Home Blog Page 509

एक ते दोन दिवस वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता !

0

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सध्या उन्हाळा जरी लागला तरी पावसाचे वातावरण तयार झालेले आहे ।अनिल शेतकऱ्याच्या गहू ‘ पपई ‘ टोळ कांदा इतर फळबागाचे नुसकान झाले आहेत ‘अनेक शेतकऱ्यांचे गहू सोंगणी राहिलेली आहे ।अगोदर शेतकरी कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झाली असताना आता निसर्गाच्या तडाख्यामुळे हवालदिल झाला आहे ‘पुन्हा एकदा 24 ते 25 तारखेपर्यंत काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता बुलढाणा हवामान केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे !अशी माहिती बुलढाणा हवामान केंद्राचे तज्ञ अनिल जाधव यांनी दैनिक भारत संग्रामची बोलताना दिली !त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल व्यवस्थित रित्या ताडपत्री ने नीट झाकून ठेवावा !

मेहकर येथे शासनाच्या आरक्षणविरोधी धोरणाचा जाहीर निषेध.तहसीलदार यांना निवेदन ।

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

मेहकर येथे दिनांक 22 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र सरकारच्या दिनांक 18 मार्च 2021 रोजीच्या मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण नाकारणाऱ्या जीआरचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व सह्योगी संघटना प्रोटान मेहकर शाखे तर्फे काळी पट्टी बांधून निषेध आंदोलन करण्यात आले . तसेच पदोन्नतीच्या कोट्यातील 33% टक्के आरक्षित पदे दिनांक 25 मे 2004 च्या आदेशाप्रमाणे मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देऊन भरण्यात यावी या आशयाचे निवेदन .
मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तहसीलदार मेहकर ह्यांचे मार्फत देण्यात आले
महाराष्ट्र शासनाने 2004 मध्ये कायदा बनवून मागासवर्गीय असलेल्या अ.जाती, अ.जमाती, , भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग यांना शासन सेवेतील रिक्त पदावर आरक्षण देणारा कायदा संमत केला होता. त्यानुसार मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये 33 टक्के आरक्षण देऊन पदोन्नतीच्या सर्व टप्प्यांमध्ये सर्व मागासवर्गीयांनाआरक्षण तत्व लागू केले होते. मात्र या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी शासनाकडून सबळपणे व पुराव्याच्या आधारे बाजू न मांडल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने 2004 ला पदोन्नतीतील आरक्षण देणारा शासनादेश रद्दबादल ठरविला होता. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका 2017 मध्ये दाखल केली होती. पदोन्नती संदर्भात विशेष अनुमती याचिका प्रलंबित असताना व पदोन्नतीचा विषय माननीय सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना पदोन्नतीच्या कोट्यातील 67% खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर पदोन्नती करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभाग 2912/ 2017 पत्रान्वये निर्गमित केले आहे. परंतु शासनाने माननीय उच्च न्यायालय मुंबईच्या दिनांक 2017 रोजीच्या दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, , भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या आरक्षित 33 टक्के कोट्यातील पदोन्नती आजतागायत रोखलेल्या आहेत आणि उपरोक्त 29/12 /2017 च्या शासन आदेशान्वये 67 टक्के खुल्या प्रवर्गातील पदावर पदोन्नती मात्र सुरू ठेवलेली आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णयाप्रमाणे शासनाने उर्वरित आरक्षित कोट्यातील 33 टक्के पदावरील पदोन्नतीची स्थगिती उठवली आहे ती 33 टक्के आरक्षित कोट्यातील पदे असल्याने पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे न भरल्यामुळे ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्या मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात नसल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून मागासवर्गीय संघटना तसेच लोकप्रतिनिधी पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व पदे भरण्याची मागणी करीत आहेत. त्या मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदं देण्यासाठी सदर आदेश निर्गमित करण्याची मागणी करणारे आणि ज्यांच्यावर अन्याय होत आहे त्या अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांची या 33 टक्के रिक्त पदावर पदोन्नती होणे अपेक्षित आहे. परंतु असे असतानाही 33 टक्के आरक्षित कोट्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटके-विमुक्त विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय कर्मचारी अधिकाऱ्यांना आरक्षित कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती देण्या ऐवजी सदर आदेशान्वये पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेली 100 टक्के पदे ही कोणत्याही आरक्षणाचा विचार न करता दिनांक 25 .०5 2004 रोजीच्या स्थितीनुसार भरण्यात यावी असे आदेश पारित केले आहेत. अर्थात सदर पदे खुल्या प्रवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातूनच भरली जातील अशा प्रकारची तरतूद शासनाने या आदेशान्वये केली आहे. म्हणजे रिक्त पदे 33 टक्के आरक्षण कोट्यातील आहेत आणि आणि पदोन्नती मात्र खुल्या प्रवर्गातील अधिकारी आणि कर्मचारी यांची होणार असा हा मागासवर्गीय प्रवर्गातील सर्वच कर्मचाऱ्यांवर भेदभाव करणारा शासन आदेश आहे. त्यामुळे या शासनाच्या अन्यायकारक निर्णयाचा विरोध करण्यासाठी बहुजन कर्मचारी वर्गाची ट्रेड युनीयन असलेल्या राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्रातील 36 जिल्हे व 358 तालुक्यात एकाच दिवशी तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर शासनाचा निषेध करण्यासाठी काळी पट्टी बांधून आंदोलन करण्यात आले. तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मा. मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसील स्तरावर तहसीलदार व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले .
शासनाने दिनांक 18 फेब्रुवारी 2021 चा शासन आदेश तत्काळ रद्दबादल करावा, मागास वर्गीय यांच्या पदोन्नतीसाठीचा शासन निर्णय 2004 च्या आदेशाप्रमाणे तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश निर्गमित करावे, 33 टक्के आरक्षित कोट्यातील रिक्त पदांवर खुल्या संवर्गातील कर्मचारी व अधिकारी यांची पदोन्नती करू नये, महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी यांची थांबलेली पदोन्नती प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात यावी या आशयाच्या विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या .
*निवेदन देताना मा. गजानन अंभोरे जि.उपाध्यक्ष R.M.B.K.S., मा.सैय्यद हबिबसर जिल्हा उपाध्यक्ष प्रोटान,मा.व्हि.के.नेमाडे सर जिल्हा कोषाध्यक्ष प्रोटान,मा बि.एस.सदार सर ता.अध्यक्ष प्रोटान, मा.इंगळेसर ता.उपाध्यक्ष प्रोटान ,मा राहुल डोंगरदिवे सर ता.कोषाध्यक्ष प्रोटान व इतर सहकारी उपस्थीत होते ‘

