Home Blog Page 53

Foreshtnews /अंबाबरवा अभयारण्याला मिळाला सर्वोच्च मानाचा तुरा

0

 

वनरक्षक कपील मोरे यांना सुवर्ण पदक

Foreshtnews:गुरुवार, २१ मार्च रोजी जागतिक वन दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे वनरक्षक कपील मोरे यांना शासनाचा सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांना सातपुड्याच्या कुशीतील दुर्गम भागात असलेल्या अंबाबरवा अभयारण्यातील उत्कृष्ट सेवेबद्दल देण्यात येत आहे.

अंबाबरवा अभयारण्याच्या या यशामुळे सोनाळा वनपरिक्षेत्राला मोठा बहुमान मिळाला आहे. कपील मोरे हे शेतकऱ्यांच्या कुटुंबातून शासकीय सेवेत दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना वन्यजीव विभागात वरिष्ठांकडून लौकिक मिळाला आहे.

KapusBajarbhav / कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत सुधारणा

अंबाबरवा अभयारण्याच्या या यशाचे श्रेय वनरक्षक कपील मोरे यांच्या प्रभावी कार्याला जातो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महसूल व वन विभागाने सन २२-२३ साठी त्यांना सुवर्ण पदकाच्या मानकरी घोषित केले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यापूर्वी सन १९२० मध्ये अंबाबरवा बीटच्या वनरक्षक कु. रुपाली राऊत यांना सुवर्ण पदक देऊन शासनाने गौरविले होते. आता दुसऱ्यांदा अंबाबरवा अभयारण्याला हा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे.

Foreshtnews:सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात याबाबतचे पत्र प्राप्त झाले असून, वनरक्षक मोरे यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुनिल वाकोडे, आर एफ ओ अंबाबरवा रेंज, सोनाळा यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी एलपीओ हॉलिडेजकडून आयोजन एक्सक्लुझिव्ह B2B एजंट्स मीटचं (B 2B )

0

 

B2B:पुणे – 18 मार्च 2025 : आंतरराष्ट्रीय पर्यटनक्षेत्रातील लोकप्रिय एलपीओ हॉलिडेज (LPO Holidays) कंपनीच्या वतीने पुण्यात ‘एक्सक्लुझिव्ह B2B ट्रॅव्हल एजंट्स मीट’चं शनिवारी (15 मार्च) आयोजन करण्यात आलं होतं.

स्थानिक ट्रॅव्हल एजंट्सना आंतरराष्ट्रीय पर्यटनविश्वाशी जोडून व्यवसायाला बळकटी देण्याच्या उद्देशाने या मीटचं पहिल्यांदा पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं, नंतर मध्य प्रदेशातील इंदूर, उत्तर प्रदेशातील लखनौ त्यानंतर संपूर्ण देशभरात अशा मीट्स आयोजित केल्या जाणार आहेत.

KapusBajarbhav / कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी कापसाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांपर्यंत सुधारणा

जागतिक पर्यटनाबद्दलची सखोल जाण असलेल्या अनुभवी कंपनीकडून एजंट्सना एक्सक्लुझिव्ह ट्रॅव्हल पॅकेजेस उपलब्ध करून देणं आणि तंत्रज्ञानातील संशोधन आणि सोयीसुविधांचा उत्तम मेळ व्यवसायात घालण्यात मदत करणं हा या मीटचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती एलपीओ हॉलिडेजचे संस्थापक आणि प्रमुख सुशील टिब्रेवाल यांनी दिली.

अमर्याद ग्रुप ट्रॅव्हल सोल्युशन्स, कम्पिटेटिव्ह प्रायझिंग याचबरोबर एक्सक्लुझिव्ह व्हाईट-लेबल संधींच्या माध्यमातून एजंट्सना त्यांच्या ब्रँडची लोकप्रियता  वाढवण्यासाठी एलपीओ हॉलिडेजशी केलेला करार उपयुक्त ठरणार आहे.

