Home Blog Page 507

यावल तालुका तलाठी संघाच्या अध्यक्षपदी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी समिर तडवी यांची बिनविरोध निवड. –

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे ,

। येथील यावल तालुका तलाठी संघाच्या तालुका अध्यक्षपदी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी समीर तडवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे . यावल तहसील कार्यालयात तहसीलदार आर डी पाटील आणी निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतआज दिनांक १८ मार्च रोजी ४ वाजता यावल तालुका तलाठी संघाची नुतन कार्यकारणी संदर्भात बैठक संपन्न होवुन संघाच्या तालुका अध्यक्षपदी पुनश्च हिंगोणा येथील तलाठी दिपक गवई यांची तर उपाध्यक्षपदी परसाडे तलाठी समिर तडवी यांची प्रकामताने निवड करण्यात आली असुन , संघटनेच्या जिल्हा प्रतिनिधीपदी ईश्वर कोळी , तालुका सचिवपदी टेमर बारेला, खजिनदारपदी निखिल मिसाळ , सहसचिवपदी भुषण सुर्यवंशी , कोषाध्यक्षपदी के के तायडे , महीला प्रतिनिधी सुचिता देशभ्रतार यांचा नुतन तालुका कार्यकारणीत समावेश करण्यात आला असुन , निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत तहसीलदार आर डी पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार आणी बैठकीस उपस्थित तलाठी संघाच्या सदस्यानी व पदाधिकाऱ्यांनी केले .

नगरपालिका कोरोना नियंत्रण पथकाकडून नियमाचे पालन न केल्यामुळे दंडात्मक कारवाई

0

 

सचिन वाघे वर्धा

शहरात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पहाता प्रशासनाने ठराविक वेळेनंतरसुद्धा दुकाने सुरु ठेवल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांवरती नगरपालिका कोरोना पथकाने दंडात्मक कारवाई करीत एकूण १७ हजार रूपयांचा दंड वसूल केला.
पालिकेच्या कोरोना नियंत्रण पथकाने शहरात विनामास्क फिरणाऱ्या एकूण ७६ नागरिकांवर कारवाई करीत त्यांचेकडून प्रत्येकी दोनशे रुपये दंड करण्यात आल्याची माहिती पथकप्रमुख प्रविण काळे यांनी दिली.
अलिकड़े लग्नसराइचा हंगाम सुरु असल्याने अनेक व्यापारी प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ आपली व्यावसायिक प्रतिष्ठाणे सुरुच ठेवतात.काल दि.१८ रोजी शहरातील राजधानी साड़ी,प्रकाश साड़ी सेंटर,सावरिया रेडीमेड, इत्यादि प्रतिष्ठानांसह बदनाम कुल्फी,महालक्ष्मी कुल्फी इत्यादि इत्यादि विक्रेत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते शहीद कुटूंबीयांना धनादेशाचे वितरण

0

 

