Home Blog Page 530

डोंगर कठोर येथे भालोद प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनावर मार्गदर्शन

0

 

 

(यावल प्रतिनीधी) विकी वानखेडे

आज दिनांक 23/2/21रोजी डोंगर कठोरा येथे भालोद प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गतडोंगर कठोरा उपकेंद्रा चे मेडिकल ऑफिसर डॉ श्री हर्षल चौधरी यांनी कोरोना कोविड 19 हा वाढता प्रदुर्भाव लक्षात घेता ग्रामपंचायत कार्यालयात येथे सर्व सदस्य सरपंच उप सरपंच पोलीस पाटील यांना कोरोना संदर्भात माहिती दिली व कोरोनाचे लक्षण कसे ओळखले जातात त्या बद्दल माहिती दिली ते पुढे म्हणाले की मागील कोरोना पेक्षा हा आता वाढता कोरोना खूपच भयंकर आहे त्या साठी आपण आपल्या गावातील ग्रामस्थांची कश्या प्रकारे काळजी घ्यायची आहे ते समजावून सांगितले व सदस्य डॉ श्री आर सी झाबरे यांनी सुद्धा कोरोना पासून कसा बचाव करावा ही माहिती दिली ते पुढे म्हणाले मी माझ्या हॉस्पिटल मध्ये मोफत टेम्परेचर व ऑक्षिमिटर ने सर्व गाव कऱ्यांची मोफत तपासणी करीत आहे ज्यांना काही लक्षण असतील त्यांनी माझ्या हॉस्पिटल ला येऊन मोफत तपासणी करून घ्यावे व तसे काही आढळ्यास पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल किंवा कोविड सेंटर ला रेफर करून ट्रीटमेंट करावी व आपली व परिवाराची काळजी घ्यावी व गावातील ग्रामस्थ यांनी मास्क न वापरल्यास प्रत्येकी 50 रुपये दंड वसुल करून मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करू असे ते बोलत होते नवनिर्वाचित सदस्य दिलीप तायडे जुम्मा तडवी यांनी सुद्धा कोरोना संदर्भात व गावात कश्या प्रकारे सुरक्षितात राहील या बद्दल माहिती मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले कि आपले गाव आपली जबाबदारी म्हणून ग्रामविकास अधिकारी यांचा सल्ला घेऊन पुढील गावात कोरोना संदर्भात जनजागृती करावी असे सांगितले व बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची बस स्टॉप वर ओक्षिमीटर ने व टेम्परेचर घेऊन च गावात प्रवेश द्यावा व रात्री बाहेरील लोकांना प्रवेश बंदी करावी असे नियोजन करण्यात आले कार्यक्रमाला सर्व नवनिर्वाचित सरपंच श्री नवाज तडवी, उप सरपंच धनराज पाटील,ग्रामविकास अधिकारी आर सी पवार सदस्य श्री दिलीप तायडे,मनोहर झाबरे, डॉ आर सि झाबरे, जुम्मा तडवी, कल्पना राणे,कल्पना पाटील, शबनम तडवी, शकीला तडवी, हेमलता जावळे, एश्वर्या कोलते, आशा आढाळे, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, क्लर्क प्रदीप पाटील, शिपाई खेमचंद्र पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी सोमा कोल्हे,उपकेंद्राचे कर्मचारी डॉ हर्षल चौधरी, आरोग्य सहाय्यक चेतन कुरकुरे, श्रीमती एल व्ही चौधरी,आदींची उपस्थिती होती

अट्रावलच्या प्रसिद्ध मुंजोबा देवस्थान विश्वस्थातांना कोवीड१९ शासन आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी तहसीलदारांनी केले दहा हजार रूपयांचे दंड

