Home Blog Page 529

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने पळून जाण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक

0

 

(यावल प्रतिनीधी) विकी वानखेडे

वाळू माफियांचा पाठलाग करणाऱ्या फैजपूर विभागीय अधिकाऱ्यांच्या (प्रांताधिकाऱ्यांच्या) गाडीला बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने पळून जाण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याची खळबळजनक घटना काल रात्री उशिरा यावल तालुक्यातील न्हावी जवळ घडली. यावेळी विभागिय अधिकाऱ्यांचा जीपचा चालक जखमी झाला असून शासकीय गाडीचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी वाळू वाहतूक करणारा डंपर,त्यावरील चालक आणि सोबत असणारी कार ताब्यात घेण्यात आली असून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती उपविभागीय महसूल अधिकारी कैलास कडलग यांनी माहीती दिली.
काल (ता २४) रात्री उशिरा अकराच्या सुमारास बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी आपल्या शासकीय वाहनातून चालक उमेशसह या डंपरचा पाठलाग यावल- किनगांव दरम्यान केला. मात्र अंधाराचा फायदा घेत हा डंपर किनगाव भागात पळून जाण्यात यशस्वी झाला. तेथून परत येताना श्री कडलग यांना न्हावी गावाकडे एक वाळू वाहतूक करणारा डंपर जाताना दिसला. त्यांनी या डंपरचा पाठलाग करतात डंपर सुसाट वेगाने न्हावी गावातील अडचणीच्या अरुंद गल्लीत शिरला. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात डंपर रिव्हर्स नेताना शासकीय गाडीला पुढून जोरात धक्का लागून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे वाहन चालक उमेश यांनाही झालेल्या ओढाताणीत वाळूमाफियांनी धक्काबुक्की केली असून त्यांना मुका मार लागलेला आहे. याप्रकरणी या डंपरला संरक्षण देणाऱ्या १०१० क्रमांकाच्या पांढऱ्या कारसह डंपरला ताब्यात घेण्यात आली आहे. सुसाट वेगाने डंपर चालवणाऱ्या अठरा एकोणीस वर्षाच्या युवकाला ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
विना क्रमांकाच्या या डंपर्समधून वाळू वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने होत असल्याचे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करण्याची अपेक्षा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील वनपाल सलीम खान व वनरक्षक गजानन सोळंके निलंबित….

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी बुलडाणा वन विभागातील 2 वन कर्मचाऱ्यांना बुलडाणा उपवनसंरक्षक अक्षय गजभिये यांनी निलंबित केल्याने वन विभागात खळबळ माजली आहे. निलंबित करण्यात आलेल्या वन कर्मचाऱ्यांमध्ये वनपाल सलीम खान गुलशेर खान व वनरक्षक गजानन रमेश सोळंके यांचा समावेश आहे.बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातून सातपुडा पर्वत रांगा जात आहे. या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन संपदा असल्याने येथे वनसंपत्तीची तस्करी ही मोठ्या प्रमाणात होत असते. जळगाव जामोद वनपरिक्षेत्र नेहमी चर्चेत राहते. वनपाल सलीम खान यांच्या कडे जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी पदाचा प्रभार असतांना त्यांच्या कार्यक्षेत्रात दोन डांबरी रस्ते वन विभागाच्या जमिनीतून करण्यात आले व त्यामुळे वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ही बाबत त्यांनी वरिष्ठांची दिशाभूल केली तसेच 33 कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत रोपांचा पुरवठा न केल्याने लागवड करण्यात आली नाही व त्यामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,तसेच जळगाव जामोद परिक्षेत्रात डिंकाचा अवैध व्यवसाय चालत असून त्यास सलीम खान हे जबाबदार असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुंवरदेव बीट क्रमांक 1 मध्ये कार्यरत वनरक्षक गजानन रमेश सोळंके यांच्या कार्यक्षेत्रात तब्बल 14 हेक्टर वनक्षेत्र जळून 11 हजार 550 पन्नास रुपयांची वन संपत्तीचे नुकसान झाले. या आगीच्या वेळी वनरक्षक गजानन सोळंके हे गैरहजर होते व त्यांच्या निष्काळजी पणामुळे वन क्षेत्रात आग लागून वनसंपदेचे नुकसान झाले . अशा कारणामुळे वनपाल सलीम खान व वनरक्षक गजानन सोळंके यांना बुलडाणा डीएफओ अक्षय गजभिये यांनी निलंबित केले आहे.

