Home Blog Page 527

मराठी भाषा दिनानिमित्त मनसे तर्फे कवी यांचा सत्कार

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस मराठी राजभाषा, मराठी गौरव दिन म्हणून 27 फेब्रुवारी ला साजरा करण्यात येतो.त्यानिमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा गोंदिया च्या वतीने गोंदिया येथील शासकीय विश्राम गृहात मराठी स्वाक्षरी अभियान तथा कवी, लेखक, दिग्दर्शक, वं पत्रकार असे मराठी भाषेला टिकवून ठेवणाऱ्या लोकांचा सत्कार शाल, पुष्पगुछ तथा श्रीफळ देऊन करण्यात आला. याप्रसंगी कोहमारा येथील आंतरराष्ट्रीय कविरत्न पुरस्कार प्राप्त नवोदित कवी अश्लेष माडे यांचा शाल वं श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अश्लेष माडे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. व मराठी भाषेला अभिजात दर्जा कसा प्राप्त होईल यावर आपले मनोगत व्यक्त केले. या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष मा. मनिषभाऊ चौरागडे, हेमंतजी लिल्हारे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेशजी मिश्रा,तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे तर सत्कार मूर्ती म्हणून माणिकजी गेडाम (कवी, साहित्यिक ), जयंतजी शुक्ला (लोकशाही वार्ता), हिदायत शेख (देशोन्नती), दिनेश फरकुंडे (दिव्यांग मराठी चित्रपट निर्माते ), दिलीप कोसरे (दिव्यांग मराठी चित्रपट दिग्दर्शक), मिलन रामटेककर (सरपंच फुलचूर ग्रामपंचायत)आदी उपस्थित होते. आयोजक म्हणून राजेश नागोसे, क्षितिज वैद्य, रजत बागडे, खेमा ठाकरे, रोहित उके, निर्वाण वानखेडे, राहुल वाकरे, संदीप राहुलकर, सुमित कावळे, शुभम चौहान, राना नागपुरे, अमोल लांजेवार सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष आदी उपस्थित होते.

साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार श्री दीपक राणे यांना कोरोना ची लागण !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वेगाने वाढत असताना ‘आरोग्य कर्मचारी ,सफाई कामगार व पोलीस कर्मचारी हे आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या काळजी साठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत,याचाच परिपाक म्हणून अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन ते पूर्णपणे बरे झाल्याचे आपण बघितले आहेत,व परत ते जनतेच्या सेवेसाठी कर्तव्यावर हजर झालेले आहेत,तालुक्यातील सर्वात मोठे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार श्री दीपक राणे यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यामुळे श्री राणे यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करावी असे आव्हान केले आहे,साखरखेडा पोलीस स्टेशन मध्ये काही पोलिस कर्मचाऱ्याच्या कोरोना टेस्ट केली असता त्यामध्ये दुय्यम ठाणेदार श्री दीपक राणे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे ‘तर साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे ‘गेल्या चार वर्षापासून दुय्यम ठाणेदार श्री दिपक राणे हे आपले कर्तव्य चोखपणे साखरखेर्डा येथे बजावत आहे .ठाणेदार यांच्या खांद्याला खांदा लावून अविरतपणे ते आपली सेवा बजावत आहे .तरी जनतेने काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान यावेळी ठाणेदार श्री आडोळे यांनी केली आहे ‘

मोटर सायकल धडकून 35 वर्ष इसमाचा मृत्यू

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा ते चांगेफळ या रोडवरील सौदागर यांच्या शेताजवळील पुलाच्या कठड्यावर मोटारसायकल धडकुन झालेल्या भिषण अपघातात एक इसम जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान घडली आहे.सदर इसम हा जळगांव जामोदहुन संग्रामपुर कडे जात होता.सदर इसमाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षाच्या दरम्यान आहे.सदर इसम हा MH28 N5146 क्रमांकाच्या हिरो होंडा कपनीच्या मोटरसायकलने जात होता. सदर घटनेची माहिती मिळताच जळगांव जामोद येथील ग्रामीण रुग्णालय येथील वाहन चालक राजु बुटे व त्यांच्या टिमने घटनास्थळी अँब्युलन्सने धाव घेत सदर इसमाला ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सदर इसमाची अद्यापर्यंत ओळख पटलेली नाही. सदर व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन जळगाव जामोद पोलीस स्टेशन च्या वतीने करण्यात आले आहे घटनास्थळी जाऊन जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सदर मृत इसमाच्या अंगामध्ये निळ्या कलरचे शर्ट, पांढरे बनियन, हातामध्ये कडे ,कानामध्ये बाली, तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची आयडी अथवा कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा नव्हता सदर इसमाची ओळख पटल्यास जळगाव जामोद पोलीस स्टेशन ला संपर्क करावा असे आवाहन जळगाव जामोद पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.

