Home Blog Page 520

शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडल्यास तिव्र आंदोलन करू ! राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अतुलभाऊ भुसारी पाटील यांचा इशारा !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

कोरोनामुळे शेतकरी व सर्व सामान्य जनता अर्थिक संकटात सापडलेली आहे त्यात आणखी भर म्हणून विद्युत वितरण कंपनीने सर्व सामान्य ग्राहकना जास्त वीज बिल देऊन त्यांना अर्थिक मानसीक ञास देणे सुरू केले आहे महावितरणने वीज कनेक्शन तोडल्यास राज्य भर आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अतुलभाऊ भुसारी पाटील आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्ध पञिकात दिला आहे.
घरगुती वापराचे व कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्याची धमकी विद्युत वितरणाची कर्मचारी देत आहे त्यात वाढीवविज कमी करुन देण्याचा नावाखाली ग्राहकांकडून पैशाची मागणी केली जात आहे त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन जनतेची होणारी फसवणूक थांबवावी वीज वापरली तितकेच वीज बिल त्यांना द्यावे सर्व सामान्य जनतेची होणारी लुट थांबवावी तसेच चुकीच्या पद्धतीने वीज कनेक्शन कट करु नये अन्यथा राज्य शासनाचा विद्युत वितरण कंपनी चा विरोधात राष्ट्रीय समाज पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अतुलभाऊ भुसारी पाटील यांनी दिला आहे

रूम्हणा येथील शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील रुम्हणा येथील शेतकरी मधुकर आश्रुबा खेडकर यांनी एक मार्च रोजी शेतातील तांदुळवाडी शिवारातील गट नंबर 59 मधील स्वतःच्या मालकीच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली ।या घटनेमुळे गावांमध्ये एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्याकडे एक सो साईट नोट आढळून आली आहे याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सुसाईट नोट नुसार कसून तपास करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे,मधुकर खेडकर हे 55 वर्षे शेतकरी सकाळी सात वाजेच्या सुमारास मध्ये एका लिंबाच्या झाडा मध्ये मृतावस्थेत आढळून आले ‘यामुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे व पुढील तपास किनगाव राजा पोलिस करीत आहेत .

जे धान्य जनावरेही खाऊ शकत नाही अशी निकृष्ट दर्जाची, मका ‘ व ज्वारी, लाभार्थ्याच्या माथी !जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यामध्ये बीपीएल आणि अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून माफक दराने ,गहू ,तांदूळ, ज्वारी, मका , या व इतर धान्याचा पुरवठा केला जात असतो ‘सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोरोना च्या संकट काळामध्ये,शिधा पत्रिकाधारकांना गोरगरिबांना, लॉक डाऊन मध्ये माफक दरामध्ये रेशन दुकानदाराकडून मिळणारे धान्य हे आधार वाटत असते ‘ज्याची संध्याकाळची ही भाकरीसाठी आटापिटा असते अशा गरजू लोकांना हे धान्य उपयुक्त असते ‘परंतु शासनाने रेशनवरील धान्य देताना जे धान्य जनावरेही खाऊ शकत नाही अशी धान्य म्हणजेच मका व निकृष्ट दर्जाची ज्वारी शिधापत्रिका धारकांच्या व गोरगरीब जनतेच्या माथी मारत आहेत ‘त्यामुळे ज्वारी व मका घेऊन करायचे तरी काय ?हा प्रश्न जनतेसमोर पडला आहे ‘स्वस्त धान्य दुकानदाराला जो शासनाने जो जो माल पाठवला तोच माल त्यांना वितरित करावा लागतो ‘माणसं ही जनावराच्या बरोबरीत आहेत काय असा सवालही महिला विचारताना दिसत आहेत ‘ कोरोनाच्या या संकट काळामध्ये अनेक लोकांचा रोजगार गेला आहे आणि ग्रामीण भागातील लोकांचे पोट हे रेशनचे धान्य वरच असते ‘म्हणून दिलेली निकृष्ट दर्जाची मका व ज्वारी हे प्रशासनातील अधिकारी सुद्धा खातील का ‘ ? कारण जनावर ही अशा धान्यांना तोंड लावू शकत नाहीत अशी ही मका व ज्वारी गोरगरिबांच्या माथी मारण्यात येत आहे तरी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन धान्य तपासून चांगले धान्यच राशन धारकांना वितरित करावी अशी अपेक्षा लोक व्यक्त करीत आहेत ‘‎

