Home Blog Page 508

कार्यकारी अभियंता बेबंळा प्रकल्प विभाग यवतमाळ येथे घुईखेड वासीयांचे आमरण उपोषण

0

 

 

घुईखेड येथील अनुसूचित जाती बौध्द व वंचित वहुजन समाजातील लोकांना त्यांच्या सुटलेल्या अतिक्रमण व अतिरिक्त बांधकाम केलेल्या घरांचा मोबदला देण्यात यावा या प्रलंबित न्याय मागणीची पुर्तता करण्यात यावी. या करीता सामाजिक कार्यकर्ते आयु.अनिल आर वरघट घुईखेड (अध्यक्ष बेबंळा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति अमरावती जिल्हा) यांचे कुशल नेतृत्वात सोमवार दि 22/3/2021 ला सकाळी 10,30 वाजता पासुन कार्यकारी अभियंता बेबळा प्रकल्प विभाग यवतमाळ* यांच्या कार्यालया समोर  आमरण उपोषण  करण्यात आले.
या आमरण उपोषणात सहभागी असलेले खालील अतिक्रमण धारक कार्यकर्ते सर्वश्री किशोर नरगळे, दुर्योधन धाबर्डे, प्रेमदास वरघट, नागोराव डांगे, प्रकाश नाना वरघट, नारायण वरघट, नितीन वरघट, रमेश कवडू धाबर्डे, सुनिल नरगळे, पवन अशोक वरघट, सतिश मारोती मेश्राम, संदिप भालचंद्र गजघाटे ,अमोल देविदास शंभरकर, पदमाकर गजघाटे, दिनेश वरघट, कवडू चद्रभान राऊत, गजानन गिरी, सचिन किसन वरघट, प्रविन रंगारी, विलास मारोतराव मेश्राम, तेजस भिमराव मेश्राम, राजेश न्यानेश्वर वानखडे, आनंद वानखडे प्रविन ना वरघट, नरेश भानुदास खंडारे, कपिल श्रीधर मेश्राम, बजरंग भगवान शिंदे,सुरेश नवघरे,
आदी अतिक्रमण धारक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.

स्वस्त धान्य दुकानदारांची बनवाबनवी च्या गैर कारभारा बाबत आम आदमी पार्टी च्या वतीने वर्धा जिल्हा अधिकारी यांना निवेदन

0

 

सचिन वाघे वर्धा

वर्धा दी.24 मार्च 2021
शहीद दिनाच्या दिवसी वर्धा जिल्हा आप च्या वतीने स्वस्त धान्य दुकान मध्ये होत असलेल्या गैरव्यवहार बाबत निवेदन देण्यात आले,निवेदनात जनतेला निकृष्ठ दर्जाचे मिळत असलेले धान्य,मशीन द्वारे पावती मिळत नाही,फक्त एकच किलो चणा डाळ मिळत असते,मक्का जबरदस्तीने दिला जातो,तो ईच्छेप्रमाणे द्यायला हवा,पावती मशीन 1 वर्षापासुन खराब आहे असे दुकान दाराच्या वतीने सांगितले जाते,ग्राहकाला त्याच्या कोट्या प्रमाणे धान्य मिळाले पाहिजे,ते चांगले प्रतीचे असायला पाहिजे,
आदी प्रकार चे गैर व्यव स्थापन बाबत निवेदन देण्यात आले
त्यात ताबडतोब सुधार झाला पाहिजे असा आग्रह चर्चे दरम्यान धरण्यात आला अती रिक्त जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे सोबत जिल्हा कमेटी च्या वतीने सखोल चर्चा झाली,अधिकारी यांनी कारवाई करण्याची सूचना करतो असे सांगितले
या वेळी जिल्हा प्रमूख प्रमोद भोमले वर्धा जिल्हा आप,ममता कपूर महिला आघाडी अध्यक्षा वर्धा जिल्हा आप,पूनम गुल्हने श्रध्दा तिवारी,रवी बाराहाते मंगेश शेंडे ,दुर्गा प्रसाद मेहरे तुळसीदास वाघमारे,प्रकाश डोडानी, समीर बेग,प्रमोद हजारे, आदी उपस्थित होते
.

अवकाळीमूळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25000 रुपयांची मदत द्या.. लोकनेते माजी आमदार विजयराज शिंदे

0

 

मोताळा प्रतिनिधी
अजहर शाह

जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून मागणी

बुलडाणा:- मागील चार दिवसां पासून वादळी, वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना दर हेक्टरी 25000 रुपयांची आर्थिक मदत मिळण्याची आग्रही मागणी प्रदेश कार्यकारीणी सदस्य मा.आमदार विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.