शिंदी येथे 109 जणांनी केली कोरोना चाचणी !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे)

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता शिंदी येथे दिनांक २७ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत व साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने शिंदी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये कोरोना चाचणीचे आयोजन करण्यात आले होते,शिंदी चे ग्रामसेवक अर्जुन गवई व सरपंच विनोद खरात यांच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले होते ‘सकाळी नऊ वाजेपासून कोरोना चाचणीला सुरुवात करण्यात आली होती ‘यामध्ये सर्दी खोकला ताप असलेली व्यक्ती,दमा, बी पी, शुगर, असलेली व्यक्ती,तसेच करून पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात असलेली हाय रिक्स व्यक्ती, असलो स्लो रिक्स व्यक्तीचा यात समावेश होता . तरुण महिला वयोवृद्ध माणसांनी हिरहिरीने सहभाग नोंदवला .व कोरोना चाचणी करून घेतली ‘यामध्ये तब्बल १०९ जणांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली यानंतर हे स्वॉब तपासणीसाठी बुलढाणा येथे पाठवण्यात आले असून उद्या संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येणे बाकी आहे,येळी पत्रकार सचिन खंडारे सरपंच विनोद खरात प गजानन भांड ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश बंगाळे अरविंद खंडारे सुनिल ताडे आदींनी यावेळी आपली कोरोना टेस्ट करून घेतली,यावेळी ग्रामसचिव अर्जुन गवई, सरपंच विनोद खरात,समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत वायाळ ‘आरोग्य सहायक श्री बी ए भोंडे,आरोग्य सेविका जे .एस . चांगाडे,आरोग्य सेविका डी ए पिठलोड,पी टी एल ए , श्रीमती गीता नरवाडे,आशा सेविका सौ लता बंगाळे, आशा सेविका उर्मिला बुरकुल,आदींनी यावेळी उपस्थित राहून सहकार्य केले,

भारतीय बहुऊदेशीय पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी विजय बन्सोड ( ग्रामीण ) व पाशु शेख ( शहर )यांची सर्वानुमते निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे,

भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ , महाराष्ट्रची नुतन प्रदेश कार्यकारणी जाहीर झाली असुन, पत्रकार संघाच्या प्रदेश ग्रामीण अध्यक्षपदी विजय धोंडोपंत बन्सोड आणी प्रदेश शहर अध्यक्षपदी पाशु शेख यासिन यांची निवड करण्यात आली आहे . गंगापुर जिल्हा औरंगाबाद येथे नुकतीच भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ, महाराष्ट्रच्या राज्य कार्यकारणी बैठक संघाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब जी पटेल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होवुन , वर्ष २०२१ ते २०२२साठीची राज्य कार्यकारणीची निवड करण्यात आली असुन , यात महाराष्ट्र प्रदेश ग्रामीण विभागाच्या प्रदेश अध्यक्षपदी विजय धोंडोपंत बन्सोड यांची तर प्रदेश शहर विभागाच्या अध्यक्षपदी पाशु शेख यासीन यांची निवड करण्यात आली असुन तर प्रदेश उपाध्यक्षपदी अय्युब मेहबुब पटेल आणी विष्णु अवचार यांची व सचिवपदी जिवन मुरलीधर चौधरी , मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी अलीम चाऊस यांची कार्याध्यक्षपदी प्रा . सुनिल तिजारे , विजय आंनदा जोशी , सुनिल गावडे , संघटकपदी पराग विजय सराफ , कार्यवाहकपदी सलीम रशीद पटेल , नरेन्द्र एफ .सपकाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे . गंगापुर येथे संपन्न झालेल्या बैठकीत राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील पत्रकारांच्या विविध अडचणी आणी समस्याबाबत चर्चा करण्यात आली . प्रसंगी देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेले जवान तथा पत्रकारांच्या कुटुंबातील मयतांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली . यावेळी नुतन प्रदेश अध्यक्षपदी निवड झालेल्या विजय बन्सोड आणी पाशु शेख आणी प्रदेश उपाध्याक्षपदी निवड झालेले अय्युब मेहबुब पटेल यांचे स्वागत सत्कार संस्थापक अध्यक्ष अय्युब जी पटेल यांच्या हस्ते करण्यात आले तर उपस्थित सर्व पत्रकारांचे आभार प्रदेश सचिव जिवन चौधरी यांनी मानले .

