Home Blog Page 519

निमगाव येथील वय वर्षे२९या यूवकाने गळफास घेउन आत्महत्या केली

0

 

सुनील पवार, नांदुरा. ता.प्र.

नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील. 29 वर्षीयनिळु भगवान ईगळे या युवकाने आपल्या राहत्या घरात पाळण्याच्या दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली त्याला एक मुलगा आहे त्याचे पछात दोन भाउ आईवडील असा आप्त परिवार आहे त्याचे मृत्यूचे कारण अद्याप समजले नाही नांदुरा पोलीस्टेशनचे बिट जमदार ईगळे साहेब पूढील तपास करीत आहेत

धरणगाव तालुका तलाठी अध्यक्ष म्हणून साखरखेर्डा येथील सुमित गवई यांची निवड ‘

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील रहिवासी असलेले सुमित ज्ञानेश्वर गवई यांची जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तलाठी संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला त्यावर सुमित गवई यांची बिनविरोध निवड करण्यात आली ‘यावेळी सचिव वीरेंद्र सोनकांबळे उपाध्यक्ष मीना शिरसाठ सहसचिव बालाजी लोंढे संघटक बसवेश्वर मजने सल्लागार गणेश बिराडे ( भाऊसाहेब मंडळ अधिकारी ।खजिनदार अल्ताफ पठाण ।सदस्य भागवत पवार सचिन कलोरे ‘पल्लवी इंगळे प्रज्ञा खंडेराव कांचन वाणी मनिषा पोटे ‘यांची सुद्धा एकमताने निवड करण्यात आली ‘जिल्हा संघाच्या पुढील कार्यकारणी साठी तालुक्यातून प्रशांत पाटील यांची प्रतिनिधी म्हणून एकमताने निवड करण्यात आली ‘सुमित गवई यांची तालुकाध्यक्षपदी निवड होताच साखरखेर्डा येथे त्यांच्या मित्रपरिवाराने आनंद व्यक्त केला आहे .

भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी हिरोळे पेट्रोल पंपा शेजारी नगर परिषदेच्या मालकीचे जागा मिळावी,

0

 

सम्राट चे अध्यक्ष आशिष खरात यांचे नगर परिषदेला निवेदन ।

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्याच प्रमाणे यापूर्वी सन 1996 – 97 च्या काळात बुलढाणा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता,मात्र कला संचालन विभाग पुणे यांनी दोन्ही महामानवांचे पुतळे दोषपूर्ण असल्याचा निर्वाळा दिला होता प्रमाणपत्रही दिले होते ‘त्यानंतर जिल्हा परिषद यांनी ते दोन्ही महामानवांचे पुतळे हटवले होतेत्यानंतर दोन्ही महामानवांचे पुतळे बुलढाणा शहरामध्ये बसण्यात यावे यासाठी विविध संघटना विविध सामाजिक कार्यकर्ते आंदोलने करीत आहेत मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही,ही शोकांतिका म्हणावी लागेल,छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी अनेक आंदोलने शिवप्रेमींनी केली व त्यांच्या आंदोलनाला यश आल्याचे आज दिसत आहे .त्याच प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सुद्धा बुलढाणा शहरामध्ये उभारला तर बुलढाणा शहरामध्ये दोन्ही महामानवांचे पुतळे बसून एक वेगळेपण येईल ‘ व सौंदर्यत यामध्ये सुद्धा भर पडेल,बुलढाणा शहरातील भीम अनुयायी यांची मागणी आहे की बुलढाणा शहरामध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा सध्या बुलढाणा शहरात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी निधी जमा करण्यासाठी भीम अनुयायी प्रयत्नशील आहेत तसा निधी सुद्धा जमा होईल यात शंका नाही ‘म्हणून हिरोळे पेट्रोल पंपाच्या शेजारील बुलढाणा नगर परिषदेच्या मालकीची असलेली जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यासाठी समाज बांधवांना द्यावी ‘अशी मागणीसुद्धा यावेळी सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आशिष खरात यांनी दिनांक 3मार्च रोजी नगरपरिषद ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