बुलढाण्याच्या रस्त्यावर माणुसकी हरवली आहे काय !अपघातात पडलेल्या पत्रकाराला वाचवायचे तर त्याचे पाकीट चोरले!

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

आपल्या महाराष्ट्रातील अनेक संतांनी महापुरुषांनी माणुसकी जपण्याचा संदेश सर्व मानवाला दिलेला आहे ‘तसेच अनेक ठिकाणी माणुसकीचा प्रत्यय सुद्धा आलेला आहे ‘परंतु काही ठिकाणी माणुसकीचा प्रकार हा काहीतरी वेगळा घडत आहे ‘काल दिनांक 1 मार्च रोजी दैनिक भारत संग्राम चे बुलढाणा तालुक्यातील उपसंपादक ‘श्री अविनाश खिल्लारे ‘हे ४ 30 मि – काही कामानिमित्त सुंदरखेड येथून बुलढाणा शहरात येत होते ‘रस्त्याने जात असताना बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन समोर देवीच्या मंदिराच्या जवळ अचानकपणे समोरच्या ऑटो वाल्यांनी उभा केला ‘हो आता आपली मोटरसायकल त्या आठवलेंना धडकणार तोच पत्रकार खिल्लारे यांनी ब्रेक दाबले ‘त्यामुळे ते व त्यांची मोटरसायकल डाव्या बाजूला डोक्यावर ते आदळलेते खाली पडल्यानंतर अनेक बघ्यांची गर्दी जमली उन्हाळा लागल्यामुळे कोणी पाणी सुद्धा आणून दिलेली नाही आणि हा सर्व प्रकार घडला तो बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन च्या समोरच ‘काहींनी त्यांना उचलून मंदिरा मध्ये बसवले ‘व सर्वजण निघून गेले ‘त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे आपल्यासोबत काय झाले काय नाही हे त्यांना कळले नाही ‘आणि त्यामुळेच बघ्यांपैकी त्यातील काही चोरट्यांनी मोटर सायकल जवळ पडलेली त्यांचे पाकीट अलगद उचलून नेले ‘त्यामध्ये त्यांचे पैसे आधार कार्ड पॅन कार्ड एटीएम कार्ड असे महत्वाची कागदपत्रे होती ‘थोड्यावेळातच सिनखेडराजा चे प्रतिनिधी सचिन खंडारे तिथे पोहोचले सर्व हकीकत बघितली नंतर आणि पाकीट याचा बराच वेळ आसपास शोध घेतला परंतु पाकीट कुठेच आढळून आले नाही ‘पैसे देणार यांनी दिले तरी चालतील परंतु पाकिटात असणारे महत्त्वाचे कागद तर परत द्यायला हवी होती हाच प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो की बुलढाण्याचा रस्त्यावर माणुसकी हरवली आहे काय . ? एखाद्या अपघातग्रस्तांना वाचवण्याचे सोडून गर्दी बघून काही चोरटे मात्र चोरी चा फायदा घेतात ‘त्यामुळे माणुसकीची गोष्ट शिल्लक तरी आहे काय हा प्रश्न निर्माण होतो ‘

नगर परिषद आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणा शहरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात यावा- मनसे

0

 