शहीद दिनानिमित्त शिंदी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन !पंचवीस तरुणांनी केले रक्तदान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या गावांमध्ये शहीद भगतसिंग ‘ सुखदेव ‘ राजगुरू ‘यांच्या शहीद निमित्त आदर्श गाव शिंदी येथे दिनांक 23 मार्च रोजी सकाळी ८वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन .डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया शिंदी च्या वतीने करण्यात आले होते ’23 मार्च रोजी भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना क्रांतीकारकांना इंग्रजांनी फासावर लटकवले होते ‘आणि त्यांचा स्मृतिदिन हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो ‘आणि याच शहीद दिनाचे औचित्य साधून ‘शिंदा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ रक्तदान शिबिर , रक्तगट तपासणी, शिबिर नेत्रदान शिबीर,अवयव दान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे ‘या रक्तदान शिबिर मध्ये २५ तरुणांनी रक्तदान केले ‘रक्तदान केलेल्या तरुणांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले ‘यावेळी शिंदी गावचे सरपंच विनोद खरात . पोलीस पाटील मदन हाडे ‘डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे शिंदी अध्यक्ष निलेश बंगाळे ‘पत्रकार सचिन खंडारे ‘अरविंद खंडारे ‘अमोल खरात ‘प्रवीण वैद्य ‘डॉक्टर रामेश्वर खरात ‘सोमेश पागोरे ‘कृषी पर्यवेक्षक गणेश बंगाळे ‘दिपक खरात ‘आधी हजर होते ‘यावेळी शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात आले ‘

