Home Blog Page 545

विद्यार्थी सेना शेंदुर्जन सर्कल पदी आकाश आव्हाळे यांची नियुक्ती !

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

शिवसेना प्रणित विद्यार्थी सेना शेंदुर्जन सर्कल पदी तालुक्यातील सायाळा येथील येथील आकाश आव्हाळे यांची नियुक्ती 19 जानेवारी रोजी विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख सागर समुद्रवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली !शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे .व विद्यार्थी सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना खासदार प्रतापरावजी जाधव ‘व आमदार डॉ . संजयजी रायमुलकर माजी आमदार डॉक्टर शशिकांतजी खेडेकर व युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश रामदास आव्हाळे यांची विद्यार्थी सेना विभाग प्रमुख शेंदुर्जन सर्कल पदी नियुक्ती करण्यात आली !नियुक्तीपत्र देताना विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख सागर समुद्रवार ‘आदित्य काटे ‘ विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख कामरान भाई ‘शाळा माझी सरपंच रामदास भाऊ आव्हाळे सोपान आव्हाळे गोपाल आव्हाळे सचिन आवळे स्वप्निल काटे आदी पदाधिकारी उपस्थित होते ।

रोड रोलर नादुरुस्त असल्यामुळे शिंदी – साखरखेर्डा खड्डे बुजवण्याचे काम एका आठवड्यापासून बंद

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

अतिशय महत्त्वाच्या अशा व संपूर्णपणे उखडून गेलेल्या शिंदी ते साखरखेर्डा रस्त्याचे कामगेल्या आठवडा भरापासून रोड रोलर नादुरुस्त असल्यामुळे बंद आहे.

साखरखेर्डा ते रताळी फाटा पर्यंतच खड्डे बुजवण्याचे काम झालेले असून खड्डे बुजवले नंतर त्यावर चूर टाकले.

  बातमी तेच जे सत्य आहे एक क्लिक वर पूर्ण बातमी

https://www.suryamarathinews.com/post/8188

 

 

जातोहा चूर टाकल्यानंतर दुचाकीस्वारांना गाडी स्लिप होण्याचा मोठा धोका असतो.

साखरखेर्डा ते शिंदे भारुड पूर्णपणे झाला असून त्यावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते परंतु आठवडा भरापासून रोडरोलर रस्त्याच्या बाजूला उभे असून ते नादुरुस्त आहे.

असे सांगण्यात येत आहे ‘त्यामुळे शिंदी ते साखरखेर्डा खड्डे बुजवण्याचे काम कासवगतीने सुरु आहे.

काम करणारे मजूर याचे सुद्धा दुसऱ्या कामावर स्थलांतरित करण्यात आले आहे.

आता नेमके काम कधी सुरू होणार हा प्रश्न दुचाकी वाहन धारक विचारत आहेत !

सततच्या नापिकीला कंटाळून युवा शेतकऱ्याची आत्महत्या !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून बाळसमुद्र येथील युवा शेतकरी रामेश्वर मेरत यांनी 20 जानेवारी रोजी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील बाळ समुद्र येथील रामेश्वर मेरत त्यांच्याकडे सहा एकर शेती आहे शेती मशागतीसाठी त्यांनी व इतर लोकांकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतली आहे.

 ही बातमी पण पहा एक क्लिक

https://www.suryamarathinews.com/post/8184

 

परंतु सततच्या अतिवृष्टी तसेच पिकांचे होणारे नुसकान यामुळे पाहिजे तसे उत्पन्न होत नव्हते त्यामुळे कर्ज आणखीनच वाढत गेलं अशातच निराश होऊन त्यांनी 16 जानेवारीला विषारी औषध प्राशन केले होते .

त्यांना तातडीने बुलढाणा येथे दवाखान्या मध्ये दाखल केले होते तेथे उपचार सुरू असताना 20 जानेवारी रोजी दुपारी रामेश्वर मेरत त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या पश्चात त्यांच्या पाठीमागेआई वडील पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.

अतिशय चांगल्या स्वभावाचा रामेश्वर निघून गेल्यामुळे मित्र परिवारामध्ये हळहळ व्यक्त होत आहे !

