Home Blog Page 514

ग्रामपंचायत कार्यालय देऊळगाव माळी येथील सावित्रीबाई फुले यांना अभिवादन.

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय देऊळगाव माळी येथे स्मृतिदिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची मान्यवरांच्या हस्ते पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे सदस्य स्वप्निल गाभणे हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर डि.के काळे, गजानन गाभणे, नागोजी मगर, जयराम बकाल, केशव मगर हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून स्वप्निल गाभणे यांनी माता सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्याबद्दल उजाळा दिला. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर डि.के काळे यांनी माता सावित्रीबाई फुले नसत्या तर मुली शिकल्या नसत्या असे उद्गार यावेळी त्यांनी काढले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कार्यालयाची कर्मचारी शिवशंकर चांगाडे, गजानन खरात, संतोष मगर व आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गजानन गाभने यांनी केले.

प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव माळी येथे कोविड लसीकरण कक्षाचे उद्घाटन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा.

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

सावित्रीबाई फुले स्मृति दिनाच्या पर्वावर देऊळगाव माळी प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये covied लसीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम माता सावित्रीबाई फुले त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व नंतर
पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव यांच्या हस्ते कोविंड लसीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र सरपाते यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विषाल मगर, डॉक्टर गणेश बोरकर, डॉक्टर मिश्रा मॅडम, डॉक्टर रूहतिया मॅडम, डाॅ. रूपाली इंगळे, डाॅ प्रविण गाभणे, डाॅ. तांगडे , डाॅ होणे, व सहकारी यांनी covied लसीकरण कक्षाचे नियमाप्रमाणे अद्यतन केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सरपाते यांनी लसीकरणा बद्दल सर्व माहिती सांगितली. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विषाल मगर यांनी जनतेला लसीकरण करून घेण्याचे आव्हान केले.
लसीकरण आठवड्यातून सोमवार,बुधवार आणि शुक्रवार,तीन दिवस असणार असून लसीकरण वेळ – सकाळी 10 ते 5 तर लसीकरणासाठी वयोमर्यादा
60 वर्षापुढील व्यक्ती आणि दुर्धर आजार असलेले 45 वर्षापुढील व्यक्ती, उदा. मधुमेह,उच्च रक्तदाब, कर्करोग, अर्धांगवायु इत्यादी. असणार आहे. लसीकरण कक्षाचे उद्घाटन व सावित्रीबाई फुले जयंती प्रसंगी सर्व आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका व मान्यवर मंडळी उपस्थित होते. वरील कार्यक्रम हा कोरोणा नियमाच्या शिष्टाचार याप्रमाणे पार पाडण्यात आला.

यावल येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरूद्ध महसुल , पोलीस आणी नगरपरिषदच्या वतीने धडक कारवाई चार व्यापाऱ्यांची दुकाने केली सिल, .

0

 

, यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे ,

कोरोना विषाणु संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज तहसीलदार महेश पवार आणी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणी नगर परिषद प्रशासन यांच्या माध्यमातुन आज शहरात रस्त्यावर उतरून शासन नियमांचे पालन न करणाऱ्या विरूद्ध कारवाईची धडक मोहीमद्वारे चार व्यवसायीकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांची दुकाने सिल केली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , संपुर्ण महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणुच्या महामारीच्या आजाराने पुनश्च आपले डोके वर काढले असुन जळगाव जिलह्यात कोरोना बाधीत रूग्णांची संख्याही आटोक्यात येत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या विरूद्ध कारवाई बडगा उद्धगारला असुन , आज यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार आर के पवार , पोलीस निरिक्षक सुधीर पाटील , नगर परिषद प्रशासन चे विजय बढे , स्वच्छता अधिकारी शिवानंद कानडे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत शहरातील बुरूज चौकातील पटेल टी सेन्टर , पापुलर झेरॉक्स व स्टोअर्स , बस स्टॅन्ड परिसरातील जय हिंगलाज स्विट अँन्ड नास्ता सेन्टर या व्यवसायीकांवर पाच पेक्षा अधिक लोकांना जमविणे तसेच मास्कचा वापर न करणे अशा कोरोना नियमांचे उल्लंघन करतांना आढळुन आल्याने त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करीत त्यांच्या दुकांनासिल करण्यात आले आहे . महसुल प्रशासन , पोलीस आणी नगर परिषदच्या संयुक्त कारवाईचा यावल शहरातील बेसावध व बेशिस्त वागणाऱ्यावर या धडक कारवाईचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसुन येत आहे .

हिरोळे पेट्रोल पंपाजवळ ची जागा डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी योग्य ! – .जागा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडू – -सम्राट संघटनेचे आशिष खरात बाबा यांचा इशारा . !  

