Home Blog Page 521

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण ‘आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी यासाठी . !ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे साखरखेर्डा ठाणेदारास निवेदन ‘

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील जागदरी या गावांमध्ये
दि. 3 मार्च रोजी जागदरी ग्रा पं
चे पाणीपूरवठा कर्मचारी बद्री एकनाथ उगलमूगले यांना कामावर असतांना गावातील व्यक्तीने मारहाण करून जखमी केले .त्या निषेधार्थ आज दिनांक 9 मार्च रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियन सिंदखेडराजा तालुक्याच्या वतीने सदरहू आरोपी यांच्यावर शासकीय कामात अडथळाकलम 353 नूसार व जखमी करणे कलम 324 नूसार गून्हा दाखल करणे बाबत मा ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे साखरखेर्डा यांना तालूका ग्रामपंचायत कर्मचारी यूनियन ४५ ११ यांचे वतीने निवेदन देण्यात आले . त्यावेळी मा ठाणेदारश्री आडोळे साहेब यांनी सदरहू आरोपी वर तात्काळ 353 कलम दाखल करणे बाबत आश्वासन दिले .यावेळी महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियन चे सिनखेडराजा तालुका अध्यक्ष किसन अवसरमोल,उपाध्यक्ष भिमराव राठोड, सचिव भरत सूपेकर,सहसचिव केशव मूंढे कल्याण आढाव, श्रिराम दराडे,शेषराव मेरत इ तालूका यूनियन चे पदाधिकारी उपस्थीत होते ‘यावेळी सदर आरोपी विरुद्ध कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही निवेदनात दिला आहे ‘

मलकापूर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांसाठी ४४ कोटींचा निधी मंजूर

0

 

नांदुरा(बुलढाणा):-
(प्रफुल्ल बिचारे पाटिल)

मलकापूर विधानसभा मतदार आम

दार,विकास पुरुष, श्री.राजेश एकडे यांच्या प्रयत्नाने व सातत्याने पाठपुरावा करून महा विकास आघाडी शासना कडून रस्ते पूल ईमारत बांधकाम ईत्यादी विकास विकास कामासाठी ४४ कोटीचा निधी मंजूर केला आहे.मतदार संघाच्या विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या आमदार राजेश एकडे यांनी अर्थसंकल्प २०२१-२२, ग्रामविकास विभागाचा ३०५४ मार्ग व पुल, केंद्रीय मार्ग निधी, नांदुरा तहसील ईमारत, नांदुरा तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे निवासस्थान बांधकाम,नांदुरा येथील न्यायालय इमारतीचे उर्वरित बांधकाम अशा विविध कामासाठी सदरचा निधी प्राप्त झाला आहे यामध्ये जांबुळधाबा पिंपळगाव देवी फाटा रस्ता रु.१.५० कोटी, हिंगणेगव्हाळ चांदुरबिस्वा रस्ता रु३.५० कोटी, पान्हेरा वडोदा वडगाव दिघी मोमीनाबाद रस्ता रु५.०० कोटी,
मलकापूर देवधाबा रस्त्यावरील मलकापूर स्मशानभूमी जवळील पूल रु.५.०० कोटी,
निंभारी पुलाजवळ सौरक्षण भिंत रु.५०.०० लाख, पिंपळखुटा महादेव गावाजवळ पूल रु३.५० कोटी, मलकापूर देवधाबा रस्त्यावरील भालेगाव गावाजवळ पूल व रस्ता रु.१.६० कोटी, नांदुरा तहसिल ईमारत रु.८.१० कोटी, नांदुरा तहसीलदार व नायब तहसिलदार निवासस्थान रु.२.५० कोटी,
नांदुरा न्यायालयीन इमारत नांदुरा उर्वरीत कामे रु३.६० कोटी, भालेगाव निंबोळी शिवणी रस्त्यावरील पूल व वरखेड गावातील मुख्य रस्ता (केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरीस्तरावर) रु.५.०० कोटी,
पिंप्री अढाव गावातील काँक्रीट रस्ता व पिंप्री पोटळी रस्त्यावरील पिंप्री आढाव गावातील पूल (केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजुरीस्तरावर) रु.१.५० कोटी याव्यतिरिक्त ग्रामविकास विभागाच्या ३०५४ मार्ग व पूल लेखाशिर्षका अंतर्गत, नांदुरा तालुक्यातील रोटी ते भोटा रस्ता फुलाच्या बांधकामासह सुधारणा करणे रुपये ५० लक्ष, नांदुरा तालुक्यातील आलमपुर ते पातोंडा रस्त्यावर अलमपूर गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे रुपये ४० लक्ष,
मलकापूर तालुक्यातील जांबुळधाबा ते आळंद रस्ता सुधारणा करणे रु.६० लक्ष, नांदुरा तालुक्यातील खातखेड ते वडगाव रस्ता रस्त्याच्या कामास सुधारणा करण्यासाठी रुपये ३० लक्ष
इत्यादी कामाचा समावेश आहे.
मलकापूर विधानसभा मतदार संघातील विकास कामांचे सूक्ष्म नियोजन करून सदर कामे मंजूर करण्यासाठी शासन दरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सदर कामे मंजूर झाली आहे.तर अजूनही अनेक प्रस्थावित कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे,
परिणामी मागील २५ वर्षापासून मलकापूर विधानसभा मतदार संघाचा खुंटलेल्या विकासाला आमदार राजेश एकडे यांच्या माध्यमातून चालना मिळून विकास कामे गतिमान झाल्याची निदर्शनास येत आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जनतेमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिला जागतिक दिनाच्या औचीत्याने HIV/AIDS, CBC ई. रक्त तपासणी