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे,

जिल्हयात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असली तरी तालुक्यात सुरू असेलेल लग्न समारंभ, बाजारपेठा यामधे नागरीकांची गर्दी राहत असल्याने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून कारवाईचे सत्र सुरु झाले आहे. तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबा महाराज देवस्थानवर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रौत्सव रद्द असतांनाही सोमवारी (ता.२२) येथे भाविकांची गर्दी ऊसळून कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजनाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत तहसीलदार महेश पवार यांनी विश्वस्त समितीकडून दहा हजार दंड वसूल केला.
याशिवाय लग्न समारंभ विविध धार्मिक कार्यक्रमांत उपस्थितीतचे निर्बंध लावण्यात आले असताना देखील गर्दी होत आहे. येथे गंगानगरमध्ये एका विवाह सोहळ्यात आणि माधवनगरात एका जाऊळाच्या समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळुन आल्याने नगर पालिका प्रशासनाकडुन दोघं ठिकाणी प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.तसेच शहरात तेरा दुकानदारांकडून प्रत्येकी पाचशे प्रमाणे एकूण साडे सहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.येथे तब्बल साडे सव्वीस हजाराचा दंड वसुल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस प्रशासनाने कारवाई करत ३१ जणांकडून प्रत्येकी दोनशे प्रमाणे सहा हजार दोनशे रुपयाचा दंड वसुल केला आहे. तर गेल्या दोन दिवसात ३० जणांकडून प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे १५ हजाराचा दंड वसुुल केला होता .

जिल्हाधिकारी यांनी जनतेला सुरक्षिततेच्या नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश दिले असले तरी नागरीक मात्र अजुनही गाफील राहत असल्याने त्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाच्या वतीने पोलीस पाटील, पोलीस व संबधित प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेवून जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार कडक कारवाईचे आदेश दिल्याचे तहसीलदार महेश पवार यांनी सांगीतले . त्यानुसार पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला असून यापुढे नागरीकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघा्न केल्यास कडक कारवाइ करण्याचा येईल असा इशारा पो. नि. सुधिर पाटील यांनी दिला आहे.

शेतकऱ्यास दोन दिवसात डिपी उपलब्ध न करुन दिल्यास, प्रहार शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

0

 

प्रतिनिधी- सचिन पगारे
नांदगांव नाशिक

 

नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील शेतकरी विलास लाठे यांच्या शेतातील विद्युत डीपीत सूमारे तीन महिन्यांपासून बिघाड झाल्याने बंद झाली.यासंबंधित पाठपुरावा करूनही कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डी पी बसवून देण्यासाठी दखल घेतली नाही . सदर शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळणे अशक्य झाल्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे.सदर शेतकऱ्यास न्याय मिळण्यासाठी दखल घेणे आवश्यक आहे.सदर शेतकर्‍यास त्वरीत डी पी उपलब्ध न झाल्यास प्रहार शेतकरी संघटनेकडून महावितरण संबंधित कंपनी व ठेकेदारा विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नांदगाव तालूका प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी दिला .यावेळी विलास लाठे, जनार्दन भागवत, चंद्रभान झोडगे, नितीन गायकवाड, रविकांत भागवत आदी उपस्थित होते.

बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे कोरोना मुक्त ।पुढील १२ दिवस विलगीकरणात !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा सिंदखेडराजा मतदारसंघाचे आमदार तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री .नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे .हे कोरोना मुक्त झाले ’17 फेब्रुवारी रोजी ना . डॉ . राजेंद्रजी शिंगणे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता ‘त्यानंतर ते मुंबईतील बीचकॅन्डी हॉस्पिटल मध्ये उपचार करण्यासाठी दाखल झाले होते ‘यशस्वी उपचारानंतर नामदार डॉक्टर शिंगणे यांना 22 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता डिस्चार्जर मिळाला ।पुढील बारा दिवस ते विलगीकरण कक्षामध्ये आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे .नामदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खाते असल्यामुळे .गेल्या दीड वर्षापासून ते सतत कोरोनाच्या काळामध्ये औषधे च्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच मेडिकल दुकानदारांनी औषधाचा साठा करू नये यासाठी सतत संपूर्ण महाराष्ट्रभर ते फिरत राहिले ‘तसेच कोरोना च्या काळामध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे त्यांना .सकाळ समूहातर्फे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब मुख्यमंत्र्याच्या हस्ते ‘कोरोना योद्धा म्हणून सन्मानाने सुद्धा करण्यात आले होते .आमदार डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे यांचे मंत्रिमंडळातील सहकारी ‘ ना .राजेश भैय्या टोपे ना . जयंत पाटील ना .अनिलजी देशमुख ना .बच्चू कडू यांना सुद्धा कोरोना ची लागण झाली आहे हे सर्व मंत्री कोरोना च्या काळामध्ये सतत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लोकांच्या रक्षणासाठी फिरत राहिले ‘ ना .डॉ .राजेंद्रजी शिंगणे हे कोरोना मुक्त व्हावे यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रार्थना सुद्धा केली होती !