पेठगावच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल तथागत युवा प्रतिष्ठानच्या वतिने सत्कार !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

दि: 23/02/21 रोजी
तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र राज्य वाळवा तालुका, सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या आदेशावरुन वाळवा तालुका सांगली जिल्हा येथे मा.चंद्रकांत पवार साहेब यांची पेठ गावच्या उपसरपंच पदी निवड झालेबद्दल त्यांचे तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुपच्या वतीने वाळवा तालुका अध्यक्ष मा. अनिकेत (भाऊ ) पवार यांनी अभिनंदन केले.
येथील फुले, शाहू, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते पेठ तालुका वाळवा येथील मा. चंद्रकांत पवार यांची पेठ गावच्या उपसरपंच पदी निवड झालेबद्दल त्यांचे वाळवा तालुका तथागत युवा प्रतिष्ठान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा देऊन वाळवा तालुका अध्यक्ष अनिकेत पवार यांनी अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

यावेळी उपस्थित मान्यवर :विशाल भाऊ कुर्णे, जयकुमार कांबळे, रविराज आढाव, अजय गायकवाड, सुशांत कांबळे, सागर आढाव, आणि इतर कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

डॉक्टरांच्या प्रतीक्षेत असलेले साखरखेर्डा येथील शवविच्छेदन केंद्र 15 वर्षापासून धूळखात !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा येथील शवविच्छेदन केंद्र डॉक्टरांच्या व साहित्याच्या अभावी गेल्या पंधरा वर्षांपासून धूळ खात पडलेले आहे,साखरखेरडा हे सर्वात मोठे गाव असल्यामुळे परिसरातील ५२ खेडे या गावची जोडलेले आहेत,साखरखेर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून ‘अनेक लोक उपचारासाठी साखरखेर्डा येथे दवाखान्यामध्ये येत असतात .परंतु एखांदा अपघाती मृत्यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन करावयाचे असल्यास सिंदखेड राजा येथे न्यावे लागते .त्यामुळे नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो व आर्थिक भुर्दंड पडतो,कारण साखरखेर्डा ते सिंदखेडराजा हे ७० किलोमीटर अंतर असून,लवकर नंबर लागत नसल्यामुळे तासन तास सिंदखेडराजा येथे शवविच्छेदन केंद्रावर ताटकळत बसावे लागते,कधी तर शवविच्छेदन केंद्रावर नातेवाईकाचे व डॉक्टरचे वाद सुद्धा झालेले आहे,व वादाचे रूपांतर मारहाणीत सुद्धा झालेली आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो,म्हणून शवविच्छेदन करताना प्रेताची विटंबना झाल्या सारखीच आहे ‘म्हणून साखरखेर्डा येथील गेल्या पंधरा वर्षापासून शवविच्छेदन केंद्राची इमारत धूळखात पडलेली आहे,शवविच्छेदन केंद्राची इमारत बांधून पूर्ण तयार आहे परंतु डॉक्टर व साहित्याच्या अभावी अजूनही शवविच्छेदन केंद्र सुरू झालेले नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल, सिंखेडराजा मतदारसंघाचे आमदार व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी या घटनेकडे लक्ष देऊन शवविच्छेदन सुरू करावे अशी मागणी नागरिकानी केली आहे,त्यामुळे साखरखेर्डा परिसरातील लोकांना मोठा दिलासा मिळेल, — – – -(गेल्या पंधरा वर्षापासून शवविच्छेदन केंद्र सुरू झाले नसून हे केंद्र सुरू झाली तर परिसरातील नागरिकांना याचा लाभ मिळेल व वादविवाद होणार नाहीत हे केंद्र लवकरात लवकर सुरू करावे यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहू – – -राजू ठोके माजी पंचायत समिती सभापती साखरखेर्डा )

– …हे केंद्र लवकरात लवकर सुरू करावे यासाठी आपण पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत . – …सय्यद रफिक ग्रामपंचायत सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार साखरखेर्डा ‘

नांदुरा येथील तहसील कार्यालयाची ईमारत बांधकामाला प्रशासकीय मंजुरी प्रदान-आमदार राजेश एकडे यांच्या प्रयत्नांना यश.

