Home Blog Page 502

हिंगणघाट मध्ये होणार डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती धुमधडाक्यात*(प्रशासन नियमाचे पालन )

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 1एप्रिल
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्याच्या हेतूने आज दि १ एप्रिल २०२१ रोजी मा.श्रीराम मुंदडा (तहसीलदार, हिंगणघाट) यांना दलित युथ पॅंन्थर, हिंगणघाट शहर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले..
तमाम बहुजनांचे उद्धारकर्ते, बहुजनांची अस्मिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या १४ एप्रिल रोजी असुन जयंती साजरी करण्याच्या हेतूने कोरोना सारख्या महामारीला लक्षात घेऊन कशा प्रकारे महामानवाची जयंती साजरी होईल यावर चर्चा करण्यात आली..
त्यावेळी संघटनेच्या वतीने शाश्वती देण्यात आली की नियमांचे पालन करुन लोकांची गर्दी न करता वैचारीक पद्धतीने भिमजयंती मोठ्या थाटात साजरी करनार ..
प्रशासन कडुन आलेल्या नियमावली आम्ही मान्य करुन कार्यक्रमाची रुपरेषा ठरवनार, बाबासाहेबांचे अनुयायी असल्यामुळे कायद्याचं काटेकोर पणे पालन करुन जयंती उत्सव साजरा करनार, पण ह्या सगळ्यात प्रशासनाने सुद्धा दुजा भाव न करता नियम सगळ्यांसाठी सारखा करावा अन्यथा तफावत आढळल्यास संघटना आक्रमक भूमिका घेईल अशी चेतावणी देन्यात आली..
यावेळी निवेदन देताना
प्रतीक वासेकर (हिंगणघाट शहर अध्यक्ष, दलित युथ पॅंन्थर संघटना)
प्रज्वल गायकवाड
यतार्थ बाणमारे
तेजस जवादे
अश्वजीत मेश्राम
शुभम बुरबुरे
तेजस मुन
तेजस ढेपे
विजय भगत
एकता प्रतिष्ठान हिंगणघाट चे
संदेश थुल
शैलेश चांदुरकर
अखिल धाबर्डे
बहुजन क्रांती मोर्चा चे
निखिल कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते…

सेलू तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना घरकुल अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची भाजपची निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी सेलू व गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी

0

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

सेलू* सेलू तालुक्यातील सर्वच गावामध्ये असंख्य लोकांची नावे प्रपत्र “ड” मध्ये आहेत परंतु सद्यस्थितीत ऑनलाईन कॉम्प्युटर वर दिसत नसून त्यांचे आधार सेडींग व जॉब कार्ड मॅपिंग करता येत नसल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सदर बाब अतिशय महत्त्वपूर्ण आहे . केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या या योजनेचे सर्वेक्षण तालुक्यातील पंचायत समिती प्रमुख मा गटविकास अधिकारी यांचे अंतर्गत ग्रामपंचायत ऑपरेटर द्वारे करण्यात आलेले आहे. तरी सदर घडत असलेला प्रकार अतिशय निंदनीय असून यावर योग्य ती कार्यवाही करून वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा अशी मागणी उपजिल्हाधिकारी सेलू व गटविकास अधिकारी सेलू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर महादेव गायके जिल्हा कोषाध्यक्ष परभणी भाजप युवा मोर्चा, दगडोबा जोगदंड पाटिल तालुकाध्यक्ष सेलू भाजप किसान मोर्चा सेलू, बळीराम गटकळ पाटील तालुका उपाध्यक्ष सेलू, गोविंद मगर माजी सरपंच सोन्ना आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोरोणाच्या RTPCR चाचण्याचे रिपोर्ट तात्काळ देण्याची श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलूची उपजिल्हाधिकारी सेलू यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

