Home Blog Page 535

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सदैव तत्पर रहावे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे शिवजयंती साधेपणाने साजरी करावी

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा:-समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांती प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य टिकून राहून प्रगती होते. तरी नवीन भरती होणाऱ्या पोलिसांनी ही बाब प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सदैव तत्पर रहावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.
स्थानिक प्रभा सभागृह येथे अनुकंपा तत्वावर पोलीस शिपाई पदावर नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पालकमंत्री डॉ शिंगणे बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे आदी उपस्थित होते.
आगामी येणारी शिवजयंती कोविड आजाराच्या पार्श्वभूमी वर साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करीत पालकमंत्री म्हणाले, शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात यावी. याबाबत सर्वत्र जनजागृती करावी. माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी पोलिस यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. गुणवत्तेच्या आधारावर निवड होणे ही बाब ती उमेदवारांच्या बाबतीत महत्वाची असते.
यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कार्यक्रमा मागील आयोजनाची भूमिका विषद केली. याप्रसंगी पोलीस विभागातून पोलीस अंमलदार या पदावरून पोलीस उपनिरीक्षक पदावर एमपीएससी विभागीय परीक्षेतून निवड झालेले अंमलदार यांचा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये रमेश दळवी, नानाभाऊ काकड, विष्णू बोडखे, शेख अख्तर शेख सत्तार व संदीप बालोद यांचा समावेश आहे.
तसेच अनुकंपा तत्त्वावर भरतीतील उमेदवारांना पोलीस शिपाई या पदावर नेमणूक देण्यात आली आहे. अशा सर्वांना पालकंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पोलीस दलात ३१ जणांना नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले. संचलन पोलीस शिपाई निलेश रत्नपारखी यांनी तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुनगाव येथे नवनियुक्त सरपंच रामेश्वर भाऊ अंबडकार यांनी स्वीकारला पदभार तर उपसरपंचपदी सगीराबाई तडवी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक 15 जानेवारीला झाली होती त्यादृष्टीने 18 जानेवारी रोजी निवडणुकीचा निकाल लागला होता व 9 फेब्रुवारी रोजी सरपंच पदाची निवडणूक ठरली होती त्यादृष्टीने भाजपाकडून रामेश्वर भाऊ अंबडकार यांचा सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता व महाविकास आघाडी यांच्याकडून कौशल्या दिनेश ढगे यांचा सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता व भाजपाकडून उपसरपंच पदासाठी सगीराबाई उमेद तडवी व महा विकास आघाडी यांचेकडून दीपिका रामसिंग राजपूत यांचा उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता त्यामध्ये श्री रामेश्वर भाऊ अंबडकार यांना 9 मते पडली त्यामुळे त्यांचे सरपंच पदी निवड झाली व उपसरपंच पदी संगीराबाई उमेद यांना 9 सुद्धा मते मिळाली त्यामध्ये त्यांची उपसरपंच म्हणून निवड झाली त्यानंतर ग्रामपंचायत येथे श्री रामेश्वर भाऊ अंबडकार यांनी आपल्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारला व तसेच सगिरा भाई उमेद तडवी यांनी उपसरपंच पदाचा पदभार स्वीकारला यावेळी नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य संतोष शत्रुघ्न वंडाळे बळीराम धुळे ज्योती उत्तम ढगे योगिता उमेश कुरवाडे विमल समाधान काळपांडे नंदा रियाज तडवी श्याम भुरा निहाल यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गुणवंतराव कपले जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई काळपांडे पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे माजी पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे रमेश वंडाळे राजेश झंवर अनिल ढगे नारायण भाऊ अंबडकार माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश अंबडकार मोहनसिंह राजपूत अनिल ढगे ज्ञानेश्वर धुर्डे ऋषी येउल राजेश येउल लक्ष्मणराव काटोले सूनगाव ग्रामपंचायतीचे सचिव चौधरी साहेब व ग्रामपंचायत कर्मचारी व सूनगाव येथील भाजपा कार्यकर्ते हजर होते

बोदवडचे पत्रकार गोपाळ व्यास यांना अपमानास्पद वागणुक देणाऱ्या पोलीस निरिक्षकांचे भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघातर्फ निषेध