सुशील टिब्रेवाल म्हणाले, “ट्रॅव्हल इंडस्ट्रीतील अनेक वर्षांच्या अनुभवाच्या बळावर अगदी योग्य नियोजन करून ठरवलेल्या डिपार्चर आणि अरायव्हलच्या वेळा, कोणत्याही अडचणींविरहित ऑपरेशन्स देणारी कंपनी अशी ख्याती असलेली एलपीओ हॉलिडेज एजंट्सना हमी देते की, कुठलीही आंतरराष्ट्रीय पॅकेजेस शेवटच्या क्षणी रद्द होत नाहीत किंवा त्यात काहीतरी विचित्र बदलही केले जात नाहीत. एलपीओ हॉलिडेजची विश्वासार्ह सेवा आणि जादा फायदा यांच्या बळावर या मीटमध्ये सहभागी झालेले एजंट्स त्यांच्याकडची पॅकेज ऑफरिंग्ज वाढवू शकतील आणि अधिकाधिक कमाईही करू शकतील.”

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

एजंट्सना आपल्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम पर्यटन अनुभव देण्यात मदत करण्यासाठी विश्वासार्ह व मजबूत B2B कोलॅबरेशन्सच्या माध्यमातून एलपीओ हॉलिडेज ट्रॅव्हल व्यवसायाची पारंपरिक पद्धतीच बदलू पाहत आहे. या कोलॅबरेशन्समुळे एजंट्स आणि ग्राहक दोघांनाही आंतरराष्ट्रीय प्रवास सेवा सहज उपलब्ध होतील आणि किफायतशीर होतील.

B2B:“फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, उर्वरित युरोपासह सगळ जग फिरण्याचं प्रत्येक भारतीयाचं स्वप्न असतं आणि आम्ही ते स्वप्न वास्तवात आणतो. आमच्या एलपीओ हॉलिडेजची आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ट्रॅव्हल पॅकेजेस अनुभवल्यानंतर असंख्य भारतीय कुटुंबियांनी आणि ग्राहकांनी आनंदाची अनुभूती घेतली आहे,” असंही एलपीओ हॉलिडेजचे संस्थापक सुशील टिब्रेवाल यांनी सांगितलं.

युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव ( shivajimaharaj)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- शहरात तिथी प्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली.अभिनंदन मुनोत यांचा नेतृत्वात संध्याकाळी ५ वाजता शोभायात्रा संत तुकडोजी चौक येथून भूषण कापकर (शहर प्रमुख युवासेना) यांच्या अध्यक्षतेत शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाला हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा भीषण सामना (Farmer Suicides)

कारंजा चौक, विठोबा चौक, आंबेडकर चौक, महावीर भवन चौक या प्रमुख मार्गाने शोभायात्रा निघाली!मोठ्या संख्येने युवक ,महिला यांनी भगवे फेटे बांधून सहभागी झाले होते.

युवासेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव ( shivajimaharaj)

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Shivajimaharaj :तसेच मावळे तानाजी मालसुरे यांची तलवार, ५० पुरुष भजन हरिपाठ,शंकर आणि पार्वती नंदी वर बसून, सुंदर मनमोहक देखाव्यामुळे तसेच छावा चित्रपटातील दृश्य धुमाळ ढोल ताशाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शोभयात्रेत आनंदमय वातावरनात शोभायात्रा समापण करण्यात आले . कार्यक्रमाचे आयोजन युवासेने कडुन करण्यात आले.

आठ महिन्यांपासून वाट पाहणारे नागरिक: नुकसानीची भरपाई केव्हा?( nanduranews)

0

 

nanduranews:ग्राम चांदुर बिस्वा येथील नागरिकांना पाऊस आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही,

ही समस्या आता आठ महिन्यांपासूनची आहे. या नागरिकांनी या संबंधात शासनाकडे विनंती पत्र सादर केले आहे, ज्यामध्ये त्यांनी नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी विनंती केली आहे.

वाळू चोरीचा धंदा जोरात; प्रशासनाची कारवाई कुठे? (revenue)

 

विनंती पत्रात नागरिकांनी चक्रीवादळामुळे झालेल्या घरांची आणि गुरांची नुकसानी भरुन काढण्यासाठी निधी मिळण्याची मागणी केली आहे.

त्यांनी या संबंधातील काही पुरावे आणि उदाहरणे देखील सादर केले आहेत. पत्रावर आठ महिन्यांपूर्वी शासनाकडे सादर करण्यात आले होते, परंतु अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

“आम्ही शासनाकडे अनेक वेळा विनंती केली आहे, परंतु अद्यापही नुकसानीची भरपाई मिळाली नाही.

ही परिस्थिती आमच्यासाठी खूप कठीण आहे,” असे एका नागरिकाने सांगितले. पत्रातील एका महत्त्वाच्या बिंदूवर प्रकाश टाकताना त्यांनी नमूद केले की, “आम्ही शासनाकडून योग्य न्याय मिळवण्याची आशा करतो.”

