Home Blog Page 501

कोरोना च्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता !शहरातील व्यापारी . प्रतिष्ठाने, दुकानदार ,ऑटो , यांची कोरोना चाचणी करण्यासाठी निर्धारित दिलेल्या तारखे मध्ये जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हजर राहण्याचे आवाहन !5 एप्रिल पासून चाचणीला सुरुवात !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

कोरणा च्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता व कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोविड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी . सिंदखेडराजा तालुक्यातील यंत्रणा सतर्क झाली असून .मुख्याधिकारी नगरपालिका सिंदखेड राजा ‘गट विकास अधिकारी .वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय ‘तालुका आरोग्य अधिकारी तथा तहसीलदार सिंदखेड राजा ‘यांच्यासह यांनी एक पत्रक जारी केले असून ‘शहरातील व्यापारी, प्रतिष्ठाने, दुकानदार ,ऑटोचालक व त्यांच्या कामावरील सर्व कर्मचारी,यांना दिल्या तारखेवर ‘जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन ‘कोरोना चाचणी करून घेण्याचे आव्हान सिंदखेड राजा तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे ‘तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘कोरोना चाचणी करून मिळेल ‘यामध्ये आडगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्र ‘ /मलकापूर पांगरा ‘साखरखेर्डा ‘ /किनगाव राजा /या प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश असून सकाळी दहा वाजता निर्धारित वेळेत व्यापाऱ्यांनी हजर राहायचे आहे ‘यामध्ये व्यापारी व दुकानदार वर्ग यांची वर्गवारी तयार केली असून !
१)दिनांक ५एप्रिल पासून ‘सर्व किराणा दुकानदार व कर्मचारी !
२) ६ एप्रिल सर्व कापड दुकानदार व कर्मचारी ‘
3 ) ७एप्रिल .सर्व हॉटेल मिठाईवाले चहा दुकानदार कर्मचारी खानावळ ‘
4 ) ९एप्रिल सर्व फळ ‘भाजीपाला .दूध विक्रेते ‘
5)दिनांक 12 एप्रिल ‘सर्व इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स ,हार्डवेअर दुकानदार, कर्मचारी ‘
6 )दिनांक 15 एप्रिल ‘सर्व वाहन विक्री दुरुस्ती ‘दुकानदार कर्मचारी ‘
7)दिनांक 17 एप्रिल ‘सर्व शहरे ऑटोचालक ‘
8)दिनांक 19 एप्रिल ‘सर्व वेल्डिंग वर्कर व भंगारवाले ‘
9 ) दि . २० एप्रिल ‘सर्व इस्तरी वाले दोबी दुकानदार ‘
10 ) दि . 22 एप्रिल ‘केस कीर्तनकार व ब्युटी पार्लर वाले ‘
11 )दिनांक 23 एप्रिल ‘सर्व पान टपरी धारक व पंचर दुकानदार ‘
12 )दिनांक 26 एप्रिल .सर्व देशी दारू विक्रेता ‘वाईन बार ‘वाईन शॉपी बियर शॉपी दुकानदार ‘
13 )दिनांक 27 एप्रिल ‘सर्व ज्वेलर्स व कर्मचारी ‘
14 )दिनांक 28 एप्रिल ‘सर्व फ्लॅट व पाणीपुरवठा कर्मचारी ‘
15 )दिनांक 29 एप्रिल .सर्व फूट वेअर विक्रेता ‘
16 )दिनांक 30 एप्रिल ‘सर्व मेडिकल पॅथॉलॉजी लॅब व सर्व कर्मचारी ।
17 )दिनांक 2 मे ‘सर्व चिकन मटन व अंडी विक्रीते ‘
18 ) दि . 3 मे ‘सर्व जनरल व टेशनरी दुकानदार ‘या सर्वांनी दिलेल्या तारखे मध्ये जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन आपली कोरोना चाचणी करावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्रकुमार साळवे यांनी केले आहे ‘

शिंदी ते साखरखेर्डा रस्त्याच्या कडा भरण्याचे काम सुरू !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