मोताळा प्रतिनिधी
अजहर शाह

बुलडाणा:-जिल्ह्यातील शहीद जवान सतिष सुरेश पेहरे रा. अमोना पो. शेलगांव आटोळ ता. चिखली हे पुर्व लद्दाख गलवान घाटी, जम्मू काश्मिर येथे 14 जुलै 2020 रोजी शहीद झाले. या शहीद जवानच्या कुटूंबियांना राज्य शासनाच्यावतीने 1 कोटी रूपयांच्या आर्थिक मदत जाहीर झाली. या मदतीचा धनादेश आज राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, सहा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान, श्री. सोनटक्के आदी उपस्थित होते. शहीद जवान सतिष पेहरे यांच्या कुटूंबीयांमध्ये 60 लक्ष रूपयांचा धनादेश वीरपत्नी श्रीमती जया सतिष पेहरे, वीरमाता श्रीमती अलका सुरेश पेहरे यांना 20 लक्ष रूपये, वरपिता सुरेश छोटीराम पेहरे यांना 20 लक्ष रूपयांचा धनादेश देण्यात आला. दुर्मिळ मांडूळ प्रजातीच्या सापाची तस्करी भोवली ; दोन आरोपी ताब्यात खामगांव वनपरिक्षेत्रातील घटना बुलडाणा,(जिमाका) दि.19 : खामगांव वनपरिक्षेत्रात 15 मार्च 2021 रोजी मिळालेल्या माहितीनुसार वरखेड फाटा येथे दुर्मिळ मांडूळ प्रजातीच्या तस्करी प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक गौरव सराग यांना मिळालेल्या माहितीनुसार वरखेड फाटा येथे आरोपी शेख इरफान शेख बाबु रा. अहमदाबाद ह. मु वरखेड, दुसरा आरोपी शेख नासीर शेख गफुर रा. वरखेड यांच्याजवळ मांडुळ प्रजातीचा साप असून चहा- नाश्ताच्या हॉटेलवर बसलेले होते. त्यानुसार 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजेदरम्यान त्यांच्याजवळील थैलीमध्ये 1.500 किलोग्रॅम वजनाचा साप, लांबी अंदाजे 95 से. मी, गोलाई 4 से. मी असल्याचे नमूद केले. सदर घटनेचा पंचनामा नोंदविण्यात आला. सदर घटनेनंतर आरोपीस ताब्यात घेवून त्याचे वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण प्रकरण वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगांव यांचेकडे आरोपी व जप्त मांडूळ सापासह वर्ग करण्यात आले. प्रकरण वनविभागास प्राप्त झाल्यानंतर वन विभागाने सदर आरोपीकामी ताब्यात घेवून तपास सुरू केला. आरोपीस तपास कामी ताब्यात घेवून 15 मार्च रोजी सायंकाळी शहर पोलीस स्टेशन, खामगांव येथे कोठडीत ठेवण्यात आले. पुढील तपास कामी आरोपी शेख इरफान शेख बाबु रा. अहमदाबाद ह. मु वरखेड, शेख नासीर शेख गफुर रा. वरखेड यांचेविरूद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 नुसार वनअपराध क्र 760/17 दि. 15.3.2021 कायम करण्यात आला. या आरोपीस न्यायदंडाधिकारी, खामगांव यांचे न्यायालयात हरज करून वनकोठडी मंजूर करण्यात आली. पुढील तपास उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, सहायक वनसरंक्षक श्री. गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, खामगांव व त्यांचे अधिनस्थ सहकारी करीत आहे. वनयजीव तक्रारी बाबत माहिती असल्यास वनविभागास कळविण्याबाबतचे आवाहन वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

5 लाख 50 हजाराची चोरी करणारा आरोपी अखेर अटक

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट घरी कुणी नसल्याचे पाहुन चोरट्यांनी ५ लाख ५० हजार रुपये नगदी तसेच साडेसात तोळ्याचे सोने तसेच चांदीचे एकूण ८ लाख १७ हजार रुपये किमतीचे सोनेचांदीचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी एका स्थानिक संत चोखोबा वार्ड येथील रहिवासीआरोपी सोनुसिंग उर्फ सौनिहालसिंग या आरोपीस अटक केली असून आज न्यायालयाने त्याला पुढील २२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मंजुर केली.सदर घटना दि.१५ रोजी उघड़किस आली होती.
स्थानिक रहिवासी जितेंद्र राऊत हे हॉटेल व्यावसायिक असून गावोगावी जावून हॉटेल व्यवसाय करतात.
मागील शनिवारी काही महत्वाचे कामाने श्री राऊत व कुटुंबिय हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे गेले असता चोरट्यांनी त्यांचे रहातेघरी हात साफ केला.
सदर कुटुंबियांचे चोखोबा वार्ड येथे निवासस्थान असून वरच्या माळ्यावरती सदर कुटुंबिय राहतात.
सदर कुटुंबिय परत आल्यानंतर सदर घटना उघड़किस आली होती.
या घटनेतील आरोपीसुद्धा याच परिसरात राहत असून काही बाहेरगावी राहणाऱ्या सराइत आरोपिच्या मदतीने त्याने सदर चोरी केली.
सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर डीबी पथकाने छानबिन सुरु करीत संशयितास अटक केली.
सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकानेसुद्धा भेट देऊन चौकशी केली होती.
पोलिस कारवाई सुरुच असून सदर प्रकरणी ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे पोहवा विवेक बंसोड़,सुहास चांदोरे,सहायक उपनिरीक्षक सादिक शेख हे पुढील तपास करीत आहेत.