0

 

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक बुलढाणा शहरामध्ये उभे राहावे यासाठी सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष खरात बाबा यांनी हिरोळे पेट्रोल पंपा जवळ असलेली जागा नगर परिषदेने समाजबांधवांच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती ‘या मागणीची बुलढाणा जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांकडून स्वागत सुद्धा झाले होते .व क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार करता ही जागा मोठी आहे व येथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक चांगल्याप्रकारे उभी राहू शकते .व स्मारक समाज बांधवाच्या पैशातून उभी राहू शकते .अगोदर दोन्ही महामानवाचे पुतळे बसवण्यात आले तिथे तत्कालीन आमदारांनी वेगवेगळे प्रतीके उभे केले असून ते तोडून बाबासाहेबांचा पुतळा उभा करणे योग्य नाही शिवाय जागेचे क्षेत्रफळ पाहता शिव प्रेमी जनतेने जागा सदर वादग्रस्त बदलून इतरत्र जागा मिळवली आज रोजी ते काम सुरू आहे ‘हे प्रशंसनीय बाब आहे .सदर हिरोळे पेट्रोल पंपाजवळ जागा योग्य असून तसे मागणी समाज बांधव बीन प्रेमी जनतेकडून होत आहे सदर जागा न मिळाल्यास भविष्यात समाजाकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी समाज बांधवाकडून देण्यात आला आहे !

सिंदखेड राजा तालुक्यातीलअनेक शेतकरी पी .एम .किसान . योजनेपासून वंचित !राज्य तहसीलदार संघटनेचे पी एम किसान योजनेचे काम बंद असल्यामुळे !शेतकरी अडचणीत ! महसूल मंत्र्यांनी तोडगा काढण्याची शेतकऱ्यांची मागणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

शेतकऱ्यांना पी . एम . किसान योजना अंतर्गत .मिळणारे दरवर्षी सहा हजार रुपयाची मदत सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही मिळाले नसल्यामुळे . अदोगरच कोरोना महामारी मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखीनच अडचणीचा सामना करावा लागत आहे ‘त्यामुळे कृषी विभाग व तहसील विभाग यांच्या मधोमध गरीब शेतकरी भरडला जात आहे ,त्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचे अर्ज नेमके द्यायची तरी कुठे हा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे ?सिनखेडराजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचे अर्ज भरलेले असून अनेक शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळाला नसल्यामुळे त्यांनी परत आधार कार्ड ,बँक पासबुक झेरॉक्स, सातबारा, तलाठी यांचा दाखला अर्ज सोबत जोडलेला आहे,सदर अनेक अर्ज बाद होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे ‘अनेक शेतकरी भाडे खर्च करून दिवस गमावून सिंदखेडराजा तहसीलच्या पायऱ्या झिजवत आहे,परंतु महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांनी 8 – 3 -2021 रोजी पासून .पी . एम . किसान योजनेचे संदर्भातील कामे बंद करण्याचा निर्णय घेतला असून ‘त्यामुळे ी एम किसान योजनेसंदर्भातील अडीअडचणी नेमके मांडायचे तरी कुठे हा प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला आहे !याबाबत महसूल मंत्र्यांनी लक्ष घालून सदर पी एम किसान योजने संदर्भातील अडीअडचणी सोडवाव्यात अशी मागणी शेतकरी करत आहे ! — —

.. (सदर महाराष्ट्र राज्य तहसीलदार संघटना व नायब तहसीलदार संघटनेने ८मार्चपासून पी एम किसान योजनेसंदर्भातील काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे .पुढील आदेश येईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील -श्री सुनील सावंत (तहसीलदार सिंदखेडराजा ) — –

सध्या शेतकरी अडचणीत सापडला आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेत आहोत -सर्वप्रथम शेतकऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे -श्री वसंत राठोड (तालुका कृषी अधिकारी सिंदखेड राजा )

सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिलांना प्रगती करण्याची संधी- सौ .हाडोळे मॅडम  

0

 