 

चक्रीवादळामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन खूपच अव्यवस्थित झाले आहे.

घरांची नुकसानी आणि गुरांची हानी यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. या नुकसानीची भरपाई मिळणे हे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे त्यांना पुन्हा स्थिरता मिळेल.

शासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही, परंतु नागरिकांना आशा आहे की लवकरच त्यांची मागणी पूर्ण होईल.

nanduranews:त्यासाठी ते पुढील काही दिवसांत शासनाशी बैठक घेण्याचा विचार करत आहेत. या बैठकीत ते पुन्हा एकदा आपली मागणी मांडतील आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतील.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश(sameerkumawar)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

sameerkumawar:हिंगणघाट :-विधानसभा निवडणुक पार पडल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट बाबत सातत्याने आमदार समीर कुणावार यांच्या पाठपुरावा सुरू होता अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश प्राप्त झाले

असून उद्या दिनांक १९/०३/२०२५ बुधवार रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांच्या दालनात दुपारी ४.३० वाजता आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

नागपूर हिंसा: पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशननंतर 80 जणांना अटक, शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी(Nagpurnews)

या बैठकीला मंत्री वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री, आमदार कुणावार,सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय मुंबई, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, जिल्हाधिकारी वर्धा, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई, उपसचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय मुंबई, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम

विभाग नागपूर, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट व संबंधित इतर अधिकारी उपस्थित राहणार असून या बैठकीमध्ये प्रामुख्याने वैद्यकीय महाविद्यालय बांधकाम, तसेच जागा हस्तांतरण व इतर मुख्य विषयांवर चर्चा होणार आहे.

… यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार कुणावार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटची निर्मिती हे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अशा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाला नविन ओळख प्राप्त होणार आहे.

sameerkumawar:हा प्रकल्प माझ्यासाठी ड्रिम प्रोजेक्ट असून कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प पुर्ण केल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेत अध्यक्ष अब्दुल कदीर बख्श तर उपाध्यक्ष पदी सचिन वाघे यांची नियुक्ति (media)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

media_हिंगणघाट – डिजिटल मीडिया क्षेत्राच्या वाढत्या प्रभावाला अधिक बळकटी देण्यासाठी आणि पत्रकारांना त्यांच्या हक्कांसाठी संघटित करण्याच्या उद्देशाने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र अंतर्गत हिंगणघाट तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली._

दिनांक 17 मार्च रोजी हिंगणघाट येथील के. जी. एन. हॉल येथे संपन्न झालेल्या एका विशेष समारंभात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

घराचा धाबा कोसळला, बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू(Brekingnews)

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या निर्देशनाखाली व राज्य समन्वयक इकबाल शेख यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडिया पत्रकारांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात सशक्त नेटवर्क उभारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

हिंगणघाट तालुका कार्यकारिणी – जबाबदारीची नवी धुरा
संघटनेच्या हिंगणघाट तालुका कार्यकारिणीत खालील पदाधिकारी निवडण्यात आले –

अध्यक्ष अब्दुल कदीर बख्श, उपाध्यक्ष सचिन वाघे, जावेद पाशा कार्याध्यक्ष आसिफ कुरैशी, सचिव करीम खान पठाण, सह सचिव मंगेश लोखंडे ,कोषाध्यक्ष प्रज्योत लिहितकर , सह कोषाध्यक्ष आसिफ मलनस, प्रसिद्धी प्रमुख राहुल दारुणकर, संघटक सैय्यद जाकिर,कार्यकारिणी सदस्य अश्विन बोन्दाडे, शेख फैमुद्दीन, निखिल ठाकरे, सलीम शेख विलास नवघरे, आदी डिजिटल मीडिया – बदलत्या युगातील प्रभावी माध्यम आजच्या डिजिटल युगात डिजिटल पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची ठरली आहे,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

डिजिटल मीडियाचा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर दिसून येतो. अशा परिस्थितीत, डिजिटल पत्रकारांच्या समस्या सोडवणे आणि त्यांना त्यांच्या हक्कांसाठी संघटित करणे हाच संघटनेचा मुख्य उद्देश आहे

या संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडिया संपादक व पत्रकार त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आणि माध्यम क्षेत्रात सक्षम भूमिका बजावण्यासाठी एकत्र येणार आहेत.