डिग्रस रेती घाट अवैध रेती तस्कराचा बालेकिल्ला ! रेती तस्करी रोखण्याच महसूल विभागाला खुले आव्हान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे

सिंदखेड राजा तालुक्याची सीमाभाग लगत आणि देऊळगाव राजा तालुक्यात येत असलेल्या डिग्रस हे गाव या गावानजीक पूर्णा नदी वाहते या नदीत असलेली रेती अक्षरशः अवैध रेती तस्करासाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरलेली आहे या घाटात हजारो ब्रास असा नंबर एकचा रेती साठा प्रचंड आहे मात्र या भागात असलेल्या रेती तस्कराच्या दहशतीमुळे अद्याप पर्यंत या घाटाचा लिलाव झालेला नाही अर्थात कोणी हा घाट घ्यायची हिंमत दाखवत नाही या रेती घाटावर जाण्यासाठी तस्करानी अनेक चोरटे रस्ते बनविलेले असल्याने महसूल प्रशासनाला रेतीच्या गाड्या पकडणे फार अवघड झाले आहे घर का भेदी लंका ढाके या उक्ती प्रमाणे महसूल विभागातील काही कर्मचाऱ्याचे अर्थपूर्ण लागेबांधे या तस्करासोबत असल्याने साहेब येणार आहेत साहेबाचे लोकेशन माहिती याची टीप लगेच तस्करांना मिळत असल्याने या रेती तस्करांच्या मुसक्या आवळने पर्यायी अवैध रेती उत्खनन बंद ठेवने हे सर्वात मोठे आव्हान महसूल विभागा समोर उभे असून जिल्हाधिकारी आणि पोलीस विभागाने जर संयुक्त कारवाई केली तरच या घाटावरीलअवैध रेती तस्करी बंद होऊ शकते अन्यथा या तस्करांच्या मुसक्या आवळने प्रशासनासमोर एक आव्हानच राहनार आहे
महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून या डिग्रस घाटातुन बिनबोभाटपणे अवैध रेती तस्करी सुरू असते देऊळगाव मही ते मलकापूर पांग्रा रस्त्यावर देऊळगाव मही पासून थोडया अंतरावर आडवळणी डिग्रस हे गाव आहे या गावात रेती तस्कर ठाण मांडून बसले आहेत गावात जवळपास चाळीस ते पन्नास अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर गाड्या आहेत रेती घाटावर जाण्यासाठी रेती तस्करांनी अनेक छुपे मार्ग बनवले आहेत येथील रेती घाटाचा लिलाव न झाल्याने या पॉईंट वर महसूल विभागाने एक तलाठी दोन कोतवाल ऑन ड्युटी तैनात ठेवले आहेत संध्याकाळी सहा वाजता त्यांची ड्युटी संपली की तलाठी घरी जातात आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू होते रेती तस्करीला सुरुवात तलाठी घरी गेले की सायंकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान रेती घाटावर स्टॉक केलेली रेती टिप्पर मध्ये जेसिबी च्या साह्याने भरल्या जाते त्यानंतर रेतीच्या गाड्या विक्री साठी पाठविल्या जातत् त्यानंतर 9 वाजेच्या दरम्यान रेती तस्कर नदी पात्रात किनी असलेले ट्रॅक्टर लावून सकाळी तीन वाजेपर्यंत रेती पाण्यातून उपसून बाहेर काढून नदी काठावर त्याचा पुन्हा साठा केल्या जातो त्यानंतर सकाळच्या चार वाजे दरम्यान रेती जेसीबी द्वारे टिप्पर मध्ये भरून पुन्हा त्या गाड्या रेती विक्री साठी पाठविली जातात या रेती तस्करा कडे स्वतःच्या गाड्या आणि त्या भरण्यासाठी स्वतःच्या जेसीबी