Home Blog Page 498

वडाळी येथे कोरोना लसीकरणास चांगला प्रतिसाद

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

प्राथमिक आरोग्य केंद्र

नांदुरा च्या वतीने आज दि, 6/4/2021 रोजी वडाळी ता.नांदुरा येथे कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली, या लसीकरणा मध्ये ग्रामपंचायत वडाळी येथील आज 154 व्यक्तींनी कोरोना लस घेतली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथील डॉ. नारखेडे मॅडम, डॉ. चंदनगोडे सर, सोळंके मॅडम, आरोग्य सेवक चव्हाण सर, आरोग्यसेविका तायडे मॅडम, अवतार मॅडम तसेच वडाळी येथील आशा गोदावरी वक्ते, जि. प. प्राथमिक शाळा, वडाळी येथील शिक्षक अवचार मॅडम, होनाळे मॅडम, धनोकार मॅडम, तसेच ग्रामपंचायत वडाळी चे नवनिर्वाचित सरपंच सौ. विद्याबाई ज्ञानेश्वर वक्ते, गोविंदा वक्ते, विशाल वक्ते, मनोज आत्माराम वक्ते, आदींनी ज्येष्ठ नागरिक तथा 45 वर्ष वयावरील व्याधिग्रस्त नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले.

0

नांदुरा:-(प्रफुल्ल बिचारे पाटिल)

सध्या शहरांसह ग्रामीण भागातही कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कोरोना संसर्ग, लसीकरण आणि सामाजिक मूल्यांबाबत कृतिशील जनजागृती केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुका दौऱ्यावर खासदार रक्षाताई खडसे असतांना शेंबा, टाकारखेडा, बेलुरा, तरवाडी, खैरा, फुली आणि कंडारी आदी गावांना सदिच्छा भेट दिली. यावेळी गावातील गावकऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव संसर्ग व कोविड चाचणीबाबत जागृत करण्यात आले. तसेच पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत गावकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेचा आढावा घेऊन विविध सरकारी योजनांबाबत पूर्ण मार्गदर्शन खासदारांनी गावकऱ्यांना केले. आज नांदुरा तालुका रेस्ट हाऊस येथे खासदार रक्षाताई खडसे व भाजपा नेते मा. चैनसुखजी संचेती माजी आमदार मलकापूर यांच्या उपस्थितीत अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
खारे पाणी पट्टीतील जमीन सिंचनाकृत करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पोकरा योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी खासदारांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. त्याचबरोबर शिधा पत्रिका धारक नागरिकांना रेशन मिळण्याबाबत आणि पिण्याच्या पाण्याची वीज कापणी थांबविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. तालुक्यात कोरोनाच्या लढ्यासाठी औषधींचा व इंजेक्शनचा तुटवडा भासल्यास तत्परतेने त्या उपलबध करून दिल्या जातील; रुग्णांसाठी अवश्यक असलेली सर्व मदत करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त वेगाने कोरोना संसर्ग आणि लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम गावा-गावात राबविण्यात येण्याबाबत खासदारांनी ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करून जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळा सुरु झाला असून त्यानुसार गावा-गावातील पाणी टंचाईवर प्राधान्याने उपाय योजना राबविल्या जाव्यात. यासोबतच पुढील वर्षासाठी सोयाबीन बियाणे तुटवड्याबाबत आढावा घेण्यात आला असून १४ हजार क्विंटल सोयाबीन बियानाची मागणी पुढील वर्षासाठी करण्यात आलेली आहे. पोकरा योजनेअंतर्गत ट्रॅक्टर वितरण सुरु झाले असून खरेदी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. पोकरा योजनेसाठी ६९ गावांची निवड करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तहसीलदार कार्यालयात पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी आधार क्रमांक व खाते क्रमांकांसाठी केवायसी केली जात असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच गावकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी गावांना समक्ष भेटी द्या असे आवाहन खासदार रक्षाताई खडसे व चैनसुखजी संचेती यांनी अधिकाऱ्यांना केले. यावेळी पोलीस निरीक्षक, बी.डी.ओ. नगरपंचायत सदस्य, कृषी अधिकारी,शहर अध्यक्ष श्याम राखोंडे, नांदुरा तालुका अध्यक्ष संतोष मुंढे, सुधीरभाऊ मुर्हेकर, महिला शहर अध्यक्ष सारिका डागा, बेटी पढाओ, बेटी बचाओ अध्यक्ष ज्योती तांदळे, शंकरसा ताकवाले, दत्ताभाऊ सुपे, प्रमोद हिवाळे, संजयभाऊ फणसे, ब्रम्हानंद चौधरी, उमेश शंकरसा ताकवाले, लक्ष्मण झांबरे, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस विजय पाटील, प्रविणभाऊ मानकर, तालुका व शहर भाजपा अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक द चैन च्या नावावर जनतेची व व्यापाऱ्यांची शासनाने केली फसवणूक अजय वानखडे अध्यक्ष, व्यापारी संघटना जळगांव(जामोद)