0

 

विक्की वानखड़े यावल

8 मार्च रोजी बोरावल गेट लोणारी वाडा यावल येथे ग्रामीण रुग्णालय यावल व आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर , डॉ बी बी बरेला सर वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्श नाखली संयुक्त विद्यमाने अंतर्गत आज 08 मार्च महिला जागतिक दिनाच्या औचीत्याने HIV/AIDS, CBC ई. रक्त तपासणी चा कार्यक्रमाचे आयोजन लोणारी वाडा यावल येथे करण्यात आले त्यात प्रमुख पाहुणे बेबाताई धनगर क्राईम वार्ता संपादक ह्या होत्या तसेच कार्यक्रमात माता जिजाऊ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच महिलांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत करण्यात आले तसेच प्रमुख पाहुणे बेबा ताई धनगर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले तसेच ग्रामीण रूग्णालय यावल चे समुपदेशक वसंतकुमर संदानशिव यांनी उपसथितांना महिला दिना विषयी व कोराना एच आय व्ही /एड्स, गुप्तरोग आदि आजाराविषयी माहिती दिली तसेच अशोक तायडे यांनी महिलांना आरोग्य काळजी घेण्याविषयी महिला कायदे विषयी माहिती दिली तसेच रवींद्र माळी यांनी रक्त संकलन केले त्यात 35 महिलांनी स्वेइच्छा ने रक्त चाचणी करवून घेतले त्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुधाकर धनगर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी कविता लोणारी, निर्मला लोणारी, मीना पाटील सुरेखा लोणारी उज्वला महाजन पौर्णिमा झांबरे, पौर्णिमा धनगर रूपाली धनगर छाया लोणारी, मौसमी धनगर, वंदना लोणारी पद्मावती पाटील रेखा लोणारी सुधाकर धनगर आदी उपस्थित होते

यवतमाळ जिल्ह्यातील पहिला अपंग हक्क अधिनियम 2016 च्या कायद्या नुसार कलम 92 चा गुन्हा दाखल

0

 

यवतमाळ अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असुन या संघटनेच्या माध्यमातून अपंग हक्क अधिनियम 2016च्या कायद्या मधील सर्व तरतुदी सक्तीने लागु व्हावे म्हणुनअपंग नेते शेख अनिस पत्रकार हे सतत प्रयत्न करीत आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलीस स्टेशन अंतर्गत उमरी येथील अपंग युवा समाज सेविका यांना गावातील नागोराव टेकाम याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर युवा अपंग समाज सेविका यांनी पांढरकवडा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली त्या तक्रार नुसार नागोराव टेकाम याच्यावर 214,506,427,504,यानुसार गुन्हे दाखल केले होते.पण अपंग हक्क अधिनियम 2016 नुसार कलम 92 दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे युवा अपंग समाज सेविका यांनी अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांना माहिती देऊन सर्व प्रकार सांगितला. अखेर अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी बोलुन अपंग हक्क 2016च्या कायद्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले व नियमानुसार कलम 92 दाखल करा असे संगितले. अखेर अपंग हक्क 2016च्या कायद्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पोलिस विभागाच्या सहकार्याने कलम 92 चा पहिला गुन्हा दाखल झाला आहे.
अशी माहिती अपंग जनता दल (सामाजिक संघटना) यवतमाळ जिल्हाध्यक्ष दीपक जाधव यांनी दिली