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची १३० व्या जयंतीच्या मिरवणुकीसाठी परवानगी न दिल्यास बौद्ध पंच मंडळ आंदोलन करणार

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

तालुक्यातील साकळी येथील बौद्ध पंच मंडळाच्या वतीने येणाऱ्या १४ एप्रिल २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात येणार असल्याने शासनाने परवानगी द्यावी या संदर्भात महसुलचे मुक्तार तडवी यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना दि.२२ मार्च रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती साजरी करण्यात येणार असुन, शासनाच्या नियम अटी शर्तीचे पालन करून कोरोना संसर्गजन्य आजार पसरू नये याची खबरदारी घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची साजरी करण्यात येणार असुन या मिरवणूकित सहभागी होणारे प्रत्येक व्यक्तीच्या तोंडाला माक्स व सुरक्षित अंतर ठेऊन अतिशय नियमांचे काटेकोर पालन करीत ही मिरवणूक काढण्यात येणार असुन ,आपण आम्हास डॉ .बाबासाहेबांची जयंतीच्या मिरवणुक काढण्याची परवानगी द्यावी. आपण परवानगी नाकारत असाल तर आम्ही समस्त समाज बांधव रस्त्यावर उतरून शासनाचा लोकशाही मार्गाने तीव्र जाहीर निषेध करून प्रसंगी धरणे आंदोलन देखील करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी असा इशारा शासनाला देण्यात आला आहे तरी आमची मागणी मान्य करून रीतसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती निमित्त मिरवणूक काढण्याची परवानगी द्यावी.अशी मागणी निवेदनातद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर मिलिंद जंजाळे, अर्जुन जंजाळे, सागर सोनवणे, देवानंद जंजाळे, विक्रम सुरवाडे, भूषण तायडे, विलास सोनवणे, मुकेश तायडे, गणेश जंजाळे, विजय जंजाळे, दिपक जंजाळे, चंद्रकांत पवार, उमेश शिरसाडे, सचिन सोनवणे, राहुल जंजाळे, सागर भालेराव, रवी भालेराव, रवी पवार आदी सह समाज बांधवांच्या सह्या आहेत.सदर निवेदनाच्या प्रती माहीतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री (महाराष्द्र राज्य), जिल्हाधिकारी (जळगाव), पोलीस अधिक्षक जळगाव , विभागीय पोलीस अधिकारी फैजपूर यांना देण्यात आलेल्या आहेत.

 

चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांनवर होणार कारवाई तहसीलदार राजेंद्र इंगळे ; 25 मार्च पर्यंत चाचणी करण्याचे आवाहन ; विशेष चाचणी कॅम्प चे आयोजन

0

 

हंसराज उके अमरावती

चांदुर रेल्वे तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णाची संख्या लक्षात घेता तालुक्यातील प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आले आहे, जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक दुकानदार व्यावसायिकांनी कोविड चाचणी सक्तीची केली असून 25 मार्च पर्यंत चाचणी न करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

आज झालेल्या एका बैठकीत उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी या सूचना दिल्या आहे, चाचणी सुलभ व्हावी यासाठी स्थानिक सरस्वती शाळा येथे 23 मार्च आणि न प कन्या शाळा येथे 24 मार्च रोजी दुपारी 1 ते 4 पर्यंत व्यावसायिकांसाठी विशेष कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही तहसीलदार यांनी सांगितले, यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी श्री आर कोवे, महिला बाल विकास अधिकारी वैशाली ढगे, न प चे प्रशासन अधिकारी, गट शिक्षणअधिकारी मुरलीधर राजनेकर उपस्थित होते. तालुक्यात काल दि 21 मार्च रोजी 20 कोरोना रुग्णाची नोंद झाली, त्यामुळे तालुक्यासोबत शहरातील कोरोना चाचणी वाढविण्याचे प्रयत्न प्रशासन करीत आहे, या शिबिरात इतर कोणालाही चाचणी करून घेता येईल या दोन सेंटर सह ग्रामिण रुग्णालयात रोज सकाळी 9 ते 12 या वेळात चाचणी सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी कोवे यांनी सांगितले. तर 25 मार्च पर्यंत तालुक्यातील सर्व व्यावसायिकांनी कोविड टेस्ट करून त्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवावे असे आवाहन तहसीलदार राजेंद्र इंगळे यांनी केले त्यानंतर सर्व दुकानांना भेट देऊन चाचणी प्रमाणपत्र तपासण्यात येणार असून प्रमाण पत्र नसणाऱ्या दुकानावर नाईलाजाने दंडात्मक कारवाई करावी लागणार असल्याचेही तहसीलदार इंगळे यांनी सांगितले.