रोही समोर आल्यामुळे त्याला वाचवण्याच्या नादामध्ये बस रस्त्याच्या कडेला !सुदैवाने चालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

कै .विजय मखमले विद्यालय मलकापूर पांग्रा जवळ दिनांक 21 जानेवारी च्या सकाळी सात वाजेच्या सुमारास लोणार -खामगाव – एम एच – ४० – ८६७८ ही बस खामगाव कडे जात असताना.

अचानक समोर रोही आल्यामुळे रस्त्याच्या उजव्या बाजूला कलंडली ‘रोहिला वाचवण्याच्या प्रयत्नात मध्ये ही बस वाहन चालक यांच्या सतर्कतेमुळे बाजूला कडेला कलंडली.

मोठी बातमी फक्त एक क्लिक वर

https://www.suryamarathinews.com/post/8181

 

 

वाहन आतमोहम्मदयांनी शर्तीचे प्रयत्न करूनही बस कडेला गेली तरीही वाहनचालकाने शर्तीचे प्रयत्न करून बसवर नियंत्रण मिळवल्याने बस आणि बसमधील प्रवाशांना जास्त गंभीर मार लागला नाही.

किरकोळ मार लागला !वाहन चालक मोहम्मद आणि वाहक विशंभर रामकृष्ण निकले हे लोणार -खामगाव बस ने खामगाव कडे निघाले होते.

यामध्ये 14 प्रवासी प्रवास करत होते ।प्रवाशांना किरकोळ मार लागला असून त्यांना तातडीने मलकापूर पांग्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले.

यामध्ये वाहन चालकासह -सुमेध शेजुळे वय १९(‘ बिबी ) -सीमा रवींद्र मूळवकर वय 32 (बिबि )रवींद्र राधाकिसन मुळवकर 3५ बिबि )लता भाऊराव बरबळे वय ४२ बिबी ) एकनाथ मुळे ‘ 62 बिबि )कांताबाई गाईत ६० बिबि )यांच्यासह अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले.

जखमींना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र मलकापूर पांग्रा येथे नेण्यात आलेव त्यावर उपचार करून त्यांना दुसऱ्या बसची व्यवस्था करून रवाना करण्यात आले.

सुदैवाने मोठी दुर्घटना यावेळी तळणी परंतु या निमित्ताने मलकापूर पांग्रा ते दुसरबीड पर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून ते बुजवण्याचे काम सुद्धा करणे गरजेचे आहे

सरपंच पदासाठी आतापासूनच रस्सीखेच !सरपंच पदाच्या आरक्षण सोडत कडे लक्ष !साखरखेर्डा कडे सर्वांचे नजरा !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

नुकताच 18 जानेवारीला सिदखेडराजा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल लागला अनेक ठिकाणी तरुण उमेदवारांना मतदारांनी संधी दिलीतर काही ठिकाणी अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले.

निकाल लागल्यानंतर अनेक ठिकाणी आपले आणण्यासाठी स्थानिक नेत्याला यश आले आहे ‘ सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या व अतिशय संवेदनशील समजल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे परिवर्तन पॅनलचे 17 पैकी 16 सदस्य निवडून आले आहेत .

आता यामध्ये नेमकी सरपंच पदाची माळ साखरखेर्डा गावची कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल !अगोदरच्या सोडत मध्ये साखरखेर्डा सरपंचपद हे सर्वसाधारण .

ही बातमी पहा एक वर सविसर

https://www.suryamarathinews.com/post/8176

आरक्षित होते परंतु त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरपंच पदाचे आरक्षण ठरवण्यात येईल असा निर्णय ग्रामविकास मंत्री यांनी घेतला होता .

!सध्या साखरखेर्डा येथून सरपंच पदाच्या दावेदार साठी जातीय समीकरण याचा विचार केला तर माळी समाजा साठी अजून पर्यंत सरपंचाची माळ त्यांच्या गळ्यात पडली नाही.

!जर शिंगणे साहेबांनी ठरवलं तर श्रीमती कौशल्याबाई मंडळकर .ह्या पहिल्या टर्ममध्ये सरपंच होऊ शकतात !दुसऱ्या बाजूने अल्पसंख्याक समाजाचा विचार केला.

तर ‘ज्येष्ठ कार्यकर्ते सय्यद ‘दाऊद सेट कुरेशी ‘यांचाही विचार होऊ शकतो ‘तर दुसऱ्या बाजूने आतापर्यंत असे घडले नाही.

असे रावसाहेब देशपांडे हे सुद्धा सरपंच पदाचे दावेदार असू शकतात.

शेवटी आरक्षणाच्या सोडती नंतरच निर्णय होऊ शकेल !मात्र सध्या सरपंचपदासाठी प्रत्येक गावामध्ये बिल्डिंग लावणे सुरू झाले आहे !

न प जळगाव जामोद च्या शिक्षण समितीच्या सभापती पदी महाविकास आघाडीचे नगरसेवक मा श्री रमेश ताडे यांची निवड

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

स्थानिक न प सभागृहात दिनांक 21 जानेवारी 2021 रोजी पार पडलेल्या सभेत महाविकास आघाडीचे गटनेता तथा काँगेस कमिटी शहर अध्यक्ष अर्जुन घोलप यांनी रमेश ताडे यांचे नाव सुचविले तर नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांनी अनुमोदन दिले.

 

ही बातमी नक्की पहा

https://www.suryamarathinews.com/post/8170

 

पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार मा शिवाजी मगर साहेब यांनी संख्याबळानुसार रमेश ताडे यांची शिक्षण समिती सभापती म्हणून घोषणा केली.

काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा राहूल भाऊ बोन्द्रे तसेच काँग्रेसच्या पक्षनेत्या मा डॉ सौ स्वातीताई वाकेकर, प्रदेश प्रतिनिधी मा रमेशचंद्र घोलप, जिल्हा उपाध्यक्ष मा प्रकाश पाटील,काँग्रेस नेते मा रामविजय बुरुंगले,महिला काँग्रेस अध्यक्षा मा ज्योतीताई ढोकने,

तालुकाध्यक्ष मा अविनाश उमरकर यांच्या सोबत तसेच आघाडीचे सर्व नगरसेवक यांच्यासोबत चर्चा करुन व शिवसेना गटनेते मा गजानन वाघ यांना माहिती देऊन अर्जुन घोलप यांनी उपरोक्त निर्णय घेतला व शिवसेना नगरसेवक रमेश ताडे यांचे नाव सुचविले.

सभेनंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवडीबद्दल जल्लोष केला तसेच शिवसेना तालुका प्रमुख तथा गटनेता गजानन वाघ यांनी आघाडी धर्म पाळल्याबद्दल काँग्रेस गटनेता अर्जुन घोलप तथा काँगेस चे सर्व नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

याप्रसंगी नगरसेवक श्रीकृष्ण केदार,नितीन ढगे, कलीम खा हुसेन खा,सौ चित्राताई इंगळे, ऍड संदिप मानकर व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शासनाने कोरोना काळातील वीज बिल माफ करावे.जनसाण्याचा अंत बघु नये.-गोपाल तायडे.

0

 

वैश्विक कोरोना महामारीमोळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता शासनाला प्रतिसाद म्हणून सर्वसामान्य जनता ही घरी राहून व कुठल्याही कमावर्ती न जाता लोकडाऊन चे संपूर्ण पालन केले.

एक क्लिक वर बातमी पहा

https://www.suryamarathinews.com/post/8165

 

तसेच सर्वसामान्य जनता रोजगारावर न गेल्या मुळे आर्थिक संकटात सापळली होती.

अश्यातच वीज बिलात सवलत देण्याचे आश्वासन मा.नितीन राऊत
(ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी दिले व्होते.

परंतु मध्यंतरी वीज बिलात कोणतेही सूट मिळणार नाही असे घूमजाव करीत. जनतेची दिशा भूल केली.

सध्या शेगाव शहरात महावितरण कंपनीने वीज बिल वसुलीची मोहीम हाती घेतल्या मुळे .

शेतकरी व सर्वसामान्य जनता धास्तावलीली आहे. ऊर्जा मंत्र्यांनी आपल्या आश्वासनावर कायम राहत शासनाने कोरोना काळातील सर्व सामान्यांचे वीज बिल माफ करावे. सर्वासामान्याचा अंत बघू नये.

वीज बिल माफ व्हावे करिता स्वाभिमानी शेतकरी संघटना वारंवार पाठपुरावा करीत असून शासनाने जनसंण्याच्या मांगणी मान्य करून त्वरित वीज बिल माफ करावे.

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथे ग्रामपंचायत सदस्य पळवापळवीच्या राजकारणाला वेग

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रा प्रमाणे येत्या 27 जानेवारी रोजी ग्रामपंचायत सरपंच पदाचेआरक्षण जाहीर होणार आहे त्यानंतर दोन दिवसांनी महिला आरक्षणाची सोडत.

जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे परंतु सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्यांची पळवापळवी सुरू झाली आहे त्यामुळे अगदी समसमान जागा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या गटाचा सरपंच होईल.

ही बातमी पण पहा

https://www.suryamarathinews.com/post/8165

 

याबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे अशातच सूनगाव येथे भाजपा समरथीत पॅनलचे 8 व आघाडी समरथीत 8 असे सदस्य विजयी झाले.

व एक अपक्ष व अपक्ष सदस्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्याने आघाडीचा सरपंच होईल असे चित्र तयार झाले असतानाच आघाडी गटाचा एक सदस्य 15 जानेवारी रात्रीपासून भूमिगत असल्याची चर्चा आहे .

असे चित्र कमी-अधिक प्रमाणात अन्य ग्रामपंचायतीमध्ये ही सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर दिसणार आहे ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणूक पक्षीय चिन्हावर लढविल्या जात नसल्याने हा पक्षांतराचा कायदा लागू होत नाही .

त्यामुळे एका गटाच्या सदस्यांनी दुसऱ्या गटाला सहकार्य केले तर त्याचे सदस्यत्व रद्द होत नाही त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर हे फोडाफोडीचे राजकारण पाचही वर्ष चालत राहणार आहे

अमरावती विभागातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र घा _ कुणाल ढेपे यांची मागणी _

0

 

 

सीईटी , बीबीए , एमसीए आवश्यक असलेल्या जात पडताळणी प्रमाणपत्र साठी विद्यार्थ्यांना मध्ये चांगलाच गोंधळ उडाला आहे.

या प्रमाणपत्रा अभावी राज्य भारतील शेकडो विद्यार्थ्यांनावर उपरोक्त शाखेतील प्रवेशपसुन वाचिंत राहण्याची वेळ आली आहे तरी हे प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी कुणाल ढेपे यांनी केली.

आरक्षित जागेवर प्रवेश मिळावा यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांना अमरावती येथील जात पडताळणी विभागाकडे प्रस्ताव सादर करावा लागतो .

 

ही बातमी नक्की पहा

https://www.suryamarathinews.com/post/8162

 

या प्रमाणपत्रासाठी किमान 30दिवस किवा त्यापेक्षाही अधिक कालावधी लागतो .

त्यामुळे राज्य भारतील हजारो विद्यार्थ्यांचे प्रेवेश सादर प्रमापत्राअभावी थब्लेला आहे. विविध मुदतीच्या आत हे प्रेवेष दिले जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना कमी दिवसात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवणे शक्य नाही.

राज्यातील 99कॉलेज साठी 10 हजार 45 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरत होते .

परंतु जातवैधता डबयू . एस . प्रमाणपत्र वेळेत मिळाले नाही .त्यामुळे हजारो विद्यार्थी प्रेवेशा पासुन वंचित
राहणार असल्याची भीती व्यक्त होत आहे .

जात पडताळणी विभागाकडून हे प्रमाणपत्र प्रस्ताव सादर केल्या नंतर होत होत द्यावे अथवा उप्योगत्य शखे साठी प्रेवेश मुदतवाढ मिळावी अशी मागणी कुणाल ढेपे , शुभम आमडरे , यांनी सरकार कडे केली

सरपंच पदांचे महिला आरक्षणाची सोडत 29 जानेवारी रोजी काढणार

0

 

अजहर शाह मोताळा

बुलडाणा:- ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील 870 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम चे कलम 30 अन्वये तसेच मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार सन 2020 ते 2025 दरम्यान जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीद्वारे गठीत होणाऱ्या सरपंच पदांचे आरक्षण 27 जानेवारी 2021 रोजी तहसिल स्तरावर निवडणूक अधिकारी तथा तहसिलदार हे निश्चित करणार आहे.

 

बातमी आवश्यक पहा

https://www.suryamarathinews.com/post/8158

तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग अंतर्गत स्त्रीयांकरीता व खुल्या प्रवर्गाअंतर्गत स्त्रीयांकरीता आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली 29 जानेवारी रोजी स. 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे आयोजित करण्यात आली आहे.

तरी याबाबतची नोंद सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरीकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी कळविले आहे.