नांदगाव खंडेश्र्वर पालखी काँगग्रीट रस्ताचे बांधकाम होतय निक्रुस्ट दर्जाचे जन लोका मधे चर्चेचा विषय

0

 

भगवंत ब्राह्मणवाडे नांदगाव
खंडेश्र्वर तालुका प्रतिनिधी

नांदगाव खंडेश्र्वर येथील स्थानिक खंडेश्र्वर तीर्थक्षेत्र क्रुती आरखड्या नुसार पालखी रस्ता क्राँग्रिंट जिल्हा परिषदे अंर्तगत बांधकाम सुरू असून शासणाचे नियमानुसार होत नसल्याने स्थानिक नागरिका मधे नाराजी दिसुन येत आहे कारण इस्टीमेट नुसार होत नसल्याचे नागरिकांना ओरड असुन कुठल्याच नियमांचे रस्ता बांधकामाचे पालन होत नाही इस्टीमेट नुसार बांधकाम साहित्य प्रचंड तफावत असुन बांधकाम साठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंट .लोहा .गिट्टी व इतर साहित्य अल्प प्रमाणात वापरत असुन खास करून लोखंडाचा वापर कमी प्रमाणात दाखवून लोकांना दिसावे साईट मधेच एका बिमच टाकलेले दिसुन
येत आहे रस्त्याच्या मधेमधे सेंटर लोखंडच गायब त्यामुळे खंडेश्र्वर पालखी रस्ता काही दिवसात उकरणार असल्याचे स्पष्ट दिसत संबंधित अधिकार्यला इस्टीमेट मधे लोखंड, सिमेंट बाबतीत विचारले असता उडवाउडवीची उत्तर देवुन काम चुकार करीत असल्याचे जन लोका मधे चर्चा सुरू आहे संबंधीत बांधकाम ठेकेदार व अधिकारी यांचे साठेलोठ त नाहिना ?सदर रस्त्याच्या दुतर्फा लावले गेलेले बिम कमी एम एम चे लोखंडी सलाख सुध्दा लावले आहे म्हणून संबंधित अधिकारी या समेशे कडे लक्ष देतील का? व खंडेश्र्वर नगरीला न्याय मिळवून देईल तरच खंडेश्र्वर भगवान नक्कीच मदत करेल

पोलीस व अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई साखरखेर्डा येथे ३८,००० हजाराचा गुटखा जप्त ‘ !

0

 

सिदखेडराजा । ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे ८मार्च रोजी दुपारच्या दरम्यान साखरखेडा पोलीस स्टेशन तसेच अन्न व औषध प्रशासन बुलढाणा
यांच्या संयुक्त कारवाई मुळे ‘गुजरी चौकातील केजीएन किराणा दुकान वर ‘छापे टाकून सुमारे 38 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला,त्यामुळे चोरून गुटखा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे ‘तसेच परिसरातील किराणा दुकानदार सुद्धा धास्तावलेले आहेत ‘दुकानदार ‘शेख वसीम शेख चांद .यांच्यावर साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये ‘अपराध नंबर 65व अन्न सुरक्षा अधिनियम 2006 भारतीय दंड विधान कायदा नुसार ‘कलम ( २६ ) ( 2) i ) २६ (2) ii २० – २७ ( ३ ड) – २७ – ३ ई ) ३ (W ) ( z z )व भारतीय दंड कायद्यानुसार -कलम 272 ,188 273, 328,नुसार आरोपी
शेख वसीम शेख चांद वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या कारवाईमध्ये ‘अन्नपुरवठा अधिकारी रवींद्र सोळंके ‘जीके वसावे ‘साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे,पोलीस कॉन्स्टेबल श्री अरविंद चव्हाण ‘गोपनीय विभागाचे श्री मापारी .हे या संयुक्त कारवाई मध्ये सहभागी होते . ‘

डिझेल पेट्रोल व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारचा तीव्र निषेध…

0

 

