Home Blog Page 532

सुतार काम करणाऱ्या लोकांना शासनाने स्वतंत्र आर्थिक पॅकेज द्यावे !सुतार कामगार ज्ञानेश्वर जाधव यांची मागणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुतार व्यवसाय करणारे सुतार कामगार आहेत की ज्यांनी स्वतःची मशीन घेऊन लाकडांना आकार देऊन आपला घर गाडा चालवण्यासाठी ते परिश्रम घेत आहेत ‘शिंदी येथील सुतार कामगार तिचे गेल्या 22 वर्षांपासून सुतार काम करतात व आपल्या घरांचा संसाराचा गाडा पुढे हाकलत आहेत ‘सुतार असलेले ज्ञानेश्वर जाधव ‘यांनी सांगितले की गेल्या 22 वर्षांपासून सुतार व्यवसाय करत आहे यामध्ये लोकांच्या घराच्या खिडकी असतील दरवाजे असतील पाठ असेल कोलपाट असेल सोपा असेल अशा विविध प्रकारच्या वस्तू आम्ही बनवत असतो ‘शिवाय स्वतःची मशीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मशीन ला वीज लागते ‘बिलही अव्वाच्या सव्वा येते ‘अशा परिस्थितीमध्ये लोक जेमतेम पैसे देतात ‘या घरातील दवाखाना असेल मुलांचे शिक्षण व अन्नधान्याचा वस्तू असतील या कमी पैशांमध्ये कशी भागणार ?अनेक मजूरासाठी शासनाने स्वतंत्र पॅकेज जी ची निर्मिती केली आहे परंतु सुतार व्यवसायिक आजही संकटात आहे ‘त्यांच्यावर लॉक डाऊन मध्ये उपासमारीची वेळ सुद्धा येऊन गेली आहे व परत येणार आहे ‘म्हणून मायबाप शासनाने सुतार व्यवसायिक कामगारांना स्वतंत्र पॅकेजमधून आर्थिक मदत द्यावी जेणेकरून ते आपल्या घराचा प्रपंच भागू शकेल असे मागणीही यावेळी सुतार व्यवसायिक ज्ञानेश्वर जाधव यांनी केली आहे !

सौ. नंदाताई पाऊलझगडे यांचा शिवजयंती दिनी सामान्य जनतेच्या समस्या सोडवून त्यांना चिंतामुक्त करण्याचा संकल्प.

0

 

छत्रपती शिवाजी महाराज हे बारा बलुतेदार यांचे राजे आहेत तसेच त्यांच्या काळात जनतेस कधीच अडचण आली नाही. ते एक उत्तम राजकारणी होते एवढे मोठे राजकारणी आता होणे नाही पण त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. असा संकल्प ताईंनी शिवजयंती दिनी घेतला आहे. सौ. नंदाताई पाऊलझगडे यांनी त्यांच्या निवासस्थानी पारंपरिक शिवजयंती चा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास रोकडीया नगर येथील महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रम पूर्ण झाल्या नंतर ताईंनी शेगाव तालुका व परिसरातील महिलांना व नागरिकांना येणाऱ्या समस्या त्या स्वाता सोडविण्याचा प्रयत्न करेल असे आवाहन ताईंनी नागरिकांना केले आहे सामान्य जनतेचे सर्वच प्रकारच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करून त्यांना चिंतामुक्त करण्याचा आगळा वेगळा संकल्प ताईंनी शिवजयंती दिनी घेतला आहे.

अँड नाझेर काझी साहेबांनी केला आडगावराजा ग्रामपंचायतच्या सरपंचाचा सन्मान.,, !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