गोंदिया. शहरातील अनेक नाल्या तुटफुट अवस्थेत असल्यामुळे त्या नाल्यांमधून सांडपाणी निकासी न होता तो काही महिन्या पासून आपल्या नगर परिषद आरोग्य विभागाच्या कामचुकारु पणा मुळे स्वच्छता व फवारणी होत नसल्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.
करिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया तर्फे आज नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देवून सांगण्यात आले कि, कोरोना काळ संपलेला नाही आजही प्रत्येक वार्डात स्वच्छतेची गरज असल्यामुळे शहरात त्वरीत स्वच्छता व फवारणी करावी ही मागणी करण्यात आली. मनसेचा शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष मुकेश कुमार मिश्रा, तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, शहर अध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, सौरभ गौतम व सर्व पदाधिकारी उपस्थित होते

सुनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराज भंडारा महोत्सव रद्द

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे चार मार्च रोजी असलेला आवजी सिद्ध महाराज भंडारा महोत्सव यावर्षी कोरोणा रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे रद्द झाला आहे सुनगाव येथील श्री आवजी सिद्ध महाराज यांचा भंडारा महोत्सव चार मार्च रोजी होणार होता परंतु या वर्षी कोरोणाच्या वाढत्या प्रभावामुळे संस्थांचे अध्यक्ष तथा संचालक मंडळाच्या वतीने महोत्सव रद्द करण्याचे ठरले आहे सूनगाव येथील नागरिकांचे ग्रामदैवत व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आवजी सिद्ध महाराज यांचा भंडारा जणू काही सून गाव येथे दिवाळीच आहे या प्रमाणे साजरा केला जातो गावातील बाहेरगावी असणारे फक्त जे की दिवाळीला ही आपल्या घरी येत नाही ते या भंडाऱ्याला सुट्टी काढून येत असतात व परिसरातील भाविक भक्त या भंडारयासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात या भंडार्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे महाप्रसाद म्हणून उडदाची डाळ व ज्वारीची भाकरी असा असतो परंतु या वर्षी जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे व कोरणा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे येथील विश्वस्त मंडळ यांनी भंडारा महोत्सव रद्द करण्याचे ठरविले आहे तरी आवजीसिद्ध महाराज संस्थान चे अध्यक्ष श्री सुरेश भाऊ अंबडकार व सचिव प्रवीण धर्मे यांनी परिसरातील भक्तांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करू नये असे आवाहन केले आहे

यावल येथे महागडया वाहनातुन बकऱ्यांची चोरी करणारा नागरीकांच्या सर्तकतेने व पोलीसांच्या दक्षतेने गजाआड

0

 

,यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

येथील शहरालगत यावल चोपडा रोडवर असलेल्या नवीन विस्तारीत अकसानगर वसाहतीतुन चारचाकी वाहनातुन बकऱ्या चोरणाऱ्या भामट्यास पकण्यात नागरीकांना यश आले असुन , या भामट्यास वाहनासह पोलीसांनी ताब्यात घेतले असून , अद्याप कुणीही तक्रारदार समोर न आल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेले नसल्याचे पोलीस सुत्रांकडुन कळते . या संदर्भात मिळालेली माहीती अशी यावल शहरातील अक्सानगर परिसरातुन दिनांक १ मार्च रोजी दुपार१ वाजेच्या सुमारास एमपी०९जी के९४५३या महागडया स्वीप्ट चार चाकी वाहनातुनही ईम्रान रफीक पठाण वय ४८ वर्ष राहणार ईन्दौर मध्य प्रदेश ही व्यक्ति चार बकऱ्या किमत ४५हजार रूपये गाडीच्या डिकीत भरून चोरून घेवुन जात असतांना अक्सानगर परिसरातुन अजुन काही बकऱ्या चोरीच्या प्रयनात असतांना सर्तक व जागृत नागरिकांना आढळुन आलेल्याने परिसरातील नागरीकांनी त्यास रंगेहाथ पकडुन त्यास चांगला चोप दिला नंतर घटनेचे वृत्त कळताच तात्काळ दखल घेत पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार व त्यांच्या सोबत पोलीस कर्मचारी असलम रवान , भुषण चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली व बकऱ्या चोरी करणाऱ्या ईम्रान रफीक पठाण यास वाहनासह ताब्यात घेतले आहे घटना स्थळावरून दोन जणं फरार होण्यात यशस्वी झाले. सदरच्या या बकऱ्या फैजपुर परिसरातुन चोरून आण्ल्याचा संशय व्यक्त करण्यात असुन , बकऱ्या चोरणाऱ्या चोरट्यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे .मागील काही दिवसापासुन शहरातील चांद नगर , आयशानगर आदी परिसरातुन अनेकांच्या बकऱ्या चोरीस गेल्या असल्याची माहीती समोर येत आहे .