 

 

कोरोना संकटात माझे कुटुंब माझी जबाबदारी या जनजागृती मोहीम राज्यात सायकल भ्रमण करणाऱ्याची प्रशंसा.

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

कोरोना संक्रमण महामारीच्या संकटात शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या जनजागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सायकलद्वारे भ्रमण करणाऱ्या ध्येयवादी तरूणास महसुलतर्फ प्रशंसापत्र देण्यात आले . दरम्यान कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारी संकटात नागरीकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी हे समाजकार्याचे विधायक दृष्टीकोण घेवुन सायकलीद्वारे संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सुमारे १३हजार५०० किलोमिटरचे भ्रमण करीत यावल तालुक्यात आलेल्या कोल्हापुर जिल्ह्यातील राहणाऱ्या नितिन नावनुरकर यास महसुलतर्फ प्रभारी तहसीलदार आर डी पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , बामणोद विभागाचे मंडळ अधिकारी देवरे यांनी नितिन याच्या समाज विधायक कार्याची प्रशंसा करीत त्यास महसुल प्रशासनाने त्याच्या पुढील वाटचालीसाठी कार्य आभार पत्र दिले व नंतर नितिन याने आपल्या रावेर तालुक्याच्या जनजागृती मोहीमसाठी यावलहुन प्रस्थान केले .

यावल येथे आजपासुन नाफेडच्या माध्यमातुन शेतकऱ्यांच्या हमीभाव हरभरा खरेदीचे आमदार चौधरी यांच्या हस्ते शुभारंभ, 

0

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे ,

केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्र शूभारंभ दिनांक १९ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता कृषी उत्पन्न बाजार समीती यावल येथे रावेर यावल चे आमदार शिरीष चोधरी आणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील व पंचायत समितीच्या सभापती सौ पल्लवी चौधरी यांचे शुभहस्ते काटापुजन व धान्य पुजन कार्यक्रम पार पडले .
याप्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील ,उपसभापती उमेश प्रभाकर पाटील व संचालक पुंजो डिंगबर पाटील , संचालक सत्तार तडवी भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, मंडळ पंचायत समीती सभापती सौ. पल्लवी पुरूजीत चौधरी , मसाकाचे माजी जेष्ठ संचालक बारसु रामदास नेहते, कृउबाचे संचालक डॉ . नरेन्द्र कोल्हे ,आणी खरेदी उपाभिकर्ता विकास कार्यकारी सहकारी सोसायटी कोरपावली चेअरमन राकेश फेगडे व सर्व संचालक मंडळ, खरेदी विक्री संस्था संचालक मंडळ, शिवसेनेचे शरद कोळी , संतोष खर्चे, पप्पु जोशी , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचीव स्वप्नील सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले . दरम्यान या प्रसंगी सर्वप्रथम हरभरा विक्रीचा क्रमांक लागलेल्या शेतकरी यांचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते स्वागतसत्कार करण्यात आले , या प्रसंगी शासन निर्देशीत कोवीड १९ चे सर्व नियम सर्वाना पाळाण्यात येवुन हरभरा खरेदीचे शुभारंभ करण्यात आले आहेत असे विकास कार्यकार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी या प्रसंगी सांगीतले, दरम्यान नाफेडच्या हमीभाव हरभरा खरेदी केन्द्र अंतर्गत प्रथम ऑनलाईन १७७०नोंदणी झालेल्या प्रत्येकी शेतकऱ्याच्या हरभरा खरेदीस प्राधान्य दिले जाणार असुन एका शेतकऱ्याकडुन अधिका अधिक२५क्विटंल हरभरा खरेदी करण्यात येणार असल्याची माहीती कोरपावली विकास सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे पांनी दिली असुन , शासनाच्या वतीने महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशनच्या वतीने यावल तालुक्यातुन यंदा एकुण २५ हजार क्विंटल हरभरा खरेदीचा उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती फेगडे यांनी दिली .