स्व.आर.आर.पाटील तालुकास्तरीय प्रथम सुंदर गावाचा पुरस्कार आडगावराजा ग्रामपंचायतीला मिळाल्याबदल राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्याक्ष अँड.नाझेर काझी साहेबांनी प्रातिनिधीक स्वरुपात रामदास कहाळे यांचा राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची प्रतिमा देऊन19 फेब्रुवारी रोजी सन्मान केला
ग्रामविकासासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामपंचायतीला ऊर्जा देण्याचे काम स्व .आर.आर.पाटील आबा यांनी केले होते त्यामुळे
राज्यशासनाने त्यांच्याच नावाने स्व.आर.आर.पाटील स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धा आयोजित करुन ग्रामपंचायतीना स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी ऊर्जा देण्याचे काम केले
याच अनुषंगाने ऐतिहासिक आडगावराजा ग्रामपंचायतीने चांगले काम करुन
तालुकास्तरीय प्रथम क्रमाकांचे पारीतोषीक
मिळवले या बदल राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्याक्ष अँड .नाझेर काझी साहेबांनी रामदास कहाळे यांचा जिजाऊ प्रतिमा देऊन सत्कार केला आणी व ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकारी यांच्या सह गावकरी मंडळी चे अभिनंदन केले आहे

शेगांव येथे सामाजिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.

0

 

आयुषी दुबे शेगाव

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथे एकता ग्रुप शेगांव आणि आई जिजाऊ युवती दल शेगांव यांनी सामाजिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव साजरा केला. बुलढाण्यात कलम १४४ लागू झाले असून संचार बंदी सुरू आहे.तरी याची दाखल घेता शेगांव येथे महाराजांचा जयंती उत्सव हा साजरा करण्यात आला. समस्त एकता ग्रुप व आई जिजाऊ युवती दल यांनी तोंडाला मास्क, सोशल डिस्टंसिंग या गोष्टींची एकता ग्रुप अध्यक्ष खुशाल भाऊ सारवाण आणि आई जिजाऊ युवती दल अध्यक्ष आयुषी दुबे यांनी दक्षता घेऊन शेगांव येथे सई बाई मोटे सरकारी दवाखान्यात तसेच बस स्टँड, ऑटो स्टँड येथे बिस्कीट आणि फळांचे वाटप करून शिवरायांची जयंती साजरी केली,प्रत्येक नियमा पालन करून हे कार्य करण्यात आले.आजच्या काळात शिवाजी महाराज जयंती म्हटली की Dj ,band हे असतातच परंतु , एकता ग्रुप शेगांव यांनी असे काहीच न करता सामाजिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा केला आणि या कार्यात त्यांना
आई जिजाऊ युवती दल शेगांव यांनी सहकार्य केले. या कार्यातून एक शिकवण या मावळ्यांनी दिली आहे. ते म्हणजेच, महाराजांचे विचार त्यांनी याठिकाणी मांडले आहेत.

अस्मानी संकटामुळे शेतकरी !मलकापूर पांग्रा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीटिने केले शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान ! -..शेतकरी पंढरीनाथ सोनुने यांच्या ७ एकरातील शेतातील कांदा, गहू, मका, हरभरा या पिकाची मोठ्या प्रमाणात नुसकान !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

अगोदरच कोरोनाच्या संकट पुढे संपूर्ण जग हतबल झाले आहे 2020 या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिपावसामुळे हिरावून गेला होता ‘ लाँकडावून मुळे शेतातील भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ आली होती त्यात पिक विमा कंपनी वाल्यांनी अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकलेले नाही त्यामुळे दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला असताना .18 फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता सिंदखेडराजा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी वादळ व गारपिटीसह पाऊस सुरू झाला ‘अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्याच्या शेतातील हरभऱ्याच्या सुडीचे ‘गव्हाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान झाले ‘यामध्ये मलकापूर पांग्रा परिसरामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीचा जोरदार तडाखा बसला ‘यामध्ये झोटिंगा ‘ मांडवा . डोरवी येथील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान झाली आहे यामध्ये लोणार तालुक्यामध्ये येत असलेल्या मांडवा येथील ‘पंढरीनाथ सोनुने यांनी ७ एकर शेतामधील, गहू ,हरभरा, कांदा व मका ‘या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान झाली आहे .गहू वार्‍यांमुळे संपूर्ण जमिनीवर पडलेला आहे वाळलेली हरभऱ्याची पूर्ण घाटे जमिनीवर विखरून पडलेली आहे ‘कांद्याचे फुलं गळून पडलेली आहे ‘मका मोडून पडलेली आहे ‘अशा परिस्थितीमध्ये मुलीला शिक्षण देऊन या उद्देशाने ‘पंढरीनाथ सोनुने यांची मुलगी कुमारी कोमल सोनुने जिद्द व चिकाटीच्या जोरावर अभ्यास करून नुकताच तिचा बीडीएस ला नंबर लागलेला आहे ‘व त्यामुळे घरात नुकतीच आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते ।परंतु सात एकर शेतातील पिकांची अवस्था पाहून पंढरीनाथ सोनवणे यांना मात्र धक्काच बसला ‘जसे तिच्या भरोशावर मुलींचे शिक्षण घरातील घरगाडा चालतो ‘त्याच शेतातील पिके मात्र उस्मानी संकटामुळे उध्वस्त झाली आहे ‘आता तलाठी ‘तहसीलदार यांनी तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांचा अंत न बघता सरळ हाताने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे . ‘

