Home Blog Page 526

मास्क लावा अन्यथा कठोर कारवाई करू ! ठाणेदार जितेंद्र आडोळे सिंदखेड राजा (स्वतः बाजारात फिरून लोकांना मास्क लावण्याचे केले आव्हान !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी त्यांच्या ताफ्या सह मलकापूर पांग्रा येथिल आठवडी बाजारात येऊन दुकानदार आणि नागरिकांना कोरोनाची नियम पाळा तसेच ज्यांनी मास्क लावला नाही त्यांना मास्क लावा असे सांगत यापुढे बिना मास्क दिसलास कठोर दंडात्मक कारवाई करू असा खणखणीत इशारा ठाणेदार यांनी दिला त्यामुळे बाजारात प्रत्येक जण तोंडावर मास्क बांधलेला दिसला
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर संचार बंदी असल्याने ठाणेदार जितेंद्र आडोळे ,पोलीस उपनिरीक्षक दीपक राणे आणि त्यांचे कर्मचारी यांनी येथील आठवडी बाजारात फिरून कोरोणाचे नियम काटेकोर पाळण्याचे सांगितले तसेच दुपारी 4 वाजेनंतर बाजार बंद राहील त्यामुळे दुकाने बंद करा असे आवाहन ठाणेदार यांनी बाजारात फिरून केले यावेळी त्यांच्या तोंडाला मास्क दिसला नाही त्याला थांबून मास्क बांधा असे सांगून लोकांना सोशल डिस्टंसिंग पाळण्याच्या सूचना दिल्या आणि यापुढे दर बिना मास्क दिसलास तर कठोर कारवाई करू असा सज्जड दम ही यावेळी ठाणेदारांनी दिला यावेळी त्यांच्या समवेत सहाय्यक पत्रकार भगवान साळवे पोलीस उपनिरीक्षक सुरजसिंग ठाकूर पोकाँ विशाल बनकर, प्रकाश मुंडे,चालक आंभोरे माजी सरपंच साबेर पठाण दिनकर बावरे पत्रकार होते

हयातनगर येथे तात्काळ नाल्यातीळ गाळ व साफ सफाई करण्याची जनविकास महासंघाची मागणी

0

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधि सेनगाव

चार दिवसांत साफ सफाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा
वसमत तालुक्यातील हयातनगर येथे गेल्या काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य वाढले असुन त्यामूळे डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे त्यामुळे या डासांमुळे लहान, वृध्द व नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मलेरियाचा आजार वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे काही ठिकाणी डेंग्यू , मलेरिया या सारखे खतरनाक आजार होऊ नये यासाठी जनविकास महासंघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष साईनाथ गिरी यांच्या नेतृत्वाखाली हयातनगर ग्रामपंचायला एक निवेदन दिले असून या निवेदनात गावातील सार्वजनिक परिसर,नाल्यातील गाळ,सांडपाण्याची विल्हेवाट व व्यवस्थित लावून व गावातील साफसफाई करुन द्यावी अशी मागणी या निवेदनात केली आहे
चार दिवसांत साफ सफाई नाही झाली तर आंदोलन करु असा इशारा या नेवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर साईनाथ गिरी,विनोद अंभोरे , तुकाराम जिरे यांच्या सह असंख्य नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत ग्रामप्रशासनाल नेवेदन देते वेळी जनवाकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाईनथ गिरी.विनोद अंभोरे.तुकाराम जिरे.ज्ञानेश्वर सारंग.अनिल सारंग.बिस्मिला पठाण.वेभव बुलबुले.शिवाजी खाडे.विशाल खाडे.सतिश.सारंग आदी उपस्थित होते व या निवेदनाच्या प्रति सर्व संबंधितांना पाठवलेल्या आहेत

शेगाव वरुण श्री क्षेत्र तुळापूर संभाजी महाराज समाधी स्थळ येथे सायकलने रवाना 

0

 

शनिवार दि. 20 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते धर्मवीर संभाजीराजे चौक ते श्रीक्षेत्र शेगाव पासून श्रीक्षेत्र तुळापुर संभाजी महाराज स्थळ पुणे येथे बलिदान मांस निमित्ताने सायकल यात्रा काढण्यात आली. आकाश भाऊ पाटील या युवकाने ही सायकल यात्रा काढली होती.

