख ७/४/२०२१ला बस
स्टाँड परतवाडा परिसरात ड्युटीवर असलेल्या साहय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाल खानंदे बँच नबंर ९७५व महिला पोलिस शाहीण शबास खान बँच नबंर ९१६यांना परतवाडा बस स्टँड परिसरात दुपारी बारा च्या सुमारास पेट्रोलिगं वर असताना
एक पस्र सापडली व त्या पस्रमधे
विमल रामभाऊ भोरे यांच्या नाव आधार ओळख पत्राचे ह्या रा.हरम
नावाच्या आधार ओळख पत्राची मिळाल्याची माहिती परतवाडा पोलिस स्टेशनचे करतव्यदक्ष पोलिस निरीक्षक सदानंद मानकर यांना दिली पोलीस निरीक्षक मानकर यांनी सदर पस्र मिळाल्याची माहिती शोशल मिडीयावर टाकत सदर महिला पस्र धारक विमल रामभाऊ भोरे
माहिती देण्याचे आव्हान केले त्यावर हरम येथील विमल भोरे या
परतवाडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या पस्र परत मिळाल्यामुळे त्यांनी पोलीसांचे आभार मानले गरीब महिलेचे पैसे व पस्र परत केल्याचे समाधान व्यक्त आणि विमल भोरे यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहून पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचाऱ्यांना व करतव्यदक्ष सदानंद मानकर यांच्या कार्याला सलाम.

अपंग बेरोजगाराचे कर्ज प्रकरण मंजूर करा अन्यथा बँकाना घेराव घालणार

0

 

हंसराज उके अमरावती

अपंग जनता दल सामाजिक संघटना चा इशारा

अमरावती..शासन निर्णय प्रमाणे अपंग बेरोजगाराना रोजगारासाठी बीज भांडवलं योजना सुरु असून या योजने मध्ये अपंग बेरोजगार यांना एक लाख पन्नास हजार रुपये कर्ज मिडते यामध्ये शासना कडून 30 हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात येते व एक लाख वीस हजार बँक देते असे एकूण एक लाख पन्नास हजार मंजूर झाल्यावर बँक मार्फत अपंगांना देण्यात येत असून अमरावती जिल्ह्यात अनेक अपंग बेरोजगार यांनी जिल्हा परिषद समाज कल्याण अपंग विभागात अर्ज केले आहे व त्यांनी सर्व अर्ज तपासून संबंधित बँकना मंजूर साठी पाठविले आहे पण बँक ये अपंग बेरोजगार यांना कर्ज मंजूर करत नाही आहे व त्यांना उडवा उडवीचे उत्तर देऊन त्याची दिशा भुल करत आहे
अपंग बेरोजगार यांनी पैसे खर्च करून कर्ज प्रकरण तयार केले व अपंग विभाग दिले पण बँक मॅनेजर याचा उडवा उडवीचे उत्तर मुडे अपंगांना मानसिक त्रास सहन करावा लागत असून दिनांक 15 /04 / 2021 परंत अपंग बेरोजगार चे बँक ने कर्ज मंजूर केले नाही तर अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावती चा वतीने संबंधित बँका ना अपंग घेराव आंदोलन करणार असा इशारा अध्यक्ष शेख अनिस पत्रकार यांनी दिला आहे

नांदुरा-जळगाव (जामोद) रस्त्यावर लवकरच आरओबींची निर्मिती होणार – खासदार रक्षाताई खडसे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

कोरोनाचा कठीण काळ असला तरीही देशांतर्गत कोणतीही विकासकामे बंद नाहीत. याचीच प्रचिती म्हणून आज खासदार रक्षाताई खडसे यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यात नांदुरा-जळगाव (जामोद) रस्त्यांवरील आरओबी निर्मिती कारण करण्याबाबतच्या कामांना गती देण्याचे आणि कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. महामार्गांचे चौपदरीकरण होण्याचे दिवास्वप्न प्रत्यक्षात साकार होते आहे याचेच हे जिवंत उदाहरण! नांदुरा-जळगाव-जामोद रस्त्यांवर वाढत्या ट्राफीकच्या समस्येने आणि सुरु असलेल्या रस्त्यांचा कामांमुळे जनसामान्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे या मार्गावरील कामांना जलद गती देण्यात यावी अशी भागातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी मागणी आहे. त्याअनुषंगाने आज खासदार रक्षाताई खडसे यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक ठेवून सुस्तावल्या अवस्थेत सुरु असलेल्या कामांबाबत आढावा घेतला.

