Home Blog Page 520

राज्यातील अपंगांनी मुख्यमंत्री निवास स्थान मातोश्री चा घेराव आंदोलन सहभागी व्हा

0

 

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अपंग नेते शेख अनिस पत्रकार हे करणार घेराव आंदोलन चा नेतृत्वात
———————————————————
अमरावती – : अपंग जनता दल ही एक अ राजकीय सामाजिक संघटना असून या संघटना चा माद्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अपंग हक्क अधिनियम 2016 चा नवीन कायद्याची सक्तीने अंमलबाजणी व्हावी म्हणून सतत आंदोलन सुरु असून सुद्धा राज्य सरकार या कडे दुर्लक्ष करत आहे अनेक वेळा पत्र दिले तरी सुद्या हरगर्जी पणा सरकार करत आहे व अपंगांची दिशा भुल करत आहे अपंगांचा हक्का चा कायदा हा सक्तीने राज्यात लागू झालं पाहिजे व अपंगांचा जलद गतीने विकास झाला पाहिजे व अपंगांना त्वरीत न्याय व हक्क मिळाले पाहिजे यासाठी केंद्र सरकारचा अपंग हक्क अधिनियम 2016 नविन कायदा राज्य शासनाने सक्तीने लागू करावा यासाठी अपंग नेते तथा संस्थापक अध्यक्ष मा . शेख अनिस पत्रकार याच्या नेतृत्वात मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकारे साहेब याचा निवास स्थान मातोश्री मुंबई ला दिनांक 15 मार्च 2021 रोजी टिक 1 वाजता अपंगांचा घेराव करण्यात येणार आहे अशी माहिती अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र अमरावती विभागीय उपाध्यक्ष शेख बबू. राजिक शाह. मयूर मेश्राम (अमरावती ) शेख शकील ( बुलठाणा ) दीपक जाधव (यवतमाळ ) करामत शाह (अकोला )शारदा आवडे (वाशीम ) जहिर खान. प्रभाकर राऊत यांनी बैठकितून राज्यातील अपंगांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे

दहिगाव शिवारात सर्पमित्र सरपंच बाळु अडकमोल यांनी पकडला बारा फुटी अजगर शेतकऱ्यांनी मानले आभार

0

 

,यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

,तालुक्यातील दहीगाव शिवारातील लीलाधर बादु पाटील यांचे झापेल नाल्याच्या लगत असलेल्या गव्हाच्या शेतात बारा फुटी अजगर आढळल्याने गहू काढणाऱ्या मध्ये घबराट निर्माण झाली शिताफीने सर्पमित्र सरपंच अजय बाळू अडकमोल यांनी पकडून सातपुड्याच्या जंगलात सोडले आहे . येथून जवळच असलेल्या सातपुडा कडे जाणाऱ्या मार्ग या मार्गावरील झापेल नाल्याच्या लगत असलेल्या शिवारात लीलाधर बाळू पाटील यांचे शेतात गहू काढण्याचे मशीन गेले असता बांदा लगत गव्हात अजगर दडलेला होता मशीनचा आवाज आल्याने हा अजगर गावातून बाहेर निघायला लागतात मजुरांना तो दिसून आला तत्काळ सर्पमित्र येथील सरपंच अजय बाळू अडकमोल यांना मालकांनी भ्रमण दूरध्वनीवरून कळविले अडकमोल तात्काळ तिथे पोचताच त्यांनी आज घराला पकडले व त्यांनी रीतसर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले पकडलेला अगोदर त्यांनी नागा देवी पाझर तलावात नेऊन सोडला आहे नवनिर्वाचित सरपंच पदावर असतानाह विषारी सर्प वजनदार पकडून जंगलामध्ये सोडून देत आहेत व संबंधित व्यक्तींवर निर्माण झालेला घबराटीचे कमी करीन आहे याबाबतची माहिती त्यांनी वन विभागाचे अधिकारी विशाल कुठे यांना दिली त्यांच्या सांगितल्यावरून त्यांनी पकडलेल्याचे कळाले असुन या कामा त्यांना सहकारी मित्रांनीही सहकार्य केले .

