Home Blog Page 500

वैजापूर शहरातील पत्रकाराला सहाय्यक पोलीस निरीक्षकाची शिवीगाळ…….पत्रकार संघाकडून निषेध

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी

वैजापूर शहरातील स्थानिक पत्रकाराला सहायक पोलीस निरीक्षकाची शिवीगाळ : शहरातील जुना बसस्थानक परिसरातील पत्रकार तथा वृत्तपत्र विक्रेते दिपक बरकसे हे रोजनिशी प्रमाणे आज (ता.२७) रोजी त्यांचे वृत्तपत्र विक्रीचे काम करीत होते. कडकडीत उन्हात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास दीपक यांनी पाणी पिण्यासाठी मास्क बाजूला काढला, यावेळी पेट्रोलिंग दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक निलेश केळे हे आपल्या लावाजम्यासह त्याठिकाणी आले. यावेळी त्यांनी दिपक यांना कंबरेखालच्या (अश्लील) भाषेत शिवीगाळ केली. केळे शिवीगाळ करत असताना सोबत असलेल्या इतर पोलीस कर्मचारी यांनी दिपकभाऊ एक जबाबदार नागरिक तथा पत्रकार आहेत असे सन्मानीय केळे यांना सांगितले मात्र केळे हे कुठल्याही कर्मचारी यांचे म्हणणे ऐकायच्या मनःस्थितीत नव्हते…
सहायक पोलीस निरीक्षक केळे यांनी वृत्तपत्रविक्रेते/पत्रकार यांना केलेल्या दमबाजीमुळे वैजापूरात लोकशाही की हुकूमशाही ? असा प्रश्न उपस्थितीत झाला. शिवाय पत्रकार बांधवाना केळे यांच्याकडून अशा प्रकारची वागणूक तर सामान्यांना  कशी वागणूक मिळत असेल ? हा मोठा गंभीर प्रश्न उपस्थितीत होत आहे. आज घडलेल्या घटनेचा वैजापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने जाहीर निषेध… तालुका मराठी पत्रकार संघातर्फे रविवारी निषेध नोंदवण्यात आला.संबधित पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पत्रकार संघाचे सचिव मकरंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव,गणेश पैठणकर यांनी निवेदन स्वीकारले. संघाची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी विजय गायकवाड, भानुदास धामणे,प्रशांत त्रिभुवन, शांताराम मगर,काकासाहेब लव्हाळे,फैसल पटेल,बाबासाहेब धुमाळ,सुनील त्रिभुवन, नितीन थोरात,शैलेंद्र खैरमोडे,सय्यद मन्सूर अली,शेख रियजुद्दीन,अमोल राजपूत,विलास म्हस्के,प्रा.आबासाहेब कसबे,डॉ हरेष साबणे,विशाल त्रिभुवन, दीपक बरकासे, दीपक थोरे,संदीप गायके, सचिन कुमावत,किरण राजपूत,शेख अजहर, मिलिंद वाघमारे,ऋषी जुंधारे उपस्थित होते.

देवाच्या स्थानी ठेऊन रविकांत तुपकरांना पुजले!

0

 

पद धुवूनि, मुलांच्या आसवांची झाली फुले : शेतकरी कुटुंबीयांनी दिवंगत वडिलांचा शब्द पाळत व्यक्त केली कृतज्ञता : कोथळीत घडला ‘न भूतो, न भविष्यती’ भावूक प्रसंग

 