मशीन तसेच रेती बाहेर काढण्यासाठी किनी असलेले ट्रॅक्टर स्वतःचेच आहेत प्रत्येकाची यंत्रणा स्वतंत्र असल्याने अवैध रेती तस्करीला मोठ्या प्रमाणात सुरु होते गाडी भरून पाठवले की त्या गाडीच्या समोर तस्कराचे चार चाकी वाहन जीप जाऊन थांबते आणि समोर कोणी अधिकारी आला आहे का याची खातरजमा केली जाते लोकेशन घेतले जाते आणि कोणी तहसीलची गाडी आली की लगेच मोबाईलद्वारे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकास त्या संदर्भात माहिती दिले जाते तर काही ठिकाणी महसूल कर्मचारी समोर साहेब आहेत आता येऊ नका असा मेसेज रेती तस्कराना देतात त्यामुळे रेती तस्कर चा धंदा बिनधास्तपणे सुरू असतो या अवैध रेती उत्खनमुळे मुळे पर्यावरणाची तर मोठ्या प्रमाणात हानी तर होतेच मात्र शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडत आहे या रेती तस्करांनी कायद्याचा लाभ उठवत उपसा केलेल्या रेतीचा साठा शासकीय जमिनीवर करून ठेवतात त्यामुळे जर एखाद्या वेळी महसूल विभागाने अवैध साठा केलेली रेती पकडली तर तिचा मालक कोण आहे तो भेटत नाही त्यामुळे कुणावर गुन्हा दाखल होत नाही त्यामुळे रेती तस्कर कायद्याच्या चपाट्यातून निसटून जातात आणि पर्यायाने महसूल विभाग त्या साठवलेल्या रेतीचा लिलाव करतात त्यामुळे सदर रेती तस्कर त्या लिलाव केलेल्या रेतीची हर्रशी घेऊन त्या पावतीवर पुन्हा मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी करतात या नदीवर रेती तस्करीसाठी 2 ते 3 पॉईंट आहे त्यामुळे महसूल विभागाने कितीही पकडण्याचे प्रयत्न केले तरी हे तस्कर जाळ्यात येत नाहीत त्यामुळे डिग्रस पॉइंट रेेती च्या तस्करी साठी सोन्याची अंडे देणारी कोंबडी ठरला आहे या ठिकाणी रेती अवैध रेती तस्करच्या मुसक्या आवळण्यासाठी एकट्या-दुकट्या कर्मचाऱ्यांचे काम नसून त्यासाठी पोलीस विभाग आणि महसूल प्रशासनाच्या टीम ने संयुक्तरित्या कारवाइ केली तरच खर्‍या अर्थाने रेती तस्करी बंद होऊ शकते अन्यथा महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून अवैध रेती तस्करी बिनधास्तपणे आणि बिनबोभाटपणे सुरूच राहील यात तिळमात्र शंका राहनार नाही
Box
तलाठ्याने दिली रेती तस्कराला पत्रकार आल्याची माहिती
दिग्रस रेतीघाट पॉइंटवर पत्रकारांची एक टीम ऑन दी स्पॉट रेती तस्करी पाहण्यासाठी गेले असता रेती तस्करांचे लोकेशन वर असलेल्या खबऱ्यांनी पत्रकार आले आहेत याची माहिती लगेच रेती तस्करांना दिली दरम्यान पत्रकार नदीवर गेल्यावर त्या ठिकाणी पलीकडच्या तीरावर तलाठी बसले होते त्यांनी लगेच पत्रकार आले आहेत तुम्ही गाड्या भरू नका अश्या सूचना तस्कराना आपल्या मोबाइल वरून दिल्या त्यामुळे रेती तस्कराची किती अलर्ट यंत्रणा आहे हे दिसून येते सर्वच यंत्रणा तस्करावर जवळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे खऱ्या अर्थने रेती तस्कराच्या मुसक्या आवळणे महसूल विभागा समोर मोठे आव्हान उभे टाकले आहे ‘