या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक नागेश दादा देशमुख, किशोर भाऊ महल्ले, आशिष दादा सावळे, सागर भाऊ काशिद, राजू भाऊ तायडे, लखन भाऊ देशमुख, वैभव ठाकरे व इतर मित्र परिवार उपस्थित होते. या सर्वांनी आकाश भाऊ पाटील यांना शुभ यात्रेच्या शुभेच्छा देऊन त्यांचे मनोबल वाढविले.

 

पोलिसांच्या पुढाकाराने आयोजित राेजगार मेळाव्याचा 1182 युवक-युवतींना लाभ

0

 

गोंदिया शैलेश राजनकर

गोंदिया,दि.20 : नक्षली चळवळीचा बिमोड करण्याच्या ध्येयाने गोंदिया पोलिसांनी अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा विडा उचलला आहे. विविध उपक्रमाच्या अंमलबजावणीतून आदिवासी युवकांना रोजगाराची संधीही उपलब्ध करून दिली जात आहे. ऐवढेच नव्हेतर आदिवासी युवक-युवतींमधील सुप्त गुणांना वाव ही देण्याचे काम गोंदिया पोलिसांकडून केले जात आहे. पुणे, मुंबई येथील कंपन्यांमध्ये आवश्यकतेनुसा दुर्गम भागातील आदिवासी युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे.16 ते 18 फेबुवारी दरम्यान देवरी,नवेगावबांध व सालेकसा याठिकाणी हा रोजगारमेळावा आयोजित करण्यात आलेला होता.यात गृप आॅफ कंपनी पुणे,पटेल एज्युकेशन स्कील फाऊंडेशन नागपूर,इमर्ज वर्क फोर्स नागपूर,डेक्कन मॅनेजमेंट कंसल्टंट फिनीसींग स्कुल,पुणे आदी कंपनीचे प्रतिनिधीनी मुलाखत घेतल्या.या मेळाव्यात 1182 सुशीक्षित बेरोजगार युवक युवतींनी सहभाग नोंदविला.पोलीस अधिक्षक विश्व पानसरे व अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात हे आयोजन करण्यात आले होते.युवकांना रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.आयोजनासाकरीता देवरी,नवेगावबांध व सालेकसा पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी घेतली कोविशिल्ड लस

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा:-कोरोनाविरूदध निर्णायक लढाई सुरू असून या विषाणूवर कायमस्वरूपी नियंत्रण मिळविण्यासाठी कोविशिल्ड लसीचे लसीकरण जिल्हयात सुरू आहे. त्यानुसार आज जिल्हा सामान्य रूग्णलयातील लसीकरण कक्षात जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कोविशिल्ड लस घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तडस उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले, लसीकरणाच्या लाभार्थ्यांनी टप्प्यानुसार अवश्य लस घ्यावी. कुठल्याही प्रकारे अफवांना बळी न पडता लस टोचून घ्यावी. लस ही पुर्णपणे सुरक्षीत असून 100 टक्के खात्रीशीर आहे.