बुलडाणा, मोताळा तालुक्यातील कोथळीचे रहिवासी, ज्ञानी, अभ्यासक, वजनदार व्यक्तिमत्व, हाडाचे शेतकरी मनोहरराव पाटील पाच दिवसांपूर्वी निर्वाणस्थ झाले. आपल्या ८४ वर्षांच्या हयातीत त्यांनी अनेक गोड, कटू अनुभव घेतले. अनेक राजकीय नेते, पदाधिकारी त्यांनी पाहिले. अनेकांना त्यांनी मोठे केले. पण, मिसरुड फुटले नव्हते, त्या किशोरवयीन दशेपासूनच शेतकऱ्यांसाठी सावळ्यातील चंद्रदास तुपकर या शेतकऱ्याचं पोर कष्टकऱ्यांसाठी मर मर करतंय हे मनोहररावांनी वारंवार अनुभवले. तेव्हापासूनच तो शेतकरीपुत्र अर्थात आजचे राज्यस्तरीय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मनोहर पाटलांनी आपल्या काळजात देवरुपी स्थान दिले. शेतकऱ्यांच्या भल्याकरिता दिवस-रात्र न पाहता आपला देह झिजवतो याची जाण कुणी ठेवो की न ठेवो, मात्र पाटील परिवाराने समस्त शेतकरीबांधवांतर्फे रविकांत तुपकर यांचे पाय धुवून, कुंकू लाऊन पूजन करावे व पायांवर फुले टाकावीत व पूजन केलेले पाणी तुळशी वृंदावनात टाकावे अशी इच्छा स्व.मनोहररावांनी मृत्युच्या २-३ दिवसाआधी मुलाकडे व्यक्त केली होती. रविकांत तुपकर जेंव्हा जेंव्हा कोथळीत येतील तेंव्हा तेंव्हा त्यांचे अश्याच पद्धतीने पदपूजन करावे असेही मनोहररावांनी सांगून ठेवले. आपल्या दिवंगत वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण करूनच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल हे मुलगा विठ्ठल पाटलांनी हेरले व मनोहररावांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यासाठी सांत्वनपर भेटीसाठी आलेल्या रविकांत तुपकरांचे पाद्यपूजन करण्यात आले. एवढ्या दु:खदप्रसंगी वडिलांची इच्छापूर्ती करून पाटील कुटुंबीयांनी तुपकरांना देवाच्या स्थानी मानले. या मानाकरिता आपली पात्रता नाही हे सांगत तुपकर कायम विरोध करत होते. पण, देवाचा धावा काय असतो याचा प्रत्यय देत पाटील कुटुंबीयांनी भक्ति प्रकट करून शेतकऱ्यांच्या देवाला प्रणाम केला. भावूक प्रसंगाला नि:शब्द होत तुपकर सामोरे गेले अन् त्यांना गहिवरून आले.
आजपर्यंतच्या इतिहासात कुण्या नेत्याचे पाय धुवून अशी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली नाही, किंवा मृत्यूवेळी अशी इच्छाही कोणी सहसा व्यक्त करत नाही. पण जो प्रसंग घडला तो ‘न भूतो, न भविष्यती’ प्रसंग होता. स्व.मनोहरराव यांचे चिरंजीव पोलीस पाटील विठ्ठल पाटील, त्यांची मुले व सुनेने बळीराजासाठी झटणाऱ्या नेत्याचे पाय धुवून ऋणातून ऊतराई होण्याच्या भावनिक प्रसंगावर जिल्हाभर सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. विठ्ठल पाटील हे गावचे पोलीस पाटील तर आहेत पण पोलीस पाटील संघटनेचे नेतेही आहेत. पाटील घराण्याचे परिसरामध्ये मोठे वजन आहे. वडिलांमध्ये विठ्ठलरावांचा खूप जीव होता. विठ्ठल पाटलांनी वडिलांची इच्छा पूर्ण करत तुपकरांचे पाद्यपूजन करून ‘पद धुवूनि, मुलांच्या आसवांची फुले झाली’, असा हा कृतज्ञतापूर्वक आदर केला. इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा, असा क्षण कोथळीवासीयांनी अनुभवला. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’ या उक्तीनुसारच रविकांत तुपकर यांचे कार्य अविरत सुरू आहे.
चंदन कितीही जुने झाले तरी सुगंध द्यायचे सोडत नाही, तसा सुगंध आपल्या कार्यकर्तृत्वातून मनोहर पाटील यांनी जगाचा निरोप घेऊनही अवतीभोवती दरवळत ठेवला आहे. असंच चंदनासारखे झिजून रविकांत तुपकर हे शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना सुखाचे सुगंधी लेपन लावत आले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यात आपला बाप आणि त्या पित्याच्या उभ्या हयातीत साथ देणाऱ्या अर्धांगिनीत माय शोधणारे रविकांत तुपकर तमाम कास्तकारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्याविषयी लहान, थोरांमध्ये आदराची भावना आहे. ८४ वर्षांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन जगलेले मनोहर पाटील यांनी रविकांत तुपकरांच्या कार्याची जाण ठेऊनच आपल्या पश्चात मुलगा व त्याची मुले, सुनांनी तुपकरांचा देवासारखा धावा करण्याचा जिवंतपणी उपदेश दिला. त्यांच्या शिकवणीचे आचरण करत विठ्ठल पाटील, त्यांचा मुलगा व सुनेने तुपकरांचे पाय धुवून गुलाबपुष्पांनी पूजन केले. हे पाणी नंतर तुळशी वृंदावनात सोडण्यात आले.
एखादी व्यक्ती एवढी सेवा देते की मर्यादेपलीकडे. संकट असो वा आनंदीक्षण, सर्वच ठिकाणी पाठीराखा म्हणून धावून जाणाऱ्या व्यक्तीबद्दल आदरच असतो. त्याचे पाय धुवून पाणी पिले तरी पांग फेडू शकणार नाही, असे लोक उदाहरणादाखल बोलत असतात. अगदी ते खरेच असल्याचे यावरून दिसून येते.