 

यावल नगर परिषद साठवण तलावाच्या जेकवेल हाऊसमधील सुमारे २ लाख२० हजार रूपयांचे साहीत्य चोरीस अज्ञात चोरटयांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

,वेथील नगर परिषदच्या पाणीपुरवठा साठवण तलाव येथील दोन महागड्या मोटर्स चोरीस गेल्या असल्याने नगर परिषद वर्तृळात एकच खळबळ उडाली असुन याबाबतची यावल पोलीसात अज्ञात चोरट्यांच्या विरूद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे . या संदर्भात पोलीस सूत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , यावल नगर परिषदच्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावाच्या जेकवॅल हाऊस मधील पक्या ईमारतीच्या खोलीतुन दिनांक २५ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी नगर परिषदच्या मालकीचे जेककॅल हाऊस खोलीचे शटर तोडुन व उघडुन आत प्रवेश करून ९० हजार रुपये किमतीची दोन ३०एचपी क्षमतेची इलेक्ट्रीकल मर्सिबल ओपन वेल पंप, तसेच ३५स्केअर एमएम व्यासाचा कॉपर वायर५o मिटर असे एकुण २ लाख२० हजार रुपये किमतीचे साहीत्य चोरून नेल्याची घटना घडली असुन याबाबत यावल नगर परिषदचे पाणी पुरवठा चे प्रभारी अधिकारी व वरीष्ठ लिपिक रमाकांत गजानन मोरे यांनी फिर्याद दिल्याने पोलीसात भाग ५ गुरन३४ / २०२१ भादवी कलम३८० , ४५७ , ४२७ प्रमाणे अज्ञात चोरटया विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस उपनिरिक्षक अजमल पठाण हे करीत आहे . दरम्यान या संपुर्ण शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावावर दोन दोन सुरक्षा रक्षक असतांना अशा प्रकारे नगर परिषदच्या महागडया वस्तु चोरीस गेल्या कशा असा प्रश्न नागरीकांमध्ये उपस्थित केला जात आहे .

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या देशव्यापी काव्यस्पर्धेचा निकाल जाहीर

0

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड-एक वादळ आयोजित राज्यस्तरीय ‘काव्यस्पर्धा’ या ऑनलाईन पद्धतीने समुहाच्या माध्यमातून काव्य स्पर्धेचे आयोजन शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी दिनांक १९फेब्रुवारीला करण्यात आले होते.या स्पर्धेचा निकाल छत्रपती राजाराम महाराज जयंती दिनी समुहाच्या वतीने जाहीर केला.ही स्पर्धा काव्यस्पर्धा १व २या दोन्ही समुहात पार पडली.यामध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून रचना प्राप्त झाल्या.या रचनांचे परिक्षण सुप्रसिद्ध कवयित्री.रिया पवार (मुंबई ) आणि सुप्रसिद्ध गझलकार आनंद देवगडे (यवतमाळ ) यांनी केले.या स्पर्धेचे आयोजन दोन समुहात झाल्यामुळे दोन्ही समुहातुन प्रशिक्षकांनी दिलेत.काव्यस्पर्धा समुह १मधुन प्रथम क्रमांक नंदकिशोर कदम, द्वितीय क्रमांक वसुधा नाईक(पुणे), तृतीय क्रमांक प्रशांत बागुल व.चतुर्थ क्रमांक प्रितम कुमार देवतळे, ओंकार राठोड,व सांगोला तालुक्यातील गौडवाडी गावचा तसेच पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनेरिंग कॉलेज सांगलीचा विध्यार्थी कु.तुषार पोपट गुळीग(TY.B.TECH)यांना मिळाला.तसेच काव्यस्पर्धा समुह २ मध्ये सर्वोत्कृष्ट रामदास गायधने, उत्कृष्ट रझिया इस्माईल जमादार, प्रथम वर्षा मेंढे, व्दितीय संजय तांबे, तृतीय वर्षा फटकाळे वराडे व प्रोत्साहनपर गणेश निकम, राजश्री मराठे,भारती तिडके, निलिमा नरके ,अमित वीर,सौ.सुनिता कपाळे,सौ.करुणा कंद,सौ.प्रतिमा काळे, वैशाली शंकर यांनी पटकाविलेत.
दोनही प्रशिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेचे आयोजन समुहप्रमुख काव्यभुषण कवी.विशाल इंगोले ( अजातशत्रु ),राहुल गजभिये, तसेच संकलन कवी.अमित मंदा अनिल,कवयित्री.आम्रपाली घाडगे,कवी.बादल जोगे,योग काळे, तेजस्विनी खेडकर व ग्राफिक्स अनिकेत कुहिरे,ओजस केदार यांनी केले.सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्र वितरित करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती व छत्रपती राजाराम महाराज जयंती
काव्यस्पर्धेच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.अशी माहिती कवी.अजातशत्रु व कवी.अमित अनिल मंदा यांनी दिली.