महाराष्ट्र शासनाच्या कामाचे फलक मराठीत करण्यात यावे- मनसेची मागणी

0

 

गोदिया-शैलेश राजनकर

गोंदिया- महाराष्ट्र राज्यात राहणारे मराठी भाषिक अधिकारी असतांना सुध्दा गोंदियातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नगर परिषद कार्यालया मार्फत जिल्ह्यात होत असलेल्या कामाचे उटघाटन, व लोकार्पणाचे फलक हे हिंदी भाषे मध्ये असल्याचे निदर्शनास येत आहेत, आपले कार्यालय हे मध्यप्रदेश, किंवा छत्तीसगढ या राज्यात नाही, महाराष्ट्र राज्यात आहे, व महाराष्ट्राची मातृभाषा हि मराठी आहे, व जनहितार्थ कामे सुध्दा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होतात, करीता या नंतर आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून होत असलेल्या कोणत्या हि प्रकारच्या कामाचे उटघाटन किंवा लोकार्पण फलक हे फक्त मराठी भाषेतच असायला पाहिजे, याचात समनधीत अधिकाऱ्याला व ठेकेदारांना कार्यालय मार्फत कामाचे उदघाटन, लोकार्पणाचे फलक हिंदी भाषेत न लावता मराठीत असावे हि जाणीव असायला हवी होती. कारण महाराष्ट्रात राहून मराठी भाषेत अपमान शासनाच्या अधीन असणारे अधिकारी करीत असतील तर याला लाचारी म्हणावे लागणार, ज्या ज्या ठिकाणी लागलेले हिंदी भाषिक फलक मराठीत करण्यात यावे. आम्हाला हिंदी भाषेत फलक हिंदी भाषेत फलक दिसल्यास त्या फलकाला काळ लावण्यात येईल, व जे.ई.च्या तोंडाला सुध्दा काळ फसल्या जाईल, व मराठी भाषे बद्दल द्वेष असल्यामुळे हिंदी भाषेचं वापर करीत असल्यास गुणा दाखल करण्यात येईल. मराठी भाषिक अधिकारी व महाराष्ट्रात राहत असल्यावर सुध्दा जवाबदारी त्यांची जवाबदारी आहे, आपली मराठी भाषा टिकून रहावी करीता आपल्या भाषेला प्रथम प्राधान्य दिला जावे. करिता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया तर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग, जि.प. कार्यालय, नगर परिषद, यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश कुमार मिश्रा, तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, शहर अध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, व सर्व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध अल्पवयीन मुलीची पोस्टेला तक्रार…

0

 

जळगांव जा.प्रतिनिधी:-

स्थानिक जळगाव जामोद शहरातील चौभारा चौक काळपांडे हॉस्पिटल जवळील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली की सूर्यवंशी नगर येथील शुभम गजानन कपले हा तरुण नेहमी शासकीय तंत्रज्ञान माध्यमिक शाळा जुने बस स्टँड जळगाव जामोद तसेच शिकवणुकीला गुरुमाऊली ऍकॅडमी येथे जात असताना शुभम कपले हा नेहमी त्या तरुणीचा वाईट उद्देशाने पाठलाग करीत असे.सदर आरोपी शुभम कपले हा तरूणीला धमकी देत म्हणायचा की तु माझे सोबत बोलत जा.नाही बोललीस तर त्या तरुणीला व तिच्या घरच्यांना एखाद्या दिवशी चाकु मारून जिवाने मारून टाकीन अश्या प्रकारच्या धमक्या सदर आरोपी त्या तरूणीला देत असे.15 फेब्रुवारी रोजी तरुणांनी एकटि असल्याचे पाहत तरूणीच्या घरात घुसून तिचा वाईट उद्देशाने हात पकडला असता तरूणीने आरडाओरडा केल्याने सदर तरूणीचे आई वडील मोठी बहीण यांच्यासह तरूणीचा आवाज ऐकून शेजारीहि धावत आले.तेव्हा आरोपीने धमकी देत आतापर्यंत मी तुझा रस्ता अडवला व तरूणीला मारण्याच्या धमक्या दिल्या वैजापूर या कुटुंबाला अडकवतो असे म्हणून आरोपी तिथून निघुन गेला. सदर तरुणी जी समाजात बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी रिपोर्ट दिला नव्हता परंतु आरोपीने अति केल्याने जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला येऊन सदर तरुणीने तोंडे रिपोर्ट दिला आहे सदर तरुणीची फिर्याद ऐकून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम ३५४,३५४डी,४५२,५०६ बालकाचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार कलम ८,१२ नुसार सदर आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशन करीत आहे.