निवेदनात नमूद आहे की , गेल्या तिन- चार दिवसांपासून बेमोसमी वादळी वारा व गारपिटीसह झालेल्या पावसाने बुलडाणा व मोताळा तालुक्यासह संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यातही शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
प्राप्त माहिती नुसार गेल्या तिन दिवसात जिल्ह्यात सरासरी 1.9 मि.मि.पावसाची नोंद झाली आहे.जिल्हयात सर्वाधिक अवकाळी पावसाचा फटका बुलडाणा तालुक्याला बसला असून तालुक्यात 8.7 मि.मि पावसाची नोंद झाली आहे.
या अवकाळी मुळे तालुक्यातील गहू, सोयाबीन, ज्वारी,बाजरी,
हरबरा,मका,भाजीपाला,कांदा,
पपई ई पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तसेच मोताळा तालुक्यातील कोथळी,पलढग,तरोडा,लोणघाट,सहस्त्रमुळी,पून्हई,वडगांव,काबरखेड,रोहिणखेड,उबाळखेड,सारोळापीर,काळेगावं,तपोवन,मूर्ती,टाकळी,वाघजाळ,परडा,शिरवा,शेलापूर,चिंचपूर,डिडोळा,तालखेड,रिधोरा जहाँ,महाल पिंप्री,आड विहीर, अंत्री,बोराखेडी, मोताळा,कुऱ्हा,गोतमारा ई गावांत कमी जास्त प्रमाणात गहू,हरभरा,मका, भाजीपाला,कांदा टोळ यांसह केळी, टरबूज,लिंबू,पपई यांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.काही पिके काढणीवर आलेली होती तर काही पिके काढून ठेवलेली होती मात्र या अवकाळी मुळे आता निसर्गाने शेतकऱ्यांवर मोठा आघात केला आहे.संपूर्ण जिल्ह्यात अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.
तरी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत विमा कंपनीला नुकसानी बाबत कळवून क्लेम दाखल करून
बुलडाणा ,मोताळा तालुक्यासह या अवकाळीमुळे बाधित झालेल्या पिंकांचे तात्काळ सर्वे करून मायबाप सरकारने शेतकऱ्यांना दर हेक्टरी 25000 रुपयांची तातडीची मदत करावी. अशी आग्रही मागणी विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यां कडे केली आहे.

मंगला ठक यांच्या नेतृत्वात ओबीसीची जातिनिहाय जनगणना व ज्येष्ठ नागरिक निराधार यांच्या मागण्या संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन

0

 

सचिन वाघे वर्धा

महागाईचा भस्मासुर वाढतच चालला आहे परंतु शासनाने बी. प. एल. ची उत्पन्न मर्यादा 21000 हजार गेल्या कित्तेक वर्ष पासून निर धारित केली आहे . आज प्रत्येक वस्तूचा किमती वाढत आहे मग बी. पी. एल. ची उत्पन्न पर्यादा आजही 21000 रुपयेच कशी काय आज प्रत्येक व्यक्तीचा दर डोईचा खर्च हा किमान 100 रू इतका तरी आहेच मग 58 रुपये प्रतिदिन उत्पन्न असलेला व्यक्ती दोन वेळचे जेवण कसे काय करू शकते म्हणून शासनाने निरधरांची उत्पन्न मर्यादा 21000 रुपया वरून 50000 रुपये करावी सोबतच खालील मागण्या तातडीने मंजूर करण्यात याव्या

सोबतच ओबीसी ची जात निहाय जनगणना झालीच पाहिजे . अलीकडच्या काळात रास्त सर्वच ओबीसी चे मागण्या फेटाळल्या जात आहे . व सरकार ओबीसी च आवाज व मागण्या दाबण्याचा काटेकोर प्रयत्न करीत आहे परंतु आता सर्वच स्तरावरून ओबीसी समाज आता जागरूक झालं आहे आणि सर्वच स्तरावरून जात निहाय जनगणना व्हावी अशी मागणी होत असताना सरकार दुर्लक्ष का करीत आहे याचा जाब विचारण्यासाठी आज 23 मार्च 2021 ल भव्य मोर्चाचे आयोजन हिंगणघाट तहसील कार्यालयावर केले होते परंतु कोरोणा मुळे सर्विकडे तणावाचे वातावरण असल्याने भिड करता येणार नाही. असे प्रशासनाकडून आदेश असल्या मुळ मोर्चाची तारीख समोर ढकलण्यात आली आहे .
आणि आज मोजकेच लोक निवेदन देत आहे परंतु आमच्या हक्काचा मागण्या सरकारनी कदापिही दाबण्याचा प्रयत्न करू नये अ न्य था भविष्यात मोर्चा ला भव्य स्वरूप घ्यावं लागेल आणि याला कारणीभूत सरकार राहील ..