0

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान सेलू गाने* *निवेदनात म्हटले आहे की प्रशासनाच्या वतीने कोरोणाच्या RTPCR चाचण्या करण्यात येत आहेत. त्याच्या रिपोर्ट हा 8-10 दिवस लागत आहेत. मागील 15 दिवसाआधी सेलूतील* *व्यापाऱ्यांच्या RTPCR चाचण्या करण्यात आल्या होत्या. जवळपास 1000 च्या वर व्यापाऱ्यांनी या चाचण्या केल्या होत्या. पण या RTPCR** *चाचण्याचे रिपोर्ट तब्बल 10 दिवसांनी आले. व यात शेकडो व्यापारी कोरोणा बाधीत आले
*RTPCR चाचणी केल्यानंतर* *त्यांना क्वारंटाईन करणे आवश्यक होते. पण तसे करण्यात आले नाही. त्यामुळे हे शेकडो कोरोणा बाधीत व्यापारी अगोदर त्यांच्या घरच्या लोकांच्या व नंतर बाहेरच्या हजारो* *लोकांच्या संपर्कात आले. व हे व्यापारी कोरोणा चे वाहक ठरले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांच्या घरचे व संपर्कातील लोक कोरोणा बाधीत आले आहेत. केवळ RTPCR चाचण्याचे रिपोर्ट उशिरा आल्यामुळे हे घडत आहे. यास कोण जबाबदार आहे? तरी यानंतर ज्यापण RTPCR चाचण्या होतील त्याचे रिपोर्ट लवकरात लवकर देण्यात यावे. जेणेकरून असे पुन्हा घडणार नाही. व ज्यांची RTPCR चाचणी केली आहे त्यांना क्वारंटाईन करण्यात यावे. जेणेकरून कोरोणाचे रुग्ण वाढणार नाहीत. असे निवेदनात म्हटले आहे
या निवेदनावर जयसिंग शेळके, हर्षल देशमुख, पांडुरंग सावंत, अक्षय सोळंके, पवण धूमाळ, गणेश शेवाळे यांच्या सह्य़ा आहेत

सावखेडा सिम येथे विवाहीत महीलेचे घरात घुसुन विनयभंग संशयीताच्या विरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सावखेडा सिम या गावात एका विस वर्षीय महीलेच्या घरात घुसुन विनयभंग केल्याची घटना घडली असुन, या गुन्ह्यतील संशयीत आरोपी मागील आठ दिवसांपासुन बेपत्ता असल्याने अखेर आज महीलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , दिनांक २१ मार्च रोजी रात्री ९, ३o वाजेच्या सुमारास घरात एकटी असल्याचे पाहुन आमच्या घरासमोर राहणारा संशयीत आरोपी अल्लाउद्दीन दगेखा तडवी हा महीलेच्या कुटुंबातील मंडळी शेतीकामासाठी गेले असता सदर महीला ही घरात झोपली असता तो आला व माझे हात धरून मला लज्जा वाटेल असे कृत्त केले .दिनांक २२ मार्च रोजी माझे पती हे सकाळी शेतकामावरून आल्यावर मी घडलेला प्रकार पतीस सांगीतले, माझे पती यांनी त्यास घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता अल्लाउद्दीन तडवी हा काही एक न बोलता घरातुन निघुन गेला असुन तो अद्यापपर्यंत घरी परत न आल्याने अखेर आज दिनांक ३१ मार्च रोजी त्या२० वर्षीय महीलेच्या तक्रारीवरून संशयीताच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .’

किनगाव येथे एका तरूणाची नैराश्यपोटी घरात गळफास घेवुन आत्महत्या पोलीसात घटनेची नोंद

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील किनगाव बु॥ येथे एका तरूणाची कौटुंबीक नैराश्यातुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे वृत्त असुन , यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार किनगाव बु॥ तालुका यावल येथील राहणारे नवल दगडु भोई वय ३६ वर्ष गावात शेंगदाणे फुटाणेचा व्यवसाय करणारा याने आज दिनांक ३१ मार्च रोजी सकाळी ९ , ३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छ्ताच्या हुकाला सुताची दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केली असुन , आत्महत्या चे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती वरून कळाले असुन , दरम्यान मयत नवल भोई हा मागील काही दिवसापासुन कौटुंबिक नैराश्यात जिवन जगत असल्याचे वृत्ताद्वारे कळते त्याच्या कुटुंबात पत्नी , दोन मुली , आई , भाऊ असे कुटुंब असुन , मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी केले असुन ,या घटनेबाबत बापु दगडु भोई वय ४० वर्ष राहणार किनगाव यांनी यावल पोलीसात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय धनंजय पाचपोळे हे करीत आहे .