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

बोदवड येथील लोकमतचे प्रतिनिधी गोपाळ व्यास आपल्या वृत्तसंकलनाच्या कार्यासाठी गेले असता पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षक यांनी अपमानास्पद वागणुक दिल्याच्या घटनेचा भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ , महाराष्ट्रच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असुन , पोलीस निरिक्षक गायकवाड यांच्यावर तातडीने कारवाई करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे . या संदर्भात भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघा महाराष्ट्रच्या वतीने पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , बोदवड येथील राहणारे दैनिक लोकमतचे प्रतिनिधी गोपाळ व्यास हे एका गुन्ह्याच्या संदर्भातील वृत्तसंकलनासाठी बोदवड पोलीस स्टेशनला गेले असता व्यास यांनी अगोदर प्रसिद्ध केलेल्या एका बातमीचा त्यांच्यावर संताप व्यक्त करीत पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड यांनी गोपाळ व्यास यांना धक्के देत पोलीस स्टेशन मधुन बाहेर निघ असे म्हणत अरेरावी केली व तुला किती बातम्या छाप्याच्या आहेत छाप माझे काही होत नाही व या पुढे या ठीकाणी यायचे नाही असा दमही दिला, अशा प्रकारे एका जबाबदार पत्रकार यांच्याशी अशी वागणुक देण्याऱ्या पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड यांचा जाहीर निषेध भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघ , महाराष्ट्रच्या वतीने व्यक्त करण्यात येत असुन , अशा बेजबाबदार पोलीस निरिक्षकांवर वरिष्ठ पातळीवर योग्य ती तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली असुन , या निवेदनावर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अय्युब जी . पटेल , प्रदेश सचिव जिवन चौधरी , डी .बी . पाटील , सुनिल गावडे , शब्बीर खान सरवर खान , काबीज शेख समद , विक्की वानखेडे , बेबाबाई सुधाकर धनगर , लतीफ तडवी , सुधाकर धनगर आदी पत्रकारांच्या स्वाक्षरी आहे .

यावल चोपडा रोडवर अपघातात जख्मी झालेले शांतता समिती सदस्य हमीद मिस्त्रि यांचा उपचारादरम्यान मृत्यु,

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे ,येथील डांगपुरा परिसरातील राहणारे सामाजीक कार्यकर्त हमीद शेख मोहम्मद यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले . यावल येथील डांगपुरा परिसरातील राहणारे शांतता समितीचे जेष्ठ सदस्य व मोमीन बिरादरीचे अध्यक्ष हमीद शेख मोहम्मद मोमीन यांचा यावल चोपडा मार्गावरून सकाळी ८ वाजेच्या सुमारास जात असतांना चोपडयाकडे जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या एका वाहनाने त्यांना उडवुन पड काढला होता . दरम्यान यावलच्या जागृत नागरीकांनी तात्काळ या घटनेची माहीती देत अपघात करून पळुन जाणारा हरीयाणा येथील ट्रक अडावद पोलीसांच्या मदतीने पकडण्यात आला होता . तर अपघातात गंभीर जख्मी झालेले हमीद शेख मोहम्मद मोमीन वय७० वर्ष यांना नागरीकांच्या मदतीने उपचारासाठी दिनांक २८ जानेवारी रोजी जख्मी अवस्थेत गोदावरी या खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले होते . दरम्यान १५ दिवसांपासुन उपचार सुरू असतांना आज दिनांक १३ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले असुन आज त्यांचा दफनविधी करण्यात आला ,अपघाताच्या गुन्ह्यात काही बदल होते का हे पाहावे लागणार हमीद शेख मोहम्मद यांच्या पश्चात पत्नी चार मुली , तिन मुल, सुना, नांतवंडे असा परिवार आहे .

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

– रुग्ण सेवा हिच इश्वर सेवा आहे या प्रचितीतीची जाणीव करून देत साखरखेर्डा येथील निष्णात सिध्द धन्वंतरी बालरोग तज्ज्ञ डॉ ज्ञानेश्वर तांगडे यांनी गणेश जयंतीचे औचित्य साधून बालरुग्णालय बंद ठेवून दि 13 फेब्रुवारी रोजी दिवसभर सवडद येथील सिध्दविनायक मंदिरावर एक हजार बालकांची मोफत तपासणी करून मोफत औषधोपचार केले आहेत.
करोनाच्या भयातून आताशा कुठेतरी लोक बाहेर येत असले तरी देखील भीती मात्र कायम आहे. दवाखान्यात गेल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण आढळून येतात तर खेडेगावात बालकांच्या किरकोळ आजारावर पालक लक्ष देत नाहीत. त्यामुळे सवडद येथे गणेश जयंतीचे औचित्य साधून मोफत बालरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ ज्ञानेश्वर तांगडे यांनी सर्दी, ताप, खोकला अशा आजारावर उपचार करून आध्यात्मातून माणवसेवेचा वीडा उचलला आहे. दरम्यान सांप्रदायिक कार्यक्रमात भाविकांनी आरोग्य शिबीरे घेऊन आपल्या कुटूंबियाची काळजी घेतली पाहिजे असे आवाहन डॉ तांगडे यांनी केले आहे.