जनसामान्यांना चांगले रस्ते लवकरात लवकर उपलब्ध होण्याची प्रदीर्घ प्रतीक्षा आहे. त्यामुळे सुरु झालेले काम कासव गतीने होऊ लागताच जागृत नागरिक व शेतकरी हे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कामे लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशीलपणे कृतिशीलता दर्शवित असतात. आज नांदुरा-जळगाव-जामोद रस्त्याला प्रत्यक्ष भेट देऊन नांदुरा गेट क्रमांक १६ बाबत महामार्ग व रेल्वे अधिकाऱ्यांशी खासदारांनी चर्चा केली. तसेच नांदुरा-जळगाव-जामोद रस्त्यांवरील आरओबीसह डिजिटल माहिती फलक, सिक्युरिटी कॅमेरा, बसण्यासाठी पत्र्याचे शेड, शौचालय, सुरक्षा भिंत तसेच शेतीसाठी अंडर पास रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा आढावा खासदार रक्षाताई खडसे यांनी घेतला. गेट क्रमांक १९ महार्गाच्या कामकाजामुळे बंद झाल्यामुळे पर्यायी रस्ता नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत रेल्वेसह महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. यावेळी सेंट्रल रेल्वेचे सिनिअर डी.एन.इस्ट अधिकारी किशोर सिंग यांच्यासह महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकनेते विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवालयात “भाजपा स्थापना दिन” साजरा

0

 

अजहर शाह मोताळा

बुलडाणा:- भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 अप्रिल 1980 रोजी भारतीय जनसंघ व जनता पक्ष यांची मिळून झाली. आज पक्षाचा 41 वा स्थापना दिवस असल्याने बुलडाना येथे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा आमदार विजयराजजी शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय “शिवालय” येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत साजरा झाला.

भारतीय जनता पक्षाच्या उभारणी व विचारधारेत ज्यांचे भरीव योगदान आहे अश्या भारतीय जन संघाचे संस्थापक स्व.श्यामाप्रसादजी मुखर्जी व पंडित दिन दयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे प्रथमतः पूजन करून लोकनेते विजयराजजी शिंदे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करून या महापुरुषांना उपस्थित सर्वानी अभिवादन केले. यावेळी “भारतीय जनता पक्षाचा विजय असो” , “भारत माता की जय” आदि घोषनांनी कार्यलय परिसर दणानून गेला होता.
यावेळी बोलताना मा.आमदार विजयराजजी शिंदे यांनी बोलताना सांगितले की ,”भारतीय जनता पक्षास गौरवशाली व संघर्षशिल इतिहास आहे. पक्षाचे अनेक महापुरुषांच्या परिश्रमातुन विशाल अश्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे.पक्षाची राष्ट्रवादाची विचारधारा व अंत्योदय सिद्धांत यांच्या आधारावर पक्ष जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेला आहे तसेच पंत प्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात येणाऱ्या काळात देश “आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करेल यांत शंका नाही” असे मत व्यक्त केले.
यावेळी महिला मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेड़ेकर,मा.नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले,प्रा.जगदेवराव बाहेकर, तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे,नगरसेवक अरविंद होंडे,प्रा.प्रभाकर वारे, दत्ताभाऊ पाटिल,प्रकाश राजगुरे,विनायक भाग्यवंत,नंदिनीताई साळवे,पद्मनेताई,गणेश पांडे,विधि आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍड मोहनदादा पवार,ऍड दशरथसिंग राजपूत,शेख रशिद ई कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

सेलू तालुक्यातील सोन्ना, वलंगवाडी येथील प्रा. आ. उपकेंद्रात कोविड लस मोहिमेस प्रारंभ

0

 