शिंदी ते साखरखेर्डा रस्त्याचे काम पूर्ण झाले असून रस्ता उंच असल्यामुळे खाली गेलेली वाहने वर येताना स्लीप होते ‘त्यामुळे वर वाहने येत असताना अनेक अडचणी निर्माण होतात ‘अनेकदा अपघात सुद्धा झालेले आहेत ।मेरा बुद्रुक येथे स्वयंपाकी साठी जाणाऱ्या मालवाहतूक गाडी चा असाच रस्त्याच्या कडेला स्लिप होऊन गाडी पलटी झाली होती ‘यामध्ये चार महिला गंभीर जखमी झाल्या होत्या ‘याबाबत दैनिक भारत संग्रामने बातमी प्रकाशित केली होती ‘त्यामुळे त्वरित ठेकेदाराने रस्त्याच्या कडा भरण्याचे काम हाती घेतले असून एक ते दोन दिवसांमध्ये मुरमाच्या कडा रस्त्याच्या कडा भरण्याचे काम पूर्ण होईल ।त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल ‘

जयस्तंभ चौक येथील हिरोळे पेट्रोल पंपाजवळील जागा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतूळा तथा भव्य स्मारक उभारण्यासाठी नगर परिषदेमध्ये बैठक बोलावून स्मारकाच्या ठराव सगळे समोर पारित करावा ! …नगरसेविका राणी बी शेख बबलू कुरेशी यांची निवेदनाद्वारे नगर परिषदेकडे मागणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा व भव्य स्मारक उभारण्यासाठी सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष बाबा खरात यांनी गेल्या तीन दिवसापासून हिरोळे पेट्रोल पंपाजवळील जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी व स्मारकासाठी देण्यात यावी या संदर्भामध्ये नगरपरिषदे समोर उपोषण सुरु केले आहे ‘तथापि जवळपास 19 वॉर्डातील नागरिकांनी जयस्तंभ चौक येथील पेट्रोल पंपाजवळ च्या जागेची मागणी तसेच विनंती अर्ज नगर प्रशासनास दिल्यानंतर सुद्धा त्यावर नगर प्रशासनाने कुठल्याही प्रकारची उत्तर न दिल्यामुळे दिनांक 30 मार्चपासून श्री आशिष खरात सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांना बेमुदत उपोषण करावे लागते ही नगर प्रशासनासाठी शोकांतिका असून मुख्य अधिकारी व नगराध्यक्ष यांनी तात्काळ विशेष सभा आयोजित करून उपोषणकर्त्यांची रास्त असलेल्या मागणीचा नगरसेवकांच्या सह्यानिशी ठराव पारित करून पारित झालेल्या ठरावावर नगरपालिका कायदा 1965 नुसार टिपणी लिहून उपोषणकर्त्यांना तथा नगर प्रशासनास प्राप्त झालेल्या अर्जानुसार प्रत्येकाला लेखी स्वरूपात उत्तर द्यावे अशी मागणी राणी बी शेख लाल उर्फ बबलू कुरेशी सभापती महिला व बालकल्याण समिती तथा नगरसेविका वार्ड क्रमांक 3 यांनी दिनांक एक एप्रिल रोजी नगर परिषद बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे !जर ठराव पारित न झाल्यास आंदोलनाची भूमिका माझ्यासारख्या नगरसेवकाला घ्यावी लागेल व होणाऱ्या परिणामास मुख्याधिकारी व नगराध्यक्ष जबाबदार राहील असा इशारा यावेळी शेवटी नगरसेविका राणी बी शेख लाल उर्फ बबलू कृषी यांनी दिला आहे !

अज्ञात इसमाने पेटवून दिले एमआरजीएस अंतर्गत असलेले वृक्ष लागवड क्षेत्र

0

 

गजानन सोनटक्के जळगाव

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येथील जुनापाणी परिसरामध्ये एमआरजीएस अंतर्गत वृक्षलागवड केली होती परंतु एक एप्रिल 2019 रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात इसमाने वृक्ष लागवड क्षेत्र पेटवून दिले अशी तक्रार ग्रामपंचायत प्रशासनाने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला केली आहे सविस्तर असे की जुनापाणी परिसरात विविध वृक्षांची लागवड केली होती व वृक्ष संगोपनाची कार्य चांगले चालू होते परंतु एक एप्रिल 2021 रोजी वृक्षलागवड झालेले पेटवून देण्यात आले त्यामुळे त्यामुळे परिसरातील गवत व छोटे-मोठे वृक्ष या आगीमध्ये होरपळून निघालेले आहेत परिणामी जुनापाणी परिसरातील पर्यावरणाची हानी झालेली आहे