शिवाजी पार्क येथे तिथीनुसार शिवसेनेकडून शिवजयंती साजरी करण्यात आली

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 31 मार्च :- शिवाजी पार्क येथे झेंडा वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पगुच्छ माल्यार्पण करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक शिंदे (माजीआमदार शिवसेना ) प्रमुख पाहुणे संपत चव्हाण (पोलीस निरीक्षक हिंगणघाट ) यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र बद्दल माहिती दिली यावेळी संचालन राजेंद्र खूपसरे (उपजिल्हाप्रमुख )यांनी केले यावेळी उपस्थित सतीश ढोमणे ( शिवसेना शहर प्रमुख ) भोला चव्हाण (तालुका प्रमुख) प्रकाश अनासाने (उपतालुका प्रमुख) श्रीधर कोटकर( नगरसेवक) डॉ. गुजर, मुन्ना त्रिवेदी, शंकर मोहमारे ,संजय पिंपळकर, महेश खडसे, गुणवंतराव वानखडे, लक्ष्मण बकाने , सुधा शिंदे ,माधुरी खडसे, वरुणा वाटकर, संजय सोयम ,जयंत रोहनकर , अनंता गलांडे यांच्या उपस्थितीत तिथीनुसार शिव जयंती साजरी करण्यात आली

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार्याने शहरात कोरोना चाचणी कॅम्प संपन् अब्दुल्ला पठाण. सुनील घाटे यांच्या नेतृत्वात

0

 

मोताळा प्रतिनिधी
अजहर शाह

मोताळा :- जग भरात थैमान घातलेल्या कोरोना या जिव घेण्या आजाराचे योग्य वेळी अचूक निदान व्हावे या करिता ग्रामीण रुग्णालय अंतर्गत 30 मार्च 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने दिवसेंदिवस कोरोना रुग्णात होणारी वाढ लक्षात घेता मोताळा शहरात स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया च्या परिसरात कोरोना चाचणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात कोरोना च्या चाचण्या करण्यात आले असुन चाचणी मध्ये पॉजेटिव्ह आलेल्या रुग्णांना स्थानिक सहकार विद्या मंदिर येथील कोरोना सेंटर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले
सदरच्या कोरोना चाचणी कॅम्पच्या यशस्वीते साठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ अमोल पाटील,ग्रामीण रुग्णालयाचे डॉ दत्तात्रय गायकवाड, डॉ अभिजित नाफडे,डॉ कविता जाधव,लॅब टेक्निशन ICT अशोक महाले,
शे अजीज,शे आबीद कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

पातुर्दा येथील  मुक्कामी बसेस सुरू करा प स सभापती सौ धर्माळ यांचे जिल्हा परिवहन अधिकारी ला निवेदन

0

 

पातुरडॉ गावातील बऱ्याच वर्षांपासून बुलढाणा, जळगाव जामोद, अकोट,तेल्हारा या मुक्कामी बसेस सुरू होत्या मात्र मागील वर्षी पासून कोरोना सुरू झाला व वरील सर्व अगाराच्या बसेस बंद करण्यात आल्या या मुळे जनतेला,ये जा करणाऱ्या नागरिक,कर्मचारी याना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे हे माहिती पडताच जणतेते निवडून दिलेल्या व सध्या प स संग्रामपूर सभापती पदावर असलेल्या सौ रत्न प्रभा ताई धर्मळ यांनी जिल्हा आगार प्रमुख याना निवेदन दिले असून जनतेला त्रास झाल्यास तुमची गाठ माझ्या शी राहील असा इशारा पण दिला आहे
पातुरडॉ हे गाव वीस हजार लोकसंखेच्या आस पास असून या गावाला 30 च्या वर खेडे पाडे लागू आहेत पातुर्डॉ हे गाव सर्वात मोठे असल्यामुळे येथुनच सर्व गावातील दळण वळण व इतर वाबीच्या सुख सुविधा त्या गावाला मिळतात येथे मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून अकोला,जळगाव जामोद,बाळापूर,बुलढाणा, अकोट,तेल्हारा या अगराच्या मुक्कामी बसेस सुरू होत्या त्या सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान येथून निघून जायच्या या मुळे विद्यार्थी, येणे जाणे करणारे नागरिक,कर्मचारी,बुलढाणा येथे जिल्हा लेवल वर असणारे ऑफीस मध्ये काम असणारे नागरिक,अकोला येथे दवाखाना,दूर च्या पाल्यावर जाणारे प्रवासी,व रेल्वे चा प्रवास करणारे नागरिक,विद्यार्थी यांच्या साठी या सर्व आगार च्या बसेस फायद्याच्या ठरत होत्या व या सर्व आगार ला या पासून इन्कम पण चांगले येत होते मात्र मागील वर्षी पासून कोरो ना या महामारी मुळे या बसेस बंद पडला तर मधात काही दिवस सुरू झाल्या व आणखी बंद पडल्या या सर्व आगार च्या बसेस बंद असल्यामुळे जनतेला खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो या मुळे आर्थिक नुकसान पण जास्त प्रमाणात होते तर जनतेला नाहक त्रास पण सहन करावा लागत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे एक ब्रीद वाक्य आहे की एस टी ही सेवा साठी आहे मात्र तसे काही दिसत नाही या बसेस आता स्वतःच्या फायद्याचा विचार करत असून जनतेचे त्यांना काही घेणे देणे नाही सर्व आगार च्या बसेस बंद आहे हे माहिती पाडताच प स संग्रामपूर च्या सभापती सौ रत्न प्रभा ताई धर्माळ याना माहिती पडताच त्यांनी लगेच जिल्हा आगर प्रमुख याना निवेदन दिले व बसेस पुर्ववत सुरू करा अन्यथा गाठ माझ्याशी राहील असा इशारा दिला जनतेला त्रास झाला नाही पाहिजे तो मी सहन करणार नाही
निवेदनाच्या प्रति आगार प्रमुक जळगाव जामोद,बुलढाणा याना दिल्या आहेत