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

पाच एप्रिल पासून *कडक निर्बंध लावून फक्त *शनिवार व रविवारी संपुर्ण लॉक डाऊन करण्यात येईल असे मंत्री मंडलातील जेष्ठ, श्रेष्ठ मंत्रीगण काल पासून सांगत होते मात्र आज आता प्राप्त जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून त्यांनी जनतेची व व्यापारी वर्गाची सफसेल फसवणूक केल्याचे स्पस्ट झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊन ची घोषणा करून व्यापाऱ्यांसमोर भले मोठे संकट निर्माण केले आहे. लॉक डाऊन करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे नियोजन केल्या गेलं नाही, विजेचे बिल, नगर पालिका टॅक्स, इनकम टॅक्स, दुकानांचे भाडे, कर्जाचे हप्ते,ज्यांचे हातावर पोट आहे अश्यांचा उदरनिर्वाह कसा होईल याबाबत तरदूत करणे आवश्यक असतांना फक्त दुकाने बंद चा आदेश देने हा अन्याय कारक आहे . तब्बल पंचवीस दिवसांचा लॉक डाऊन करून व्यापाऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणून ठेवली आहे. वर्ष भरात शासनाने कोरोना संदर्भात कोणत्या उपाययोजना केल्यात ह्या बाजूला ठेऊन जनतेला वेठीस धरण्याच्या या धोरणाचा निषेध करावा तेवढा कमीच!
वर्षभरात तालुका स्तरावर कोरोना टेस्टिंग ची एक लॅब उभारली गेली नाही, जिल्हास्तरावर लॅब सुरू केली तिचीही मर्यादा दिवसाला फक्त 1000 swab तपासण्याची आहे. रॅपिड अँटीजन टेस्ट ही बेभरवश्याची असल्याचे सिद्ध झाले आहे. तालुका स्तरावरील कोविड सेंटर हे कंत्राटी डॉक्टर वर अवलंबून आहे एक ही *एम. बी.बी. एस डॉक्टर या ठिकाणी नाही.* एक ही व्हेंटलेटर या ठिकाणी नाही. फक्त टेस्टिंग चा सपाटा लावला आहे . Positive आल्यानंतर तुम्हाला पुढे रेफर केलं जाते, पुढे बेड मिळत नाही अश्यावेळी काय करावं हा मोठा प्रश्न आहे. स्वतःचे अपयश लपविण्यासाठी जनसामान्यांना वेठीस धरण्याचाच हा प्रकार का समजू नये ! ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्या साठी लॉक डाऊन हा *आत्महत्या करण्याकरिता उपलब्ध करून दिलेला पर्याय ठरू नये* एवढीच माफक अपेक्षा !
आणि हो कितीही दिवस लॉक डाऊन करा कोरोना हद्दपार होणार नाही हे सूर्य प्रकाशा इतके सत्य आहे. लसीकरणाची गती अगदी धीम्या गतीनं, कोरोना चीन मध्ये गेला अन परत आला असे मुळीच नाही मग आपण झोपला होतात का ? आरोग्य खात्यात लक्षवेधक उपाययोजना केल्या नाहीतच मग आम्ही तुम्हाला फुकट काय मागतो ! *नियमांचे पालन करून आम्हाला आमचे व्यवसाय करू द्या जगू द्या,* कोरोनाने मरू तेव्हा मरू वीणा कोरोनाने मारण्याची वेळ आमचेवर आणू नका एवढीच मागणी आहे आमची !
पुन्हा सांगतो *लॉक डाऊन ने कोरोना ला हरविता येणार नाही नाही नाहीच !!*
व्यापारी संघटित नाहीत त्याचा गैरफायदा घेतला जात आहे,तुमच्याकडे नियंत्रण करण्याकरिता पुरेशी यंत्रणा नाही. रिपोर्ट यायला पाच सात दिवस लागतात तो पर्यंत इलाज काय करावा हे समजत नाही, काही Positive पेशंट बिनधास्त समाजात वावरताना त्यांना अडकाव करण्याची कुवत तुमच्या कुचकामी यंत्रणेत नाही, फक्त एकच दुधारी शस्त्र *लॉक डाऊन* उपसले म्हणजे आपण खूप मोठे काम केले याचाच आव आणल्या जातो हे आमचे दुर्दैव आहे !!
आगामी दिवसात व्यापारी *रस्त्यावर उतरल्यास* त्याचे कोणाला आश्चर्य वाटायला नको तूर्त एवढंच !!

महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी परवानगी मिळणे बाबत व जमावबंदी आदेश मागे घेण्यासाठी निवेदन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

या निवेदनात नमूद करण्यात आले की मागील वर्षी covid-19 मुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती,महात्मा फुले जयंती व इतर थोर महापुरुषांच्या जयंती, उत्सव प्रशासनाच्या विनंतीमुळे 100% साजऱ्या झालेल्या नाहीत सर्वांनी शासनाच्या नियमाचे पालन करून जयंती घराघरात साजरी केली आपण covid-19 चे कारण पुढे करून जयंती वर बंदी घालत आहात,असे पाहता येथून पुढे माणसांना या विषाणूसोबत जीवन जगावे लागणार आहे,महापुरुषांच्या जयंती हा सण प्रत्येक वेळी आपण नियमांची अट घालून थांबू शकत नाही आपण जनभावनांचा आदर केला पाहिजे ज्याना आजाराची भीती आहे अशा लोकांनी सार्वजनिक ठिकाणी येऊ नये परंतु जे लोक नियमांचे पालन करून जर कार्यक्रम करीत असतील तर त्यांना हे अडविणे चुकीचे आहे जयंती ही प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून साजरी करण्याची व जनभावनेचा आदर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कोरोणाचे संकट वाढत आहे त्यामुळे लॉकडाऊन लावून जनतेवर निर्बंध लागलेले आहेत आरोग्य सेवा पुरविण्यात शासन अपयशी ठरत आहे वास्तविक पाहता सरकारने आरोग्य सुविधा वर भर द्यावा व इतर प्रतिबंधक उपाय करावे, निर्बंधांमुळे सामान्य जनता भरडली जात आहे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहे ,लोकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत गर्दीमुळे कोरोना वाढत असेल तर गर्दी नियंत्रित करण्यासाठी केवळ कडक निर्बंध न लावता जनतेला नियमाचे पालन करण्याचे आवाहन करावे व आपण जनतेवर लावलेले कडक निर्बंध मागे घेऊन जमावबंदी आदेश मागे घ्यावा व जनतेला होत असलेला त्रास थांबावा या निवेदनावर शंकरराव इंगळे ,अरुण पारवे ,देवानंद दामोदर, सुनील बोदडे, साहेबराव भगत महादेव बोदडे ,अभिषेक बोदडे, सुभाष शिरसाट ,विजय तायडे ,विलास तायडे सुरेश वाघोदे इत्यादींच्या सह्या आहेत

लॉकडावून काळात सी .एस .सी . सेंटर चालू ठेवण्याची मागणी ! पंचायत समितीचे सदस्य संतोष आडे यांचे तहसीलदारांना निवेदन !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सध्या महाराष्ट्रामध्ये रात्रीची संचारबंदी दिवसा जमावबंदी . तसेच लॉकडाऊन चे आदेश जारी झाले आहे .त्यामुळे अनेक अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद आहेत ‘अशा परिस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या csc केंद्र ‘लॉक डाउन काळामध्ये सुरू ठेवण्याची मागणी .पंचायत समिती सदस्य दत्ता आडे ‘व तंटामुक्ती अध्यक्ष संजय पवार .यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .त्यांनी दिनांक 5 एप्रिल रोजी सिंदखेड राजा तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले ‘निवेदनामध्ये म्हटले आहे की ‘अतिशय महत्वाचे असे काम csc सेंटर च्या माध्यमातून होत असते .मुलांचे शिष्यवृत्तीचे अर्ज असतील .मुलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र शाळेतील परीक्षेचे अर्ज ‘जातीचे प्रमाणपत्र .इत्यादी कामे हे सीएससी सेंटर च्या माध्यमातून होत असतात .व ही कामे झाली नाही तर विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते .व त्यांच्या शिक्षणासाठी अडथळा निर्माण होईल ‘म्हणून लोक डाऊन काळामध्ये .csc सेंटर चालू ठेवण्याची मागणी पंचायत समिती सदस्य दत्ता आडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे !

कोरोना चा कहर व उष्णतेची लहर .यामुळे साखरखेर्डा बस स्थानकावर शुकशुकाट !

0

 

शासनाच्या नियमाचे पालन करावे ठाणेदार जितेंद्र आडोळे व सरपंच दाऊत सेठ कुरेशी यांचे आव्हान !