सिंदखेडराजा पंचायत समितीला भ्रष्टाचाराचे ग्रहण ! ४०,हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता संदीप उबाळे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेडराजा येथील पंचायत समिती कार्यालय मध्ये अनेक गोरगरीब व्यक्तींचे तसेच शेतकऱ्यांचे कामे निगडित असतात ‘परंतु ग्रामीण भागाचा कणा समजल्या जाणाऱ्या पंचायत समितीमध्ये अनेक अधिकारी हे लाचेची मागणी गुपचूप पणे करत असतात तर काही व्यक्ती ही त्यांना लाच सुद्धा देऊन आपली कामे भागवतात ‘व यामुळेच पंचायत समितीमधील कर्मचारी अधिकारी वर्ग आहे लाचेच्या एवढ्या आहारी गेले आहेत की छोटे काम सुद्धा करायचे झाल्यास गोरगरीब लोकांना लाचेची मागणी करतात ‘परंतु काही लोक सुज्ञ असतात ‘असाच काहीसा प्रकारदिनांक 23 मार्च ला सिंदखेडराजा पंचायत समितीच्या आवारात घडला ‘तालुक्यातील दुसरबीड येथील एका 55 वर्षीय व्यक्तीने ‘सन 2020 मध्ये सिंदखेड राजा पंचायत समिती अंतर्गत ग्राम वाकद , राहेरी बुद्रुक, . आडगाव राजा, येथील जिल्हापरिषद शाळेच्या बांधकामाचे बील एकूण ‘ २५ लाख ‘ २६हजार रुपये झाले असून त्याचे तीन टक्के प्रमाणे ’70 हजार रुपये लाचेची मागणी पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंता ( वर्ग 3 )संदीप उबाळे वय 34 वर्ष .हे दुसरबीड येथील व्यक्तीला करू लागले ‘त्याचप्रमाणे ठरल्याप्रमाणे 40 हजार रुपये पहिला हप्ता देण्याचे .दिनांक 23 मार्च रोजी ठरले ‘त्याप्रमाणं ४० हजार रुपये पंचायत समितीच्या आवारामध्ये देत असताना ‘अगोदरच सापळा रचून बसलेल्या .लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने श्री उबाळे यांना 40 हजार रुपये घेताना रंगेहात पकडले ।या लाचलुचपत सापळा पथक का मध्येपोलीस उपाधीक्षक श्री आर .एन .मळघणे ।पोलीस नाईक श्री विलास साखरे ‘रवींद्र दळवी ‘ श्री जगदीश पवार ‘हे होते तर मार्गदर्शन अधिकारी म्हणून ।श्री विशाल गायकवाड ‘पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र ‘श्री अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र ‘श्री संजय चौधरी पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा ।तर तपासणी अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक श्री आर एन मळघणे यांनी काम पाहिले ‘आरोपीवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया वृत्त लिहीपर्यंत सुरू होती ‘

यावल तालुक्यात कोरोना संसर्गामुळे एका वर्षात ८१ जणांचा मृत्युत्तर दोन हजार पॉझीटीव्ह रुग्ण व८६० प्रतिबंधीत क्षेत्र