तुपकरांची भविष्यातील जबाबदारी वाढली

दिवंगत मनोहरराव पाटील या बाबांनी जिवंतपणी त्यांच्या हृदयात जागा दिली. शेतकऱ्यांसाठी धडपड करतो म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी दु:खद प्रसंगीदेखील माझे औक्षण, पूजन करून माझ्यावर आता मोठी जबाबदारी सोपविली आहे. आज ते या दुनियेत नसले तरी त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहील. माझी या आदरासाठी लायकी नाही. पण, त्या कुटुंबीयांचा मोठेपणा आहे. हा प्रसंग माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे व तितकीच माझी जबाबदारी वाढविणाराही आहे. त्यांच्या कृतार्थ भावनेने मला आपल्या शेतकरीबांधवांसाठी काम करण्याचे मोठे बळ मिळाले आहे, या कुटुंबाला किंवा शेतकऱ्यांना पश्चाताप होईल असे मी कधीही वागणार नाही. अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी ‘पुण्यनगरी’शी बोलताना व्यक्त केली.

रुढी, परंपरांना दिला छेद

मनोहर पाटील यांनी मुलगा विठ्ठल यांना, ‘मी या जगात नसेल तेव्हा रविकांत तुपकर यांना घरी बोलावून त्यांचे पाय धुवून व पूजन करून जोडीने दर्शन घ्यावे’ असे सुचविले होते. निधनाच्या चौथ्या दिवशी तुपकर कोथळीत पोहोचले. पाटील कुटुंबीयांना दु:खातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो म्हणत तुपकर यांनी धीर दिला. मनोहर पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करणार तोच विठ्ठल पाटील यांनी बाबांनी मरणाअगोदर व्यक्ती केलेली इच्छा सांगितली. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या देवमाणसाची पूजा केली तरच बाबांना खरी श्रद्धांजली ठरेल व त्यांचा शब्द मला पूर्ण करायचा आहे असा आग्रह त्यांनी धरला.मी एवढा मोठा नाही, तुम्ही एवढ्या उंचीचा मान मला देऊ नका, मी सामान्य कार्यकर्ता आहे आणि मायबाप शेतकऱ्यांसाठी मी प्राणपणाने लढत न्याय देईल, ते माझे कर्तव्यच आहे, असे तुपकर वारंवार सांगत राहिले. बाबांना श्रद्धांजली द्यायची असेल तर आम्हाला तुमचे पाद्यपूजन करावेच लागेल असे म्हणत पाटील कुटुंबीयांनी त्यांचे काही एक न ऐकता पाद्यपूजन करून पाणी तुळशी वृंदावनात सोडले. एखाद्या शेतकरी नेत्याविषयी कास्तकाराचे कुटुंबीय एवढे निस्सीम प्रेम करते याची प्रत्यक्षात अनुभूती आली. विशेष म्हणजे घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर सूतक पाळले जाते. भाळी कुंकू लावले जात नाही. पाणी धरणाऱ्यांना जागचे उठता येत नाही. तरीदेखील सर्व रुढी, परंपरांना फाटा देत पाटील कुटुंबीयांनी स्व.मनोहररावांच्या शब्दांचा मान ठेवला आणि उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

तुपकरांनी पूजनाला विरोध केला पण….

मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. मला एवढ्या उंचीचा सन्मान देऊ नका मी फक्त शेतकरी चळवळीचे काम करतो. कृपया माझे पूजन करू नका. अशी हात जोडून विनंती रविकांत तुपकरांनी विठ्ठल पाटील यांना केली. परंतु आमच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी तुमचे नेहमी करिता पदपूजन करून सन्मान करण्याची इच्छा व्यक्त केली होती ती आम्हाला पूर्ण करावीच लागेल आणि ते भविष्यातही आम्ही करत राहू, तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल ! आमचे वडील जिवंत माणसात देव बघत होते आणि ते तुम्हाला खूप मानत होते. त्यामुळे पाटील कुटुंबाच्या भावनांचा विचार करावा असे विठ्ठलरावांनी सांगितले. प्रसंगच इतका भावनिक होता की प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. तुपकर निशब्द झाले होते. एवढ्या दुखातही पाटील कुटुंबाने तुपकरांची इच्छा नसतानाही पाद्यपूजन करून वडिलांची इच्छा पूर्ण केली.

काँग्रेस पक्षाचि विचारधारा गावागावात पोहचने गरजेचे कार्याध्यक्ष आमदार कुनाल पाटील

0

 

सुनिल पवार. नांदुरा. ता प्र.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार मा.कुनालजि पाटील आज बुलढाणा जिल्हा दौरावर आले असताना त्यांनी मलकापूर तालुका व शहर काँग्रेस कमिटिचा पदाधिकारीचि बैठक घेऊन आढावा घेतला आपल्या अध्यक्ष भाषनात केंद्र सरकारच्या शेतकरी व सामान्य नागरिकांच्या विरोधि धोरनाचा समाचार घेत काँग्रेस पक्षाचि विचारसारनि गावागावात पोहचवने आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले यावेळी आमदार मा.राजेश एकडे यांच्या सन२०१९-२०च्या विकास निधी आमदार निधी मधिल रुग्णवाहीकेचे लोकाअरपन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटिचे कार्याध्यक्ष कुनालजि पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नांदुरा क़षि उतपन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक पदमराव पाटील. प्रशासक.भगवानभाउ धांडे. वसंतराव भोजने. मोहन गावंडे. नितीन देशमुख. सुनिल गोंड. राम पांडव. भानुदास तीतरे. जनादन दाडंगे. गजानन करंगळे डॉ. अमिन. यांचा देखिल मान्यंवराचेहसते सतकार करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाच्या कायँकरतेयांचँ नियुक्ती सह विविध पक्षातील असंख्य कायँकरतेनि काँग्रेस पक्षात प्रवेश केला निमखेड येथील प्रविन पाटिल. भाडगनि येथील मंगलसिंग चव्हाण. अमरुत सांबरे. गोपाळ उमाळे. विजय भवरे यांच्या नेतृत्वाखाली१००कायँकरतेनि. कुनाल पाटिल. राहुल बोंद्रे. आमदार राजेश एकडे. डॉ अरविंद कोलते. साहबराव मोरे. हरीष रावळ. बंडुभाउ चौधरी. राजु पाटिल. यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश केला जिल्हाअधक्ष. राहुलभाऊ बोंद्रे. आमदार राजेश एकडे. आमदार हषँवधन सपकाळ. साहेबराव मोरे. हाजिरशिदखा जमादार. यानि.मनोगत व्यक्त केले काँग्रेस पक्षाचे कायँकरते मोठ्या संख्येने उपस्थित होते

अपंग जनता दल (सामाजिक संघटना) महाराष्ट्र राज्य च्या राज्य सचिव पदी शेख कलीम शेख वजीर यांची नियुक्ती

0

 