अजहर पठान सेलू/परभणी

कोरोनाच्या या लाटेला सामोरे जाण्याची तयारी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोविड 19लस मोहिमेस सॉन्ना, वलंगवाडी येथील ग्रामस्थांनी लस टोचून घेण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोंन्ना गावचे सरपंच श्री. प्रमोद गायके, ग्रामसेवक खरात, ग्रां प. सदस्य श्री. गोविंद मगर, तलाठीश्री. सोडगिर्वार, भा ज पा. किसान मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. दगडोबा जोगदंड पाटील यांनी लस टोचून घेण्याचे महत्व पटवून लस टोचून घेण्याचे आवाहन केले. लसीकरण यशस्वितेसाठी डॉ. मुक्तेश्वर पारवे, आरोग्य सेविका एस आर. सुडके, एफ एम. पर्ले, प्रा. शिक्षक श्री. प्रवीण सानप, आशाताई आशमती काळे, गंगुताई शेळके गणेश त्तार्डे, अशोक मगर, दत्ताबुवा गीरीआदींनी परिश्रम घेतले

जिल्हयात ऑक्सीजन निर्मिती व रिफीलींग उद्योगासाठी पुढे यावे

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन
परवाना देण्यासाठी विभाग तत्पर

बुलडाणा:-जिल्ह्यात एकुण ऑक्सीजनची मागणीनुसार पुरवठयाचे नियोजन प्रशासनामार्फत केले जात आहे.

जिल्ह्यासाठी मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा माऊली उद्योग,अकोला, मे. इसीस गॅसेस,जालना यांचेकडून निरंतर सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सदर पुरवठा अखंडीतपणे सुरु राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी आरोग्य विभागाचया समन्वयाने काम करीत आहे.

तसेच जिल्ह्यामध्ये ऑक्सीजनचे एकही उत्पादन व रिफीलर नाहीत जिल्ह्यात खाजगी व शासकीय हॉस्पीटलमध्ये आवश्यक असणारा मेडीकल ऑक्सीजन हा बाहेरुन जिल्ह्यामधून मागविण्यात येत आहे. कोव्हीड – 19 या विषाणुजन्य आजारात रुग्णाचे वाढते प्रमाण पाहता भविष्यात मेडीकल ऑक्सीजनची जास्त गरज भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित वेळीही ऑक्सीजनची शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांना गरज राहते. जिल्ह्यातील घाऊक औषध विक्रेता किंवा ज्यांना सदर व्यवसाय करावयाचा आहे, त्यांनी पुढे यावे. ऑक्सीजन निर्मिती किंवा रिफीलींगचा उद्योग जिल्ह्यातच निर्माण करावा. त्यासाठी त्यांनी सदर कार्यालयातील सहायक आयुक्त औषधे अशोक बर्डे, औषध निरिक्षक गजानन प्रल्हाद घिरके, यांचेशी संपर्क साधावा. जेणेकरुन असे व्यावसायीक पुढे आल्यास ऑक्सीजन उत्पादन, रिफीलींग तसेच घाऊक व्यवसाय करणाऱ्यांना कार्यालयातील अधिकारी परवाना मिळणेसाठी त्वरीत मदत करतील. अशा उद्योगांना परवाना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग तत्पर आहे. तसेच जिल्ह्यातील जागरुक नागरिकांनी रुग्णहिताच्या दृष्टीकोनातुन समोर येवून सामाजिक हित जोपासावे असे आवाहन सहायक आयुक्त (औषधे) अन्न व औषधे प्रशासन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे

संडास च्या वादावरून दोन कुटुंबात हातापायी

0

 

सचिन वाघे वर्धा हिंगणघाट प्रतिनिधी,

दोन कुटुंबियामिळून घरी एकच संडास असल्याने झालेल्या वादातुन एकमेकांना गंभीर मारहाण केल्याची घटना आज सकाळी शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड येथे घडली.
स्थानिक संत ज्ञानेश्वर वार्ड येथील रहिवासी अनिल भलमे (४०) यांचे कुटुंबिय एकाच घरी राहतात, जुने वडीलोपार्जित घर आहे. दोन्ही कुटुंबिय मिळून एकच संडास असल्याने कुटुंबियात संडासचे वापरावरुन नेहमी वाद होत असतो.
आज सकाळीसुद्धा संडासचे वापरावरुन दोन्ही कुटुंबियांत वाद झाला. वादाचे पर्यवसान लाठीकाठीसह हल्ल्यात झाले.
यात कुटुंबियांपैकी नाना भलमे याचेवरकाठी व विटेने वार करीत गंभीर जखमी करण्यात आले,
जखमी नाना भलमे यास उपचारार्थ स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात पाठविले.