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री. राजेश एकडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले असून नांदुरा येथे तहसील ईमारत बांधकामस महसूल विभागाच्या दिनांक १७ फ्रेब्रू.२०२१
रोजीच्या शासन निर्णय निर्णयान्वये
( रु.८,०९,८९,२९) प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यासोबतच तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या निवासस्थान बांधकामासाठी देखील रु.२,४८,०८,३९१ निधी उपलब्ध झाला आहे.तालुका मुख्यालय असलेल्या नांदुरा शहरातील तहसील कार्यालयाच्या ईमारतीमध्ये तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला आपल्या कामासाठी यावे लागते त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये या अनुषंगाने सध्या कार्यान्वित असलेले तहसील कार्यालयाची ईमारत ही अपूर्ण,सोइ सुविधाचा अभाव असणारी होती. तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी विशेषता महिला कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये त्यांना कार्यालयात बसण्यासाठी मुबलक जागा असावी. त्याच प्रमाणे तहसील कार्यालय येणाऱ्या तालुक्यातील अभ्यंगतांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार श्री. राजेश एकडे यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री.बाळासाहेबजी थोरात यांच्याकडे सतत पाठपुरावा करून सदर तहसील कार्यालयाची ईमारत व तहसीलदार,नायब तहसीलदार यांची निवासस्थान यांना प्रशासकीय मंजुरी मिळविली आहे.
मतदार संघातील विकास कामे जसे मोठी रस्ते व पूल, अंतर्गत रस्ते,शेत रस्ते,जलसंधारणाची कामे,नांदुरा एम.आय.डी.सी.
साठी पाठपुरावा ईत्यादी बाबत सुक्ष्म नियोजन करुन, नियोजनबद्ध पद्धतीने एक-एक विकास काम मार्गी लागत असल्याने जनमानसात व मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुसरबीड येथील सचिन वाईन बार मध्ये चोरी 

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

कोरोना च्या वाढता प्रादुर्भाव बघता बुलढाणा जिल्ह्यामध्ये 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत नियम व अटी घालून दिल्याप्रमाणे लॉक डाऊन सुरू आहे ‘ कोरोना ची संख्या वाढली तर परत पहिल्यासारखे कडक लॉक डाऊन होईल ‘या भीतीपोटी चोरीचे प्रमाण सुद्धा वाढलेले दिसून येत आहे .तालुक्यातील दुसरबीड येथील मुंबई – नागपूर या हायवेवर असलेल्या सचिन वाईन बार मध्ये अज्ञात चोरट्यांनी 23 फेब्रुवारी च्या मध्यरात्री 2 वाजता चोरी करून काही विदेशी दारू व १५७३० असा एकूण ३० ते ३५हजार रुपयांचा ऐवज लंपास करून पोबारा केला,अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असलेली सचिन वाईन बार होती ‘दुसरबीड मधील सतत चोर्‍यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .सचिन बारचे मालक संदीप देसाई यांनी किनगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल केली . व तक्रार दाखल होताच ‘किनगाव राजा चे पीएसआय माळी साहेब व दुसरबीड बीड बीट जमदार चाटे साहेब व पोलीस कॉन्स्टेबल बारगजे यांनी घटनास्थळी घटनेचा जाऊन पंचनामा केला ‘गावांमध्ये होणारे चोऱ्या याला आळा घालण्यात यावी अशी मागणी या वेळी नागरिकांनी केली आहे . ‘

विजवितरण कंपनीच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

0

 

देवरी-शैलेश राजनकर

देवरी २३: चिचगड पासुन १२ कि अंतरावर पलसगाव येथिल ओमप्रकाश हरिभाऊ वाढई वय ४२ या व्यक्तिने काल दि.२२-२-२०२१ ला घरीच छताला दोर बाधुंन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या मागे १मुलगी व १मुलगा, पत्नी आणि आई असा परिवार आहे.

विद्युत विभागाचे चक्करा मारुन सदर व्यक्ति कंटाळला होता असा कुटुंबीयांचा आरोप आहे. १५ एकर जमिनीवर त्याने रब्बी लावली होती तसेच विद्युत पोलसाठी डिमांड भरला होता तो त्या साठी रोज देवरी ला येत जात होता आणि विद्युत विभागातिल अधिकारी त्याला वारंवार फिरवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रबी पिकाची पाण्याविणा परिस्थिति खालावत गेल्यांने त्याने ही टोकाची भुमिका घेतली असे मृत व्यक्तिचे मोठे भाऊ खेमराज वाढई यांनी सांगितले.