जंगलात आग लावणा-यांचा शोध घेण्यासाठी वन विभाग हे ड्रोन कॅमे-याची मदत घेणार-उप वनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा

0

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

वन विभागामार्फत जंगलात आग लावणा-या संशयितांचा शोध घेण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा यांनी दिली आहेत.
वन विभागामार्फत जंगलातील वनवा विषयक विविध उपाययोजना करण्यात येत असून अत्याधुनिक ड्रोन तंत्राद्वारे देखरेख ठेवण्याबरोबरच स्थानिक रहिवासी व आदिवासी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी नियमित बैठका भीतीचित्रे ध्वनिमुदफीती द्वारे जनजागृती करण्यात येत आहेत. वनवा नियंत्रणाकामी अग्निप्रतिबंधक मजुरांची संख्या वाढविण्यात आलेली आहे. वनवा लावणाऱ्या संशयितांना पकडून देणाऱ्यास पाच हजार रुपये इतके बक्षीस जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या लगत जंगलात आग लागणार नाही त्या समितीस अकरा हजाराचे पारितोषिक जाहीर करण्यात येत आहेत. वनवा नियंत्रणासाठी स्थानिक रहिवाशांच्या सक्रिय सहभागासाठी वन विभागाकडून विनम्र आवाहन करण्यात येत आहेत स्थानिक लोकप्रतिनिधीमध्ये वन विषयक संवेदनशीलता निर्माण करून जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत आहेत वनवा नियंत्रणासाठी फायर ब्लोअर ग्रास कटर या मशिनद्वारे जाळ रेषांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. जंगल गोष्टीसाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची देखील मदत घेण्यात येत आहे. राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी वनसंरक्षण तथा जंगल वस्तीसाठी तैनात केली आहेत. वन व नियंत्रणासाठी शीघ्र प्रतिसाद पथके तयार केली असून आरोपी शोध व कारवाई करण्यात येत आहे अस्थाई संरक्षण कॅम्प उभारून वनवा देखरेख नियंत्रण व निगराणी करण्यात येत आहे. गस्ती पथक द्वारे जंगल क्षेत्राचे गोष्टीचे नियोजन वाढविण्यात आलेले आहेत अग्नि संवेदनशील परिसरात गौन वनोपजाचा संकलन व विक्रीवर निर्बंध घालण्याबाबत गंभीर विचार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

स्थानिक रहिवाशांनी वनवा विषयक माहिती नजीकच्या स्थानिक वन कर्मचारी, अधिकाऱ्यांना देऊन वनवा नियंत्रणासाठी सक्रिय सहकार्य करावे. वनक्षेत्रात पर्यटनावेळी पर्यटकांनी जबाबदारीचे भान ठेवावे.
*वणव्याची कारणे*
जंगलात महू व उत्पादन अधिक लालसेने, गुराखी पुढील हंगामात अधिक गवत उत्पादन होणेच्या अंधश्रद्धेमुळे, लगतच्या भागातील शेत बांधावरील राब जाळणे, नकळत जंगलाच्या दिशेने ठिणगी उडाल्यास, वन्य प्राण्यांच्या शिकार करण्याच्या उद्देशाने, पर्यटक अभ्यागाच्या निष्काळजीपणाने ज्वलनशील पदार्थ वनक्षेत्रात फेकल्याने व अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने होतात.