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना च्या पार्श्वभूमीवर जमाबंदी व संचारबंदी लागू झाली आहे ‘तसेच प्रत्येक ठिकाणी वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने सुद्धा काल रात्रीपासून आदेश जारी केली आहे ‘तसेच दहा एप्रिल पर्यंत असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे सुद्धा लोक हैराण झाले असून उष्णतेपासून पासून वाचण्यासाठी लोक शेतातील लिंबाच्या वआंब्याच्या झाडाचा आश्रय घेत आहे ‘सूर्य आग ओकू लागल्या मुळे अंगाची लाही लाही होत असून .मधेच लाईट हि जात असल्यामुळे लोक आणखीन परेशान झाली आहे .त्यामुळे व कोरोना ची संख्या वाढत असल्यामुळे साखरखेर्डा येथील बस स्थानकावरील सर्व दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद होती ‘म्हणजेच कोरोना ची लहर व उष्णतेचा कहर यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते .अनेक लोकांनी कोरोना मुळे व उष्णतेच्या लाटेमुळे प्रवास करणे टाळले आहे तर शासनाच्या दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे लोकांनी पालन करावे असे आव्हान साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे व साखर खेडा ग्रामपंचायत सरपंच दाऊत सेट कुरेशी यांनी केले आहे ‘

रमजान पवित्र महिन्यातील लोडशेडिंग बंद करण्यात यावी मलकापुर पांग्रा येथील मुस्लिम बांधवांची विद्युत अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

14 एप्रिल पासून इस्लाम धर्माचा पवित्र महिना रमजान सुरू होत आहे, रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रात्री तीन ते चार वाजता सहीरी साठी उठतात व दिवसभर अन्नपाणी सेवन न करता उपवास ठेवतात ,तसेच रात्री नमाज तरावीह व कुराण पठण करत असतात . यामुळे मलकापूर पांग्रा येथील मुस्लिम बांधवांनी विद्युत अभियंत्याला दिनांक चार एप्रिल रोजी निवेदन देऊन रमजान महिन्यातील लोड शेडींग बंद ठेवण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली. मुस्लिम बांधव हे मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलां पासून ते ज्येष्ठांपर्यंत उपवास करत असतात परंतु उन्हाळा सुरू असल्याने वाढलेल्या भयंकर तापमानापासून उपवास धरला त्रास होईल व रात्री 3 वाजता स्वयंपाक करणे नमाज पठण करणे या कामात महिलांना त्रास होणे या सर्व बाबींचा विचार करून रमजान महिन्या 14 एप्रिल 20 21 ते 15 मे 2021 पर्यंत पूर्णत लोडशेडिंग बंद करण्यात यावी.. अशी मागणी मुस्लिम बांधवांनी विद्युत अभियंता मलकापूर पांग्रा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली
यावेळी निवेदन देताना जलील वहीद शेख ,फजल खान मजीत पठाण, निशान खान ,शेख तालिब , राजिक पटेल ,एजाज खान, सय्यद आसिफ उपस्थित होते.यामुळे आता पवित्र रमजान महिन्यामध्ये उष्णतेची लाट बघता विद्युत वितरण कंपनी काय निर्णय घेते हे बघणे औचित्याचे ठरेल !

दि . ७ एप्रिल ते १० एप्रिल पर्यंत बुलढाणा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटे सह विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार, बुलढाणा जिल्ह्यात दि.०७ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची तर दिनांक १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची व हलक्या पावसाची अधिक शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शेतातील कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत, जनावरे सावलीत/गोठ्यात बांधून ठेवावीत.त्यांना पिण्यासाठी स्वच्छ, थंड पाण्याची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करावी. तसेच मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी स्वत:ची व पशुधनाची योग्यप्रकारे काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, बुलढाणा तसेच बुलढाणा हवामान केंद्राचे हवामान निरीक्षक अनिल जाधव यांनी केले आहे ‘अगोदरच शेतकरी निसर्गापुढे हतबल झालेला असताना परत एकदा पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे बागायतदार शेतकरी चिंतातुर झाला आहे !