मनसेच्या प्रयत्नाला यश.छोटा गोंदिया पांगोली नदीच्या बंधाऱ्याला मंजुरी.

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदिया तालुक्याच्या वतीने छोटा गोंदीया जवळून वाहणारी एकमेव नदीचे सौंदर्यीकरण,नदी पात्र खोलीकरण व नव्याने बंधारा बांधण्यात यावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.पांगोली नदी पात्रात बारो महिने पाणी राहणार व नदीच्या आजू बाजूच्या शेतकरी बंधूंना पाण्यामुळे वेगवेगळी पिके व भाजी पाला व्यवसाय करण्यास मद्दत होईल,पाळीव व वन्य प्राण्यांना पिण्या करीता पाणी उपलब्ध होईल.भविष्यात पाण्याची कमतरता छोटा गोंदिया भागात होणार नाही या महत्वाच्या मुद्यांवर तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी जिल्हाधिकारी काळे साहेब व जिल्हापरिषद मुख्य कार्यपालन अधिकारी रवींद्र ठाकरे साहेब व जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी ताई याच्याशी चर्चा केली होती.२०१४ ते २०२१ पर्यंतच्या पांगोली नदीच्या कार्याच्या पाठपुराव्याला अखेर मंजुरी मिळाली.
मनसे गोंदिया तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे व त्यांच्या समस्त सहकाऱ्यांनच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब गोंदिया,जिल्हापरिषद मुख्याधिकारी,जिल्हा परिषद अध्यक्ष,अभियंता यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

किनगाव येथे अवैद्य वाळुची वाहतुक करणारे डंपर पकडण्यास गेलेल्या पथकास धक्काबुक्की व मोटर वाहनाने ठार मारण्याचा प्रयत्न

0

 

,यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे ,

तालुक्यातील किनगाव गावाजवळ अवैद्य गौण खनिज वाहतुक करणाऱ्या डंपर व एका कारद्वारे कारवाई करणाऱ्या महसुल पथकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली असुन , तालुक्यात महसुल वरील पथकावर हल्ला करण्याची ही दुसरी घटना असुन , या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे . दरम्यान या घटने बाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की दिनांक २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ , ४० वाजेच्या सुमारास किनगाव येथे कार्यरत असलेले मंडळ अधिकारी सचिन तुळाशीराम जगताप किनगाव तलाठी टेमरसिंग छतरसिंग बारेला , विलास भिकाजी नागरे , राजु काशीनाथ घोरटे, गणेश रमेश वऱ्हाडे , विजय साळवे , निखील वैजनाथ मिसाळ या पथकासह तहसीलदार महेश पवार यांच्या आदेशान्वये आपले कर्तव्य बजावत असतांना जळगाव हुन किनगावच्या दिशेने येणारे डंपर वाहन क्रमांक एमएच १२ एफ झेड८४ २५या वाहनास चौकशी कामी थांबविण्याचे प्रयत्न केले असता सदर डंपर चालकाने वाहन न थांबवा सरळ वाहन हे किनगाव गावात नेले आम्ही आमच्याकडील वाहनाने त्यांचा पाठलाग केला असता सदरचे डंपर हे गावातील मस्जिद जवळ गर्दीच्या ठिकाणी थांबले असता आम्ही डंपर चालकास त्याचे नांव विचारले असता त्यांने आपले नाव गपेश संजय कोळी रा . कोळन्हावी ता यावल असे सांगीतले , याच वेळी त्या ठीकाणी टाटा इंडीका ही मोटर वाहनक्रमांक एमएच १९ एपी४१२८ही आली व यातील गोपाळ प्रल्हाद सोळुंखे, संदीप आधार सोळुंखे , छगन कोळी व गोपाळ कोळी हे त्यात बसले होते यातील गोपाळ कोळी हा गाडीतुन उतरल्यावर त्यांने मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्याशी हुज्जत घातुन तुम्हाला डंपर पकडण्याचा अधिकारी नाही असे बोलुन वाद घातला व शासकीय कामात अडथळा निर्माण करून मंडळ अधिकारी यांना धक्काबुकी करून छातीवर बुक्का मारला यानंतर गावातील मंडळीची वाढती संख्या पाहुन टाटा कार घेवुन त्यांनी पळ काढला , त्यानंतर पंचनामा करून सदरचे डंपर यावल कडे आणत असतांना पुन्हा डंपर चालकाने वाहन साकळी जवळच्या भोनक नदीच्या दिशेने पळविण्याचा प्रयत्न केला असता सदर कारही चालक गोपाळ प्रल्हाद सोळुंखे यांने महसुल पथक हे कारवाई करीत असतांना कार त्या पथकाच्या दिशेने वेगाने आणुन अधिकारी यांनी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला . या बाबत यावल पोलीसात संशयीत आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, अवैद्य गौण खनिज विनापरवाना वाहतुक करणारे डंपर व टाटा कार यांना जप्त करण्यात आले आहे .