हिंगणघाट तालुका क्रीडा संकुल मे खुली व्यायाम स्कूल

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि .22
जिल्हा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा, इनके सहयोग से हिंगणघाट तालुका क्रीडा संकुल बी.सी.ग्राऊड हिंगणघाट याहा खिलाडीओ के लिये खुली व्यायाम स्कूल।
ये खुली व्यायाम स्कूल खिलाडीओ के लिए हिंगणघाट तालुका क्रीडा संयोजक बी.एल खांडरे सर , फुटबॉल प्रशिक्षक मुस्तफा बक्श सर , कराटे , किक बॉक्सिंग , प्रशिक्षक प्रशांत लेदाडे सर इनहोणे खुली व्यायाम स्कूल की पूजा करके खिलाडीओ के लिये शुरू हो गई।

पोलिसांनी राबविली ‘वॉश आऊट’ मोहीम २ लाख ४० हजार रुपयांचा मोहा सडवा नष्ट , ठाणेदार यांनि प्रत्यक्ष हजेरीत राबविलि वाश आउट मोहिम.  

0

 

तळेगाव (शा. पंत) पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भारसवाडा शिवारातील नदिच्या काठावर गावठी दारूची निर्मिती करून त्याची परिसरातील गावांमध्ये विक्री केली जात असल्याची माहिती प्राप्त होताच तळेगाव पो स्टेचे ठाणेदार आशिष गजभिये यांनी आपल्या कर्मचारी सह सदर ठिकाणी आज वाश आउट मोहिम राबवली.
या कारवाईत मोहा सडव्या सह दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण २ लाख ४० हजार रुपयांचा मोहा सडवा नष्ट करन्यात आला.

जिल्ह्यात दारूबंदी असताना भारसवाडा शिवारात गावठी दारूची निर्मितीकरून त्याची विक्री परिसरातील गावांमध्ये केली जात असल्याने त्याचा सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागत असे. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजाणीसह ईतर समस्या लक्षात घेता ठाणेदार आशिष गजभिये यांनी प्रत्यक्ष हजेरीत भारसवाडा शिवारात गोदावरी नदिच्या काठि पिप्या मध्ये दाबुन ठेवलेल्या मोहा सडव्याचे १६० पिपे नष्ट केले.

मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदुरा येथील पत्रकारांनी केला निषेध!!

0

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

मलकापूर आजतकचे संपादक विरसिंह राजपूत यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा नांदुरा येथील पत्रकारांनी निषेध नोंदवून हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कडक कारवाई करावी, या मागणीसाठी नांदुरा येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १६ रोजी सायंकाळी ७:३०वाजेच्या सुमारास आपले वृत्तपत्रांचे कार्यालय बंद करून दूध घेण्याकरिता रूपाली दूध डेअरी कडे जात असताना माता महाकाली येथील मोहन महादेव लटके हा दारुच्या नशेत येवून त्याने तुमच्या वृत्तपत्रांत माझ्या वडिलांच्या चांगल्या बातम्या लावा असे म्हटले त्यावर नगरपालिका निवडणुकीसाठी अजून बराच वेळ आहे म्हणून त्याला समजावून सांगितले परंतु त्याने काही एक न ऐकता अश्लील शिवीगाळ करून फोन करून दहा ते पंधरा इतर मंडळी जमवून विरसिंह राजपूत यांच्यावर हल्ला केला.सदरचा हल्ला हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्रांवर हल्ला आहे हे वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी व त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी नांदुरा तालुक्यातील पत्रकार बांधवांनी केली आहे, निवेदनावर किशोर इंगळे विदर्भ प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना, तालुका अध्यक्ष अमर पाटील, दिनेश ब्राह्मणे, विजयानंद तायडे, पुरुषोत्तम भातुरकर, संतोष तायडे, राहुल खडेराव, निंबाजी बाजोडे, प्रफुल्ल बिचारे, विठ्ठल भातुरकर, देवेंद्र जैस्वाल , नजीर रजवी आदींच्या सह्या आहेत.