बुलढाणा :-अपंग जनता दल ही एक अराजकीय सामाजिक संघटना असून संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते मा.श्री.शेख अनिस पत्रकार यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात उल्लेखनीय कार्य सुरू आहे.
आज दि. 26/03/2021/रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉल शिवनेरी नगर गल्ली नंबर 15 कोंढवा खुर्द पुणे 48 येथे संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते मा.श्री. शेख अनिस पत्रकार यांच्या अध्येक्षेत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक संपन्न झाली. श्री.शेख कलीम शेख वजीर रा.मलकापूर जि. बुलढाणा यांनी अपंग क्षेत्रात मागील काही वर्षात अपंगांसाठी बरेसचे चांगले काम केले व आता ही करीतच आहे.
म्हणून त्यांची उत्कृष्ट कार्यशैली पाहून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांनी हा निर्णय घेतला व त्यांच्या आदेशानुसार श्री.शेख कलीम शेख वजीर यांची राज्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली व त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.या वेळी बैठकीत मलकपूरातून नागेश सूरंगे नीखीन पोनदे मोशकील शेगाव नवनिर्वाचित पदाधिकारी व सर्व जिल्हाध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.
आणि यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा अपंग नेते शेख अनिस पत्रकार व संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

नदी पात्रातील वाळु चोरट्यांचा शोध घ्या.अन्यथा उपोषण. संतोष तेल्हारकर यांचा जिल्हा प्रशासनाला ईशारा.

0

 

संग्रामपूर : ( ता.प्र.) तालुक्यातुन जाणाऱ्या पुर्णा नदी व वाण नदीतून लाखो ब्रास चोरीला गेलेल्या वाळुचा शोध घ्या अन्यथा हद्दिचा कार्यभार सांभाळत असलेल्या महसूल अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी संतोष तेल्हारकर यांनी जिल्हा अधिकारी यांच्या कडे लेखी निवेदनातून केली आहे. अवैध रेती उत्खनन थांबवण्यासाठी अनेक तक्रारी निवेदन देऊनही प्रशासनाच्या अधिकारी गप्प असल्याने पर्यायाने लोकशाही मार्गाने दि.१ एप्रिल पासून नदिपात्रात उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
तालुक्यातील सर्वच नदिपात्रातुन ट्रक, ट्रकटर नी अवैध रेती उत्खनन होत असल्याने एक्शिडंट चे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे ह्या रेती वाहणाऱ्या ट्रक खाली घेउन अनेक लोकांचा मृत्यु सुध्दा झालेले आहेत. ह्याला पुर्णपने जबाबदार महसूल विभागाचे कर्मचारी असल्याचा गंभिर आरोप संतोष तेल्हारकर यांनी केला आहे. तालुक्यातील सर्वच नदिपात्रात मोठ मोठे खड्डे पडले असून यातील हजारो ब्रास रेती उत्खनन करून चोरीला गेली आहे. त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे. नदिपात्रातिल चोरीला गेलेल्या रेतीचा शोध घेऊन महसूल वसुल करा. ज्या हद्दीतून रेती उत्खनन करण्यात आली ते हद्दीचा कार्यभार सांभाळत असलेल्या महसूल कर्मचाऱ्यावर कारवाई करा. या मागणीसाठी उपोषण करणार असल्याचा ईशारा संतोष तेल्हारकर यांनी निवेदनातून देण्यात आला आहे.

अवैधरित्या वाळु वाहतूक ट्रक पकडला तळेगांव दशासर पोलीसांची धडक कार्यवाही

0

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावती तळेगांव दशासर ते घुईखेड महामार्गाने बाभुळगाव येथुन अवैधरीत्या वाळु वाहतुक करणार्या एका ट्रकला तळेगांव
दशासर पोलीसांनी ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी ५ लाख ४०रुपयांचा मुधेमाल जप्त केला आरोपी लहुजी किसन पांडे वय ६० वर्षे रा.बाभुळगाव वरशिम मुस्तफा पठाण वय२७ वर्षे रा.गणोरी हे दोघे ट्रक क्रमांक एम एच ३६एफ ०४६४ मधे बाभुळगाव येथून अवैधरीत्या वाळु भरून तळेगांव दशासर ते घुईखेड महामार्गाने जात होते घुईखेड येथे पोलिसांनी नाकाबंदी या ट्रकची तपासणी असता त्या ट्रकमध्ये विना राँयलटिची ४ ब्रस वाळु किमंत अंदाजे ४०,०००रुपये व ट्रक किमंत पाच
लाख असा एकूण पाच लाख ४०,०००रुपयांचा मुधेमाल पोलिसांनी जप्त केला या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भांदवि कलम ३७९, सहकलम १३० अन्ववे गुन्हा दाखल केला आहे हि कार्यवाही तळेगांव दशासर पोलिस निरीक्षक अजय आखरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस काँस्टटेबल संजय भोपळे,पोलीस ना.राजु डगवार,बंडु मेश्राम, विलास खडशे यांनी केले