शेतकऱ्याने मानले प्रहार शेतकरी संघटनेचे आभार

0

 

प्रतिनिधी – सचिन पगारे
नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील विलास लाठे यांच्या शेतातील डी.पी.गेल्या तिन महीन्यापासुन जळालेली होती.त्यांच्या शेतातील कांदे व बाजरी पीकाचे मोठे नुसकान झाले शेतकरी विलास लाठे यांनी संबंधीत वायरमन,सबस्टेशन येथील कर्मचाऱ्यांना कळवले देखील परंतु कोनीही दखल घेतली नाही.शेवटी शेतकऱ्याने शेवटचा पर्याय म्हणुन प्रहार शेतकरी संघटनेकडे धाव घेतली.प्रहार शेतकरी संघटनेने प्रत्यक्ष शेतात जाऊन पहानी करुन महावितन अधिकाऱ्यांशी व संबंधीत ठेकेदारांशी फोनवर चर्चा केली व सांगीतले की शेतकऱ्याचे फार मोठे नुसकान झाले आहे.तरी पुढील नुसकान होऊ नये म्हणुन शेतकऱ्यास त्वरीत डी.पी.देन्यात यावी.
परंतु महावितरणाच्या आधीकाऱ्यांनी व ठेकेदारांनी ऊडवा ऊडविचे ऊत्तरे दीली.
परंतु प्रहार शेतकरी संघटना ही वंदनीय राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन चालवलेली संघटना आहे.प्रहार संघटनेने सडेतोड भाषेत सांगीतले की दोन दीवसात शेतकऱ्याला न्याय नाही मिळाल्यास,शेतकऱ्याच्या शेतात डी.पी.नाही बसवल्यास प्रहार शेतकरी संघटना महावितरनाच्या कार्यलयापुढे अर्धनग्न आंदोलन करेल. तरी देखील डी.पी.दिली नाही.
शेवटी आज प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सुर्यवंशी.चंद्रभान झोडगे,रविकांत भागवत,नवनाथ वरपे,शेतकरी विलास लाठे.हे आंदोलनासाठी गेले असता महावितरणाचे संबंधीत अधीकारी वाटपाडे साहेब यांनी सांगीतले की.आंदोलन करु नका तुम्हाला एक तासात डी.पी.देतो.आणि तासाभरात विलास लाठे यांची डी.पी.व ढेकु येथील गावठानची डी.पी.पोहच करन्यात आली.
त्यामुळे आता शेतकऱ्याचे होनारे नुसकान टळले.म्हणुन शेतकऱ्याने मोठ्या मनाने प्रहार शेतकरी संघटनेचे आभार मानले.