भारतीय मानवाधिकारच्या तालुका उपाध्यक्ष पदी व्दारकादासजी नकवाल

0

 

चिखली:- स्थानिक नगर परीषदचे सेवानिवृत्त कर्मचारी व्दारकादास नथ्थु नकवाल यांची भारतीय मानवाधिकारच्या चिखली तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
व्दारकादास नकवाल यांनी नगर परीषद कार्यालयात नोकरी करीत असतांना सर्वस्तरातील नागरीकांना न्याय देण्याचे काम केले आहे. तसेच वाल्मीकी समाजातील प्रतीष्ठीत व सामाजिक संघटनेत काम करण्याचा दांडगा अनुभव मानवाच्या कल्याणासाठी देशपातळीवर झटनारी एकमेव संघटना भारतीय मानवाधिकार संघटन सोबत सक्रीय असल्याने व त्यांच्या सामाजिक कार्याची दखलघेत भारतिय मानवाधिकार चे जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे यांनी व्दारकादास नकवाल यांचि चिखली तालुका उपाध्यक्ष पदि निवड करुन नियुक्तीपत्र प्रमाणपत्र व संघटनेचे ओळखपत्र देऊन सत्कार केला त्यांची नियूक्तीबद्दल सर्वचस्तरावरुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांतभैया डोंगरदिवे जिल्हा उपाध्यक्ष हि. रा. गवई सर तालुका अध्यक्ष दिनेश आढावे तालुका सचिव कल्पनाताई केजकर राहुल घेवंदे शाहनवाज खान दिपक अवसरमोर विकास हिवाळे यांच्यासह भारतीय मानवाधिकारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

14 एप्रिल डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करू दया . वंचित चे नेते डाॅ उमेश वावरे यांची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

कोराना सोबत आपलाला जिवन जगायचे आहे . अशे
W.H.O यानि म्हटले आहे . तरी सुध्दा कोरोणा मुळे मागची जयंती साजरी करता आली नाही. महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यानची जयंती जगात म्हणविला जाते. पाच राज्यात निवडणुका होत असलास तिकडे लाखोच्या सभा होत आहे. तिकडे करोणा कही दिसत नाही भारतात वेगवेगळ्या स्टेडीयम मधे मॅच खेळत आहे तिते पन हजारो मॅच पाहायला येतात ते कोरोणा दिसत नाही आनी आबेडकर जयंती साजरी करण्यासाठी नियम का . 14 एप्रिल हा. दिवस सर्व भारतीया साठी अभिमानाच्या दिवस आहे जाच्या संविधानावर सपूर्ण देश चालतो . करीता या वेळेस डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करीना करीता आज दिनांक 31 मार्च रोजी पिपल्स वेलफेयर सोसायटी चे अध्यक्ष व वंचित चे नेते डाॅ उमेश वावरे यांनी मा. श्री.एस . डी एम.साहेब हिंगणघाट याना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे. वंचित बहूजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष राजेश खानकूरे.शहर अध्यक्ष दिलीप कहूरके .जिवन उरकुडे. महेश लोहकरे. चारू आटे. प्रशांत शंभरकर. विशाल थु ल. किशोर लढे. देवेंद्र त्रिपल्लीवार.रसपाल शेदरे.संतोष सहारे. कुडलिक भजभूजे. गणेश कावळे. केशव सहारे नितिन मैदलकर हे उपस्थित होते