सिंदखेडराजा तालुक्यामध्ये कोरोनाची वाढती संख्या !’ ३४ ऍक्टिव्ह रुग्ण ! ११० जणांचे स्वॅब तपासणीला !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सध्या कोरोना ने परत एकदा डोके वर काढले असून अनेक ठिकाणी कोरोना ची संख्या वाढतच आहे ‘प्रशासन लोकांना काळजी घेण्याचे आव्हान करत असून ‘अजूनही लोक बेपर्वाईने वागतच आहे ‘सिनखेडराजा तालुक्यामध्ये दिनांक 20 फेब्रुवारी रोजी34 कोरोना चे रुग्ण असून त्यावर उपचार सुरू आहे .त्यामध्ये rt-pcr ‘टेस्ट करण्यासाठीची स्वॅब बुलढाणा येथील लॅब मध्ये पाठवण्यात आले असून ‘दोन दिवसांमध्ये त्यांचा रिपोर्ट येईल ‘तर 42 रॅपिड टेस्ट पैकी .दोन रुग्ण कोरूना पॉझिटिव्ह स्थानिक सिंदखेडराजा मध्ये सापडली आहे ‘त्यापैकी ४० निगेटिव आहेत ।लोकांनी तोंडाला मागचा वापर करावा गर्दीत जाणे टाळावे असे आवाहनही यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्रकुमार साळवे यांनी केली आहे ‘

महाराष्ट्र राज्यातील 300 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी त्यामध्ये सिंदखेडराजा तालुक्यातील एकमेव गोरेगाव येथील जिल्हा परिषदेचा शाळेचा समावेश … ( माजी सरपंच पती संजय पंचाळ यांनी केला होता सतत पाठपुरवठा )

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

महाराष्ट्र राज्यातील 300 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करायच्या आहेत यामध्ये प्रत्येक तालुक्यातील एक शाळा याप्रमाणे सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे ‘गोरेगावचे माजी सरपंच पती संजय पांचाळ यांनी सतत गावातील शाळा विकसित झाली पाहिजे यासाठी पाठपुरावा केला होताव त्यांच्या पाठ पुरावा याला शिक्षण विभागाने मान्यता सुद्धा दिली आहे ‘याबाबत महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक क्रमांक ‘ २० २० I प्र .क. १४३ / एसडी – ६यामध्ये तसे आदेश संबंधित विभागांना देण्यात आली असून यामध्ये विकसित करावयाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ।यामध्ये 1ते सातवी वर्गाच्या जिल्हा परिषद शाळा असतील त्या आठव्या वर्गापर्यंत जोडण्यात याव्यात ‘आदर्श शाळा म्हणजेच ‘यामध्ये भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवता ,व प्रशासकीय बाबींचा यामध्ये समावेश असेल,यामध्ये भौतिक सुविधा मध्ये स्वतंत्र स्वच्छालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, ici लॅब,सायन्स लॅब ग्रंथालय शिवाय आसपासच्या खेडे गावापर्यंत येण्यासाठी सुसज्ज असे रस्ते असतील !
शैक्षणिक गुणवत्तेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण उपलब्ध राहील पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील .,
आदर्श शाळा यामध्ये गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा समावेश झाल्यामुळे उमनगाव ‘ पांगरी काटे, वडगाव माळी, तांदुळवाडी ,सायाळा, लिंगा या भागातील विद्यार्थी गोरेगाव येथे शिक्षण घेऊ शकतील ‘ सिंदखेडराजा तालुक्यातील एकमेव आदर्श शाळा विकसित करायची असल्यामुळे व त्यामध्ये गोरेगाव येथील जि.प. शाळेचा समावेश असल्यामुळे निश्चितच ही अभिमानास्पद गोष्ट म्हणावी लागेल ‘संजय पांचाळ यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे निश्चितच एक शाळेतून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल . !

सुतार काम करणाऱ्या लोकांना शासनाने स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्यावे !सुतार कामगार ज्ञानेश्वर जाधव यांची मागणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुतार व्यवसाय करणारे सुतार कामगार आहेत की ज्यांनी स्वतःची मशीन घेऊन लाकडांना आकार देऊन आपला घर गाडा चालवण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत ‘शिंदी येथील सुतार कामगार तिचे गेल्या 22 वर्षांपासून सुतार काम करतात व आपल्या घरांचा संसाराचा गाडा पुढे हाकलत आहेत ‘सुतार असलेले ज्ञानेश्वर जाधव ‘यांनी सांगितले की गेल्या 22 वर्षांपासून सुतार व्यवसाय करत आहे यामध्ये लोकांच्या घराच्या खिडकी असतील दरवाजे असतील पाठ असेल कोलपाट असेल सोपा असेल अशा विविध प्रकारच्या वस्तू आम्ही बनवत असतो ‘शिवाय स्वतःची मशीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मशीन ला वीज लागते ‘बिलही अव्वाच्या सव्वा येते ‘अशा परिस्थितीमध्ये लोक जेमतेम पैसे देतात ‘या घरातील दवाखाना असेल मुलांचे शिक्षण व अन्नधान्याचा वस्तू असतील या कमी पैशांमध्ये कशी भागणार ?अनेक मजूरासाठी शासनाने स्वतंत्र पॅकेज जी ची निर्मिती केली आहे परंतु सुतार व्यवसायिक आजही संकटात आहे ‘त्यांच्यावर लॉक डाऊन मध्ये उपासमारीची वेळ सुद्धा येऊन गेली आहे व परत येणार आहे ‘म्हणून मायबाप शासनाने सुतार व्यवसायिक कामगारांना स्वतंत्र पॅकेजमधून आर्थिक मदत द्यावी जेणेकरून ते आपल्या घराचा प्रपंच भागू शकेल असे मागणीही यावेळी सुतार व्यवसायिक ज्ञानेश्वर जाधव यांनी केली आहे !

सौ. नंदाताई पाऊलझगडे यांचा शिवजयंती दिनी सामान्य जनतेच्या समस्या सोडवून त्यांना चिंतामुक्त करण्याचा संकल्प.

0

 

छत्रपती शिवाजी महाराज हे बारा बलुतेदार यांचे राजे आहेत तसेच त्यांच्या काळात जनतेस कधीच अडचण आली नाही. ते एक उत्तम राजकारणी होते एवढे मोठे राजकारणी आता होणे नाही पण त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. असा संकल्प ताईंनी शिवजयंती दिनी घेतला आहे. सौ. नंदाताई पाऊलझगडे यांनी त्यांच्या निवासस्थानी पारंपरिक शिवजयंती चा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास रोकडीया नगर येथील महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रम पूर्ण झाल्या नंतर ताईंनी शेगाव तालुका व परिसरातील महिलांना व नागरिकांना येणाऱ्या समस्या त्या स्वाता सोडविण्याचा प्रयत्न करेल असे आवाहन ताईंनी नागरिकांना केले आहे सामान्य जनतेचे सर्वच प्रकारच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करून त्यांना चिंतामुक्त करण्याचा आगळा वेगळा संकल्प ताईंनी शिवजयंती दिनी घेतला आहे.

अँड नाझेर काझी साहेबांनी केला आडगावराजा ग्रामपंचायतच्या सरपंचाचा सन्मान.,, !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

स्व.आर.आर.पाटील तालुकास्तरीय प्रथम सुंदर गावाचा पुरस्कार आडगावराजा ग्रामपंचायतीला मिळाल्याबदल राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्याक्ष अँड.नाझेर काझी साहेबांनी प्रातिनिधीक स्वरुपात रामदास कहाळे यांचा राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची प्रतिमा देऊन19 फेब्रुवारी रोजी सन्मान केला
ग्रामविकासासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायतीला ऊर्जा देण्याचे काम स्व .आर.आर.पाटील आबा यांनी केले होते त्यामुळे
राज्यशासनाने त्यांच्याच नावाने स्व.आर.आर.पाटील स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धा आयोजित करुन ग्रामपंचायतीना स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ऊर्जा देण्याचे काम केले
याच अनुषंगाने ऐतिहासिक आडगावराजा ग्रामपंचायतीने चांगले काम करुन
तालुकास्तरीय प्रथम क्रमाकांचे पारीतोषीक
मिळवले या बदल राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्याक्ष अँड .नाझेर काझी साहेबांनी रामदास कहाळे यांचा जिजाऊ प्रतिमा देऊन सत्कार केला आणी व ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकारी यांच्या सह गावकरी मंडळी चे अभिनंदन केले आहे