तसेच वणव्याचे परिणाम मौल्यवान वृक्ष संपदेचा व पर्यावरणाचा ऱ्हास, जैवविविधतेची अपरिमित हानी, वन्यजीव व त्यांच्या आदिवासाची हानी होणे, तसेच जमिनीची धूप व उत्पादकता कमी होणे आणि आदिवासी बांधवांच्या दैनिक जीवन मनावर विपरीत परिणाम होणे व मानव-वन्यजीव संघर्ष असे परिणाम होतात.
तसेच जंगलात ज्वलनशील पदार्थ फेकू नये अथवा जवळ ठेवू नये आणि असे करणाऱ्या प्रवृत्तीस परावृत्त करावे व वनालगतच्या परिसरात अथवा वनात वनोपज संकलित करतांना पालापाचोळा जाळू नये रात्री उजेडासाठी थेंबाऐवजी बॅटरी घेऊन जावे वनालगत शेती बांधावरील काडीकचरा निष्काळजीपणाने जाळू नये अशा प्रकारची काळजी करणे गरजेचे आहे . असेही पद्मनाभा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

कोरोना अलर्ट : प्राप्त 1885 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ तर 579 पॉझिटिव्ह • 392 रूग्णांना मिळाली सुट्टी

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा:-दि.9: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2464 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1885 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 579 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 520 व रॅपीड टेस्टमधील 59 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 1512 तर रॅपिड टेस्टमधील 373 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1885 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : शेगांव शहर : 57, शेगांव तालुका : माटरगांव 1, जानोरी 1, लासुरा 1, कालखेड 5, पहुरजिरा 3, खामगांव शहर : 35, खामगांव तालुका : घाटपुरी 1, लाखनवाडा 2, कुंबेफळ 1, लांजुड 5, लोणी गुरव 3, भालेगांव बाजार 1, शहापूर 7, नांदुरा तालुका : नायगांव 1, जळगांव जामोद शहर : 10, जळगांव जामोद तालुका : जामोद 1, मडाखेड 1 पिं. काळे 2, आसलगांव 2, बोराळा 1, कुरणगड 1, बुलडाणा शहर : 37, बुलडाणा तालुका : करडी 4, पळसखेड भट 1, पिं. सराई 1, शिरपूर 1, वरवंड 2, साखळी 4, माळविहीर 1, सुंदरखेड 1, गिरडा 1, कोलवड 1, मोताळा शहर : 3, मोताळा तालुका : रोहीणखेड 2, चिखली शहर : 86, चिखली तालुका : डोंगर शेवली 1, येवता 1, मेरा बु 1, असोला नाईक 10, उंद्री 1, काटोडा 2, अमडापूर 3, वरूड 1, मलगी 1, सावरगांव डुकरे 3, अंत्री तेली 1, सातगांव भुसारी 1, खैरव 1, पार्डी 1, अंत्री कोळी 1, शेलगांव आटोळ 1, भोगावती 1, शेलूद 1, येवता 1, गोद्री 1, भानखेड 1, शिंदी हराळी 1, अंत्री खेडेकर 2, शेलगांव जहागीर 1, एकलारा 4, भारज 1, मुंगसरी 1, चांधई 2, बेराळा 1, तेल्हारा 1, सवणा 7, वाघापूर 1, बोरगांव काकडे 2, किन्होळा 4, करतवाडी 1, दिवठाणा 1, दे. घुबे 1, ब्रम्हपूरी 1, संग्रामपूर तालुका : पातुर्डा 1, सोनाळा 9, टुनकी 1, वानखेड 2, नांदुरा शहर : 23, नांदुरा तालुका : वडनेर 1, जवळा बाजार 1, बेलूरा 1, निमगांव 1, नारखेड 1, सिं. राजा शहर : 22, सिं. राजा तालुका : चंदनपूर 1, सावंगी भगत 1, साखरखेर्डा 5, हिवरखेड पुर्णा 2, मलकापूर शहर : 39, मलकापूर तालुका : तालसवाडा 1, मेहकर तालुका : मोळा 1, जानेफळ 1, कळमेश्वर 9, सारशिव 1, पार्डा 4, गोहेगांव 1, सावत्रा 1, उकळी 1, दे. माळी 3, मेहकर शहर : 12, लोणार शहर : 5, लोणार तालुका : वढव 1, उऱ्हा 1, पळसखेड 3, सुलतानपूर 1, सावंगी माळी 3, धानोरा 1, पारडा 2, शिवणी पिसा 2, दे. राजा शहर : 30, दे. राजा तालुका : डोढ्रा 1, आळंद 1, सिनगांव जहागीर 3, दे. मही 3, दगडवाडी 1, पिंपळगांव चिलमखा 1, उमरद 1, दगडवाडी 1, अंढेरा 2, निमखेड 1, नागणगांव 2, कुंभारी 1, मूळ पत्ता विव्हळा ता. पातूर जि अकोला 2, नागपूर 1, राजूर ता. बोदवड 1, सिनगांव जि जालना 1 संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 579 रूग्ण आढळले आहे. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान गुंज ता सिं. राजा येथील 75 वर्षीय पुरूष व केसापूर ता. बुलडाणा येथील 64 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 392 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : चिखली : 41, खामगांव : 70, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 9, कोविड रूग्णालय 20, स्त्री रूग्णालय 5, अपंग विद्यालय 26, दे. राजा : 29, मेहकर : 37, जळगांव जामोद : 6, सिं. राजा : 5, नांदुरा : 43, मलकापूर : 56, शेगांव : 24, मोताळा : 18,
तसेच आजपर्यंत 152524 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 19168 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 19168 आहे.
आज रोजी 4179 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 152524 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 22400 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 19168 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 3029 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 203 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