यावल शहरातुन एका उतारकरूच्या कुटुंबातील अडीच वर्षाच्या मुलाचे केले अपहरण शहरात एकच खळबळ पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

येथील शहरातील फैजपूर रोडवरील सुभानी पेट्रोल पंपासमोरील मोकळ्या जागेवर राहणाऱ्या एका उतारकरूच्या दोन ते अडीच वर्षाच्या मुलाला एका अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली असुन, परिसरात एकच खळबळ उडाली आहे . याबाबत पोलीसात त्या संशयीत व्यक्ति विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , यावल शहरातील फैजपुर मार्गावरील सुभानी पेटूॉल पंपा समोरील हरी ओम नगरच्या मोकळ्या जागेवर मागील काही दिवसापासुन सादीक शाह शाहीद शाह वय २८ वर्ष, फकीर राहणार गोशलपुर तालुका सोहरा जिल्हा जबलपुर , मध्य प्रदेश हे आपल्या कुटुंबा सोबत राहात असुन, दिनांक २ एप्रिल रात्री ते आपल्या कुटुंबा सोबत राहात असुन, रात्री ४ वाजेच्या पुर्वी त्याच ठीकाणी परिसरात फिरून झोपत असलेल्या संशयीत आरोपी दिपक पुर्ण नांव पत्ता माहीत नाही याने आमचे कुटुंब झोपेत असतांना आमच्या बरोबर झोपलेल्या अडीच वर्षाच्या अरमान शाह नांवाच्या मुलाला झोपेतुन पळवुन अपहरण करून नेल्याची तक्रार दिली असुन , सादीक शाह यांचे कुटुंब हे सकाळी जागे झाल्यावर त्यांना त्यांचा अडीच वर्षाचा अरमान हा आईजवळ मिळुन आला नाही त्यामुळे भयभीत झालेले शाह कुटुंबांनी आपल्या चिमकुल्या मुलाचा परिसरात शोध घेतला पण तो मिळुन
आला नाही व त्याच ठीकाणी असलेला दिपक नांवा संशयीत आरोपी देखील दिसत नसल्याचे आढळुन आल्याने अखेर अरमान शाह यांचे वडील यांनी यावल पोलीस स्टेशनला दिपक नांवाच्या व्यक्ति विरूध्द फिर्याद दाखल केली असुन , दरम्यान घटनेचे वृत्त कळताच जेष्ठ पोलीस निरिक्षक अजमल पठान व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवुन परिस्थितीची पाहणी केली .पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांच्या तपास व शोध कार्याला वेग आला आहे .
.

स्वतः आर्थिक मदत करून आपातग्रस्त तायडे कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत:- आ. राजेश ऐकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

चांदुर बिस्वा (नांदुरा) येथील श्री.प्रल्हाद लक्ष्मण तायडे यांच्या घराला आग लागून घरातील सर्व साहित्य,अन्नधान्य जळून खाक झाले अंगावरील कपडे व्यतिरिक्त श्री.तायडे यांच्या कडे काहीही उरले नव्हते.या कुटुंबाचे खूप मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री राजेश एकडे यांनी श्री.तायडे यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली.स्वतः आर्थिक मदत करून अपघातग्रस्त तायडे कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देणे बाबत तहसीलदार नांदुरा यांना सूचना केल्या यावेळी नांदुरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष श्री.लालाभाऊ इंगळे, माजी पंचायत समिती सदस्य श्री.प्रसादभाऊ पाटील,नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त संचालक (प्रशासक) श्री.गजानन करांगळे,श्री.राम पांडव व गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

गैबीनगर ,शहानगर प्रभाग क्रं.9मधिल विवीध समस्या निवारणासाठी नगरसेवक काचे तहसील समोर आमरण उपोषण.