यावल येथे फैजपुर मार्गावरील रोडावर पुर्णब्रम्ह हॉटेल जवळ परवानगी न घेता बोगद्याचे काम सेनेची पालकमंत्र्यांकडे तक्रार  

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील फैजपुर रोज बुऱ्हाणपुर अंकलेश्वर मार्गावर हॉटेल पुर्णब्रम्ह जवळ मोठा बोगदा पाडला असुन यामुळे अपघात होण्याची शक्यता असुन , या अप्रीय घटनेस संबधीत ठेकेदार व नगर परिषद जबाबदार राहील अशी लेखी तक्रार शिवसेनेचे उपशहर प्रमुख संतोष बन्सी खर्चे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे . या संदर्भात शिवसेने संतोष खर्चे यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की , यावल शहरातील फैजपुर रोडावर असलेल्या हॉटेल पुर्णब्रम्ह जवळ एका बांधकाम ठेकेदाराच्या वतीने यावल नगर परिषद वा कोणत्याही विभागाकडुन कुठलीही परवानगी न घेता प्रमुख रहदारीच्या व वर्दळीच्या रोडाच्या खालुन बोगदा पाडल्याने त्या ठीकाणी पोकळ निर्माण झाल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता असुन , या मार्गावर काही एक अपघात किंवा अप्रीय घटना घडल्यास सर्वश्री जबाबदारी यावल सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय व यावल नगर परिषद आणी ठेकेदाराची राहील . तरी या संदर्भात वरीष्ठ अधिकारी यांनी तात्काळ या कामाचा ठेकेदार आणी अधिकारी यांच्यावर शासनाने परवानगी न घेता मुख्य मार्गावर बोगदा पाडल्याने त्याच्या रितसर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख संतोष खर्चे यांनी उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांच्याकडे केली असुन याबाबतची माहीती राज्याचे सार्वजनिक मंत्री ना . अशोक चव्हाण , जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी जळगाव आणी रावेर यावल चे आमदार शिरीष चौधरी केली आहे .

सावखेडा सिम येथील रमाई आवास योजनेचे अपात्र लाभार्थी पात्र कसे झालो गविअ यांनी दिले चौकशीचे आदेश

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सावखेडा सिम ग्रामपंचायतीद्वारे मान्यता मिळालेल्या रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी दिशाभुल करणारी माहीती प्रशासनाकडे सादर केली असुन , या सर्व प्रकाराची लेखीतक्रार गावातील सामाजीक कार्यकर्ते सुनिल नथ्थु भालेराव यांनी केल्याने तिन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी दिले आहे . या संदर्भात सावखेडा सिम येथील सुनिल भालेराव यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश एस .पाटील यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की , सावखेडासिम गावातील राहणारे अभीजीत दिलीप साळवे व अशोक प्रकाश साळवे या दोघांचे अद्याप लग्न झालेले नसुन ते शिक्षण घेत आहे असे असतांना ही या दोघांच्या नांवाने सन्२०१९-२०या वर्षात ग्रामपंचायतच्या वतीने रमाई आवास योजनेचा लाभ घेत आहे . एकत्रीत कुटुंबात राहात असुन असे असतांना त्यांना घरकुलाची गरज काय ?यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातुन या दोघांच्या घरकुलांना मान्यता मिळाली कशी हाच मुद्दा महत्वाचा आहे . तरी या दोघांचे रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल तात्काळ रद्द करण्यात यावे अशी तक्रार सुनिल भालेराव यांनी केली होती, या तक्रारीची तात्काळ दखल घेत गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील यांनी दिनांक १९ मार्च रोजी सावखेडा सिम ग्रामपंचायतीला पत्र पाठवुन रमाई आवास योजनेचे लाभ घेणाऱ्या अभिजित साळवे व अशोक साळवे या दोघा लाभार्थ्यांचे रेशनकार्ड वेगवेगळे आहेत का ?त्यांचे कडे स्वताची जागा आहे का ?व ते जर एकत्र कुटुंबात रहिवास करीत असतील तर त्यांच्या कुटुंबाने यापुर्वी घरकुल योजनेचा किंवा दुरुस्तीचा लाभ घेत लाभ घेतला आहे ?याबाबतचा सुधारीत अहवाल तिन दिवसात लेखी स्वरूपात पंचायत समितिकडे लेखी स्वरूपात गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावा अश्या स्वरूपाचा लिखित अहवाल सादर करावा असे म्हटले आहे . या संदर्भात गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील काय निर्णय घेतात हे विशेष आहे .