कॅच द रेन अभियान जनजागृती पोस्टर्सचे विमोचन

0

 

अजहर शाह मोताळा

बुलडाणा:-भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालय व युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्र बुलडाणा व्दारा कॅच द रेन अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे. कॅच द रेन अभियाना संदर्भातील जनजागृती पोस्टर्स चे विमोचन जिल्हाधिकारी एस. राममुर्ती यांच्याहस्ते 26 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, येथे करण्यात आले. या प्रसंगी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजयसिंग राजपूत व क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जतन करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे श्री. डागर यांनी यावेळी सांगितले.

कर्तव्याची जाणीव ठेवत नि:स्वार्थ निष्काम सेवा देणारे सहाय्यक गटविकास अधिकारी तुकमान तडवी यांचा आज निवृत्ती सोहळा संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे,

आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवुन नि:स्वार्थ, निष्काम सेवेने कार्य करणारे व माणुसकी जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सर्वप्रिय यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमान तडवी असे गौरवद्धगार आज त्यांच्या सेवा निवृत्तीपर कौटुंबीक सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले . यावल पंचायत समितीच्या सभागृहात आज दिनांक २ मार्च रोजी यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमान आय तडवी यांचा सपत्नीक सेवापुर्ती निरोपाचा सोहळा भावनिक व अत्यंत साधा पद्धतीचा कौटुंबीक कार्यक्रम गटविकास अधिकारी डॉ . निलेश एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्राम पंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे यांनी केले कार्यक्रमास ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव के.टी. तळेले , कृषी अधिकारी डी .पी कोते , प्रशासन अधिकारी आर .व्ही . जोशी , राष्ट्रपती पुरस्कार विजेते ग्रामसेवक मजीत अरमान तडवी, लक्ष्‍मण महाजन राजू तडवी, रूपाली तळले ांच्यासह ग्रामसेवक मंडळी याप्रसंगी उपस्थित होते .दरम्यान यावल येथे पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमान आय तडवी हे मुळचे हरिपुरा तालुका यावल येथील रहीवासी असुन जळगाव येथे १९८२ साली त्यांनी पशुसंवर्धन विभागात कर्मचारी म्हणुन आपल्या शासकीय सेवेची सुरुवात केली, आदीवासी कुटुंबात जन्मास आलेले व अत्यंत गरिबीच्या प्रसंगातुन त्यांच्या आई वडीलांनी कुटुंबाने मेहनतीने कष्ठ करून आमचे शिक्षण पुर्ण करून आम्हास आत्मनिर्भर केले, आई वडीलांचे आर्शिवाद आणी आज सेवानिवृती होत असलेले आमचे जेष्ठबंधु लुकमान तडवी यांच्या मार्गदर्शनानेच आम्ही आज ईथ पहोचल्याचे मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या कुटुंबातील कनिष्ठ बंधु जे .आय . तडवी सर यांनी आपल्या बालपणी जीवनाच्या आठवणींना उजाळ दिला व या निरोप समारंभा प्रसंगी सर्व उपस्थितांचे डोळे अश्रुंनी पाणावले आणी निरोप सोहळा अत्यंत भानिक झाला . याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील , पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी आर .व्ही .जोशी ग्रामविकास अधिकारी के जी पाटील आदीनी आपले मनोगत व्यक्त करून सेवानिवृत्त तडवी यांच्या कार्याचे गौरव या निरोपा सोहळ्यात व्यक्त केलीत. सर्व उपस्थितांचे आभार एन.पी. वैराळकर यांनी मानले.