media_हिंगणघाट संघटनेच्या पुढील वाटचालीकडे लक्षया नवीन कार्यकारिणीच्या स्थापनेसह, डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संपादक आणि पत्रकारांना अधिक बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. पत्रकारांच्या हितासाठी संघटना सातत्याने कार्यरत राहील आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सामूहिक पातळीवर प्रयत्न केले जातील

पळसखेड भट येथील दोन युवकांचा अपघातात मृत्यू(Buldhananews)

0

 

 

जावेद शहा  बुलडाणा

Buldhananews :बुलडाणा तालुक्यातील पळसखेड भट येथील विठ्ठल पांडूरंग चिंचोले ( सेवानिवृत्त

कोतवाल ) यांचा मोठा मुलगा , स्व .धर्मराज विठ्ठल चिंचोले वय ३२ वर्ष ,, व सुधाकर सिताराम मोहिते यांचा मुलगा स्व. शंकर सुधाकर मोहिते वय २५ वर्ष हे संभाजीनगर येथून दि. १४/३/२०२५ रोजी संध्याकाळी भोकरदन मार्गे पळसखेड भट येथे आपल्या गावी येत असताना भोकरदन मार्गावर हिरेगाव जवळ दोघांचा अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने अपघात झाला

होळीनिमित्त गेट-टुगेदरचा परतीचा प्रवास अपघातात संपला(accdentnews)

Buldhananews :त्यांना उपचारासाठी संभाजी नगर येथे घाटी रुग्णालयात नेले असता उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून पळसखेड येथे दि. १५ / ३ / २०२५ रोज शनिवार ला दुपारी २ वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .या घटनेने पळसखेड भटसह पंचक्रोशीत हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.

होळी सणाच्या पर्वावर स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेतेवर धडक कार्यवाही (policenews )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

policenews:वडणेर :- दि 14/03/25 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक होळी सणानिमित्त अवैध धंद्यावर कारवाईची मोहिम राबवून पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे पो.स्टे. वडणेर हद्दीतील घाटसावली येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 44 लगत असलेल्या मनीषा जैस्वाल हीचे मालकिचे निर्मल साई ढाबामध्ये दारूबंदीबाबत प्रो.रेड केला असता, ढाब्याचे आतील रूममध्ये व बाथरूममध्ये तसेच ढाब्यासमोर उभ्या असलेल्या कारचे डिक्कीमध्ये सिलबंद खरर्ड्याचे खोक्यात व प्लास्टीक चुंगडीमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा साठा मिळुन आला असुन,

सदर दारूचा माल हा आरोपी नामे मनिषा जैस्वाल हिचे मालकिचा असुन, आरोपी नामे निमेष बिडकर हा तिचेकडे महिणा पगारावर दारूविक्रीचे काम करीत असुन, ते दोघेही त्यांचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता संगणमताने चोरट्या पध्दतीने अवैधरित्या दारूविक्रीचा व्यवसाय करीत असुन,

बच्चू कडूंची अनोखी धुळवड: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ५ किमी रस्ता रंगवला(Maharashtra Political )

सदर दारूचा माल हा आरोपी नामे आशिष कांबळे व मनोज चाफले यांनी त्यांचे कारनी आणुन दिल्याचे निष्पन्न झाल्याने, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून, आरोपी मनीषा जैस्वाल व निमेश बिडकर यांचे ताब्यातुन

1) 12 खरर्ड्याचे खोक्यात व 01 प्लास्टीक चुंगडीमध्ये देशी दारूने भरलेल्या गोवा नं. 01 कंपनीच्या प्रत्येकी 180 एम.एल. च्या 624 सिलबंद शिशा, कि 93,600 रू 2) 02 प्लास्टीक चुंगडीमध्ये विदेशी दारूने भरलेल्या रॉयल स्टॅग कंपनीचे प्रत्येकी 750 एम.एल. चे 16 सिलबंद बंम्फर कि 24,000 रू 3) दारू मालाची साठवणुक करण्याकरीता वापरलेली एक पांढ-या रंगाची Hyundai VENUE कंपनीची कार क्र. MH-32/AS-8552 कि. 10,00,000 रू असा जु.कि. 11,17,600 रू चा मुद्देमाल. जप्त करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

असुन, 1) मनिषा संजय जैस्वाल, वय 46 वर्ष, रा. घाटसावली, तह. हिंगणघाट, जि. वर्धा, 2) निमेष माणिक बिडकर, वय 38 वर्ष, रा. घाटसावली, तह. हिंगणघाट, जि. वर्धा, 3) आशिष ईश्वर कांबळे, रा. वडणेर, तह. हिंगणघाट 4) मनोज बबनराव चाफले, रा. बांबर्डा, तह. हिंगणघाट याचेविरूध्द पोलीस स्टेशन वडणेर येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

policenews:सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, विनोद कापसे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व खुशबु गोडघाटे (पो.स्टे. वडणेर) यांनी केली.