साखरखेर्डा ते गुंज रस्त्याचे काम सुरु ! !वैभव तुपकर ने दिला होता आंदोलनाचा इशारा !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

गुंज ते साखरखेर्डा मेहकर जोडणाऱ्या रस्त्यावरील डांबरीकरणाचे व खड्डे बुजवण्याचे काम हे सुरू होते परंतु अचानकपुणे काम बंद करून मजूर पसार झाले होते याबाबत 10 फेब्रुवारीला वृत्त प्रकाशित झाले होते !तसेच भाजपचे युवा कार्यकर्ते वैभव तुपकर यांनी सुद्धा चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता !या आंदोलनाची व वृत्ताची दखल घेवून दिनांक 13 फेब्रुवारीपासून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हे सुरू झाली आहे !त्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केले!याबाबत युवा कार्यकर्ते वैभव तुपकर यांनी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला होता काम लवकरात लवकर सुरू न झाल्यास मेहकर ते साखरखेर्डा रोडवर ते चक्काजाम आंदोलन करणार होते !याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम त्वरित सुरू केली आहे याबाबत लोकांनी समाधान व्यक्त केले आहे !

लोणार तालुक्यातील बोरखेडी लघु प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या पार्डी शिरसाट या गावचे पुनर्वसन करावे ! पालकमंत्र्यांना निवेदन !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

लोणार तालुक्यातील पार्डी सिरसाठ हे गाव बोरखेडी लघु संग्राहक प्रकल्पामध्ये सन 2001 साली बाधित झाले होते !याबाबत लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे लोणार तालुका उपाध्यक्ष शुभम सिरसाट यांनी पालकमंत्री डॉ .राजेंद्र शिंगणे यांना 12फेब्रुवारी रोजी निवेदन दिले आहे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे कीत्या गावातील लोकांना घराचा मोबदला हा २००४ सालच्या बाजार भावाप्रमाणे मिळाला होता परंतु त्या कालावधीत जागा उपलब्ध न झाल्यामुळे गावाचे पुनर्वसन होऊ शकले नाहीपरंतु त्यानंतर शासनाने 2019 -20 मध्ये जागा उपलब्ध करून दिलीव उपलब्ध करून दिलेल्या जागेवर गावकऱ्यांना भूखंड देखील वाटप करण्यात आले .भूखंड वाटप केले जरी असली तरी घर बांधण्याकरता गावकर्‍याकडे पाहिजेत असे पैसे उपलब्ध नाहीकारण गावकर्यांना मिळालेला मोबदला हा2007 मधील बाजारभावाप्रमाणे 2013 -14 यावर्षी मिळाला होता व मिळालेला मोबदला हा खूपच कमी होता !मिळालेला मोबदला हा आजही गावकर्‍याकडे शिल्लक नसून प्रकल्पबाधित गावकऱ्यांना आजच्या भावा प्रमाणे रक्कम देण्यात यावी ।जर शासनाकडून गावकऱ्यांना मदत मिळाली नाही तर गावकरी हे घरे बांधणार तसे तरी कसे ?हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो ।पुनर्वसन विभागाकडून भूखंड वाटप करण्यात आलेली आहे व भूखंड धारक आज रोजी कब्जा हक्क रक्कम भरणे इतकेही सक्षम नाही !तरीही कब्जा हक्क रक्कमही माफ करून प्रकल्पग्रस्त लोकांना न्याय द्यावा अशी मागणीही यावेळी ‘राष्ट्रवादीचे विद्यार्थी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष शुभम सिररसाट यांनी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे !

नांदुरा येथे नवीन एम.आय.डी.सी. च्या जागेची स्थळ निश्चिती करून मंजुरीचा प्रस्थाव तात्काळ शासनास सादर करावा.- आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा ता. प्रतिनिधि – सुनील पवार