नांदुरा( बुलढाणा )
(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

कच्च्या तेलाचे भाव कमी असतांना सुद्धा अंबानी अदानीच्या केंद्र सरकारने गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांवर पेट्रोल डिझेल व इंधन दरवाढ लादली आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेची प्रचंड आर्थिक पिळवणूक होत आहे.यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये केंद्र सरकारच्या वतीने तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व इंधन गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी नांदुरा तालुका काँग्रेस कमिटी,शहर काँग्रेस कमिटी,नांदुरा व शहर महिला काँग्रेस,युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय यांच्यावतीने नांदुरा शहरातील गणी पेट्रोल पंपासमोर काँगेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार श्री.राहुलभाऊ बोंद्रे यांच्या आदेशनुसार मलकापूर मतदार मतदारसंघाचे आमदार माननीय श्री.राजूभाऊ एकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनआक्रोश निषेध करत केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
या जन आक्रोश मोर्चाच्या वेळी सर्वश्री जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निलेशभाऊ पाऊलझगडे,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष भगवानभाऊ धांडे,ऍडवोकेट मोहतेशाम रजा,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य तथा पातोंडा येथील युवा सरपंच पुरुषोत्तम झाल्टे,माजी पंचायत समिती सदस्य प्रसाद पाटील,राजू हाडे पाटील,ज्ञानेश्वर डांबरे,केशवराव मापारी,इक्बाल खान, किसन भगत,संजू इटखेडे, किसना इंगळे,महेंद्र देशमुख,विनलकुमार मिरगे,जयसेन सरदार,शालीग्राम तांगडे,संजय बाठे,शंकरभाऊ बोदळे,शुभम लांडे,वासुदेव वावगे,सोपान फाडके,दीपक काळे,पांडुरंग किसन तायडे,चंद्रकांत इंगळे,शत्रुघ्न काळे,ज्ञानेश्वर हरिचंद्र देठे,अक्षय वनारे,अमोल तांदळे,मिलिंद मोरे,वैभव साबे पाटील,सुनील वेरुळकर,सागर काटे पाटील, गजनान उन्हाळे,महेंद्र गजानन देशमुख,विष्णू पाटील,भास्कर वाकोडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सुनगाव येथील सोनल बनली पहिली महिला एमबीबीएस डॉक्टर

0

 

जागतिक महिला दिनविशेष

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील सोनल संजय झंवर बनली पहिली महिला एम बी बी एस डॉक्टर सूनगाव येथील प्रतिष्ठित नागरिक जीवनलालजी झंवर यांची नात ही जळगाव जामोद येथील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठ जळगाव जामोद येथे आपले बारावी सायन्स पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व 12 वी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले व त्यानंतर 2015 साली गोदावरी फाउंडेशन द्वारा संचालित डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे प्रवेश घेतला व आपले एमबीबीएस शिक्षण उत्तम गुणांसह पूर्ण केले व नुकत्याच 7 मार्च रोजी झालेल्या सेमिनारमध्ये उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे तिचा सत्कार करण्यात आला व मागील वर्षी पासून डॉक्टर सोनल ही डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय जळगाव येथे कोविड विभागात आपली अविरत रुग्ण सेवा देत आहे तरी तिने तिने तिची जिद्द कर्तुत्वाने सुनगाव येथील पहिली एमबीबीएस महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला आहे तरी तिच्या एम बी बी एस पदवी पूर्ण केल्याबद्दल व कोरोना काळात स्वतःची काळजी न करता आपले सामाजिक कर्तव्य जोपासून कोविढ विभागात रुग्णसेवा करीत आहे याबद्दल तिचे सुनगाव येथे सर्वत्र कौतुक होत आहे

महिला दिन विशेष सुनगाव येथील अंगणवाडी सेविकेने कर्तृत्वाने बनविले एका मुलीस करनिर्धारण अधिकारी व दुसऱ्या मुलीस पोलीस उपनिरीक्षक