संपादक विरसिंह राजपूत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जळगाव जामोद पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध…

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत भ्याड हल्ला करणाऱ्या त्या आरोपींना तातडीने अटक करीत पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत कार्यवाही व्हावी अशी मागणी दिनांक १९ मार्च रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना जळगांव जामोद पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.दिनांक १६ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास सायंदैनिक मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत हे आपले वृत्तपत्राचे कार्यालय बंद करून समोरील रूपाली डेअरीकडे दुध आणण्याकरीता निघाले होते. दरम्यान माता महाकाली परिसरातील मोहन महादेव लटके हा दारूच्या नशेत आला व त्याने तुमच्या वृत्तपत्रात माझ्या वडिलांच्या चांगल्या बातम्या प्रकाशित करा कारण माझे वडील येत्या नगर पालिका निवडणुकीत उभे राहणार आहेत. त्यावर विरसिंह राजपूत यांनी त्यास म्हटले की, सद्या न.प. निवडणुकीला बराच कालावधी आहे. त्यामुळे आपण हा विषय पुढे बघू असे समजावून सागितले असता त्याने दारूच्या नशेत वाद घालीत सरळ अश्लील शिविगाळ सुरू केली. एवढ्यावरच न थांबता त्याने भ्रमणध्वनीद्वारे त्याच्या १० ते १५ साथीदारांना बोलवून घेत विरसिंह राजपूत यांच्यावर हल्ला केला. मद्यधुंद अवस्थेत गुडप्रवृत्तीमुळे हल्ला करीत आरोपींनी शांतता भंग करण्याचा व दहशत निर्माण करण्याचा प्रकार केला.तरी या प्रकरणी आरोपी मोहन लटकेसह त्याच्या साथीदारांना तातडीने अटक करीत पत्रकार संरक्षण कायद्यातंर्गत गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली असून निवेदनाच्या प्रतिलिपी जन संबंधितांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर आश्विन राजपुत, मंगेश राजनकर,अभिमन्युजी भगत,गणेश भड,गुलजारखॉ पठाण, गुलाबराव इंगळे, गोपाल अवचार,राजेश बाठे,गजानन सोनटक्के, शिवदास सोनोने, अशोक टाकळकर, लियाकत खान,अनिल भगत यांच्यासह बहुसंख्य पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दारूच्या नशेत वाद घालीत मोहन लटकेसह त्याच्या साथीदारांनी मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत यांच्यावर हल्ला केला. याप्रकरणी विरसिंह राजपूत यांनी शहर पोलिस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरूध्द कलम २९४, ३२३, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींना अद्यापपावेतो मात्र अटक करण्यात आली नाही…

विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांच्या नेतृत्वात मलकापूर -सोलापूर महामार्गावर मोताळा येथे जोरदार चक्काजाम आंदोलन करण्यात आले..

0

 

लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा व कनेक्शन कापणे थांबवा..अन्यथा मुख्यमंत्री व ऊर्जा मत्र्यांच्या घराचे विज कनेक्शन कापणार -राणा चंदन ..

लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे व सक्तीची विजबिल वसूली थांबवून कनेक्शन कापणे तात्काळ थांबवावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राणा चंदन यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर – सोलापूर महामार्गावर मोताळा ता.जि.बुलडाणा) येथे रास्तारोको करण्यात आला. जर सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ केले नाही तर आम्ही ऊर्जा मंत्री व मुख्यमंत्री यांच्या घरांचे वीज कनेक्शन कापू ,असा इशारा राणा चंदन यावेळी दिला.. सकाळ पासून चाललेल्या रास्तारोको मुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच – लांब रांगा लागल्याने महामार्गावर अडीच तास वाहतूक खोळंबली होती…यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ही तैनात होता..
या आंदोलनात,राणा चंदन,शेख रफिक शेख करीम,सय्यद वसीम,महेंद्र जाधव,राजेश गवई ,दत्ता पाटील,मारोती मेढे चंदू गवळी,मनोहर उमाडे,वैभव शिरसाट,संतोष गवळी,राजू पन्हाळकर,निलेश पुरभे,गजानन तायडे,राजू गायकवाड,संतोष खराटे,राजु सुरडकर,कबीर खान नारायण तायडे,गजानन गवळी उपस्थित होते..