राष्ट्रीय समाज पक्षाची यापुढे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी !

0

 

. । पक्षाचे नेते अतुलभाऊ भुसारी यांची माहिती . ।

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

या पुढील काळातील बुलढाणा जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुका व बुलढाणा जिल्हा परिषद पंचायत समिती चा निवडणुका होतील त्या सर्व राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे.राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वाभिमानाने लढणारा पक्ष असून काही छोटे पक्ष आमच्या सोबत आले तर त्यांना सोबत घेऊ अन्यथा बुलढाणा जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुका व जिल्हा परिषद ,पंचायत समिती , नगर परिषद च्या निवडणूक स्वबळावर लढण्याची राष्ट्रीय समाज पक्षाची तयारी आहे.
राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपचा मित्रपक्ष असून त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही
राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मध्ये उत्साह वाढवा व. आगामी काळातील पक्षाची ध्येधोरणे याची रूपरेषा तयार करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आमदार आदरणीय श्री.महादेवरावजी जानकर साहेब , पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार साहेब.श्री. रत्नाकरजी गुट्टे साहेब, अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष व पक्षाचे महासचिव आदरणीय श्री.बाळासाहेब दोडतले साहेब , जिल्हा प्रभारी श्री.गजानन गोरोळे पाटील व अमोल काकड भगवान बावने राज्य कार्यकारिणी सदस्य यांचे नेतृत्वाखाली , मार्गदर्शनात व उपस्थिती मध्ये लवकरच बुलढाणा जिल्ह्यात पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल असे राष्ट्रीय समाज पक्षाचे बुलढाणा चे नेते अतुल भाऊ भुसारी पाटील सि.राजा तालुका अध्यक्ष रामप्रसाद लव्हकरे यानी सांगितले आहे !

शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी भाजपाच्या वतीने सिंदखेड राजा येथे जेलभरो आंदोलन !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

भारतीय जनता पार्टी सिंदखेडराजा तालुक्याच्या वतीने दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भामध्ये जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये
भारतीय जनता पक्ष मतदार संघातील सर्व तालुके व,शहर,युवा मोर्चा,महिला आघाडी,तसेच सर्व आघाड्याचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सरचिटणीस,सचिव,सदस्य बुध प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख ,जिल्हा पदाधिकारी ‘व सर्व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते तथा शेतकरी बांधव या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत तहसील कार्यालयासमोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे ‘ राज्यातील विजग्राहकांच्या व शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हे आंदोलन करणार आहेत आवकाळी ग्रस्त आणि गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार रुपये मदत करू असे मुख्यमंत्री मा.ऊध्दव ठाकरे यांनी घोषणा केली होती या घोषणा प्रमाणे सरकारने मदत दिलीच नाही .आवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी 10 हजार रुपये मदत मात्र मोठा गाजावाजा करुन जाहीर करण्यात आली मात्र ही मदत देतांना असे निकष लावले की फार कमी शेतकऱ्यांना मदत मिळु शकली तसेच कर्ज माफी ही पुर्ण शेतकरी बांधववांना मीळु शकली नाही कर्ज माफी पासुन सुध्दा असंख्य शेतकरी अजुनपण वंचित आहेत .कोरोणा महामारीच्या काळातील विज बिल माफ करू अशी घोषणा करणारे हेच सरकार शेतकऱ्यांची विज तोडत आहे .शेतकरी आत्महत्या करत आहे.या सरकारच्या काळात शेतकरी हवालदिल झाला आहे.कोरोणा काळातील विज बिल माफ व्हायला पाहिजे. विदर्भातील शेतकरी बोंड आळीमुळे त्रस्त.झाला आहे.30लाख हेक्टर वरील पिकांची राज्य सरकारने अजुनही दखल घेतली नाही. हे शेतकरी अजून ही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत या शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 25 हजार रुपये एवढी मदत करणे आवश्यक आहे.
एकीकडे शेतकर्याना थकीत विज बिल भरण्यासाठी क्रुषीसंजीवनी योजना चालू करता ‘आणि ही योजना चालू असताना शेतकऱ्यांचा विजपुरवठा थकबाकी मुळे तोडता ?असला तुघलकी कारभार बंद करा अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन हे जेल भरो आंदोलन होणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आव्हान या वेळी भाजपच्या वतीने सिंदखेड राजा भाजपा तालुका अध्यक्ष प्रा गजाननराव घुले यांनी केली आहे करण्यात आली आहे !