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

संपुर्ण जगासह महाराष्ट्र राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले असुन , यात कोरोना बाधीत ८१ नागरीकांचा मृत्यु झाला असुन एक वर्षात सुमारे दोन हजार लोक हे कोरोना बाधीत आढळुन आले आहेत . दरम्यान मागील वर्षी यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केन्द्र आणी राज्य शासनाने २२ मार्च २०२०च्या मध्यरात्री पासुन संचारबंदी लागु करण्यात आली होती . या काळात सर्वप्रथम कोरोना पॉझीटीव्ह रुग्णहेकोरपावली तालुका यावल येथे तर यावल शहरातही जुन अखेर शहरातील सुर्दशन चित्र मंदीर परिसरात डॉ . सलीम शेख यांचे कुटुंबातील त्यांचा मुलगा हा कोरोना बाधीत आढळुन आला होता , यावेळी पॉझीटीव्ह रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेसाठी ग्रामीण परिसरात एकुण ६१२ प्रतिबंधीत क्षेत्र तर शहरी भागात २४५ प्रतिबंधीत क्षेत्र अशी ८६० प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आली होती. या महामारीच्या कठीन व संकटमय समयी तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे तत्कालीन तहसीलदार जितेन्द्र कुवर , तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल व पोतीस प्रशासना तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य प्रशासनाने लक्ष वेधणारे असे उल्लेखनिय कार्य केलीत, या कार्यात त्यांना यावल नगर परिषद आणी फैजपुर नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी यांचे बहुमुल्प सहकार्य मिळाले . यावेळी फैजपुर विभागाचे तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणी यावलचे तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी कोरोना काळात केलेल्या नागरिक शासन आदेशाची अमलबजावणी साठीचे घेतलेले कठोर निर्णय व त्यासाठीचे अथक प्रयत्न हे असमरणीय आहे . दरम्यान आज कोरोना संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले असुन , मागील वर्षाच्या मिळालेल्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत गेल्या दहा दिवसात मिळालेले ३७०पॉझीटीव्ह रुग्णसंख्या ही अत्यंत धोकादादक व आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची चिंता वाढवणारे आहे , याकरीता वारंवार प्रशासनाच्या वतीने सोशल डिस्टेंसिंग, मास्क वापरणे , सार्वजनिक ठीकाणी अनाश्यक गर्दी टाळणे या सर्व नियमांची काटेकोर अमलबजावणी होणे अत्यंत गरजे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे .

अपंग बेरोजगारचे कर्ज प्रस्ताव त्वरित मंजूर करा…..

0

 

हंसराज उके अमरावती

.लीड मॅनेजर जिल्हा अग्रेणी बँक चा कार्यालयामध्ये दिनांक 24 ताऱखीला ठिय्या आंदोलन करणार अपंग जनता दल सामाजिक संघटना चा इशारा

अमरावती ::- अपंग बेरोजगारना हक्काचा रोजगार मिडवा म्हणून राज्य शासननाणे अपंग बीज भांडवलं योजना सुरु केली आहे व तसें शासन निर्णय निर्गमित केला आहे या शासन निर्णय प्रमाणे अपंग बेरोजगारांना जिल्हा परिषद मार्फत 20 टक्के अनुदान व उरलेली 80 टक्के रक्कम हे बैंक मार्फत एकूण 1,50,000 , ( अक्षरी एक लाख पन्नास हजार ) कर्ज मिडते अपंग बेरोजगारांना कर्ज प्रकरण मंजूर बँक मार्फत होते सदर कर्ज प्रकरण हे जिल्हा परिषद मार्फत सर्व तपासणी करून संबंधीत बँकेत पाठविण्यात येते नंतर बँक हा कर्ज प्रस्ताव मंजूर करून जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग मंजूर पत्र पाठविते त्यानंतर 20% अनुदान रक्कम ये बँक ला पाठविण्यात येते असे समाज कल्याण विभागा मार्फत 18 प्रस्ताव लाभार्थी चा संबंधीत बँक ला पाठविण्यात आले आहे तरी सुद्या बँक मॅनेजर कर्ज प्रकरण मॅनेजर टाळाटाळ करीत असून अनेक वेळा जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले व जिल्हाधिकारी साहेब यांनी एक बैठक सुद्या लीड मॅनेजर सोबत लावली होती पण या बैठक ला कोणीच आले व कर्ज प्रस्ताव सुद्या अपंग बेरोजगारचे मंजूर झाले नाही म्हणून अपंग जनता दल सामाजिज संघटना जिल्हा अमरावती चा वतीने बुधवार दिनांक 24/03/2021 रोजी टिक 1 वाजता लीड मॅनेजर जिल्हा अग्रेणी बँक सहकार नगर येते अपंग ठिय्या आंदोलन करणार असून जिल्हातील अपंग बेरोजगार नी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन अपंग जनता दल सामाजिक संघटना चे जिल्हा अध्यक्ष मयूर मेश्राम यांनी केले आहे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोताळा तहसील कार्यालयाला दणका

0

 