यावल येथे तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अकलुदच्या पोलीस पाटीलास केले निलंबीत,

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे,

तालुक्यातील अकलूद येथील पोलिस पाटील किरण मुरलीधर वानखेडे यास येथील तहसील कार्यालयात दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आज निलंबित केले.
यावल पोलिस पाटील किरण वानखेडे याने गेल्या सोमवारी (ता. १५) दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास सोबत असलेल्या एका दारूड्या व्यक्तीसह येथील तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांचे दालनात दारुच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिस पाटील किरण वानखेडे यांचेविरूध्द यावल पोलीस स्टेशन मध्ये
गुरन ७/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कालम ८५ (१), ११२, ११७ दि १५/०३/ २०२१ रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. येथील पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन त्यास अटक झाली होती.
गुन्ह्याबाबतचे प्रकरण व विभागीय चौकशीच्या अधिन असून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नियम ४च्या पोटनियम (१) तसेच उपोद्घतातील अ. क्र.२ चे महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियम १९६७ चे कलम ११ अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी पोलिस पाटील किरण मुरलीधर वानखेडे यास पुढील आदेशापावेतो तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश आज बजावले आहेत.

यावल येथे तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अकलुदच्या पोलीस पाटीलास केले निलंबीत,. . . . यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे, . , . ।। तालुक्यातील अकलूद येथील पोलिस पाटील किरण मुरलीधर वानखेडे यास येथील तहसील कार्यालयात दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आज निलंबित केले. यावल पोलिस पाटील किरण वानखेडे याने गेल्या सोमवारी (ता. १५) दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास सोबत असलेल्या एका दारूड्या व्यक्तीसह येथील तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांचे दालनात दारुच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिस पाटील किरण वानखेडे यांचेविरूध्द यावल पोलीस स्टेशन मध्ये गुरन ७/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कालम ८५ (१), ११२, ११७ दि १५/०३/ २०२१ रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. येथील पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन त्यास अटक झाली होती. गुन्ह्याबाबतचे प्रकरण व विभागीय चौकशीच्या अधिन असून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नियम ४च्या पोटनियम (१) तसेच उपोद्घतातील अ. क्र.२ चे महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियम १९६७ चे कलम ११ अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी पोलिस पाटील किरण मुरलीधर वानखेडे यास पुढील आदेशापावेतो तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश आज बजावले आहेत.

0

यावल येथे तहसील कार्यालयात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या अकलुदच्या पोलीस पाटीलास केले निलंबीत,. . . . यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे, . , . ।। तालुक्यातील अकलूद येथील पोलिस पाटील किरण मुरलीधर वानखेडे यास येथील तहसील कार्यालयात दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आज निलंबित केले.
यावल पोलिस पाटील किरण वानखेडे याने गेल्या सोमवारी (ता. १५) दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास सोबत असलेल्या एका दारूड्या व्यक्तीसह येथील तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांचे दालनात दारुच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी पोलिस पाटील किरण वानखेडे यांचेविरूध्द यावल पोलीस स्टेशन मध्ये
गुरन ७/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कालम ८५ (१), ११२, ११७ दि १५/०३/ २०२१ रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. येथील पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन त्यास अटक झाली होती.
गुन्ह्याबाबतचे प्रकरण व विभागीय चौकशीच्या अधिन असून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नियम ४च्या पोटनियम (१) तसेच उपोद्घतातील अ. क्र.२ चे महाराष्ट्र ग्राम पोलिस अधिनियम १९६७ चे कलम ११ अन्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करून प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी पोलिस पाटील किरण मुरलीधर वानखेडे यास पुढील आदेशापावेतो तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश आज बजावले आहेत.