नांदुरा शहर व तालुका भाजपा महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न

0

 

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

विधात्याने घडवलेली सृजनांची सावली म्हणजे स्त्री. आदिशक्ती, प्रभूची भक्ती, झाशीची राणी, मावळ्यांची भवानी, प्रयत्नांना लाभलेली उन्नती, आजच्या युगाची प्रगती म्हणजेच स्त्री. या स्त्रीशक्तिच्या हक्कांचे रक्षण व स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन नांदुरा शहर व तालुका भाजपा महिला आघाडीच्या वतीने सोमवार दि. ०८/०३/२०२१ रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिला दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण, महिला सशक्तिकरण व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आदी विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नांदुरा शहरातील राजेंद्रजी डांगे यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा नामदार श्री चैनसुख संचेती तर प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उज्वलाताई संचेती तथा मार्गदर्शक म्हणून कोठारी महाविद्यालयातील शिक्षिका प्रा. प्रतिभाताई भोपळे आदी उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री चैनसुखजी संचेती तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन वृक्ष संवर्धनाचे महत्व प्रतिपादीत करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित प्रा. प्रतिभाताई भोपळे यांनी उपस्थित महिलांना ‘महिला सशक्तिकरण’ या विषयावर दिशादिग्दर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन हे भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा सौ. अर्चना शिवाजीराव पाटील व शहराध्यक्षा सौ. सारिका राजेशजी डागा यांच्या संकल्पनेतुन व मार्गदर्शनातून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नांदुरा शहर व तालुका भाजपा महिला आघाडीच्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, परिसरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जेष्ठ व अन्य महिला, गृहिणी, विद्यार्थिनी आदी उपस्थित होत्या.

___

हिंगोणा गावात दुसऱ्या टप्यातील कोरोनाने घेतला प्रवेश दोन महीला पॉझीटीव्ह आरोग्य यंत्रणा सज्ज

0

 