मोताळा प्रतिनिधी
अजहर शाह

मोताळा:-प्रशासन हादरले तहसील प्रशासनाने दिले लेखी पत्र तात्काळ पंचनाम्याचे आदेश
विदर्भ कार्यध्यक्ष राणा चंदन व युवा नेते राजेश गवई यांच्या नेतृत्वाखाली मोताळा तहसील कार्यालया मध्ये ठिया आंदोलन
गेल्या चार दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या वादळी पावसामुळे मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे पंचनामे होत नाहीये हे लक्षात येताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत आक्रमक पवित्रा घेतला व मोताळा तहसील च्या आवारात जो पर्यंत लेखी स्वरूपात तहसीलदार पंचनाम्याचे आदेश काढत नाही तो पर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा इशारा देताच तात्काळ तहसीलदार यांनी लेखी आदेश दिला.
यावेळी प्रामुख्याने विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन महेंद्र जाधव शे रफिक शे करीम राजेश गवई मारोती मेढे राजू पन्हाळकर बाबुराव सोनोने चंदू गवळी राजू गायकवाड गजानन गवळी राजू शिंदे संदीप गोरे विजय बोराडे निखिल पाटील भागवत धोरण गजानन तायडे नारायण तायडे शे नाजीम शब्बीर मिस्त्री शे सलीम शे हशम धम्मदीप वानखेडे मनोहर उमाळे वैभव शिरसाट राजू सुरडकर वासुदेव मेढे शुभम मेढे शुभम इंगळे नामदेव बोरकर गोपाल मिरगे हे सर्व उपस्थित होते

यावल येथे विविध ठीकाणी शहीद दिवसानिमत्त क्रांतीवीर शहीद भगतसिंग , राजगुरू व सुखदेव यांना अभिवादन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

शहीद क्रांतीकारक भगतसिंग , शिवराम राजगुरू , सुखदेव हिन्दुस्थानातील ब्रिटीस साम्राज्याविरुद्धच्या स्वातंत्र्याच्या लढयात त्यांनी केलेल्या हिंसात्मक कार्यामुळे वयाच्या अवघ्या २ ३ व्या वर्षी २३ मार्च १९३१ साली त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या क्रांतीकारी विर शहीदांच्या स्मृतीदिना निमित्त आज यावल पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील , एस एस तायडे , कनिष्ठ प्रशासन अधिकारी रिधे, श्रीमती सुनिता सोनवणे , आर पी देशमुख ,लतेश नेमाडे, आशिक पिंजारी , के एस पाटील , विशाल राऊत , जावेद तडवी , अक्षय शिरसाळे , मोहन हिरळकर , मिलींद कुरकुरे , भुषण मेढे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहुन शहीदाच्या प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभीवादन केले . यावल तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय ईमारतीत प्रभारी तहसीलदार आर डी पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , सुयोग्य पाटील , रविंद्र माळी , दिपक भुतेकर, निशा चव्हाण, सुरज जाधव यांच्या उपस्थितीत शहीद दिवस साजरा करण्यात येवुन क्रांतीविर शहीद भगतसिंग , राजगुरू , सुखदेव यांच्या प्रतिमा पुजन करून भावपुर्ण आदरांजली अपर्ण करण्यात आली .

हिंगणघाट शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावरुन मोटरसायकलने जात असतांना झालेल्या अपघातात एका विवाहित इसमाचा मृत्यु झाला.

0

 

सचिन वाघे वर्धा

प्राप्त माहितीनुसार वडनेर येथील इंदिरा गांधी विद्यालयाचे कर्मचारी सुरेश देवतारे हे आपल्या पत्नीसमवेत उड़ाणपुलावरुन स्वतःचे मोटरसाइकलवरुन जात असता मागून आलेल्या कंटेनरने धडक दिल्याने सदर अपघात झाला असून त्यात सुरेश देवतारे यांचा जागीच मृत्यु झाला.
सुरेश देवतारे हे आज सायंकाळी ४.३० वाजताचे दरम्यान शालेय शिक्षिकेचे साक्षगंध आटोपुन नांदगांव परिसरातील द्वारकानगरी येथे घरी परत जाण्यास निघाले असतांना सदर अपघात घडला.
सदर अपघात घडला त्याचवेळी देवतारे यांचा मुलगा तेथून जात होता.अपघात पाहण्यासाठी आलेल्या मुलाला आपले वडिलांचा अपघात झाल्याचे दृश्य दिसले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे,पोशी अजहर खान,प्रदीप राठोड,दिपक हाके घटनास्थळी पोचले.