आई जिजाऊ युवती दल व नारी शक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरीसाजरी
शेगाव: अतिशय खडतर जीवन जगत असताना सुद्धा महिलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून विरोधाचा सामना करीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले त्या मुळेच आज महिलांना सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची संधी प्राप्त झाली आहे असे प्रतिपादन येथील मुरारका हायस्कूलच्या शिक्षिका हाडोळे मॅडम यांनी केले स्थानिक धानुका कंपाऊंड जवळ कोरोना नियमाचे कडेकोट पालन करीत आई जिजाऊ युवती दल नारी शक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले स्मृतिदिन निमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी प्रमुख म्हणून उपस्थित असलेल्या शिक्षक संजय कळमकर सर यांनी सांगितले की सावित्रीबाई फुले या खरोखरच आदर्श शिक्षिका होत्या त्यांनी अनेक हाल अपेष्टा सहन करुन न डगमगता महिलांना शिक्षणाची दारे उघडी करण्यासाठी जो संघर्ष केला आहे त्याचीच परिणती म्हणून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला उच्च जिजाऊ शिक्षण घेऊन सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत पोहोचत आहेत सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्वांनी त्यांना आदरांजली वाहिली कार्यक्रमाला उपस्थित प्रेस क्लब शेगाव चे कार्यकारणी सदस्य राजकुमार व्यास आई जिजाऊ युवती दल अध्यक्ष कुमारी आयुषी दुबे नारी शक्ती संघटनेच्या सचिव सौ प्रिया जोशी सहसचिव सीमा दुबे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आकर्षण कुमारी आर्या संजय कळमकर येणे अतिशय उत्कृष्ट अशी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करून सावित्रीबाईंचे पात्र जिवंत केले यावेळी सौ रुपाली गोपाल भटकर मीनाक्षी कळमकर सौ प्रमिला कळकार सौ सुरेखा हाडोळे कुमारी आयुषी दुबे कुमारी पल्लवी पंचवटकर कुमारी पूजा कैतवास कुमारी टीना कैतवास कुमारी हेमल परियाल कुमारी श्रावणी कळमकर आदी उपस्थित होते

अपघातात जखमीना घेऊन जाणाऱ्या सोनाळा पोलीस स्टेशनच्या गाडीचा अपघात

0

 

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा बावबीर रोड वर सोनाळा विद्युत वितरण कार्यालय जवळ सोनाळा पोस्टेचे कर्मचारी व मजुर यांच्या दुचाकीची धडक होऊन जखमीना सोनाळा पोलीस ठाण्याची चार चाकी वाहन हे वरवट बकाल मार्गे शेगाव कडे जखमींना घेऊन जात असताना नेकणामपूर फाट्या नजीक रात्री ९ वाजेच्या दरम्यात अचानक रोहिला (हरिण) वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन क्रमांक एम एच २८ ,६३२३ वाहन झाडाला धडक होऊन समोरील बाजूचे टायर व कैची एक्सल तुटल्याने सदर वाहन रस्त्याच्या कडेला ब्रास शेतात घुसल्याने वाहनातील व्यक्ती किळकोळ जखमी झाले परंतु दैव्य बलवंत म्हणुन सोनाळा पो स्टे चे सहाय्यक पो उपनिरिक्षक पवार व ड्रायव्हर सह इतर बालबाल बचावले जीवित हानी झाली नाही सदर वाहनाच्या अपघाताची माहिती सोनाळा, तामगाव पो स्टे ला समजताच घटना स्थळी ठाणेदार श्रीधर गुट्टे , तामगाव पो.स्टे.जमदार माळी, इंगळे पोलीस कर्मचारी सह यांनी धाव घेऊन अपघात ग्रस्त वाहनातील जखमीना उपस्थीत असलेले शिवा खोंड , शफाकत अली , शेख नाजीम , अरुण धर्माळ, वासुदेव म्हसाळ यांच्या सहकार्याने वाहनातुन काढुन तात्काळ रुग्णवाहिका १०८ बोलावून शेगाव ला उपचार करीता पाठविण्यात आले आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा १२४ वा स्मृतीदिन जातेगांव येथे साजरी

0

प्रतिनिधी – सचिन पगारे
नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा १२४ वा स्मृतीदिन सामाजिक अंतर राखून साजरी करण्यात आला.महात्मा फुले चौकासह येथील ग्रामपालिका कार्यालयातही सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भारतातील स्त्री मुक्तीच्या व स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या, पहिल्या महिला शिक्षिका,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२४ व्या पुण्यतिथीचे आयोजन जातेगांव येथील प्रहार संघटनेकडून करण्यात आले. महात्मा फुले चौक येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस भारतीय सैन्यदलातील जवान रविंद्र पगारे यांनी सपत्नीक पुष्पहार अर्पण केला व महात्मा फुलेंच्या पूतळ्यास नवनियुक्त उपसरपंच पंढरीनाथ वर्पे यांनी पुष्पहार अर्पण केला.नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार,संदिप पवार,बाळू लाठे,संतोष गायकवाड,कारभारी खिरडकर,सागर पगारे,दिपक पगारे, सोमनाथ जाधव आदींनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमेस अभिवादन केले.तसेच पिनाकेश्वर देवस्थानचे विश्वस्त बंडू पाटील, पंढरीनाथ पवार,माजी उपसरपंच नारायण पवार,शरद पवार, सोसायटी चेअरमन गोटू पवार,भरत गायकवाड,गुलाब पठाण,माजी सैनिक शरद पवार,अनिल पवार, सोपान खिरडकर,दारासिंग बिडे व पत्रकार ईश्वर जाधव यांनी प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली.यावेळी गौरी झोडगे या चिमुकलीने सावित्रीबाई फुलेंना समर्पित सुंदर कवितेचे गायन केले.याठिकाणी विविध मान्यवर व समस्त भजनी मंडळासह ग्रामस्थ आदी सामाजिक अंतर राखून उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रहार संघटनेचे जनार्दन भागवत, चंद्रभान झोडगे,वैभव शिंदे,रविकांत भागवत,बापू पगारे,शिवा पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले.