 

जातेगांव येथे प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी

0

 

प्रतिनिध-सचिन पगारे
नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथे विश्वकर्मा पांचाळ सूतार समाजासह तमाम ग्रामस्थांकडून सृष्टीनिर्माता भगवान विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.
भगवान विश्वकर्मा वास्तूकला,चौसष्टकलेची देवता असून विश्व निर्माण करणारे परमात्मा आहे. ते देवशिल्पी नसून तेच सृष्टिनिर्मितीची बीजे निर्माण करणारे व जडचेतन सृष्टी निर्माण करणारे निर्माता आहे. जगाच्या या निर्मात्याचा जन्म माघ शुद्ध त्रयोदशीला विश्वकर्मा जयंती म्हणून साजरा केला जातो.यंदा ही विश्वकर्मा जयंती २५ फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात आली.सालाबादप्रमाणे तालूक्यातील घाटमाथ्यावरील जातेगांव येथे विश्वकर्मा पांचाळ सूतार समाजासह ग्रामस्थांच्या विशेष सहकार्याने
व माऊली वारकरी शिक्षण संस्था जैतापूर येथील विद्यार्थीनींच्या विशेष उपस्थितीत विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.भगवान विश्वकर्मा प्रतिमेसह गावात विशेष शोभायात्रा काढण्यात आली.परिसरातील समस्त नागरिक व समाजबांधवांनी प्रतिमेचे पूजन केले.या प्रसंगी बालकिर्तनकार तेजस्विनीताई जाधव यांचे सुश्राव्य किर्तन जयंती सोहळ्यातील कौतूकाचा विषय ठरला.सूभाष पवार यांच्यासह नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांनी उपस्थित वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला.सदर जयंती उत्सवासाठी शांताराम जाधव,शिवहार जाधव,दादा जाधव,गणेश जाधव,ईश्वर जाधव,मच्छिंद्र बागूल,आण्णा बागूल,नंदू जैतमल,विनोद सोनवणे,रामेश्वर सोनवणे आदी समाज बांधवांसह तमाम नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.

कोरोना च्या संकट काळामध्ये, सावंगी भगत येथे डेंग्यूचा रुग्ण आढळला, .पालकांमध्ये भीतीचे वातावरण !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

कोरोना च्या संकट काळामध्ये लोक भयभीत झालेले असताना सिंदखेडराजा तालुक्यातील सावंगी भगत या छोट्याशा गावांमध्ये डेंग्यूचा रुग्ण परत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे ‘अगोदरही सांवंगी भगत गावामध्ये चार ते पाच डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते .त्यानंतर आरोग्य विभाग साखरखेडा यांच्या वतीने दोन तीन वेळेस घराची ची फवारणी सुद्धा करण्यात आली होती,परंतु परत प्रवीण चंद्रकांत गवई यांचा लहान मुलाला ताप येऊ लागल्यामुळे त्यांनी तातडीने चिखली येथील खासगी दवाखान्यांमध्ये मुलाला भरती केले .त्यानंतर मुलाचे रक्त लघवी चे नमुने तपासले असता ,मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला व त्याला डेंगू झाल्याचे निष्पन्न झाले ! सावंगी भगत गावची लोकसंख्या जेमतेम दोनशे ते तीनशे आहे,मोलमजुरी करून पोट भरणारे मजूरवर्ग येथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे,अशातच डेंग्यूच्या साथीमुळे सावंगी भगत पालक वर्ग भयभीत झाला आहे,गावामध्ये आरोग्य विभागाने कठोर पावले उचलण्याची मागणी यावेळी पालक प्रविण चंद्रकांत गवई यांनी केली आहे ‘ -तर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र कुमार साळवे यांच्याशी संपर्क साधला असता .त्यांनी आपण तातडीने उपाययोजना करू व तसे काळजी घेण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दिले आहे असे सांगितले ‘

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवेकानंद आश्रमाचे प्रवेशद्वार बंद !भाविकांनी दर्शनासाठी येऊ नये संस्थांचे आवाहान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

आपल्या शैक्षणिक , व सांस्कृतिक,आरोग्य सेवा, जनसेवेसाठी जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये परिचित असलेले मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रम भाविकासाठी कोरोना च्या पार्श्वभूमीवर विवेकानंद आश्रमाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आली आहे,मेहकर तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,हिवरा आश्रम येथे आठवड्याभरात मध्ये कोरोना चे सहा रुग्ण आढळून आले आहे,याच पार्श्वभूमीवर शासनानेव प्रशासनाने कोरोना वर निर्बंध आणण्यासाठी नियम व अटी घालून दिलेली आहे,विवेकानंद आश्रम मध्ये परमपूज्य शुकदास महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक दाखल होत असतात .म्हणून खबरदारी म्हणून विवेकानंद आश्रमाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून भाविकांनी घरूनच समाधीचे दर्शन घ्यावे असे आवाहन यावेळी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे !