Home Blog Page 538

खाजगी वाहनाने प्रवास करीत असताना मोबाईल खिशातून लंपास !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

मेहकर वरून वरुडी येथे खाजगी वाहनाने येत असताना विवो कंपनीचा किंमत 13,000हजार रुपयेमोबाईल खिशातून लंपास झाल्याची घटना 5 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन च्या दरम्यान घडली !हकीकत अशी की लक्ष्मण नारायण गवई वय 40 वर्ष व त्यांचा मुलगा आशिष लक्ष्मण गवई वय 19 वर्ष दोघेही राहणार वरुडी हे मेहकर वरून काळीपिवळी या खाजगी वाहनाने वरुडी येथे येत असताना .विवो कंपनीचा 13 हजार रुपये चा मोबाईल आशिष गवई यांच्या खिशातून लंपास झाला ‘प्रवास करत असताना विशेष गवळी याला झोप लागली होती त्याच्या शेजारी अन्य सुद्धा प्रवासी होते .जेव्हा तो गाडीतून उतरून घरी गेला तेव्हा त्याच्या खालच्या खिशातील मोबाईल त्याला दिसला नाही ‘याबाबत त्याने साखरखेडा पोलीस स्टेशन मध्ये रीतसर तक्रार दिली असता लवकरच मोबाईलचा शोध घेऊन पोलिसांनी सांगितले !पुढील तपास साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहे

सिंदखेड राजा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या विदर्भ दौऱ्यातील पहिल्या टप्प्याची सांगता !प्रांत अध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

गेल्या 12 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे माध्यमातून विदर्भातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचे काम सुरू केली आहे .विदर्भात गेल्या 12 दिवसांपासून आतापर्यंत त्यांनी 66 विधानसभा मतदारसंघात आढावा बैठका घेतल्या आहेत :दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सिंदखेड राजा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत तील विदर्भ दौऱ्याची सांगता करण्यात आली !यावेळी राष्ट्रवादी संवाद यात्रा व झालेल्या जाहीर सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन करताना सिंदखेडराजा येथील पवार साहेबांच्या जुन्या सहकार्याच्या आठवणीला उजाळा दिला ‘ते पुढे म्हणाले की पवार साहेबांनी अनेक वर्ष खस्ता खाऊन जी माणसं कमवली की कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी नाहीत पुढे बोलताना ते म्हणाले की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना पवार साहेबांचे नाव घेतले शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी साधण्याचा सल्ला पवार साहेबांनी दिला होता मोदींनी पवार साहेबांचा सल्ला ऐकला तर निश्चितच यातून मध्यम मार्ग निघू शकतो अशीही यावेळी पाटील यांनी सांगितले तसेच ‘सिंदखेड राजा मतदार संघातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी मतदार संघाचे आमदार तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे मनापासून प्रयत्न करत आहेत जिजाऊ स्मारक आला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे ती मागणी आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू तसेच राजमाता जिजाऊंच्या नावे सुरू असलेला साखर कारखाना सुरू करण्यासाठी देखील प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी नामदार जयंत पाटील यांनी दिली ‘यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले !यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अँड नाझेर काझी महिला जिल्हाध्यक्ष अनुजा साळवे युवक जिल्हाध्यक्ष शेखर बोंद्रे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे जिल्हा अध्यक्ष मीरा बावस्कर बुलढाणा विद्यार्थी अध्यक्ष नरेश शेळके राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे संदीप बाजोरिया विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील विनायक पाटील अँड साहेबराव सरदार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ।यावेळी सिंदखेड राजा मेहकर देऊळगाव राजा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते !

निर्माणाधीन सिंचन प्रकल्प गतीने पुर्ण कराव जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिंचन प्रकल्प आढावा बैठक जिगांवसाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक घेणार

0

 

अजहर शाह मोताळा

बुलडाणा.दि.8.जिल्ह्यात बळीराजा जलसंजीवनी योजनेतंर्गत एक मोठा व पाच लघु पाटबंधारे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या निर्माणाधीन प्रकल्पांना जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न राहणार असून सदर प्रकल्प यंत्रणेने गतीने पुर्ण करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेत असताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, विभागीय पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अनिल बहादूरे, विशेष प्रकल्प अधिकारी आशिष देवगडे, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गिते, अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर आदी उपस्थित होते.
जिगांव या महत्वाकांक्षी प्रकल्प गतीने पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावण्यात येणार असल्याचे सांगत जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले, जिगांवच्या बैठकीत प्रकल्पाच्या सर्व बाबींनी आढावा घेतला जाईल. यामध्ये निधीची तरतूद, भूसंपादन, भूसंपादन कायद्यांनुसार झाडे व तत्सम बाबींचा देण्यात येणारा मोबदला, मोबदला देण्याबाबत महसूल व जलसंपदा विभागाचा असलेला संभ्रम आदींविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सरळ खरेदी प्रक्रिया ही विनाविलंब होणारी असल्यामुळे या प्रक्रियेचा अवलंब प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार करण्यात यावा. या प्रक्रियेने शेतकऱ्यांना लगेच मोबदला मिळतो.
पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याबाबत सुचना देताना जलसंपदा मंत्री म्हणाले, पेनटाकळी प्रकल्पाचा 11 किलोमीटरचा कालवा आहे. या कालव्याद्वारे पाणी सोडल्यामुळे आजूबाजुच्या शेतीचे नुकसान होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. तरी प्रकल्पाची चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यतेमध्ये या कालव्याच्या दुरूस्ती, बंद पाईपद्वारे सिंचनासाठी पाणी देण्याच्या बाबीचा समावेश करण्यात यावा. त्यानंतर सुप्रमा प्रस्ताव राज्यस्तरीय समितीची मंजूरी घेवून पाठविण्यात यावा. या कालव्याचे पाणी वितरण बंद पाईपद्वारेच करण्यात यावे. चतुर्थ सुप्रमा ही 416.59 कोटी रूपयांची आहे.
पालकमंत्री डॉ शिंगणे यावेळी म्हणाले, खडकपूर्णा प्रकल्पामध्ये पुनर्वसनाचे बाकी असलेल्या कामात नागरिकांच्या मागणीचा विचार करीत काम करावे. जिगांव प्रकल्पाच्या बाबतीत मोबदला देण्याबाबत यंत्रणांनी समन्वय साधून शेतकऱ्यांना मोबदला मिळवून द्यावा. याबाबत जलसंपदा विभागाने तोडगा काढावा. याप्रसंगी आमदार संजय रायमूलकर यांनी पेनटाकळी कालवा पाईपबंद करणे, लोणार तालुक्यातील बोरखेडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याची उंची कमी करणे, पेनटाकळी गावाच्या गावठाणाची हद्दवाढ करणे आदी मागण्या मांडल्या. आमदार संजय गायकवाड यांनी मोताळा तालुक्यातील राहेरा प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. बैठकीत अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी सादरीकरण केले. बैठकीला जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हयातील पुर्ण व निर्माणाधीन सिंचन प्रकल्प
पुर्ण प्रकल्प : मोठे 2, मध्यम 7 व लघु 100, अशाप्रकारे 109 प्रकल्प पूर्ण. पुर्ण झालेल्या प्रकल्पातून निर्माण झालेला पाणीसाठा 606.57 दलघमी, सिंचन क्षमता 90178 हेक्टर, निर्माणाधीन प्रकल्प : मोठे 2 (जिगांव व अनुशेष व्यतिकरिकत्‍ एक पेनटाकळी), लघु 5 (राहेरा, चौंढी, आलेवाडी, अरकचेरी, बोरखेडी) एकूण 7. बांधकामाधीन प्रकल्पाची अंतिम सिंचन क्षमता 106553 हे, निर्माण झालेला पाणीसाठा 67.35 दलघमी, सिंचन क्षमता 14232 हे. प्रत्यक्ष झालेले सिंचन (सन 2019-20) 10159 हे.

राजेगाव येथे शॉटसर्किट होवून घराला आग ! अंदाजे अडीच लाखाचे नुसकान !

0

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथे दि ८फेब्रुवारी रोजी. दुपारी 2 वाजेदरम्यान अचानक पणे राहत्या घराला शॉर्ट सर्किट होऊन आग लागून अंदाजे अडीच लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे ‘घरातील विजेच्या तारेवर शॉर्टसर्किट होऊन आग लागली सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही !आजगाव येथील रघुवीर बंडू जगताप यांच्या घराचे व घरातील सामानाची मात्र मोठ्या प्रमाणामध्ये नुस्कान झाली आहे ‘यामध्ये मौल्यवान वस्तू शेती उपयोगी सामान । टीव्ही ‘कपडे इतर खाण्यापिण्याचे सामान याचा यात समावेश आहे ‘सदर आगीची माहिती मिळताच गावातील नागरिक व युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग वर पाणी टाकून आग नियंत्रणात आणली ‘यावेळी गावातील भानुदास जाधव हार्दिक खा पठाण लक्ष्मण तांगडे सचिन खंडागळे अमोल मसुरकर युवकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला !सदर या गीत घर मालक रघुवीर जगताप यांच्या घरातील सामानाचे अंदाजे अडीच लाखाचे नुकसान झाले असून तातडीने मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे ‘आगीची माहिती मिळताच साखरखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल इंगळे व पोलीस कॉन्स्टेबल श्री सानप व तलाठी गुंजकर यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला .

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन व नगर परिषद कर्मचारी यांच्या प्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी ! महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन ची मागणी !कमी पगारात घर कसे चालवावे !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 27 हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायत आहेत यामध्ये ६०, ००० ग्रामपंचायत कर्मचारी सेवा देत आहेत सेवा बजावत आहेत,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी वेतन श्रेणी व पेन्शन बाबत अनेकदा शासन दरबारी मोर्चे काढले विविध मंत्र्यांना निवेदन सुद्धा दिले परंतु या मागणीकडे शासनाने पुरते डोळेझाक केली आहे ‘ग्रामपंचायत कर्मचारी हा गावातील मुख्य दुवा असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो ‘गावाला स्वच्छ पाणीपुरवठा करणे ‘ गावात दिवाबत्तीची सोय करणे ‘गावात स्वच्छता राखणे आदी कामे ग्रामपंचायत कर्मचारी इमाने-इतबारे करत असतो ‘मात्र त्याला काहीच मिळत नाही मिळते ते फक्त .उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार वेतन ‘एवढ्या कमी वेतनावर ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या संसाराचा गाडा ओढत असतो ‘या पगारामध्ये घरातील सदस्यांचा असणारा दवाखाना ,मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न,वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ असे अनेक काम आज रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे ‘दिनांक 10 ऑगस्ट 2020 च्या कामगार विभागाच्या राजपत्र नुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू केली आहे परंतु त्याला ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची अट असल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी संकटात सापडला आहे तरी सदर उत्पन्नाची अट शिथिल करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची 10 टक्के रक्कम शासनाकडून लागू करावे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करून न्याय द्यावा अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन सिंदखेड राजा यांच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे ‘

एअरटेल -आयडिया नेटवर्क समस्येमुळे अनेक कामे खोळंबली !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

गेल्या तीन ते चार दिवसापासून आयडिया एअरटेल मोबाईल कंपन्यांची नेटवर्क नसल्यामुळे अनेक शासकीय काम खोळंबले आहे ‘दिनांक आठ फेब्रुवारी ला सकाळी पाच तासापासून एअरटेल नेटवर्क गायब होते ‘त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला ‘अनेकांचे फोन लागत नाही नव्हते आणि नेटवर्क नसल्यामुळे येत नाही नव्हते ‘अनेक ग्रामपंचायत चे कामे सुद्धा खोळंबली होती ‘सतत एअरटेल आयडिया नेटवर्क नसल्यामुळे शिंदी येथील नागरिक हैराण झाली आहे ‘तरी अशा नेटवर्क समस्या तातडीने दखल घेऊन नेटवर्क सुरळीत करावी अशी मागणी शिंदी येथील सरपंच विनोद खरात यांनी केली आहे !आयडिया एअरटेल चे सतत नेटवर्क नसल्यामुळे तरी काय असा प्रश्न यानिमित्ताने नागरिक विचारत आहेत !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख थांबवा- तहसीलदारांना निवेदन

0

नांदुरा ( प्रफुल्ल बिचारे पाटिल) :-

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात जन्माला आल्याने सर्व जण स्वतःला भाग्यवंत समजतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेले कष्ट,त्यांचे पराक्रम, त्याग, ध्येय याला तोड नाही. अशा महापुरुषांच्या नावाने नांदुरा शहरातील एका चौकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे व त्याठिकाणी सुंदर देखावा निर्माण केला आहे. मात्र त्या चौकाला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा उल्लेख काही सुशिक्षित, प्रतिष्ठित दुकानदार आपल्या दुकानाच्या शापील जाहिराती, होल्डिंग, कॅरी बॅग व थैली वर एकेरी उल्लेख शिवाजी चौक कसा करतात. अशा महापुरुषांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणे योग्य नाही त्यामुळे तमाम शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या जात आहे.
म्हणून तहसीलदार हे तालुक्याचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे बाबीकडे लक्ष देऊन संबंधित दुकानदार यांना करत असलेली चूक लक्षात आणून देऊन एकेरी नावाचा उल्लेख त्यांनी करू नये यासाठी आपण आपल्या स्तरावरुन कारवाई करावी यासाठी नांदुरा शहरातील तमाम शिवसैनिक व भीमसैनिक यांच्यावतीने तहसीलदार नांदुरा यांना निवेदन देण्यात आले आहे. असा एकेरी नावाचा उल्लेख पुन्हा त्यांच्या कडून झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी कुणाल वाकोडे,अर्जुन वाकोडे, गणेश पानझाडे, शुभम भिडे, हरिओम ताटे, प्रेम भामन्द्रे, विशाल बगन, देवा वाकडे,सुरज राखोंडे, धम्मा वाकोडे, पंकज गवई , रोहित पहुरकर, गौरव सातरोटे, अभिजित वाकोडे,राष्ट्रपाल सपकाळ,मुकेश,सागर सूर्यवंशी वाकोडे इत्यादी भरपूर लोक उपस्थित होते.

उद्या ठरणार सूनगाव ग्रामपंचायत चा कारभारी (सरपंच)

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत निवडणूक 15 जानेवारी रोजी झाली होती व या वर्षीची निवडणूक जरा हटकेच राहिली त्यादृष्टीने सरपंच निवडणुकीची तारीख उद्या नऊ फेब्रुवारी म्हणजेच मंगळवार रोजी ठरलेली आहे ग्रामपंचायत निवडणूक भाजपा व महाविकास आघाडी यांचे एकमेकासमोर आव्हान होते तरीसुद्धा जनतेकडून या निवडणुकीतून 8 जागा भाजपाला मिळाल्या व 8 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या व एक अपक्ष असा निवडणुकीचा निकाल राहिला सुरुवातीला सरपंच पदाचे आरक्षण काढलेले रद्द झाल्याने बराच गोंधळ उडाला त्यामुळे सरपंचपदाची खात्री नसल्याने उमेदवार खर्च करताना संकोच करताना दिसले होते मात्र आता सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाल्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या सोयीसाठी हा राखून ठेवलेला खर्च होतांना दिसत आहे त्यातच सुनगाव येथील महाविकास विकास आघाडीचा एक सदस्य 18 जानेवारी पासून भूमिगत आहे व तसे दोन्ही गटाकडून सदस्य सहलीला गेलेले आहेत त्यातही सरपंच पदाचे दावेदार असलेले काही उमेदवार बंडाच्या तयारीत आहेत पक्षामधून मधून संधी मिळत नसेल तर काही जणांना सोबत घेऊन विरोधी गटामध्ये मध्ये जाऊन का होईना मात्र सरपंच पद मिळवायचे असा चंग अनेकांनी बांधला आहे व गावातील पुढारी विरोधी गटातील मधील काही सदस्य गळाला लागतील का यासाठी रणनीती तयार करत आहे गळाला लावण्यासाठी सरपंच पदाचे आमिष देणे किंवा लक्ष्मी दर्शन असे आमिष दाखविण्यात येत आहे व सरपंच पदाच्या शर्यतीत असलेल्या उमेदवारांची गाव पुढाऱ्यांकडून मनधरणी चालू आहे परंतु सरपंच मात्र आमचाच असा दावा दोन्ही गटाकडून होत आहे तर सहलीला गेलेल्या सदस्यांची गाडी ठरवून दिलेल्या वेळेच्या पाच मिनिटे आधी ग्रामपंचायत कार्यालय येथे धडकणार आहे ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच पदाची निवडणूक होणार आहे तरी या परिस्थितीत भाजपा गटाचा सदस्य बनतो किंवा महाविकास आघाडी चा सरपंच बनतो याकडे लक्ष लागले आहे परंतु सरपंच कोणत्याही गटाचा होवो मात्र सूनगाव येथील विकास कामे करावी ही अपेक्षा मात्र येथील जनतेने ठेवली आहे

देशाच्या अन्नदाता शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठीच्या आंदोलनास पाठींबा देण्यासाठी कॉंग्रेसचे शेतकरी मेळावा संपन्न,

0

 

यावल ( प्रतिनिधी ) केन्द्र शासनाच्या दडपशाहीमुळे देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या काळया काद्याला तात्काळ रद्द करावे या मागणी करीता गेल्या अडीच महीन्यापासुन दिल्ली येथे शेतकरी बांधव हे आंदोलनास बसले असता त्यांना पाठबळ व पाठींबा देण्यासाठी आज यावल येथे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आल्याचे वक्तव्य कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी व्यक्त केले .आज दिनांक ७ फेब्रुवारी रोजी यावल येथे यावल खरेदी विक्री सहकारी संघाच्या आवारात आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवाच्या संघर्षमय आंदोलनास पाठींबा देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात तालुक्यातील कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते . या शेतकरी मेळाव्याच्या सुरुवातीस दिल्ली येथे आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनात मृत्युमुखी झालेल्या १५५ शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . देशाला स्वातंत्र मिळाले त्या स्वातंत्र चळवळीला कॉंग्रेस पक्षाने एतिहासीक असे संघर्ष करून देशाला स्वातंत्र मिळुन दिले असुन ,आता देखील केन्द्रातील दडपशाही मार्गाने काळे कायद्या करणाऱ्या केन्द्रसरकारच्या तावडीतुन देशाच्या अन्नदाता शेतकरी बांधवांना मुक्त करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे मनोगत कॉंग्रेसच्या मान्यवरांनी व्यक्त केलीत. याप्रसंगी शेतकरी मेळाव्यास उपस्थित तालुक्यातील शेतकरी बांधवांचे तसेच नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेले पक्षाचे सदस्य व भावी सरपंच यांचा ही यावेळी सत्कार करण्यात आले, या मेळाव्यास माजी आमदार रमेशदादा चौधरी , काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान , जिल्हा परिषदचे गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे , जिल्हा परिषद सदस्य आर जी नाना पाटील , डी .जी . पाटील , श्रीधर चौधरी , राहुल बाहेती, पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , नगरसेवक असलम शेख नबी , समीर शेख मोमीन , हाजी गफ्फार शाह, अनुसुचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे , काँग्रेस महीला आघाडीच्या तालुका अध्यक्ष शबाना तडवी , शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष कदीर खान यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते . मेळाव्याची प्रस्तावना प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केली तर सुत्रसंचलन अमोल भिरूड यांनी केले .

यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात दि. ०७ रविवार रोजी अनुसूचित जमातीच्या कर्मचारी व अधिकारी यांची ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेची बैठक संपन्न झाली

0

 

यावल तालुक्याची नविन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. व्यासपिठावर अध्यक्ष स्थानी कवि रमजान गुलाब तडवी , प्रमुख पाहुणे प्रा. के के वळवी सर , संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र बारेला , जिल्हा सचिव प्रकाश वसावे यांच्या उपस्थित घेण्यात आली. बैठकीत मान्यवरानी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेच्या कार्या बद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. नुकताच चार्टर अकाउंटंट (सी.ए.) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेत अंजुमन रमजान तडवी हे परिक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल संघटने तर्फे जिल्हा सल्लागार व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा .के के वळवी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेची यावल तालुक्याची नविन कार्यकारिणीची नियुक्ती पुढील प्रमाणे
यावल तालुका अध्यक्षपदी – अब्दुल रशीद तडवी , सचिव -असलम तडवी , उपाध्यक्ष पदी – मुजाहिदा हुसेन तडवी व अठान भुगवाड्या , कार्यध्यक्ष पदी – युनुस अयुब तडवी , सह कार्यध्यक्ष – हकीम तडवी , प्रसिद्धी प्रमुख – सलिम तडवी , सहसचिव -​ रहीम रशिद तडवी, कोषाध्यक्ष – कादर फत्तु तडवी , संघटक – फुलसिंग किसन बारेला, आरिफ तडवी, सलमा युनुस तडवी व हुसेन नाजिर तडवी , सल्लागार – याकूब आमद तडवी, प्रा. प्रल्हाद पावरा , सुरपाल बारेला व ताराचंद सावसाकडे या सर्वाना मान्यवराच्या हस्ते नियुक्त पत्र देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीला संघटनेचे जिल्हा संघटक नवाज जहांगीर तडवी , डॉ. जयेश पाडवी सर , कोषाध्यक्ष प्रदीप बारेला , न्याजूद्दीन तडवी ,
हुसेन रुबाब तडवी , नामदार तडवी , हुसेन नजीर तडवी यांच्यासह इतर सदस्य उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जहाबीर तडवी सर यांनी केले तर आभार रहिम तडवी यांनी मानले.

फोटो – ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेश संघटनेची यावलतालुका अध्यक्षपदी – अब्दुल रशीद तडवी​