परसाडे गावात इत्तया८वी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील परसाडे गावात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की करूणा बाळासाहेब भालेराव वय१४ वर्ष इत्तया ८वी शिकणारी अल्पवयीन मुलगी राहणार परसाडे ही परसाडे येथे आपली आजी आणी वडीलां सोबत राहात होती व तिची आई ही आपल्या माहेरी राहात आहे .करूणा भालेराव रा परसाडे तालुका यावल हिने आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ते ६ , ३० वाजेच्या सुमारास आजीही घराबाहेर बसली असता आपल्या राहत्या घरातील छतच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्याचा प्रयत्न केले असता , तिला तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता , वैद्यकीय अधिकारी डॉ .मयुर चौधरी यांनी तिला मृत घोषीत केले असुन, तिचे शवविच्छेदन डॉ . मयुर चौधरी यांनी केले असून ,याबाबत अशोक शंकर भालेराव यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अस्लम खान हे करीत आहे . या अल्पवयीन शाळ्करी मुलीने आत्महत्याचे मार्ग का पत्कारले हे मात्र समजु शकले नाही .

सुनगाव परिसरात अवकाळी पावसाने गहू हरभरा पिकाचे अतोनात नुकसान

0

 

गजानन सोनटक्‍के जळगाव जा

जामोद जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे अवकाळी पावसाने फार मोठ्या प्रमाणात गहू व हरभरा पिकाचे नुकसान केले आहे गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने या परिसरात पाण्याची पातळी चांगली आली होती त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी रब्बी पीक म्हणजेच गहू हरभरा मोठ्या प्रमाणात परिसरात पेरणी केली होती व गहू हरभरा हे पीक चांगल्या प्रमाणात येईल अशी आशा शेतकर्‍यांना होती परंतु काढणीस आलेला हरभरा व गहू पीक हे जागेवरच ओले झाले व जोरदार असलेल्या वाऱ्यामुळे गहू पीक हे पूर्णतः पसरलेले आहे तरी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घासही निसर्गाने हिरावला आहे व शेतकऱ्यांचे या वर्षी प्रत्येक पीक हे पावसाने नुकसान केलेले आहे तरी अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे तरी शासन स्तरावरून या पिकाचे पंचनामे व्हावे व शासनाकडून काही मदत मिळावी असे अपेक्षा सूनगाव परिसरातील शेतकऱ्यांनी मनाशी बाळगली आहे

विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0

 

ऋषी जुंधारे वैजापूर

आज दि.19 फेब्रुवारी 2021 रोजी विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे छञपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरूवात शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी शिव गितांवर नृत्य सादर केले.कार्यक्रमा निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे देखीलआयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी. एम.हजारे सर हे होते. तर प्रमुख अतिथी नालेगावचे नवनिर्वाचित सरपंच निर्मलाताई म्हसु कुमावत , उपसरपंच रमेश ञिभुवन ,म्हसु कुमावत, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक विद्यार्थी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादि या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना श्री. हजारे सर व श्री. जाधव सर यांच्याकडून पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सुञसंचालन विभुते सर यांनी केले तर आभार उभेदळ मॕडम यांनी मानले

कोरोना महामामारी नष्ट व्हावी यासाठी श्री गणेश मंदिरात आभिषेक ।

0

 