शिंदी गावातील जास्तीत जास्त लोकांनी कोरोना ची लस घ्यावी ! ग्रामसेवक अर्जुन गवई यांचे आव्हान ! लस संदर्भात शिंदी ग्रामपंचायत मध्ये चर्चा !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस बुलढाणा जिल्ह्यामध्ये झपाट्याने वाढत आहे ‘तसेच ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे तेथील रुग्ण संख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे .या संदर्भामध्ये ग्रामपंचायत प्रशासन हे सतर्क झाले असून ‘जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड लसीकरण सुरू झाली आहे ‘या पार्श्वभूमीवर ’60 वर्षावरील व 45 वर्षावरील नागरिकांनी जास्तीत जास्त कोविड ची लस घ्यावी .या संदर्भात दिनांक 5 एप्रिल रोजी शिंदी येथील ग्रामपंचायत भवनामध्ये छोटी सभा घेऊन चर्चा करण्यात आली .यावेळी ग्रामसेवक अर्जुन गवई यांनी गावातील परिस्थितीचा आढावा घेतला ‘व जास्तीत जास्त नागरिकांनी न घाबरता कोविडची लस घ्यावी असे आव्हान केले ‘व नागरिकांनी तोंडाला मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा घराच्या बाहेर कोणीही विनाकारण फिरू नये असे सांगितले ‘यानंतर समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वायाळ ‘यांनी सांगितले की कोविडची लस पूर्णतः सुरक्षित असून आपण गावातच कोविडचे लसीकरण लवकरात लवकर गावातच सुरू करू असे सांगितले .यावेळी ‘पोलीस पाटील श्री मदन हाडे ‘ग्रामसेवक अर्जुन गवई ‘सरपंच अर्चना ताई खरात ‘सरपंच पती विनोद खरात ‘तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर गावडे ‘समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वायाळ ‘व ग्रामपंचायतीचे इतर सदस्य हजर होते ‘

पत्रकार संरक्षण समितीच्या बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी निर्भीड पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांची निवड!

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

_”खिंचो न कमानों को, न तलवार निकालो…!, जब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो……ना जातीसाठी, ना मातीसाठी लढाई फक्त पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी …. हे ब्रिदवाक्य घेवून कार्य करणाऱ्या ‘ पत्रकार संरक्षण समिती ‘ ने
बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदाची धुरा ख्यातनाम निर्भीड पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे यांच्या खांद्यांवर सोपवली आहे.
आपले पञकारितेचे शिक्षण औरंगाबाद येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाची उच्च पदवी व विशेष बीएड ही शैक्षणिक पात्रता पूर्ण करून दैनिक गावकरी,दैनिक लोकपत्र,दैनिक एकमत,दैनिक लोकमत नंतर स्वतःचे साप्ताहिक तेजस्वी प्रभात, उत्कर्ष प्रभात,दैनिक उत्कर्ष जनतेचा आदी वृत्तपत्रात विशेष लिखाण करुन आपली वेगळी ओळख आणी छबी निर्माण करुन पत्रकारिता श्रेत्रात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करुन केवळ सकारात्मक पत्रकारितेच्या भरवशावर दैनिक लोकमंथन या वृत्तपत्रात निवासी संपादक या पदावर स्थिरावलेले आहे. सुमारे 20 वर्षांपासून विविध वृत्तपत्रांत काम करुन विविध समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे काम पुरुषोत्तम बोर्डे यांनी केले आहे,दैनिक लोकमंथनची बुलडाणा जिल्ह्याची सर्व धुरा प्रामाणिकपणे सांभाळत असतांना दैनिक लोकमंथनचे लोक न्यूज २४ या चॅनेल ची सुध्दा सर्व जबाबदारी पुरुषोत्तम बोर्डे यांच्यावर आली ती सुध्दा ते प्रामाणिक पणे पार पाडत आहेत, अनुभवाच्या भरवशावर पुरुषोत्तम बोर्डे यांच्या कार्याची दखल घेवून आणि पत्रकारांच्या न्याय – हक्कासाठी ते देत असलेला लढा लक्षात घेवून “पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, सह प्रदेश उपाध्यक्ष रामभाऊ खुर्दळ ( नाशिक ) व महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल चौधरी ( पुणे ) व जेष्ठ पत्रकार सुभाष लहाने यांनी पुरुषोत्तम बोर्डे यांची नियुक्ती बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे.पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे हे धडाडीचे व निर्भीड स्पष्टवक्ते आहेत, ते जेव्हा भुमीका घेतात तेंव्हा ती सत्याची व अनेकांना न्याय देण्याची असते त्या मुळे त्यांचे विरोधक सुध्दा त्यांच्यापुढे नतमस्तक होतात, बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारितेला सकारात्मकतेकडे नेणारे व पत्रकारांना स्वाभिमानाची,हक्क व कर्तव्याची जाणीव करून देणारे एकमेव पत्रकार पुरुषोत्तम बोर्डे आहेत त्यांची पत्रकार संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आता सर्व पत्रकारांना नक्कीच न्याय मिळेल ही खात्री आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असुन जिल्ह्याभरातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.