 

 

राज्यातील अपंगांनी मुख्यमंत्री निवास स्थान मातोश्री चा घेराव आंदोलन सहभागी व्हा

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अपंग नेते शेख अनिस पत्रकार हे करणार घेराव आंदोलन चा नेतृत्वात
———————————————————
अमरावती – : अपंग जनता दल ही एक अ राजकीय सामाजिक संघटना असून या संघटना चा माद्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अपंग हक्क अधिनियम 2016 चा नवीन कायद्याची सक्तीने अंमलबाजणी व्हावी म्हणून सतत आंदोलन सुरु असून सुद्धा राज्य सरकार या कडे दुर्लक्ष करत आहे अनेक वेळा पत्र दिले तरी सुद्या हरगर्जी पणा सरकार करत आहे व अपंगांची दिशा भुल करत आहे अपंगांचा हक्का चा कायदा हा सक्तीने राज्यात लागू झालं पाहिजे व अपंगांचा जलद गतीने विकास झाला पाहिजे व अपंगांना त्वरीत न्याय व हक्क मिळाले पाहिजे यासाठी केंद्र सरकारचा अपंग हक्क अधिनियम 2016 नविन कायदा राज्य शासनाने सक्तीने लागू करावा यासाठी अपंग नेते तथा संस्थापक अध्यक्ष मा . शेख अनिस पत्रकार याच्या नेतृत्वात मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकारे साहेब याचा निवास स्थान मातोश्री मुंबई ला दिनांक 15 मार्च 2021 रोजी टिक 1 वाजता अपंगांचा घेराव करण्यात येणार आहे अशी माहिती अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र अमरावती विभागीय उपाध्यक्ष शेख बबू. राजिक शाह. मयूर मेश्राम (अमरावती ) शेख शकील ( बुलठाणा ) दीपक जाधव (यवतमाळ ) करामत शाह (अकोला )शारदा आवडे (वाशीम ) जहिर खान. प्रभाकर राऊत यांनी बैठकितून राज्यातील अपंगांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे

दहिगाव शिवारात सर्पमित्र सरपंच बाळु अडकमोल यांनी पकडला बारा फुटी अजगर शेतकऱ्यांनी मानले आभार

0

 

,यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

,तालुक्यातील दहीगाव शिवारातील लीलाधर बादु पाटील यांचे झापेल नाल्याच्या लगत असलेल्या गव्हाच्या शेतात बारा फुटी अजगर आढळल्याने गहू काढणाऱ्या मध्ये घबराट निर्माण झाली शिताफीने सर्पमित्र सरपंच अजय बाळू अडकमोल यांनी पकडून सातपुड्याच्या जंगलात सोडले आहे . येथून जवळच असलेल्या सातपुडा कडे जाणाऱ्या मार्ग या मार्गावरील झापेल नाल्याच्या लगत असलेल्या शिवारात लीलाधर बाळू पाटील यांचे शेतात गहू काढण्याचे मशीन गेले असता बांदा लगत गव्हात अजगर दडलेला होता मशीनचा आवाज आल्याने हा अजगर गावातून बाहेर निघायला लागतात मजुरांना तो दिसून आला तत्काळ सर्पमित्र येथील सरपंच अजय बाळू अडकमोल यांना मालकांनी भ्रमण दूरध्वनीवरून कळविले अडकमोल तात्काळ तिथे पोचताच त्यांनी आज घराला पकडले व त्यांनी रीतसर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले पकडलेला अगोदर त्यांनी नागा देवी पाझर तलावात नेऊन सोडला आहे नवनिर्वाचित सरपंच पदावर असतानाह विषारी सर्प वजनदार पकडून जंगलामध्ये सोडून देत आहेत व संबंधित व्यक्तींवर निर्माण झालेला घबराटीचे कमी करीन आहे याबाबतची माहिती त्यांनी वन विभागाचे अधिकारी विशाल कुठे यांना दिली त्यांच्या सांगितल्यावरून त्यांनी पकडलेल्याचे कळाले असुन या कामा त्यांना सहकारी मित्रांनीही सहकार्य केले .