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे माहेर असणाऱ्या व सुनगाव येथे रहिवाशी असणाऱ्या गीता गजानन दामधर यांचा स्वतःच्या दोन्ही मुलींना अधिकारी बनवण्यापर्यंतचा प्रवास खडतर,अथक परिश्रमाचा दुखद आहे
सुनगाव येथील गीता रामा धुळे यांचा विवाह 1993 साली अकोट येथील गजानन दामधर यांच्याशी झाला ,तीन वर्षानंतर 21 मे 1996 ला त्यांच्या पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला पतीच्या मृत्यूच्या वेळी प्रिया नावाची मुलगी 18 महिन्यांची होती तर लहान मुलगी नीता ही आईच्या गर्भात सहा महिन्याची होती अशा परिस्थितीत सासरच्या मंडळींनी कोणतीही मदत देण्यास नकार दिल्याने त्या दोन वर्ष वडिलांच्या घरी राहिल्या,नंतर स्वतःच्या बहिणीने त्यांना स्वतंत्र जागा विकत घेऊन गेल्याने त्या वेगळ्या राहायला लागल्या सुरुवातीला त्यांनी मोलमजुरी करून उदरनिर्वाह केला नंतर 2019 मध्ये त्या अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाल्या
मोठी मुलगी प्रिया चे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण सोयगाव येथे मावशी कडे झाले अकरावी ते पदवीधर पर्यंतचे शिक्षण समाजकल्याण वसतिगृहात राहून घेतले औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेचे क्लास केले स्पर्धा परीक्षेद्वारे करनिर्धारण अधिकारी म्हणून 15 जानेवारी 2018 ला परिषद बीड येथे रुजू झाल्या
लहान मुलगी नीताचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण मातोश्री नथियाबाई विद्यालय सुनगाव येथे झाले तर अकरावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण हायस्कूल जळगाव जामोद येथे झाले औरंगाबाद येथे बीए झाल्यानंतर त्यांनी एम पी एस सी परीक्षा दिली आणि 17 मार्च 2020 रोजी त्यांचा निकाल लागलेला असून त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे 25 एप्रिल 2021 पासून पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण नाशिक येथे होणार आहेत
अशा दुर्दम्य परिस्थितीत कोणाचीही मदत नसताना केवळ स्वतःच्या हिमतीवर कर्तृत्वावर मेहनतीवर विश्वास ठेवून दोन्ही मुलींना अधिकारी बनवणाऱ्या मातेला महिला दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम

यावल पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपाचे प स सदस्य योगेश भंगाळे यांची ईश्वरीय चिट्टीव्दारे निवड .

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

,येथील पंचायत समितीच्या उपसभापतीपदी यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली .आज दिनांक ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या १ मार्च रोजी प्राप्त झालेल्या आदेशानुसार यावल पंचायत समितीच्या सभागृहात दुपारी २ वाजता उपसभापती निवडीची प्रक्रीया निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील व महसुलचे दिपक भुतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली , या सर्वसाधारण सभेच्या पुर्वी उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने योगेश दिलीप भंगाळे यांचा एकतर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने कलीमा सायबु तडवी आणी सरफराज तडवी यांचे प्रत्येकी एक असे एकूण ३नामर्निर्दशन अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी महेश पवार यांच्याकडे प्राप्त झाले होते . या पंचायत समितीमध्ये सत्ताधारी गटाचे भारतीय जनता पक्षाचे चार आणी काँग्रेस पक्षाचे चार असे सरसम्मान सदस्य संख्याबळ असुन , विद्यमान प्रभारी सभापती दिपक अण्णा पाटील यांनी आपल्या उपसभापतीपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आज निवड करण्यात आली , दरम्यान यावल पंचायत समितीत योगेश भंगाळे , दिपक भास्कर पाटील , लक्ष्मीबाई विजय मोरे , सौ .पल्लवी पुरूजीत चौधरी असे चार सदस्य असुन कॉंग्रेस पक्षाचे उमाकांत रामराव पाटील, शेखर सोपान पाटील , सरफराज सिकंदर तडवी ,कलीमा सायबु तडवी हे सदस्य आहेत . या वेळी उपसभापतीच्या निवड प्रक्रीयेत पंचायत समिती सदस्य सरफराज सिकंदर तडवी यांनी आपला उमेदवारीचे अर्ज मागे घेतल्याने दोन अर्ज राहीले असता मतदान घेण्यात आले योगेश भंगाळे यांना ४ मते तर कलीमा सायबु तडवी यांना ही चार मते मिळाल्याने सरसन्मान मते मिळाल्याने अखेर ईश्वरीय चिट्टीद्वारे प्रेम देवरे यांनी काढतेल्या चिठ्ठीद्वारे योगेश भंगाळे यांची निवड करण्यात आली .