आर. डी. एम ग्रुप तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा(Amravtinews)

0

 

Amravtinews:स्थानिक अमरावती येथील आर. डी. एम ग्रुप तर्फे दिनांक 9 मार्च रोजी योग भवन, काँग्रेस नगर येथे महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. रविराज देशमुख सर यांनी केले तर अध्यक्ष स्थान डॉ. हसीना शाह (हिम सोसायटी अध्यक्ष)यांनी भूषविले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रुपेश खडसे (विदर्भ अध्यक्ष लहुजी शक्ती सेना) यांनी महिलांची ताकद एक झाली तर जगातील कोणतीच शक्ती त्यांना हरवू शकत नाही तसेच त्यांनी स्वावलंबी होणे गरजेचे आहे.

बच्चू कडूंची अनोखी धुळवड: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ५ किमी रस्ता रंगवला(Maharashtra Political )

व महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार यासाठी मी व माझी संघटना सदैव पाठीशी राहील असे जाहीर आव्हान डॉ रुपेश खडसे यांनी केले. तसेच लाडक्या बहिणींमुळे आज मोदी सरकार व फडणवीस सरकार उभे आहे त्यासाठी त्यांनी महिलांचे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमाला मा. रविराज देशमुख , डॉ. रुपेश खडसे, डॉ. उमक, मा. चरणदासजी इंगोले, सौ. पूनम खडसे, सौ. अलका सरदार, सौ. पदमा पुरी, सौ. प्रज्ञा मेश्राम, सौ. कल्पना जोंधळे, बंडूभाऊ जोंधळे, लाखनवाडी फिल्म अभिनेता विजयकुमार खंडारे व नाळ फिल्म बालकलाकार श्रीनिवास पोकळे उपस्थित होते. ऑटो चालक सौ. सुप्रियाताई गजभिये यांना प्रतिभावंत महिला व समाजसेविका म्हणून सन्मानित करण्यात आले.

तसेच उपस्थित पाहुण्यांनी कार्यक्रमाच्या आयोजिका श्लेषा वानखडे व शीलाताई गायकवाड यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी घेतलेल्या पुढाकारासाठी त्यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.

Amravtinews:चिमुकल्यांसाठी आयोजित वेशभूषा स्पर्धेत प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. सोनल सचिन मोटघरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

मका पिकांवर रानडुक्कर यांचा हौदास,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या कडून पाहणी.(FarmerNews)

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

FarmerNews:आरमोरी:-आरमोरी हे गडचिरोली जिल्ह्यातील एक सर्वच क्षेत्रात उन्नत तालुका म्हणून ओळखला जातो.या तालुक्यातील बहुतांश लोकांचा जीवनमान हे कृषी वर विसंबून आहे.

“पाण्याच्या चणचणीतून आत्महत्या; राज्य पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याची धक्कादायक घटना” (Buldhana Farmer Suicide )

या भागात धान्य,गहू व मका पिकाची लागवड केली जाते.आरमोरी साजा क्रमांक चार,सर्वे क्रमांक नवशे सतरा मध्ये मका पिकाची लागवड केली आहे.

परंतू काही दिवसांपासून रानडुक्कर यांनी हौदास घालून मका पिकाची नासाडी केली आहे.त्यामुळे येथील गरीब शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.अक्षरश: शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसटला आहे.

त्यामुळे आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष झालेल्या पिकांची शेतीवर जाऊन पाहणी केली आणि शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केले आहे.

FarmerNews:प्रसंगी सेवा निवृत्त केंद्र प्रमुख मेघराज बुरांडे, लोकप्रिय पान सेंटरचे मालक संजूबाबा मेश्राम व इतर शेतकरी यांनी आमदार रामदास मसराम यांना निवेदन सादर केले आहे.