0

 

सुनिल पवार नांदुरा

नांदुरा नगरपरिषदे अंतर्गत गैबीनगर ,शहानगर प्रभाग क्रं.9मधिल घरावरुन गेलेल्या विज तार आणि पाणी समस्या दुर करण्यासाठी वेलफेअर पार्टी आँफ इंडिया नांदुरा शाखेचे तथा नगरसेवक मो.मुजम्मिल फुरकान अ.रहेमान यांनी आज दि.३०मार्च पासुन आमरण उपोषण सुरु केले आहे.
या बाबत असे कि नांदुरा न.प अंतर्गत विविध समस्या निवारण्यासाठी नगर सेवक मो.मुजम्मिल फुरकान अ.रहेमान यांनी दि.२७/०५/२०२१.न.प नांदुरा व विजवितरण कार्यालय नांदुरा यांना निवेदन देऊन समस्या निवारण करन्याची विनंती केली होती.
मात्र त्यानंतर ही कार्यवाही न झाल्याने तहसील कार्यालया नांदुरा समोर उपोषण सुरु करण्याचा ईशारा दिला होता त्यानुसार खालील मागण्या पुर्ण करण्यासाठी १)गैबीनगर मुस्लिम कब्रस्थानच्या जागेची मोजणी करुन ताब्यात देण्यात यावी
२) गैबीनगर मधे पाणी पुरवठा साठी नविन पाण्याची टाकी व पाईपलाईन
३)शाहनगर मधे नविन पाईपलाईन टाकणे.
४)गैबीनगर मधे सफाई कर्मचारी नियुक्ती करणे
५)गैबीनगर मधे नागरिकांच्या घरावरुन गेलेल्या विज तार काढुन ABCकेबल टाकणे
६)छोटी मस्जिद समोरील सरकारी बोअरवेल वर 5 HP चा नविन पंप बसविणे

आदी मागण्या पुर्ण करण्यासाठी तहसील कार्यालया समोर नगर सेवक व सहकारी यांनी आमरण उपोषणास सुरवात केली आहे.

दगडी गावातुन एक लाख रुपये किमतीची म्हैस चोरीला पोलीसात अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी विकी वानखेडे

तालुक्यातील दगडी मनवेल येथील शेतमजुरी करुन उदरनिर्वाण करणाऱ्या वंसत बाबुलाल कोळी यांच्या मालकीची घरा जवळच्या जनावरांच्या गोठ्यातील एक लाख रुपये कींमतीची एक म्हैस बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असुन या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.
आज दिनांक ३१ मार्च रोजी गुरुवारी सकाळी आपल्या गोठयात गेले असता त्यांच्या निर्दशनास हा प्रकार उघडकीस आला. दगडी मनवेल येथील शेतमजुर बाबुलाल कोळी यांचा जनावरांचा गोठा आहे. गोठ्यामध्ये वंसत कोळी हे जनावरांना वैरण टाकून झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी गोठ्यात प्रवेश करून म्हैस चोरुन नेली. या घटनेनंतर दगडी व परिसरातील गावांमध्ये जनावरांचे गोठे असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन, या चोरीच्या घटनेबाबत काही जागृत नागरीकांनी सोशल मीडियावरही चोरीचा मेसेज पाठवून जनावरे आढळल्यास ? संपर्क करण्याचे सावध राहण्याचे ही आवाहन नागरीकांना करण्यात आले.

चिखली पोलीस स्टेशनचे लाचखोर पीएसआय दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले

0

 

सूर्या मराठी न्यूज साठी किरण शेजोड सह हिम्मतराव तायडे महाराष्ट्र ब्युरो चीफ

बुलढाणा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या चिखली तालुका येथील पोलीस स्टेशनचे पीएसआय स्वप्निल रणखांब यांना अमृततुल्य हॉटेलच्या मालकाकडून दहा हजार रुपये घेताना अँटी करप्शन ब्युरो यांनी रंगेहात पकडले या कारवाईनंतर चिखली पोलीस स्टेशनमधील कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
याबाबत सविस्तर असे की, येथील खामगांव रोडवर असलेल्या हॉटेल अमृततुल्यमध्ये जुगार सुरू असल्याच्या गोपनीय कागदपत्रे आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या पथकासह चिखली पोलिसांनी धाड टाकत 8जणांना ताब्यात घेवून त्यांच्याजवळून 2,29,500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना ता.23 मार्च रोजी घडली होती. यामध्ये 8 जुगार्‍यांविरूद्ध व हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये हॉटेलमालकाचे नाव वगळण्याकरिता पोलीस उपनिरीक्षक रणखांब यांनी 10 हजार रूपयांची लाच मागितली होती. आज ता.1 एप्रिल 2021 रोजी हॉटेल अमृततुल्य येथे लाचेची रक्कम स्विकारण्याकरिता पीएसआय रणखांब गेले असता बुलडाणा लाचलुचपत अधिकारी यांनी सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक रणखांब यांना ताब्यात घेतले असून वृत्त लिहेपर्यंत कारवाई सुरू होती.
सदर कारवाईत विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अरूण सावंत अप्पर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पो.उपअधिक्षक संजय चौधरी, पोलीस नाईक विलास साखरे, रविंद्र दळवी, पो.शि.जगदीश पवार, विनोद लोखंडे, चालक मधुकर रगड सहभागी होते. या बातमीमुळे चिखली नागरिकांमध्ये एक आनंदाचा वातावरण निर्माण झाले आहे कारण की असे पोलीस स्टेशन मध्ये सामान्य नागरिकांकडून असे अधिकारी पैसे लुटत असतात म्हणून अशा घटना घडल्यावर लोकांना फार आनंद होतो म्हणून सामान्य जनतेला सतर्क होऊन अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.

पालकमंत्री ना .गुलाबराव पाटील व आमदार सौ. सोनवणे यांच्या प्रत्यनांनी 20 लाख रुपयांचा मिळाले विरावली गावाच्या ग्रामपंचायत ईमारतीस बांधकाम साठी

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील विरावली येथील अत्यंत जुनी व जिर्ण झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या ईमारतीसाठी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या तडकाफडकी निर्णयाने आणि चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ .लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याने येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी वीस लाख रुपये मंजूर झाले आहे. राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून निधी प्राप्त करण्यासाठी पालक मंत्री गुलाबराव पाटील, आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा विरावली ग्रामपंचायत माजी सरपंच, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील, यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की महाराष्ट्र शासन राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियान अंतर्गत ग्राम विकास विभागाकडील पत्र तसेच राष्ट्रीय ग्रामस्वराज्य या कार्यालयाकडील निधी विचारणा आदेश पत्र ऑक्टोंबर २०२० राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत विरावली येथे ग्रामपंचायतीची इमारत फार जुनी झाली असून विरावली येथे ग्रामपंचायतीचे नविन इमारतीचे बांधकाम मंजूर केलेले आहे. सरपंच कलिमा तडवी, उपसरंपच मनिषा पाटील यांनी देखील पाठपुरावा सुरु ठेवला होता.
………… चौकट……………
याशिवाय जिल्ह्यात चिंचखेडा खुर्द (ता. मुक्ताईनगर), खिरवड (ता. रावेर), निमखेडा (ता. धरणगाव ), जाणवे (ता. अमळनेर), देवगांव (ता. पारोळा), अंतुर्ली खुर्द प्र. लो. (ता. पाचोरा) येथील ग्रामपंचायतीच्या नविन इमारत बांधकामासाठी प्रत्येकी पाच लाख निधी मंजूर झाला आहे. तर नागरी सुविधा केंद्र खोल्यांसाठी नाडगाव ( ता.बोदवड ), अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर), वर्डी, घोडगाव (ता. चोपडा), रोझोदा (ता. रावेर), आमोदा (ता. यावल) व पाळधी बुद्रुक (ता. धरणगाव), शिरसोली प्र.बो. (ता. जळगाव), जवखेडा, पातोंडा(ता. अमळनेर), देवगाव, उत्राण (ता. पारोळा),जारगाव, नगरदेवळा (ता. पाचोरा ),येथील ग्रामपंचायतींना नागरी सुविधा केंद्र खोली बांधकामासाठी प्रत्येकी दोन लाख मंजूर झाले आहेत. दरम्यान आपण पालकमंत्री तथा आमदार यांच्या माध्यमातुन केलेल्या प्रत्यनांना अखेर यश मिळाले असुन . शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी सर्वाचे आभार मानले आहे .