सदर घटनेची सखोल चौकसी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणीकुटुंबीयांनी केली आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक फौजदार होरे आणि पो.ना विजय सलामे करित आहेत.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर साखरखेर्डा येथील प्रतिष्ठाने कडकडीत बंद . ।

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढता कोरूना चा उद्रेक बघता जिल्हाधिकारी यांनी 21 फेब्रुवारी पासून शहरी व ग्रामीण भागामध्ये 28 फेब्रुवारी पर्यंत काही प्रतिबंधित क्षेत्र वगळून काही नियम व अटी घालून लॉकडाऊन ची घोषणा केली आहे ‘दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे ।या पार्श्वभूमीवर सिनखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठे असलेले साखरखेर्डा येथे पाच वाजेपासून दुकानदार व्यवसायिकांनी आपली प्रतिष्ठाने नियोजित वेळेच्या आत बंद करून प्रशासनाला सहकार्य केले आहे ।साखरखेर्डा येथील संपूर्ण दुकाने अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बंद आहेत ‘तशीही साखरखेर्डा येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे हे आपल्या माध्यमातून जनतेला वेळोवेळी मास्क लावण्याचे आव्हान करीत आहेत .

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी यात्रा यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून रद्द !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे या मध्येच शासनाने 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत संचार बंदी व अनेक नियम व अटी घालून दिलेले आहेत ‘वाढता कोरोना चा उद्रेक बघता ‘बुलढाणा जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी ‘प्रतिबंधित क्षेत्रासाठी वप्रतिबंधित क्षेत्र वगळून निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत ‘त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदी च्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक राजकीय मनोरंजन शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे या कालावधीत बंद राहतील तसे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिलेले आहेत ‘आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे ज्या आर्थिक दिनांक 25 मार्च 2021 ते दिनांक 6एप्रिल 2021 पर्यंत चालणारी बुलढाणा जिल्ह्यातील तथा महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणजे सैलानी यात्रा होईल .या सैलानी यात्रेसाठी देशभरातून ६ लाख भाविक भक्त यात्रे मध्ये दाखल होत असतात .परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता ‘यात्रेमध्ये गर्दी जमणार या लोकांमुळे कोरोना चा प्रादुर्भाव आणखीन वाढू शकतो ‘म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये ‘जिल्हाधिकारी बुलढाणा मा . एस राममूर्ती यांनी सैलानी यात्रेला स्थगिती दिली आहे ‘

तांदुळवाडी येथील श्रामनेर शिबिर व धम्मपरिषद सोहळा संपन्न…

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

तांदुळवाडी, तालुका सिंदखेडराजा येथे दि. ११फेब्रुवारी २०२१ पासून सुरू असलेल्या अंशकालीन श्रामनेर शिबिराचा सांगता समारंभ आणि भव्य बौद्ध धम्म परिषद सोहळा पुज्य भिक्खु संघ आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थित दिनांक २१ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.

या सोहळ्याला उपस्थित असणारे पुज्य भिक्खु प्रा..डॉ.एम सत्यपाल महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पुज्य भिक्खु संघ, धम्मपिठावर विराजमान झाल्यानंतर भीमाई महिला बचत गट व मीराबाई महिला बचत गट यांनी पुज्य भिक्खु संघाचे स्वागत केले.
त्याचबरोबर या सोहळ्याला आवरजून उपस्थित असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सौ सविताताई मुंढे सौ लताताई खरात, उपसभापती पंस सि×राजा वंचित नेते मेजर अनिल दादा खरात शरद ससाने अमोल खरात अॅडव्होकेट प्रदीप सोनकांबळे जयद्रत खरात दिपक सरदार व इत्यादी मान्यवरचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मधुकर शिंदे सोनोषी वंचित बहुजन आघाडी सिंदखेडराजा यांनी केले
या परिषदेला उपस्थित असलेले पुज्य भिक्खु बोधी पालो महाथेरो , पुज्य भिक्खु प्रा.डॉ.एम.सत्यपाल महाथेरो, धम्म परिषदेचेअध्यक्ष: पुज्य भिक्खु इंदवंस महाथेरो , पुज्य भिक्खू ज्ञान रक्षित थेरो, यांनी आपल्या धम्म देसणेच्या माध्यमातून धम्म सोप्या भाषेत समजावून सांगितला व मानवाच्या कल्याणासाठी बौद्ध धम्म हाच विशाल धम्म आहे असे ते म्हणाले सायंकाळी कविसंमेलन भरवुन कवितेतून धमाचेच विचार कविंनी माडले व श्रोत्यांचे मने जिंकली
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
आयोजक समिती: प्रकाश खरात,दिलीप खरात,गजानन काळे,दीपक खरात, सीताराम जाधव , सुनील खरात ,विजय काळे, अनिकेत काळे, राजरत्न खरात.यांनी परिश्रम घेतले

विशेष सहकार्य: भींमाई महिला बचत गट व मीराबाई महिला बचत गट तांदुळवाडी.