नगर परिषदेने जागेच्या मागणी संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची उत्तर न दिल्यामुळे सम्राट संघटनेचे संस्थापक आशिष खरात यांचे 30 मार्चपासून नगरपरिषदेसमोर बेमुदत आमरण उपोषण !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व भव्य स्मारक संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून फक्त आणि फक्त फक्त हे हिरोळे पेट्रोल पंप जवळील जागेवरच बांधण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे होत आहे !याबाबत सर्वप्रथम सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष खरात यांनी हिरोळे पेट्रोल पंपाजवळील जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळ्यासाठी व स्मारकासाठी नगरपरिषदेने द्यावी अशी मागणी केली होती ‘त्यानंतर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून तहसीलदार जिल्हाधिकारी नगर परिषदेला निवेदन देण्यासाठी विविध संघटनेचे तथा सामाजिक कार्यकर्ते सरसावले ‘परंतु या संदर्भामध्ये नगरपरिषदेने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही किंबहुना उत्तर सुद्धा दिली नाही त्यामुळे सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष बाबा खरात हे 30 मार्च पासून नगर परिषद कार्यालय बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे । जोपर्यंत नगरपरिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी जागा देत नाही तोपर्यंत सम्राट संघटना असाच लढा देत राहील असेही यावेळी अशीच खरात यांनी सांगितले आहे !

शिक्षण उपसंचालक अनिल पारधी तसेच सहसंचालक तेजराव काळे इतर सहा जणांविरुद्ध बुलढाणा पोलीस अधिक्षकाकडे अन्यायग्रस्त शिक्षक गजानन खंडारे यांची तक्रार ! …शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांची उद्धटपणाची वागणूक ! ….न्याय न मिळाल्यास कठोर निर्णय घेऊ शिक्षक खंडारे यांची शेवटचा इशारा ! शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाने पैसे घेऊन प्रकरण दाबल्याचे आरोप 

0

 