यावल ( प्रतिनीधी ) विकी वानखेडे

सध्या देशासह आपल्या राज्यात कोरोना विषाणुच्या संसर्गजन्य आजाराने पुनश्च थैमान घालण्यास सुरूवात केली असून, कोरोना या घातक आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे काही यावल शहरातील भागांमध्ये सुद्धा दिवसा गणित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता या महामारीने ग्रामीण भागात सुद्धा प्रवेश मिळवला असून आज दिनांक ९ मार्च रोजी हिंगोणा तालुका यावल येथे दोन पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्याने एकच नागरीकांमध्ये आपल्या आरोग्याची काळजी म्हणुन चिंतेचे सावट वाढले आहे .कोरोना च्या आगमनाने हिंगोणेकरांची साठी ही चिंतेची बाब आहे . आज मिळुन आलेल्या बाधीतांमध्ये सापडलेल्या रुग्णांमध्ये एक ३० वर्षीय व ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाव्दारे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करावे असे हिंगोणा प्राथमिक केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ . फिरोज एम तडवी यांनी केले असुन ग्रामस्थानी एकाच ठिकाणी गर्दी न करता सोशल डिस्टन्स मास्कचा वापर सॅनिटायझर चा वापर करणे गरजेचे आहे तसेच अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर सुद्धा निघू नये तसेच याबाबत ग्रामपंचायतीव्दारे नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ठोस अशीउपाय योजना करणे अत्यंत गरजेचे आहे .

महसुलच्या या धडक कारवाईमुळे वाळू माफियाचे धाबे दणाणले

0

 

विकि वानखड़े यावल

यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात महसुलच्या भरारी पथकाने धडक कारवाई करिता तापी नदीच्या पात्रातून अवैध मार्गाने वाळू वाहतूक करताना एक ट्रॅक्टर पकडण्यात आले आहे महसुलच्या या धडक कारवाईमुळे वाळू माफि धाबे दणाणले आहे. या संदर्भात मिळलेली माहिती अशी डांभुर्णी तालुका यावल येथे आज ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, निवास नायब तहसीलदार आर के पवार ,आणि फैजपुर मंडळचे तलाठी प्रशांत जावळे ,आमोद येथील तलाठी एम .पी. खुर्दा. आडगावचे तलाठी आर.के. गोरटे. वाहन चालक हिरामण सावळे. यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत ट्रॅक्टर मालक साहेबराव मच्छिंद्र दर सोळुंके कोळन्हावी यांच्या मालकाचे ट्रॅक्टर क्रमांक ,(एम एच १९ एपी७४९७) ट्रॉली चा क्रमांक नाही याव्दारे तापी नदीच्या पात्रतुन अवैधारित्या वाळूची वाहतुक करतांना आढळून आले आहे महसुलच्या पथकाने कारवाई करित ट्रॅक्टर ताब्यात घेवून यावल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे दरम्यान यावल तालुक्यात ही बऱ्यात ठिकाणी बेकायदेशीर वाळ्ची वाहतुक होत असत्याने त्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे

उसणे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून मित्रानेच केले बलात्कार

0

 

आयुषी दुबे शेगाव/ बुलढाणा

खामगाव – उसणे पैसे देण्याच्या बहाण्याने शेगाव येथे बोलावून मित्राने युवतीवर बलात्कार केल्याची घटना शेगाव येथे घडली .

याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . अकोला येथील ३१ वर्षीय युवतीसोबत पारस येथील चेतन जामोदकर ( ३० ) याने मैत्री करुन तिचा विश्वास संपादन केला . दरम्यान ९ फेब्रुवारी रोजी तिला उसणे पैसे देण्याच्या बहाण्याने शेगावला बोलाविले व शिवालय गेस्ट हाऊसमधील एका खोलीत नेवून बळजबरीने तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले . तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास बदनामी करण्याची व फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली . याबाबत सदर युवतीने शेगाव शहर पोस्टेला तक्रार दिली असून पोलिसांनी याप्रकरणी चेतन जामोदकर याच्याविरुध्द कलम ३७६,४१७,५०६ भादवीनुसार गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत .

सिंदखेडराजा तालुक्यामध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू ! .. न घाबरता सर्वांनी लस घ्यावी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साळवे यांचे आव्हान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सध्या संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे आणि अशाच सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी कोविड लस ही सर्वसामान्य माणसासाठी सिंदखेडराजा तालुक्यातील ४ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध झाली आहे .यामध्ये आडगाव राजा, किनगाव राजा ,मलकापूर पांग्रा, साखरखेर्डा,या प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश असून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक ८ मार्च पासून या आरोग्य केंद्र मध्ये लसीकरणाची सुरुवात झाली आहे,
आडगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये .60 वर्षावरील 2 व्यक्ती ’45 ते 59 वर्षावरील o व्यक्ती -हेल्थकेअर वर्कर – 2 व्यक्ती ‘ फ्रंटलाईन वर्कर – 0 – एकुन . ४ पहिला डोज – ४ – दुसरा डोज – 0. – –

तर किनगावराजा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये . ६०वर्षावरील – ७ व्यक्ती – ४५ – ते ५९ वर्षावरील – ० .हेल्थ केअर वर्कर . १२ -फ्रंट लाईन वर्कर – 0.एकूण 19 – पहिला डोज – ८ – व्यक्ती – दुसरा डोज – ११ – व्यक्तीला देण्यात आला, – –
मलकापूर पांगरा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये – – ६० वर्षावरील ० व्यक्ती – ४५ ते ५९ वर्षावरील 1 व्यक्ती -हेल्थ केअर वर्कर -०-फ्रंटलाईन वर्कर o एकुन . 1 व्यक्ती – पहिला डोज – 1 – दुसरा डोज – ० .

साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये – ६०वर्षावरील २९ व्यक्ती – ४५ ते ५९ वर्षावरील – 23 व्यक्ती -हेल्थ केअर वर्कर – १० – व्यक्ती -फ्रन्टलाइन वर्कर – 0 – एकून – ६२ व्यक्ती ‘ -एकूण 86 व्यक्तींना चार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लस देण्यात आली -पहिला डोज 65 व्यक्तींना तर दुसरा डोस 21 व्यक्तींना देण्यात आली अशी माहिती सिनखेडराजा आरोग्य विभागाचे तालुका अधिकारी डॉक्टर महेंद्र कुमार साळवे यांनी दिली आहे .तसेच लसी पूर्णतः सुरक्षित असून परत एकदा लस दिली जाणार आहे असे सुद्धा त्यांनी सांगितले ‘

सिंदखेड राजा येथे काँग्रेसच्या वतिने गॅस व पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ आक्रोश आंदोलन ! तहसिलदारांना निवेदन !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

देशात वाढत्या पेट्रोल व गॅस सिलेंडर च्या किमती बघता .देशातील गॅस व पेट्रोलच्या किमती कमी करण्यात यावे यासाठी सिंदखेड राजा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस व पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ ८ मार्च रोजी आक्रोश आंदोलन करण्यात आले .आंदोलनानंतर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना रीतसर निवेदन दिले,या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कच्च्या किंमती कमी असताना देखील केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल ,डिझेल व गॅस यांच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ केली आहे ‘ कोरोना महामारी मुळे अगोदरच सर्वसामान्य नागरिक होरपळून निघाला आहे .तरी केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य माणसाची लूट थांबवावी व गॅस पेट्रोल च्या किमती मध्ये कमी कराव्यात .असे ही यावेळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ‘यावेळी सिंदखेडराजा काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष,श्री शिवदास रिंढे,ज्येष्ठ नेते जगन दादा ठाकरे,पक्ष निरीक्षक विनोद पऱ्हाड,शहराध्यक्ष सिद्धार्थ जाधव,शेख कदीर,उल्हास भुसारे, रमेश कांबळे ,बद्रीनाथ वाघ,शेख रहेमान शेख दौलत ( जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग )परमेश्वर खंदारे,रंगनाथ डोईफोडे, सुभाष शेळके, समाधान साहेबराव काकड,लक्ष्मण साबळे,दिलीप गाडेकर,सुनील जायभाये,उमेश इंगळे,कचरूजी भारस्कर ,जुनेद अली,आधीच्या यावेळी निवेदनावर सही आहेत ‘