तालुका मुख्यालय असलेल्या नांदुरा येथे रेल्वे स्थानक असून नांदुरा शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे.तसेच नांदुरा येथिल बाजारपेठ देखील मोठी आहे. परंतु उद्योगधंद्यांना चालना मिळत नसल्याने नांदुरा तालुक्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.तर अनेक सुशिक्षित बेरोजगारानी शहराची वाट धरली आहे.बेरोजगारांच्या हाताला काम व रोजगार मिळवून देण्याच्या अनुषंगाने *मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे* यांनी नांदुरा तालुक्यामध्ये नवीन एम.आय.डी.सी.मंजूर करावी अशी मागणी राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.श्री.सुभाषजी देसाई यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने काल दिनांक १२ फेब्रुवारी ला सायंकाळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अमरावती चे प्रादेशिक अधिकारी श्री.राजारामजी गुठले
यांच्या समवेत  आमदार श्री.राजेश एकडे यांनी नांदुरा येथे एम.आय.डी.सी.मंजूर करणे बाबत सुजातपूर,आमसरी,आंबोडा, सांगावा वडी येथील जागेची पाहणी केली व नांदुरा येथे नवीन एम.आय.डी.सी.
च्या जागेची स्थळ निश्चिती करून सदर बाबातचा मंजुरीचा प्रस्थाव तात्काळ शासनास सादर करावा अश्या सूचना केल्या.यावेळी नांदूऱ्या चे तहसीलदार श्री.राहुल तायडे,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अमरावती चे सर्व्हेअर श्री.बंडू राठोड,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ खामगाव चे अभियंता श्री.धुर्वे,
मंडळ अधिकारी श्री.उगले, श्री.बंगाळे,तलाठी श्री.म्हस्के, शकील पटेल प्रामुख्याने उपस्थित होते….!!

यावल येथे वर्दळीतील दुकाना समोरील उभी रिक्शा बाजुला करण्यावरून वाद एकाने केले मानेवर चाकुकरीत केले गंभीर जखमी

0

 

,यावल, ( प्रतिनिधी )विकी वानखेडे , येथे शहरातील वर्दळीच्या चौकातील दुकानासमोरील रिक्षा पुढे काढून घे असे सांगितल्याचा राग येऊन प्रवासी रिक्षा मालकाने दुकान मालकाचे गळ्यावर चाकूने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना शुक्रवारी (ता.१२) दुपारी चारच्या सुमारास घडली असुन या घटने बाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सागर अशोक देवांग यांच्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी नवाज अली नियाज अली ( रा.बाबूजीपूरा यावल) याने त्याचे मालकीची प्रवासी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्हि ५५४५) महेश अशोक देवांग यांचे दुकाना समोर उभी करून ठेवली होती. महेश देवांग यांनी सदरची रिक्षा पुढे काढून घे असे नवाज अली यास सांगितले असता त्याचा राग येऊन नवाज अली नियाज अली याने महेश देवांग यास शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करून महेश चे गळ्यावर चाकूने वार करून मारहाण करीत दुखापत केली.संशयित नवाज अली याचे विरुद्ध येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजमल पठाण व पोलिस हवालदार संजय तायडे आदी पोलीस कर्मचारी हे करीत आहेत.

STAR5.LIVE या OTT.प्लॅटफाँर्म करीता गयबान्या बाल्या या वऱ्हाडी बोलीभाषेतील विनोदी वेबसिरीजचे थाटात उद्घाटन संपन्न

0

 

आज दिनांक १२/०२/२०२१रोजी अकोला येथे स्टार फाईव्ह डाँट लाईव्ह करीता वऱ्हाडी बोलीभाषेतील विनोदी वेबसिरीज चे थाटात उद्घाटन संपन्न झाले. केवळ मनोरंजनाकरीता या वेबसिरीज ची निर्मिती होत असल्याचे दिग्दर्शक जि.तुषार यांनी स्पष्ट केले. दिवसभर नुसते टेन्शन डोक्यावर घेऊन जगणाऱ्या सामान्य नागरिकांना क्षणभर का होईना हसले तर ताणमुक्त करता येऊ शकते. हसण्यामुळे निरोगी जीवन जगणे सुलभ होते, हे जाणून दिग्दर्शक जि.तुषार ह्यानी या वेबसिरीज ची निर्मिती करत असल्याचे आपल्या भाषणात नमूद केले. तर तरुण पिढीला योग्य दिशा दिली तर त्यांचे कडून विधायक कार्य करुन घेता येईल आणि त्यासाठी आपण पालकांनी सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहणे किती जरुरीचे आहे हे संकेत साक्षी फिल्म प्रोडक्शन चे अध्यक्ष तथा या वेबसिरीज चे निर्माते सुभाष गवई यांनी स्पष्ट केले. पुरुष मुख्य कलावंत पियुष वानखडे, म्रुनाली ओहेकर, शोभना ठाकरे,श्रेयस गावंडे,अभिषेक वाहूरवाघ, राहूल सोनोने, स्रुष्टी खरात, शुभम दारोकार,अनिल कुळकर्णी, महावीर तायडे,बाबाराव दंदी,दिलीप गोपनारायण, शरद थोरात, गणेश खंडारे,दिनेश खरात उपस्थित होते. या कलावंताना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचे अभिवचन बाबाराव दंदी महावीर तायडे यांनी दिले. संचालन बी. गोपनारायण यांनी केले.