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण ; तिघांवर गुन्हा दाखल ,

0

 

संग्रामपूर – तालुक्यातील आदिवाशी भागातील आलेवाडी येथील एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून सन 2017 पासून तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगून घरी नेले व लैंगिक शोषण करून लग्न न करता जीवे मारण्याची धमकी दिली यावरून पिडित युवतीने दिनांक ०१/ मार्च /२०२१ रोजी सोनाळा पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यावरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
प्राप्त माहिती अशी की संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी येथील एका पिडित युवतीने काल दिनांक १/ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरा दरम्यान सोनाळा पोलिस स्टेशनला तक्रार दिली की गावातीलच आलेवाडी येथील आदिल सुरत्ने याने २०१७ पासून वेळोवेळी चोरून लपून त्याच्या घरी माझे मर्जी व इच्छेविरुद्ध माझ्यासोबत लग्न करायचे आहे असे सांगून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत त्याच अबूजर सुरत्ने व आबिद सुरत्ने हे सुद्धा मदत करीत असत त्यानंतर २९/जुलै/ २०१९रोजी मला लग्नाचे आमिष दाखवून त्याचे घरी नेऊन ठेवले त्या वेळीसुद्धा माझे मर्जीविरुद्ध शारिरीक शोषण मला जीवे मारण्याची जिवे मारून टाकण्याची धमकी दिली त्यावेळी सुद्धा दोघांनी मदत केली ही बाब माझ्या घरच्यांना माहिती पडल्यानंतर सोनाळा पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली त्यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी आदिल सोबत लग्न लावून देण्याचे सांगून तक्रार देण्यापासून परावृत्त केले त्यानंतर 30 /जुलै/ २०१९ ला आदिल याने नोटरी करून दिली होती त्याप्रमाणे मध्यस्ती यांचे सांगण्यावरून दिनांक २/ जानेवारी/ २०२० रोजी लग्न करण्याचे आश्‍वासन दिले होते परंतु तो हजर झाला नाही त्यास त्याच्या कुटुंबीयांचे पाठबळ आणि पाठबळ दिले अखेर सदर पिडीत युवतीने दिनांक १/ मार्च /२०२१ रोजी सोनाळा पो.स्टे. तक्रार दिल्यावरून आदिल अब्बास सुरत्ने ,अबुजर अब्बास सुरत्ने ,आबिद अब्बास सुरत्ने रा. आलेवाडी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार ३७६(२),(n) ,५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्या होणार जळगाव जामोद पंचायत समिती सभापती पदाची निवड

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जामोद पंचायत समिती सभापती पदी भाजपाच्या सौ रंजनाताई ठाकरे यांनी 8 फेब्रुवारीला आपला राजीनामा मनिषाताई पवार यांच्याकडे सुपूर्त केला होता तो त्यांनी मंजूर केला त्यामुळे जळगाव जामोद पंचायत



समिती सभापती पद रिक्त झाले आहे त्यादृष्टीने उद्या दिनांक तीन मार्च रोजी जळगाव जामोद पंचायत समिती कार्यालय येथे सभापती पदाची निवडणूक होणार आहे 10 ते 12 या वेळेत गटविकास अधिकारी पंचायत समिती जळगाव जा यांचेकडे अर्ज दाखल होणार आहेत व दोन वाजता सभापती पदाची निवडणूक होणार आहे तरी सभापती पदी कुणाची वर्णी लागणार आहे याकडे जळगाव जामोद तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे