Home Blog Page 536

नगरसेवकाच्या तक्रारीची दखल न घेता मुख्याधिकारी संबंधित लिपिक यांनी ठेकेदाराची संगनमत करून काढले घनकचऱ्याचे बोगस लाखोंचे बिल…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद शहरामध्ये नगरपरिषदेच्या अंतर्गत उचलल्या जाणारा ओला व सुका कचरा कत्राट सन 2020-2021 करीता अंदाजे किंमत 74 लक्ष रुपयांमध्ये हे देण्यात आले आहे यामध्ये प्रत्येक प्रभागात मधून ओला व सुका कचरा संकलन करून डम्पिंग ग्राउंड येथे ये पोचविणे करिता हे कंत्राट जळगाव जामोद येथील देशमुख यांना देण्यात आले आहे परंतु सतत सदर पत्र मुख्याधिकारी व आरोग्य अभियंता पल्लवी इंगळे आणि नगर परिषदेमध्ये सत्तेत असलेले पक्ष पदाधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष कंत्राटदार यांच्याशी स्वतःच्या फायद्या साठी संगत मत करून लाखोचे बोगस बिल काढले आहे.तसेच नगरपरिषदेचा कचरा आर्थिक हेतूने आरोग्याच्या दृष्टीने कचरा संकलन व्यवस्थित होत नाही कचरा संकलन गाड्या व मजूर वर्ग हा ठरल्याप्रमाणे त्याचे काम करतो त्यामुळे यासंदर्भातील शासन आदेशाची पायमल्ली करत असून लोकांच्या आरोग्याची खेळ करत आहे परंतु नगर सेवकांच्या वरील आशयाच्या तक्रारीची दखल न घेता स्वतःच्या आर्थिक फायदा या करिता सदर कंत्राटदाराचे बोगस बिल काढून एका प्रकारे अपहार करून कर्तव्यात कसूर केला आहे यामुळे मुख्याधिकारी आरोग्य अभियंता व संबंधित सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक यांनी संगनमत करून जनतेच्या आरोग्याशी खेळ केला आहे प्रसंगी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाचे नगरसेवक तथा शिक्षण सभापती रमेश ताडे यांनी केली आहे

पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षणाचे आयोजन !30 टक्के महिला व तीन टक्के अपंगांना संधी !अर्ज करण्याचे पशुधन विस्ताराधिकारी श्री उदार यांचे आवाहन !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत मागासवर्गीय विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षणासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रियाअकोला अकोला पंचायत समिती स्तरावर पशुधन विस्तार अधिकारी मार्फत सुरू झाली आहे सदर अर्जाचा नमुना पशुधन कार्यालयामध्ये उपलब्ध आहे .या अर्जाच्या व्यतिरिक्त इतर दुसरा कुठलाही प्रकारचा अर्ज स्वीकारले जाणार नाही सदर योजने अंतर्गत दिनांक 4 फेब्रुवारी 20 21 पासून अर्ज स्वीकारण्यात येतील अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 असणार आहे !अर्जदार हा मागासवर्गीय समाजाचा तसेच दारिद्र रेषेखालील असावा अर्जदाराकडे दुधाळ जनावरे शेळ्या कोंबड्या असणे आवश्यक आहे अर्जदारास १ मे 2000 हजार नंतर तिसरे अपत्य नसावे तसा ग्रामसेवकाचा दाखला अर्जासोबत जोडावा अर्जासोबत नुकतेच काढलेले छायाचित्र जोडावे योजनेमध्ये तीस टक्के महिला व 3% अपंग अर्जदाराचा समावेश असावा लाभार्थ्यास या योजनेचा लाभ 2020 – 21 च्या प्राप्त तरतुदीचे अधिन राहून देण्यात येईल । वशिली बाजूला कुठल्याही प्रकारचे थारा नसूनअर्जदाराने अर्ज करावा !अशी आव्हान सिंदखेडराजा पशुधन विस्तार अधिकारी श्री उदार यांनी केली आहे !

नांदुरा शहर भाजपा महिला आघाडी व राष्ट्र सेविका समिती यांच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-

विविध सामाजिक उपक्रम व भारतीय सण-उत्सवांच्या माध्यमातून महिलांमध्ये एकात्मता व एकोप्याची भावना वाढविण्याचा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून नांदुरा शहर भाजपा महिला आघाडी व राष्ट्र सेविका समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारचे सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्याच अनुषंगाने आज बुधवार दि. ०३/०२/२०२१ रोजी हळदी कुंकू व तिळगुळ, श्रीराम दीपोत्सव व महिला सक्षमीकरण या सांस्कृतिक, अध्यात्मिक व सामाजिक मांगल्याचे प्रतिक असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन नांदुरा येथील श्री राम मंदिर, नागलकर ले-आउट येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ. उज्वलाताई चैनसुखजी संचेती तर मान्यवर म्हणून भाजपा महिला आघाडी जिल्हाअध्यक्षा सौ. सिंधुताई खेडेकर, भाजपा महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस सौ. अलकाताई पाठक, भाजपा महिला आघाडी जिल्हा सोशल मीडिया संयोजिका नंदिनीताई साळवे ह्या उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आराध्य दैवत प्रभु श्री राम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन होऊन महिलांना हळदी कुंकू व तिळ गूळ वाटप उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोख्याचे महत्व प्रतिपादीत करण्यात आले. त्यानंतर अयोध्या येथे साकारल्या जाणाऱ्या भव्य श्री राम मंदिर उभारणीच्या पार्श्वभूमीवर श्रीराम दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी व मान्यवर यांच्याकडून महिलांना विविध सामाजिक बाबींवर महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
नांदुरा शहर व परिसरातील तसेच ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील असंख्य महिलांच्या उपस्थित पार पडलेल्या या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळून महिलांच्या सामाजिक व सांस्कृतिक एकात्मतेचे महत्व अधोरेखीत झाले. या कार्यक्रमासाठी सौ. शीतल ताई डागा यांनी रेखाटलेली प्रभू श्री राम यांची अद्वितीय रांगोळी ही वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नांदुरा शहर भाजपा महिला आघाडी व राष्ट्र सेविका समितीच्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी परिश्रम घेतले.

सवडद येथे 13 फेब्रुवारी पासून गणेशोत्सव ! सप्त खंजेरी वादक संदिपाल महाराजांसह तिनही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम !

0

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

करोना प्रादुर्भावामुळे समाजामध्ये भीतीचे, भयाचे वातावरण आहे. आजूबाजूला सतत ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे लोक घाबरतात. ज्यांच्या कुटुंबापर्यंत करोना पोहोचला आहे, ती कुटुंबे त्याहीपेक्षा जास्त घाबरलेली आहेत. भयभीत अशी स्थिती दुर्दैवाने निर्माण झाली आहे. करोनाने एकूण समाजव्यवस्था आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्टय़ा उद्ध्वस्त केली आहेच, पण मानसिकता आणि मानवी भावपटलावरही त्याचे ओरखडे उठले आहेत. हे भय, चिंता या साऱ्यातून समाजाला मानसिकदृष्टय़ा बाहेर काढणे हेसुद्धा एक आव्हान आहे. एकीकडे न दिसणाऱ्या विषाणूच्या विरोधात लढाई लढायची आहे, तर दुसरीकडे या भयगंडातून, नैराश्यातून थिजलेल्या समाजव्यवस्थेच्या चक्रालाही गतिमान करण्याचे आव्हान आहे. या सगळ्या लढाईमध्ये विज्ञान, वैज्ञानिक साधने, औषधे हे जसे उपयोगी ठरत आहेत, ठरणार आहेत; त्यासोबतच धार्मिक परंपरा, विधी, सण-उत्सव आणि त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा हीसुद्धा समाजाला नैराश्यातून बाहेर काढू शकते, भयमुक्त करू शकते. म्हणून उत्सवप्रिय समाजाला नियमांचे पालन करून हळूहळू त्या दिशेने घेऊन जाणे गरजेचे आहे. काही अंशी हे काम आपण करीत आहोत आणि म्हणूनच अखंड परंपरा असणारी वैष्णवांची वारी जरी या वर्षी होऊ शकली नाही, तरी वारकरी परंपरेला खंड न पडू देता संतांच्या पादुका पंढरपुरात गेल्या. शिस्तबद्ध पद्धतीने विठ्ठलाचा आषाढीचा सोहळा संपन्न झाला. यातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा ही वारकरी समाजाला चेतना देणारीच ठरेल, तशी ऊर्जा निर्माण करणे ही आता गणेशोत्सव मंडळांचीसुद्धा जबाबदारी होऊन बसली आहे. याचेच औचित्य साधून सालाबादाप्रमाणे मौजे सवडद येथे श्री सिद्धिविनायक मंदिरावर तिन दिवसीय गणेश जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सोशल डिस्टसिंगचा वापर करून दि 13 पासून ह्या कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून पहिल्या दिवशी सकाळी 9 ते 12 डॉ. ज्ञानेश्वर तांगडे बालरुग्णायल साखरखेर्डा हे मोफत बालरोग तपासणी तथा मोफत औषधोपचार करणार आहेत. सायंकाळी 8 ते 10वा गणेश घुले औरंगाबाद यांचा विद्यार्थ्यांना उर्जा देणारा “सुंदर माझी शाळा” जागर बालकवितेचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे दि 14 फेब्रुवारी रोजी रात्रौ 8 ते 10 राष्ट्रीय किर्तनकार सप्त खंजेरी वादक संदिपाल महाराज यांचा कार्यक्रम तर दि 15 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता बालकिर्तनकार सोहम महाराज काकडे यांचे काल्याचे किर्तन नंतर किशोर महाजन, ओमप्रकाश अग्रवाल, डॉ शेषराव देशमुख यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप रात्रौ 8 ते 10 गुरूदेव सेवा मंडळ वझर खामगाव यांच्या कार्यक्रमाने सांगता होईल. दरम्यान तिन्ही दिवस सकाळी 11 ते 5 ह. भ.प.अशोक महाराज घायाळ यांच्या अमृवाणीतून गणेश पुराण कथासार संपन्न होणार आहे. यामध्ये हरिपाठ, भजन असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याने भाविकांनी या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

गावंडे महाविद्यालय समोरील गतीवरोधकाला पांढरे पट्टे मारण्याची मागणी !गतीरोधक दिसत नसल्याने अपघाताचे सत्र सुरूच !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

गावंडे महाविद्यालयासमोरील गतीवरोध काला पांढरपट्टे नसल्यामुळे रोज अपघात घडत आहे !साखरखेर्डा येथुन पाचशे मीटर अंतरावर शिंगणे महाविद्यालय आहे येथे जवळपास सात ते आठ हजार विद्यार्थी विविध विषयात शिक्षण घेत आहे ‘महाविद्यालया मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी पालकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि साखरखेर्डा येथून हा रस्ता लव्हाळा मार्गे मेहकर – चिखली -खामगाव -तिकडे जाते त्यामुळे वाहनधारकांची संख्या या रस्त्याने मोठ्या प्रमाणामध्ये आहे !तसेच दुचाकीस्वारांची संख्या खूप आहे ।दुचाकीस्वरांना दोन्ही गतिरोधक हे दिसत नसल्यामुळे हात सटकून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे ‘या गतिरोधक आवर आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून ४०च्या वर दुचाकीस्वार मोटर सायकल वरून पडले आहे !गावंडे महाविद्यालया समोरील गतीवरोधकावर अपघाताची मालिका सुरूच असून अनेकांना आपले हात-पाय गमवावे लागले आहे ‘अनेक मुले -महिला जखमी सुद्धा झालेले आहेत ‘तरी दोन्ही गतीरोधकावर कायमस्वरूपी पांढरे पट्टे मारण्यात यावे अशी मागणी वाहनचालक करीत आहेत !

ओ टी एस पी योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे वाटप करण्याकरता लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहान !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

ओ टी एस पी योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांचे गट ‘शेळी गट वाटप करणे करता अनुसूचित जाती गटातील लाभार्थ्यांनी या योजने करता अर्ज सादर करावे असे आवाहन सिंदखेडराजा पशुधन विस्तार अधिकारी श्री उदार तसेच साखरखेर्डा येथील पशुवैद्यकीय डॉक्टर श्री शिंगणे यांनी केली आहे ‘सन 2020-2021मध्ये ओ टी एस पी योजनेअंतर्गत75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप करतात रुपये वीस लाख व शेळी गट वाटप करता रुपये दहा लाखाची तरतूद जिल्हा पशुसंवर्धन विभाग बुलढाणा यांच्याकडे प्राप्त झालेली आहे !तरी सदरहू दुधाळ जनावरे वाटप करण्याकरता सिनखेडराजा तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज पशुधन कार्यालय सिंदखेड राजा येथे सादर करावा !अर्ज करण्याची तारीख 1 फेब्रुवारी 20 21 पासूनअर्ज स्विकारण्याची सुरुवात होईल ।तर 28 फेब्रुवारी 2021 हे अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख असेल !लाभार्थ्यांनी अर्जासोबत खालील प्रकारचे कागदपत्रे जोडावी !
1 )आधार कार्डची सत्यप्रत २) दारिद्र रेषेखालील असल्याचा दाखला 3) सातबारा व आठ अ ग्रामपंचायत नमुना ) ४ )प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत ५ )जातीच्या दाखल्याची सत्यप्रत ६ ) बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र ७)रोजगार स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डाची सत्यप्रत ८ )अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ९) बँक पासबुक ची सत्यप्रत १० )अपत्याचे प्रमाणपत्र ११ )
रेशन कार्डाची सत्यप्रत !
इत्यादी कागदपत्रे लाभार्थ्यांनी अर्जासोबत जोडायची आहे !

ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ला तथागत युवा फाउंडेशन चा जाहीर पाठिंबा !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

दि.३ फेब्रुवारी रोजी, इस्लाम्पुर येथे तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या आदेशावरुन निता आनंदा बनसोडे महाराष्ट्र सचिव महीला आघाडी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यकर्त्यांसह संपूर्ण ऑल इंडिया यूथ फेडरेशन (AIYF)
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AIYF) मा.हरीश भाऊ कांबळे जिल्हा अध्यक्ष
ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन,कोल्हापूर
मा.प्रशांत भाऊ आंबी राज्य सेक्रेटरी *किसान पुत्र संघर्ष यात्रा* दवऱ्यावर असता कोल्हापूर-सांगली-सातारा-पुणे
दि. 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2021 यांचे दि.३ फेब्रुवारी रोजी, तथागत युवा फाउंडेशन ग्रुप महाराष्ट्र राज्य, यांचेकडून इस्लामपूर, ता.वाळवा,जिल्हा- सांगली येथे स्वागत करण्यात आले व किसान पुञ संघर्ष याञा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AIYF) जाहीर पाठींबा देण्यात आला…! यावेळी तथागत फाउंडेशन व तथागत ग्रूप महाराष्ट्र राज्य महीला आघाडी सचिव निता बनसोडे, मा.तुषार शिंदे जिल्हा अध्यक्ष,मा.अनिकेत भाऊ पवार वाळवा तालुका अध्यक्ष,करण कांबळे,आकाश कांबळे,मोन्टी कांबळे,डिगांम्बर कांबळे,अनिल कांबळे अहमद इनामदार यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

चिखली शहरातुन जाणार्या महामार्गावर रबलींग स्ट्रीप टाकुण वाहनांना स्पिड लिमिड बांधा

0

 

चिखली येथील महाबिज,दवाखाने,हाॅटेल समोर रबलींग स्ट्रीप टाका–स्वाभिमानीची मागणी

स्वाभिमानी संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

चिखली–शहरातुन जाणार्या खामगांव चौफुली ते मेहकर फाटा या महामार्गावर अनेक अपघात झाले अनेकांना जीव गमवावा लागला आहे.सतत होत असलेले अपघात पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा सरसावली असुन या महामार्गावर महत्वाच्या व वर्दळीच्या ठीकाणी रस्त्यावर रबलींग स्ट्रीप टाकण्यात यावे,शहरातुन जात असलेल्या वाहणांना गती क्षमता(स्पिड लिमिट )बांधुन देण्यात यावी,रस्ता कडेला बॅरीगेट लावण्यात यावे,अशी मागणी स्वाभिमानीचे नितिन राजपुत, विनायक सरनाईक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दि०३फेब्रुवारी रोजी केली आहे.
चिखली शहरातुन जाणार्या खामगांव चौफुली ते मेहकर फाटा मधोमध आपघाताच्या प्रमाणामधे वाढ झाली आहे.या रस्त्यावर या एक दिड महिण्यामधे महाबिज समोर अनेक वेळा अपघात झाले परवा सुद्धा एका हाॅटेल समोर आपघात झाला आहे.या झालेल्या अपघातांमधे अनेकांना जिव गमवावा लागला आहे.सदर रस्त्यावर भरधाव वेगाने वाहणे चालत असतात तर याच महामार्गावर हाॅटेल्स असल्याने या ठिकाणी नियमीत लग्न समारंभ होत असल्याने गर्दि होत असती.भारतीय राज्य घटनेनुसार भारतीय नागरीकांना मुलभुत सुविधा पुरवीणे हे शासनाची कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे परंतु प्रशासनाकडुन कर्तव्यात कसुर होत असल्यानेच अनेकांना जिव गमवावा लागला असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.या झालेल्या वेगवेगळ्या आपघातामधे कहिना आपला मुलगा,भाऊ,वडील,पती नातेवाईक गमवले आहे.तर काहिंना कायमचे अपंगत्व आले आहे.तसेच अनेक कुटुंब उघड्यावर आले आहे.यापुर्वी सुद्धा रस्त्यावर ठिकठीकाणी गतिरोधक टाकावे अशी मागणी करण्यात आली होती.परंतु दररोज होत असलेले अपघात पाहता खामगांव चौफुली ते मेहकर फाटा ठिकठिकाणी असलेल्या हॉटेल्स,पेट्रोल पंप व वर्दळीच्या ठिकाणी कलर रबल्लीग स्ट्रीप टाकण्यात यावे,शहरातुन बाहेर पडे पर्यत वाहनांना गती क्षमता बांधुन देण्यात यावी,तशा प्रकारचे फलक रबल्लींग स्ट्रीप समोर लावण्यात यावे,ज्या ठीकाणी बॅरीगेट नाहित अशा ठीकाणी तात्काळ बॅरीगेट लावावे,बॅरीगेट लावण्यात कसुर केल्याप्रकरणी संबंधीतावर मनुष्य वधाचा गुन्हे दाखल करावे व होणार्या अपघातांना आळा घालण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी पालकमंत्री, जिल्हाधिकारी,तहसिलदार,
राष्ट्रीय महामार्गाचे उपविभागीय अभियंता,यांच्याकडे करण्यात आली आहे.सदर मागण्यांची दखल घेऊन कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानीचे नितिन राजपुत, विनायक सरनाईक,अनिल चौहान,राम अंभोरे, सुधाकर तायडे,रविराज टाले,यांच्यासह आदिंनी दिला आहे.

भारतीय महाक्रांती सेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर होणार ! समाजकारणाची आवड असणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधण्याचे आवाहन .

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

भारतीय महाक्रांती सेनेची सध्या जिल्हा पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू आहे. समाजकार्य करण्यास इच्छुक युवक व्यक्तींनी तातडीने संपर्क करण्याचे आवाहन विदर्भ अध्यक्ष ज्ञानेश्वर ताकोते पाटील बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रा वैभव दाभाडे यांनी केले आहे
भारतीय महाक्रांती सेना एक सामाजिक संघटना असून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या भागात भारतीय महाक्रांती सेनेचे सामाजिक कार्य प्रशंसनीय आहे कोरोना काळात संघटनेच्या माध्यमातून अनेक गरजूंना भरघोस मदत करण्यात आली आहे या काळात सर्वप्रथम भारतीय महाक्रांती सेनेच्या माध्यमातून समाजासाठी देशासाठी लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला होता.सर्वप्रथम विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात त्या त्या विभागात जाऊन कोरोना काळात सुद्धा कोरोना योद्धा यांचा सत्कार करण्यात आला होता. भारतीय महाक्रांती सेना समाजासाठी देशासाठी कार्य करत आहे.
विदर्भात व बुलढाणा जिल्ह्यात संघटना बळकट करण्यासाठी तसेच बुलढाणा जिल्ह्यात संघटनेचे पदाधिकारी शहराध्यक्ष, तालुका अध्यक्ष, यांची निवड करण्याची प्रक्रिया होत आहे समाजासाठी धडपडणाऱ्या कार्य करु इच्छीत असणाऱ्या युवकांसाठी भारतीय महाक्रांती सेना सतत पुढे असते अशाच युवकांना एक सुवर्णसंधी भारतीय महाक्रांती क्रांती सेनेच्या माध्यमातून मिळत आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर 7066432459

कुवरदेव येथील वनामधून अवैधरित्या गोंध तस्करी करताना 3 आरोपी अटकेत तर 6 जण फरार.आरोपीजवळुन 21 हजार रुपयांचा सलाई गोंद जप्त…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद वनविभागामार्फत जामोद येथील राखीव वनपरिक्षेत्रातील कुवरदेव येथील वनातून अवैध रित्या सलाई गोंद काढून वाहतूक करणाऱ्या आरोपी क्रमांक 1 कृष्णा तुळशीराम बारकल वय 21 वर्षे राहणार कुंवरदेव तालुका जळगाव जामोद आरोपी क्रमांक 2 अनिल सुकलाल जमरा वय 21 वर्षे राहणार कुंवरदेव तालुका जळगाव जामोद आरोपी क्रमांक तीन कैलास राजू वय 19 वर्षे राहणार कुंवरदेव तालुका जळगाव जामोद यांना वन विभागाने अटक केली तर इतर 6आरोपी फरार आहे अटक केलेल्या आरोपीकडून 210 किलो सलाई गोंद जप्त केलेला असून त्याची किंमत 21 हजार रुपये आहे सदर आरोपीवर वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1 )अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच त्यांना आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद येथील न्यायालयामध्ये उपस्थित केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.