सिंदखेडराजा l सचिन खंडारे ।

मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या कडून पुन्हा आलेल्या कोरोना लाठी बद्दल श्री गणेश मंदिर येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी आभिषेक करण्यात आला व भोजन ठेवण्यात आले व आपले लाडके आमदार संजय रायमूलकर साहेब यांनी घोषणा केली कि दिनांक 18/02/2021 रोजी झालेल्या पावसा व गारी मुळे जे नुकसान झाले आहे त्या शेतक्यानी ऑनलाईन तक्रार करावी, तक्रार करण्याचे दोन माध्यम आहे त्या पैकी 1) टोलफ्री क्रमांक आहे 18001024088 व
2) क्रॉप इन्शुरन्स आप या माध्यमातून कोणत्याही प्रकारची तक्रार करू शकता असे आहवान केले व सर्व सोशल डिस्टन्स व मास लावून प्रसाद घेतील ही जबाब दारी माजी पोलीस पाटील बद्रीनाथ गिऱ्हे व अतुल गिऱ्हे, किशोर मोरे यांनी सुकारली व त्या वेळेस सर्व नवनिवाचित ग्राम पंचायत सदस्य उपस्तित होते. सौ. निर्मला मनोहर गिऱ्हे, सौ. संगीता किशोर मोरे,
पूजा गारोळे, रमेश गिरी,अशोक लहाने,नितीन इंगळे,विठ्ठल भाकडे व अंगणवाडी सेविका सौ. संगीता गजानन मोरे हे उपस्तित होत्या

सागवान ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या जांभरून येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी ! ग्रा. प . सदस्य अर्चना सोनुने यांची निवेदनाद्वारे सरपंच यांच्याकडे मागणी !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सागवन ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र .-2 जांभरून येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य सौ अर्चना सोनुने यांनी सागवन ग्रामपंचायतचे सरपंच यांना दिनांक 18 फेब्रुवारी रोजी निवेदन दिली आहे .त्यांनी या निवेदनामध्ये म्हटले आहे की ‘सागवन ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या .प्रभाग क्रमांक दोन गोडबोले लेआउट, गणराज नगर,व परिसरातील लोकसंख्या ही १६०० ते १७०० असून ग्रामपंचायत कायदा १९५८नुसार स्मशानभूमी असणे आवश्यक आहे ‘जांभरून गावातील व्यक्ती मृत्युमुखी पडल्यासत्या मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार कुठे करावा हा प्रश्न गावातील नागरिकांना व नातेवाईकांना पडतो .पावसाळ्यात अनेक वेळा मृत व्यक्तीचे प्रेत हे अर्धवट जळालेल्या अवस्थेत राहिले आहेत अशा अनेक घटना घडल्या आहेत .त्यामुळे ही एक प्रकारे मृत व्यक्तींच्या प्रेताची विटंबनाच म्हणावी लागेल .जांभरून येथील मृत व्यक्तीचा .बुलढाणा शहरात अंतिम संस्कार करावयाचा झाल्यास 3 किलोमीटर पायी चालत जावे लागते ‘जांभरून येथील लोक हे शंभर टक्के मोल मजुरी करणाऱ्या असून ‘सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना बुलढाणा येथे जाणे शक्य होत नाही .मागील शंभर वर्षापासून जांभरून गावालगत असलेल्या दुसर्‍याच्या मालकीच्या शेतामध्ये जांभरून गावातील मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार केले जातो .जांभरून गावासाठी हक्काची स्मशानभूमी मिळावी यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायत ‘ जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन दिले तथा जांभरून गावातील लोकांच्या च्या वतीने आंदोलनही झाली ‘तरी जांभरून गावासाठी हक्काची स्मशानभूमी करावी व जागा उपलब्ध करावी अशी मागणीही यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ अर्चना सुनील सोनुने यांनी निवेदनाद्वारे केली आहे ‘त्यांनी निवेदनाच्या प्रती पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे ‘ माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा .माननीय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ‘तहसीलदार ‘एचडीओ ‘ बी डिओ ‘सचिव ‘यांना दिले आहेत ‘