पत्रकार शिवदास उईके यांना मिळावा न्याय .

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

पॉवर ऑफ मिडीयाची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचेकडे मागणी

पॉवर ऑफ मीडिया, नांदगाव खंडेश्वर या पत्रकार संघटनेतील सदस्य शिवदास उईके हे आदिवासी समाजातील असून त्यांची वडिलोपार्जित जमीन असून येणार येतील देवतळे परिवारांने ती सदर जमीन बेकायदेशीरपणे हडप केली आहे. त्याबाबत पत्रकार शिवदास उईके यांनी विद्यमान उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये त्यांना त्वरित न्याय मिळण्यात यावा. या साठी आज दिनांक २५ मार्च रोजी पॉवर ऑफ मिडीयाचे विभागीय अध्यक्ष यांच्या नेत्ववात माननीय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पॉवर ऑफ मीडिया चे राज्य संघटक संदिप बाजड, विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, विदर्भ सदस्य अमोल नानोटकर , जिल्हा प्रसिद्धी प्रमुख फणींद्र वाडकर, अमरावती महानगर अध्यक्ष सुधीर गनवीर, अमरावती शहर उपाध्यक्ष प्रवीण शेगोकार, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष अनिकेत ठाकरे, सचिव सागर सव्वालाखे, सदस्य उमेश चौकडे, प्रमोद देशमुख, गजानन भस्मे, गोकुळ खोडके, मनोज जैन, प्रदीप रघूते, उमेश चव्हाण, संजय पवार, देविदास गाडेकर, रमेश गंजीवाले, नितेश कांबले, नितीन जाधव, अंकुश निमनेकर आदी पत्रकार उपस्थित होते.

देशव्यापी भारत बंद ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे समर्थन

0

 

सुनिल पवार नान्दूरा ता, प्र

दि – 26/3/20210 रोजी देशातील सर्व शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारच्या शेती विषयक तीन काळया कायद्याच्या व वाढती महागाई विरोधात दिलेल्या भारत बंद च्या हाकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने जाहीर समर्थन दिले. यासाठी काँग्रेस पक्षा द्वारे तहसील कार्यालय नांदुरा समोर आयोजित एक दिवसीय उपोषण आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामधे तालुका अध्यक्ष युवराज देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष मोहन पाटील, शहराध्यक्ष नितीन मानकर, जिल्हा उपाध्यक्ष सेवादल गोपाल सातव, तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग श्रीराम इंगळे, जिल्हा सहसचिव डॉ. अमीन,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती शिवाजी ताठे , जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी सेल रमेश पायघन, माजी युवक तालुका अध्यक्ष विनायक मुर्हे, युवक तालुकाध्यक्ष संदीप भगत, सर्कल प्रमुख योगेश चावरे, तालुका अध्यक्ष सोशल मीडिया राहुल मुऱ्हे,विजय डिवरे, शंकर सकळकळे, पुरुषोत्तम भगत, मोहन काटे, योगेश डीवरे विरेंद्र जाधव,हरिदास अवचार, व अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.