(सिंदखेड राजा)सचिन खंडारे

सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व स्वर्गीय भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालय राजेगाव येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असणारे गजानन संपत खंडारे यांनी शिक्षण उपसंचालक अमरावती श्री अनिल पारधी तसेच सहसंचालक श्री तेजराव काळे यांच्यासह कार्यालयातील श्री शेगोकार अधीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालयतसेच सूर्यकांत पवार अध्यक्ष द फ्रेंड्स एज्युकेशन सोसायटी नागपूर राहणार राजेगाव तसेच कार्यालयातील श्री युनी कनिष्ठ लिपिक शिक्षण उपसंचालक अमरावती तसेच प्राचार्य विकास सरकटे ‘या सहा जणांविरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे !त्यामुळे एकच शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली असून ‘आपल्याला गेल्या 13 वर्षापासून शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती यांच्याकडून मानसिक व शारीरिक त्रास झाला असून आता आरपारची लढाई खेळल्या शिवाय पर्याय नाही !असे मत अन्यायग्रस्त शिक्षक श्री गजानन खंडारे यांनी व्यक्त केली आहे ‘त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये या संबंधित संपूर्ण पुराव्यानिशी लेखी तक्रार दिली आहे ।त्यांनी या तक्रारीत नमूद केली आहे की ‘ते यशवंतराव चव्हाण माध्यमिक व स्व भास्करराव शिंगणे उच्च माध्यमिक विद्यालय राजेगाव येथे सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असून .वैयक्तिक मान्यतेचे प्रकरणअमरावती उपसंचालक श्री अनिल पारधी यांच्याकडे प्रलंबित आहे सदर प्रकरणात दिनांक 28 ऑक्टोंबर 2020 च्यासुनावणीच्या निर्णयाविरोधात व शाळेतील नियमबाह्य प्रकरणा विरोधात सहाय्यक शिक्षक श्री गजानन खंडारे यांनी 26 जानेवारी 2021 रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते,सदरचे अमरण उपोषण माझ्या वैयक्तीक मान्यतेच्या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी केली असून माझे प्रकरण खरे असून सुद्धा मला न्याय मिळाला नाही वास्तविक पाहता सदर शाळेमध्ये नियमबाह्य पद्धतीने नियुक्त केलेले कर्मचारी व नियमबाह्य बाबी अमरावती उपसंचालक श्री अनिल पारधी यांच्या कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिल्या त्यासंदर्भात दिनांक 7 डिसेंबर 2020 रोजी निवेदन सुद्धा दिले होते सदर नियमबाह्य व बेकायदेशीर प्रकरणे उघडकीस आणल्यामुळे गैरअर्जदार ‘शाळेचे अध्यक्ष सूर्यकांत पवार ‘व प्राचार्य विकास सरकटे ‘यांनी मी प्रकरण उजेडात आणले मुळे मला जीवाने मारून टाकण्याच्या तसेच गाडीखाली चिरडून टाकण्याच्या धमक्या दिल्या व तू फक्त शाळेच्या वाटेच्या दिशेने येते तुझी वाट लावतो असे सुद्धा म्हटले !शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयास दिलेल्या दिनांक 24 डिसेंबर 2020 27 जानेवारी 2019 च्या पत्रात मी अध्यक्ष सूर्यकांत पवार व प्राचार्य विकास सरकटे यांच्या विरोधात तक्रार देऊन सुद्धा शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी संगतमत करून प्रकरण दाबले ‘तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता श्री गजानन खंडारे यांनी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या कार्यालयासमोर कुटुंबा समवेत उपोषण केले होते परंतु अमरावती कार्यालय शिक्षण उपसंचालक मधील शिक्षण उपसंचालक अधीक्षक श्री शेगोकार व कनिष्ठ लिपिक श्री इवने ‘यांनी जर तुम्ही परत कार्यालयामध्ये आले तर तुमच्या विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार करू इतकेच नव्हे तर दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिक्षण उपसंचालक श्री अनिल पारधी यांनी मी जर उपोषणाला बसले असता त्यांनी दालनात बोलावून घेतले व धमकी दिली की तू जर तुझी उपोषण मागे घेतले नाही तर तुला जर मध्ये टाकले जाईल .तसेच शिक्षण सह संचालक तेजराव काळे यांनी सुद्धा तुला एका भाषेत समजत नाही का तो परत परत या कार्यालयात आला तर तुला शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्ह्याखाली जेलमध्ये टाकू अशी धमकी दिली वास्तविक पाहता वैयक्तिक मान्यतेचे प्रकरणे असल्यामुळे मला विचारणा करण्यासाठी वारंवार कार्यालयांमध्ये जावे लागत आहे ‘तसेही श्री गजानन खंडारे यांनी लेखी तक्रार मध्ये नमूद केले आहे !शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती मधील काही कर्मचारी हे संगत मत करून पैसे उकळून प्रकरण दाबण्याचे काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व मला न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी अन्यायग्रस्त सहाय्यक शिक्षक गजानन खंडारे यांनीजिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा यांना दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे !आता यावर पोलिस काय कारवाई करते हे बघणे औचित्याचे ठरेल तरी अन्यायग्रस्त शिक्षक श्री खंडारे यांना जर न्याय मिळाला नाहीतर आपण कठोर निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले !त्यांनी या लेखी तक्रारी च्या प्रती माननीय मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री ‘ गृहमंत्री उप अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा ठाणेदार सिटी कोतवाली पोलिस स्टेशन अमरावती यांना सुद्धा पाठवले आहेत