लोकसंघर्ष मोर्चा आयोजित खुल्या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दे.माळी चा १० वर्षीय देवानंद राजगुरू द्वितीय. !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

शिवजयंतीनिमित्त लोकसंघर्ष मोर्चा जळगाव व्दारा आयोजित केलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धा 19 व 20 फेब्रुवारी 2021 ला पार पडल्या. यामध्ये देऊळगाव माळी ता.मेहकर येथील ग्रामीण भागातील देवानंद विष्णू राजगुरू याने 10 वर्षे वयोगटांमध्ये द्वितीया क्रमांक पटकावून गावाचे नाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये नव्हे तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा उंचावून दिले.
आयोजित स्पर्धेमध्ये दे.माळी येथील 9 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये देवानंद राजगुरू, कु.दिव्या मगर, प्रथमेश बळी, तेजस राजगुरू, कु.श्यामबाला काळे, विनायक मगर, कु.पुनम गिरी, विष्णू राजगुरू, विश्वनाथ मगर, यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. यामध्ये सर्वांनीच चांगला खेळ खेळून परीक्षकाची मने जिंकली. यामधून देवानंद राजगुरू यांनी द्वितीय क्रमांक मिळवून विजय प्राप्त केला. त्यांच्या या यशाबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्याचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याच्या यशाबद्दल दे.माळी सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या यशस्वीतेसाठी विष्णू राजगुरू सर, विश्वनाथ मगर सर यांनी मार्गदर्शन केले.

विवाह सोहळ्यासाठी २५ जणांची उपस्थिती असल्यामुळे अनेक नवरदेवांचा हिरमोड !तर काहींनी मंगल कार्यालय केली रद्द !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

कोरोना चा वाढता संसर्ग लक्षात घेता बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 फेब्रुवारी पासून लॉकडाउन घोषित करण्यात आली आहे ‘अनेक ठिकाणी निर्बंध सुद्धा घालण्यात आले आहे ‘यामध्ये सिनेमागृहे वायम शाळा तलाव नाट्यगृह आदी सर्व बंद करण्यात आली आहे ‘तर एसटी मध्ये सुद्धा 50 टक्के प्रवासी लाच परवानगी देण्यात आली आहे ‘तर मंदिरामध्ये फक्त दहा व्यक्तीलाच परवानगी आहे ।मागील वर्ष हे कोरोना च्या सावटाखाली गेले ‘त्यानंतर कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाला व त्यानंतर हळूहळू राज्य सरकारने लॉक डाउन उठवल्यानंतर ‘सर्व काही सुरळीत झाले ‘यामध्ये महत्त्वाचे म्हणजे विवाह सोहळा होय ‘मागील लॉकडाऊन मध्ये साध्या पद्धतीने विवाह करणारे लॉक डावून उठल्यानंतर मात्र धाम धूम मध्ये लग्न करायचं या इराद्याने मैदानात उतरले होते ‘अनेक विवाह सोहळे हे ‘हजारो लोकांच्या उपस्थितीत पार सुद्धा पडले .त्यावेळी तशी परवानगी होती ‘अनेक नवरी व नवरदेव ज्या मुलांचे, मुलींची लग्न जुळलेत्यातील अनेक मुलांना असे वाटले की या वेळेस आपण धुमधडाक्यात लग्न करू ‘अनेकांनी महागडा डीजे .गाड्या सुद्धा बुक केल्या होत्या ‘अनेकांनी ॲडव्हान्स देऊन मंगल कार्यालय सुद्धा बुक केली होती .तर अनेक नवरदेवांनी नवरीच्या घरच्यांना फोन करून महागडा मंडप टाकण्याचे सुद्धा सांगितले होते ‘तर अनेक वधूपिता नी आपण अनेक नातेवाईकांना आंदन भांडे वाटप केले या आशेने आपल्या मुलीचे लग्न धुमधडाक्यात करू असे ठरवले होते ‘अनेकांनी डिझाईन व आकर्षक अशा महागडे पत्रिका सुद्धा छापल्या तर काही वाटल्यास सुद्धा ‘परंतु अचानक करुणा चा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रमध्ये वाढला बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढला ‘व जिल्हाधिकारी यांना 21 फेब्रुवारीपासून घोषणा करावी लागली ‘व वधू वरा कडील असे दोन्ही मिळून फक्त २५ जनांच्या उपस्थितीतचआता लग्नाचा कार्यक्रम उरकून घ्यावा लागणार आहे ।त्यामुळे ज्या वधू वरा कडील मंडळींनी लग्नाची तयारी केली होती त्यांचा मात्र पुरता हिरमोड झाल्याचे सध्या तरी दिसत आहे तर अनेक वधूपिता यांनी मंगल कार्यालय रद्द केले आहे ‘तर काहींनी जे झालं ते चांगलंच झालं अशी प्रतिक्रिया दिली आहे ।

जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती श्री रविंद्र सुर्यभान पाटील(छोटुभाऊ) यांच्या विकास निधीतून साकळी- दहिगाव गटात 52 लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

0

 

तालुका प्रतिनिधी विकी वानखेडे

दि.21/2/2021 वार रविवार रोजी दु.१२ वा वार्ड क्र 3 मध्ये (पेवर ब्लॉक बसवणे भूमिपूजन
छोटू भाऊच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले .या वेळी त्यांच्या सोबत सकाळी चे पीक सवरक्षणं चे चेअरमन दीपक पाटील , माजी सरपंच मुसेखा इसेखा पठाण , साहेबराव बालगुजर , सलीम शेख आदीची उपस्थित होते .वार्ड क्र 3 विरावली मधील ग्रा प सदस्य ऍड देवकांत बाजीराव पाटील ,शोभा युवराज पतील, हमीदा टेनू तडवी , माजी ग्राम पंचायत सदस्य पवन पाटील , रणधीर पाटील , रंगुबाई तडवी या सह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांनी विकास कांमच्या भूमीपूजनासाठी गावातील कैलास पाटील , गोरख पाटील , गणेश पाटील ,दगडू तडवी ,बाळू पाटील ,संजू तडवी ,राजेश अडकमोल , हर्षल धनगर , दशरथ पाटील ,खगेश पाटील , हिरामण पाटील , नरेंद्र निळे , संभाजी पाटील , शरद पाटील , रमेश तडवी ,प्रदीप पाटील , दिलीप निळे , मोहित पाटील धिरज पाटील, संजू पाटील राजेश पाटील ईश्वर पाटील , बापू अजलसोंडे , सुमेरसिंग पाटील ,दर्पण पाटील , राहुल पाटील ,दिनेश फुलपगारे .
उपस्थितीत होत या प्रसंगी ऍड देवकांत पाटील सूत्रसंचालन व प्रास्ताविक केले पवन पाटील उपस्थितांचे आभार मानले .
रविंद्र सुर्यभानपाटील(छोटुभाऊ)
सभापती:-शिक्षण,क्रिडा व जि. प.जळगांव यांचे
सर्व विरावली वासीयांच्या वतीने छोटू भाऊ चे मना पासून धन्यवाद !!

विरोधी पक्षनेते ना.देवेंद्रजी फडणवीस यांची लोकनेते विजयराजजी शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट

0

 

मोताळा:- बुलडाणा येथील वैद्यकीय महाविद्यालय मंजूर होण्यासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्न व सहकार्याबद्दल ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आज लोकनेते विजयराजजी शिंदे यांनी नागपुर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक धन्यवाद दिले. त्याच प्रमाणे लोकनेते विजयराजजी शिंदे यांनी आगामी काळात होऊ घतलेल्या भारतीय जनता पक्ष बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे स्नेह पूर्वक निमंत्रण सुद्धा दिले.यावेळी निमंत्रणाचा स्विकार करून “आम्ही नक्की उपस्थित राहु” असे आश्वासन सुद्धा ना.फडणवीस साहेब यांनी दिले आहे. तसेच जिल्ह्यातील पक्ष संघटन,विकास कामे व इतरही अनेक विषयांवर ना.देवेंद्रजी फडणवीस व लोकनेते विजयराजजी शिंदे यांची सविस्तर चर्चा या भेटी दरम्यान झाली.
याप्रसंगी बुलडाणा नगर परिषद नगरसेवक मंदारजी बाहेकर व दत्ताजी पाटिल,प्रशांतजी नारखेड़े, यांचीही उपस्थिति होती.